महाभारत १३२ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाभारत १३२ |
महाभारत १३२
बर्बरीक ते बाण घेऊन आपल्या गुरू जवळ आला तेव्हा
विजयसिद्धीसेंन म्हणाले ," अभिनंदन तुझे. तुला सिद्धी बाण
प्राप्त झाले. आता तू अजेय झालास. तुला मोठ्यात मोठी सैन्या देखील परास्त करू शकणार नाहीये."
" हे आपल्या मुळे साध्य झाले."
" आता तुला ह्यांच्या प्रयोगा विषयी माहिती सांगतो. हा
पहिला बाण आहे, त्याला सिंधुर लावून आपल्या लक्षा वर
सोडशील तेव्हा हा लक्ष आणि शस्त्र ह्या दोघांना स्तब्द करेल. आणि हा दुसरा बाण लक्षाचा छेद करून शस्त्राचा पण
छेद करेल. आणि ह्या तिसऱ्या बाणांची तुला गरजच भासणार नाही. आता तू साऱ्या सृष्टीचा पण विनाश करू शकतोस."
" ही सर्व आपली कृपा आहे, अर्थात गुरुदक्षिणा काय देवू
ती सांगा."
" गुरुदक्षिणा म्हणून मला तुझ्याकडून दोन वचने हवीत."
" कोणती दोन वचन ?"
" पाहिले वचन हे की ह्या शक्तीचा प्रयोग तू कधी स्वतःच्या स्वार्थासाठी करणार नाहीस तर युद्धासाठी करशील. आणि
दुसरे वचन तू सदैव निर्बल पक्षाच्या बाजूने युध्द करशील."
" मी वचन देतो तुम्हाला की ह्या शक्तीचा मी प्रयोग निर्बल
सैन्याचे साह्य करण्यासाठीच करेन." त्यानंतर त्या रात्री तो देवी माता समोर उभा राहून देवीची पुजा करत होता. एवढ्यात दोन वाटसरू त्या मार्गा जात असताना काही राक्षसांनी त्या उपयताना गराडा घातला. परंतु त्या दोघांनी
तेथून पळ काढला.पण पळून पळून पळणार कुठे ? संपूर्ण
जंगल चा मार्ग होता. त्या दोघांनी आम्हाला कोणीतरी वाचवा अशी मोठ्या ने बोंब ठोकली. ते दोघेही पळत पळत त्या
मंदिरे जवळ आले. ज्या मंदिरात बर्बरीक द्यान लावून
देवी समोर उभा होता. त्याने त्या लोकांना पाहिले नि त्या राक्षसा सुद्धा पाहिले. तसा बर्बरीक त्याना ताकीद देत म्हणाला ," त्या दोघांना सोडून द्या. " परंतु ते राक्षस काही ऐकले नाहीत. उलट ते राक्षस आपली शस्त्रे घेऊन बर्बरीकाच्या अंगावर धावून आले. तेव्हा बर्बरीक ने एका बाणाला सिंधुर लावला नि त्या राक्षसा वर सोडला. त्या एका बाणा ने सर्वांना एकदम स्थिर केले नि दुसऱ्या एका बाणाने त्या सर्वांचा वध केला नि बाण भात्यात परत आला. तेवढ्यात त्याचा गुरू तेथे आला नि म्हणाला ," अरे वा ! तुला आजच सिद्धी शक्ती बाण मिळाले नि त्याचा प्रयोगही करून पाहिलेस ! एका बाणा ने त्याना स्थिर केले नि दुसऱ्या बाणा ने त्यांचा वध केलास. हे केवळ आठ जण होते .परंतु ह्यांची संख्या हजार किंवा लाखाच्या घरात जरी असती तरी त्या दोन बाणा नि त्यांचे काम तमाम केले असते. जा आता तू अजेय झालास.
पांडवांचा बारा वर्षाचा वनवास समाप्त झाला होता नि
एक वर्षाचा अज्ञातवास सुरू झाला होता, ते वेषांतर करून
मत्स्य नरेश विराट च्या राज्यात राहात होते. भीम बल्लव
बनून स्वयंपाकी बनला होता. एके दिवशी सरपण साठी
लाकडे आणायला जंगलात गेला असताना त्याला सरोवर दिसले. तो आपले हातपाय धुण्यासाठी त्या सरोवराच्या काठी गेला नि एका धोंडी वर बसून आपले हात पाय धुवत
होता. तेवढ्यात तेथे बर्बरीक आला नि म्हणाला ," हे तुम्ही
काय करत आहात ?" त्यावर भीम म्हणाला , " मी काय
करतोय ते पाहत नाहीस काय ? हात पाय धुतोय."
" हे हात पाय धुण्याचे पाणी नाहीये."
" हात पाय धुवा अथवा पाणी पिऊन आपली तहान भागवा पाणी त्याच साठी तर असते ना ?"
" हां परंतु ह्या पाण्यात हात-पाय धुवून पाणी अपवित्र करू नका."
" पाणी कसे होईल अपवित्र ?उलट पाण्यात स्नान केल्याने
मनुष्य पवित्र होतो. गंगेत कितीतरी लोक स्नान करतात म्हणून ती काय अपवित्र होते ?"
" ते मला काही सांगू नका. ह्या पाण्यात तुम्ही पाय धुवायचे नाही बस्स !" तरी पण भीम त्याचे न ऐकता आपले
हात-पाय धुतच राहतो. हे पाहून बर्बरीक चिडला नि म्हणाला, " तू असा ऐकणार नाहीस तर !"
" अरे रे थोरा-मोठ्या शी कसे बोलावे हे सुध्दा तुझ्या
आई-वडिलांनी शिकविले नाही की काय ? हरकत नाही मी शिकवितो." असे म्हणून भीमसेन उभा राहिला. तसा बर्बरीक
ने एक ठोसा लगावला परंतु भीमसेन त्याचा हात वरच पकडला. त्यानंतर दोघांचे द्वंद्वयुद्ध सुरू झाले. कुणी कोणाला ऐकेना. शेवटी दोघेही खाली कोसळले तेव्हा दोघेही एकमेकां बद्दल विचार करू लागले- भीम मनात म्हणाला , हा बालक असूनही महाबली आहे मला थकविले ह्याने. अगदी तसाच
बर्बरीक सुद्धा आपल्या मनात विचार करू लागला की, जरूर
ह्यांच्या कडे कोणतीतरी दैवीशक्ती आहे, नाहीतर आतापर्यंत
माझ्या कडून परास्त झाला असता. असा विचार करून ते
दोघेही उठले नि पुन्हा दोघांची जुंपली. भीमाने बर्बरीक दोन्ही
हात पकडले तेवढ्यात तेथे महर्षी व्यास येतात नि मोठ्या ने
ओरडून म्हणाले ," थांबा." तसे ते दोघेही महर्षी व्यास कडे
पाहतात.तेव्हा भीमसेन म्हणाला ," आपण ह्यात पडू नका
महर्षी मी आज या दुष्ट बालकाला दाखवून देणार आहे की
थोरा-मोठ्यांचा आदर कसा केला जातो ते." तसा बर्बरीक
महर्षी मी सुध्दा ह्यांना दाखवून देणार आहे, पाणी अपवित्र
कधी करायचे नसते." असे म्हणून पुन्हा दोंघांची जुंपली.
तेव्हा महर्षी व्यास म्हणाले ," लढा नि एकमेकांना मारून टाका. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की दोघांच्याही शरीरातून
एकाच कुलाचे रक्त वाहणार आहे." असे म्हणताच भीम
लढायचे सोडून महर्षी व्यास कडे पाहत विचारले ," हे आपण
काय बोलत आहेत महर्षी एकाच कुलाचे रक्त ?"
" हां , ज्याला तू मारत आहेस तो कोण आहे हे तुला
माहीत आहे का महावीर भीमसेन ?" भीमसेन नाव घेताच
बर्बरीक उद्गारला ," भीमसेन !" त्यावर महर्षी व्यास म्हणाले,
" पांडू पुत्र भीमसेन तुझे आजोबा !" असे म्हणून भीमसेन
कडे महर्षी व्यास म्हणाले ," आणि भीमसेन हा तुझा नातू बर्बरीक !" तसा भीमसेन हर्षभरीत स्वरात म्हणाला ," माझा
नातू बर्बरीक !" त्याला मायेने जवळ घेत म्हणाला ," मला माफ कर बाळा मला माहित नव्हते. तू माझा नातू आहेस ते."
तसा बर्बरीक एकदम लज्जित होऊन म्हणाला, " म्हणजे मी माझ्या परमपूज्य आजोबांचा अपमान केला. धिक्कार आहे माझ्या जीवनावर. मी असभ्य वाणी ने न जाणो काय काय
बोललो आपल्याला ?" तेव्हा भीमसेन म्हणाला," पुत्र नकळत घडलेल्या गोष्टींचा पश्चात्तापच प्रायश्चित आहे."
" नाही आजोबा हे शक्ती चे घमंड आहे जी मला शक्ती
प्राप्त झाली होती. अशी शक्ती मला नकोय." असे म्हणून
तो आपल्या गुरूच्या दिशेने निघाला. भीमसेन त्याला हांक
मारतच राहिला तेव्हा महर्षी व्यास म्हणाले ," जाऊ दे त्याला.
कुठं नाही जाणार तो." बर्बरीक आपल्या गुरू जवळ आला
नि त्याना म्हणाला ," गुरुदेव , ही शक्ती आपण परत घ्या."
" का बरं ?"
" ह्या शक्तीमुळे आज माझ्या कडून एक मोठे पाप होता
होता राहिले. जी शक्ती माझ्या वरीष्ठांचा विनाश होण्यास
कारणीभूत ठरेल अशी शक्ती काय कामाची आहे ?"
" बघ शक्ती प्राप्त करणे सरळ आहे, परंतु ती कोठे आणि
कशी वापरायची आहे, हे ज्ञान असणे आवश्यक आहे. शक्ती
गंगेच्या समान आहे, जसे गंगेला सांभाळण्यासाठी शिवांच्या
जटांची आवश्यकता असते."
" हीच तर समस्या आहे गुरुदेव , माझ्यात सहनशीलता
नाही, माझ्यात शक्तीचे घमंड आले आहे, म्हणून आपली शक्ती परत घ्या." त्यावर विजयसिद्धीसेंन म्हणाले ," वरदान
परत घेतले जात नाही. आणि वरदान त्यालाच दिले जाते की
जो त्यासाठी योग्य असेल शिष्य ! बरं झालं तुला इतक्यातच
सत्याची जाणीव झाली. शक्तीचा उपयोग जनकल्याणासाठी
करायचा असतो त्याचा दुरुपयोग केल्यास दुःख आणि
पश्चात्तापाचे कारण बनते. म्हणून शक्तीचा सदूउपयोग करायला शिक. जर शिकलास तर सारा संसार तुझे चरण
चुबेल. आणि खरं सांगायचं तर मीच अनुशासन बद्दल तुला सांगायचे विसरलो. शक्ती सोबत अनुशासन चे ज्ञान पण माहीत असणे आवश्यक आहे, आज तुझ्या सोबत जी घटना घडली ती घटनाच उद्या तुझे मार्गदर्शन करील. शक्ती पासून
पळू नकोस. तिला आपल्या वश मध्ये कर नि तिचा वापर
जनकल्याणासाठी नि स्वतःच्या कल्याणासाठी कर."
वासुदेव कृष्ण पांचाली ला सांगतात की , बर्बरीक शक्तीचा
सदूउपयोग किंवा दुरुपयोग करायला शिकला किंवा नाही.
हे सांगणे फार कठीण. परंतु विधात्याने आपल्याला अश्या
दरवाज्यावर आणून उभे केले आहे की तिथून शक्ती वापर
सदूउपयोग किंवा दुरुपयोग साठी केला जाईल हे सांगणे
कठीण !" तेव्हा पांचाली घाबरून म्हणाली," छे चे छे !
त्यांच्या कडे ज्या शक्ती आहेत त्या फार विनाशकारी आहेत.
त्याला कसं ही रोखले पाहिजे."
" जो बाण धनुष्यातून एकदा सुटला की त्याला वापस घेणे
एवढं सरळ नाहीये. परंतु त्याला रोखले नाही तर महाविनाश अटळ आहे आणि रोखले तर दुःखाचे कारण बनेल. तेही
महाविनाश पेक्षा कमी नाही. आज पांडवां पुढे संकट आणि
त्याच्या निवारण्याची परीक्षा आहे आणि विधीचे विधान
माझी पण परीक्षा घेत आहे. " असे वासुदेव ने म्हटल्यावर
द्रौपदी तिथून निघाली ती सरळ राजमाता कुंती च्या कक्षेत
गेली नि तिने राजमाता कुंती ला विचारले ," मातोश्री ऐकलंत
का तुम्ही ? बाहेर काय वार्ता सुरू आहेत त्या ?"
" हो घटोत्कच आणि बर्बरीकाच्या आगमनाने साऱ्या
हस्तिनापूरात ही वार्ता पसरली आहे की बर्बरीक अजेय आहे.
त्याच्या पुढे कोणाचीही शक्ती चालणार नाहीये. आणि त्याच्या प्रतिज्ञा विषयीही चर्चा सुरू आहे."
" परंतु त्याची शक्ती आमच्यासाठीही विनाशकारी ठरेल त्याच काय ? मला तर काही सुचतच नाहीये. मातोश्री मी असा कोणता अपराध केला होता की त्या अपराधाची क्षमा
नाहीये. मी ज्या दिवशी या परिवारात प्रवेश केला त्या दिवसा
पासून एका मागून एक आमच्यावर संकटे येतच आहे, जणू
काही आमचं भाग्य आमच्यावर रुसले आहे."
" असं नाही आहे पांचाली !"
" असेच आहे, मातोश्री ! नाहीतर पहा ना ,अधर्मीयांच्या
नशिबात राजमहालाची छत्रछाया नि आमच्या नशिबात लाक्षाग्रहाची ज्वाला , त्यांच्या नशिबात राजपाट आणि आमच्या नशिबात काय शकुनीचे फासे नि वनवासाची यात्रा
वनवास संपून आता कुठे युध्याच्या तयारीला लागलो होतो तर आता हे नवीन संकट समोर येऊन उभे राहिले.भाग्य
आमच्याशी असं का डाव खेळत आहे ?"
" शांत हो पांचाली शेवटी विजय सत्याचाच होतोय."
" कशी शांत होऊ मातोश्री ? सर्वकाही संपल्यानंतर विजय झाला देखील तरी तो काय कामाचा. पांडव परिवारामध्ये आपण सर्वात मोठ्या आहात. आता आपणच काहीतरी मार्ग काढा यातून मातोश्री !"
" मी काही करू शकले असते तर अजून गप्प बसले असते का ? मी तर युध्दच होऊ दिलं नसतं. परंतु सर्वकाही
आपल्या हातात नसतं. विधीचे विधान काही केल्या टळत
नाही. म्हणून आलेल्या प्रसंगाला फक्त आपण तोंड द्यायचे
असते.एवढेच आपल्या हाती आहे." असे सांगून वेळ मारून
नेली. द्रौपदी ची कशीतरी समजूत घातली.परंतु स्वतःच्या
मनाला कसे समजविणार ? कुंतीला काही सुचत नव्हते. शेवटी त्या महर्षी व्यासांना भेटायला त्यांच्या कडे जातात.आणि दोन्ही हात जोडून महर्षी व्यास ना प्रणाम
करत त्या म्हणाल्या ," प्रणाम महर्षी !" त्यावर ते आशिर्वाद
देत म्हणाले ," आयुष्यमान भव !" असे म्हणून ते पुढे म्हणाले,
" कुंती तू आज फार चिंतेत दिसते आहेस , काय समस्या
आहे का ?"
" हो .एक संपली नाही की दुसरी पुढे आहेच तयार ....काय
करावं ते सुचत नाहीये."
" तू बर्बरीक विषयी बोलते आहेस ना ?"
" हो.सध्या बर्बरीक च सर्वांत मोठी समस्या बनून आलाय."
आहे तर आमच्याच घरचा सर्वात छोटा सदस्य परंतु त्याची प्रतिज्ञा आमच्यासाठी संकट बनून आलीय."
" परंतु प्रत्येक समस्या चे उत्तर असते कुंती ?"
" मला वाटलंच होतं, की आपल्याकडे या समस्यांचे उत्तर
जरूर असणार , म्हणून मी आपल्या कडे."
" परंतु ह्या समस्यांचे उत्तर माझ्या जवळ नाहीये."
" काय म्हणताय महर्षी ?आपल्या कडे मग कुणाकडे
मिळणार याचे उत्तर ?"
" सर्व प्रश्नांची उत्तरे केवळ वासुदेव कडे आहेत."
" वासुदेव कडे आहेत तर मग ते बोलत का नाहीयेत ?"
" ह्याही प्रश्नांचे उत्तर वासुदेव कडेच आहे."
" आपण काहीच करू शकत नाहीत का ?"
" आता फक्त एवढेच सांगू शकतो की पांडव परिवाराच्या
सर्व प्रश्नांची उत्तरे फक्त वासुदेव कडे आहेत.आणि ते जे काही करतील ते आपल्या भल्याचेच असेल. त्यांच्या कडून
अन्याय होऊच शकत नाहीये.ह्या समस्यांचे समाधान ही तेच
शोधून काढतील. तू चिंता करायची सोड पुत्री !"
पुन्हा एकदा हात जोडून वंदन केले, तसे महर्षी आशीर्वाद
येत म्हणाले ," आयुष्यमान भव !" कुंती एकदम निश्चिंत मनाने
तेथून निघाली.
अंगराज कर्ण दुर्योधन च्या शिबिरात आला नि दुर्योधन ने
त्याला वळून पाहत म्हटलं ," ये मित्रा !"
" मित्रा तू आज कार्यच असे महान केलेस की तुझ्या पुढे
मला नतमस्तक व्हावेसे वाटते. कारण काय माहितेय ?"
" ते मला कसं माहीत असणार ,तू सांग."
" मला जेव्हा कळले की बर्बरीक वर लपून प्रहार प्रयत्न
केल्या बद्दल तू आपल्या वैऱ्याची अर्थात भिमाची माफी
मागीतलीस , असं फक्त एक वीर पुरुषच करू शकतो.
आणि ते तू केलेस. त्यामुळे मी मित्र असल्याचा मला अभिमान वाटतो."
" धन्यवाद तर तुला द्यायला हवे. कारण हे सारे तुझ्या मुळे घडले. तू जर मला रोखले नसते तर मी इतर लोकांचे ऐकून जे कार्य करायला गेलो होतो. ते कार्य जर माझ्या कडून घडले असते तर माझ्या भ्याडपणाचा कलंक जो माझ्या माथी लागला असता तो माझ्या रक्ताने ही धुतला गेला नसता. परंतु त्या बदनामी पासून तू मला वाचविलेस त्या बद्दल मलाच तुझे आभार मानायला हवेत."
" परंतु तू बर्बरीक बद्दल जी माहिती सांगितलीस ती
एकदम सत्य आहे, त्याच्या जवळ अश्या काही सिध्दी आहेत की त्याचे तोड आपल्या जवळ नाहीयेत. आपल्याला काहीतरी उपाय शोधायलाच हवा."
" नाही मित्र आता माझ्या जवळ विचार करण्यासाठी वेळ
नाहीये.मी निर्णय घेतलाय की अग्निकुंडीत उडी मारायचीच.
अर्थात युध्दा विषयी जो निर्णय झालाय तो मागे घेतला
जाणार नाही.आता विजय होवो या पराजय त्याची पर्वा
नाहीये."
" माझ्या जवळ एक पर्याय होता.परंतु पितामहानी मला
युध्दात सामील होण्यास मनाई केली आहे, त्यामुळे मी तुझी
मदत काहीच करू शकत नाहीये."
" परंतु उपाय काय शोधला होतास ?"
" उपाय हा आहे की एक सैन्याची तुकडी घेऊन मी
पहिल्याच दिवशी पांडवावर आक्रमण केले असते.भले मग
माझा बर्बरीकाचा च्या हातून वध झाला असता.परंतु नंतर
पितामहा आणि तू दोघांनी मिळून त्याला कोंडीत पकडले
असते."
" नाही नाही मित्र मी एवढा पण स्वार्थी नाही,विजय प्राप्त
करण्यासाठी मला सर्वांत जास्त प्रिय असलेली व्यक्ती अर्थात
माझा मित्र त्याला मी बळी देईन. असा विचार केलासच कसा
तू ? मी कदापि अशी परवानगी दिली नसती तुला. दुर्योधन
सर्वांवर पाणी सोडू शकतो.परंतु आपल्या मैत्रीवर कदापि नाही."
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा