Vamana Hari Watmare | Love story | Mahendranath prabhu

इमेज
  Vamana Hari Watmare         This is a very long year ago, there is a Konkan village, the village of the village is Tamhankar Wadi, the scenic village, and the Bils in the mountains, and the bay originated from the mountain, and the cake came from the village of Kharipatan and the end of Kharipaton. The end was going to the Arabian Sea than the ends. Tamhankar Wadi is situated in Kashi on the basis of Sahyadri Mountains, because the village's gate was in the gate of the village, this village has been a different importance. Fresh fish in the creek, the villagers get eaten every day. Coconut trees are also in the horticulture, according to the horticultural horticultural horticulture, even though the main business of the villagers are the major business of these villages, though the member of the villagers, the mangoes, the mangoes, which are in large custody, are the door of the mangoes.. Be. Tamhankar Wadi was living in the village of merciful and Damanti. Bec...

महाभारत १०३ | मराठी स्टोरी, मराठी शॉट स्टोरी, मराठी कथा | महेंद्रनाथ प्रभु.

महाभारत १०३
महाभारत १०३

 


                      महाभारत १०३

   वसुदेव कृष्ण म्हणाले , " तू सुद्धा ज्ञानाच्या नावेत बसून पापाचा सागर पार कर आणि हे समजून घे पार्थ की जसा अग्नि सर्वकाही जाळून भष्म करते तशीच ज्ञानाची अग्नि , कर्मफळाची इच्छा ,  फळाची प्राप्ती झाली नाहीतर येणारा
क्रोध आणि त्या क्रोधा सोबत पुढे  येणारा मोहाला जाळून
भष्म करून टाक पार्थ ह्या मंत्राला नेहमी लक्षात ठेव की
जगा मध्ये ज्ञाना सारखी ना कुणी वस्तू आहे  आणि नाही कुणी तत्व म्हणून ज्ञानच सर्वांत उत्तम आहे."

    जे अज्ञानी आहेत, ज्यांना श्रद्धा भाव नाहीये आणि लोक
छोट्या छोट्याशा गोष्टीवर शंका करतात अश्या संशयी युक्त
लोकांचा विनाश होतो आणि त्याना ना या लोकांत सुख
मिळते ना परलोकात सुख मिळते. म्हणून हे पार्थ संशयाचा
त्याग कर आणि तुझ्या आंत मध्ये जो मुनी बसला आहे , त्याला जागे करून  ज्ञानी योगी बन आणि ज्ञानीची चरणसीमा च कर्म संन्यास आहे." तेव्हा अर्जुन ने प्रश्न केला
की ,आपण कर्म संन्यास नि कर्म योग या दोघांची प्रशंसा
कशी काय करू शकता केशव ?" तेव्हा वसुदेव कृष्णाने
उत्तर दिले की , ते दोन्ही एकमेकांचा रस्ता अडवत नाहीत.
शिवाय ते दोन्ही कल्याणकारीच आहेत. परंतु दोघांमध्ये
श्रेष्ठ कर्म योग आहे."
    " का आणि कसे ?"
    "  जो मनुष्य द्वेश आणि आकांक्षाच्या वर उठून जो कर्म
करतो तो नित्य संन्यासी आहेच आणि त्याच्या मनात कुणा
बद्दल द्वेश रहात नाही तो संसारिक बंधनापासून मुक्त होतो.
म्हणून कर्म संन्यासाला योगापासून वेगळे समजतो तो मूर्ख आहेच. ज्ञानी असं कधी करत नाही. कारण कर्म त्याग तर
वास्तविक पाहता निहित स्वार्थाचे नाव आहे पार्थ , म्हणून
कर्म योगा शिवाय कर्म संन्यासाची प्राप्ती होऊच शकत
नाही. कर्म योगीचे तत्वज्ञान असते की त्याचे पाहणे न पाहणे,
ऐकणे न ऐकणे , चाखणे न चाखणे , जागणे न जागणे, घेणे
न घेणे , सोडणे न सोडणे आणि त्याचे प्रत्येक कर्म लोक
कल्याणासाठी असते. म्हणून तो पापापासून एकदम वेगळा
असतो.
   हे धनंजय  कर्मयोगी कर्मफळ त्यागून परमशक्तीला प्राप्त
करतो आणि नऊद्वार असलेल्या शरीर रुपी घरात एकदम
सुखी राहतो." तेव्हा महाराज धृतराष्ट्रा ने संजय ला न समजून
विचारले की , हे संजय आपल्या शरीरात नऊ द्वार कुठून आले आहेत नि कोठे आहेत ? "तेव्हा संजय उत्तरला ," महाराज वसुदेव कृष्ण  दोन डोळे , दोन कान, एक तोंड ,उत्सर्जन आणि प्रजननाच्या एक एक इंद्रियांची गोष्ट करत आहेत. त्यांच्या म्हणण्याचे तात्पर्य हे आहे की केवल निष्काम  करणाऱ्याचाच आत्मा त्याच्या शरीरात सुखी राहू शकतो. कारण आत्मा मोहाच्या धुंदरट वातावरणात सुखी राहू शकत नाहीये."
    " या बद्दल मी कधी विचारच केला नाही संजय."
    " जर मनुष्याने हा विचार सोडला असता तर महाराज
वसुदेव कृष्णाना हे सांगायची आवश्यकता काय होती ?"
    " बरं बरं तू आता नऊ द्वार असलेल्या घरापासून पुढे चल
संजय." तेव्हा संजय उत्तरला की ,वसुदेव कृष्ण सांगत आहेत
की ,
    " मनुष्य  भ्रमित होण्याच्या कारण हे आहे पार्थ त्याचे
अज्ञान त्याच्या ज्ञानाला झाकून टाकते. आणि जेव्हा आत्मज्ञान  अज्ञानाला नष्ट करते. तेव्हा त्या परम तत्वाला
सूर्याच्या प्रकाशा सारखी चमक येते ,आणि ज्ञानी मनुष्य
ह्या नश्वर जीवना मध्ये परम सत्याला प्राप्त करतो. तो जन्मावर जन्म घ्यावे लागत नाहीत. तो ह्या नश्वर जीवना मध्येच मोक्ष प्राप्त करतो. मग हे पार्थ हे नश्वर जीवन सुध्दा
भरपुर ही महत्वपूर्ण आहे ,आणि त्यानंतर तुझा आत्मा तर
असेल .परंतु तू नसणार म्हणून तू ह्या नश्वर जीवन काळातच
अर्थपूर्ण समाजासाठी कल्याणकारी बनवून टाक पार्थ. ज्ञान
प्रकाश आहे तर मग ह्या प्रकाशाला प्राप्त केलास तर तू असा
भ्रमात भटकण्यापासून वाचशील , आणि तुला शांती मिळेल.
हे धनंजय शांती चा सरळ मार्ग मी आहे. जो मला प्रत्येक
यज्ञाचा लक्ष , प्रत्येक लोकांचा स्वामी , आणि प्राणींचा
हितचिंतक मानतात. तेच शांती प्राप्त करतात. तू जर मला
हितचिंतक समजत असशील तर पार्थ माझं ऐक नि युध्द
कर , कारण युद्धा शिवाय तुला शांती मिळणार नाहीये. आपल्या धर्मा पासून पलायन करणे म्हणजे शांती प्राप्ती
करणे नव्हे ! हे युद्ध तुझा धर्म आहे. अर्थात तुला तुझ्या धर्माचे पालन करणे अनिवार्य आहे. तू त्याच्या परिणामाचा
विचार करू नकोस. कोण जगेल नि कोण मरेल याचा विचार
तू करू नकोस. लोक ज्याला संन्यास समजतात. त्याला तू
योग मान आणि संशय , द्वेश  आणि आकांक्षा पासून मुक्त
होऊन युध्द कर , कारण या त्यागा शिवाय कुणी योगी होऊच
शकत नाहीये.

     मनुष्याचे कर्तव्य आहे की त्याने आपले पतन होऊ देवू नये , आणि स्वतःचा उध्दार व्हावा असे वाटत असेल तर त्याने  सत्याचा मार्ग सोडू नये. मनुष्य स्वतःच स्वतःचा मित्र ही असतो नि शत्रू ही असतो. ज्याने आपल्या साऱ्या इंद्रियांना
आपल्या ताब्यात ठेवले तो स्वतःचा मित्र बनतो , आणि जो
इंद्रियांच्या स्वाधीन होतो तो स्वतःच स्वत:चा शत्रू बनतो. जो
शिशिरकाळ आणि ग्रीष्मकाळ , सुख आणि दुःख , मान आणि अपमान मध्ये शांत रहातो , आणि संतुलन ठेवतो तो जितेंद्रीय पुरुष सदैव परमात्मा  मध्ये लिन रहातो. परंतु हे पार्थ भरपुर खाणारे नि बिल्कुल न खाणारे किंवा अधिक झोपणारे वा अजिबात न झोपणारे ह्या लोकांना हा योग साध्य होत नाही. जीवन संतुलनचे नाव आहे पार्थ आणि संतुलन ठेवून जगणारे मनुष्य दुःखावर मात करतात. जसे वायूलहरीत सुद्धा दीपकाची ज्योती निश्चल राहते. चंचल मनाला आपली मनमानी करायला देवू नकोस पार्थ त्याला थांबव. त्याला आपल्या आत्म्याच्या आधीन बनव. तुझ्या शंकाचा हाच उपचार आहे. माझ्याकडे पहा पार्थ माझ्याकडे पहा. ज्याला प्रत्येक दिशेला आणि प्रत्येक वस्तू मध्ये फक्त मीच दिसतो. तो कधीच भटकणार नाही. तो मला विसरत नाही आणि मी त्याला विसरत नाही. तो संसारिक जीवन जगत असूनही तो जगापासून वेगळा आणि माझ्या मध्ये लिन राहतो. हे अर्जुन जो योगी सगळ्यांच्या सुख-दुःखाला आपले सुख -दुःख मानतो तोच परम श्रेष्ठ आहे." तेव्हा अर्जुन ने प्रश्न केला , की योग मार्गावर चलता चलता मन भटकू पण तर शकते ."
   "  हां अवश्य भटकू शकते."
   " केशव ब्रम्हांच्या प्राप्तीचा मार्ग आणि ह्या भटकण्याचा
परिणाम काय होतो ? भटकणारा ढगा प्रमाणे छीन्नविछीन्न
होऊन कुठं नष्ट तर होणार नाही ना केशव ?"
    " ते लोक असो वा परलोक असो. कल्याणकारी शुभ कार्य
करणाऱ्याची दुर्गति होऊच शकत नाही. हे कुंतीपुत्र माझ्या
मध्ये तुझे मन लाव. माझ्यावर सर्व भार ठेवून निर्भयपणे  योग
कर. तुला माझा संशय नसलेले पूर्ण ज्ञान मिळेल. हे धनंजय
सर्वांत मोठे सत्य तर  मी स्वतः आहे, मीच धागा आहे ज्या
धाग्यांमध्ये ही सारी प्रकृती मन्या प्रमाणे गुंफली आहे. हे
कौन्तेय पाण्यातील रस मीच आहे , सूर्य आणि चंद्रामधील  प्रकाश मीच आहे , वेदातील ओंकार मीच आहे , आकाश
मधील शब्द मीच आहे , मीच पृथ्वी मध्ये पवित्र सुगधं आहे ,
मीच अग्नीत तेज आहे , प्राणी मध्ये जीवन शक्ती मीच आहे ,
तपस्वीचे तप मीच आहे. प्रारंभिक बीज मीच आहे , बुद्धिमानीची बुद्धी सुद्धा मीच आहे , तेजस्विनीचे तेज पण मीच आहे , बलवानाचे बळ सुध्दा मीच आहे , आणि प्राणींयाच्या धर्माच्या विरुद्ध न जाणारा काम ही मीच आहे , मी सगळ्या मध्ये आहे पार्थ , परंतु सगळ्यांपासून वेगळा आहे , मी अविनाशी आहे , निर्गुण आहे पार्थ मी गेलेला सर्व काळ , आधुनिक काळ, येणारा साऱ्या काळांच्या सर्व प्राणांना मी ओळखतो. परंतु  मला कुणी ओळखत नाही. मीच साऱ्या जगाचा पिता आहे , मीच साऱ्या जगाची माता आहे , आणि पालनकर्ता मीच आहे , मीच ऋग्वेद आहे, आणि मीच सामावेद आहे , मीच स्वामी आहे , मीच शिरण आणि मीच श्रीधणं मीच विलोपन आहे, मीच सगळ्यांचा आधार आहे  पार्थ मीच सर्वकाही आहे, ग्रीष्म ऋतू पण मीच आहे, वर्षा ऋतू पण  मीच आहे आणि हे पार्थ संसाराचा विनाश बीज पण मीच आहे , मी सर्वांचा मित्र पण आहे ,  मी सर्वांसाठी एक सारखाच आहे ना कोणी मला प्रिय आहे आणि नाही कुणी मला अप्रिय आहे ,परंतु जे मला श्रद्धाने पूजतात ते माझे मित्र आहेत ,  ते माझ्यात आहेत आणि मी त्यांच्यात आहे."
     " हे कृष्ण आपण परब्रह्म आहात ,  परम साधक आहात ,
आपण शास्वत आहात ,  दिव्य तत्व आहात , ईश्वर आहात ,
आपण आजन्म पण आहात , हे योगेश्वर हे ज्ञान मूर्ती , मी
आपल्याला ओळखू कसे ? कृपया आपण मला विस्तारपूर्वक
सांगा माधव."
     " हे कुरुश्रेष्ठ माझ्या विस्ताराचा कुठंच अंत नाहीये. पण
तरी सुध्दा ऐक. मी प्राण्यांच्या हृदयात विस्तुत आहे."
    " हे गुणकेश मीच आरंभ आहे, मध्य पण मीच आहे आणि
शेवट पण मीच आहे. मी आदित्य मध्ये विष्णू , ऋतू मध्ये मनीची , ज्योती मध्ये सूत , आणि नक्षत्रा मध्ये चंद्र आहे,
वेदा मध्ये सामावेद मीच आहे, देवा मध्ये इंद्र मीच आहे, इंद्रियां मध्ये मन मीच आहे , आणि प्राण्या मध्ये चेतना पण
मीच आहे, मीच रुद्र , मीच शंकर , यक्ष आणि राक्षस मध्ये
कुबेर मीच आहे , वसू मध्ये अग्नि मीच आहे , आणि पर्वता मध्ये सुमेर मीच आहे, पुरोहिता मध्ये ब्रहस्पती मीच आहे,
सेनापती मध्ये कार्तिकेय मीच आहे, आणि जलाशय मध्ये
महासागर मीच आहे , महर्षी मध्ये भृगु वाणी मध्ये ओंकार
यज्ञा मध्ये  जय यज्ञ ,वृक्षा मध्ये पिंपळ, आणि देवर्षी मध्ये
नारद मीच आहे , गंधर्व मध्ये चित्रव्रत पण मीच ,सिद्धी मध्ये
कपिलमुनी, हे महारथी मी अश्व मध्ये अमृत मंथनाच्या वेळी
उत्पन्न झालेला उच्छस्वा आहे, हत्ती मध्ये ऐरावत आहे आणि मनुष्या मध्ये नरपती मीच आहे, शस्त्रा मध्ये वज्र मीच,
धेनु मध्ये कामधेनू मीच आहे, जनका मध्ये कामदेव मीच आहे, नागा मध्ये शेषनाग मीच आहे.
    दैत्या मध्ये मीच प्रल्हाद आहे, गणका मध्ये काळ मीच
आहे, वनचरा मध्ये सिंह मीच आहे , पक्षांमध्ये विष्णू वहान
गरुड मीच आहे. धनुर्धर मीच , शस्त्रधारी मध्ये राम मीच आहे
अक्षरा मध्ये ओंकार मीच ,कधी न समाप्त होणारा काळ पण
मीच आहे , चारमुखी श्रेष्ठा आहे पार्थ , मीच मृत्यू आहे पार्थ
मीच सर्वांचा आरंभ आहे, जे येणाऱ्या काळात जन्म
घेणार आहेत आणि काहींचा अजून आरंभच झाला नाही आहे.
   मी स्त्री ची कीर्ती , श्रीवाह, स्मृती , मेघा, धुती आणि क्षण ,
मी ऋतू मध्ये ऋतुराज ,आहे , तेजस्विनी चे तेज , मी गुण
आहे , मीच विजय आणि मीच प्रयत्न आहे, यादवा मध्ये मी
वसुदेव आहे ,पांडवा मध्ये अर्जुन , मुनी मध्ये व्यास, आणि
कवी मध्ये शुक्राचार्य , मीच उत्पत्ती का बीज आहे पार्थ , मग
तो चर असो वा  अचर माझ्या शिवाय काहीच शक्य नाहीये."
   " हे कमलनयन माझे डोळे आता उघडले आहेत. शंका
कुशंकाचे ढग बाजूला झालेत आता. आपण जे सांगितलेत
तेच सत्य आहे. आणि त्या व्यतिरिक्त काहीही सत्य नाहीये.
परंतु हे परमेश्वर मी आपल्या ईश्वरी रूपाचे दर्शन घेऊ इच्छितोय."
      " हे निष्पाप अर्जुन आपल्या ह्या डोळ्यांनी माझे ते रूप
पाहू शकत नाही. म्हणून मी तुला दिव्यदृष्टी देतो." असे म्हणून
वसुदेव कृष्णाने अर्जुनला दिव्यदृष्टी प्रधान केली. त्यानंतर
आपले विश्व विराट रूप धारण केले. ते पाहिल्यानंतर अर्जुनचे मन एकदम प्रसन्न झाले. डोळे भरून ते विश्वरूप पाहिल्या नंतर अर्जुन म्हणाला ," हे नाथ पहिल्यांदा कधी न पाहिलेले आपले हे विराट रूप पाहून मी धन्य झालो. परंतु चित्त भीतीने व्याकुळ झालो आहे म्हणून आपले विराट रूप सोडून पुन्हा आपल्या मूळ रुपात या आता."
    " हे कोणते रूप आहे संजय ?"
    " मी आपल्याला त्या विराट रूपाचे वर्णन करून सांगू शकत नाहीये. हे रूप दिव्यदृष्टी असणारेच पाहू शकतात.
जर आपण महर्षी कडून दिव्यदृष्टी घेतली असती तर आपण
सुध्दा विराट रूप पाहू शकला असता."
    " मला माझ्या दुर्भाग्या विषयी काहीही सांगण्याची गरज
नाहीये. संजय तिकडे काय चालले आहे ते पाहून सांग मला."
    " जशी आपली आज्ञा !" असे म्हणून संजय कुरुक्षेत्रावर
काय चालले आहे ते पाहू लागतो."
     " क्षमा प्रभू क्षमा हे विश्व मूर्ती , हे अनंत , हे नारायण ,  हे
दयासागर , जसा मित्र मित्र पिता पुत्र आणि भगवन्त आपल्या भक्ताला क्षमा करतो, हे प्रभू आपण सुध्दा मला
क्षमा करा. असे अर्जुन  अर्जुन बोलला.
    " मित्रा , पिता आणि पुत्र ,ईश्वर आणि भक्त या मध्ये क्षमाचे स्थान आहेच नाही या शब्दांचा आधार आहे स्नेह , श्रद्धा , आणि भक्ती , कारण जो माझा भक्त आहे तो माझ्या
मध्येच ध्यान लावतो जो सदैव माझ्या मध्ये लिन असतो. आणि जो माझी श्रध्दापूर्वक  उपासना करतो. मीही त्याचाच
होऊन जातो पार्थ ! हा संसार तर पिंपळाचे झाड आहे. त्याची
मुळे वरच्या बाजूला तर फांद्या खालच्या दिशेने वळलेल्या
असतात. वेद ह्या वृक्षाची पाने आहेत , आणि ज्याला हे माहीत आहे त्याला वेदांचे अर्थ पण  माहीत आहे ,असे समज
ह्या वृक्षाची शाखा वर खाली सर्वत्र पसरलेली असतात. त्याचे
पालन पोषण केले आहे प्रकृतीच्या तीन गुणा मध्ये सत्वगुण, रजोगुण, आणि तमोगुण, ह्याची मुळे संपूर्ण मानव
समाजा मध्ये भरपूर खूप दूरवर पसरली आहेत. वास्तविक
रूपाची अनुभूती ह्या संसार मध्ये शक्यच नाहीये पार्थ कारण
कुणी ही पाहत नाही की वृक्षाचा आधी, अंत आणि आधार
काय आहे नि कुठे आहे ? परंतु मनुष्य ह्या संसाररूपी वृक्षाची
वैराग्याची कुऱ्हाड ह्याला तोडून ते परम पद प्राप्त करू शकतो. परंतु तिथे पोहोचून त्याला परत यायचे आहे ,आणि
हे पार्थ वैराग्य निहित स्वार्थ त्यागाचे नाव आहे. म्हणून तुला
विचारच करायचा असेल तर माझा कर, पुजायचे असेल तर
फक्त मला पूजत जा आणि स्वतःला मला अर्पित कर ,
सर्वश्रेष्ठ धनुर्धर मला शरण ये मी तुला मार्गदर्शन करीन. माझ्यात मन लाव पार्थ माझा भक्त हो आणि मला नमस्कार
कर ,जर तू असे केलेस तर मी प्रतिज्ञा करतो की तू मला
संपूर्ण रूपाने प्राप्त करशील , आणि साऱ्या धर्माला त्याग कर पार्थ आणि माझ्या शरण मध्ये ये. मी तुला सर्व पापातून मुक्त करीन. म्हणून शोक करू नकोस. धनंजय, हे प्रिय भक्त , मीच कर्म योग आहे, भक्ती आणि ज्ञानाचा चरणबींधु आहे,
आणि परम लक्ष आहे, म्हणून योगी सारखे निष्काम कर्म कर,
चिंता करू नकोस पार्थ माझ्यावर विश्वास ठेव. महाबाहो
आपले गांडीव धनुष्य उचल , आणि युध्द कर."
    तेव्हा संजय म्हणाला ," कुंती पुत्र ने गांडीव उचलले महाराज."
     " अर्थात  आता नक्कीच सुरू होणार , आणि हे संजय
ह्या युद्धाचा मला परिणाम सुद्धा माहीत आहे. म्हणून तुझी
इच्छा असेल तर मला सोडून जाऊ शकतोस. जर रथच नसेल
तर सारथी ठेवून काय करू ?"
    " जर आपला हा आदेश असेल तर मी त्याचे अवश्य पालन करीन. परंतु मी आपल्याला त्यागू इच्छित नाहीये."
     " निष्काम सेवा करू इच्छितोस तर मग ठीक आहे, नको
जाऊ तू इथंच थांब. आणि मला हे सांग अर्जुनचा पहिला
बाण कोणाला लागला ? त्या शिवाय माझ्या शूरवीर पुत्रांना
वीरगती कशी प्राप्त झाली ते सांगायला थांब इथं." असे म्हणून किंचित थांबून पुढे म्हणाले ," संजय युद्धाला सुरुवात
झाली का ? माझा पुत्र दुर्योधन युद्धासाठी व्याकुळ झाला
असेल."
     " हां युवराज तर व्याकुळ झाले आहेत. परंतु त्याना युद्धाचा परिणाम माहीत नाही ना म्हणून."
    " जरी त्याला युद्धाचा परिणाम माहीत पडला असता तरी
तो मागे फिरला नसता कारण तो क्षत्रिय आहे आणि क्षत्रिय
कधी परिणामाचा विचार करत नाहीये. त्याला फक्त इतकंच
माहीत असते की शत्रू पक्षाशी युध्द करता करता वीरगती ला
प्राप्त होणे."
    " जर आपण नेत्रहीन नसता तर युद्धात भाग घेतला असता का ?"
   " तू हा निर्दयी प्रश्न विचारायला नाही पाहिजे होता. आता
विचारले आहेस तर त्याचं उत्तर ऐक. मुख्य म्हणजे माझा
पुत्र दुर्योधन माझ्या महत्वकांक्षाचे फळ आहे. परंतु मी नेत्रहीन नसतो तर कदाचित मी युध्द होऊच दिलं नसतं , आणि जर युध्द टाळता आलं नसतं तर हा प्रयत्न केला
असता की पांडुपुत्र पुढे यावेत. परंतु वसुदेव ने माझे काहीच चालू दिलं नाही तुला वाटत असेल की हे युद्ध माझ्या पुत्रात
नि अनुज पुत्रात होत आहे, परंतु सत्य हे नाहीये. युध्द माझ्यात नि वसुदेव मध्ये सुरू आहे."
     " जर आपल्याला हे सर्व माहीत आहे तर युध्द थांबवत का नाहीये ?"
    " मी क्षत्रिय आहे संजय रणभूमीवर पाठ दाखवू शकणार
नाहीये. हे युध्द वास्तविक पणे निर्णायक युध्द असेल."
    " हस्तिनापूरच्या विषयी विचार करा महाराज."
    " हस्तिनापूरच्या विषयी मी का विचार करू संजय  आणि
का ? हस्तिनापूर ने माझ्या बद्दल कधी विचार केला आहे का ? त्याने तर माझा हा अपमान सुध्दा चुपचाप सहन केला. मी राजा असूनही माझ्या अनुजचा प्रतिनिधी म्हणून राज्य करतोय. तुला आठवते का ? अश्या कोणत्या मोठ्या भावाचा
अपमान झाला असेल ? म्हणून हस्तिनापूरला माझ्या सोबत
होत असलेल्या अन्यायाचे काहीतरी मोल द्यावेच लागेल. हा
सौदा सर्वांनाच महाग पडणार आहे अर्थात मला ही आणि
वसुदेवालाही कारण पांडवांना जेवढ्या जखमा होतील .
वास्तविक त्या जखमा वसुदेवाला होणार आहेत. आता जर
इथं विदुर असता तर त्याने आपला नीतीचा बाण अवश्य
सोडला असता. परंतु आता युद्धाला उशीर का केला जात
आहे जरा बघून सांग बरं." महाराज धृतराष्ट्रा म्हणाले.
    " महाराज युवराज सुध्दा हाच प्रश्न गंगापुत्र भीष्मांना
विचारत आहेत ." संजय ने रणभूमी कडे दृष्टी करून म्हणाले.
    " पितामहा आपण इथं का उभे आहोत ? युद्धाला सुरुवात
कधी होणार ?"
    " जोपर्यंत युध्द आरंभावाचा शंक वाजत नाही तोपर्यंत."
    " मग आपण कोणाची वाट पाहताय वाजवा ना शंक ."
    " जर दोन्ही सैन्या एकमेकांसमोर उभे आहेत तर युध्द
अवश्य होईल. जेव्हा क्षत्रिय रणभूमीवर येतात तेव्हा एकाला
विजय नि दुसऱ्या ला पराजय प्राप्त होतो. ह्या युद्धात ही तेच
होणार आहे. परंतु आता आपल्या डोळ्याच्या पापण्या झपकविल्याशिवाय  रणभूमीच्या मध्यावर सूंदर दृश्य पाहण्याचा प्रयत्न कर. हे आमच्या डोळ्यांचे सौभाग्य आहे की पाहायला मिळत आहे. वसुदेव सारखा सारथी नि अर्जुन
सारखा महारथी परंतु हे आमच्या कर्माचे दुर्भाग्य आहे की
आम्हाला त्या वार्तालापचा एक शब्द पण ऐकू येत नाहीये.
हे पुत्र जर वायूचा एक झोका सुध्दा मला त्या वार्तालापचा
एक शब्द जरी ऐकविल ना तरी मी त्याला माझ्या साऱ्या
शुभ कर्माचे फळ देऊन टाकीन. मला आज प्रथमच मी
गंगापुत्र भीष्म असल्याचे दुःख होत आहे, मला शक्य जर
असते तर मी विधात्याला म्हणालो असतो की हे विधात्या
मला गंगापुत्र भीष्म बनविण्या पेक्षा कुंती पुत्र अर्जुन का
बनविले नाहीस ?"
    " अहो पितामहा तो गवळी अर्जुन ला हेच सांगत असेल
की युद्धातून वाचण्याचा उपाय शोध. कारण आपल्याकडे
एवढी मोठी सैन्या आहे त्या मानाने पाडवांकडे शून्या च्या
बरोबर आहे , आणि वसुदेव काही मूर्ख नाही मृत्यू नि आत्महत्याचे अंतर माहीत नाहीये , आणि ह्या गवळ्या ने
मला साथ ना देवून माझा अपमानच केला आहे. मी त्याला
कदापि विसरणार नाहीये." तेवढ्यात त्याची नजर अर्जुन वर
पडली. तसा दुर्योधन म्हणाला ," ते बघा त्यांचा रथ मागे वळला. आता तर शंक वाजवा ना ?"
    " मी वाट पाहतोय."
    " कोणाची वाट पाहताय ?"
    " हे समज माझ्यासाठी युध्द कमी आणि धर्म संकट जास्त
आहेत. म्हणून मला युध्द आरंभ करण्याचा मुहूर्ताची वाट
पाहू दे."
    " मग आपण शुभ मुहूर्त का नाही म्हणाले पितामहा ?"
    " मी जिथं उभा आहे तेथून मला शुभ मुहूर्त दिसत नाहीये."

क्रमशः

पुढच्या भागासाठी वाट पहावी लागेल कारण मला एक
कथा लिहून द्यायची आहे.आणि ती कथा प्रतिलिपीवर प्रकाशित होणार नाही. kuku fm वर ऐकावी लागेल. धन्यवाद



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाभारत १३४ | Mahabharat part 134 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३३ | Mahabharat part 133 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३५ | Mahabharat part 135 | Author : Mahendranath prabhu.