महाभारत १३१ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाभारत १३१ |
महाभारत १३१
बर्बरीक म्हणाला, " आजोबा दुर्योधनाना जेव्हा माहीत
होईल की त्यांची हटधर्मी धर्म नाहीये धर्म न्याय आहे, आणि अंतिम विजय धर्माचाच होतो ." त्यावर वासुदेव कृष्ण म्हणाले ," आणि जोपर्यंत विजय धर्माचा होत नाही तोपर्यंत
अर्धमाशी लढावेच लागते , आणि ते करत असताना त्रास सोसावाच लागतोच. तुझा परिवार सध्या तेच करत आहेत."
" आजी तेच सांगते की आजोबा दुर्योधनाच्या महत्वकांक्षेचा अंतच नाहीये."
" हां वत्स ! महत्वकांक्षा अश्वासारखी असते. जर अश्वाच्या
नाकात संयमाची लगाम घातली गेली नाही तर तो पण बेफाम उधळेल. त्यामुळे त्याला काबू मध्ये आणणे आवश्यक आहे."
" आजोबा आपल्याला असं तर नाही म्हणायचंय ना की वेळेच्या अभावी कारण आपण मला आपला शिष्य बनवू शकत नाहीये."
" हे कारण तर आहेच शिवाय अजून एक कारण आहे."
" अजून कोणते कारण आहे ?"
" त्याची तुला गरज आहे नि त्याला तुझी ! अर्थात तुला जी विद्या शिकायची आहे, ती विद्या माझ्या व्यतिरिक्त विजयसिद्धीसेंन नावाचे ब्राम्हण गुरू आहेत तेच तुला देवू शकतील."
" कोण आहेत ते आणि कोठे राहतात ?"
" इथून खूप दूर पूर्व दिशेकडे जा तेथे एक सरोवर आहे त्या सरोवराच्या काठी तुझी नि त्याची भेट होईल. त्याना माझा प्रणाम सांग की मी तुला त्यांच्याकडे कशासाठी पाठविले आहे तेही सांग.ते तुला सर्वकाही शिकवतील ज्याची तुला आवश्यकता आहे."
" मी त्यांच्याकडे अवश्य जाईन आजोबा. त्यांची माहिती
दिल्या बद्दल मी आपला फार आभारी आहे." असे म्हणून
बर्बरीक ने त्यांचे चरणस्पर्श केले. तेव्हा वासुदेव कृष्ण म्हणाले, " माझा आशीर्वाद तर सदैव तुझ्या पाठीशी आहेच, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव. तुझी विद्या आपल्याच लोकांना
अडचणीत आणू नये म्हणजे झालं आणि तुझ्या कडून योग्य वेळी गुरुदक्षिणा घेतली जाईल."
तेव्हा हिडींबा म्हणाली , " पाहिलेस मी काय म्हणाली
होती तुला की तुला मार्गदर्शन केवळ वासुदेव करू शकतील. कोणता असा मार्ग आहे जो ह्यांच्या चारणा जवळून आरंभ होत नाहीये. ह्यांनी सांगितलेल्या मार्गांनी जा , सफलता तुझी
चरणाजवळ असेल. परंतु तुझ्या आजीला मात्र तुझी फार आठवण येणार."
" मी लवकरच येईन आजी !" तेव्हा हिडींबा म्हणाली ," नाही. आपली विद्या अपूर्ण सोडून तू येऊ नकोस. विद्या
शिकून आल्यानंतर तुला आपल्या कुलाचे नाव रोशन करायचे
आहे. जा तू.....देवा जवळ मी पार्थना करेन की तुझ्या सारखा
मला अजून एक नातू दे म्हणून. जा , वाट पाहीन मी तुझी !" असे म्हणताच त्याने आपल्या आजीचे चरणस्पर्श केले. तेव्हा हिडींबा ने त्याला आयुष्यमान चा आशीर्वाद दिला. त्यानंतर त्याने आपल्या मातोश्रीचे चरणस्पर्श केले. तेव्हा मोर्वी म्हणाली," जा नि यशस्वी होऊन परत माघारी ये."
त्यानंतर त्याने आपल्या पिताश्री चे चरणस्पर्श केले आणि शेवटी वासुदेव कृष्णा चे चरणस्पर्श केले. त्यांनी त्याला
आशीर्वाद दिला. त्यानंतर बर्बरीक तेथून निघाला. दर मजल
दर मजल करीत तो अश्या एका ठिकाणी पोहोचला. तेव्हा
त्यांनी पाहिले की एक सिद्धी पुरुष देवीच्या मूर्ती समोर पूजे मध्ये लिन आहे , आणि काही दुष्ट राक्षस त्याची पूजा भंग
करण्याचा प्रयत्न करत आहेत. बर्बरीक ने पाहिले नि लगेच
आपल्या धनुष्यावर बाण चढवून त्या राक्षसाच्या तलवारी वर
अचूक बाण मारला. जी तलवार त्या सिद्धी पुरुषांचा वध करण्यासाठी वर उचलली गेली होती. बर्बरीक ने सोडलेला
बाण त्या तलवारीत शिरून तो लाकडी खांबातही शिरला. तेव्हा राक्षसा ने रागाने बर्बरीक कडे पाहिले ,तेव्हा बर्बरीक
म्हणाला ," एका पूजे मध्ये लिन असलेल्या योगी मनुष्यावर
आक्रमण करण्यास लाज वाटली नाही काय तुम्हा लोकांना ?" त्यावर त्यातील एक राक्षस म्हणाला ," तुला मध्ये पडायचे काम तू आपल्या मार्गांनी निघून जा नाहीतर स्वतःच्या मृत्यूला कारणीभूत होशील." त्यावर बर्बरीक म्हणाला ," मी असताना त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाहीये. राहिला माझ्या मृत्यूचा प्रश्न तो तुमच्या सारख्या भ्याडांच्या हातून तर मुळीच होणार नाही .हां मात्र तुमची नि यमराज गाठ मी अवश्य घालून देईन." त्यावर एक राक्षस चिडून म्हणाला ," अस्सं ! मग अगोदर तुझाच समाचार घेतो." असे म्हणून त्या चार पाच राक्षसानी एकदम बर्बरीकावर आक्रमण केले. परंतु बर्बरीक यत्किंचितही मागे न हटता त्यांच्यावर तुटून पडला. एक एक करून सर्वांना यम सदनास पाठवून दिले. शेवट राहिलेला राक्षस मरता मरता त्या योगीच्या अंगावर जाऊन पडला आणि त्यांची समाधी भंग पावली. परंतु समोर सर्व राक्षस मरून पडलेले पाहून तो अति प्रसन्न होत म्हणाला ," तू आज माझे प्राण वाचविलेस , नाहीतर हे राक्षस माझी नेहमीच समाधी भंग करत असतात. परंतु बालक तू कोण आहेस ?"
" मी भीमसेन पुत्र घटोत्काचा पुत्र बर्बरीक आहे."
" परंतु तू इथं कसा ?"
" मी विजयसिद्धीसेंन यांच्या कडे चाललो आहे."
" विजयसिद्धीसेंन तर मीच आहे .परंतु तुला माझ्या कडे कुणी पाठविले."
" माझे आजोबा, वासुदेव कृष्णानी मला आपल्या कडे
पाठविले आहे."
" माझ्या कडे पण का ?"
" मला आपला शिष्य बनविण्यासाठी ! मला अश्या शक्तीचा शोधात आहे की ज्या शक्ती मुळे मी अजेय आणि
अपरजिता होईन. आणि त्या शक्ती केवळ आपण मला देऊ
शकता."
" एकतर तू माझा प्राण वाचविलास आणि दुसरी गोष्ट तुला
श्रीकृष्णाने पाठविले आहे, त्यांचा आदेश तर मी डावळू शकत नाहीये. म्हणून मी तुला आपला शिष्य अवश्य बनविन.
परंतु अजून माझी सिद्धी पूर्ण झाली नाही. आणि त्या पूर्ण
करण्यासाठी मला अजून सात दिवस आणि सात रात्री लागतील. त्या सात दिवसात जर तू माझी रक्षा केलीस तर
मी तुला माझा शिष्य अवश्य बनविन."
" आता आपण एकदम निर्धास्त पणे आपले द्यान करा.
आपल्या जवळ मी कोणालाही येऊ देणार नाहीये."
त्यानंतर विजयसिद्धीसेंन द्यान लावून बसले नि बर्बरीक
पहारा करत राहिला. दिवस संपून रात्र झाली तेव्हा पुन्हा
काही राक्षसांनी हल्ला केला. परंतु बर्बरीक ने त्या साऱ्या
राक्षसाचा वध केला. पहाट झाली नि दुसरा दिवस उगवला.
दुसऱ्या दिवशी ही राक्षसानी हल्ला केला. बर्बरीक ने त्या
सर्वांचा वध केला. असे सतत सहा दिवस त्याने दिवस रात्र
जागता पहारा ठेवला,सहा दिवस तो झोपला नाही. परंतु त्याला आता भयंकर झोप येत होती. आणि एकदा का
माणसाच्या डोळ्यावर झोप येऊ लागली की मनुष्य बेचैन
होतो. मग त्याला काही सुचत नाही. डोळे गपकन कधी
झाकतात तेही त्याला कळत नाही. मग उभा असला तरी
उभ्या उभ्या नेच धडाम जमिनीवर कोसळून पडतो.
बर्बरीकाची सध्या अवस्था तीच झाली होती. त्याला झोप
येत होती आणि तो जबरदस्तीने जागु पाहत होता. झोप
अनावर झाली होती. त्याचा तोल जाऊ लागला होता.
तो खाली बसला.
तेच दृश्य त्याच्या आईला स्वप्नात दिसले तशी खडबडून
जागी होत किंचाळली. " नाही sss " तिच्या किंचाळण्या ने
हिडींबा पण जागी झाली नि उठून मोर्वी जवळ येत म्हणाली,
" काय झालं सुनबाई तू का किंचाळलीस ? वाईट स्वप्न
वगैरे पाहिलेस का ?"
" नाही आई मला माझ्या मुलाची चिंता लागली आहे, कसा असेल माझा बर्बरीक ?"
" हे बघ तो ज्ञान संपादन करायला गेला आहे, त्याला वेळ तर लागणार ना ? शिवाय ज्ञान काही सरळ मार्गांनी मिळत नाही त्यासाठी बरेच परिश्रम करावे लागतात."
" हे माहीत नाहीये का मला .पण मन माझे मानत नाही
त्याला मी काय करू ? शिवाय आज पाहिल्यांदाज माझ्या
पासून दूर गेलाय तो, या पूर्वी मी माझ्या नजरे समोरून कधीच त्याला दूर होऊ दिलं नव्हतं."
" हे बरोबर आहे तुझं. त्यात तुझा दोष नाही. हे मातृ हृदय
आहे हे तसेच असते क्षणात रडणारे नि क्षणात हसणारे ! आपल्या बाळासाठी तडफडणारे . परंतु आपला बर्बरीक विद्या संपादन करून लवकरच येईल तो परत. चिंता करू नकोस." त्यावर मोर्वी चिंता व्यक्त करत म्हणाली ," त्याला
काही होणार तर नाही ना मातोश्री ?"
" त्याला काय होईल ? तो आर्यपूत्र भीमसेन आणि हिडींबा चा नातू आणि महाबली घटोत्कच आणि वीरांगना
मोर्वीचा पुत्र आहे. त्याला केसाला ही कुणी धक्का लावू शकत नाहीये. मी त्याला फक्त दोनच शब्द शिकविले आहेत.
विजय आणि लक्ष या व्यतिरिक्त भय आणि हानी हे शब्द
शिकविलेच नाही त्याला. तेव्हा त्याची चिंता तू सोड."
" ते जरी खरं असलं तरी तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत माझं मन कशातच लागणार नाहीये."
" बर्बरीकाची अजिबात चिंता करू नकोस, कारण त्याच्या
डोक्यावर वासुदेव चा हात आहे, त्याचं कोणीच अहित करू
शकणार नाही. तुझा वासुदेव वर विश्वास नाहीये का ?"
" नाही नाही आई असं मुळीच नाही. सर्वात जास्त मला
वासुदेव वरच विश्वास आहे, आईच्या ममतेने माझं मन व्याकुळ जरूर होतेय. परंतु मला ठाऊक आहे माझा बर्बरीक
माझ्या श्यामच्या कृपा छात्रा खाली आहे, त्याला काहीच
होणार नाहीये."
" एवढा विश्वास आहे ना, मग झालं तर , आता एकदम
निश्चित मनाने जाऊन झोप ! रात्र फार झाली आहे."
बर्बरीकाचे डोळे पेंगत होते परंतु बर्बरीकाने एक क्षणासाठी पण आपले डोळे बंद केले नाहीत.भूक ,तहान
लागली असताना ही तो तसाच बसून राहिला. फक्त वासुदेवाचे नाव स्मरण करत होता. शेवटी सात दिवस नि सात रात्र पूर्ण होताच देवी मातेने विजयसिद्धीसेंन ला दर्शन देत म्हणाली,
" डोळे उघड विजयसिद्धीसेंन मी आली आहे." विजयसिद्धीसेंन आपले डोळे उघडले. समोर देवीच्या मूर्तीच्या ऐवजी देवीमाता स्वत: प्रगट झालेली पाहून त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. तो हात जोडून उभा राहिला. तेव्हा देवी माता म्हणाली ," विजयसिद्धीसेंन तू ज्या सिद्धी साठी एवढी कठीण तपस्या केलीस तशी तपस्या या आधी कुणी केली नाही. मी तुझ्यावर प्रसन्न झाली आहे , आणि जा तुला सिध्दी प्राप्त होईल. तुझी तपस्या सफल झाली आहे " असे म्हणून देवी अंतर्ध्यान पावली. तसे विजयसिद्धीसेंन आपल्या आजूबाजूला पाहिले. अनेक राक्षसांचे मृतदेह पाहून
ते समजले की आपल्या पूजे मध्ये विघ्न घालण्याचा अनेक राक्षसांनी प्रयत्न केला. परंतु बर्बरीक मुळे आपली तपस्या सफल झाली.? हा विचार मनात येताच त्यांनी आपले कमंडलू उचलले नि बर्बरीक जवळ येत म्हणाले, " आज तुझ्या मुळे माझी पूजा सफल झाली."
" आता तरी आपण मला आपला शिष्य बनविणार का नाही ?" बर्बरीक विचारले.
" हो अवश्य .परंतु....
" परंतु काय गुरुदेव ?"
" तुला अजून एक काम करावे लागेल. "
" हो करेन ना , तुम्ही फक्त काम सांगा."
" एवढं सोपं नाहीये फार कठीण आहे."
" चालेल. कितीही कठीण असो. मी ते यशस्ची करून
दाखवेन.
° मग ठीक आहे , तुला तीन दिवस रात्र समोरच्या सरोवर मध्ये गळ्याभर पाण्यात उभा राहून मंत्राचा जप करावा लागेल. तीन दिवसात तुझी साधना सफल झाली तर तू
आपोआपच पाण्याच्या वरती येशील. पण हां एक गोष्ट द्यानात ठेवायची की पाण्यात मध्ये अनेक जलचर ,उभयचर, निशाचर प्राणी त्रास देतील. परंतु अजिबात विचलित न होता अखंड जप चालू पाहिजे. त्या मध्ये अजिबात खंड पडता कामा नये."
" नाही पडणार...!'
" मग ठीक आहे ,आता मंत्र ऐक." असे म्हणून त्याला
एक मंत्र दिला नि पाण्यात उभा राहून त्याचा जप करायला
सांगितला नि म्हटलं ," एक क्षणासाठी मंत्र जप बंद करू
नकोस. मी मंदिरात जाऊन देवी माता जवळ प्रार्थना करतो
की तू आपल्या कार्यात सफल होण्यासाठी देवी मातेने तुझी
मदत करावी." बर्बरीक ने आपल्या गुरुदेवला वंदन केले नि
सरळ सरोवरात जाऊन गळ्याभर पाण्यात मंत्र जप सुरू केला. इतक्यात अचानक वादळ वारा सुटला. सरोवरात
झाडांचा पालपाचोळा उडून जाऊ लागला. परंतु बर्बरीक
अजिबात विचलित न होता त्याने मंत्र जप सुरूच ठेवला.
त्यानंतर एक भली मोठी मगर बर्बरीकाच्या शरीराचे लचके
तोडायला त्याच्या जवळ आली. परंतु न जाणो मागून कोणीतरी तिला खेचले. तशी मगर तेथून पळून गेली.
नंतर मुसळधार पाऊस पडू लागला. पण तरी देखील बर्बरीक
आपल्या जाग्यावरून यत्किंचितही हलला नाही. शेवटी कुठून
तरी आले परंतु दुसऱ्या क्षणी तसेच बाण त्याच्या विरुद्ध
दिशेने आले नि या संकटातून ही देवी ने त्याचे रक्षण केले.
तीन दिवस आणि तीन रात्र पूर्ण होताच बर्बरीक पाण्याच्या
पुष्ठ भागावर आपोआपच आला, आणि त्याच्या सभोवती
एक सुरक्षित कडे निर्माण झालें नि तो किनाऱ्यावर आला.
आणि देवी माता प्रगट झाली नि म्हणाली ," वत्स तुझी तपश्या सफल झाली. तुला हवी असलेली सिध्दी शक्ती तुला
प्राप्त झाली हे तीन शक्ती बाण आहेत. तुझ्या पुढे कोणतीही
बलाढय सैन्या पळभर ठिकाणार नाही. तू अजेय झालास !
तुला कोणीही पराजित करू शकणार नाहीये.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा