पोस्ट्स

मार्च, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

महाभारत १३२ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत १३२                      महाभारत १३२     बर्बरीक ते बाण घेऊन आपल्या गुरू जवळ आला तेव्हा विजयसिद्धीसेंन म्हणाले ," अभिनंदन तुझे. तुला सिद्धी बाण प्राप्त झाले. आता तू अजेय झालास. तुला मोठ्यात मोठी सैन्या देखील परास्त करू शकणार नाहीये."     " हे आपल्या मुळे साध्य झाले."     " आता तुला ह्यांच्या प्रयोगा विषयी माहिती सांगतो. हा पहिला बाण आहे, त्याला सिंधुर लावून आपल्या लक्षा वर सोडशील तेव्हा हा लक्ष आणि शस्त्र ह्या दोघांना स्तब्द करेल. आणि हा दुसरा बाण लक्षाचा छेद करून शस्त्राचा पण छेद करेल. आणि ह्या तिसऱ्या बाणांची तुला गरजच भासणार नाही. आता तू साऱ्या सृष्टीचा पण विनाश करू शकतोस."     " ही सर्व आपली कृपा आहे, अर्थात गुरुदक्षिणा काय देवू ती सांगा."     " गुरुदक्षिणा म्हणून मला तुझ्याकडून दोन वचने हवीत."     " कोणती दोन वचन ?"     " पाहिले वचन हे की ह्या शक्तीचा प्रयोग तू कधी स्वतःच्या स्वार्थासाठी करणार नाहीस तर युद्धासाठी करशील. आणि दुसरे वचन तू सदैव निर्बल पक्षाच्या बाजूने युध्द करशील."      "

महाभारत १३१ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत १३१                      महाभारत १३१        बर्बरीक म्हणाला, "  आजोबा दुर्योधनाना जेव्हा माहीत होईल की त्यांची  हटधर्मी धर्म नाहीये धर्म न्याय आहे, आणि अंतिम विजय धर्माचाच होतो ." त्यावर वासुदेव कृष्ण म्हणाले ," आणि जोपर्यंत विजय धर्माचा होत नाही तोपर्यंत अर्धमाशी लढावेच लागते , आणि ते करत असताना त्रास सोसावाच लागतोच. तुझा परिवार सध्या तेच करत आहेत."      " आजी तेच सांगते की आजोबा दुर्योधनाच्या महत्वकांक्षेचा अंतच नाहीये."    " हां वत्स ! महत्वकांक्षा अश्वासारखी असते. जर अश्वाच्या नाकात संयमाची लगाम घातली गेली नाही तर तो पण बेफाम  उधळेल. त्यामुळे त्याला काबू मध्ये आणणे आवश्यक आहे."      " आजोबा आपल्याला असं तर नाही म्हणायचंय ना की वेळेच्या अभावी कारण आपण मला आपला शिष्य बनवू शकत नाहीये."     " हे कारण तर आहेच शिवाय अजून एक कारण आहे."     " अजून कोणते कारण आहे ?"     " त्याची तुला गरज आहे नि त्याला तुझी ! अर्थात तुला जी विद्या शिकायची आहे, ती विद्या माझ्या व्यतिरिक्त विजयसिद्धीसेंन नावाचे  ब्राम्

महाभारत १३० | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत १३०                              महाभारत १३०               हीडींबा आपल्या नातूला अर्थात बर्बरीकाला सांगते की तुला आपल्या आजोबा सारखे धनुर्धर व्हायचे आहे, त्यासाठी तुला त्यांच्या सारखीच एकाग्रता ठेवायला हवी आहे, आपली नजर केवळ लक्षा वरच केंद्रित असायला हवी आहे, असे म्हणून त्याला एका झाडाची फांदी दाखवून त्या फांदीवर नेम धरून बाण सोडायला लाविला. बर्बरीकाच्या बाणाने अचूक लक्षभेद केला. ते पाहून खुश होत हिडींबा म्हणाली ," आता माझी खात्री झाली की तू नक्कीच आपल्या अर्जुन आजोबा प्रमाणे धनुर्धर बनशील." तेवढ्यातच महर्षी व्यासांचे तेथे आगमन झाले. महर्षी व्यासांना पाहून हिडींबा ने आदरपूर्वक त्याना प्रणाम केला. तेव्हा महर्षी व्यास यांनी तिला सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. त्यानंतर हिडींबा आपल्या नातूकडे पाहत त्याला म्हणाली ," बाळ महर्षी ना प्रणाम कर." असे म्हणताच बर्बरीकाने महर्षी व्यास यांना प्रणाम केला. महर्षी व्यासांनी बर्बरीकाला आयुष्यमान भव असा आशीर्वाद दिला. त्यानंतर हिडींबा ने महर्षी व्यासांकडे पांडवांच्या खुशलतेची चौकशी केली. तेव्हा व्यास म्हणाले,    

महाभारत १२९ | मराठी स्टोरी, मराठी शॉट स्टोरी, मराठी कथा | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत १२९                             महाभारत १२९      " तू राज महालात लहानाची मोठी झाली आहेस , तुला हे वनातील जीवन किती आवडेल कोण जाणे ?"       " ह्या वनात मला तुमच्या रूपाने प्रेमच प्रेम दिसतंय मला फक्त तुमचं प्रेम हवंय बाकी काहीही नको." असे म्हणताच तिला मायेने जवळ घेत हिडींबा म्हणाली ," आता फक्त मला तुम्हां दोघां कडून एक बाळ पाहिजे, तो पण असा की माझ्या पती सारखा महावीर आणि तुझ्या पती सारखा बलवान. काय देशील की नाही ?" असे म्हणताच ती चक्क लाजली. त्यानंतर ती आंत जाणार असते. तर हिडींबा त्याना रोखते. "थांबा." असे म्हणून आंत पळतच जाते नि आरती चे ताट घेऊन बाहेर येते नि त्या दोघांना आरती ओवाळून घरात घेते. त्यानंतर दोघांचा सुखी संसार सुरू झाला. लवकरच त्यांच्या संसार वेली वर एक फुल उमलले. अर्थात मोर्वी ने  एका सुंदर शा बाळाला जन्म दिला. त्याचे घुंगरा सारखे केश असल्याने हिडींबा त्याचे नाव  बर्बरीक असे  ठेवले. त्यानंतर घटोत्कच ला हांक मारून आपल्या जवळ बोलवून घेतले नि मग म्हणाली, " पुत्र सुनबाई ने तुला बाळ दिलंय तिचे आभार मान बरं !"     

महाभारत १२८ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत १२८                               महाभारत १२८      " अगदी बरोबर बोललीस तू मी आर्य लोक आपल्या आईच्या पोटातून शिकूनच जन्माला येतोय. शिवाय मी इतर आर्य लोकांपेक्षा थोडा वेगळा आहे."     " तो कसा ?"     " मी आर्य महावीर पांडुपुत्र भिमाचाच पुत्र नाही तर माझी महापराक्रमी माता हिडींबाचा सुध्दा पुत्र आहे. पण ते सोड. व्यर्थ वार्तालाप करण्यात काय अर्थ आहे, आपण प्रथम मुद्याचे बोलू. अर्थात तू अगोदर माझ्या बुद्धीची परीक्षा घेऊ इच्छित आहेस का बळाची ?"      " अगोदर बुद्धीचीच परीक्षा होईल. कदाचित शस्त्र बळाची परिक्षा घेण्याची गरजच भासणार नाहीये. कारण मृत शरीर परीक्षा तर देवू शकणार नाही ना ? म्हणून तू मला कोणताही प्रश्न विचार त्या प्रश्नांचे जर मी उत्तर देवू शकली नाही तर मी आपला पराजय स्वीकार करीन. विचार काय विचारायचे आहे तुला ते." आता इथून पुढे-     त्यावर घटोत्कच म्हणाला," मी तुला एक कथा ऐकवितो. कथा ऐकल्यानंतर एक प्रश्न विचारीन त्या प्रश्नाचे फक्त तू उत्तर द्यायचे."     " हो चालेल." मोर्वी उद्गारली.     एका नगरात एक का

महाभारत १२७ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत १२७                        महाभारत १२७        सत्यभामा आपल्या रथातून खाली उतरली नि आपली तलवार घेऊन विद्युत तारांपाशी आली नि आपल्या तलवारीने विद्युत तारांचे मायाजाळ तोडले. अग्निचा भडका उडाला परंतु सत्यभामेला मात्र काहीच अपाय झाला नाही आणि विद्युत तारांचा प्रतिकार मात्र संपला. ही वार्ता जशी नरकासुर ला पोहोचली. तसा तो चिडून म्हणाला ," हाच केला होता का बंदोबस्त ?" त्यावर मुर म्हणाला ," तुझा मृत्यू तुला इथं घेऊन आला आहे , तू इथं आलास खरा .परंतु इथून वापस मात्र जाऊ शकणार नाहीस." त्याच वेळी युध्द भूमीवर मात्र सत्यभामा वासुदेव कृष्णा जवळ जाऊन म्हणाली ," वासुदेव सर्व बाधा आता समाप्त झाल्या आहेत." त्यावर वासुदेव कृष्ण सेनापतीला म्हणाले," सैन्याला सावधान करा."   सेनापतीने लगेच त्यांच्या आदेशाचे पालन केले. त्यानंतर वासुदेव कृष्णाने युध्द आरंभ होण्यापूर्वीचा शंक फुंकला. तसे तिकडून नरकासुर , मुर, आणि मोर्वी आपल्या सैन्यासह हजर होतात. तेव्हा वासुदेव त्याला अजून एक संधी देण्याचा विचार करून म्हणाले ," अहंकार पेक्षा नम्रता आणि युध्दा पेक्

महाभारत १२६ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत १२६                           महाभारत १२६     धर्मराज युधिष्ठिर इकडून तिकडे सारखे येरझाऱ्या घालत होता. त्यांच्या मनात अनेक विचार सुरू असतात. तेवढ्यात तेथे वासुदेव कृष्ण आले नि त्यांनी विचारले," मोठ्या दादा कोणत्या विचारात पडले आहात एवढे ?"      " वासुदेव माझे अनुज माझ्यावर फार नाराज आहेत."      " का बरं ?"       " बर्बरीक बद्दल जो मी  निर्णय घेतला तो चुकीचा आहे, असं त्यांचं मत आहे, आपले पण मत असेच आहे का ?"      " छे छे छे ! आपला निर्णय कधीही चुकीचा असू शकत नाही. कारण कमळ कुंज मध्ये कमळच उगवणार तिथे काटे असू शकत नाहीत. आपण तेच केलं ज्याची आपल्या कडून सदैव अपेक्षा केली जाते. अर्थात आपण नेहमी प्रमाणे धर्माचे कार्य केले आहे."     " असं जर आहे , तर आपल्याही चेहऱ्यावर असंतुष्टाचे भाव का दिसत आहेत , जसे माझ्या अनुजांच्या चेहऱ्यावर उमटले आहेत."     " त्याचे काय आहे मोठ्या दादा एखाद्या गोष्टीशी सहमत होणे वेगळी गोष्ट आहे, आणि त्याच गोष्टीवर अंतुष्ट होणे ही दुसरी गोष्ट आहे. सांगायचे तात्पर्य हे की आपल्या निर्