महाभारत ११२ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाभारत ११२ |
महाभारत ११२
सुभद्रा जवळ एक दासी आली नि म्हणाली ," महारानी की जय असो." तेव्हा सुभद्रा ने विचारले ," बोल काय खबर
आणलीस ?" तेव्हा ती दासी म्हणाली ," रणभूमीवरून एक
पत्र आलंय." सुभद्रा ने पत्र घेतले नि वाचू लागली.त्यात अभिमन्यू लिहिलं होतं की काल पितामहाशी सामना झाला. तेव्हा त्यानी मला आशीर्वाद दिला नि म्हटलं तुला पाहून मला माझे बालपण आठवले.पत्र वाचता वाचता तिला अचानक रडू कोसळले. तेव्हा तेथे वासुदेव येऊन तिला विचारू लागले
की सुभद्रा काय झाले का रडतेस तू ?" तेव्हा सुभद्रा म्हणाली,
रणभूमीवरून अभिमन्यू चे पत्र आले आहे . परंतु न जाणो
मला असं का वाटतं की रणभूमीवर अवश्य दुर्घटना घडली
आहे पिताश्री !" त्याच वेळी दुसरीकडे म्हणजे हस्तिनापूरात
महाराज धृतराष्ट्रानी संजय कडून युध्द भूमीवरील वार्तालाप ऐकून महाराज धृतराष्ट्र उद्गारले ," आज दुर्योधनाने अभिमन्यू
सोबत जे केले. त्यावरून तर मला असं वाटतंय की पांडव
माझ्या शिल्लक असलेल्या मुलांना देखील जिवंत सोडणार
नाहीत."किंचित थांबून ते पुढे म्हणाले ," हे संजय जरा पाहून सांग की अर्जुन कुठे आहे ?" त्यावर संजय म्हणाला ," जशी आपली आज्ञा !" असे म्हणून संजय ने आपली नजर कुरुक्षेत्राच्या दिशेने वळविली. त्यावेळी त्याने पाहिले की अर्जुन त्रिगर्त नरेश सुशर्माशी युध्द करत होता. अर्जुनाने दोन्ही ही बंधूंचा वध केला नि म्हणाला ," केशव लवकर कुरुक्षेत्रावर चल. तेथे काहीतरी अघटित घडलं असं मला वाटतंय.का ते
कुणास ठाऊक पण मला रडावेसे वाटतंय. " तेव्हा वासुदेव कृष्ण म्हणाला की, तिकडे अधर्माचा विजय आणि धर्माचा पराजय झाला आहे या व्यतिरिक्त अन्य काहीही घडलेले नाहीये." त्यावर अर्जुन म्हणाला ," परंतु माझ्या डोळ्यांना राडावेसे का वाटतंय."
" हूंss आपल्या डोळ्यांना नीट समजविले नसशील तू ."
" चल लवकर आपला रथ घेऊन तिकडे."
" ठीक आहे." असे म्हणून वासुदेव कृष्णा ने रथ हाकलला.
परंतु नेमके काय घडले ते मात्र सांगितले नाही."
त्याचवेळी तिकडे एका सैनिकाने तेथे येऊन युधिष्ठीरला
खबर दिली की अभिमन्यू वीरगतीला प्राप्त झाला. ते ऐकून
युधिष्ठीरला खरं तर त्याच्या बोलण्यावर विश्वासच बसला नाही. म्हणूनच पुन्हा विचारले की , हे सैनिक तू नीट पाहिलेस का ? वीरगतीला प्राप्त झालेला योध्दा अभिमन्यूच होता का ?"
" हां महाराज तो अभिमन्यूच होता. " तसा युधिष्ठीर कडे
पाहत म्हणाला ," ऐकलेस भीम सैनिक काय म्हणतोय ते."
" हां दादा ऐकले नि सारे !"
" हे ईश्वर आता मी अर्जुनला काय उत्तर देवू ?"
तेवढ्यात अर्जुन आणि वासुदेव कृष्ण तेथे पोहोचले होते.
तेव्हा अर्जुन पाहिले की शिबीर मध्ये शोककळा पसरली
आहे. हे पाहून अर्जुन ने विचारले की एकदम सुनसान का
वाटत आहे. तेव्हा वासुदेव कृष्ण उद्गारला ," हे तर शिबिराच्या
आंत गेल्यानंतर कळेल ना पार्थ !" दोघेही रथातून खाली
उतरले परंतु शिबिराच्या बाहेर उभे असलेले सैनिक माना
खाली घालून उभे होते. त्यांनी अर्जुनला प्रणाम पण केला
नाही. तेव्हा अर्जुन ने एका सैनिकांला विचारले," काय झालं
आज युध्द भूमीवर महाराजांना आचार्य द्रोण नि बंदी बनविले का ?" त्यावर सैनिक बोलला ," नाही असं काहीही झालं नाही ." तसे अर्जुन ने विचारले ," मग आपल्या शिबिरात
शोककळा का पसरली आहे ?" त्यावर तो सैनिक बोलला,
" गुरू द्रोण ने चक्रव्युहची रचना केली होती."
" काय चक्रव्यूहाची रचना केली. अरे बाप रे ! चक्रव्यूहाचा
भेद तर आम्हां दोघां शिवाय अन्य कोणाला येतच नाहीये." असे म्हणताच त्याच्या द्यानात आले की अभिमन्यू चक्रव्यूहात प्रवेश करता येतो ?अभिमन्यू ते हे साहस केले नसेल ना ?
हे खरे आहे का खोटे हे जाणून घेण्यासाठी त्याने त्या सैनिकाला विचारले ," अभिमन्यू तर चक्रव्यूहात प्रवेश केला
नाही ना ?" असे विचाताच त्या सैनिकांने प्रश्नाचे उत्तर न
देता आपली मान खाली घातली. तेव्हा अर्जुन समजला.
आणि वासुदेव कृष्णा सह आंत मध्ये प्रवेश केला. तेव्हा समोरील दृश्य त्याच्या मनाची खात्री पटली.आणि तेवढ्यात
अर्जुनची नजर अभिमन्यूच्या आसनावर जाते.तसे अर्जुन ने युधिष्ठीर विचारले ," मोठ्या दादा अभिमन्यूचे आसन खाली का आहे ?" परंतु युधिष्ठीर त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. त्यानंतर त्याने भीमाला विचारले की मजले दादा अभिमन्यूचे आसन रिक्त का आहे ?" परंतु भीमाने देखील त्याच्या ह्या प्रश्नांचे उत्तर दिले नाही. त्याने नकुलकडे वळत नकुल ला विचारले. नकुल ने पण उत्तर दिले नाही. म्हणून मग शेवटी सहदेवला ही तोच प्रश्न केला. सहदेव ने सुध्दा त्याच्या ह्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. तेव्हा मग सर्वांना उद्देशून म्हणाला ," तुम्ही लोक बोलत का नाहीयेत ?" पण कोणीच काही बोलत नाही, तसा अर्जुन म्हणाला ," ठीक आहे तुम्ही माझ्या प्रश्नाचे
उत्तर देत नाहीये ना मग आता मी उत्तरालाच जाऊन विचारतो. केशव माझा अभिमन्यू !" तेव्हा वासुदेव कृष्ण म्हणाले ," हां पार्थ - पार्थ आपल्या क्षत्रिय जीवना मध्ये आपल्याकडे शस्त्राच्या व्यतिरिक्त अन्य काही असत नाही. परंतु आपल्या पावलांवर पाउल ठेवून आपला मृत्यू मात्र आपल्या सोबत अवश्य चालत असतो आणि रणभूमीवर वीरगती ला प्राप्त होणेच आपल्या भाळी लिहिलं असतं. त्यामुळेच आपल्याला कोणत्या ना कोणत्या युध्दा मध्ये वीरगती ला प्राप्त व्हावेच लागते. ह्या सर्वांचे चेहरे हेच सांगत आहेत की आपला अभिमन्यू सुद्धा वीरगतीला प्राप्त झाला आहे." तसा मोठ्या ने ओरडला, नाही sss केशव नाही ss s अर्जुनला एकदम भडभडून आले आणि त्याला रडू कोसळले. तेव्हा त्याची समजूत काढत वासुदेव कृष्ण म्हणाले ," हे बघ पार्थ शोक करून वीरगती प्राप्त झालेल्या अभिमन्यूच्या मृत्यूचा अपमान करू नकोस. आणि एक गोष्ट द्यानात ठेव की ,आचार्य द्रोण, महारथी कर्ण , महारथी , दुर्योधन , दु:शासन , महारथी कृतवर्मा , अश्वत्थामा, कृपाचार्य सारख्या महारथीशी अभिमन्यू एकटा लढला. त्याबद्दलचा अभिमान बाळग पार्थ ! "
" केशव अभिमन्यूला चक्रव्यूहात प्रवेश करायचा माहीत
होते. परंतु त्यातून बाहेर पडायचे माहीत नव्हते."
" हे माहीत होते आम्हाला म्हणून आम्ही प्रिय अभिमन्यू च्या मागोमाग चक्रव्यूहात प्रवेश करणार होतो. परंतु ...?"
" परंतु काय ? "
" सिंधू नरेश जयंद्रथने एकट्यानेच आम्हां सर्वाना रोखले."
" आज सिंधू नरेश एकटा नव्हता. त्याच्या सोबत महादेव ने
त्याला दिलेले वरदान होते."
" वरदान ? " एकदम सर्वांनी विचारले.
" हां ! तुम्हां साऱ्यांना आठवत असेल वनवासात असताना
त्याने द्रौपदीचे हरण करण्याचा त्याने प्रयत्न केला होता."
" हां ! केला होता."
" तेव्हा तुम्हां लोकां कडून त्याला जीवदान तर मिळाले.
परंतु तो अपमानाच्या अग्नित जळत होता. तुम्हां लोकांशी
बदला घेण्यासाठी त्याने महादेवाची घोर तपस्या केली. तेव्हा
महादेवांनी त्याला वरदान दिलं होतं की अर्जुन सोडून बाकीच्या पांडवावर तो एक दिवस फक्त भारी पडेल. आज ते वरदान त्याच्या कामी आले." तेव्हा अर्जुन ने विचारले,
" माझ्या पुत्राचे शव कोठे आहे ?" तेव्हा सर्वजण उत्तराच्या शिबिरात जायला निघतात. तेव्हा उत्तराच्या मनावर एकदम आघात होतो. ती त्याला जीवित समजून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते. ती त्याच्या मृत शरीराला सांगत असते की उठा ना , बघा ना आपल्याला भेटायला मातोश्री आल्या आहेत. तेव्हा त्या दोन्ही मातोश्री ना कळत नाही की उत्तराची समजूत कशी काढावी. तिचे सांत्वन कसे करावे ? तेव्हा समस्त पांडव तेथे येताच त्यांच्या सोबत वासुदेव कृष्ण सुद्धा असतात. त्या सर्वांना पाहून उत्तरा म्हणाली ," आता तरी उठा सगळा परिवार तुम्हांला भेटायला आलाय पहा. " पण तो काहीच बोलत नाही पाहून ती अर्जुन कडे पाहत म्हणाली ," पिताश्री तुम्ही तरी सांगून पहा ना, माझं ते ऐकतच नाहीत." तेव्हा अर्जुन वासुदेव कडे पाहत बोलला," केशव आता तूच सांग.काय उत्तर देवू मी उत्तराच्या प्रश्नांचे ?" तेव्हा वासुदेव कृष्ण म्हणाले ," धन्य आहेत या पुत्राचे माता-पिता धन्य त्याची विधवा , धन्य आहेत ते डोळे ज्या डोळ्यांना या महावीरांचे दर्शन झाले. मृत्यू तर अंतिम सत्य आहे ना , ते तर प्रत्येकाला येणारच आहे, परंतु असा मृत्यू कुणा-कुणाच्याच नशिबी येतो. आज तुझा पती अश्या महावीरांशी लढला आहे की त्या मवीरांच्या सोबत पूर्ण सैन्या
सुद्धा लढत नाही. म्हणून अग्निच्या भोवती फरताना जे ह्याने तुला वचन दिले होते त्या वचनातून तू त्याला मुक्त कर.माझी
बहीण सुभद्रा सुध्दा त्याला ममता च्या ऋणातून मुक्त करेल.
पार्थ आता अभिमन्यूच्या अंतिम यात्राची तयारी कर. "
तेव्हा अर्जुन ने प्रतिज्ञा केली की, वत्स मी तुला वचन देतो
की उद्या सूर्यास्तापूर्वी जर जयंद्रथ चा वध केला नाहीतर मी
स्वतः अग्नित प्रवेश करीन." त्यानंतर त्याची प्रेतयात्रा निघाली. त्याची चिता रचण्यात आली तेव्हा कुरुसेनेतील
मान्यवर योध्ये तेथे उपस्थित झाले. तेव्हा अर्जुन म्हणाला,
" माझ्या पुत्रांच्या अंत्यसंस्कारला आलेल्या सर्वांचे स्वागत आहे. " तेव्हा दुर्योधन म्हणाला ," उद्या तुझी पाळी आहे." तेव्हा अर्जुन ने आचार्य द्रोणाचार्यांना विचारले, " आपल्या शिष्याचा पुत्र आज आपल्या सोबत युध्द करताना घाबरला तर नाही ना गुरुदेव ?"
" कुंती पुत्र अर्जुन आज रणभूमीवर तुझ्या पुत्रा व्यतिरिक्त
दुसरा कोणीही वीर नव्हता की त्याची वीरता वाखाण्यासारखी
असेल आमच्या पैकी असा कोणीही वीर नाही की तो वीर
अभिमन्यू कडून घायाळ झाला नसेल. आज युधिष्ठीर नि
माझ्या मध्ये केवळ अभिमन्यू होता. जर अभिमन्यू नसता तर
मी युधिष्ठीर बंदी बनविण्यात यशस्वी झालो असतो नि युध्द
समाप्त झाले असते.म्हणून हा वृध्द ब्राम्हण वीर अभिमन्यू ला
प्रणाम करायला आला आहे." असे म्हणून अभिमन्यूच्या
चरणी फुले ठेवून प्रणाम केला. त्यानंतर दुर्योधन, शकुनिमामा, दु:शासन , कृपाचार्य , अश्वत्थामा, कृतवर्मा , आणि कर्णाने जेव्हा अभिमन्यू ला श्रद्धांजली वाहिली तेव्हा म्हणाला," हे सुभद्रा पुत्र अभिमन्यू धन्य आहे तुझी माता, धन्य आहेत तुझे पिता, आणि धन्य आहे तुझा वंश ज्या वंशात तू जन्म घेतलास. तुझं नाव इतिहास सदैव आदर सहित घेतले जाईल. ह्या राधेयाचा तुला अंतिम प्रणाम !" त्यानंतर मद्र नरेश शल्य, आणि शेवटी सिंधू नरेश
श्रद्धांजली वाहायला आला तर अर्जुन त्याला रोखले.
" सिंधू नरेश जयंद्रथ तू नाही."
" अनुज ss युधिष्ठीर मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला.तेव्हा
अर्जुन म्हणाला ," नाही मोठ्या दादा ह्याला माझ्या पुत्रांच्या
शवाला स्पर्श करू देणार नाही. आपल्याला माहितेय हा आपला दास होता. ह्याला आपल्या आज्ञेवरून मुक्त केले होते. परंतु आज हा माझ्या पुत्रांच्या मृत्यूला कारणीभूत
ठरला. आज जर सूर्यास्त झाला नसता तर आताच ह्याला मृत्यूदंड दिला असता मी ! पण काही हरकत उद्याचा सूर्यास्त तू पाहणार नाही. जर असं झालं नाही तर मी स्वतः अग्नित समाधी घेईन." तसा सिंधू नरेश जयंद्रथ तेथून चालता झाला.
त्यानंतर सर्व विधी पूर्ण होताच स्वतः अर्जुन ने आपल्या पुत्रांच्या चितेला अग्नि दिला. त्यानंतर एक एक करून सर्वजण तेथून निघून गेले. आचार्य द्रोणच्या शिबिरात कृपाचार्य आले तेव्हा आचार्य द्रोण ना दुःखीकष्टी पाहून
कृपाचार्य म्हणाले ," वीर तर वीरगती ला प्राप्त होतच असतात." तेव्हा आचार्य द्रोणाचार्य म्हणाले ," मग मी वीर
नाहीये का ? मग मी का नाही वीरगती ला प्राप्त झालो ?
अभिमन्यू तर बालक होता. परंतु त्याची वीरता वाखाण्या जोग होती आणि खरे सांगायचे तर युद्धाचे सारे नियम आम्ही
तोडले नि वीर अभिमन्यूचा वध केला. तसे पाहायला गेले
तर ते सारे नियम आमच्याच प्रधान सेनापती ने बनविले होते. मी तर एवढा लज्जित आहे की गंगापुत्र भीष्मांच्या समोर जाऊ शकत नाही. त्यांनी जर विचारले की हे आचार्य तुमच्या
उपस्थित हा अधर्म घडला कसा ? तर काय उत्तर देवू शकतो मी त्यांना ?" तेवढ्यात तेथे सिंधू नरेश जयंद्रथ आला नि
म्हणाला ," प्रणाम आचार्य !" त्यावर आचार्य द्रोण उद्गारले,
" ये सिंधू नरेश जयंद्रथ बैस ! उद्या सूर्योदय होताच तुला
युध्द करायचे आहे, मग विश्राम करायचे सोडून इथं का
आलास ?" त्यावर सिंधू नरेश जयंद्रथ उद्गारला ," माझ्या
मनात एक काटा खटकतोय. म्हणून मी आपल्याला विचारायला आलोय."
" विचार काय विचारायचे आहे तुला ?."
" आपण माझे सुध्दा गुरू आहात . मी आणि अर्जुन ने
आपल्या कडूनच शस्त्रविद्या प्राप्त केली. परंतु अर्जुनच
सर्वश्रेष्ठ धनुर्धर का ?" त्यावर आचार्य द्रोण उद्गारले," अर्जुन
सर्वश्रेष्ठ धनुर्धर होण्यामागे माझा काहीच हात नाही. मी तर दोघांनाही शस्त्रविद्या सारखीच दिली होती. परंतु तू मी दिलेल्या विद्येवरच संतुष्ट होऊन राहिलास. परंतु अर्जुन ने मी दिलेल्या शस्त्र विद्येला आधारशीला मानून अभ्यास केला आणि त्यात तो प्रवीण झाला. परंतु तुला घाबरण्याचे काय कारण ? मृत्यू तर जीवनाचे अंतिम सत्य आहे, मृत्यू कायर चा
पण आणि वीरचा पण होतो आणि कुरुसेनाचा प्रधान
सेनापती मी असताना तुला घाबरायचे काही कारण नाहीये.
उद्या सुध्दा मी तुझ्या सोबत असणार आहे, अर्थात तुझ्या
सुरक्षेतेची सारी जबाबदारी माझी आहे , म्हणून चिंता करायचे
सोडून आपल्या शिबिरात जाऊन विश्राम कर." तो तेथून
निघाला. तेव्हा दुर्योधनाच्या शिबिरात वार्तालाप सुरू होता.
अंगराज कर्ण म्हणाला," मला नाही वाटत सिंधू नरेश जयंद्रथ
अर्जुनच्या हातून वाचेल असे, मुश्किल आहे." तेव्हा गांधार
नरेश शकुनि उद्गारला ," जर उद्या कसे ही करून सिंधू नरेश
जयंद्रथला अर्जुन पासून वाचविले तर अर्जुन अग्नि समाधी
घेईल." त्यावर दुर्योधन उद्गारला ," आणि बाकीच्या राहिलेल्याना गाजर मुळी सारखे कापून टाकू."
" भीमाला विसरू नकोस मित्र ?"
" भीम त्याला माझ्या पेक्षा दुसरा कोण चांगल्या प्रकारे
ओळख तो त्याची बुध्दी पण त्याच्या सारखी आहे, तो
मूर्ख आहे, त्याला चुना लावायला किती वेळ लागतो. परंतु
अर्जुन बद्दल काही सांगता येत नाही आणि त्याही पेक्षा मला
त्या मायावी वासुदेव कृष्णाची भीती वाटते." तेव्हा गांधार नरेश शकुनि म्हणाला," उद्या अर्जुनच्या हातून सिंधू नरेश जयंद्रथचा वध होवो अथवा न होवो परंतु अर्जुन मृत्यू निश्चितच आहे. कारण जयंद्रथच्या मृत्यूच्या सोबत एक
शाप पण आहे."
" शाप ?" दुर्योधनाने विचारले.
" हां शाप ! जयंद्रथाचा मृत्यू ज्याच्या हातून होईल त्याचाही
मृत्यू त्या क्षणीच होईल. हा मारणाऱ्या साठी शापच आहे ना,
झाले असे की एके दिवशी जयंद्रथ आपल्या पिताश्री ना भेटायला तपोवन मध्ये गेले. वृद्धक्षत्र तपोवन मध्ये जाऊन
सुध्दा त्यांचा पुत्र मोह सुटला नाही. जयंद्रथ त्याना प्रणाम
केला तेव्हा त्याचे वडील वृद्धक्षत्र ने आशीर्वाद दिला.
" आयुष्यमान भव !"
" पिताश्री मला असा आशीर्वाद द्या. जसा गंगापुत्र भीष्मांला त्याच्या वडिलांनी अर्थात शंतनूनी दिला होता."
त्यावर वृद्धक्षत्र म्हणाले ," ना तू भीष्म आहेस आणि मी
शंतनू आहे , म्हणून तुला इच्छामृत्यूचे वरदान देऊ शकत नाही. परंतु एक शापाचे कवच अवश्य तुला मी घालू शकतो.
तुझे मस्तक धडा वेगळे केल्यानंतर ते धर्तीवर पाडण्यास जो कारणीभूत होईल त्याच्या मस्तकात क्षणात विस्फोट होऊन
तो भस्म होईल. तेव्हा उद्या अर्जुन ने सिंधू नरेश वध केला
काय नि नाही केला काय अर्जुनचा अंत तर निश्चितच आहे.
अर्थात आपल्या साठी उद्याच दिवस मोठ्या भाग्याचा आहे
असे समजा." तेवढ्यात तेथे सिंधू नरेश जयंद्रथ येतो त्याच्या
पडलेला आणि चिंतामय चेहरा पाहून कर्ण म्हणाला ,"काय
झालं सिंधू नरेश तुझ्या चेहऱ्यावर आज बारा का वाजले
आहेत." त्यावर सिंधू नरेश उद्गारला ," ज्याच्या वधाची प्रतिज्ञा
अर्जुन सारख्या महारथी ने केली आहे, तो आनंदी दिसले
काय ?" ते गांधार नरेश शकुनिमामा उद्गारले, " पण तुम्ही कशाला घाबरताय ? तुमच्या संरक्षणासाठी पूर्ण कुरुसेना सज्ज आहे, आचार्य द्रोण, कृपाचार्य, अंगराज कर्ण, अश्वत्थामा, दुर्योधन , दु:शासन , कृतवर्मा, मद्र नरेश शल्य आणि स्वतः इतके सारे योद्धे असताना आपल्याला
घाबरायचे कारणच नाहीये."
" मी तर विचार करतोय की आजच रातोरात सिंधू देशाला निघून जाऊ म्हणतोय."
" असं अजिबात करू नका भ्राताश्री ! नाहीतर माझ्या
सैन्यात भगदड मांजेल नि सर्व सैन्याशी फारकाफारक होईल
नि अर्धी जिंकलेली लढाई पूर्णपणे हरून जाऊ आम्ही !"
" परंतु मामाश्री म्हणतात त्या प्रमाणे हे सारे योद्धे संरक्षण
करतील ना ?"
" अर्थात अर्जुनच काय यमराज सुद्धा तुमच्या पर्यंत
पोहोचू शकणार नाहीये. " दुर्योधन अभिमानाने म्हणाला.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा