Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

महाभारत १०७ | मराठी स्टोरी, मराठी शॉट स्टोरी, मराठी कथा | महेंद्रनाथ प्रभु.

महाभारत १०७
महाभारत १०७

 


                        महाभारत १०७

   पितामहांनी आपला शंक फुंकला.तसे पांडव सेनांचा प्रधान
सेनापती धृष्टद्युम्न नेही आपला शंक फुंकला नि युद्धाला
सुरुवात झाली.वद्य षष्टीच्या पाचव्या दिवशी दिवशी च्या युद्धात कौरव सेनेने केलेल्या मकराकृतीवर अर्जुनाने श्येन पक्ष्याकृती  पांडवसेना चालून आली. सर्व कुरुक्षेत्राभोवती अंकुश , दंड, पालाणं ,खंडित पाती, भग्र रथचक्रं यांचे ढीग साचले होते. हात , पाय ,मस्तक , धड यांचे पर्वत उभे राहिले होते. मैनाक पर्वतावरील गृध ,कुकर, कुररी , ह्या मांसभक्षक पक्ष्यांचे थवेच्या थवे युध्द भूमीवरती उतरायला लागले होते. पाचव्या दिवसाचा नायक होता भूरिश्रवा ! त्याने सात्यकीच्या दहा  पुत्रांना यमसदनास पाठवून त्याने सत्त्यकीवर चढाई केली  होती. दोघां मध्ये घामाशांन युध्द झाले. शेवटी सात्यकीची सरशी झाली नि त्याला तेथून पळ काढावा लागला.

     सारंग पक्ष्याच्या आकाराची कुरुसेना सहाव्या दिवशी
रणांगणावर उतरली. तेव्हा समोर पांडवसेनाचा विशाल
मकर पाहून पितामहाही थरकले असावेत. कारण त्यांच्या समक्ष रथातून खाली उतरून  हाती घेतलेला भीम क्रोधाने आचार्य द्रोण , अश्वत्थामा , शल्य यांचे रथ  उचलून फेकून  देवू लागला. तेवढ्यात दुर्योधन  त्याच्या समोर आला. दोघां मध्ये द्वंद्व युध्द जुंपले. कोणी कोणाला ऐकेना शेवटी मस्तकावर प्रहार झाल्याने दुर्योधन मूर्च्छित झाला. तेव्हा
अश्वत्थामा तेथे आला परंतु दुर्योधनाला तेथून बाहेर काढण्याची साठी  त्याला मार्ग सापडत नव्हता कारण भीम
आणि  अर्जुन यांच्या आक्रमक हल्याने कुरुसेना घाबरून  सैरावैरा पळत होती.  परंतु तेवढ्यात तेथे पितामहा आले नि त्यांचे नि अर्जुन द्वंद्व युध्द सुरू झाले. कधी कौरव सेना पांडवसेनावर भारी पडत होती तर कधी पांडव सेना कुरु सेना वर भारी पडत होती. असे नऊ दिवस युध्द सुरू होते. परंतु निर्णय काहीच लागत नव्हता. भीमाच्या हातून मात्र गांधारी पुत्र मारले जात होते. नऊ दिवसात ७४ गांधारी पुत्र मारले गेले.
 
   पांडव सेनेतील सर्व महावीर एकत्र बसून युध्दा विषयी
चर्चा करत होते. तेव्हा युधिष्ठिर ने विचारले ,"  हे मत्स्य नरेश
युध्द कसे जिंकता येईल ?" तेव्हा मत्स्य नरेश म्हणाले ,
    " गंगापुत्र भीष्म जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत युध्द
जिंकणे अशक्यच आहे." त्याना दुजोरा देत पांचाल नरेश
द्रुपद उद्गारले , " शिवाय त्यांच्या कडे इच्छामृत्यूचे वरदान
हे कवच आहे." त्यावर धृष्टद्युम्न म्हणाला ," म्हणूनच तर
अजूनपर्यंत जिवंत आहेत नाहीतर मी त्यांचा कधीच  वध
केला असता. " त्यावर अर्जुन म्हणाला ," भ्राता धृष्टद्युम्न
पितामहा चा वध करणे एवढं सोपे नाहीये. त्यांच्या जवळ
इच्छामृत्यूचे वरदान जरी नसते तरीही साऱ्या संसार मध्ये त्याना परास्त करू शकेल असा एक ही वीर  योद्धा नाहीये."
    " मी पार्थच्या मताशी सहमत आहे. ज्यांनी आपल्या
गुरूंना देखील परास्त केले असे महावीर आहेत ते."
    "  हां ते तर मी सुध्दा पाहिले. मी साक्षी आहे त्याचा.परंतु
मग माझी प्रतिज्ञा कशी पूर्ण होणार वसुदेव ?" राजकुमार शिखंडी उद्गारला.
    " त्यावर सुध्दा उपाय काढला जाईल."
    " उपाय कोणता उपाय ?"
    " त्यासाठी मोठ्या दादाला त्यांच्या पाशी जायला हवंय."
    " केशव मी जाऊन काय करणार तेथें ?"
    " तेच तर सांगतोय."
    " बरं सांग."
    " तेथे जाऊन सांगायचे की पितामहा आपण मला दिलेला
विजयीश्री चा आशीर्वाद परत घ्या."
     " त्यांनी दिलेला आशीर्वाद परत करू ? मी  समजलो
नाही वसुदेव ?"
   " हां कारण त्यांचा आशीर्वाद आणि विजयी श्रीच्या मध्ये
ते स्वतःच धनुष्य घेऊन उभे आहे , मग त्या आशीर्वादचा
फायदा काय ? जसे एखाद्या भूक लागलेल्या माणसा समोर
सोन्याची थाळी दिली. परंतु एकदम खाली तर भूक लागलेला
मनुष्य थाळी तर खाऊ शकत नाही ना ? जर त्यांनी विजयी श्रीचा आशीर्वाद दिला आहे , तर त्या आशीर्वादाची रक्षा
करण्याचे काम सुध्दा त्यांचेच आहे."
     " परंतु केशव ?"
     "  परंतु चा प्रश्नच उदभवत नाहीये पार्थ त्याना माहीत
होते की ह्या धर्म युद्धा मध्ये तुमच्या विरुद्ध युध्द करणार, त्याना हे सुद्धा माहीत होते की त्यांनी  इच्छामृत्यूचे कवच
परिधान केले आहे , आणि ते कौरव सैन्याचे प्रधान सेनापती
आहेत. जोपर्यंत ते स्वतः वीरगती ला प्राप्त होत नाहीत तोपर्यंत  पांडव सैन्याला विजय प्राप्त होणार नाही मग
त्यांनी विजयीश्रीचा आशीर्वाद दिलाच का ?"
   " आपण या प्रश्नाचे उत्तर जाणत नाहीत का मामाश्री ?"
अभिमन्यू ने प्रश्न केला.
    "  मला काय माहीत नि काय माहीत नाही ते सोड वत्स !
परंतु मोठे दादा नि पितामहां च्या मध्ये मी कशाला पडू ?
काय करायचे ते  पितामहां आणि त्यांचे नातू पाहून घेतील.
मोठ्या दादा पाहिजे तर आपल्या सोबत पार्थ ला घेऊन जा."
    त्यानंतर अर्जुन आणि युधिष्ठिर दोघेही गंगापुत्र भीष्मांना
भेटायला गेले. आंत प्रवेश करताच दोघेही एकदम उद्गारले,
प्रणाम पितामहा !"  तेव्हा त्यांची नजर त्या दोघांवर पडली
त्या दोघांना पाहताच हर्षभराने ते म्हणाले, " या पुत्रां नो या !"
   त्या दोघांनी ही त्यांचे चरणस्पर्श केले. तेव्हा त्यांनी त्या
दोघांना पुन्हा विजयी श्री आशीर्वाद दिला. तेव्हा अर्जुन
म्हणाला , " आम्ही इथं आपला आशीर्वाद घ्यायला नाही
आलोय पितामहां ! आम्ही तर आपले आभार प्रगट करायला
आलोय. कारण युध्द भूमी मध्ये परशुराम शिष्याचे दर्शन
घेण्याचे आम्हाला सौभाग्य प्राप्त झाले. आपल्या शरीराचे
आभार प्रगट कारायला आलोय. आम्हाला आपल्या बाणांचा
घावांच्या रुपात प्रसाद  पण  मिळाला. परंतु आम्हाला आपण कोणताही आशीर्वाद देऊ नका."
    " हे तू काय बोलत आहेस पुत्र माझ्या कडून आशीर्वाद
घ्यायचा नाही याचा अर्थ माझी पण निवड शत्रू मध्ये केलीस
असेच ना ?"
    "  नाही पितामहां आम्ही असा विचार स्वप्नातही करु
शकणार नाही. परंतु आम्हाला आशीर्वाद देऊ नका."
    " पण का ?"
    " कारण आपला आशीर्वाद आमच्या समोर अपराधी
सारखा उभा राहील. कारण आपण आमच्या आणि विजयी श्री मध्ये उभे असणार, मग आम्हाला विजयीश्री प्राप्त होणार कशी ?"
     " हां पुत्र तू योग्य तेच बोलतोयेस तुमच्या नि विजयीश्री
च्या मध्ये मी अवश्य उभा आहे.परंतु त्याला माझा नाईलाज
आहे. मी मधून हटू शकत नाही आणि माझा वध करणे पण
शक्य नाहीये."
    " म्हणून तर वसुदेव सांगितले की युध्द आरंभ होण्यापूर्वी
दिलेला आशीर्वाद परत करून ये म्हणून."
     " अस्स अस्स !  म्हणजे हे सर्व वसुदेव ने सांगितले तर !
त्यांना जाऊन सांग मी एकदा दिलेली वस्तू परत घेत नाही
मग तो आशीर्वाद असला तरीही !"
    " परंतु पितामहा ....?"
    " माझं वक्तव्य मध्येच कापू नकोस. माझे धनुष्य तोड,
मला फार आनंद होईल त्याचा. परंतु माझं वक्तव्य मध्येच
कापू नका. ते कार्य फक्त दुर्योधनालाच करू देत."
     " माफी असावी पितामहां !"
     " आयुष्यमान भव ! हां तर मी काय म्हणत होतो.'"
आठवल्या सारखे करून पुढे म्हणाले ,"  हां आठवलं.
वसुदेव ला जाऊन सांग की मी दिलेली वस्तू परत घेत नाही
मग तो आशीर्वाद असला तरी ही ! परंतु त्याना चांगले माहीत
आहे की अखेर विजय त्यांचाच होणार आहे, कारण आरंभ
पण तेच आहेत नि अंत ही तेच आहेत. तुझ्या आणि तुझ्या
विजयी श्री च्या मधून मला हटविण्याचा उपाय काय आहे तो
सांगतो. जर माझ्या समोर नारी आली तर मी माझे धनुष्य
बाण खाली ठेवीन. मग मी नि:शस्त्र असताना अर्जुन तुला मला आपल्या मार्गातून हटवायला काय अवघड आहे ?"
    " परंतु रणभूमी मध्ये नारी कशी येईल ? शिवाय हे क्षत्रिय
मर्याद्याचे उल्लंघन नाही का होणार ?"
    " वसुदेव ने जे विचारले होते ते मी सांगितले. आता राहिली मर्यादांची गोष्ट ती तू त्यांनाच जाऊन  विचार."
    " प्रणाम पितामहा !" दोघांनीही वंदन केले नि तेथून
निघाले. आपल्या शिबिरात आल्यानंतर वसुदेव कृष्णाला
सविस्तर माहिती दिली. श्रीकृष्णाने सर्वकाही ऐकून तर
घेतलं .परंतु युधिष्ठीर ने विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देण्या ऐवजी  नमूल ला पेरू खाणार का म्हणून विचारले. नकुल ने
फळ खाण्याचे आपले मन नाहीये असे सांगितले. तसे कृष्णाने अर्णूंला विचारले की पार्थ तू खाणार का ? पेरू
खाणार का नाही हे सांगण्या ऐवजी अर्जुनाने विचारले की
केशव आपण मोठ्या दादाने विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर दिले
नाही अजून ? त्यावर श्रीकृष्ण उद्गारला ," हूं समस्या तर गंभीर आहेच." त्यावर अर्जुन म्हणाला ," पितामहांशी युध्द
करण्यासाठी नारी कुठून आणणार ?" त्यावर द्रौपदी म्हणाली ," मी नारी आहे हे विसरलात की काय तुम्ही सर्व ?" त्यावर वसुदेव कृष्ण हसून उद्गारले ," घे.पार्थ तुझ्या प्रश्नांचे उत्तर मिळाले. कल्याणी उद्या गंगापुत्र भीष्मांचा सामना करेल ."
    " हां उद्या मी करेन पितामहांचा सामना."
    " परंतु हे तर क्षत्रिय मर्याद्याचे उल्लंघन नाही का होणार ?
शिवाय आम्ही पुरुष असतांना नारीला जर युध्द भूमीवर यावे
लागले तर हे पुरुषांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे."
    " हां पण बरोबर आहे कल्याणी मोठे दादा योग्य तेच
बोलताहेत. " त्यावर द्रौपदी त्रागाने म्हणाली ,  " मला तर  पुरुषांच्या बद्दल अजिबात सांगू नका. काही महापुरुषाना मी चांगलीच ओळखते. आणि  हे पाच महापुरुष असे आहेत की ह्याना जर असा काही मार्ग सापडला की गांधारी नंदन वाचतील तर हे लोक तो मार्ग अवश्य  निवडतील. परंतु क्षत्रिय मर्याद्याचे उल्लंघन कदापि करणार नाहीत. भले त्यांच्या पत्नीचा भर दरबारात अपमान झाला तरी गप्प राहतील. कारण अपमान करणारे ह्यांचे बंधू आहेत. मी कोण ? बाहेरची म्हणजे परकीच ना ?"
      " हा तर तू ह्यांच्यावर खुला अन्याय करत आहेस
कल्याणी हे महापुरुष अवश्य आहेत  म्हणून तर सामान्य
लोकाप्रमाणे प्रत्याक्रमण करत नाहीयेत आणि तू सुध्दा
असाधारण नारी आहेस , म्हणून साधारण नारी प्रमाणे
प्रत्याक्रमण करू नकोस. तुझी अशी इच्छा आहे का ? की
तुझ्या ह्या खुल्या केसांसाठी अनेक लोक मरावेत. तुझ्या ह्या
अपमानीत केसांसाठी अनेक निर्दोष माणसांच्या रक्ताचा
सडा पडावा. त्यांच्या स्त्रिया विधवा होतील. त्या सर्वांचे पाप
तू आपल्या डोक्यावर घेशील का ? नाही ना ? म्हणून पुन्हा
पुन्हा आपल्या अपमानाची गोष्ट करू नकोस. तुझा अपमान
त्या जीवित माणसांच्या प्राणा पेक्षा अधिक मोलाचा आहे का ? नाही ना ? शिवाय तू फक्त नारी नाहीयेस. समस्त नारी
जातीच्या सन्मानाचे प्रतिक आहेस. परंतु जिथं मूळ विषयांवर
वादविवाद सुरू आहे तेथे आपले हे खुले अपमानीत केस पुन्हा पुन्हा दाखवू नकोस." किंचित थांबून दीर्घ श्वास घेऊन पुढे म्हणाले , "  मोठ्या दादा आपले म्हणणे अगदी बरोबर आहे, आपण असताना कल्याणी युध्द भूमीवर जाऊ शकत
नाही. परंतु भ्राता शिखंडीला तर कोणतीही मर्यादा रोखू शकत नाही." श्रीकृष्ण उद्गारले.
    " भ्राता शिखंडी ! मान्य आहे की ते महारथी आहे , परंतु
पितामहांच्या समोर ठिकू शकत नाही, आणि पितामहांनी
नारी बद्दल बोलले होते. मान्य आहे की शिखंडी अर्ध पुरुष
आहेत. परंतु आहेत तर ते पुरुषच ना ?" अर्जुन बोलला.
    " तो तुझ्यासाठी अर्ध पुरुष आहेत. परंतु पितामहांसाठी
ते नारी आहेत. त्याला पाहताच पितामहां आपले धनुष्य
खाली ठेवून देतील." वसुदेव कृष्ण उद्गारले. लगेच सहदेव
ने न समजून विचारले ," असं का वसुदेव ?"
    " ते असं यासाठी सहदेव की शिखंडीच्या रुपात काशी नरेेश राजकुमारी अंबा आहे, हां हे खरे आहे की गंगापुत्र
भीष्मांनी कळत नकळत ही तिचा अपमान केला नव्हता.
परंतु अंबा ते समजू शकली नाही. तिने तो आपला अपमान
समजून हस्तिनापूरच्या राजसभेत प्रतिज्ञा केली की तिला
जन्मावर जन्म घ्यावे लागले तरी ती घेईल. परंतु गंगापुत्र
भीष्मांच्या मृत्यूचे कारण तीच बनेल. त्या प्रमाणे तिने जन्मावर जन्म घेतले. आणि शिखंडीच्या रुपात कुरुक्षेत्रावर उपस्थित आहे." वसुदेव कृष्ण उद्गारले.
     " परंतु पितामहां अंबाला ओळखतील का ?" युधिष्ठीर ने
विचारले. त्यावर वसुदेव कृष्ण म्हणाले ," जर ते केवळ गंगापुत्र नसते तर कदाचित त्यांनी ओळखले नसते. परंतु ते गंगापुत्र भीष्म आहेत. म्हणून ते शिखंडी रुपात असलेल्या अंबाला जरूर ओळखतील."

     भयाण काळोखी रात्र त्या रात्री मध्ये रात किड्यांचा किर्रर्र
किर्रर्रर आवाज सर्वत्र उमटत असताना एक सफेद वस्त्र
परिधान केलेली स्त्री कुरुक्षेत्रावर एकटीच खडे बाजूला
करून जमीन स्वच्छ करत असते. त्याच वेळी गंगापुत्र भीष्म
सफेद वस्त्र परिधान करून गंगा दिशेने जात असताना त्यांची
नजर त्या स्त्री कडे गेली असता त्यांची पाऊले आपोआपच
त्या स्त्री च्या दिशेने वळली. जवळ जाऊन पाहतात तर त्यांचीच माता भूमीवरील बारीकसारीक खडे साफ करत होती. त्यांनी आपल्या मातेला वंदन केले. तशी गंगा माता
त्याना म्हणाली ," तुला मी काय आशीर्वाद देऊ ते मला कळत
नाहीये." तेव्हा गंगापुत्र भीष्म म्हणाले ," मला मोक्षप्राप्तीचा
आशीर्वाद दे आई !" त्यावर गंगा माते ने त्याना विचारले की,
परंतु तू आज इथं कसा आलास ?"
    " मी विचार करत करत इथपर्यंत आलो."
    " कसला विचार करत होतास ?"
    "  हाच की माझ्या संपुर्ण जीवनामध्ये काय कमावले नि
काय गमावले ? "
    " ज्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात स्वत:साठी काही केलेच नाही तो काय गमावणार ?"
     " बस्स एक अंबा चे ऋण फेडायचे राहिले आहे, आणि
काल जेव्हा वसुदेव ने युधिष्ठीर माझ्याकडे  मी त्याला दिलेला
विजयीश्री चा आशीर्वाद परत करण्यासाठी पाठविले. तेव्हा
समजून चुकलो की अंबा चे ऋण उतरणाचा दिवस जवळ
आलाय. शिखंडीच्या लपलेल्या अंबाला मी पहिल्याच
दिवशी ओळखले होते. परंतु आपण इथं काय करत आहात
माते ?" गंगापुत्र भीष्मांनी विचारले.
     " मी ह्या जमिनीच्या साफ करत होती."
     " ह्या जमिनीच्या तुकड्याला ? पण का ? "
     " उद्या तुझे शरीर इथंच पडणार आहे, तुझ्या अंगाला खडे
टोचू नये म्हणून साफ करत होती आणि तू आता फार थकला आहेस तुला विश्राम करण्याची फार गरज आहे."
      त्यानंतर गंगापुत्र भीष्म आपल्या शिबिरात पोहोचले.
जेव्हा सकाळी त्यांचे सेवक त्यांच्या अंगावर वस्त्र चढवीत होते.वस्त्र चढवून झाल्या नंतर त्या दोघांना उद्देशून गंगापुत्र
भीष्म म्हणाले ," तुम्ही दोघांनी माझी खूप सेवा केली आहे.
जसा एक पुत्र आपल्या पित्याची सेवा करतो. मी फार प्रसन्न
आहे तुम्हां दोघांवर." तेव्हा ते दोघेही म्हणाले ," आपली
सेवा करणे तर आमचा धर्म आहे.आम्ही तर ईश्वर जवळ
अशी प्रार्थना करतो की पुढच्या जन्मात ही आपली सेवा
करण्याचे सौभाग्य आम्हाला प्राप्त व्हावे !"
    " पुढच्या जन्माचे बोलू नका मी  आज पासून दासत्वातून तुमची मुक्तता करत आहे. तुम्ही दोघे आजपासून हस्तिनापूरचे नागरिक म्हणून जीवन जगाल. "
    " आमच्या कडून काही अपराध घडला का ?"
    " मनुष्याला दासत्व हा सर्वांत मोठा कलंक आहे, तो स्वतंत्र म्हणून जन्म घेतो तेव्हा त्याला स्वतंत्र म्हणूनच मरायला हवं." त्या दोघांना त्यांच्या सेवाचे मोल देवून त्यांचा
गौरव करून म्हणाले," जा आता स्वतंत्र नागरिक म्हणून जगा." त्यावर ते दोघेही म्हणाले ," परंतु संध्याकाळी जेव्हा
युध्द करून शिबिरात याल तेव्हा आपले शस्त्र अस्त्र ,धुतलेले
कपडे कोण आणून देईल ?"
    " माझी चिंता करू नका तुम्ही ! आता तुम्ही इथून जा.
मला थोडा एकांत पाहिजे." तेव्हा त्या दोघांना दिलेले
सोन्यामोत्यांचे थाळ्या खाली ठेवून त्याने चरणस्पर्श केले.
तेव्हा गंगापुत्र भीष्मांनी त्याना आशीर्वाद देताना म्हटले ,
   " तुम्हां दोघाना कोणत्याही जन्मात दासत्व  मिळू नये.जा."

     शिखंडी  युद्धावर जाण्याची तयार करत होता , तेव्हा
कुंती पुत्र अर्जुन आला नि त्यांना वंदन करत म्हणाला ," प्रणाम भ्राताशी !" त्यावर शिखंडी उद्गारला ," तुला आशीर्वाद
देण्यासाठी माझ्या कडे शब्द नाहीये. कारण तुझा मान एवढा
वाढला आहे की तिथपर्यंत माझे हात पोहोचतच नाहीत. तू
महावीर आहेस , आणि वसुदेव कृष्णाचा सखा आहेस. तुझ्याशी  सारख्या धनुर्धराला भला मी काय आशीर्वाद देऊ
शकतो." त्यावर अर्जुन उत्तरला," आशीर्वाद नाही तर नाही परंतु माझी एक प्रार्थना तर ऐकू शकता ना ?"
    " प्रार्थना ती पण माझ्याकडे ?  मी अशी कोणती मदत
करू शकतो मी तुला ?"
    " करू शकता आणि ती सुध्दा फक्त तुम्हीच करू शकता." अर्जुनच्या या वक्तव्याने शिखंडी फार गोंधळला. त्याला कळेना सर्वश्रेष्ठ धनुर्धरला  भला मी काय मदत करू
शकतो ? म्हणून त्यांनी आपल्या प्रश्नांचे निरसन करत म्हटले,
   " मी फार गोंधळलोय ,मला कळत नाहींये की मी तुझी  काय मदत करू शकतो बरं ?"
    " आज मी पितामहांशी अंतिम युध्द करणार आहे , त्यावेळी मला तुमची फार गरज आहे, कारण तुमच्या मदती शिवाय मी पितामहांना पराजित करू शकत नाही. कराल ना एवढी मदत."
    " अवश्य. करीन कुंती पुत्र तुला माहीत नाही की तुझ्या
पितामहांशी युध्द करण्यासाठी मी किती व्याकुल आहे."
    
    आचार्य द्रोण युद्धावर जाण्यासाठी तयार होत होते. तेवढ्यात तेथे अश्वत्थामा आला नि आपल्या वडिलांना प्रणाम केला. तसा त्यांनी त्याला आयुष्यमान चा आशीर्वाद
दिला त्यावर त्याने विचारले ," ह्या रणभूमी मध्ये आपल्या
तोंडुन विजयीश्रीच्या आशीर्वादासाठी मी तसरलो आहे पिताश्री !" तेव्हा आचार्य द्रोण म्हणाले ," जो आशीर्वाद मिळाला त्याचा स्वीकार करायचा असतो पुत्र. प्रश्न विचारून
त्याला लज्जित करायचं नसतं. तुला काय माहीत तू जे
मागत आहेस ते देणाऱ्या ला शक्य आहे किंवा नाही. देणाऱ्याच्या नि घेणाऱ्याच्या काही मर्यादा असतात. कदाचित
देणारा तुला आशीर्वाद देऊ इच्छित नसेल. किंवा तो देऊ शकत नाही म्हणून लज्जित असेल."
      " परंतु मी आपला पुत्र होण्याच्या नात्याने आपल्याकडे
आशीर्वाद मागण्याचा अधिकार आहे किंवा नाही ? "
    " आपल्या वडिलांशी प्रश्न करतो आहेस पुत्र ?"
    " नाहीतर मला आदेश द्या,मी दुर्योधन मस्तक कापून
आपल्या चरणावर ठेवतो , कारण व्यंगाचे बाण जेव्हा तो
माझ्यावर चालवतो तेव्हा मला ते सहन होत नाही. तो म्हणतो
प्रधान सेनापती गंगापुत्र भीष्म आणि आपण कौरव सैन्यामध्ये असूनही पांडवांच्या बाजूने युध्द करताय म्हणून."
    " तो मला ही कित्येक वेळा बोलून झालाय पुत्र.दुर्योधन
बालक प्रमाणे आहे, त्याला चंद्र आणि अंगार या मधला
फरक ठाऊक नाहीये. त्याला बोलू दे , तू त्याच्याकडे लक्ष
देवू नकोस."
    " कसे न देवू लक्ष ? जेव्हा तो म्हणतो आपण पांडवांच्या
पक्षात आहात. आणि त्यावर कर्ण  स्मित हास्य करतो. तेव्हा
मला असं वाटतं की माझ्या काळजात कोणीतरी कट्टार
घुसविली. म्हणून मला सांगा आपण कोणत्या पक्षात आहात ?"
    " कदाचित मी तुझ्या पक्षात आहे. परंतु माझी आणि गंगापुत्र भीष्मांची मजबुरी तू समजू शकत नाहीये. आम्ही
दोघेही अस्ताला जाणाऱ्या सुर्या प्रणाणे आहोत. जोपर्यंत आम्ही अस्त होत नाही तोपर्यंत नवीन सूर्योदय होऊ शकत नाही. म्हणून तुम्ही लोक चिंता करू नका. आम्ही लवकरच
अस्ताला जाणार आहोत. हीच आमची नीती आहे आणि
ऐतिहासिक कर्तव्य सुध्दा ! आणि कर्तव्याच्या मार्गावर नाते
चालत नाही वत्स ! तेथे एकट्यालाच चालावे लागते. जे मी
करत आहे त्याला जबाबदार मी आहे. आणि जे तू करणार
आहेस त्याची सारी जबाबदारी तुझीच असेल. म्हणून हे
विचारू नकोस की तुला विजयीश्रीचा आशीर्वाद का नाही
दिला ? जो आशीर्वाद दिला आहे त्याचा स्वीकार कर. युध्द
जिंकायचे असेल तर आपल्या हिंम्मत वर जिंकून दाखव.
हे युद्ध आशीर्वाद च्या बळावर जिंकता येणार नाही. हे एकदम
त्रिवार सत्य आहे."

      " आचार्य द्रोण ने असे का सांगितले संजय ?"
      " आचार्य द्रोण बरोबर तर बोलले महाराज ? जर आपल्या कथनानुसार हे धर्म युध्द आहे तर हे युद्ध केवळ
आशीर्वादाच्या बळावर जिंकले जाणार नाहीये. अशी कमी
माणसे असतात महाराज नि आशीर्वादाची मर्यादा ओळखतात. की आशीर्वाद देणे मोठे जबाबदारी चे काम आहे. स्वतः महाराणी ने युवराजला विजयीश्रीचा
आशीर्वाद दिला नाही. आशीर्वाद पूजेचा प्रसाद नाहीये. जो
हात पुढे करील त्याला दिला जाईल ." तेव्हा धृतराष्ट्र संजय
वर किंचित रागवत म्हणाले ," मी पाहतोय की आजकाल तू सुद्धा विदुर सारखे कडवे बोल बोलू लागला आहेस."
    " कडवाहट स्वरा मध्ये नसते महाराज , काही कडवाहट वक्तव्य बोलणाऱ्या मध्ये असतात. तर काही कडवाहट वक्तव्य ऐकणाऱ्या मध्ये असतात. जर आपण हस्तिनापूरचे
नरेश नसता तसेच दुर्योधन चे पिता नसता तर हा आशीर्वाद
कोणाला दिला असता  ?"
    " परंतु मी हस्तिनापूरचा नरेश पण आहे आणि दुर्योधन चा
पिता सुध्दा आहे, आणि मी जो आहे तोच शेवटपर्यंत राहणार. हे शक्य आहे की मी हस्तिनापूरचा नरेश राहणार
नाही. परंतु तरी सुध्दा दुर्योधनचा पिता अवश्य राहणार मी ! म्हणून तू तुझा कडवाहटपणा तुझ्या कडेच जमा करून ठेव. मला माझ्या हालत वर सोडून दे. जरा विचार कर संजय  आणि माझं दुर्भाग्य समजण्याचा प्रयत्न कर. माझ्या पुत्राला कोणीही विजयीश्रीचा आशीर्वाद दिला नाही आणि तिकडे बघ आशीर्वादाच्या माळाच माळा घातल्या जाता आहेत.पण तरी देखील माझा वीर पुत्र एकटाच झुंजतो आहे." किंचित थांबून एक दीर्घ सुस्कारा सोडून ते म्हणाले ," युद्धाचा आजचा
कितवा दिवस आहे संजय ?"
    " हा दहावा दिवस आहे महाराज."
    " इतिहास मला काय म्हणेल संजय ?"
    " हे मला विचारू नका महाराज कारण मी  सत्य बोलले आपल्याला आवडणार नाही. आणि मी खोटे बोलू शकणार
नाहीये."
    " तू न बोलूनही सर्वकाही सांगून टाकलेस संजय , परंतु
धर्ममोक्ष आहे संजय निराकार आहे, दृष्टी कोणाने महत्वपूर्ण
आहे, पवन धुळी सोबत एक व्यवहार करतो नि फुला सोबत
एक व्यवहार करतो. म्हणून धुळीचा धर्म फुलांच्या धर्मा पेक्षा
भिन्न असतो. म्हणून फुलांच्या मोजमाप ने त्याला मापणे
चुकीचे ठरेल. मला माहितेय की वसुदेव धर्म युध्द करत आहेत.आचार्य द्रोण आपल्या पुत्राला विजयीश्री चा आशीर्वाद देवो अथवा न देवो , तसेच गांधारी आपल्या पुत्राला
विजयीश्रीचा देवो अथवा न देवो परंतु माझा पुत्र  माझे
प्रतिनिधित्व करतच राहणार ."
     " परंतु पवन चा व्यवहार धूळ आणि फुल सोबत समानच
असतो महाराज. फुला जवळ पराग असतो आणि धूळ रिक्त
फुल एका देटाला धरून असते आणि देट एका फांदीला
धरून असतो. आणि फांदी खोडाला आणि खोड जमिनीत
मुळा मार्फत धरून ठेवतो. परंतु धुळीला खोड नसते. म्हणून
ती उडून लोकांच्या डोळ्यात जाते . जसे युवराज च्या डोळ्यात आपण पडले आहात." त्यावर महाराज धृतराष्ट्र
निरुत्तर झाले. पण क्षणभरच. दुसऱ्या क्षणी ते संजयला
म्हणाले ," कुरुक्षेत्रावर या क्षणी काय चाललंय ते सांग."
    "  जशी आपली  आज्ञा !" असे म्हणून संजय ने  आपली
दृष्टी कुरुक्षेत्रावर वळविली. कुरुक्षेत्रावर त्या वेळी एक सैनिक
येऊन दुर्योधनाला म्हणाला ," युवराज जय हो !"
    " बोल काय खबर आणलीस ?"
    " युवराज आज अर्जुनच्या रथावर शिखंडी सुद्धा उभा
आहे." दुर्योधनाने न समजून आपल्या मामाश्री कडे पाहत
म्हटले ," मामाश्री शिखंडी अर्जुनच्या रथावर काय करत आहे ?" त्यावर दु: शासन म्हणाला ," तो आपल्या रथावर
होता तेव्हा काय विशेष कार्य केले तर आता अर्जुनच्या
रथावर येऊन करणार आहे ? त्या नपुंसकाला पाहून कसली
चिंता करताय ?" त्यावर गांधार नरेश शकुनि उद्गारला," पण
तरी सुध्दा तू गंगापुत्र भीष्मांना जाऊन विचार की शिखंडी
अर्जुनच्या रथावर काय करत आहे ? कारण कालच्या
रात्री युधिष्ठिर गंगापुत्र भीष्मां ना भेटायला गेला होता. आणि
आज अर्जुनच्या रथावर शिखंडी दिसतोय तेव्हा काहीतरी गडबड जरूर आहे. तू जाऊन तर बघ काय सांगतात ते."
     " सारथी रथ पितामहा कडे घेऊन चल." थोड्याच वेळात
दुर्योधनाचा रथ गंगापुत्र भीष्मां कडे पोहोचला. दुर्योधन
खाली उतरला तसे गंगापूर भीष्म देखील खाली उतरले.
दुर्योधनाने त्यांच्या जवळ येऊन त्याना प्रणाम केला. तसा
त्यांनी त्याला आशीर्वाद दिला. तेव्हा त्याने त्याना विचारले,
पितामहा काल रात्री युधिष्ठिर आपल्याला काय सांगायला
आला होता ?" त्यावर ते म्हणाले ,"  तो मला काही सांगायला आला नव्हता  तर मी दिलेला आशीर्वाद परत करायला आला होता."
    " कोणता आशीर्वाद ?"
    " युध्द आरंभ होण्यापूर्वी मी विजयीश्रीचा आशीर्वाद
दिला होता. तेव्हा तू नाराज झाला होतास ?"
     " तर मग काय केलं आपण ?"
     " दिलेला आशीर्वाद परत तर घेऊ शकत नाही. आणि
तसे पण त्या आशीर्वादाचा काहीच उपयोग नव्हता. कारण
मला पराजित तर करू शकत नाही. आणि युध्द भूमीवरून
मी हटल्या शिवाय त्याना विजयीश्री प्राप्त होऊ शकत नाही.
म्हणून मला हटविण्याचा उपाय सांगावा लागला."
    " म्हणजे तुम्ही स्वतःला हटविण्याचा उपाय सांगितला."
    " हां मी दिलेल्या आशीर्वादाची लाज तर ठेवायचीच होती
ना मला."
    " मला हे कळत नाही की आपण माझ्या पक्षात युध्द
करताय का त्यांच्या ?"
    " ना मी तुझ्या पक्षात युध्द करत आहे ना त्यांच्या मी
फक्त हस्तिनापूरच्या पक्षात युध्द करत आहे पुत्र. मातृभूमी
पेक्षा कुणीही प्रिय असू शकत नाही. उद्या जर ईश्वराने विचारले की तुला स्वर्ग पाहिजे का हस्तिनापूर तर मी
सांगेन फक्त हस्तिनापूर जरी मला  हजार वेळा विचारले तरी माझे उत्तर हेच असेल."
     " मला पण तर  हस्तिनापूर पाहिजे आणि आपल्याला
रणभूमीवरुन हटण्याचा काही अधिकार नाहीये. मी हस्तिनापूर नरेश कुरुश्रेष्ठ धृतराष्ट्रांचा प्रतिनिधी होण्याच्या
नात्याने मी आपणाला आदेश देतो की आपण रणभूमीवरुन
हटायचं नाहीये."
    " तसे पण युध्द समाप्त होईपर्यंत रणभूमीवरुन हटणार
नाही."
    " परंतु आपण रणभूमीवरुन हटण्याचा उपाय जो
सांगितला."
     " तो काही विशेष उपाय नाहीये पुत्र. मी सांगितले की
माझ्या समोर जर नारी आली तर मी माझे धनुष्य खाली
ठेवीन."
     " मग अर्जुन च्या रथावर शिखंडी काय करतोय ?"
     " अर्जुन च्या रथावर आज शिखंडी आहे का ?"
     " हा ! "
     "  मग तुला जर मी रणभूमीवरुन हटू नये असे जर वाटत
असेल तर शिखंडीला माझ्या समोर येऊ देवू नकोस. शिखंडी
माझ्या समोर आला तर मी माझे धनुष्य खाली ठेवीन, कारण
शिखंडी एक नारी सुध्दा आहे." हे ऐकता क्षणी दुर्योधनाच्या
पाया खालील जमीन सरकली. तो लगेच आपल्या मामाश्री
जवळ गेला नि म्हणाला ," शिखंडी सोबत पितामहां युध्द
करणार नाहीत.शिखंडी समोर येताच पितामहा आपले
धनुष्य खाली ठेवतील. मग त्याच्या आड राहून अर्जुन पितामहांवर आपले बाण सोडील.म्हणून आज सर्वांनी पितामहांची सहायता करा. शिखंडीला पितामहा समोर येऊ देऊ नका."

      क्रमशः
    



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..