Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

महाभारत १२६ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

महाभारत १२६
महाभारत १२६

 


                        महाभारत १२६

    धर्मराज युधिष्ठिर इकडून तिकडे सारखे येरझाऱ्या घालत
होता. त्यांच्या मनात अनेक विचार सुरू असतात. तेवढ्यात
तेथे वासुदेव कृष्ण आले नि त्यांनी विचारले," मोठ्या दादा कोणत्या विचारात पडले आहात एवढे ?"
     " वासुदेव माझे अनुज माझ्यावर फार नाराज आहेत."
     " का बरं ?"
      " बर्बरीक बद्दल जो मी  निर्णय घेतला तो चुकीचा आहे, असं त्यांचं मत आहे, आपले पण मत असेच आहे का ?"
     " छे छे छे ! आपला निर्णय कधीही चुकीचा असू शकत
नाही. कारण कमळ कुंज मध्ये कमळच उगवणार तिथे काटे
असू शकत नाहीत. आपण तेच केलं ज्याची आपल्या कडून
सदैव अपेक्षा केली जाते. अर्थात आपण नेहमी प्रमाणे धर्माचे
कार्य केले आहे."
    " असं जर आहे , तर आपल्याही चेहऱ्यावर असंतुष्टाचे भाव का दिसत आहेत , जसे माझ्या अनुजांच्या चेहऱ्यावर उमटले आहेत."
    " त्याचे काय आहे मोठ्या दादा एखाद्या गोष्टीशी सहमत
होणे वेगळी गोष्ट आहे, आणि त्याच गोष्टीवर अंतुष्ट होणे ही
दुसरी गोष्ट आहे. सांगायचे तात्पर्य हे की आपल्या निर्णयाशी
सहमत तर होऊ शकतो. परंतु संतुष्ट होता येणार नाहीये."
     " याचा अर्थ असा झाला की माझ्या अनुजांची चिंता एकदम योग्य आहे."
     " जर आपला निर्णय योग्य आहे , तर त्यांची चिंता ही
तेवढीच योग्य आहे."
     " परंतु त्यांची चिंता काय आहे ?"
     " आपल्या सैन्याची सुरक्षा बद्दल चिंता करणे तितकेच
बरोबर आहे."
     " बर्बरीक आमचा नातू आहे, तो जर आमच्या सैन्यातून
युध्द करू इच्छित असेल तर अत्यन्त चांगली गोष्ट आहे. तो
आपल्या अद्भुत बाणांनी कुरुसैन्याचा संहार करील."
     " एकदम बरोबर मोठ्या दादा ,परंतु त्यानंतर काय ?"
     " त्यानंतर काय  दुर्योधन युध्द हरून जाईल."
     " एकदम चूक."
     " ते कसं ?"
     " ते असं बर्बरीकाच्या बाणांनी कुरुसैन्याचा संहार झाल्या
नंतर दुर्योधन हरणार नाही तर एकदम दुर्बल होईल. त्यामुळे
होईल काय बर्बरीकाने आपल्या गुरू ला दिलेल्या वचना
प्रमाणे दुर्योधनाच्या पक्षात सामील होईल. मग आमच्या सैन्याचे काय होईल ? तशी पण कुरुसैन्या पेक्षा आपली सैन्या फार कमी आहे. अश्या परिस्थिती मध्ये आपल्या सैन्याची सुरक्षता कशी करायची ? या संबंधी मी विचारत करत आहे, म्हणून मी आपल्या मताशी सहमत  आहे, परंतु संतुष्ट
नाहीये."
     " या बद्दल तर मी विचारच केला नव्हता. फार महाभयंकर विनाश होऊ शकतो. अश्या परिस्थिती मध्ये आपणच काही ना काही उपाय काढू शकता, आणि मला खात्री आहे की आपण यावर उपाय सुध्दा शोधून काढला असणार."
     " उपाय अजून सापडला नाहीये. परंतु त्या संदर्भात विचार अवश्य करतोय. जसे की साप पण मरेल नि काठी
सुध्दा तुटणार नाहीये. असा उपाय शोधतोय मी !"

      अर्जुन सुध्दा मोठ्या चिंते मध्ये विचार करत आहेत, तेवढ्यात तेथे द्रौपदी आली. तिला पाहून अर्जुन म्हणाले,"
     " ये पांचाली !"
    द्रौपदी ने अर्जुनच्या चिंतामय चेहऱ्याकडे पाहून म्हटले,
मला तर वाटलं होतं विचारात मग्न राहण्याचा मक्ता फक्त
आपल्या जेष्ठ बंधूनी घेतला आहे, परंतु आपल्या कडे पाहिल्या नंतर असं वाटत नाही की मी लावत असलेले अनुमान योग्य होतं !" त्यावर अर्जुन म्हणाला ," आम्ही सर्वजण चिंते मध्ये आहोत पांचाली !"
    " चिंता कशाची ? बर्बरीकाची तो तर आपला पुत्र आहे,
वशंज आहे, आणि तो जे काय करील ते आपल्या कुटूंबाच्या
हिताचेच करील ना ? त्याची कशाला चिंता करायला हवी ?"
     " आम्हाला बर्बरीकाची चिंता नाहीये पांचाली ! आम्हाला
चिंता आहे त्याच्या जवळ असलेल्या सिद्धीची ! त्याची गुरूवर असलेल्या निष्ठतेची ! "
     " मी समजले नाही आपल्याला काय म्हणावयाचे आहे ते."
    " बर्बरीकाचा न्याय अन्याय, धर्म अधर्म याच्याशी काहीही
संबंध नाहीये. कारण त्याने आपल्या गुरुला वचन  दिलंय की तो सदैव निर्बल लोकांची मदत करणार म्हणून.अर्थात तो युध्द आमच्या पक्षातूनच प्रथम करील, परंतु जसा दुर्योधनाचा पक्ष निर्बल होईल तसा तो दुर्योधनाच्या पक्षातून लढेल.मग आमचं काय होईल सांग आपलाच पुत्र आपल्या विनाशाला कारणीभूत ठरेल. म्हणून आम्ही पाची ही भाऊ चिंतीत आहोत. आणि फक्त आम्हीच नाही ते वासुदेव सुध्दा चिंतेत आहेत."
    " वासुदेव चिंतीत ....छे छे छे ! हे कसं शक्य आहे, वासुदेव
तर स्वतःच प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहेत. ते कसे काय चिंतीत
असू शकतील?  मला अजिबात खरं नाही वाटत हे."
    " म्हणजे मी खोटं सांगतोय का ?"
     " नाही नाही मला असं नव्हतं म्हणायचं चुकून बोलून गेले. माफी असावी आणि मी जाते आपल्या प्रश्नाचे उत्तर
मिळवायला."
     " कुठं निघालीस ?"
     " तिथंच जिथं प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळेल."
     " अर्थात वासुदेव कडे."
     "  हो तिथंच ! जिथं प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळेल मला."
    असे म्हणून द्रौपदी तेथून निघाली ती थेट वासुदेव कृष्णाच्या कक्षेत आली. तेव्हा तिने समोरील दृश्य पाहून आश्चर्य व्यक्त करत म्हटले," मला वाटलं होतं की चिंता फक्त आम्हां माणसानाच असते. परंतु इथले दृश्य पाहून असं वाटत नाही की माझा तर्क बरोबर आहे? कारण इथं स्वतः ईश्वर सुद्धा स्वतः चिंतीत आहे."
   " हो कारण परिस्थितीच तशी ओढवली आहे. आपले ओठ
नि आपलेच दात त्यामुळे दोष कुणाला द्यायचा बरं ? बरं ते
जाऊ तू का आलीस इथं ते सांग बरं."
     " मी ही तेच विचारला आली."
     "  ते काय ?"
     " ते आपलं....चिंता कशाची करताय म्हटलं."
     " चिंता अनेक प्रकारची असते. कोणाला धन आपले चोरीला जाऊ नये याची चिंता असते, तर कोणाला दुसऱ्या चे धन आपल्याला कसे मिळेल याची चिंता असते , तर कोणाला मनाची चिंता असते की योजलेले काम होईल की नाही ? तर कोणाला आणखीन कशाची चिंता असते. तू कोणत्या चिंते विषयी बोलते आहेस ?"
    " वा हे बरं आहे, प्रश्न पण मीच विचारायचा नि उत्तर पण
मीच द्यायचे !"
     " अर्थात तू प्रश्न कोणत्या संदर्भात विचारलास हे मला
कसं कळणार ?"
    " आपल्या कळलं नाही असं कसे होईल बरं ? कोणाच्या
मनात काय चाललं आहे, हे आपल्या शिवाय दुसरं कोणाला कळणार आहे ? तेव्हा चेष्टा करायची सोडा नि मुद्यावर या."
     " पांचाली, बर्बरीक माझ्या चिंतेचा विषय आहे, तो आपल्या गुरू कडून तीन सिद्धीमंत्र घेऊन आला आहे नि
त्याची ढाल अद्याप उपलब्ध झालीच नाहीये."
     " ही तर सर्वात चांगली गोष्ट आहे ना ?"
    " जे ऐकायला चांगले वाटते ते चांगले असेलच असं नाहीये. जसे की कुऱ्याडीचा दांडा गोत्यास काळ ! अगदी
तसेच आहे हे."
     " असं कसं म्हणता त्याच्या कडे सिद्धीमंत्र बाण आहेत
तर आपली शक्ती वाढेलच ना ?"
     " हां परंतु तो आपल्या सोबत राहिला तर ! परंतु
कुरुसैन्याला जाऊन मिळाला तर आपल्यासाठी फार मोठी
समस्या उभी करील."
     " पण तो असं का करेल ? तो तर आमच्या नातू आहे , आमच्या परिवारातील एक सदस्य आहे,त्यांच्या धमणीत आमचे रक्त धावत आहे, तो कुरुसैन्यात का जाईल बरं ?"
     " कारण त्याला त्याच्या गुरूचा आदेश आहे ,की ज्याचे
सैन्य निर्बल असेल त्याला त्याने मदत करायची आहे,पांचाली कौरव असत्याचे प्रतीक आहे, आणि असत्य जेवढे बाहेरून शक्तिशाली वाटते तेवढेच आतून ते दुर्बल असतं. अर्थात कौरवांची दुर्बलता जास्त दिवस लपून राहणार नाहीये.
लवकरच बाहेर येईल. आणि असं झालं तर बर्बरीक कौरवांना जाऊन मिळेल. बर्बरीकावर विश्वास करणे म्हणजे अग्निला आपली तहान भागवायला सांगणे. त्याच्या गुरूचा आदेशच आपल्या सर्वनाशाला  कारणीभूत ठरेल."
    " मग काय झालं ? जर त्याचा गुरू विजयसिद्धीसेंन आहे
तर आपण सुध्दा त्याचे प्रथम गुरू आहात."
    " हां परंतु मी त्याच्या कडून कोणते वचन घेतले नव्हते."
    " तेव्हा नाही घेतलेत तर आता घ्या."
    " हे तर तहान लागल्यानंतर विहीर खोदायला घेण्यासारखे
आहे, नदीला पूर आल्यानंतर नदीला बांध नाही घालता येणार."
     " पण त्याने हे वचन दिलेच का ?"
    " ती फार मोठी कहाणी आहे, परंतु  तुला ती ऐकायला
लागेल." असे म्हणून वासुदेव कृष्णाने कथा सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले ," तुझी  वहिनी सत्यभामा माझी
वाट पाहत होती आणि माझ्या आठवणीने तिच्या कोमल कंठातून सुमधुर स्वर उमटत होते. तेवढ्यात मी तेथे पोहोचलो. तेव्हा ती माझ्या कडे न पाहता फक्त माझ्या जवळ असलेल्या मणीलाच निरखून पाहत राहते. तेव्हा मी तिला म्हणालो, " सत्यभामा !"
    " हूं sss
    " तू ह्या मणी ला सदैव निरखून पाहत असतेस नि मला
विसरून जातेस.होय ना ?" त्यावर ती काहीच बोलली नाही. तसे ते पुढे म्हणाले ," काय विचार करू लागली आहेस ?"
    " मी विचार करते की हा मणी तर माझ्या पेक्षा भाग्यवान आहे , जो सदैव आपल्या सोबतच असतो."
    " परंतु तू आमच्या हृदयात सदैव विराजमान असतेस.?
    " त्याचे कारण सुध्दा हा मणीच आहे ना, आपल्याला
आठवते जेव्हा आपण हा मणी घेऊन पिताश्री जवळ आले
होते. तेव्हा आपल्याला प्रथम दर्शनी पाहिले. आणि ह्या मणीला पाहून मी आपल्याला माझं हृदय देऊन बसली."
      " परंतु ह्या मणीनेच मला चोर ठरविले होते. तुला आठवत असेलच तुझ्या पिताश्रीनी  या मणी मुळेच मला
चोर ठरविले होते."
    " तो तर खोटा आरोप केला होता आपल्यावर, आणि
त्यामुळेच लाजेच्या खातीर पिताश्रीनी माझा हात आपल्या
हाती दिला. परंतु आपण चोर तर आहेतच नंदलाल."
     " ते कसे काय ?"
    " विसरलात ? आपण लहान बालक होता तेव्हा साऱ्या
गोकुळ वाशियांचे लोणी चोरून खात होता. आणि जसे मोठे
झाले तर चितचोर बनलेत. आता ही गोष्ट वेगळी की आपण
लोणी चोरून खायचे ते साऱ्या गोकुळ वाशियाना माहीत
असायचे परंतु जेव्हा चितचोर बनलेत तेव्हा मात्र मी आपले
हृदय आपल्याला देऊन टाकले."

    तेवढ्यात तेथे इंद्रदेव प्रगट झाले. इंद्रदेवाला वासुदेव कृष्ण
म्हणाले ," या इंद्रदेव आपले स्वागत आहे."
    " आपल्या एकांत भंग केल्याची क्षमा असावी !"
    " वाऱ्या ची एक जुळुक सरोवराचा एकांत भंग करत नाही देवराज इंद्र तो तर सरोवरातील लाटांना हालचाल चा संदेश
ऐकवितो. अर्थात काम ही तसे असाधारणच असेल."
    " हां असाधारणच आहे, प्रागज्योतिषपूरचा राजा नरकासुरने देव माता अदितीची कुंडल आणि वरुण देवाचे छत्र घेऊन आणि देवलोकांचा मणी घेऊन गेलाय.
     " त्याला माहित नाही काय माता अदिती चे देवता मध्ये काय स्थाम  आहे ते."
    " कुंडल आणि छत्र चोरून नेलं त्या बद्दल त्याला मी क्षमा
देखील केली असती. परंतु पृथ्वी वरील सोळा हजार एकशे नारींचे त्याने अपहरण केले आहे, आणि त्या नारींचे सतित्व तो भंग करू पाहत आहे."
     " त्याला माहित नाही काय ? नारी जात सन्मानाचे  प्रतीक  आहे ,कारण नारीच्या उदरातूनच सभ्यता जन्माला येते. नारी संपूर्ण ब्रम्हांडाचे सौंदर्याचे रहस्य आहे. कुंडल आणि छत्र चोरण्याच्या अपराधाला मी क्षमा केलीही असती. परंतु नारीचा अपमान करणाऱ्या क्षमा अजिबात केली जाणार नाहीये. त्याला त्याचा दंड अवश्य मिळेल. मी स्वतः जाऊन माता आदीतीची कुंडले आणि वरुण देवाचे छत्र आणि सोळा हजार एकशे नारींची नरकासुरच्या तावडीतून सुटका करून आणीन."
     " वासुदेव नरकासुरा पर्यंत पोहोचणे एवढे सोपे नाहीये.
त्याचा सेनापती मुर आणि त्याची कन्या मोर्वी ह्यांनी कडक
सुरक्षा बंदोबस्त ठेवला आहे. त्यामुळे प्रागज्योतिषपूर मध्ये
प्रवेश अशक्य आहे."
     " पापी आणि अत्याचारी लोकांची ताकद मेना सारखी असते. बाहेरून तर कडक दिसते. परंतु अग्नि ची छोटीशी
झलक जरी तिला लागली तरी मेन वितळू लागते. आपण
चिंता करू नका, मला प्रागज्योतिषपूर ची सीमा रोखू शकत
नाही." वासुदेव कृष्ण जाण्यास निघाले तशी सत्यभामा उद्गारली ," थांबा. आपण एकटे नका जाऊ. का ते माहीत नाही .परंतु मला असं वाटतं की प्रागज्योतिषपूर मध्ये माझी आपणास मदत होईल."
     " बरं चल." असे म्हणून दोघेही तेथून निघाले.

     नरकासुरच्या सेनापती मुर ने येऊन सूचना दिली की
देवराजच्या विनंतीला मान देऊन स्वतः द्वारकाधिश आपल्या वर चाल करून  येत आहेत."
    " येऊ देत तू फक्त प्रागज्योतिषपूरच्या सीमेवर पक्का
बंदोबस्त काय केलास तेवढं फक्त सांग." तेव्हा सेनापती मुर म्हणाला ," सीमेवर अदृश्य विद्युत तारा आहेत .शत्रू सैन्य सीमेच्या आंत येऊ शकणार नाहीये. खात्री नसेल तर स्वतः जाऊन पाहावे."
    " मी अवश्य येऊन पाहणार ."
    " चालावे आपण." असे म्हणून सेनापती मुर  दानवराज नरकासुराला घेऊन राज्याच्या सीमेवर येतात. तेव्हा उलट्या
लटकलेल्या तलवारीकडे आपले बोट करून सेनापती मुर
म्हणाला," ते पहा दानवराज !"
    " मला त्याचा प्रयोग करून दाखव." तसा सेनापती मुर
एका सैनिकाला म्हणाला ," ते विद्युत तारांचे जाळं आहे त्यावर तलवार मारून दाखव." सैनिक गेला नि तलवार फक्त
टेकविली. तेथे भडका उडाला  नि तो सैनिक वर फेकला गेला."
    तेव्हा नरकासुर म्हणाला ," लक्ष ठेवा बरोबर. वासुदेव कृष्ण महाचालाख आहे, तो काही ना काही उपाय अवश्य
शोधून काढेल."
    " आपण अजिबात चिंता करू नका महाराज, जर युध्द
झालंच तर माझी पुत्री मोर्वी कृष्णाच्या सैन्याच्या रक्ताची नदी
वहायला भाग पाडेल." त्यावर सगळेच खळखळून हसले.

       मोर्वी कामाख्या देवीच्या पूजे मध्ये लिन होती. तेव्हा
सेनापती मुर तेथे आला. परंतु आपल्या कन्येला पूजे मध्ये
लिन पाहून चुपचाप उभा राहिला. पूजा आटोपल्यानंतर मोर्वीने मागे वळून पाहिले . तेव्हा तिचे पिताश्री तिच्या मागे उभे असलेले तिला दिसले. तेव्हा तिने आपला पिताश्री ला प्रणाम केला. तेव्हा तिला आशीर्वाद देत म्हटले ," आयुष्यमान भव !"
    " आपण कधी आलेत पिताश्री ?"
    " आत्ताच थोड्या वेळापूर्वी आलो .परंतु तुला पूजे मध्ये
लिन पाहून पूजेत विघ्न नको म्हणून गप्प राहिलो. पण तू मागत काय होतीस देवी कडे नाही म्हणजे तू  देवी कडे जे जे
मागीतलेस ते सर्वकाही देवीने दिले म्हणजे , खड्ग , त्रिशूल, आणि शक्ती अजून काय हवंय तुला ?"
     " तेच जे प्रत्येक कन्येला हवं असतं त्या शिवाय तिचे जीवन पूर्ण होत नाही . मी वर मागत होते माझ्यासाठी देवीकडे. परंतु आता मलाही असं वाटू लागलंय की मला मिळालेली शक्ती माझ्यासाठी अभिशाप बनली आहे."
    " ती का बरं ?"
    " मी विवाहासाठी ठेवलेली अटच आता माझ्यासाठी
अडचण निर्माण करणारी ठरली , कारण मी विवाहासाठी अशी अट ठेवली की जो पुरुष मला शस्त्र विद्येत नि शब्दविद्येत पराजित करील त्याच्याशीच मी विवाह करेन.
परंतु असा एक ही राजकुमार मिळाला नाही. जे येतात ते
माझ्या कडून पराजित होऊन मृत्युमुखी पडतात. जे हात
मेहंदी ने रंगण्यासाठी तरसत आहेत, तेच हात राजकुमारांच्या रक्ताने लाल होत आहेत."
    " मी तुझं दुःख समजू शकतो , परंतु ही वेळ दुःख करण्याची नाहीये. कृष्ण आमच्यावर आक्रमण करण्यासाठी
येत आहे, तेव्हा महाराजांची सुरक्षा करणे आपले प्रथम कर्तव्य आहे." तेव्हा मोर्वी म्हणाली ," महाराजाना म्हणावे
चिंता करायची सोडा. कोणीही शत्रू विद्युत तारांचे कुंपण पार
करू शकणार नाही. आणि समजा कोणी पार केलेच तर कामाख्या देवीचे खड्ग, त्रिशूल , आणि माझी शक्ती पुढे  कुणीही वाचणार नाहीये. श्रीकृष्ण येताहेत ना येऊ दे त्याना पण ! पाहतेच मी !" मोर्वी उद्गारली.

    वासुदेव आपले सैन्य घेऊन प्रागज्योतिषपूर राज्यावर
आक्रमण करण्याच्या हेतूने तेथे येऊन पोहोचले. उलट्या
लटकत असलेल्या तलवारी ना पाहून कुत्सितपणे सेनापती
म्हणाला," इंद्रदेव ह्या विद्युत तारांच्या जाळ्याला पाहून घाबरला, हे तर विद्युत तारा एकदम निर्बल वाटतात."
    त्यावर वासुदेव कृष्ण म्हणाले," सेनापती विद्युत तारा दिसताहेत .परंतु त्या आंत मध्ये दडलेले मायाजाळ दिसत
नाहीये. देवराज इंद्राने उगाच नाही सांगितले आहे , त्या मागचे
रहस्य जाणून घेतल्याशिवाय त्या जवळ जाणे योग्य नाहीये."
    " जवळ जाऊन तपासून पाहू का ?" सेनापती ने विचारले.
    " अजिबात नाही. मुर एक कुशल शिल्पी आहे, त्याने
आकाशातील वीज धर्तीवर आणली आहे, तो काही सामान्य
व्यक्ती नव्हे ! तेव्हा घाई अजिबात करू नका."
    " जशी आपली आज्ञा वासुदेव ! सर्वकाही आपल्या अज्ञेनुसार होईल." असे म्हणून एका सैनिकाला विद्यतु तारांकडे पाठविले. जसे त्या सैनिकांने आपली तलवार त्या
अदृश्य तारांवर चालविली. तसा एक भला मोठा अग्निचा जाळ उठला नि तो सैनिक वर उडाला. तेव्हा सत्यभामा
म्हणाला ," मोर्वी ने कामाख्या देवीला प्रसन्न करून वरदान
मिळविले आहे, परंतु माझ्या जवळ सुध्दा सुर्यदेवा कडून
मिळालेली शक्ती आहे, त्या शक्ती पुढे ही विद्युत तारांची
शक्ती चालणार नाही. मी पार करीन हे तारांचे मायाजाल !"

क्रमशः



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..