महाभारत १११ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाभारत १११ |
महाभारत १११
सुशर्माला वचन देऊन दोघेही बंधू तेथून निघाले. आपल्या
घोड्यावर विराजमान होताच दु:शासनाने विचारले ," दादा तू
सुशर्माला असं का वचन दिलेस "
" अरे दु:शासन वचन पळायला आपण काय पितामहा
आहोत काय ? आणि आपण वचन पाळतोय की नाही हे पाहायला सुशर्मा जिवंत राहणार आहे काय ? आज त्याचा प्रतिद्वंद्वी अर्जुन आहे, तेव्हा अर्जुन त्याला जिवंत सोडणार आहे काय ? मग कशाला चिंता करतोस. ही खुश खबर आपण पितामहा देवू !" त्यावर दु:,शासन उद्गारला ," पण दादा
ही खुश खबर ऐकून पितामहा खुश होणार नाहीत."
" माहितेय ते मला, म्हणूनच जायचंय." आणि थोड्याच
वेळात ते पितामहांच्या येथे पोहोचला. घोड्यावरून खाली
उतरून त्यांच्या पाशी येऊन दोघांनीही पितामहांना प्रणाम
केला. पितामहांनी त्या दोघांना आयुष्यमान भव ! चा आशीर्वाद दिला. त्यानंतर त्यांनी विचारले ," आज युद्धाचा
काय बातमी ?" त्यावर दुर्योधन उद्गारला ," आज काही खास
नाही घडलं फक्त युध्द झाले. परंतु उद्या साठी मात्र एक खास
बातमी आहे." त्यावर त्यांनी विचारले ," अशी काय खास
बातमी आहे ?" दुर्योधन म्हणाला ," उद्या गुरुदेव चक्रव्यूहाची
रचना करत आहेत."
" त्यात काय विशेष आहे ,वसुदेव कृष्ण आणि अर्जुन दोघेही चक्रव्यूहाचा भेद करणे माहीत आहे त्याना."
" हां परंतु त्या दोघांनाही उद्या दूर पाठविण्याचा मी बंदोबस्त केला आहे आणि ते दोघे परतून येइपर्यंत गुरुदेव
युधिष्ठीरला बंदी बनवून आमच्या स्वाधीन करतील. मग
युध्द समाप्त झालेच समजा."
" हे ईश्वर ह्याला बुद्धी दे रे बाबा !"
" याचा अर्थ असाच झाला ना, की आपण माझा विजय
पाहू इच्छित नाही."
" ना मी तुझा पराजय आणि ना मी युधिष्ठीर चा विजय
पाहू इच्छित आहे, मला फक्त हस्तिनापूरची चिंता आहे. फक्त
हस्तिनापूरची !" तेव्हा दुर्योधन म्हणाला ," चल दु:शासन."
त्यानंतर दोघेही तेथून निघाले. त्याचवेळी हस्तिनापूर मध्ये
विदुर आपल्या भवन मध्ये बसला होता. तेवढ्यात द्वारपाल
ने येऊन खबर दिली की आपल्याकडे महाराज येत आहेत.
विदुर लगबगीने उठून उभा राहिला नि पट्कन पुढे होऊन
महाराज धृतराष्ट्राचा हात पकडून त्यांना आसन जवळ आणले नि आसनावर बसायला सांगितले. त्यानंतर त्यांनी आपल्याकडे येण्याचे कारण विचारले. तेव्हा महाराज धृतराष्ट्र म्हणाले ," मी बोलवून तू आला नसतास म्हणून मी स्वतःच तुझ्याकडे आलो." त्यावर विदुर म्हणाला ," जेष्ठ बंधू या नात्याने जर आपण बोलविले असते तर मी आलोही असतो."
" आणि नरेश म्हणून बोलविले असते तर ?"
" त्याचे कारण आपल्याला ठाऊक आहे, मी कदापि आलो नसतो. हस्तिनापूर नरेशी आता माझा काहीही संबंध
राहिलेला नाहीये." तेवढ्यात विदूरची पत्नी सुलभा तेथे आली नि महाराजांचे चरणस्पर्श करत म्हणाली ," प्रणाम जेष्टश्री !"
" सौभाग्यवती भव ! विदुर वधू आता हा आशीर्वाद मागणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.
अगोदर भरपूर साऱ्या पुत्र वधू होत्या. परंतु आता काही विधवा आहेत. आता असं वाटतंय काही दिवसानंतर एक
सुद्धा सुहासनी राहणार नाहीये." तेव्हा विदुर म्हणाले ," मी
काही बोलू का ?"
" नको. तू अजिबात बोलू नको. मला माहितेय तू काय
बोलशील ते.परंतु हे क्षेत्र नितीज्ञान बोलण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी नाहीये. इथं मी जे आलोय ते दुःख वाटण्यासाठी ! माझे पुत्र वीरगती प्राप्त होत आहेत, ज्यांना
कधी मी माझ्या ह्या डोळ्यांनी पाहिलं देखील नाही.परंतु माझ्या डोळ्यातून अश्रू धारा मात्र वाहत आहेत. माझ्या मुलांसाठी तुझ्या डोळ्यात अश्रू आले होते का विदुर ?"
" भरपूर अश्रू आले. परंतु त्या अश्रू पेक्षा मला आपला
भयंकर राग आला होता. जर आपण माझे ऐकले असते तर
आज ते सर्व पुत्र जिवंत असणार होते. परंतु आपण पुत्रा पेक्षा सिंहासनाला अधिक महत्व दिले."
" हे आपण काय बोलत आहात ?" सुलभा मध्येच म्हणाली. तेव्हा महाराज धृतराष्ट्र म्हणाले ," त्याला रोखू नकोस बोलू दे त्याला. त्याचे हे कडवे बोल तर ऐकायला
आलोय मी इथं. बोल विदुर बोल तू बोल." पण विदुर काही
बोलतच नाही तेव्हा त्यांनी विचारले ," बरं सोड. मला हे सांग
दुर्योधन आणि दु:शासन सुध्दा वीरगतीला प्राप्त झाल्यानंतर
तरी शोक प्रकट करायला माझ्या कडे येणार की नाही ?"
" भ्राताश्री माझं हृदय आपल्यासाठी फार तुटतं.परंतु मी
काय करू शकतो ? आपण माझं काही ऐकायला तयार नाहीये. ऐकलं असतात तर असं घडलं नसतं. परंतु अजूनही
वेळ गेलेली नाही. जे मृत्युमुखी पडले त्यांच्या बद्दल फक्त
शोकच प्रकट करू शकतो. परंतु जे जीवित आहेत त्यांचे
जीवन तर आपण वाचवूच शकतो , म्हणून मी काय म्हणतोय
आपण संजयला सोबत घेऊन रणभूमीवर चला. मीही येईन
तुमच्या पाठोपाठ. वसुदेवाला आपण विनंती करून युध्द
थांबवू शकता. फक्त वसुदेवच या युद्धाला थांबवू शकतात."
" नाही विदुर नाही. मी खूप पुढे आलोय आता इथून परतणे शक्य नाहीये आणि समज मी तसा प्रयत्न केलाच
तर माझा प्रिय दुर्योधन आत्महत्या करील म्हणून आता
युध्द थांबविणे शक्य नाहीये."
" दुर्योधन ने तर कधीच आत्महत्या केली आहे महाराज.
फक्त आपल्याला ती दिसत नाहीये." त्यानंतर महाराज
धृतराष्ट्र तेथून निघाले. कारण उद्या पुन्हा युध्द आरंभ होणार
ते ऐकणे पण तर जरुरी होते ना ?
सूर्योदय होताच शंक फुंकले गेले नि युद्धाला सुरुवात झाली. आधीच ठरलेल्या रणनीती नुसार गरुड व्यूह रचला
गेला. मग सेनापती धृष्टद्युम्न ने अर्जुनशी विचारविनिमय
करून श्येन पक्ष्याकृती व्यूह ची रचना केली. कालच्या प्रमाणे
आज देखील त्रिगर्त नरेश सुशर्मा ने अर्जुन ला आव्हान दिले.
अर्जुनला नाईलाजाने त्याच्याशी सामना करणे भाग होते.
परंतु सुशर्मा कालच्या प्रमाणे अर्जुन शी युध्द करत नव्हता
पलायन करत होता नि अर्जुन त्याची पाठलाग सोडत दोघेही
वीर लढत लढत फार दूरवर गेले. तेव्हा दुर्योधन आचार्य
द्रोणाचार्यांना म्हणाला ," गुरुदेव , अर्जुनचा आता ध्वज पण दिसत नाही .आता वाट कोणाची पाहताय ? "
" हां भाच्या अर्जुनला सुशर्मा अर्जुनला आपल्या मागे लावून फार दूरवर गेला आहे यात बिल्कुल संशय नाहीये."
" पण हे कळत नाहीये की महावीर सुशर्मा डरपोका सारखा
युध्द करायचे सोडून पळतोय कशासाठी ?"
" तो असं का करतोय हे तुला नाही कळणार अंगराज कर्ण ?" सिंधू नरेश जयंद्रथ व्यंग बाण कर्णावर चालविला.
कर्णाला त्याचा राग आला परंतु दुर्योधन ने त्याची समजूत
काढत म्हटले ," जाऊ दे मित्र सिंधू नरेश आमचा मेहुणा आहे." त्यावर कर्ण काही न बोलता गप्प बसला.
" अजून थोडा दूर जाऊन दे ,कारण अर्जुनला अजिबात
कळताकामा नये की मी चक्रव्यूहाची रचना केली आहे.?"
" मला हे कळत नाहीये की आपण सारे दुर्योधन ला इतके
का घाबरताय ?" कर्ण उद्गारला.
" मी घाबरत नाहीये अंगराज परंतु अर्जुनला थोडीशी
जरी चाहूल लागली की मी इथं चक्रव्यूहाची रचना केली आहे
तर तो ताबडतोब परत येईल."
त्याच रात्रीच्या गुप्तहेरला जिथे बांधून ठेवले होते. काही
पाहेकरी आपसात बोलत असतात की ,काही म्हण परंतु
पांडू पुत्रा सोबत मोठा अन्याय केला जातोय. परंतु आपण
काही करू शकतोय आपण आहोत तर साधारण सैनिक
यंत्रा सारखे चालत राहायचे. जेव्हा बंद पडेल तेव्हा गप्प
राहायचे." त्या पाहेकऱ्यांचे आपल्या कडे लक्ष नाही हे पाहून
गुप्तहेरने कशीतरी स्वतःची सुटका करून घेतली नि
तेथून पळ काढला. परंतु त्याचा पाठलाग सुरू झाला. त्याला
कोणाचा तरी बाण लागला. परंतु तरी सुद्धा महाराज युधिष्ठीर
जिथे उभे होते तेथे पोहोचला. परंतु त्याच्या कडे कोणाचे
लक्ष गेले नाही. महाराज - महाराज असे मोठ्या ने ओरडून
शेवटी खाली कोसळला. तेव्हा त्याच्या कडे युधिष्ठीर आणि
भिमाचे लक्ष पडले. ते दोघेही भाऊ रथातून खाली उतरले
नि त्या गुप्तहेर जवळ गेले नि युधिष्ठीर त्याला विचारले ,की काय खबर आणली होतीस ? " तेव्हा तो गुप्तहेर अडखळत
कसातरी म्हणाला ," चक्रव्युह...बस्स एवढंच तो बोलू शकला
नि त्याने आपला प्राण सोडला. तेव्हा भीम म्हणाला, " मला
वाटलंच होते, सुशर्मा जो पलायन करतोय ते उगाच नाहीये.
ही गुरुदेवांची चाल आहे, परंतु अर्जुन ने माझे एक नाही ऐकले." तेव्हा युधिष्ठीर म्हणाला ," परंतु चक्रव्यूहाचे भेदन
कसे करायचे या बद्दल आम्हाला कोणालाच माहीत नाहीये."
" फक्त छोट्या दादाला माहीत होते. परंतु त्याला सुशर्मा
दूर घेऊन गेला." सहदेव उत्तरला. तेव्हा अभिमन्यू पुढे येऊन
म्हणाला ," तातश्री जर आपली आज्ञा असेल तर मी काही
निवेदन करू."
" बोल काय निवेदन करू इच्छितोस ?"
" आपण चक्रव्यूहा बद्दल चिंतीत आहात ना ?"
" होय."
" पिताश्री नाहीत म्हणून आपण चिंता करू नका. त्यांचा
पुत्र अभिमन्यू इथं आहे ना ?"
" तुला काय सांगायचं आहे नेमके ?"
" मला चक्रव्यूहा मध्ये प्रवेश करता येतो परंतु ....?"
" परंतु काय पुत्र ?"
" मला त्यातून बाहेर पडायचा मार्ग माहीत नाही."
" काही हरकत नाही, आम्ही सारे तुझ्या पाठोपाठच असू
जो तू द्वार खोलशील त्याला आम्ही बंद होऊ देणार नाहीये."
इकडे ही चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे दुर्योधन आचार्य
द्रोण ला उद्देशून म्हणाला ," गुरुदेव, आता आपण कुणाची
वाट पाहताय ? सूर्यास्त होण्याची तर वाट पाहत नाहीये ना ?" त्यावर आचार्य द्रोणाचार्यांनी युध्द आरंभ होण्याचा शंक
वाजविला. तसा युधिष्ठीर म्हणाला ," हा तर गुरुदेवांच्या शंकाचा आवाज आहे अर्थात युध्दाला आरंभ झाला. जा पुत्र
जा आम्ही आहोतच तुझ्या मागोमाग. अभिमन्यू ने त्याना
वंदन केले नि आपला रथ चक्रव्यूहाच्या निरीक्षण केले.की
कुठून आंत प्रवेश करता येईल ? आणि त्याने योग्य ठिकाणी
बाणांचा वर्षाव करून मार्ग मोकळा केला नि चक्रव्यूहाच्या आंत शिरला. परंतु त्याच्या पाठोपाठ चक्रव्यूहात प्रवेश करू
पाहणाऱ्या पांडवांना सिंधू नरेश जयंद्रथ ने बाहेरच रोखले.
आज त्याला महादेवाने दिलेले वरदान त्याच्या उपयोगी पडला. बाहू स्फुरण पावलेला ,फुललेला , स्वतःला विसरलेला वीरश्रीमत्त अभिमन्यू मागे वळून न पाहता
चक्रव्यूहाच्या केंद्रबिंदू कडे बनासारखा चालला ! हजारों रथी,
गजाती, अश्वासाद, यांना कंठस्नान घालीत तो एकटाच सात
मंडलं भेदून केंद्रस्थानाच्या आठव्या मंडलातही घुसला ! त्याच्या अवतीभवती नुसते लक्ष लक्ष कुरुसैनिक होते. तरीही
एकाकी लढत त्याने शत्रूंजय , तक्षक , सत्यश्रवन , चंद्रकेतू , जयत्सेन आणि मेघवेन या सारखे अतिरथी धडाधड धर्तीवर
कोसळविले !!!
संध्याकाळ चा प्रहार आला तरी अभिमन्यू काही हटत
नाही हे पाहून बारा दिवसांत कधी लागला नाही असा घोर
काळिमा युद्धाला लागला. केंद्रस्थानी पोहोचल्यावर जिथे कौरव सैन्याचे मुख्य महारथी उपस्थित होते. सर्वात प्रथम त्याने सावधान आचार्य म्हणून आचार्य द्रोणाचार्यांशी युध्द केलं. द्रोणाचार्यांना त्याने घायाळ करून सोडले. त्यानंतर कृपाचार्यांशी युध्द केले. त्याना ही घायाळ करून सोडले.
त्यानंतर मद्र नरेश शल्य , अंगराज कर्ण , अश्वत्थामा, दु:शासन, दुर्योधन , कृतवर्मा, अश्या सर्व महारथी ना त्याने
परास्त केले. तेव्हा दुर्योधन चिडून सर्वाना उद्देशून म्हणाला ," या बालकाचा मला मृत्यू पाहिजे. " युध्दाचे सर्व नियम तोडून एकदम सर्व महारथी नि एकट्या सुभद्रा नंदन वर आक्रमण
केले. तरी सुद्धा न डगमगता सर्वांशी युध्द केले.परंतु घायाळ
झाला. तेव्हा तो सर्वाना उद्देशून म्हणाला ," हे आचार्य मी
आपल्या प्रिय शिष्य अर्जुन चा पुत्र अभिमन्यू आहे, मी आपल्याला हे विचारू इच्छितोय की आपण युद्धाचे सर्व
नियम विसरलात काय ? जे स्वतः आपल्याच प्रधान सेनापती ने बनविले होते. त्या नियमात हा नियम नव्हता का ? एका
योध्या सोबत एकच योध्दा युध्द करेल म्हणून." त्यावर
दुर्योधन म्हणाला ," युध्द कर , कारण आज तुझा मृत्यू निश्चितच आहे, कारण बाहेर जाण्याचे सर्व मार्ग आम्ही बंद
केले आहेत." त्यावर अभिमन्यू म्हणाला ," जे वीर असतात
ते पलायन करण्याचा मार्ग शोधत नाहीत काकाश्री ! मी
तुम्हा साऱ्यांशी युध्द अवश्य करेन ." असे म्हणून पुन्हा सर्वांशी एकटाच युध्द करत होता. सर्वांच्या बाणांचा सडेतोड
उत्तर देत होता. त्याचा पराक्रम खरंच बघण्यासारखा होता.
अभिमन्यू म्हणाला ," मी श्री वसुदेवांचा शिष्य अभिमन्यू
आहे , मी साऱ्याना आवाहन करतोय की माझ्याशी द्वंद्वयुध्द
करा मी एकटा असलो तरी मागे हटणार नाही. मला फक्त
उद्याच्या इतिहासाला हेच दाखवून द्यायचे होते की तुम्हां
लोकांची ओळख भ्याडा मध्ये होऊ नये. कारण तुम्हां लोकांपैकी कुणी माझ्या पित्या चा गुरू आहे, तर कुणी गुरूबंधु आहे, तर कोणी भाऊ आहे , पण हरकत नाही.
मी सर्वांशी सामना करतोय की नाही ते पहा. " असे म्हणून
पुन्हा युद्धाला सुरुवात झाली. घमासान युध्द झालं. पण
शेवटी अनेक बाण त्याला लागले. तरी युध्द करतच राहिला.
शेवटी कर्णाने बाण मारून त्याचे रथाचे चाक तोडले. तसा
अभिमन्यू धर्तीवर कोसळला. पण तरी देखील उठून त्याने
तलवार उचलली. आचार्य द्रोणाचार्यांनी बाण मारून तलवार
हातातील पाडली. शेवटी त्याने आपल्या रथाचे चाक उचलले. तेव्हा ते सहा महावीर आपल्या रथातून खाली
उतरले नि एकदम अभिमन्यू वर हल्ला केला. परंतु अजिबात
विचलित न होता त्याने त्या सर्वांना मागे हटविले. परंतु एकाने
तलवार त्याच्या पोटात घुसविली.त्यानंतर एका पाठोपाठ
सर्वांनी आपापल्या तलवारी त्याच्या पोटात घुसविल्या.
तेव्हा तो वीर रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळला. तेव्हा
त्याने आचार्य द्रोणाचार्यांना प्रश्न केला ," हे आचार्य , एका
निःशस्त्र योधावर एकदम आक्रमण करणे हीच आपली
युध्द नीती आहे का ? मला दुःख एकाच गोष्टीचे वाटते म्हणजे
मला वीरगती प्राप्त कायर योध्दांकडून झाली. तुम्ही सारे
योद्धे नाहीत कायर आहेत कायर !" असे म्हणून मोठ्या ने
पिताश्री म्हणून ओरडला नि म्हणाला ," सूर्यास्तच्या नंतर या
धरतीला येऊन विचारा की तुमचा पुत्र कसा लढला." असे
म्हणून त्याने आपला प्राण सोडला. परंतु खरोखरच मृत
झाला की नाही हे जाणून घेण्यासाठी जयंद्रथ दैत्यासारखा
पुढे आला नि त्याने अभिमन्यूला लाथ मारली.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा