महाभारत ११० | मराठी स्टोरी, मराठी शॉट स्टोरी, मराठी कथा | महेंद्रनाथ प्रभु.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाभारत ११० |
महाभारत ११०
आचार्य द्रोणाचार्यांच्या शिबिरात दुर्योधन , दु:शासन , कर्ण,
आणि शकुनिमामा त्याना भेटायला आले होते.परंतु आचार्य
द्रोण आपल्या शिबिरात नव्हते.थोड्या वेळ वाट पाहिली पण
त्यांच्या येण्याची चिन्हे काही दिसत नव्हती.तेव्हा नाईलाजाने
दुर्योधनाने द्वारपालला हांक मारली.तसा द्वारपाल अदबीने
समोर येऊन उभा रहात म्हणाला," आज्ञा युवराज !"
" आचार्य द्रोण कुठं जातो ते सांगून गेले काय ?"
" नाही युवराज." द्वारपाल उद्गारला.
" सांगून गेले असते तर त्याने अगोदरच सांगितले नसते का मित्र ?"
" पण गेलेत तरी कुठं ?" दुर्योधनाने उद्गारला.
" अजून कुठं जाणार ? गेले असतील आपल्या प्रिय शिष्यांना सांगायला की उद्या जे ते व्यूह रचतील त्याची तोड
काय आहे ?" त्यांच्या या वक्तव्याने आणखीन कुणाला राग
आला नसला तरी कर्णाला त्यांचा राग अवश्य आला. परंतु
अजून काय बोलताहेत हे ऐकून घेण्यासाठी गप्प राहिला.
दुर्योधन आणि दु:शासन हे दोघेही मामाच्या व्यक्तव्यावर विचार करू लागले होते. खरंच असे असेल का वगैरे ? परंतु
गांधार नरेश तेवढेच बोलून थांबले नाहीत.ते पुढे म्हणाले,
" तुम्ही माझ्याकडे असे काय पाहताय ? मी बोलतोय
ते खोटं वाटतं का तुम्हांला ? जर गंगापुत्र भीष्म स्वतःला
रणभूमीवरुन हटविण्याचा उपाय सांगू शकतात तर आचार्य
द्रोण का नाही सांगू शकणार ? दोन्ही महापुरुष तर एकाच
निष्ठतेने बांधलेले आहेत.आणि त्याची निष्ठा विश्वासपूर्ण
नाहीये." आता मात्र सहन करण्या पलिकडचे शकुनिमामा
बोलून गेले होते.परंतु कर्ण मुकाट्याने ऐकून घेणाऱ्या पैकी
नव्हता. तो संतापाने म्हणाले ," महारथी गांधार नरेश, बोलताना कधी पण विचार पूर्वक बोलावे.आपण कुणा संबंधी बोलताय याचेही भान ठेवावे माणसाने. तुम्ही अश्या महापुरुषा बद्दल बोलताय ते खरोखरच निष्ठावंत आहेत. गंगापुत्र भीष्म आचार्य द्रोण हे असे महापुरुष आहेत की त्यांच्या निष्ठांवर अजिबात संशय घेतला जाऊ शकत नाही. जर त्यांनी मनात आणले असते तर ते त्यांच्या बाजूने पण युध्द करू शकले असते. परंतु त्यांनी असं नाही केले. मित्र दुर्योधनाचे सौभाग्य आहे की गंगापुत्र भीष्म दुर्योधनाच्या पक्षातून लढले नि आता आचार्य द्रोण दुर्योधनाच्या पक्षातून लढणार आहेत. त्यांच्या बद्दल माझं मन आज पण नाराज जरूर आहे. परंतु तरी ही विश्वासघाताचा आरोप मी त्यांच्यावर लावू शकत नाही. माझं सौभाग्य आहे की मी त्यांच्या झेंड्याखाली युध्द करू शकणार आहे. आणि गंगापुत्र भीष्मांच्या झेंड्याखाली मी युध्द करू शकलो नाही , हे माझं मी दुर्भाग्य समजतो. म्हणून मामाश्री पितामहां आणि आचार्य द्रोणाचार्यां सारख्या महापुरुषांचे नाव घेताना आदर सहित घ्या."
" मी ज्यांचा आदर करीत नाही ना , त्यांचे नाव सुध्दा
आदराने घेत नाही अंगराज कर्ण . माझ्या गांधार मध्ये
आदर एवढा स्वस्थ नाहीये की जे कोणालाही वाटत फिरू !
मानलं की आचार्य द्रोण महान योध्दा आहेत परंतु तुम्हां
लोकां सारखे निष्ठावान नाहीयेत."
" परंतु मामाश्री ...." दु:शासन मध्येच बोलण्याचा प्रयत्न
केला. परंतु अंगराज कर्णाने मध्येच बोलून हस्तक्षेप करत
म्हंटल ," ह्यांना रोखू नकोस दु:शासन बोलू दे त्याना." क्षणभर
कोणीच काही बोलले नाही. क्षणभर वेळाने अंगराज कर्ण
उद्गारला ," मामाश्री मी निष्ठावंत नाहीये तर मी ऋणी आहे.
दुर्योधनाचा ऋणी आहे मी ! आणि हे ऋण उतरल्या नंतरच
मी निष्ठावान असल्याचे सिध्द करू शकतो. ऋण आणि निष्ठा
या मध्ये बरेच अंतर असते मामाश्री ! परंतु आचार्य द्रोण
आणि गंगापुत्र भीष्म मोठे निष्ठावाण होते. नाहीतर गंगापुत्र
भीष्मांना हे सांगण्याची काही गरज नव्हती की मी पांडवांचा
वध करणार नाही म्हणून. असे स्पष्ट आणि सत्य बोलणारे
लोक कधीही आदरणीय असतात मामाश्री ! परंतु ते तुम्हांला
नाही कळणार म्हणा , ज्यांनी पूर्ण आयुष्यात कपट शिवाय दुसरे काही केलेच नाही त्याना काय कळणार निष्ठा कशाला म्हणतात ते." कर्ण उद्गारला.
" अंगराज कर्ण ! तू माझा अपमान करत आहेस."
" त्याबद्दल क्षमा मागतो मी तुमची मामाश्री ! परंतु जे
निष्ठावाण पुरुष असताना ना, त्यांच्या कडून चुकून जरी
अघटित कार्य घडलं तरी ते आपल्या सीमेचे उल्लंघन मात्र
करत नाहीत."
" परंतु मित्र तू हे काय म्हणालास की तू माझा फक्त ऋणी आहेस. मग जा मी तुला आज माझ्या ऋणातून मुक्त करत
आहे. मी आजपर्यंत हेच समजत होतो की तू माझा फक्त
मित्र आहेस आणि फक्त तुलाच मी निष्ठावान समजत होतो.
परंतु आज तू स्वतःच माझा भ्रम दूर केलास. तू माझा मित्र
नाहीस फक्त ऋणी आहेस."
" ऋण चुकविल्या शिवाय मी निष्ठावान आहे हे कसे सिध्द
करणार मित्र ? जे ऋणी असतात ना ते आपली निष्ठा दोरीला
बांधून ठेवतात. जोपर्यंत ऋण उतारत नाहीत तोपर्यंत ते
आपली निष्ठा सिद्ध करू शकत नाहीत. मी जेव्हा तुझे ऋण
उतारीन तेव्हा तू मला प्रश्न कर."
" तुला एकदा सांगितले ना , की मी तुला माझ्या ऋणातून
मुक्त केलं म्हणून."
" मित्र एक गोष्ट लक्षात ठेव. मी दान घेत नाही दान देतो.
मी देवाधिकाना सुद्धा दान दिलं आहे. मी तुझं ऋण जर फेडले नाही तर मी तुझ्या कडून दान घेतल्या सारखे होईल. आणि हे मला कदापि मान्य नाहीये. जर तुला माझ्या निष्ठेवर शंका असेल तर ही घे कट्यार नि उतार माझ्या छातीमध्ये." असे म्हणून कट्यार उगारतो. लगेच दुर्योधन त्याचा हात पकडत म्हणाला ," माफ कर मित्रा ! चुकलो मी !"
" मित्रांच्या मध्ये माफ़ीला स्थान नाहीये मित्र !"
तेवढ्यात आचार्य द्रोण प्रवेश करतात. तसा दु:शासनाने
लगेच विचारले ," आचार्य आपण कोठे होते इतक्या वेळ ?"
" आम्ही इथं किती चिंतेत पडलो होतो आचार्य !"
" मी गंगापुत्र भीष्मांना भेटायला गेलो होतो." क्षणभर
कोणीच काही बोलले नाही. क्षणभर वेळाने आचार्य द्रोण
म्हणाले ," अर्जुनच्या उपस्थित मध्ये युधिष्ठीरला बंदी बनविणे
अशक्यच आहे."
" अर्जुनला माझ्यावर सोपवा."
" मी सुध्दा परशुराम शिष्य आहे नि गंगापुत्र भीष्म सुध्दा
परशुराम शिष्य होते. मी तुझ्या वीरतावर शंका करत नाहीये.
परंतु तरी सुध्दा अर्जुन ...अर्जुन आहे. विराट युद्धात तू सुध्दा त्याचा स्वाद घेतला आहेस."
" मग तर आपण सर्वांनी आत्मसमर्पण करायला हवं आचार्य !"
" अंगराज कर्णाचे वक्तव्य विचारनिय आहे." शकुनिमामा
उद्गारले. तसे आचार्य द्रोण संतापाने उद्गारले , " गांधार नरेश !"
तसे दुर्योधनाने मध्येच बोलून त्यांच्या वक्तव्याला विराम
घातला. दुर्योधन म्हणाले," एक गोष्ट द्यानात ठेवा , की तुम्ही
सर्वजण माझ्या साठी युध्द करत आहात.तेव्हा आपसात
वाद-विवाद न करता आलेल्या अडचणीला मात कशी करता
येईल या बद्दल विचार करा, आणि खरे सांगायचे तर मला
गुरुदेवांचे म्हणणे एकदम बरोबर वाटते . अर्जुन जोपर्यंत
युधिष्ठीर पासून दूर जात नाही तोपर्यंत युधिष्ठीर बंदी बनविणे
अशक्यच आहे, म्हणून माझा विचार आहे...".त्याने कर्णा कडे
पाहिले. तसा कर्ण म्हणाला ," हे काम तू मला सांगू नकोस.
कारण अर्जुन शी युध्द करताना मी पळण्याचे नाटक कदापि
करू शकत नाही. तेव्हा तू दुसरा कोणी तरी बघ."
तेव्हा दुर्योधन किंचित विचारमग्न झाला , आणि लगेच
दुसऱ्या क्षणी म्हणाला ," हे काम त्रिगर्त नरेश नक्कीच करू
शकेल." असे म्हणून ते सर्वजण त्रिगर्त नरेश च्या शिबिरात
गेले. त्याच्या जवळ हा प्रस्ताव ठेवला. तेव्हा तो लगेच तयार
झाला नि म्हणाला ," अर्जुन शी सामना करणे म्हणजे मृत्यूला
आमंत्रण दिल्या सारखे आहे. परंतु आम्ही दोन्ही भाऊ
हस्तिनापूरच्या बाजूने युध्द करायला आलोय तर नक्कीच
अर्जुनला आवाहन करू नि त्याच्या हातून आम्ही वीरगतीला
ही प्राप्त होऊ. परंतु ही गोष्ट सांगायला युवराज तुला यायची
गरज नव्हती. द्वारपाल जवळ निरोप पाठविला असता तरी
चाललं असतं." त्यावर दुर्योधन म्हणाला ," इतिहासाच्या
पानावर तुझे ही नाव आदर सहित घेतले जाईल मित्र !
आज दुर्योधनाच्या सोबत हस्तिनापूर सुध्दा तुम्हां दोघांचे
ऋणी झाले." त्यानंतर अग्निला साक्षी मानून प्रतिज्ञा केली,
रणभूमीवरुन आम्ही तेव्हाच येऊ ज्या वेळी आम्ही अर्जुनचा
वध केला असेल , आणि जर आम्ही या कार्यात आम्ही
सफल झालो नाही तर आमचे शव तरी येतील इथं. "
युध्द सुरू झाले. ठरल्या प्रमाणे त्रिगर्त नरेश ने अर्जुनला
ललकारले. त्रिगर्त नरेश म्हणाला ," अर्जुन त्या सामान्य
सैनिकाशी काय लढत आहेस ? तुला लढायचे असेल तर
आमच्याशी लढ , कारण आम्ही दोन्ही बंधूंनी निश्चय केला
आहे की आज एकतर तू आमच्या हातून वीरगतीला प्राप्त
हो किंवा आम्ही तुझ्या हातून वीरगतीला प्राप्त होऊ ! म्हणून आमच्याशी युध्द कर." तसा अर्जुन चिडून बोलला ,"त्रिगर्त नरेश !"
तेव्हा भीम अर्जुनला म्हणाला ," ते दोघे मुद्दामहून असे
करत आहेत. ही आचार्य गुरुदेवांची चाल आहे अर्जुन त्यामागचा त्यांचा हेतू हा आहे की तू त्यांचा पाठलाग करत दूर जावेस नि आचार्यांना मोठ्या दादांना बंदी बनविण्याची संधी प्राप्त व्हावी !"
" परंतु तो मला ललकारतोय मजल्या दादा !"
" ललकारु दे तू पण त्याना ललकार ना ?"
" हे अर्जुन जर वीर आहेस तर आमच्याशी युध्द कर
नाहीतर आपलं गांडीव खाली ठेवून दे."
" मजल्या दादा तो मला आपले गांडीव खाली ठेवायला सांगतोय. आणि प्रतिज्ञाबध्द आहे जो कोणी मला माझं गांडीव खाली ठेवायला सांगेल त्याला मी जिवंत सोडणार नाहीये."
" ही त्यांची चाल आहे, कळत कसं नाहीये तुला अर्जुन.तो तुझ्या पुढे ठिकाव धरू शकणार नाही. ते मागच्या पायाने पळ काढतील बघ. आणि तू दूर गेलास की गुरुदेव आक्रमण करतील आणि मोठ्या दादाला बंदी बनवतील."
" मजल्या दादा तू असताना कोणाची हिंम्मत आहे मोठ्या
दादाला बंदी बनविण्याची !"
" अर्जुन मी साऱ्या कौरव सैन्याला रोखू शकतो. परंतु
गुरुदेवाना मी रोखू शकत नाही."
" मी क्षत्रिय आहे मजल्या दादा शत्रूची ललकार ऐकल्यानंतर गप्प कसा राहीन." असे म्हणून वासुदेवाला उद्देशून म्हणाला ," वासुदेव रथ पुढे हाकला." असे म्हणताच
वासुदेव कृष्णाने रथ हाकलला. भीम अर्जुन अर्जुन ओरडतच
राहिला. अर्जुन ने त्रिगर्त नसेश सुशर्मा वर बाणांचा पाऊस
पाडला. अर्जुनच्या घातक बाणांचा सामना करत करत ते
दोघे मागे हटत होते. युधिष्ठिर पासून बरेच दूर गेल्यानंतर दुर्योधनाने आचार्य द्रोण ना म्हणाला ," सुशर्मा तर अर्जुनला दूर घेऊन गेला आता युधिष्ठीर ला बंदी बनवायला विलंब का करत आहात गुरुदेव ? " तेंव्हा आचार्य द्रोण म्हणाले ," अर्जुन इतका दूर पण गेला नाही की जो युधिष्ठीरच्या सुरक्षेसाठी परतून माघारी येणार नाहीये." त्यावर दु:शासन चिडून म्हणाला," ते दोघे पळायचं सोडून अर्जुनाशी युध्द का करत आहेत ?"
त्यावर कर्ण म्हणाला ," ते दोघे वीर आहेत दु:शासन
अर्जुनच्या बाणांच्या वर्षावा पुढे त्यांचा ठिकाव लागत नाहीये.
परंतु तरी देखील ते युध्द करत आहेत. वीरगती ला प्राप्त
होण्यासाठी ते वचनबद्ध आहेत. आपण तर इथं राजनीती करत आहोत परंतु ते दोघे अश्या महावीरशी सामना करत आहेत की ज्या महावीराने आपल्या गुरूंचा रथ मागे हटविला होता. खऱ्या अर्थाने युध्द ते दोघे करत आहेत."
अर्जुन त्रिगर्त नरेश सुशर्माशी युध्द करत करत खूप दूरवर
गेला. त्यामुळे युधिष्ठीर मोठ्या चिंतेत पडले. ते चिंतायुक्त
स्वरात म्हणाले ,"अर्जुन तर खूप दूरवर गेलाय. आता काय
करायचं प्रिय भीम ?"
" मी अर्जुनला बोललो होतो जाऊ नकोस म्हणून. पण माझं अजिबात ऐकला नाही तो."
" पण आता काय करायचं ?"
" चिंता करू नका मोठ्या दादा अर्जुन दादा युध्द करत दूर गेला तरी आम्ही आहोत ना मोठ्या दादा !" नकुल म्हणाला."
" कशी चिंता नको करू प्रिय नकुल.जर गुरुदेव ने मला
बंधी बनविले तर मी दास होईन त्यांचा आणि लगेच युध्द
समाप्त होईल.कारण बंदी दास होतो नि दासाला काहीही
अधिकार नाहीये."
" आम्ही जरी असलो तरी गुरू द्रोण ला अर्जुन शिवाय
कोणीही रोखू शकत नाहीये."
तेवढ्यात आचार्य द्रोण पांडवावर चाल करून येतात. अगोदर त्यांचा भीमसेनशी सामना होतो. भीम फार काळ
त्यांच्या पुढे ठिकाव धरू शकत नाही. भीम ला परास्त केल्यानंतर ते सहदेव शी सामना करतात. सहदेव सर्व शस्त्राचा प्रयोग करून पाहतो. शेवटी तोही परास्त होतो. नंतर नकुल बरोबर सुध्दा आचार्य द्रोण सामना करतात. त्याला ही परास्त करतात नि युधिष्ठीरला बंदी करण्यासाठी पुढे सरसावतात. चारही पांडवांना कळत नाही की आता काय करावे ? तेवढ्यात अर्जुन तेथे येऊन पोहोचला. आचार्य द्रोण ना आवाहन देत म्हणाला ," सावधान आचार्य ! " असे म्हणून
दोघांचे युध्द सुरू होते नि सूर्यास्ताचा शंक फुंकला जातो.
अकराव्या दिवसाचे युध्द समाप्त झाले.
दुर्योधन एकदम संताप अनावर झाला होता.तो फक्त
आचार्य द्रोणाचार्य येण्याची वाट पाहत असतो. ते जसे
आंत आले तसा उपहास स्वरात बोलला ," या गुरुदेव मी
आपलीच वाट पाहत होतो."
" ती कशासाठी ?"
" आपल्याला पारितोषिक देण्यासाठी !"
" पारितोषिक ते कशा बद्दल ?"
" आपल्या पराक्रमा बद्दल."
" काय म्हणायचंय तुला ?"
" मला काय म्हणायचंय ते आपल्याला चांगलेच ठाऊक आहे, परंतु आपण विचारलात म्हणून सांगतोय. आपण काल काय म्हणाले होते की अर्जुनला दूर घेऊन जा. म्हणजे मला युधिष्ठीरला बंदी करण्यास सहज शक्य होईल. म्हणून त्यासाठी त्याचा बंदोबस्त ही केला. पण काय केलेत संधी मिळून ही युधिष्ठीर बंदी न करता अर्जुन येण्याची वाट पाहत बसलात. आपल्याला कल्पना आहे, अर्जुनला दूर घेऊन जाण्यासाठी मला किती सैन्याचा बळी द्यावा लागला. परंतु आपण युधिष्ठीरला बंदी बनविण्यास अपयशी ठरलेत." तेव्हा कर्णाने मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु दुर्योधनाने त्याला मध्ये बोलू न देता म्हणाला," नाही मित्र तू मध्ये बोलू नकोस मला आज जाणून घ्यायाचेच आहे की गुरुदेव माझ्या पक्षात युध्द करत आहेत का त्या पांडवांच्या पक्षात युध्द करत आहेत. पितामहांनी तर पांडवांचा वध करणार नाही म्हणून स्पष्ट सांगितले परंतु आचार्यांनी शब्द देऊन ही आपला शब्द मोडला. म्हणून मला आज जाणून घ्यायाचेच आहे." तेव्हा आचार्य द्रोणाचार्य म्हणाले ," मी तुझ्या विश्वासाचा दास नाहीये. युध्द भूमी आणि द्युतक्रीडा मध्ये फरक असतो हे समजून घे अगोदर. युध्द आमच्या हातात आहे, परंतु त्याचा परिणाम आमच्या हातात नाहीये. परंतु या शब्दला युध्द भूमीवर फार महत्व असते. अर्जुन जर अजून थोडा दूर असता तर युधिष्ठीरला मी नक्कीच बंदी बनवून तुझ्या हाती सुपूर्द केले असते. परंतु....." किंचित थांबून पुढे म्हणाले ," मी उद्या चक्रव्यूहाची रचना करत आहे चक्रव्यूहाचा भेदन अर्जुन व्यतिरिक्त अन्य कोणालाही माहीत नाही. जरा धीर धर." त्यांचा वार्तालाप ऐकून एक सैनिक गुपचूप लपतछपत युधिष्ठीरच्या शिबिरात जाता असतो. परंतु त्याला दुर्योधनाच्या पाहेकऱ्यानी पकडले नि आचार्य द्रोण समोर उभे केले तेव्हा आचार्य द्रोणाचार्यांनी त्याला विचारले ," एवढ्या रात्री
कुठं जात होतास ?" त्यावर तो सैनिक म्हणाला ," महाराज
युधिष्ठीरच्या शिबिर मध्ये."
" कशासाठी जात होतास ?"
" आपण कदाचित विसरला असाल की युद्ध आरंभ पूर्वी
ठरलेल्या नियमानुसार सूर्यास्त झाल्यापासून सूर्योदय होईपर्यंत इकडचे सैनिक तिकडच्या सैनिकांना आणि तिकडचे सैनिक इकडच्या सैनिकांना भेटू शकतात."
त्यावर आचार्य द्रोण संतापाने म्हणाले ," मी नियम नाही विचारले तुला. का जात होतास ते सांग."
" हे विचारण्याचा अधिकार आपल्याला नाहीये."
" सैनिक आपल्या प्रधान सेनापतीशी कसे बोलले जाते
ही सभ्यता पण विसरलास काय ?" अश्वत्थामा उद्गारला.
" मी काहीच विसरलेलो नाही आचार्य पुत्र. परंतु इथं बरेच
आदरणीय लोक बरंच काही विसरलेले दिसतात."
" सैनिक sss " अश्वत्थामा जवळजवळ ओरडलाच.
" अश्वत्थामा , तुझ्या सारख्या महावीरला साधारण सैनिकांवर मोठ्या ने ओरडणे शोभत नाहीये." असे म्हणून
आचार्य द्रोणानी त्या सैनिकांकडे पाहत त्याला विचारले ," मी
काय विसरलो ते सांग बरं."
" आचार्य आपली निष्ठा हस्तिनापूर प्रति हवी होती .परंतु
आपली निष्ठा हस्तिनापूर नरेश आणि युवराज यांच्या निहित
स्वार्था मध्येच सीमित राहिली. मी महाराज युधिष्ठीरला
सांगायला जात होतो की उद्या अर्जुनला दूर जाण्याचा दिवस
नाहीये. कारण आपण उद्या चक्रव्यूहाची रचना करणार आहेत आणि त्या शिबिरात सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुन व्यतिरिक्त
अन्य कोणालाही त्याचे भेदन ठाऊक नाही , म्हणून मी एक
नागरिक होण्याचे कर्तव्य पार पाडायला जात होतो. हे
आचार्यवर आपण जर हस्तिनापूरचे शत्रू असाल तर मला
तिकडे जाऊ देऊ नका."
" हे सैनिक तुझी हस्तिनापूर वर असलेली निष्ठा आदरनिय
आहे, परंतु मी ह्या सैन्याचा प्रधान सेनापती असल्याचा नात्याने हा महत्वपूर्ण संदेश कुण्या ही गुप्तहेरला त्या
शिबिरात पोहोचू देणार नाही. युध्द समाप्ती नंतर स्वतः
हस्तिनापूर नरेश तुझ्या बरोबर न्याय करतील. घेऊन जा रे
ह्याला." तेव्हा अश्वत्थामा म्हणाला ," त्याला मृत्यूदंड का दिला नाही पिताश्री ?" त्यावर आचार्य द्रोण म्हणाले ," तो
निष्ठावंत नाकरिक असल्याचे आपले कर्तव्य पार पाडायला
चालला होता. त्याची निष्ठा त्याला तेथे घेऊन जात होती. कारण हे तर सत्य आहे ना चक्रव्यूहाची तोड वासुदेव कृष्ण आणि अर्जुन या व्यतिरिक्त अन्य कोणालाही माहीत नाही. आधी गरुड व्यूह रचून पांडवांची दिशा भूल करणार आहे आणि त्या अर्जुन दूर जाताच त्यात बदल करून चक्रव्यूहाची रचना करणार हे एक प्रकारचे कपटच करत आहोत आपण पांडवा सोबत."
त्याच वेळी अभिमन्यू आपल्या पत्नीला भेटायला तिच्या
शिबिरात गेला असता उत्तरा हसून म्हणाली," आपले स्वागत
आहे आर्यपूत्र !" त्यावर अभिमन्यू उत्तरला ," युध्द कला
प्रमाणेच प्रेम कला पण महत्त्वपूर्ण आहे. परंतु त्याच तू प्रवीण
आहे, म्हणजे प्रेम व्यूह , हास्य व्यूह , लज्जा व्यूह !"
लगेच उत्तरा हसून म्हणाली ," बस बस आपले वक्तव्य पण
आपल्या बाणा सारखे अचूक आहेत. आपल्याला किती
व्यूह येतात."
" एक सोडून बाकी सर्व व्यूह येतात मला."
" एक कोणता व्यूह येत नाही ?"
" चक्रव्यूह ! मला अर्धाच येतो."
" तो अर्धाच का येतो पूर्ण का येत नाही ते सांगा ना ?"
" सांगेन पण अगोदर वचन दे."
" वचन ते कशाचे ?"
" मी ते सांगत असताना तू झोपणार नाहीस ?"
" माझ्या झोपण्याने त्या व्यूहाचा काय संबंध ?"
" तुझ्या उदरात जागत असलेल्या माझ्या बाळाने चक्रव्यूहाची माहिती अपुरी ऐकून नये म्हणून .मी आईच्या
गर्भात असताना पिताश्री मातोश्रीला चक्रव्यूहाची माहिती
देत होते तेव्हा पिताश्रीनि चक्रव्यूहात प्रवेश करण्या पर्यंतच
सांगितले होते. आणि मातोश्री झोपली. त्यामुळे चक्रव्यूहा विषयी माझे ज्ञान अधर्वटच राहिलं. चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग मला माहीत नाही. मी मामाश्री ना त्या व्यूहा विषयी अनेक वेळा विचारले. परंतु मामाश्री म्हणाले ,
" आपल्या पिताश्री कडून ऐक." त्यावर उत्तराने विचारले ," मग आपण पिताश्री कडून का नाही शिकून घेतलेत ?"
" पिताश्री ना विचारायची संधीच मिळाली नाही."
" आपण हट्ट केला नसाल ?"
" त्यांचा हसरा चेहरा हट्ट कुठं करू देते ? त्यांच्या चेहऱ्यावर सदानकदा हास्य उमटलेले असते, आणि खरं सांगायचं तर तसा अचूक बाण तर त्यांच्या भात्या मध्ये सुध्दा नाहीये. पिताश्री मुळे आचार्य द्रोण त्या चक्रव्यूहाची रचना करत नाहीत. नाहीतर त्यांनी कधीच चक्रव्यूहाची रचना करून युध्द संपविले असते.पण पिताश्री आहेत म्हणून चिंता करण्याचे कारण नाहीये."
दुर्योधन आणि दु:शासन या दोघांचा वार्तालाप सुरू आहे,
दु:शासन आपल्या बंधुस म्हणतोय की, भ्राताश्री ! त्रिगर्त नरेश सुशर्मा वीर आहेत नि वचनबद्ध सुध्दा आहेत, त्याना
पलायन करायला सांगणे इष्ट ठरणार नाहीये." त्यावर दुर्योधन
म्हणाला ," हे बघ गुरुदेव उद्या चक्रव्यूहाची रचना करणार आहेत , आणि चक्रव्यूहाची तोड फक्त वासुदेव कृष्ण आणि अर्जुनलाच माहीत आहे, जर उद्या सुशर्मा त्या दोघांना दूर घेऊन जाण्यास यशस्वी ठरला तर आपल्यासाठी उद्या दिवस विजयाची नांदी ठरणार आहे. चल माझ्या बरोबर." ते
दोघेही सुशर्मा कडे जायला निघाले. त्याच वेळी वासुदेव कृष्ण
अर्जुनला समजावत होते की , मोठ्या दादाची सुरक्षा करणे
हेच तुझं प्रथम कर्तव्य आहे पार्थ !"
" परंतु सुशर्मा ने उद्या सुध्दा मला ललकारले तर मी गप्प
कसा बसू ? मला त्याच्या बरोबर युध्द करावेच लागेल नि हाच क्षत्रिय धर्म सुध्दा आहे."
" आता क्षत्रिय धर्म काय आहे , हे मला तू सांगणार आहेस का पार्थ ? पांडवांचा पराजय म्हणजे साऱ्या समाज
कल्याणाच्या शुभ आणि अभुभ गोष्टीचे पतन. तुझा धर्म फक्त
समाज कल्याणासाठी युध्द करणे बस्स ! सुशर्माची ललकार ऐकणे हा तुझा धर्म नाहीये."
" तरी पण ...?
" हां हा तरी पण गडबड करतोय सारी. आता तुझा अहंकार आडवा येत असेल तर मी काही करू शकत नाही.
तसा पण मी तुझा सारथी आहे, अर्थात तू जिथं सांगशील तिथं मी तुला घेऊन जाईन."
दुर्योधन आणि दु:शासन त्रिगर्त नरेश सुशर्माच्या शिबिरात
पोहोचले. सुशर्मा लज्जित होता.परंतु बोलण्या अगोदरच
दुर्योधन ने त्याला विचारले ," कसा आहेस मित्रा ?"
" मी फार लज्जित आहे, ना मी अर्जुन चे शव आणू शकलो नाही स्वतः वीरगती ला प्राप्त होऊ शकलो."
" अर्जुन असा महारथी आहे की त्याच्या बरोबर आचार्य
द्रोण सुद्धा दिवसभर युध्द करू शकणार नाहीत.परंतु तू तर दिवसभर त्याला युध्दात गुंतवून ठेवलंस."
" परंतु उद्याच्या उद्याच्या युध्दात मी त्याचे किंवा स्वतःचे
शव देऊन येईन."
" भ्राताश्री तुझ्या प्राणा पेक्षा ही मूल्य वस्तू मागायला आले
आहेत."
" मागायला ते पण माझ्या कडे ?"
" हां उद्या तू युध्द नाही करायचे."
" युध्द नाही करायचे मग काय मी पाठ दाखवू ?"
" आचार्य द्रोणची हीच उद्याची रणनीती आहे."
" आचार्य द्रोण ला हे माहीत काय ? मी एक क्षत्रिय आहे आणि क्षत्रिय कधी आपली पाठ दाखवू शकत नाहीये."
" मी तुला पाठ दाखवायला सांगत नाहीये. उद्या तू अर्जुन
इतके दूर घेऊन जा की तो सूर्यास्ताच्या अगोदर परतून
माघारी येणार नाहीये."
" त्याने काय होईल ?"
" त्याने हे होईल की गुरू द्रोण युधिष्ठीरला बंदी बनवतील."
" युधिष्ठीरला बंदी बनवून काय होणार ?"
" युध्द समाप्त होईल. तुझी इच्छा नाही काय ? युध्द
समाप्त होऊ दे अशी ! "
" युध्द समाप्त होऊ दे असं कुणाला का नाही वाटणार ?
परंतु मला एक वचन दिले तर मी हे कपट पण करायला
तयार आहे."
" कपट नाहीये हे ?"
" हे कपट आहे त्या शिवाय दुसरं काही असू शकत नाही."
" अच्छा ठीक आहे, बोल काय वचन हवंय तुला ?"
" युधिष्ठीर बंदी बनविल्या नंतर त्याला सोडून द्यावे.कारण मी त्याचा ऋणी आहे.विराट युद्धात त्याने मला सोडून दिलं होतं."
" ठीक आहे मी वचन देतो तुला की युधिष्ठीर ला बंदी
बनविल्यानंतर मुक्त करीन."
" बस्स तर मग मी अर्जुन इतके दूर घेऊन जाईन की
तो सूर्यास्त झाला तरी परतणार नाही."
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा