Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

महाभारत १०८ | मराठी स्टोरी, मराठी शॉट स्टोरी, मराठी कथा | महेंद्रनाथ प्रभु.

महाभारत १०८
महाभारत १०८

 


                  महाभारत १०८

     दहाव्या दिवशी युध्द सुरू झाले. अर्जुन पितामहा पर्यंत
पोहोचू नये म्हणून दुर्योधन पक्का बंदोबस्त केला होता.परंतु
अर्जुनला कर्णा व्यतिरिक्त दुसरा कोण  रोखू शकणार होता म्हणा. आचार्य द्रोण जरी असले तरी ते त्यात पडणार नाहीत.
कारण त्याना ही माहीत आहे की ते स्वतः आणि गंगापुत्र
पुत्र भीष्म जोपर्यंत रणभूमीवर आहेत तोपर्यंत पांडवांना विजयी श्री मिळणे शक्य नाहीये. म्हणून ते अर्जुनला कदापि
अडविणार नाहीत आणि केलेही तेच. अर्जुनला दुरूनच पितामहांचा ध्वज दिसला तसा तो वसुदेव कृष्णाला म्हणाला ," केशव तो पहा पितामहांचा ध्वज. तिकडे घेऊन चल. तेव्हा अश्वत्थामा सहित सर्वांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणीही त्याला फार काळ रोखू शकले नाही. अर्जुन पितामहांच्या रथा पाशी पोहोचला. गंगापुत्र भीष्मांनी आपल्या धनुष्यावर बाण चढविला नि अर्जुन वर सोडणार तोच शिखंडी अर्जुनच्या पुढे उभा राहिला. शिखंडीला पाहतच गंगापुत्र भीष्मांनी आपल्या बाणांची दिशा बदलली नि बाण सोडला नि आपले धनुष्य खाली ठेवले नि फक्त तलवार हातात घेतली, उद्या कोणी असे  म्हणू नये की
अर्जुन ने निःशस्त्र गंगापुत्र भीष्मांच्या शरीरावर बाण चालविले. एका पाठोपाठ एक असे बाण मारून त्यांचे पूर्ण
शरीर छिन्नभिन्न करून टाकले होते. ते रथावरून झाली
कोसळले. पण तरी देखील उठून उभे राहिले. तेव्हा त्यांच्या
चालणाऱ्या पायावर पण अनेक बाण मारून त्याचे पूर्ण
शरीर चाळण करून टाकले होते. तेव्हा त्यांनी आचार्य द्रोण
यांची प्रशंसा करत म्हटले ," अभिनंदन आचार्य द्रोण अभिनंदन ! आपल्या शिष्यां ने माझ्या शरीराची नुसती चाळणं
करून टाकली आहे " असे म्हणून ते जमिनीवर कोसळले.
तेव्हा सर्वांनी युध्द थांबहुन गंगापुत्र भीष्मांच्या दिशेने धाव
घेतली. तेव्हा पितामहा म्हणाले ," माझ्या डोक्याखाली काही
आधार घ्या."  तेव्हा दुर्योधन उद्गारला ," दु:शासनाला लवकर
डोक्याखाली ठेवायला उशी घेऊन सांगितले." दु:शासन पट्कन जाऊन उशी तर घेऊन आला परंतु उशी छोटी पडू लागली. तेव्हा गंगापुत्र भीष्म म्हणाले ," ज्याने मला हे अंथरून दिले आहे तोच मला उशी देईल. अर्जुनाला बोलवून घ्या लवकर." तसा अर्जुन पुढे आला नि धनुष्यावर बाण चढवून भूमी मध्ये मारून त्या बाणांची उशी तयार केली. तेव्हा त्यांनी सांगितले की मला तहान लागली आहे, पाणी पाहिजे. तसे लगेच अर्जुनाने जमिनीत बाण मारून गंगेला
आवाहन  केले गंगा बाण मारलेल्या उत्पन्न झाली नि पाणी सरळ त्यांच्या मुखात जाऊन पडू लागले. तेव्हा गंगा
माता प्रगट झाली. गंगापुत्र भीष्मांच्या डोक्या जवळ बसली.
तेव्हा वसुदेव कृष्ण म्हणाले ,"  गंगापुत्र भीष्मांना एकटे सोडा. त्यांना विश्रांतीची फार गरज आहे."  तेव्हा दुर्योधन चिडून
म्हणाला ," त्याना एकटे कसे सोडू वसुदेव , ते आमचे पितामहां आहेत." त्यावर गंगापुत्र भीष्म म्हणाले," पितामहां
तर मी पांडवांचा सुध्दा आहे, आणि माझं जरा ऐक. जीवनभर तुझ्याकडे किंवा तुझ्या बापाकडे मी काहीच
मागितले नाही. हे शेवटचे मागत आहे , मला एकांत हवाय
तेव्हा तुम्ही सर्वजण जा इथून."
     " जशी आपली आज्ञा !" असे म्हणून त्याने गंगापुत्र भीष्मांना प्रणाम केला नि तेथून चालता झाला. त्यानंतर
एक एक करून सर्वांनी त्यांचे दर्शन घेतले नि तेथून चालते
झाले. सर्वात शेवटी वसुदेव कृष्णाने त्याना वंदन केले. तेव्हा
गंगापुत्र भीष्म म्हणाले ," तुझ्या शिवाय माझी लाचारी कोण
समजू शकतो गिरीधर !"
    " मग मी समजणे पुरेसे नाही आहे का गंगापुत्र  ? आपण
सत्य नि निष्ठा याचे प्रतिबिंब बनून सदैव जिवंत रहाल. सारे मानव जाती  सदैव आपला आदर्श लक्षात ठेवील." असे वसुदेव कृष्ण म्हणाले नि तिकडून निघून गेले. तेव्हा गंगा म्हणाली ,  " आता चल पुत्र." त्यावर तर म्हणाले , " एवढ्यात कसं येऊ शकतो मी ?   पिताजीना मी वचन दिलं आहे की जोपर्यंत  चारही बाजूनी हस्तिनापूरला मी सुरक्षित पाहत नाही तोपर्यंत मी माझा प्राण त्यागणार नाही."
    " परंतु हा त्रास ?'
    " माझं पूर्ण जीवनच पिडामय होते. ही पीडा तर त्या पुढे
काहीच नाहीये. म्हणून मी इतक्यात येणार नाही जेव्हा मला
वाटेल की हस्तिनापूर चारही दिशांनी सुरक्षित आहे तेव्हा मी
स्वत:हून प्राण त्याग करीन." त्यानंतर गंगा तेथून निघून गेली
आणि थोड्या वेळाने तेथे अर्जुन आला मी गंगापुत्र भिष्मांच्या डोक्या जवळ उभा रडू लागला. तेव्हा गंगापुत्र  आपली मान वळवून अर्जुन कडे पाहत म्हणाले," हे भरतवंशाचा आदर्श वीर पुत्रा आज तुझ्या बाणांचे घाव खाऊनी मी धन्य झालोय."
  " ती वीरता नव्हती पितामहां कायरता होती. मी शिखंडीच्या आड राहून  आपल्यावर बाण चालविले. धिक्कार आहे माझ्या वीरता वर आणि धिक्कार आहे माझ्या ह्या गांडीव वर  आणि या अपराधा बद्दल  मी स्वतःला कदापि माफ करू शकणार नाहीये पितामहां !"
     " अरे असं काय बोलतोस वेड्या सारखं.शिखंडी हे
माझं  भाग्य होतं आणि तुझी ती ढाल होती. कोणत्याही
क्षत्रियाला ढाल वापरण्याचा अधिकार असतोच ना ? आता
मी ती ढाल तोडू शकलो नाही, हे माझं दुर्भाग्य नाहीये का ?
आणि मी सुध्दा इच्छामृत्यूचे कवच परिधान करून रणभूमीवर उतरलो होतो. कुण्या क्षत्रियांला असे करणे शोभतं का ? परंतु माझा नाईलाज होता. इच्छामृत्यूचे कवच मी फेकू शकत नव्हतो. परंतु समानता आली. माझ्याकडे इच्छामृत्यूचे कवच  होते तर तुझ्याकडे शिखंडी स्वरूपाची ढाल होती. त्यामुळे  दोन्ही पारडी समान झाली आणि त्यात तुझा वियज झाला नि माझा पराजय झाला. परंतु मी मात्र
अत्यंत खुश आहे तुझ्यावर , कारण माझा पराभव तुझ्या कडून झाला. म्हणून रडून आपल्या विजयाचा अपमान करू नकोस. कारण युध्द अजून संपले नाहीये. आतापर्यंत आपल्या पितामहांशी युध्द केलेस.उद्यापासून तुला आपल्या गुरू बरोबर युध्द करायचे आहे. मनात कोणताही किंतु न
बाळगता त्यांच्याशी युध्द कर तुझा पराक्रम पाहून तर
फार खुश होतील. तुझ्या सारखा शिष्यबमिळाला म्हणून ते खुश होतील. जा पुत्र जा. आपल्या शिबिर मध्ये जाऊन विश्राम कर. परत तुला उद्या युध्द करावयाचेच आहे. मी आता इथं पडून तुझा पराक्रम पाहणार आहे."
    मग अर्जुनाने आपल्या डोळ्यातील अश्रू पुसले नि धुळीत
पडलेला पितामहांचा  मुकूट उचलून आपल्या हृदयाशी धरला
नि त्यांच्या चरणापाशी ठेवून जड अंतकरणाने तेथून निघाला.

    संजय कडून पितामहा धारातीर्थ पडल्याची खबर विदुरला
मिळाली. मोठ्या दुःखी अंतकरनाने आपल्या घरी परतले. त्यांच्या दु:खीकष्टी चेहरा पाहून सुलभाने विचारले ," काय झाले ?"
     "  मी संजयच्या घरून आता आलो.?"
     " काय झालंय संजयला ?"
     " संजयला काही नाही झाले. आज हस्तिनापूर बाणांच्या
बिछान्यावर पडले आहे."
    " म्हणजे मी नाही समजली."
    " आपले तातश्री .....?"  पुढे बोलण्या अगोदरच कुंती ने
चिंतायुक्त स्वरात विचारले ," काय झालं तातश्री ना ? अरे
बोल ना विदुर ?"
     " वहिनी , अर्जुन ने त्याना बाणांच्या बिछान्यावर झोपविले.
     " म्हणजे तातश्री ....?"
     " नाही वहिनी  त्यांनी आपला प्राण  अजून सोडलेला
नाहीये.आणि तो सोडू पण शकणार नाहीत ते ,कारण ते वचन बध्द आहेत.जोपर्यंत हस्तिनापूर चारही बाजूनी सुरक्षित नसेल  तोपर्यंत ते आपला  प्राण त्यागू शकणार नाहीत आणि हस्तिनापूरची  फळा फुलांनी डवरलेली बाग आता  त्याना ती उजाडताना पहावी लागणार आहे, कदाचित हेच त्यांचे भाग्य आहे आणि प्रायश्चित्त सुध्दा !'
  " प्रायश्चित्त त्यांनी कोणता अपराध केला आहे ?"
    " हस्तिनापूरच्या नरेश मध्ये आपल्या वडिलांची छबी पाहणे हा अपराधच नाही का ? "
    " बरं मग काय तातश्री ना प्रणाम करायला जाणार आहेस तू विदुर ?"
    " नाही वहिनी त्यांची ही झालेली दुर्दशा मला  माझ्या उघड्या डोळ्यांना ते पाहवणार नाहीये. म्हणून आपण
हस्तिनापूर तर्फे शोक प्रकट करू.? " असे म्हणून किंचित
मौन धारण करतात. त्याच वेळी महाराज धृतराष्ट्रा महारानी गांधारी कक्षेत मौन धारण करून बसले होते. तेवढ्यात तेथे राजमाता कुंती आली. तिच्या पावलांच्या आवाजावरुनच महाराज धृतराष्ट्रांनी ओळखले नि विचारले,
    " कुंती तू आली आहेस ना ?"
    " हां जेष्ठश्री प्रणाम !" लगेच गांधारी कडे पाहत म्हणाली,
    " प्रणाम ताई ! " असे म्हणून त्यांना आपला हुंदका रोखता
आले नाही. रडू कोसळले. तेव्हा महाराज धृतराष्ट्रानी  विचारले ," आज माझी आठवण कशी झाली ? नाही म्हणजे जेव्हा कधी भेटायला येतेस तेव्हा गांधारीलाच भेटून जातेस.
मला कल्पना आहे की मी तुझ्या पुत्रावर फार अन्याय केला
आहे. त्याबद्दल मला खेद आहे त्याचा. तुझे पुत्र माझे कुणी
लागत नाही का ? तुझ्या पुत्रांवर अन्याय झाला हे सांगायला  खूप जण आहेत .परंतु माझ्यावर जेव्हा अन्याय झाला तेव्हा होता कुणी ?" त्यावर गांधारी चिडून म्हणाली ," आर्यपूत्र  काय बोलत आहात आपण हे  ?" कुंती म्हणाली," आपण त्यांचे जेष्ठ पिताश्री आहात नि ते आपले अनुज पुत्र आहेत मी त्यात नाहीच आहे, मी मध्ये जर असती तर आपल्याला प्रश्न अवश्य केला असता. मी आजपर्यंत आपल्याला हे देखील विचारले नाही की कुलवधू द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते तेव्हा आपण गप्प का राहिलेत ? परंतु मी आपल्याला
कधीच प्रश्न केला नाहीये. मी आज आली ती भरतवंशाचा सर्वांत जुना मर्यादा महापुरुष धारातीर्थ पडले आहेत, त्याचा शोक करायला आली होती."
    " हां पण त्या मर्यादा वृक्षाला कुणी पाडले , अर्जुननेच ना ?"
     " अर्जुनच्या जाग्यावर आपण असता तर काय केलं असतं ?"
    " प्रश्न करू नकोस कुंती  अर्जुन तर युध्दच करायला तयार नव्हता. पण तुझ्या भाच्याने अर्थात कृष्णाने अर्जुनला
भडकविले. ते पण छोट्याश्या जमीनच्या तुकड्यासाठी !
त्याचा परिणाम हा झाला की आज अर्जुनच्या खांद्यावर
पितामहांचे शव आहे."
     " ते शवं कोणाच्या खांद्यावर हे हस्तिनापूरचे भविष्य
सांगेल." गांधारी उद्गारली. गांधारीचे वक्तव्य महाराज धृतराष्ट्राला वर्मी लागले. ते मोठ्या ने ओरडले ," गांधारी sss ? " त्यावर गांधारी उद्गारली," आर्यपूत्र मी आपल्याला कित्येकदा सांगितले आहे की आपण धृतराष्ट्रा आहात. ध्रुतला बाजूला ठेवून फक्त राष्ट्राचा विचार करा पण नाही तुम्हांला ते कधी जमलेच नाही. त्याचा परिणाम असा झाला की माझ्या पुत्रांची संख्या दिवसेंदिवस कमी कमी होत चालली. परत अजूनही काही बिघडलं नाही. तातश्रीना मध्यस्थी ठेवून पांडवांशी संधी करा." त्यावर धृतराष्ट्र म्हणाली ," गांधारी संधी करण्याची वेळ आता निघून गेली आहे. आता फक्त विजय अथवा पराजय स्वीकार करणे हेच उरले आहे  आपल्या हाती! म्हणून तुम्हां दोघीना  तातश्रीना
भेटायला जायचं असेल तर जा  नि माझाही तातश्रीना प्रणाम सांगा.त्या शिवाय हे देखील सांगा की युध्द सुरू असताना सिंहासन खाली ठेवता येत नाहीये म्हणून मला आपल्याला
भेटायला यायला मिळणार नाहीये."

      आचार्य द्रोण एकटेच आपल्या शिबिरात बसले होते.
तेवढ्यात दुर्योधन , दु:शासन , कर्ण आणि शकुनिमामा प्रवेश
करतात. तेव्हा दुर्योधनाने त्याना  प्रणाम केला आणि मग म्हणाला ,
    " आजपासून  आपली कुरुसेनेचा प्रधान सेनापतीच्या
पदावर नियुक्त करत आहे." तेव्हा आचार्य द्रोण म्हणाले ,
    " अर्जुनला गंगापुत्र भीष्म रोखू शकले नाही तर दुसरा
कोण रोखणार ?"
    " त्याला आपण रोखायचे आहे गुरुदेव."
    " आचार्य आपण तर नाही म्हणणार ना  की आपल्या
झेंड्याखाली मी युध्द करू शकत नाही म्हणून.?"
     त्यावर आचार्य द्रोण म्हणाले ," युध्द करण्यासाठी एवढा
उत्सुक आहेस अंगराज  तर   युध्द अवश्य कर,  मी कुठं
नको म्हणतोय माझी काहीच हरकत नाहीये." तसा दु:शासन
लगेच म्हणाला ," आपण पितामहा सारखे असं तर नाही
बोलणार ना ? की मी पांडवांचा वध करणार नाहीये."
       " आचार्य द्रोण उत्तरले ," मी ते तर नाही बोलणार परंतु
मी कोणतेही वचन ही देणार नाही की कोणाचा वध करेन किंवा कोणाचा वध करणार नाही. कदाचित माझ्या कडून त्याना वीरगती प्राप्त होईल किंवा मी त्यांच्या हातून वीरगतीला प्राप्त होईन , कारण ही रणभूमी आहे, दु:शासन रणभूमीवर काही पण घडू शकते. शिवाय मी करुवंश नाहीये तेव्हा माझ्या सीमा मर्यादित आहेत मी गंगापुत्र भीष्मां प्रमाणे सांगू शकत नाही की कुणाचा वध करेन किंवा कुणाचा वध
करणार नाही. जोपर्यंत मी  तुझ्या पक्षात आहे  तोपर्यंत मी तुझ्या शत्रूशी युध्द करणे हे माझे कर्तव्य आहे दुर्योधन." असे म्हणून अंगराज कर्ण कडे पाहत आचार्य द्रोण उद्गारले, " कुरुसेनेत  तुझे स्वागत आहे अंगराज कर्ण !" तेव्हा अंगराज कर्ण उत्तरला , " प्रणाम आचार्य !" असे म्हणून तेथून निघाला.

                     राधेय

    आचार्य द्रोण ने आपल्या ध्वजाखाली लढण्याची अनुमती
दिल्याने  मी फार  खुश होतो. परंतु पितामहां ती अनुमती दिली नाही त्याचेच फार वाईट वाटते. पण हरकत नाही दिली तर नाही. परंतु त्यांची भेट घेणे अत्यावश्यक आहे. असा विचार करून मी तसाच  युद्धभूमी कडे निघालो. मनात विचारांचे काहूर  मांजले  होते. भोवती अंधार दाटला होता. पितामहा पडले. कुरूंचा राजदंड पडला.त्यांचे आणि आपले जरूर मतभेद आहेत.पण याचा अर्थ असा नाही की त्यांच्या बद्दल माझ्या मनात  द्वेश आहे किंवा आदर नाही. नित्यांत आदर आहे , भले ते मला एका सारथ्था पेक्षा अधिक मानत नाही. त्यांच्या मनी एका अर्ध्यरथ्थापेक्षा अधिकसं आपणाला मोल नाही. पण तरीही माझं मन त्यांच्या कडे  का ओढ घेत होते ते माहीत नाही. ही आत्मवंचना आहे काय ? नाही ! नाही ! जो योध्दा  मृत्यूच्या  दारात घायाळ होऊन पडला आहे. त्यांची भेट घेताना कसली आलीय वैयक्तिक स्पर्धा ? कसला मानपान ? कोणते मतभेद ? आता  काही क्षणाचा सोबती असणाऱ्या महापुरुषाचे प्रमाद तसेच उगाळीत बसण्याची बसण्याची ही वेळ नाहीये. इतर  कुणाला ते शक्य असेल , पण कर्णाला ते शक्य  नाहीये. त्यांची भेट घेतली पाहिजे. शरपंजरी पडलेल्या सेनापतीच्या दर्शन घेण्यासाठी
मन धाव घेत होते.जेव्हा मी तेथे पोहोचलो.तेव्हा त्यांच्या
कडे पाहून मनात एक विचार आला की, राजकक्षात सुखशय्येवर निद्रा घेणारा तो वीर , शहरांच्या-तृणपात्यांच्या
शय्येवर पडला होता ! दाढीच्या शुभ्र कंसात दोन-तीन शुष्क शरांच्या-तृणकाट्या अडकल्या होत्या ! ठायी ठायी शरीरात
रुतलेले बाण दिसत होते ! डोळ्यांभोवती काळ्या सुरकुत्यांची
वलय दाटली होती. त्यांच्या शरीरा खालचे तृण धन्य झालं
होतं !पावन झालं होतं हे सर्व पाहून माझं मन एकदम हेलावले.मी त्यांच्या चरणावर डोके ठेवून म्हणालो ," हे भरतशिरोमणी ह्या राधेया कडून कळत नकळत झालेल्या अपराधाची मी आपल्याकडे माफी मागत आहे , नि आपल्याला सादर प्रणाम करत आहे."
    " यशस्वी भव ! कुंती पुत्र यशस्वी भव ! तुला माहीत
आहे, आणि मलाही !"
    " जर आपल्याला माहीत होते तर आपण मला आपल्या ध्वजाखाली युध्द करण्याचे सौभाग्य प्राप्त का होऊ दिले नाही."
    " त्याला दोन कारणे आहेत. पाहिलं कारण म्हणजे तू
आपल्या डोळ्यावर उपेक्षाची पट्टी बांधली आहेस आणि
कोणत्याही महावीराला डोळ्यावर पट्टी बांधून रणांगणावर
उतरले नाही पाहिजे. आणि दुसरे कारण हे होते की ह्या युध्दात अनेक शूरवीर मारले जाणार आहेत की भारतवर्षात शूरवीरांचा दुष्काळ पडेल. जर तू युद्धात भाग घेत आहेस तर तुम्हां दोघांपैकी एकच जिवंत राहणार आहे,  शिवाय तुम्हां दोघांसारखे महावीर पुन्हा पुन्हा जन्म घेत नाहीत. म्हणून माझी अशी इच्छा होती की तुम्ही दोघेही वाचावेत. म्हणून
माझे तुला सांगणे आहे , युध्द  थांबविणे शक्य झाले तर
युध्द थांबविण्याचा प्रयत्न कर आणि शक्य नाहीच झाले तर
पांडवांच्या बाजूने युध्द कर."
     " आपल्याला तर माहीत आहेच की मी असे करू शकत नाही. दुर्योधचा मी ऋणी आहे तेव्हा त्याचे ऋण मला उतरावेच लागेल. जसे आपण दुर्योधनाच्या पक्षातून लढण्यास  विवश होता. तशाच मी सुद्धा दुर्योधनाच्या
पक्षातून लढण्यास विवश आहे. म्हणून मला दुर्योधनाच्या पक्षातून लढण्याचा आदेश द्या."
    " मी आदेश तर देवू शकरणार नाही. फक्त सांगू शकतो
आपल्या धर्माचे पालन कर. तू  भरतवंशी जरी नाहीस तरीही
प्रत्येक महावीर मग तो कोणत्याही पक्षातून लढेना तरी
तो माझ्या परिवारातील सदस्य आहे. जा यशस्वी भव !"
अंगराज कर्णाने पुन्हा एकदा चरणस्पर्श केले नि तेथून निघाला. तेव्हा त्याच्या पाठमोरी आकृती कडे पाहत गंगापुत्र
भीष्म म्हणाले ," हे कुंती अंगराज कर्णा सारख्या पुत्राची
माता होणे पण मोठ्या अभिमानाची  गोष्ट आहे. अभिनंदन पुत्री अभिनंदन !"

    

क्रमशः

    



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..