महाभारत १०५ | मराठी स्टोरी, मराठी शॉट स्टोरी, मराठी कथा | महेंद्रनाथ प्रभु.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाभारत १०५ |
महाभारत १०५
महाराणी द्रौपदी आपल्या कक्षेत बसली होती.तेंव्हा
तिला धर्मराज युधिष्ठीर ने तिचे खुले केस पाहून म्हटलेले
शब्द आठवले.धर्मराज युधिष्ठीर ने तिला विचारले ," तुझे हे केस तू मोकळे का सोडले आहेस पांचाली ?" त्यावर पांचाली उद्गारली ," आता हे अपमानीत झालेले केस मोकळेच राहणार कारण ज्या ज्या वेळी तुम्ही माझ्या ह्या मोकळ्या केसांना पहाल त्या त्या वेळी तुम्हां लोकांना माझ्या ह्या अपमानीत केसांची आठवण होईल , की दु:शासन ने भरसभेत माझ्या केसांना पकडून कसे फरफटवीत आणले होते. जोपर्यंत तुमच्या पैकी कोणी दु:शासनाच्या छातीचे ओंजळीभर रक्त आणून माझ्या केसांना लावून मला सांगत नाही की पांचाली हे घे दु:शासनाच्या छातीचे रक्त ह्या रक्ताने तू आपल्या केसांना धुवून टाक. असे सांगत नाही तोपर्यंत हे केस मोकळेच राहणार." तेवढ्यात विराट नरेश ची पट्टराणी
सुदेष्णा तेथे आली नि महारानी द्रौपदी ला म्हणाली ," अभिनंदन महारानी अभिनंदन !"
" आपण मला महारानी म्हणू नका.द्रौपदी म्हणा."
" नाही. ती चूक मी पुन्हा करणार नाही. एकदा तुम्हाला
सैरंधी म्हणण्याची चुकी केली होती.परंतु आता तशी चूक
पुन्हा होणार नाही."
" ती चूक नव्हती महारानी साहेबा त्या दिवसांची ती कठोर वास्तविकता होती.ते दिवस विसरून जाणेच योग्य
आहे.परंतु आपण माझे अभिनंदन कशाचे करत होता ?"
" आज सुभद्रा नंदन अभिमन्यु ने गांगपुत्र भीष्मांच्या
रथांचा ध्वज कापला.म्हणून गंगापुत्र भीष्मांनी त्याचे कौतुक
केले.आणि आशीर्वाद दिला." त्यावर द्रौपदी कुत्सितपणे
म्हणाली ," पितामहांना फक्त आशीर्वाद देता येतो. दुसरे आहे काय त्यांच्या पाशी ! करुवंश साठी हे दिवस अशुभ आहेत
महारानी साहेबा. त्यांच्या दिवसाला सूर्य ग्रहण लागले आहे.
त्यामुळे त्यांच्या कोशात आशीर्वाद शिवाय दुसरे काही शिल्लक नाहीये."
" थोडीशी कडवाहट कमी कर प्रिय द्रौपदी."
" मी प्रयत्न तर खूप करते कडवाहट कमी करण्याची
पण मला ते शक्यच होत नाहीये. कधी चुकूनही माझे हात त्यांच्या शिबिराच्या दिशेने जाऊ लागले तर ते जळू लागतात. असं नाहीये की पितामहांच्या प्रति मला दुःख होत नाही. मला
अजूनही आठवतो की राजदरबारातील प्रसंग. कसे त्यांचे
डोळे शर्मेने झुकले होते. आणि त्यांच्या त्या लज्जित डोळ्यांनीच माझ्या घावावर स्नेह मलमाचे काम केले होते.
परंतु मला हे कळत नाहीये की कोणतीही प्रतिज्ञा स्त्रीच्या
लज्जा राक्षणापेक्षा मोठी असू शकते काय ? म्हणून महारानी
हस्तिनापूरचे मोठे मोठे धर्माचे वृक्ष जे आहेत उपटुन फेकून देण्यात येतील. पितामहां , कुलुगुरु कृपाचार्य , आचार्य द्रोण,
ह्या महापुरुषाना कुठे असायला पाहिजे नि ते आहेत कोठे ?
आणि ह्यांच्या वीरगती होण्याची देखील मी वाट पाहत नाही,
आणि त्याची मला गरजही वाटत नाही. मला फक्त दु:शासन
छातीच्या रक्त जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत माझ्या मनाची
शांती होणार नाही. आणि प्रिय अभिमन्यू ला त्यांनी आशीर्वाद
दिला. तो काही असाच दिला नाही. त्याच्या मागे त्यांच्या
अपराधाच्या भावना लपल्या आहेत."
रणभूमीवर दोन्ही सैन्या मध्ये तुंबळ युध्द सुरू आहे.
तेव्हा दुर्योधन आपल्या धाकट्या भावाला म्हणाला," दु:शासन , तू जा नि कुलगुरू कृपाचार्य, आचार्य द्रोण ,
अश्वत्थामा या सर्वांना जाऊन सांग पितामहांची सहायता करायला. कारण केवळ तेच आपल्याला विजयीचा प्रसाद मिळवून देतील. " त्यावर दु:शासन उद्गारला ," जशी आपली
आज्ञा भ्राताश्री !" असे म्हणून दु:शासन तेथून निघाला. तसा
दुर्योधन आपली चौफेर नजर फिरवून स्वतःशीच म्हणाला,
" मी मघा पासून युत्सुसला शोधत आहे, ऐनवेळी तो
माझ्या शत्रूच्या शिबिरात गेला. त्याला त्याच्या अपराधाची
शिक्षा मिळायलाच पाहिजे." असे म्हणून तो आपल्या सारथीला उद्देशून म्हणाला ," सारथी माझा रथ युत्सुस च्या रथाकडे घेऊन चल." तसा सारथी दुर्योधनचा रथ घेऊन निघाला. गंगापुत्र भीष्मांनी खवळलेल्या समुद्रा प्रमाणे भयंकर रुद्र रूप धारण केले होते. जसा सागर आपल्या प्रचंड लाटांनी किनाऱ्याला कसा झोडपून काढतो. अगदी तसेच
पितामहा आज पांडव सैन्याला गाजर मुळी सारखे कापत
सुटले होते.जसा शेतकरी आपले शेत कापत नेतो. युधिष्ठीरला मोठी चिंता लागली होती की सूर्य लवकर अस्ताला गेला
नाही तर आज काय खरं नाही. पण त्याना कोण रोखू शकेल
असा एकही योध्दा आपल्या सैन्यात नाही. त्याना रोखण्याची
हिंम्मत फक्त अर्जुन करू शकतो. पण अर्जुन आहे कुठं ?"
तेवढ्यात कोणीतरी म्हणाले ," अर्जुन आचार्य द्रोणशी युध्द
करत आहे." तेव्हा युधिष्ठीर जास्तच चिंतामय झाला. तेव्हा
शिखंडी उद्गारला ," आपण चिंता नका करू महाराज.अखेर
विजय धर्माचाच होतो. आपले पितामहा योद्धा नाहीत भ्याड आहेत भ्याड ! जर ते योध्दा असते तर त्यांनी आपले इच्छामृत्यूच्या वरदानाचे कवच घरी उतरवून युध्द भूमीवर आले असते.परंतु त्यांनी तसे केले नाही याचाच अर्थ ते भ्याड आहेत. अर्जुन जवळ पण दिव्य अस्त्र आहेत.परंतु तो त्याचा वापर करत नाहीये. परंतु आपण चिंता करू नका. वसुदेव कृष्ण ह्या कवचावर काही ना काही उपाय शोधून काढतीलच."
मद्र नरेश शल्य आणि विराट नरेश पुत्र उत्तर या दोघांमध्ये
घामाशांन युध्द सुरू होते. उत्तर ने आपल्या बाणांनी मद्र नरेशला जखमी केले. तेव्हा मद्र नरेश ने विचारले ," वीर बालक आपला परिचय दे." त्यावर उत्तर म्हणाला," मी मत्स्य नरेश विराटचा पुत्र उत्तर आहे , हा झाला माझा अर्धा परिचय."
" मग आपला पूर्ण परिचय सांग."
" वसुदेव कृष्ण ज्या महारथीचे सारथी बनले आहेत. त्या
महारथी अर्जुनचा विराट युद्धात मी सारथी बनलो होतो. तेव्हा माझ्या जखमाकडे पाहू नका मद्र नरेश हे घाव तर वीरांचे आभूषणे आहेत. आणि माझ्या वयाकडे न पाहता माझ्याशी युध्द करा."
असे म्हणून पुन्हा एकमेकांवर बाण सोडू लागले. राजकुमार उत्तर ने बाण मारून मद्र नरेशला जखमी केले. त्यांच्या सारथीचा पण वध केला. इतकेच नाहीतर एक बाण मारून त्यांच्या रथाचे चाक तोडून टाकले. तेव्हा मद्र नरेश ने भाला
फेकला तो भाला उत्तर च्या छातीच्या आरपार गेला. तसा तो
आपल्या रथामध्येच कोसळला. काही क्षणातच त्याची आत्मा
अंनतात विलीन झाला. तेव्हा मद्र नरेश आपल्या रथातून खाली उतरून राजकुमार उत्तर जवळ येऊन म्हणाले, " वीर
बालक तुझ्या मृत्यूला माझा सादर प्रणाम."असे म्हणून मद्र नरेश शल्य तेथून निघाले. दुसऱ्या योध्दाशी सामना करायला
आज दिवस भरात त्यांनी अनेक योध्याशी सामना केला.
आज पहिल्या दिवशीच्या ऐन उत्साहपूर्ण युद्धात सत्यकि विरुद्ध लढलेल्या कीर्तीवर्मन , विराट पुत्र उत्तराला यमसदनी पोहोचविणार शल्य, इरावान आणि श्रुतायू यांचं घनघोर युद्ध , कुंतिभोजला घेरणारे विंदानुविंद , द्रुपदावर धावून जाणारा जयंद्रथ बृहद्बलाला घायाळ करणारा अभिमन्यू अश्वत्थामा ने पिटाळलेला शिखंडी पांचालराज श्वेता ने पांडवांकडून लढताना त्या वीराने पहिल्या दिवसाच्या अविरोध नायकत्वाचा मान पटकावला होता. पितामहांना संत्रस्त करून त्यांने सहस्राधी सैंधव ,गांधार , कलिंग आणि कुलिंद कापून काढले. भयग्रस्त सैना पितामहांच्या नावे आक्रोशत त्यांच्या महारथाचा आश्रय घेऊ लागली तेव्हा पितामहांनी श्वेताशी निर्णायक युध्द केले आणि त्याला त्याच्या नावाला शोभेल असा कंठभेद करून त्याला यमसदनाला पाठवून दिले. परंतु त्याचे शौर्य खरेच वाखाणण्याजोगी होते. गंगापुत्र भीष्म सारख्या योध्याशी युध्द
करने काही सामान्य गोष्ट नव्हे !
संध्याकाळी युध्द थांबले तेव्हा त्या योध्याला पाहण्याची सर्व सैनिक योध्यांची झुंबड उडाली. श्वेताचे चेतनाहीन शरीर पाहण्यासाठी एकवटली होती. पहिल्या महान दिवसाचा शेवट श्वेताने श्वेतपूर्ण केला !
पहिला दिवस समाप्त झाला. असंख्य सैन्या तर मृत्युमुखी
पडली. त्यात सर्वात मोठा पराक्रम विराट नरेश पुत्र उत्तरा ने
केला. पांडव सैन्याच काय पण कौरव सैन्या सुद्धा त्याच्या
शौर्याचे गुणगान गात होती. विराट नरेश आपल्या शिबिरात
परतले तेव्हा त्यांच्या पत्नी ने खुश होऊन विचारले की, आज
माझा पुत्राने विशेष शौर्य केले का ? जे आपण मला सांगायला
इथं आले." त्यावर विराट नरेश म्हणाले ," हां महारानी सुदेष्णा
आज आपल्या पुत्राने जो पराक्रम केला त्याला तोड नाही.
पांडव सैन्याच काय कौरव सैन्या सुध्दा शौर्याची प्रशंसा करत
आहेत.म्हणून मी तुझे अभिनंदन करायला आलोय सुदेष्णा !"
त्यावर महारानी खुश होऊन म्हणाली," हे खरं सांगताय काय महाराज ?" तेव्हा विराट नरेश म्हणाले ," "हां हां महारानी हां ! मी त्याची यात्रा काढण्यासाठी आपल्या सैनिकांना विराटला पाठविले आहे."
" ही काय त्याची यात्रा काढण्याचे वय तर नाहीये महाराज."
" आज तो लहान राहिला नाही फार मोठा योध्दा झाला.
तुला माहितेय आज त्याचा मद्र नरेश शल्याशी सामना झाला.
तेव्हा शल्याने त्याला विचारले की तू कोण आहेस बालक ?
तेव्हा त्याने शल्याच्या प्रश्नाचे उत्तर देत म्हटलं, हे मद्र नरेश
मी मत्स्य देशाचे नरेश विराट यांचा पुत्र उत्तर आहे , परंतु
हा माझा अर्धा परिचय आहे." तेव्हा शल्याने विचारले, "तुझा
पूर्ण परिचय सांग. तेव्हा आपला पुत्र म्हणाला, ज्या योद्धा चे
सारथी वसुदेव कृष्ण आहेत. त्या योद्धाचा विराट युद्धात मी
सारथी होतो. म्हणून मद्र नरेश माझी आयु पाहू नका. आपल्या शरीरावर पडलेले घाव पहा. त्यानंतर दोघांमध्ये
तुंबळ युध्द सुरू झाले. त्या दोघांचे युध्द पाहण्यासाठी इतर
योद्धे आपला श्वास रोखुन ते अदभूत युध्द पाहत होते. दोघांनी एकमेकांना जखमी केले. आज माझे मस्तक गौरवाने उंच झाले आहे महारानी सुदेष्णा !" असे म्हणत असताना त्यांचे पाणावलेले डोळे पाहून महारानी सुदेष्णा म्हणाली , मग आपल्या डोळ्यात पाणी का आले आहे ? आपल्याला तर खुश व्हायला हवे ना ?"
" हे अश्रू आनंदाचे आहेत महारानी सुदेष्णा ! आज माझ्या
मुलाचे माझे नाव रोशन केले. माझ्या कुळाचा त्याने उद्धार केला .म्हणून तू सुध्दा रडून घे सुदेष्णा तू सुद्धा रडून घे."
" आपण माझ्या पासून काहीतरी लपवीत आहात."
" सन्मान लपविला जात नाही सुदेष्णा लपविला जात नाही. मी तर मोठ्या ने ओरडून सांगू इच्छितोय की हे संसार
बघ मी महारथी उत्तरचा पिता आहे, आज पर्यंत त्याचा
परिचय हा होता की तो माझा पुत्र आहे . परंतु आजपासून
माझा परिचय हा असेल की मी उत्तरचा बाप आहे आणि
तुझा परिचय असा असेल की तू उत्तरची आई आहेस. आज
आपण दोघेही धन्य झालो सुदेष्णा ! दोघेही धान्य झालो.
तुला माहितेय आज युध्द भूमीत काय घडलंय ? महारथी शल्य आपल्या रथातून खाली उतरला नि आपल्या पुत्राच्या शवाला उद्देशून म्हणाला, " हे वीर बालक मी तुझ्या मृत्यूला माझा सादर प्रणाम करत आहे."
" त्यांनी कोणाला म्हटलं आर्यपूत्र ?"
" तुझ्या पुत्राला सुदेष्णा ! कारण तुझा पुत्र वीरगती ला
प्राप्त झाला."
" नाही s s s त्या मोठ्या ने किंचाळल्या आणि त्या
ओक्सीबोक्सी रडू लागल्या. तेव्हा महाराज विराट त्यांचे
सांत्वन करत म्हणाले ," तुझा पुत्र वीरगतीला प्राप्त झाला
आहे .परंतु शोक प्रगट करून त्याच्या मृत्यूचा अपमान
करू नकोस.
कुंती आपल्या कक्षेत बसली होती. तेवढ्यात एक दासी
आली नि महारानी गांधारी येत असल्याची खबर दिली. तशी
कुंती लगबगीने उठली नि गांधारीच्या सामोरी गेली नि
वंदन करत म्हणाली ," प्रणाम ताई !" असे म्हणून त्यांचा
हात धरून आसनावर बसवत विचारले , " कशी आहेस ताई ?' " त्यावर महारानी गांधारी उद्गारली ," ज्यांची मुलं
घमासान युध्द करत आहेत त्यांच्या माता कश्या असतील बरं ? तुझी प्रेम करण्याची पद्दत न्यारीच आहे. ताई दिसेल
तेव्हा भरपूर प्रेम दाखवायचे नाहीतर ताईची विचारपूस पण
करायची नाही ?"
" असं नाहीये ताई ! मी यासाठी येत नाही की जेष्टश्रीशी . ."
" बस्स बस्स हा दिखावा पणा करायची गरज नाहीये.
मला माहितेय तुझ्या पुत्रावर अन्याय झाला.परंतु तरी देखील
तेच तुझं घर आहे. शिवाय तर विदुर आणि सुलभा सुद्धा इथं नाहीये. अश्या वेळी तर तुला इथं राहायचं कारण ही नाहीये. म्हणून मी तुला न्यायला आली आहे कुंती. आपले हृदय काही राज्य नाहीये. की ज्याचे विभाजन केले जाईल. रणभूमीवरून कोणतीही खबर येऊ दे ती चांगली असेल किंवा वाईट असेल
परंतु ती आमची दोघींची असेल. वाट पाहण्याचा ह्या कठोर
क्षणी मी तेथे एकटी राहू शकत नाही, शिवाय माझ्या डोळ्यांवर बांधलेली पट्टी माझे अश्रू तर पुसू शकणार नाही ना ?"
" मी क्षमा मागते ताई ! परंतु आपण दोघी केवळ माता
नसून क्षत्रानिया पण आहोत. आणि आपल्या दोघींचे पुत्र
आपसात युध्द करत आहेत. परंतु विजयीश्रीचा आशीर्वाद
ना मी दुर्योधनाला दिला नाही आपल्या पुत्रांना. परंतु वसुदेव
पाशी युधिष्ठीर साठी हा संदेश अवश्य पाठविला होता की ज्या
दिवसासाठी क्षत्रानिया आपल्या पुत्राना जन्म देतात तो दिवस
आता आला आहे. मला माहितेय राजभवन माझ्यासाठी पुष्कळ जागा आहे. परंतु माझ्या त्या संदेशाला हस्तिनापूरला
अजिबात जागा नाहीये ना ताई ! आणि विदुरच्या घरातून विदुर घरात नसताना सोडून जाणे योग्य नाही ना ताई !"
" विजयीश्रीचा आशीर्वाद मी आपल्या पुत्राना पण दिला
नाही. दुर्योधन तर माझ्या आशीर्वाद शिवाय कुरुक्षेत्रावर
निघून ही गेला. मी त्याला हा संदेश सुध्दा दिला नाही की ज्या दिवसासाठी क्षत्रानिया आपल्या पुत्राना जन्म देतात तो
दिवस आता आला आहे , लाक्षागृह , द्युतक्रीडा , द्रौपदी
वस्त्रहरण , सारख्या प्रसंगांनी माझ्या वाणीला रोखले होते.
शक्य असेल तर माझ्या पुत्रांना क्षमा कर कुंती दुर्योधन
मनाने वाईट नाहीये . परंतु त्याच्या डोळ्यावर अहंकाराची
पट्टी बांधली आहे आणि त्याचा हट्टी स्वभाव त्याला कारणीभूत आहे शिवाय तो आपल्या वडिलांच्या नेत्रहीन चा
उत्तराधिकारी आहे."
" पितामहा , आचार्य द्रोण , कृपाचार्य तर जेष्ठश्रीच्या
नेत्रहीनाचे उत्तराधिकारी तर नाहीयेत ना ताई ! द्रौपदीच्या
वस्त्रहरणाचा आदेश दुर्योधन दिला नसून हस्तिनापूरची रोगी
राजनीती आणि निहित स्वार्थाने आदेश दिला होता. दुर्योधन
तर त्या राजनीतीचा केवळ एक मोहरा आहे. अश्या मैली झालेल्या राजनीतीला धुण्यासाठी रणभूमीवर एक रक्ताचे सरोवर बनविले जात आहे आणि त्या सरोवरात आपल्या नि माझ्या पुत्रांचे रक्त असणार आहे ताई !"
" मी आज एक शुभ वार्ता ऐकवायला आली होती तुला की
आज युद्धभूमीवर घमासान युध्द झाले. त्यात असंख्य सैन्य
योध्दा मारले गेले. परंतु तुझे नि माझे पुत्र सुरक्षित आहेत."
" परंतु ह्या युद्धाच्या प्रत्येक दिवसाच्या संध्याकाळी आपल्या जवळ मला देण्यासाठी ही सूचना नसेल. ईश्वर आपल्या पुत्रांना उदंड आयुष्य देऊ दे ताई !"
" तुझ्या पुत्रांना सुध्दा ईश्वर उदंड आयुष्य देऊ दे. आता
फक्त हेच पहायचे आहे की ईश्वर कोणाच्या आशीर्वादाचा मान राखतो."
युधिष्ठीर ने पांडव सैन्या मध्ये फिरून त्या जखमी सैन्याची आपुलकीने चौकशी केली .मृत सैनिकांची संख्या पाहून मात्र
त्याचे हृदय हेलावले. तो आपल्या शिबिरात परतल्यानंतर सहदेव म्हणाला ," मोठ्या दादा ssss "
" मृतदेहाची संख्या जखमी लोकांपेक्षा जास्त आहे, उद्या
काय होईल वसुदेव ?"
" राजवंश आणि राष्ट्रांचे मोजमाप साधारण माफ दंडाने
माफले जाऊ शकत नाहीये महाराज. म्हणून उद्याचं बोलू नका. आणि मृतदेहांची आणि घावांची मोजदाद करू नका.
ज्यांच्या जवळ भीम ,अर्जुन, नकुल, सहदेव सारखे भाऊ आहेत. अभिमन्यू सारखा महारथी, सत्यकि, मत्स्य नरेश, पांचाल नरेश द्रुपद , शिखंडी सारखे योध्दा आहेत ,धृष्टद्युम्न सारखा प्रधान सेनापती आहेत. त्यांनी व्यर्थच चिंतीत होऊ
नये, आणि नाही परिणामाशी ! हे युद्ध आजच समाप्त झालं
नाहीये. ही तर फक्त सुरुवात आहे. परंतु असं ही हे युद्ध कधी
समाप्त होणारच नाहीये. हे युद्ध एके दिवशी समाप्त जरूर
होईल. शिवाय विजय ही आपलाच होईल. म्हणून चिंता करायची सोडून द्या आणि सूर्योदय होण्याची वाट पहा."
दुसऱ्या दिवशी ही घनघोर युद्ध सुरू झाले. अर्जुन पितामहा
शी युध्द करत होता तर त्याच वेळी धृष्टद्युम्न आचार्य द्रोणशी
युध्द करत होता.धृष्टद्युम्न मारलेल्या बाणांनी आचार्य द्रोण
जखमी जरूर झाले . परंतु नंतर पिसाळलेल्या वाघा सारखे
तुटून पडले धृष्टद्युम्न वर वेळीच भीम धृष्टद्युम्न च्या मदतीला
धावून आला नसता तर आज काय धृष्टद्युम्न चे खरे नव्हते.
ह्या प्रसंगाचे संजय वर्णन करतच होता. तेवढ्यात महाराज
धृतराष्ट्रा ने अधिरतेने विचारले ," द्रुपद पुत्र वीरगतीला प्राप्त
झाला काय संजय ?" त्यावर संजय म्हणाला ," प्रथम वाटत
तर असंच होतं परंतु तेवढ्यातच कुंती पुत्र भीम आला नि
धृष्टद्युम्न ला सोबत घेऊन गेला. "
" तातश्री जोपर्यंत युध्द भूमीवर आहेत तोवर माझ्या
अनुज पुत्रांना किंवा माझ्या पुत्रांना काहीच होऊ देणार
नाहीत. म्हणून तू आपली नजर कुरुक्षेत्रावर जमवून ठेव
आणि तेथे घडत असलेला प्रत्येक प्रसंगाचे वर्णन करून सांग ."
" जशी आपली आज्ञा महाराज." असे म्हणून संजयने
आपली नजर पुन्हा कुरुक्षेत्रावर स्थिरावली."
गंगापुत्र भीष्मांनी आज रुद्रारूप धारण केले होते. पांडव
सैन्यचा फडश्या पाडत पुढे पुढे निघाले. त्यांच्या समोर
जाण्याची कोणत्याही योद्धांची हिंम्मत होत नव्हती. हे सर्व
पाहून अर्जुन म्हणाला ," जर आता पितामहांना रोखले
नाही तर आपल्या सैन्याची हार निश्चितच आहे. म्हणून
ह्या युध्द भूमीतून पितामहांना हटविणे एकदम जरुरी आहे. त्या साठी काहीतरी उपाय शोधून काढायलाच हवा आहे."
" तुझ्या मताने पितामहा ना ह्या युध्द भूमीतून हटविण्याचा
काय उपाय आहे ?" वसुदेव ने मुद्दाम विचारले.
"आपल्याला विजय प्राप्त करायचा असेल तर पितामहांचा
वध होणे आवश्यक आहे केशव. म्हणून माझा रथ त्यांच्या
रथा जवळ घेऊन चल."
" ठीक आहे पार्थ मी तुला त्यांच्या जवळ घेऊन चालतो."
असे म्हणून श्रीकृष्णाने त्याचा रथ हकलला आणि गंगापुत्र
भीष्मांच्या रथा समोर नेऊन उभा केला. तेव्हा अर्जुन ने
त्यांना प्रणाम केला. तसा त्यांनी अर्जुनला विजयी भवचा
आशीर्वाद दिला. तेव्हा श्रीकृष्ण उद्गारला ," बघ तुला त्यांनी
विजयीश्रीचा आशीर्वादही दिला." तेव्हा अर्जुन पितामहांना उद्देशून म्हणाला ," हे भरत शिरोमणी , हे पितामहां माझे
युध्द आपल्या बरोबर नाहीये. अत्याचार , अन्याय , अंधःकार
असत्य, अधर्माशी आहे, आणि आपण अधर्माच्या बाजूने
लढत आहात. हे बरोबर नाहीये."
" ह्या दोन्ही सैन्यांनी वाद-विवाद च्या साऱ्या सीमा पार केल्या आहेत आणि वाद-विवाद करण्यासाठी रणभूमी हे
योग्य स्थान नाहीये. म्हणून तुला जे काही सांगायचे आहे ते
आपल्या बाणांनी सांग. मी सुध्दा आपल्या बाणांनीच त्याचे
उत्तर देईन." त्यावर अर्जुन उद्गारला ," ठीक आहे." असे म्हणून त्याने आपला शंक वाजविला.
शंका चा द्वनी ऐकून महारानी सुदेष्णा उद्गारली ," हा तर
धांनजयच्या शंकाचा आवाज आहे."
" मला वाटत भयंकर युद्धाला सुरुवात होणार आहे."द्रौपदी उद्गारली.
" दुर्योधन आणि अर्जुन मध्ये तर ...?" महारानी सुदेष्णाचे वक्तव्य पूर्ण होण्या अगोदरच द्रौपदी उद्गारली," नाही. महारानी तो असभ्य महारथी माझ्या महारथी सोबत युध्द काय करेल ?"
" मग तर अंगराज कर्ण.....?"
" नाही पितामहांनी त्या सुतपुत्राला युध्दा मध्ये भाग घेण्याची अनुमती दिली नाहीये. तो आपल्या सारख्या स्त्रिया
प्रमाणे आपल्या शिबिरात बसून फक्त युध्द पाहत असेल."
अंगराज आपल्या शिबिरातून रणभूमीवर होणारे युध्द पाहत होता. परंतु युद्धात भाग घेऊ न शकल्यामुळे स्वतःला
नि गंगापुत्र भीष्मांना दोष देत होता. तो परमेश्वराला
उद्देशून म्हणाला ," हे ईश्वर , हा अन्याय माझ्या सोबतच का
होतोय ? पितामहा सारख्या महावीर वीरगतीला प्राप्त
होण्याची प्रार्थना पण करू शकत नाही. परंतु पितामहां वीरगतीला प्राप्त होईपर्यंत मला वाट पहावीत लागेल.
हे महादेव मी हे पाप करत आहे, परंतु माझ्या जवळ दुसरा
पर्याय नाहीये. नाहीतर तू त्याना आदेश दे की मला युद्धात
भाग घेण्याची अनुमती दे आणि जर मी ह्या युद्धात भाग
घेऊ शकलो नाहीतर हजारो जन्म घेऊन ही मी दुर्योधनाचे
ऋण उतारू शकणार नाहीये , म्हणून परमेश्वरा पितामहां
सांग की ह्या राधेयाला त्यांच्या ध्वजाखाली युध्द करण्याचे
देऊन मला धन्य करावे."
क्रमश:
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा