Vamana Hari Watmare | Love story | Mahendranath prabhu

इमेज
  Vamana Hari Watmare         This is a very long year ago, there is a Konkan village, the village of the village is Tamhankar Wadi, the scenic village, and the Bils in the mountains, and the bay originated from the mountain, and the cake came from the village of Kharipatan and the end of Kharipaton. The end was going to the Arabian Sea than the ends. Tamhankar Wadi is situated in Kashi on the basis of Sahyadri Mountains, because the village's gate was in the gate of the village, this village has been a different importance. Fresh fish in the creek, the villagers get eaten every day. Coconut trees are also in the horticulture, according to the horticultural horticultural horticulture, even though the main business of the villagers are the major business of these villages, though the member of the villagers, the mangoes, the mangoes, which are in large custody, are the door of the mangoes.. Be. Tamhankar Wadi was living in the village of merciful and Damanti. Bec...

महाभारत १०६ | मराठी स्टोरी, मराठी शॉट स्टोरी, मराठी कथा | महेंद्रनाथ प्रभु.

महाभारत १०६
महाभारत १०६

 


                   महाभारत १०६

  दुसऱ्या दिवशी नव्या उमेदीने युध्द सुरू झाले. मार्गशीर्ष वद्य तृतीया या दिवशी पितातामांनी केलेली सारंग पक्ष्यासारखी सैन्यरचना निष्प्रभ करावी म्हणून पांडवाच्या सेनापती धृष्टद्युम्नानं आपली सेना क्रौंच पक्ष्यांच्या आकारात उभी केली ! तो स्वतः अग्रभागी उभा राहून आपल्या पित्याला - द्रुपदाला पराभूत करणाऱ्या गुरु द्रोणांना आपले रक्तवर्णी अग्नी सारखे नेत्र  विस्फारुन अथक शोधत होता ! सूर्योदय होताच हात उंचावून सिंहासारखी गर्जना करीत तो अश्वत्थामावर तुटून पडला.शल्य शंकाला भिडला पितामहांनी पांचालांची सेना बाणांनी झाकून टाकली . तेव्हा त्यांच्या
मदतीला अर्जुन धावून आला नि त्या दोघां मध्ये घामाशांन युध्द सुरू झाले. दोन्ही महारथी नि अक्षरशः बाणांचा पाऊस
पाडला.

     अर्जुन कधी गंगापुत्र भीष्मां शी युध्द करत असे तर कधी आचार्य द्रोण शी युध्द करत असे. तरी कधी कौरव सैन्यावर तुटून पडे. दुर्योधन हे सर्व पाहत होता. शेवटी त्याने आपला
रथ पितामहां पाशी आणला नि म्हणाला ," पितामहां अर्जुन वसुदेवच्या साह्याने कौरव सैन्याचा धुवा उडवत आहे नि आपण आणि आचार्य द्रोण  दोघांच्याही रोखण्याने जर अर्जुन रोखला जात नसेल. तर मग त्याला रोखू शकणाऱ्या कर्णाला आपण युद्धात भाग का घेऊ देत नाही आहेत." त्यावर. गंगापुत्र भीष्म म्हणाले ," तो असभ्य योध्दा माझ्या झेंड्या खाली युध्द करू शकणार नाही. तुला जर माझ्या निष्ठेवर विश्वास नसेल तर दुसऱ्या कोणाला ही प्रधान सेनापती नियुक्त कर." त्यावर दुर्योधन म्हणाला ," मी असा विचार कदापि  करू शकत नाही." त्यावर पितामहां म्हणाले ," हीच तर मुख्य खेदाची गोष्ट आहे की तू विचार करत नाहीस. तू जर विचार  केलास असतास तर वसुदेव कृष्णाच्या सांगण्यावरून पांडवांना पाच गावे दिली असतीस तर हा विनाश झाला नसता. आता जा इथून मला युध्द करू दे , नि माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या सैन्याचा पराजय मी होऊ देणार नाही."
   त्यानंतर अर्जुन आणि पितामहां या दोघां मध्ये घामाशांन
युध्द झाले. कोणी कोणाला कमी पडेना. इतक्यात पितामहांचे वसुदेव कृष्णांच्या दोन्ही हातात रुतले. तसे अर्जुन ने युध्द थांबवून अगोदर श्रीकृष्णाच्या हातात रुतलेले बाण काढून टाकले आणि पुन्हा अर्जुन पितामहांवर तुटून पडला. तर  दुसरीकडे अभिमन्यू लक्ष्मणावर चालून गेला. धुळीचे लोळ उठले. आपण कोण आणि परका कोण कुणाचा कुणाला मेळ लागत नाही. सात्यकीच्या झंझावाती गर्जनायुक्त भ्रमणानं दुसरा दिवस निनादला. पितामहांचा सारथी ठार करून त्यांनी आपली वृक्षी कुलाची खरी ओळख करून दिली ! प्रेतांचे ढिगारे हिमायची उंची मोजू लागले ! नाराच , बस्तिक ,पद्म , सूची ,गोमुख , गवास्थी या फेकलेल्या बाणांचे पर्वत झाले !
     तेव्हा दुर्योधन आकाशात पाहत म्हणाला ," आज सूर्य
अस्ताला का जात नाहीये. काल त्याला म्हणालो की, सूर्य
अस्ताला जाऊ नकोस. पण नाही ऐकला अस्ताला गेला तो.
आणि आज त्याला अस्ताला जायला सांगतोय तर अस्ताला
जात नाहीये." त्यावर गुरू द्रोण म्हणाले ,"तुझ्यासाठी सूर्य
आपली गती का बदलेल ? तो आपल्या निर्धारित वेळेनुसार
उदयास येईल. आणि त्याच्या निर्धारित वेळेनुसार अस्ताला
ही जाईल. तो कोणासाठी कधी थांबत ही नि कुणासाठी
वेळे आधी अस्ताला जात नाही. म्हणून सूर्याकडे बघायचे
सोड आणि  आपल्या शत्रू शी युद्ध कर." असे म्हणून त्यांनी
पांडव सैन्यावर बाणांचा पाऊस पाडला. आणि थोड्या वेळाने
सूर्य अस्ताला गेला नि शंक नाद होऊन युध्दाला विराम पडला. तसा दुर्योधन , दु:शासन नि गांधार नरेश शकुनि
कर्णाच्या शिबिरात पोहोचले. त्याना पाहून अंगराज कर्ण
उद्गारला ," प्रणाम मामाश्री !" दुर्योधनाच्या चेहऱ्यावर
ओसांडत असलेला संताप पाहून कर्णा ने विचारले ," काय
झालं मित्र ? मी तर साऱ्या दिवस कोलाहल पाहतच राहिलो.
नि विचार करू लागलो की विजय कोणाचा होतोय ? तुझ्या
प्रधान सेनापतींनी तर इच्छामृत्यूच्या वरदानाचे कवच परिधान
केले आहे, निःसंदेह विजय तुझाच होत असणार."
    " त्यांच्या इच्छामृत्यूच्या वरदानानेच तर मोठी समस्या
उभी केली आहे अंगराज. ते पांडवांचा वध करणार नाहीत.
आणि दुसरे कोणी ते करू शकणार नाही. जर त्यांच्या
इच्छामृत्यूचे वरदान आड आले नसते तर मी त्यांना कधीच
प्रधान सेनापतीच्या पदावरून हटवून त्यांच्या जागी दुसरा
कोणी प्रधान सेनापती नियुक्त केला असता. गंगापुत्र भीष्म
हे भरत शिरोमणी आहेत भाच्या. ते आम्हाला हरायला
देणार नाहीत परंतु निश्चितच जिंकू सुध्दा देणार नाहीत ."
     " मग मामाश्री अशा सेनापतीची गरजच काय जे आपल्याला हरु पण देणार नाहीत आणि जिंकू देणार नाहीत." दु:शासन उद्गारला .
     " मी तर त्यांना प्रधान सेनापती बनवू इच्छित नव्हतो. परंतु आपणच.....?
    " अरे भाच्या कधी कधी परंतु सारखे शब्द मध्ये येतात.
त्याला कारण असते. जर तू आपल्या मित्राला प्रधान
सेनापती बनविले असतेस तर तुझ्या ध्वजाखाली सारे
भारतवर्षाची सैन्या लढते ना ती दिसली नसती. फक्त तुझे
भाऊ , मामाश्री आणि तुझा मित्र कर्ण रणांगणात दिसले
असते."
     " पण मी काय करू मामाश्री ? युध्द जिंकण्यासाठी
अर्जुन वध आवश्यक आहे, आणि पितामहा भीष्म अर्जुन
वध करणार नाहीत ,आणि त्या अर्जुनाने प्रेतांचा सडा पाडला
आहे, जर मला शक्य असतं तर दुसऱ्या कोणाला तरी
प्रधान सेनापती बनवून मी स्वतःच पितामहांची हत्या केली
असती. मला हे युद्ध जिंकायचे आहे, आणि ते माझ्या मित्राच्या साह्या शिवाय शक्य नाहीये. अर्जुन प्रश्न आहे तर
त्याचे उत्तर माझा मित्र कर्ण आहे. म्हणून जर दुसऱ्या कोणाला प्रधान सेनापती कसे बनविता येईल याबद्दल
विचार करा मामाश्री !"
     " या विषयासाठी तुझ्या मामाश्री ला विचार करण्याची
अजिबात गरज नाहीये भाच्या. जर पांडव हे युद्ध जिंकू
इच्छित असतील तर ते सुध्दा पितामहांना आपल्या मार्गातून
कसे हटविता येईल या बद्दल अवश्य विचार करत असतील.
तेव्हा ते कार्य त्यांनाच करू दे, दोष त्यांच्या माथी लागेल
आपल्या नाही. शिवाय त्यांच्या सोबत वसुदेव कृष्ण आहेत.
हा काटा तर त्यांच्या गळ्या मध्ये अडकला आहे. तर त्याचा
उपाय पण त्यांनाच करू देत."

      वद्य चतुर्थी चा तिसरा दिवस उजाडताच पितामहांनी ठेवणीतील गरुडाकार सैन्यरचना आखली ! तिला ग्रासण्यासाठी अर्जुनाने अर्धचंद्रकार सैन्य उभे करून उजव्या
हाताशी रथाचा चक्ररक्षक म्हणून भीमाला घेतला. पक्ष्यांचा किलबिलाट खड्गांचा खडणखणाट मिसळत त्यांनी कौरवांच्या मध्यान्हकालापर्यंत क्रूर पाठपुरावा केला. कोसल , केकय ,गांधार ,संशप्रक , त्रिर्गत , यांच्या सेनापथकांतील शेकडो, अश्वसाद , रथी आणि पदाती निपटले. त्याना थोपवायला कुणीच समर्थ नव्हतं ! भयग्रस्त होऊन ' वाचवा वाचवा ! म्हणत ' कुरुसैन्य दुर्योधनाच्या आश्रयाला धावलं. सेनापती झालेल्या पितामहांवर सौम्य युध्द खेळल्याबद्दल दुर्योधन प्रचंड खवळला ! त्याच्या मर्मभेदक वाक्यतांडनानं
संतप्त होऊन भीष्मांनी पांडवसेना इतकी मागे पिटाळली.
ती रणक्षेत्राबाहे पळून जाते की काय असे वाटू लागले.
  तेव्हा त्यांच्यारक्षणासाठी  अर्जुन धावला. मग अर्जुन आणि
पितामहा यांच्यात  युध्द सुरू झाले. परंतु अर्जुन पितामहाशी
युध्द करताना इतका सौम्य  लढतोय  हे श्रीकृष्णाच्या द्यानात
येताच श्रीकृष्ण उठून उभा राहत म्हणाला ," पार्थ मला वाटतं
हे युद्ध तू हरण्यासाठी करत आहेस. सारखे सारखे सांगतोय
तुला जे समोर आहेत त्यांना तू आपले पितामहांच्या रुपात
पाहू नकोस. त्याना आपले शत्रू समजून युध्द कर.या युद्धात
अधर्माच्या बाजूने जो युध्द करतोय तो समाज्याचा शत्रू आहे.
आणि जो समाज्याचा शत्रू तो माझा शत्रू ! एकट्या तुझ्या
पितामहांनी असंख्य सैनिकांचा वध केला आहे. किती
महावीरांचा वध केला आहे. जे वीरगती ला प्राप्त झाले ते सर्व
सैनिकांचा ,योध्दाचा तू ऋणी आहेस अर्जुन. जर तू गंगापुत्र भीष्मांचा वध करून त्यांचे ऋण उतारणार नसशील तर
मला शस्त्र उचलावे लागेल नि गंगापुत्र भीष्मांचा वध करावा
लागेल." असे म्हणून वसुदेव कृष्ण रथातून खाली उतरले
नि हाती सुदर्शनचक्र धारण केले. ते पाहून गंगापुत्र भीष्मांनी
आपले शस्त्र खाली ठेवली आणि दोन्ही हात जोडून ते
म्हणाले ," तुझे स्वागत आहे वसुदेव कृष्ण तुझे स्वागत आहे.
माझा वध करण्यासाठी आपण आपली प्रतिज्ञा मोडली.
असे करून तिन्ही लोकांमध्ये माझा गौरव वाढविला. हे बघ
मी माझे धनुष्य खाली ठेवले.बाण ही खाली ठेवले. तुझ्या
हातून मला मरण आल्याने तिन्ही जगात माझी कीर्ती होईल.
आपल्या सुदर्शनचक्राला माझ्यावर सोडून मला मुक्ती संदेश
दे गिरीधर.माझा मान वाढविलास तू." तसा मागून अर्जुन
धावत आला नि वसुदेव कृष्णाला विनंती करत म्हणाला,
    " केशव , हे गिरीधर हे मित्र ,माझ्या सखा आपल्या भक्तावर कृपा कर.मी मान्य करतो की माझ्या कडून चूक
झाली पण त्या चुकीची एवढी मोठी शिक्षा देवू नकोस मला.
मला क्षमा करा.मी चुकलो पुन्हा नाही असं करणार. आपण ह्या युद्धात शस्त्र न उचलण्याची प्रतिज्ञा केली होती म्हणून आपण जर शस्त्र उचलून आपली प्रतिज्ञा मोडली तर मला जगाला तोंड दाखविण्याची जागा राहणार नाही. मी आपल्याला वचन देतो मी कुणासाठीही भावुक होणार नाही.
माझ्यावर विश्वास ठेव." श्रीकृष्णाने अर्जुनच्या दोन्ही दंडाना
पकडून वर उठविले नि गंगापुत्र भीष्मांकडे पाहत वसुदेव
कृष्ण म्हणाले ," आपले धनुष्य उचला गंगापुत्र  भीष्म !"
असे म्हणताच गंगापुत्र भीष्मांनी आपले धनुष्य उचलले.
अर्जुन आणि श्रीकृष्ण पुन्हा रथावर आरूढ झाले. तेव्हा
अर्जुन आपले गांडीव धनुष्य उचलून म्हणाला ," महाकालेश्वर
शपथ आज अजून थोडा सूर्यदेव जर थांबेल तर आजच मी
युध्द समाप्त करून टाकतो." त्यावर वसुदेव कृष्ण म्हणाले,"
   " मला वाटतं पार्थ मी दिलेला उपदेश तू विसरलास. म्हणून पुन्हा एकदा सांगतो तेव्हा नीट ध्यान देऊन ऐक. युध्द मानव कल्यानासाठी केले जाते. परंतु प्रकृतीच्या नियमांचे पालन करायला हवे. सूर्य आपल्या निर्धारित वेळेनुसार त्याचा सूर्योदय पण होईल नि त्याच्या निर्धारित वेळेनुसार  अस्त सुध्दा होईल. युध्द करणे तुझ्या हाती आहे , युद्धाचा परिणाम तुझ्या हाती नाहीये. म्हणून तू फक्त युध्द कर त्याचा परिणाम माझ्यावर सोड. म्हणून सूर्याकडे न पाहता आपल्या धर्माचे पालन कर. युध्द कर."
    " जशी आपली आज्ञा !"  असे म्हणून अर्जुन ने आपल्या
धनुष्यावर बाण चढविला आणि सोडला. पितामहांच्या डाव्या
खाद्याला लागला तर दुसरा उजव्या खांद्याला लागला. दोन्ही
खांदे जखमी झाले. त्यानंतर एका पाठोपाठ एक बाण  अर्जुन ने सोडले नि पितामहांचे सारे धनुष्य त्यांच्यावर प्रत्यंता चढविण्या पूर्वीच धनुष्य तोडून टाकले. तेवढ्यात आचार्य द्रोण यांनी युध्द समाप्तीचा शंक फुंकला. कारण सूर्यदेव अस्ताला गेला होता. तिसऱ्या दिवसाचे युध्द ही संपले. पितामहा आपल्या शिबिरात अंगाला झालेल्या घावांना लेप लावून घेत होते. एवढ्यात दुर्योधन , दु:शासन , गांधार नरेश शकुनि  तेथे आले. गांधार नरेश शकुनि ने म्हटले ," प्रणाम तातश्री ! जखम फार मोठी तर नाहीये ना तातश्री ?"
    "सर्वात मोठी जखम तर आपण पाहिलीच  नाहीत. भरतवंशच्या  ज्या झाडाखाली आपण उभे आहात ना ? ते
झाडच जर राहिलं नाहीतर तर बसणार कुठे आहात आपण ?" असे म्हणून जखमेवर स्नेह लेप लावणाऱ्या वर रागवत म्हणाले," बस्स कर स्नेह लेप लावू नकोस मला. ह्या जखमांचे काही एवढं वाटत नाहीये." असे म्हणून दुर्योधनाला उद्देशून म्हणाले ," अजून ही वेळ आहे ,पांडवांशी मैत्री कर आणि त्यांचे इंद्रप्रस्थ त्याना देऊन टाक."
     " हस्तिनापूर जरी हरलो तरी हरकत नाही.परंतु पांडवांना
सुई च्या टोकाला उभी राहायला जागा लागते ना ,तेवढी जागा पण मी त्याना देणार नाहीये. आणि आता माझी पूर्ण
खात्री पण झाली की आहे पितामहा , आपण ,कृपाचार्य,
आचार्य द्रोण असेपर्यंत मी हे युद्ध जिंकू शकणार नाहीये."
     "  हे चुकीचे बोलतोस आहेस तू  भाच्या , जर हे चार
महापुरुष नसते तर तू हे युध्द कालच्या दिवशी हरला असतास." गांधार नरेश दुर्योधनाच्या चुकीच्या व्यक्तव्यावर
पांघरून घालत म्हणाले. तेव्हा दुर्योधन त्यांच्या वक्तव्याचे
समर्थन करत करत आपले म्हणणे पण त्यांच्या समोर सादर
करत म्हणाला,'  कदाचित तुमचे म्हणणे बरोबर आहे मामाश्री ! परंतु जर ह्या लोकांनी आपल्या मनापासून युध्द
केले असते तर कालच्या दिवशीच आमचा विजय झाला
असता. शिवाय माझ्या कडून युध्द करणाऱ्या सर्व योद्धांना
माहीत आहे की त्यांचा जो प्रधान सेनापती आहे तो
कोणत्याही पांडवांचा वध करणार नाहीये."
    " कोणतेही झाड आपल्याच फांद्यांना तोडून टाकत नाही
पुत्र तू सुध्दा पांडवा पेक्षा मला कमी प्रिय नाहीयेस, आणि असं जर नसतं तर आता  तू जे काही असभ्य भाषेत बोललास ना, ते बोलल्यानंतर तू आतापर्यंत जिवंत राहिला नसतास. तू सुध्दा माझ्या स्नेहाचे कवच घातले आहेस जे प्रिय पांडवांनी घातले आहे. म्हणून माझा कोणताही बाण ते कवच भेदू शकत नाहीये. म्हणून माझ्या कडून दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद घे नि जा  इथून मला विश्राम करू दे, कारण उद्या पण युध्द करायचे आहे." त्यावर दुर्योधन मूळ मुद्द्यावर आला. आणि म्हणाला ," पितामहा मी आपल्याला एक विनंती करू शकतो का ?"
    " अजिबात नाही." पितामहांनी बरोबर ओळखले तो
इथं कशासाठी आलाय ते ? म्हणून लगेच उत्तरले," जोपर्यंत
ह्या सैन्येचा प्रधान सेनापती मी आहे तोपर्यंत अंगराज कर्ण
माझ्या झेंड्या खाली युध्द करू शकणात नाही."
    " पण का करू शकणार नाही त्याचा अपराध तरी काय
तो तर सांगा ना  ?"
    " त्याचा अपराध हा आहे की त्याने माझे गुरू परशुरामांचा
अपमान  केला. त्यांचा एक सुध्दा असा शिष्य नाही की त्याने
असभ्य वर्तन केले असेल पुत्र . परंतु तुझ्या मित्राने भरलेल्या
राज्यसभे मध्ये कुलवधू द्रौपदीचा वेश्या संबोधून  घोर अपमान केला आहे, जो पुरुष कोणत्याही स्त्रीच्या मर्याद्याचे रक्षण  करत नाही तो असभ्य पुरुष माझ्या झेंड्याखाली युध्द  कदापि करू शकणार नाहीये."
    " जर तो अपमान आहे तर तो अपराध आपण सर्वांनी
केला आहे,मी केला, आपण केला आहे." लगेच सारवासारव
करत शकुनि बोलला की,  परंतु भाच्याचे म्हणण्याचा असा
अर्थ नाही तातश्री की ....? " त्यांचे वक्तव्य पूर्ण होण्या अगोदरच गंगापुत्र  भीष्म संतापाने म्हणाले ," गांधार नरेश
आपण कृपा करून मला तातश्री म्हणू नका, कारण ह्या
नात्याना आता काही अर्थ उरलेला नाहीये. परंतु सारखे शब्द
फक्त वडीलधाऱ्या माणसावर दगड मारण्यासाठी कामाला
येतात. दुर्योधन आता जे काय म्हणाला त्याचा तात्पर्य तेच
आहे जो मी निष्कर्ष काढला आहे. आज तुझ्या पक्षात जे मी
युध्द करतोय ना तो त्याच अपराधाचा दंड आहे. म्हणून तुम्ही
लोक आता इथून निघा."
     " परंतु पितामहा आपण.....? दु:शासनाने  मध्येच बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला पुढे बोलू न देता
गंगापुत्र भीष्म उद्गारले ," हेच तर माझं दुर्भाग्य आहे दु:शासन
की तुम्हां लोकांचा मी पितामहा आहे. जर सत्यवती मातेने तुम्हा साऱ्यांना माझ्या पदरात टाकले नसते तर मी कधीच तुम्हां लोकांचा त्याग केला असता. तुमच्या पैकी असा कोणीही  नाहीये की त्याने माझा अपमान केला नसेल. ते पण एकवेळ नाही तर अनेक वेळा केला आहे , पण तरी ही मी माझा सारा अपमान विसरून जगत आहे तो केवळ हस्तिनापूरसाठी बस्स ! तुमच्यापैकी असा कोणी नाहीये की त्यांच्यासाठी म्हातारा माणूस जगण्याची इच्छा करील. जर तुझा माझ्या निष्ठेवर विश्वास नसेल तर दुसऱ्या कोणालाही तू आपला प्रधान सेनापती  बनवू शकतोस."
    " मी दुसऱ्या कोणालाही सेनापती बनविण्याची अर्थ हा
आहे की आपण पांडवांच्या बाजूने युध्द करणार ,आणि
मुळात मला तेच नकोय. म्हणून भले आपली निष्ठा , आपला
विश्वास , आपली आंतर्रात्मा पांडवांचा बाजूने राहू दे , परंतु
आपल्याला युध्द माझ्याच बाजूने करावे लागणार , " असे
म्हणून दोन्ही हात जोडून उद्गारला ," प्रणाम ! " हूं sss "
असे म्हणून तो तेथून चालता झाला. त्याच्या पाठोपाठ
गांधार नरेश शकुनि दोन्ही हात जोडून तातश्री म्हणायला
मनाई केलेली असतानाही तो तातश्री म्हणाला नि तेथून
चालता झाला. त्यानंतर दु:शासन दोन्ही हात जोडून म्हणाला,
   " प्रणाम पितामहा !" असे म्हणून तोही तेथून निघून गेला.
तसा मघाचाच  सेवक स्नेह लेप घेऊन आला तेव्हा गंगापुत्र
भीष्मांनी त्याला मनाई केली. तेव्हा तो म्हणाला ,' परंतु ही जख्यम .....?" तेव्हा गंगापुत्र भीष्म म्हणाले," आता आपण
सुद्धा माझ्या आज्ञाचे पालन करणार नाहीये का ? ह्या जखमा
तर स्वतःच आपोआपच भरले जातात. परंतु हृदयाला झालेली जखम कशी भरणार ? असे म्हणून आपल्या
अंथरुणावर पहुडले.

   चौथ्या दिवसापासून मात्र अंधार वाढायला सुरुवात झाली.
त्या दिवसापासून कलेकलेने क्षय पावणाऱ्या चंद्रासारखी
कौरव सेना निष्प्रभ होऊ लागली. तो दिवस भीमाचा होता. खवळलेल्या भीमाने महासागरासारखी आपली विशाल काया फुलवीत सिंहनांद करताच हत्तीच्या अंगावरील केशसुध्दा ताठ उभे राहिले !  वृषपर्व्याकडून मिळालेली आपली गदा पेलत तो गजदलात धुमाकूळ घालून कुरूंचे हत्ती कुरुंवरच उलटवून लावीत होता. वर्षाऋतूतील पाणलोटासारखा  अवतीभवतीच्या सैन्याचे तट ढासळीत होता 'तो भीम नाही,
यम आहे,असे म्हणत कौरव सैन्या सैरावैरा पळत होती.भीम आपल्या गदेने त्याना यमसदनास पाठवत होता. तेवढ्यात
त्याला दुर्योधनाचे बंधू दिसले. तसा भीम त्याना उद्देशून म्हणाला ," या माझ्या अनुज बंधूंनो खरे सांगायचे तर मी
दुर्योधन आणि दु:शासन या दोघांना शोधत होतो.पण काही
काही हरकत नाही. ते दोघे नाहीत भेटलेत. पण तुम्ही भेटलात ना ? तुमचे ही स्वागतच आहे. आणि आता देवाचे
स्मरण करा, कारण तुमचा अंत आता जवळ आला आहे."
असे म्हणून भीम दुर्योधनाच्या बंधूं वर तुटून पडला. मग एक नाही हा हा म्हणता त्याच्या दहा बंधूंना भीमाने यम सदनास पाठविले. त्यात मुख्यता शक्रदेव ,केतूमान , सत्य, सत्यदेव , सेनापती , भानुमान, जलसंघ , उग्र ,वीरबाहू , दुर्लोचंन , या दुर्योधन बंधूंना , विदीर्ण केलं. उपाशी व्याघ्रासारखे , पलित्या प्रमाणं असलेलं रक्तवर्णी नेत्र गरगर फिरवीत झंझावातासारखा  तो चतुरंगदलात अविरोध भ्रमण करून सापडेल त्याला आव्हान देवून आपल्या गदेच्या प्रहार ने त्यांचा बलदंडाना छीन्नविच्छिन्न  करून टाकत होता. आज त्याच्या अंगात अद्भुत शक्ती संचारल्या सारखी वाटत होती. यम भासत होता जणू !" संजय ने जसे हे वर्णन केले. तसे
महाराज धृतराष्ट्र संजय वर भडकले. ते म्हणाले ," हे संजय
तुला केवळ माझ्या पुत्रांची हार होताना दिसतेय काय ? माझे
पुत्र युध्द कला विसरले आहेत असे म्हणायचे आहे का तुला ? " त्यावर संजय म्हणाला ," महाराज मी असं काहीच
म्हणत नाहीये. कुरुक्षेत्रावर जे आता घडत आहे त्याचेच मी
वर्णन करून सांगत आहे तुम्हांला." त्यावर महाराज धृतराष्ट्र
म्हणाले ,"  हो मान्य आहे, परंतु कधीतरी शुभ वार्ता दे मला.
नेहमी अशुभ वार्ता ऐकवितोस."
    " पण महाराज शुभवार्ता असेल तर ऐकवीण ना ?"
    " हूं बरोबर आहे तुझं. मीच मूर्खांसारखा बोलतोय. बरं
संजय मी जरा गांधारी ला भेटून येतो मग पुढील वृतांत सांग." असे म्हणून ते उठून एकटेच गांधारीच्या कक्षेत जायला
निघाले. गांधारी च्या कक्षेत पाऊल टाकताच गांधारी च्या
कानांनी कानोसा घेतला नि बरोबर ओळखले नि उद्गारली,
    " आर्यपूत्र आपण."
    " हां प्रिये मी !"
    " कसं येणं केलंत ? काही युध्द भिमीवरील शुभवार्ता
आणलीय काय ?"
    " वार्ताच घेऊन आलोय.परंतु शुभ नाहीये."
    " मग ?"
    " आज कुरुक्षेत्रावर आपले दहा पुत्र वीरगती ला प्राप्त झाले."
    " काय सांगता का महाराज ! दहा पुत्र ..?"
    " हां प्रिये !"
    " शेवटी माझं स्वप्न खरं झालं तर !"
    " स्वप्न .. ?"
    "  हां स्वप्न ! आज रात्री मी एक स्वप्न पाहिले होते. त्या
स्वप्नात मी एका जंगलात एकटीच उभी होते.नि माझ्या
आजूबाजूला हिरवेगार वृक्ष पडलेले होते. तेवढ्यात तुम्ही
तेथे आले. मी तुम्हाला विचारले की हे वृक्ष कोणी तोडले.
तुम्ही म्हणाल मी तोडले. मी म्हटलं किती आहेत ? तुम्ही
म्हणालात शंभर आहेत. आणि थोड्याच वेळात त्या वृक्षांचे
रूपांतर माझ्या पुत्रा मध्ये झाले. "
     " तुला काय म्हणायचे तुझ्या पुत्रांना मी मारले ?"
     "  मी असं म्हटलं का ? मी माझं फक्त स्वप्न सांगितले.
आणि ते खरे ही झाले."
     " एका अर्थी तुझं म्हणणं बरोबर आहे म्हणा.माझी
उच्चकांक्षाच माझ्या पुत्रांच्या मृत्यूचे कारण बनली. "
     " असं नका हो बोलू ! जे भाग्यलिखितात लिहिलं असतं
तेच घडतं. आपण फक्त निमित्त मात्र असतो. " असे म्हणत
असतानाच त्याना रडू कोसळले. तेव्हा दोघेही एकमेकांचे
सांत्वन करू लागले होते.

क्रमशः






  
  



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाभारत १३४ | Mahabharat part 134 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३३ | Mahabharat part 133 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३५ | Mahabharat part 135 | Author : Mahendranath prabhu.