महाभारत १०९ | मराठी स्टोरी, मराठी शॉट स्टोरी, मराठी कथा | महेंद्रनाथ प्रभु.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाभारत १०९ |
महाभारत १०९
पितामहा पडल्या त्याच दिवशी भीमाच्या हातून माझ्या
पुत्राचा अर्थात भानुसेंनचा वध झाला.त्यांच्यात अंत्यसंस्कार करायचा सोडून मी पितामहांना भेटायला गेलो.परंतु मला माहित आहे की माझा पुत्र मी त्याच्या अंत्यसंस्कारासाठी गेलो नाही म्हणून तो माझ्यावर रागावणार नाहीये याची मला पूर्ण खात्री आहे.परंतु संग्रामात वीरांचे मरण पत्करणाऱ्या त्या शुराला माहिती नव्हतं की ज्याच्या हातून त्याचा वध झाला तो त्याचा सख्ख्या चुलता आहे ! अज्ञानाच्या पोटी म्हणून का होईना पण भिमानं माझ्या एका पुत्राचा बळी घेतला होता. त्याबद्दल मी भीमाला दोष देत नाही म्हणा. त्या बिच्चाऱ्याला काय माहीत की आपण ज्याचा वध करत आहोत तो आपल्या जेष्ठ भ्राताचा पुत्र आहे. परंतु श्रेद्धेचे,मायेचे नात्याचे उरले सुरले अंकुरही माझ्या मनातून होरपळून गेले होते. मन बधिर झालं होतं ! शरीर सुन्न होतं ! मधूनच पितामहांची विकलांग मूर्ती शिबिराच्या पटला पटलांवर दिसत होती. वैरभाव न ठेवता युध्द कर- निरहंकारी नेतृत्व कर ! हे त्यांचे निर्वानीचे बोल फेर धरून डोळ्यासमोर नाचत होते. डोळे मिटून आसणार बसलो होतो बैठकीची मऊ शय्या सुध्दा मला काटेरी भासत होती. तेवढ्यात बाहेरून सत्यसेन आला नि म्हणाला ," बाहेर आपल्या भेटीसाठी कोण आले आहे पहा." मला माहित नव्हते मला कोण भेटायला आलेय ते. मी पटकन बोलून गेलो की मला नाही कोणालाही भेटायचं."
" अहो अगोदर कोण भेटायला आलेय ते तर बघा."
" कोण आलेय ते तर सांग."
" वृक्षालीला पण भेटायची इच्छा नाही का आपल्याला ?
" वृक्षाली आली आहे तर मग तिला बाहेर का थांबविलेस ? आंत पाठवायचं ना ?"
" ती आंत यायला तयार नाही."
" आंत यायला तयार नाही.का बरं ?"
" ते तुम्हीच तिला विचारांना."
" बरं ठीक आहे मीच विचारतो तिला." असे म्हणून मी
उठलो नि बाहेर गेलो.पण तोपर्यंत माझ्या मनात अनेक विचार येऊन गेले. तिला कळलं तर नसेल ना ? तिचा पुत्र वीरगती ला प्राप्त झाला तो. नक्कीच कळलं असणार ,आणि मी तिला सांगितले नाही म्हणून तरी रागावली असेल किंवा पुत्रांच्या अंत्यसंस्कार गेलो नाही म्हणून रागावली असेल. आता तिचा राग कसा शांत करावा बरं ? असा विचार करतच तिच्या जवळ पोहोचलो. तेव्हा तिला पाहून म्हंटल ," अगं वृक्षाली तू बाहेर का उभी राहिलीस ? आंत ये ना ?"
" अंगराज - ' ती किंचित संकोचली.
" अगं आंत ये कुणीही तुला काही बोलणार नाहीये." तेव्हा
मस्तकावर लपेटलेले अंशुक सावरीत ती शिबिरात आली.
" वृक्षाली तू एकटीच आलीस ?"
" एकटीच कुठं दादा होता ना सोबत ."
" तसं नव्हे ! म्हणजे मला म्हणायचं होतं आई-बाबा नाही
आले ?"
" माताजी आणि मामंजी आता फार थकलेत.ते इथपर्यंत
येऊ शकत नाहीत, सुप्रिया पण येणार होती, परंतु भानुसेनासाठी शोक करणाऱ्या वृषकेतूला सांभाळण्यासाठी ती माग राहिली. म्हणून फक्त मीच आली."
" म्हणजे आपला भानुसेन गेल्याचे कळलं तुला ?"
" हां !"
" कुणाकडून ?"
" सत्यसेनदादा कडून ! आणि आपण त्यांच्या अंत्यसंस्कार
गेले नाहीत हे देखील सर्वाना कळलं.!" दु:खावेगानं तिनं मान
खाली टाकली. अंशुकाचा पदर डोळ्यांना लावला.
" वृक्षाली !" परंतु मला काय बोलावे ते सुचल्याने गप्पच
राहिलो. तेव्हा वृक्षालीच म्हणाली ," मला माहित आहे अंगराज माझ्या सारख्या सारथी कन्येशी संसार करून आपण आपले जीवन व्यर्थ घालविले. परंतु आपण आपल्या
आई-वडिलांना कसे विसरलात ? आपल्याला असं नाही
वाटत की आपल्या माता-पित्याना भेटलं पाहिजे. का भेटायला आले नाहीत आपण त्याना ?" त्यावर कर्णाने विचारले की ," तुला कुणी सांगितलं की मी सुतपुत्र नाही म्हणून." त्यावर वृक्षाली उत्तरली ," राजमाता कुंतीदेवींनी !"
" राजमाता कुंतीदेवी ! त्या कुठं भेटल्या तुला."
" ज्या दिवशी गंगेच्या तीरावर आपण त्याना वचन दिलात
त्याच दिवशी त्या मला ही भेटल्या. त्यांनी मला सांगितले की
आपण त्यांचे जेष्ठ पुत्र आहात म्हणून. तेव्हा मला कळले की
आपण क्षत्रिय आहात आणि मी आहे एक सारथी कन्या !"
" मी क्षत्रिय असलो तरी समाजाने मला क्षत्रिय म्हणून कधीच स्वीकारलेले नाहीये. त्यामुळे मी स्वतःला क्षत्रिय समजत नाहीतर सुतपुत्रच समजतोय म्हणून तू आपल्या मनातून हा गैरसमज काढून टाक."
" परंतु माझी एक विनंती आहे आपल्याला."
" काय म्हणणे आहे तुझे ,बोल."
" मला वाटतं की राजमातेचा आपल्यासाठी अजूनही जीव
तळमळतोय त्यांचा. म्हणून मी काय म्हणते आमच्यासाठी
नाही निदान त्यांच्या साठी तरी हे युध्द थांबवावे."
" हे बघ. वृक्षाली मी तुमच्यासाठी वसुदेवाची विनंती पण नाकारली. राजमातेला पण नकार दिला.पितामहांची शेवटची इच्छा पण नाकारली नि तू म्हणतेस की तुझ्याशी संसार करून मी माझं जीवन व्यर्थ घालविले. असे का वाटले तुला ?
माझ्या कृतीतून एकदा तरी जाणवले का तुला ? सांग ना मला . मी आपले कोणते कर्तव्य निभावले नाही. ते सांग बरं !"
" चूक झाली माझी , क्षमा करा."
" पुन्हा असं बोलू नकोस. हां आणि युध्दा बद्दल म्हणशील तर हे युध्द आता थांबणार नाहीये.कदाचित ही आपली शेवटची भेट असेल." असे म्हणताच तिने आपला हात त्याच्या तोंडावर ठेवून म्हणाली ," असं अशुभ बोलू नका पुन्हा कधी !"
" मी बोललो नाही तरी सत्य हेच आहे.परंतु एका गोष्टीचे
वचन देतो तुला की तुझ्यासारखी पत्नी लाभत असेल तर हा एकच जन्म काय पण अनेक जन्म घ्यावे लागले तरी सुतपुत्र म्हणून जन्म घेईन मी ! "
" बस्स अशीच माया ठेवा आमच्यावर , आम्ही तुमचेच
आहोत आम्हाला कधी अंतर देवू नका अंगराज. एवढंच
मागणं आहे माझं तुमच्या पाशी !"
" अगं वेडी का खुळी आहेस तू ? पती-पत्नीचे नाते सहज
वाऱ्याशी झुळूक यावी नि वाऱ्या सोबत उडून जावे इतकं
का कच्या धागा ने बांधलेले असते का ते ? सात जन्माचे
नाते असते ते असे म्हणतात. आणि माझं नातं तर तुझ्या
हृदयाशी आहे.हृदय शिवाय मनुष्य जगू शकतो का ? नाही
ना ? म्हणून हा विचार मनातून कायमचा काढून टाक.मी तुझाच आहे तुझाच राहणार. " असे म्हणताच ती खाली
वाकली नि तिने माझे चरणस्पर्श केले. मी तिच्या दंडाना
धरून वर उचलली. वृक्षाला वेल बिलगते तशी ती मला
बिलगली.मी तिच्या पाठीवरून हात फिरवत असताना मनात
म्हणालो ," जगलो वाचलो तर पुन्हा गंगा किनारी भेट होईल आपली. नाहीतर मग स्वर्गातच भेट होईल असे समज."
" येते मी !"
" हो अवश्य !" ती निघाली तसे मी म्हणालो , " आईला
म्हणावे मी उद्या सूर्योदय पूर्वी दर्शन आणि आशीर्वादासाठी
वाड्यावर येतो म्हणून. "अंशुक मुखा भोवती लपेटून शिबिराचा विणलेला पटल दूर सारीत ती बाहेर पडली. बाहेर
सत्यसेन उभा होता. तो तिला घेऊन निघाला खरा.रथावर
वृक्षाली चढली तशी मला आठवण झाली. मी सत्यसेन हाक
मारून थांबायला सांगितले. नि मी धावतच तिच्या पाशी
पोहोचलो. ते दोघेही स्तिमित होऊन माझ्याकडे पाहत होते.
" वृक्षाली तुझं सौभाग्यलेणं राहिलं !" असे म्हणून
हातातील बाण अंगठ्याला टोचून त्यावर तरळलेला एक टपोरा रक्तबिंदू मी उजव्या अंगठ्याने तिच्या विशाल भाली
चढविला.ती त्या कुंकूमतिलकानं कितीतरी सुंदर दिसत होती.
मी इंद्राला दानात कवच कुंडल दिलं म्हणून मला नावं ठेवणाऱ्या काय माहीत ? आता जर ते अभेद्य कवच अंगावर
असतं तर वृक्षालीच्या भाली जे मी मंगल टिलक लावला.ते
भाग्य मला लाभले असते काय ? " त्यानंतर ते दोघेही निघून
गेले तरी त्यांचा रथ दृष्टी आड होत नाही तोपर्यंत मी तिथंच
उभा राहून पाहत होतो.
द्रौपदी
रात्रीच्या वेळी मी , उत्तरा महारानी सुदेष्णा आणि इतर
काही दासिया मिळून आम्ही जेथे पितामहा रणभूमीवर बाणांच्या बिछान्यावर पहुडले आहेत तेथे पोहोचलो. सर्वात
प्रथम मी त्यांच्या चरणावर आपले मस्तक ठेविले. तसे त्यांनी आपले डोळे उघडून पाहिले नि मग म्हटले, सौभाग्यवती भव ! हे पुत्री करुवंश की कुलवधू म्हणून तुझा सदैव आदर केला जाईल. तू सदैव आदरणीय राहशील."
" हे पितामहा भरतवंशाचे मर्यादाचे प्रतीक आपण आहात.
मी भाग्यवान आहे की आपली नातसून आहे. याचा मला
सदैव अभिमान राहील. मी आपल्या शरीरावर झालेल्या जखमेवरती थोडीशी फुंकर म्हणून फुलं टाकू इच्छिते.पण
त्यापूर्वी मी अजून आपल्याला एक कष्ट देते." असे म्हणून
मी उत्तराला खुण केली. उत्तराने जसे त्यांचे चरणस्पर्श
केले तसे त्यांनी आयुष्यमती भव ! " असा आशीर्वाद दिला. आणि त्यांनी विचारले ," ही कन्या कोण आहे ?" तेव्हा मी
उत्तरली ," सुभद्रा नंदन अभिमन्यूची वधू आहे नि आपली
पौत्रवधू उत्तरा आहे."
" रणभूमी कुलवधूशी भेटण्याचे योग्य स्थान नाहीये.परंतु
मी तुझ्या पतीला सुध्दा रणभूमीवर पहिल्यांदाच पाहिले.
हे तर माहीत नाहीये. युध्द समाप्त होईपर्यंत कोण राहील नि
कोण राहणार नाही.पबरंतु तुझ्या पतीच्या बाणांचा स्वाद मी
चाखले आहे. त्याची युवा अवस्था पाहून मला माझी युवा
अवस्था आठवली. माझ्या पाशी आयुष्याचा कोष असता तर
सारा कोष मी तुझ्या पतीला दिला असता. आज तू मला
पहिल्यांदाच भेटत आहेस. परंतु तुला द्यायला माझ्या जखमा
आणि बाण या व्यतिरिक्त दुसरे काही नाहीये. हे पुत्री अर्जुन
ने मारलेला एकेक बाण मला प्रिय अर्जुनची आठवण करून
देत राहील. जर मला शक्य असते तर अर्जुनाच्या एक एक
बाणांचे मी चुंबन घेतले असते. सुखी राहा पुत्री आणि अर्जुनाला माझा संदेश की वाईट वाटून घेऊ नकोस. कारण
मला बाण मारणे हे तुझे कर्तव्य होते आणि बाणांचा मार
खाणे हे माझे कर्तव्य होते. आपण दोघांनी पण आपापले
कर्तव्य निभावले." त्यानंतर आम्ही सर्वांनी पितामहा चे दर्शन
घेतले नि मागे परतलो. तेव्हा वाटेत मला दुर्योधन भेटला. तेव्हा मी विचारले ," कसा आहेस दुर्योधन ?" तसा तो चिडून
मला बोलला ," तुला काय वाटतं , त्या डरपोक अर्जुनाने पिहमहा शरपंजरी झोपविले म्हणजे हस्तिनापूरचा ध्वज पडला की काय ? हस्तिनापूरचा ध्वज पितामहा नाही तर दुर्योधन आहे."
त्यावर मी त्याला टोला मारला ," हेच तर हस्तिनापूरचे
दुर्भाग्य आहे." असे म्हणून मी तेथून चालती झाली.
दुर्योधन पितामहा पाशी आला आपल्या सैनिकांना म्हणाला ," पितामहाच्या चोहीकडून एक खंदक
खना आणि लक्षात ठेवा. पितामहांच्या अंगाला एक सुध्दा
हींस्त्र प्राण्याने स्पर्श केला नाही पाहिजे. आलं का द्यानात ?"
असे म्हणून तेथून निघून गेला. तेव्हा इकडे अंगराज कर्ण , दु:शासन , शकुनिमामा आतुरतले वाट पाहत होते. तेव्हा
अंगराज कर्ण म्हणाला ," आतापर्यंत यायला हवा होता,कुठं
राहिला ?" तेव्हा गांधार नरेश शकिनि नेहमीच्या सवयी
प्रमाणे व्यग बाण सोडत म्हणाला," पितामहा आपली अंतिम
इच्छा सांगत असतील की हे पुत्र तू पांडवांशी संधी कर आणि त्यांचे इंद्रप्रस्थ त्याना देऊन टाक." अंगराज चिडून
म्हणाला ,' मामाश्री कुण्या शूरवीर बद्दल असे बोलणे शोभत नाहीये तुम्हांला." त्यावर शकुनि उपहास पूर्ण स्वरात उद्गारला ," ज्यांनी तुझ्या सारख्या योध्याला युद्धात भाग घेऊ
दिला नाहीं त्यांच्या बद्दल काहीच खात्रीपूर्वक सांगू शकत नाहीये. भले त्यांच्या वीरता वर संशय घ्यायला नाहीये.परंतु
त्यांची निष्ठा निश्चितच संधिग्न आहे. कारण ते सदैव दुर्योधनाच्या पक्षातूनच लढले खरे ! परंतु त्यांनी सदैव
युधिष्ठीर साठी विजयाची कामना केली.आणि आता जो त्यांच्या जागी प्रधान सेनापती बनले आहेत.त्यांच्या विषयी
सुध्दा खात्रीपूर्वक सांगता येणार नाही. कारण त्यांच्या साठी
अर्जुनच सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे. त्यामुळे त्यांच्या कडून ही
फार अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरेल."
" हां मामाश्री आपण योग्य तेच बोलताय."
" परंतु ते असताना दुसऱ्या कोणालाही प्रधान सेनापती
बनवू शकत नाहीये. " दु:शासन उद्गारला.
" मला तर आचार्य सुध्दा पांडवांचा वध करणार नाहीत.
म्हणून आपण त्यांना सांगू की युधिष्ठीर बंधी बनवून आमच्या
स्वाधीन करा. एकदा युधिष्ठीर बंधी झाला की तो माझा दास झाला. मग त्याला युध्द करायचा अधिकार नाहीये. म्हणजे युध्द आपोआपच समाप्त झालेच समजा."
" अरे वा भाच्या फार नामी युक्ती शोधून काढलीस तू !"
" हां मित्र ही युक्ती तर फारच सूंदर आहे." असे म्हणून
ते आचार्य द्रोणच्या शिबिरात जायला निघतात. त्याच वेळी
आचार्य द्रोणाचार्यांच्या शिबिरात कृपाचार्य आणि अश्वत्थामा उपस्थित असतात. तेव्हा आचार्य द्रोण कृपाचार्यांना उद्देशून
म्हणाले ," अभिनंदन कृपाचार्यजी ! आपल्यावर कुरुसेनेचा
प्रधान सेनापती बनण्याची पाळी आली नाही."
" मला मान्य आहे की पांडव आमचे शत्रू नाहीयेत.उलट
ते माझे गुरूबंधु पण आहेत. परंतु आपण जर दुर्योधनाच्या
पक्षातून युध्द करण्याचा निर्णय घेतला आहे तर मग आता
अडचण काय आहे ?"
" हीच तर सर्वात मोठी अडचण आहे की पांडव आमचे
शत्रू नाहीयेत. वैऱ्याशी युध्द सोपे असते परंतु प्रिय व्यक्तीशी
युध्द करायला तेवढेच कठीण असते पुत्र."
" मग आपण युध्द काम करत आहेत ? नका ना करू ?"
" आम्ही त्याचं मीठ खाल्लं आहे , अर्थात त्याच्या मिठाला
जागले पाहिजे ना , म्हणून नाईलाजाने का होईना त्याच्या
पक्षात युध्द करून वीरगतीला प्राप्त होणे हेच आपल्या हाती
उरले आहे आता. तू त्याचा ऋणी नाहीस. तू स्वतःचा निर्णय
स्वत: घेऊ शकतो."
" हां मी ऋणी नाही आहे त्यांचा. परंतु विश्वासघातकी सुद्धा
नाहीये.म्हणून मी दुर्योधनाच्या पक्षातच राहून युध्द करीन. आणि एक सैनिक या नात्याने पांडवांचा वध करणे माझे प्रथम कर्तव्य आहे."
तेवढ्यात तेथे दुर्योधन ,दु:शासन , कर्ण आणि शकुनिमामा
येतात. तेव्हा अश्वत्थामा कडे पाहून दुर्योधनाने विचारले ,
" कसा आहेस दादा ?"
" एकदम मजेत आहे." त्यानंतर दुर्योधन आचार्य द्रोणाना
प्रणाम केला. आणि कुलगुरू कृपाचार्यांना वंदन केले.तिथले
गंभीर वातावरण पाहून दुर्योधनाने विचारले ," आपल्या शिबिरात एवढं गंभीर वातावरण का बनले आहे ? काही
आपसात वाद-विवाद सुरू होता की काय ?"
" काही नाही आम्हां पिता-पुत्रामध्ये थोडेसे मतभेद सुरू
आहेत. बस्स ! परंतु यावेळी तू इथं कसा आलास ?"
" पितामहांच्या प्रकरणाने मी पुरता घायाळ झालोय. मला
पांडवांच्या शवावर आपला राजवाडा उभा करायचा नाहीये. परंतु मी एवढा पुढे आलोय की तेथून खाली हाताने माघारी पण जाऊ शकत नाहीये. म्हणून आपण युधिष्ठीर दादा ला
बंदी बनवून माझ्या स्वाधीन करा. मी लगेच युध्द समाप्ती ची
घोषणा करीन." तेव्हा आचार्य द्रोणाचार्यांनी विचारले ," तू युधिष्ठिरला मृत्यूदंड तर देणार नाहीस ना ? "
" छे छे छे ! मृत्यूदंड कसा देऊ शकतो मी त्याला तो कसा
ही असला तरी माझा भाऊच आहे ना ?"
" अति सूंदर विचार आहेत. म्हणजे पांडवांचा पराजय
झाल्यावर त्यांचे अर्धे राज्य पण त्याना देऊन टाकशील तर !"
" हां हां त्यात काय संशय ?"
" हाच जर पूर्वी केला असतास तर गंगापुत्र भीष्म आज
बाणांच्या बिछान्यावर नसते."
" हूं ss जे झालं ते झालं त्याला आपण बदलू तर शकत
नाही. परंतु पुढे जे होणार आहे त्याला तर आपण बदलू शकतो की नाही."
" वाहवा ! फारच सूंदर विचार आहेत तुझे. आज मी अति
प्रसन्न आहे तुझ्यावर. म्हणून उद्या मी युधिष्ठिर बंदी बनवून
तुझ्या सुपूर्द करीन." दुर्योधन एकदम खुश झाला. कारण त्याची चाल सफल झाली. त्याच वेळी धृष्टद्युम्न आपल्या शिबिरात झोपला होता. तेवढ्यात तेथे एक सैनिक येऊन म्हणाला ,
" सेनापती चा विजय असो." असे दोन तीन वेळा बोलल्यानंतर धृष्टद्युम्न ला किंचित जाग आली त्यांनी आपले
डोळे किलकिले करून विचारले ," कोण आहे ?"
" एक गुप्तचर आला आहे बातमी घेऊन."
" त्याला आंत पाठवून द्या." सैनिक गेला नि गुप्तचर आंत
आला नि म्हणाला," उद्या आचार्य द्रोण सम्राट युधिष्ठीर ला बंदी बनविणार आहेत." तसा धृष्टद्युम्न चिडून म्हणाला ,
" आचार्य द्रोण समजतात काय स्वतःला ? आम्ही लोक
असताना सम्राट युधिष्ठिर बंदी बनवून नेणार." असे लगेच त्यानी ही सूचना पांडवांच्या सैन्याच्या मुख्य व्यक्ती समोर
मांडली. तेव्हा वसुदेव कृष्ण म्हणाला ," क्रोध करून कोणतेही
कार्य सिध्द करता येत नाही धृष्टद्युम्न. आचार्य द्रोण स्वतःला
काय समजणार ? त्याना आम्ही समजतो. त्याना पार्थ समजतो.मजले दादा भीम समजतात. त्याना समजतात आपले पिताश्री ! आचार्य द्रोण तर गंगापुत्र भीष्मां पेक्षा ही कठीण लक्ष आहे. पितामहांनी तर स्वतःला हटविण्याचा मार्ग सांगितला. परंतु आचार्य द्रोण असं काहीही करणार नाहीत. त्याना हटविण्याचा उपाय आपल्यालाच शोधावा लागेल. म्हणून आपण मोठ्या दादाच्या सुरक्षाचा बंदोबस्त करा.
दुर्योधनाने एकदम अचूक बाण चालविला आहे, त्याला माहित होते की आचार्य द्रोण पांडवांचा वध करणार नाहीत. म्हणून त्याने त्यांचा पुढची ही समस्या दूर केली. आचार्य द्रोण जर मोठ्या दादाला बंदी बनविण्यात यशस्वी झाले तर युध्द
समाप्त होईल कारण बंदी तर दास होतो ना ? त्याला मग
काहीच अधिकार उरत नाहीये. अर्थात इंद्रप्रस्थावर अधिकार
राहणार नाहीये. जर मोठ्या दादा वीरगती ला प्राप्त झाले
तरी युध्द सुरूच राहील.कारण राज्यावर एकाचाच अधिकार
राहात नाही. अनेक उत्तराधिकारी आहेत.परंतु दास व्यक्ती
राहात नाही वस्तू मध्ये त्याची गणना होते.आणि वस्तू कधी उत्तराधिकारी बनू शकत नाही, म्हणून मोठ्या दादाच्या सुरक्षाची पूर्ण जबाबदारी तुम्हां साऱ्यांना घ्यावी लागेल."
" पुत्र धृष्टद्युम्न वसुदेव कृष्ण योग्य तेच बोलत आहेत."
त्यावर अर्जुन बोलला ," आचार्य द्रोण आदरणीय आहेत.
परंतु इथं सुध्दा शूरवीर आहेत.त्यांचे गुरूबंधु आहेत, सत्यकि
आहेत.भ्राता धृष्टद्युम्न आहेत.मत्स्य नरेश आहेत.भ्राता धृष्टद्युम्न योग्य तेच सांगितले की भ्राताश्री गाय नाहीयेत जे
कोणी पण त्यांचे हरण करून घेऊन जाईल."
सकाळी सूर्योदय होताच युद्ध आरंभ झाला. आचार्य द्रोण
पांडव सैन्याचा पार धुवा उडवत होते.परंतु अर्जुन आणि भीम
युधिष्ठिर च्या बाजूला उभे होते. हे लोक मला सोडून जात
का नाहीत हा प्रश्न तर युधिष्ठिर पडलाच होता.पण तरी देखील त्या दोघांंवर रागवत युधिष्ठीर म्हणाले,"तुम्ही दोघे
इथं राहून काय करताय ? जा नि आचार्य द्रोणाचार्यांना रोखा.
ते बघा कसे आपल्या सैन्याची दाणादाण उडवत आहेत. त्या
सैनिकांच्या मदतीला धावून जा. परंतु तरी देखील ते दोघेही
आपल्या जाग्यावरून हलत नाहीत. तसा युधिष्ठिर म्हणाले,
" अरे तुम्ही दोघेही अजून इथंच उभे आहेत ? मी काय
बोलतोय हे द्यानात येतंय का तुमच्या ? आपण आपल्या
अधिकारासाठी लढतो. परंतु ते साधारण सैनिक आपल्या साठी लढत आहेत. म्हणून त्यांच्या सुरक्षेतेची सारी जबाबदारी आपलीच आहे जा लवकर नाहीतर आचार्य द्रोण
आजच युध्द समाप्त करतील. पण तरी देखील आपल्या
जाग्यावरून सुतभरही हलत नाहीत.ते पाहून युधिष्ठीर ला मोठे आश्चर्य वाटले की आपले भाऊ आपल्या आज्ञेचे कधीच
उल्लंघन करत नाहीत ते आज आपले सांगणे ऐकले ना ऐकल्या सारखे करत आहेत. असे का बरं होत आहे ? असा
मनात विचार करून युधिष्ठिर भीमाकडे पाहत म्हणाला,
" प्रिय भीम आज माझ्या आज्ञाचे पालन न करण्याचा
विचार केला आहेस का तू ?"
" तसं दादा आज सेनापती ने आम्हाला आपली सुरक्षा
करण्याचा आदेश दिला आहे."
" असे असेल तर मी त्यांची आज्ञा अस्वीकार करून तुम्हां
दोघांना आदेश देत आहे की जा आणि त्या साधारण सैन्याची
मदत करा." तेव्हा भीम अर्जुनला उद्देशून म्हणाला," अर्जुन
तू जा मी थांबतो इथं."
" अरे तू कशाला थांबतो आहेस. तू पण जा ना अर्जुना
सोबत."
" मी जाणार नाही."
" म्हणजे तू माझ्या आज्ञाचे पालन करणार नाही तर !"
" मोठ्या दादा आपण समजत का नाहीये ? आम्हाला
आपली सुरक्षा करण्यासाठी ठेवलंय इथं."अर्जुन उद्गारला.
" माझी सुरक्षा मला काय झालंय ? " त्यावर ते दोघेही
काहीच बोलत नाहीत. हे पाहून युधिष्ठिर समजला की काहीतरी भानगड आहे जे हे लोक आपल्याला काही सांगत
नाहीयेत. असा मनात विचार करून युधिष्ठीर म्हणाला ," मला
वाटतं तुम्ही दोघे माझ्या पासून काहीतरी लपवीत आहेत."
" काही ही लपवीत नाहीये. आपल्या आदेशाचे पालन
आम्ही अवश्य करू परंतु आमची एक विनंती आपल्याला
स्वीकारावी लागेल." अर्जुन बोलला.
" बोला काय विनंती आहे तुमची ! " युधिष्ठीर ने विचारले.
" आपण सुध्दा आमच्या सोबत चलावे." युधिष्ठिर ने त्यांची
ही विनंती मान्य केली नि तिघेही एकदम निघाले खरे ! पुढे
जाताच कर्णाने अर्जुनला अडविले. दोघांमध्ये घामाश्यांन युध्द
झाले. शेवटी कर्ण अर्जुनच्या एका घातक बाणाने घायाळ झाला तसा अर्जुन दुसरीकडे वळला.भिमाचा सामना दुर्योधनाशी झाला. तर दुसरीकडे सहदेव चा सामना आपल्या मामाश्री म्हणजे मद्र नरेश शल्याशी झाला. दोघांमध्ये घामाशांन युध्द झाले. मद्र नरेश ला आपल्या तीक्ष्ण बाणांनी सहदेव घायाळ करून भूमीवर पाडले. तेवढ्यात शकुनिमामा धावून आला नि सहदेवचा सामना गांधार नरेश शकुनि सोबत सुरू झाला.गांधार नरेशने सहदेवाचा बाण मारून रथ तोडला. तसा सहदेव रणभूमीवर कोसळला. परंतु लगेच उठून उभा राहिला नि त्याने एक भाला गांधार नरेशच्या रथाच्या चाकावर मारून त्यांचा रथ तोडून टाकला. तसा शकुनिमामा पण रणभूमीवर कोसळला. पण लगेच तलवार उपसून म्हणाला ," भाच्या तू आज मरायला आला आहेस." असे म्हणून त्याने सहदेव वर चालून आला. सहदेव ने पण आपली तलवार उपसली नि तुटून पडला शकुनिमामा वर दोघांमध्ये तुंबळ युध्द सुरू झाले. तर त्याच वेळी दुसरीकडे आचार्य द्रोणाचार्यांनी पाहिले की युधिष्ठीर एकटाच आहे ,हे पाहतच त्यांनी युधिष्ठीरला घेरले. दोघांमध्ये युध्द सुरू झाले.परंतु युधिष्ठीर फार काळ त्यांच्या समोर तग धरू शकला नाही. युधिष्ठीर ने फेकलेले सर्व भाले त्यांनी आपल्या बाणांनी तोडून टाकले. तलवार उचलली तर तलवार पण तोडून टाकली. शेवटी बंदी बनविण्यासाठी आचार्य पुढे
सरसावलेच होते पण तेवढ्यात अर्जुन ची नजर त्यांच्यावर
पडली. तसा अर्जुन ओरडला ," सावधान आचार्य !" असे
म्हणून अर्जुन ने त्यांच्या हल्ला केला. त्यामुळे आचार्य द्रोणाचार्यांचा युधिष्ठीर ला बंदी बनविण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. त्याच क्षणी सहदेव आणि शकुनि यांचे युध्द तर चांगलेच जुंपले होते. कधी सहदेव गांधार नरेश शकूनि वर
भारी पडायचा तर कधी शकुनि सहदेव वर भारी पडायचा
असे दोघांचे तुंबळ युध्द सुरू होते.सूर्यास्त झाल्याने युध्द
समाप्तीचा शंक वाजला नि युध्द थांबला. तेव्हा शकुनिमामा
उद्गारला ," भाच्या सहदेव आता सूर्योदयची वाट पहा बरं का ?" त्यावर सहदेव बोलला ," हां मामाश्री !"
धर्तीवर युध्द सुरू होते तर त्याच वेळी स्वर्गात मात्र शंतनू
फार चिंतामय असतात.तेव्हा एक अप्सरां येऊन त्यांना
विचारू लागली की आपल्या चिंतेचे कारण काय आहे ?"
" मी विचार करतोय देवी की माझ्या पूर्वजांनी माझ्याकडे
सुखी आणि समृध्द राज्य सोपविले होते. परंतु....?
" आपण आता व्यक्ती नाहीयेत. तर आत्मा आहात. तेव्हा
आत्म्यांनी मागचे सारे विसरायचे असते." तेव्हा महाराज
शंतनू म्हणाले ," कसे विसरणार ? विसरायचे म्हटले तरी
विसरता येत नाहीत. आज माझेच वंशज एकमेकांशी युध्द
करत आहेत. आणि हे सारे माझ्या मुळे झाले. माझ्यामुळेच
आज माझा पुत्र बाणांच्या बिछान्यावर पडला आहे. युधिष्ठीर ही मीच आहे, आणि धृतराष्ट्र पण मीच आहे. द्रौपदीच्या
वस्त्रहरणाचा आदेश पण मीच दिला होता. मांडीवरचे वस्त्र
हटवून द्रौपदीला मांडीवर बसण्याची आज्ञा पण मीच केली
होती. द्रौपदीच्या वस्त्राला सुध्दा माझ्या हाताचाच स्पर्श
झाला होता. कारण हे सर्व माझ्या मुळेच तर घडलं. जर मी
सत्यवतीच्या प्रेमात पडलो नसतो तर ही वेळ आली नसती.
ना सत्यवतीशी माझा विवाह झाला असता आणि नाही
देवव्रत ला घोर प्रतिज्ञा करावी लागली असती. ह्या साऱ्याला
कारणीभूत मीच तर आहे, म्हणून मला धर्तीवर जायला
हवंय आपल्या वीर पुत्राचे आभार मानण्यासाठी तर जायलाच हवंय पण माझा पायच उठत नाहीये.पण जायला
हवं. " असे म्हणून त्यांचा आत्मा धर्तीवर यायला निघाला
नि थोड्याच वेळात धर्तीवर अवतरले. गंगापुत्र भीष्मां कडे
जाऊन ते उद्गारले ," जेष्ठ पुत्र भीष्म तुला हा शंतनू प्रणाम
करत आहे." तेव्हा आपली मान वळवून गंगापुत्र भीष्म
म्हणाले ," पिताश्री आपण आलेत मला भेटायला "
" हां पुत्र !"
" माझ्या भाग्याची पण विडंबना पहा मी उठून आपल्याला
प्रणाम पण करू शकत नाही. अशी अवस्था माझी झाली आहे ,परंतु या मध्ये ही मला फार सुख मिळत आहे, आपल्या
पपोत्राने पहा मला कसे आपल्या बाणांच्या बिछान्यावर
झोपविले आहे,असे सौभाग्य फक्त मलाच प्राप्त झाले आहे
पिताश्री ! मला त्याच्या बाणांतून खूप आनंद मिळतोय याचे
शब्दात मी वर्णन करू शकत नाही. आणि आपल्या साठी सुध्दा ही अभिमानाची गोष्ट आहे की आपण त्याचे पूर्वज आहात."
" माझ्या साठी अभिमानाची गोष्ट तू आहेस पुत्र तू आहेस.
आणि मीच काय भरतवंश सदैव तुझे गुणगाण गात राहील.
कारण फक्त आपल्या बापाचेच नाव नाहीतर साऱ्या भरतवंशीयांची मान गर्वाने ताट झाली. तू अंबाचेही ऋण उतारलेस तुझ्या सारखा मला पुत्र लाभल्याने मी आज धन्य
झालो. म्हणून तुला साक्षी मानून मी आज आपल्या मातृभूमीची मी क्षमा मागत आहे, कारण मी सत्यवतीला
आपल्या मातृभूमी पेक्षा अधिक मानले ही माझी सर्वात मोठी
चूक होती. मातृभूमी पेक्षा कुणीही मोठा नाही हे मी विसरलो
होतो. त्यामुळे धृतराष्ट्रा सारखे झाड त्या जमिनीत उगवले.
आणि दुर्योधन त्या झाडावरचे फळ आहे. हे सारे माझ्या
निहित स्वार्थामुळे घडले. हे मातूभूमी मला माफ कर."
" जे घडून गेले त्याबद्दल खंत करून काहीच प्राप्त होणार
नाही पिताश्री ! आणि मातृभूमी चा खरा अपराधी आपण नसून मी आहे, मी पितृ भक्तीला मातृभूमी पेक्षा जास्त महत्व दिले. हा त्याचा परिणाम आहे. आज भरतवंशी एकमेकांवर
शत्रू प्रमाणे तुटून पडले आहेत त्याला कारण मीच आहे.मीच
सत्यवतीच्या पित्याला वचन देऊन बसलो. नाहीतर आपण
तर नकार दिला होता दाशराजला. पण माझ्या पितृ भक्तीने
सर्वकाही घोटाळा केला. खरे म्हटले तर मातृभूमी पेक्षा कोणीही मोठा नाही हेच मी विसरलो होतो. मी माझ्या पूर्वजांचाही अपराधी आहे."
" नाही पुत्र नाही तू अपराधी नाहीयेस .?"
" मीच अपराधी आहे पिताश्री हे युद्ध होऊ नये म्हणून मी
खूप प्रयत्न केले.परंतु मी यशस्वी झालो नाही , म्हणून आपली नि पूर्वजांची मी माफी मागत आहे."
" नाही पुत्र तुझा दोष काही नाही बरं. उलट तुझा सारखा
पुत्र माझ्या पोटी जन्म आला. त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. मला तर वाटतं की ह्या देशाचे भारतवर्ष हे नाव बदलून भीष्मवर्ष किंवा देवस्थान असे ठेवायला हवे आहे."
" नाही पिताश्री चक्रवर्ती सम्राट भरतचे वंशज भारतवर्ष
या नावानेच ओळखले जावेत. आज भरतवंशी रणभूमीवर रक्ताचे पाट वाहविणार आहेत .त्यात मी देखील कुठं ना कुठं अपराधी जरूर आहे. म्हणून मी इथं बाणांच्या बिछान्यावर झोपून आपल्या त्या अपराधाचे प्रायश्चित्त करणार आहे."
" नाही पुत्र तू कोणताही अपराध केलेला नाहीये. उलट
पूर्ण भरतवंशी आणि भारतवर्ष सदैव आभारी राहतील.
आता माझं ऐक. इथं बाणांच्या बिछान्यावर खूप झोपलास
आता माझ्या सोबत स्वर्गात चल तेथे तुझी सर्वजण वाट पाहत आहेत."
" काय माझी वाट पाहत आहेत ?"
" हां तेथे अनगीनंत योध्दा आहेत. परंतु तुझ्या सारखे
शरीरावर घाव कोणाच्याही नाहीयेत. म्हणून चल."
" नाही पिताश्री मी या क्षणी आपल्या आज्ञाचे पालन
करू शकत नाही."
" का ?"
" कारण मी इथं अतिथ्थेय आहे जोपर्यंत जाणारे अतिथींना
मी मार्गस्थ करत नाही तोपर्यंत मी कसा बरं येऊ शकतो. म्हणून मी सर्वाना मार्गस्थ करूनच माझी अंतिम यात्रा
सुरू होईल. शिवाय मी आपल्याला वचन दिलंय की जोपर्यंत हस्तिनापूर चारही दिशांनी सुरक्षित दिसत नाही तोपर्यंत मी मृत्यू लोक त्यागू शकत नाही. खरंय ना हे ?"
" हां पुत्र !"
" माझ्यासाठी आपण दुःखी होऊ नका. मी सुध्दा स्वत:साठी दुःखी नाहीये." तेवढ्यात समोरून आचार्य
द्रोणाचार्य येताना दिसले तसा शंतनू चा आत्मा अदृश्य झाला.
आचार्य द्रोणाचार्य गंगापुत्र भीष्मांच्या जवळ येऊन बोलला,
" गंगापुत्र पुत्र आज मी आपल्याला आशीर्वाद द्यायला
आलोय. तशी आपल्याला माझ्या आशीर्वादाची गरज नाही
म्हणा. परंतु हा ब्राम्हण आपल्याला आशीर्वाद देऊ इच्छितोय.
आपल्या जीवन काळाचे पारितोषिक म्हणून आपल्याला
मोक्ष प्राप्त व्हावे ! परंतु मी स्वत:साठी मात्र हे पारितोषिक ईश्वर कडे मागू शकत नाहीये. कारण त्यासाठी मी योग्य नाहीये. निष्काम कर्मयोगी पुरुष केवळ आपण आहात. आम्ही आपल्या निहित स्वार्थामध्ये कुठं ना कुठं अडकलो आहोत. आणि मी आपल्या अगोदर जाणार आहे म्हणून माझा हा आपल्याला अंतिम प्रणाम !" असे म्हणून ते तेथून चालते झाले.
क्रमश:
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा