Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

महाभारत ७९ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

महाभारत ७९
महाभारत ७९

 


                    महाभारत ७९

     अर्जुन स्वर्गातून दिव्य अस्त्र प्राप्त करून परतलेला  पाहून
सर्व भावंडांना फार आनंद झाला.तेव्हा युधिष्ठिर म्हणाला ,
    " तुला माहितेय अर्जुन तू गेल्यापासून आमचं मन कशातच
रमत नव्हते. सारखी तुझीच आठवण यायची!"
     " माझी ही त्याहून वेगळी अवस्था नव्हती दादा ! मला ही
तुमच्या विना तेथे करमत नव्हते."
     " पण स्वर्ग दिसायला कसे आहे दादा ?"
     " अतिसुंदर ! परंतु तुम्ही सर्व सोबत नसल्यामुळे मजा काही  घेता आली नाही मला.असं वाटायचं की माझं शरीर तेथे आहे परंतु आत्मा इथं आहे."
    " दिव्य अस्त्र मिळाले का ?"
    " हो मिळाले."
    " पाशुपाअस्त्र कसे दिसते दादा ?' नकुल ने विचारले.
    " थांब  दाखवतो." असे म्हणून मनात मंत्र म्हणताच पाशुपाअस्त्र प्रगट झाले तसे अर्जुन ने पाशुपाअस्त्र  युधिष्ठिरच्या हातात दिले. युधिष्ठिर ते नीट निरखून पहात म्हणाले ,"  जरा हे शस्त्र चालवून ह्याचा चमत्कार दाखव बरं
आम्हां सर्वांना."
     " अवश्य मोठ्या दादा !" असे म्हणून अर्जुन ने पाशुपाअस्त्र धनुष्यावर चढविले नि  प्रत्यांत खेचली नि पाशुपाअस्त्र सोडणार इतक्यात आकाशवाणी झाली , की
सावधान अर्जुन sss दिव्य अस्त्रे क्रीडा खेळण्यासाठी नसतात .दुसरी गोष्ट  म्हणजे हे  महादेवाचे अस्त्र आहे अर्थात
महादेवाचे अस्त्राचा प्रयोग करणे म्हणजे प्रकृतीचा विनाश
करणे होय. तुझ्या मनात प्रकृतीचा विनाश करण्याचा विचार असेल तर ह्या अस्त्राचा प्रयोग कर. पण खरं सांगू ? ह्या दिव्य
अस्त्राचा उपयोग मानव कल्याणासाठीच करायचा असतो.
त्यांचा दूर उपयोग केल्यास विनाश अटळ आहे." असे म्हणताच अर्जुन ने अस्त्र वापस पाठवून दिले. तसा युधिष्ठिर म्हणाला ," चल अर्जुन अगोदर स्नान करून घे.त्यानंतर थोडा विश्राम कर आणि मग आम्हाला सुध्दा स्वर्गातील गंमती जयंती सांग."
   " बरं बरं सांगतो हं ! " असे म्हणून अर्जुन   कुटीच्या दिशेने
निघाला तसे त्याचे सारे भाऊ त्याच्या मागोमाग निघाले.
  
   अर्जुन स्वर्गातून दिव्य अस्त्रे घेऊन परतल्याची खबर दुर्योधनला मिळताच दुर्योधनाची झोप उडाली. कारण  तो समजून चुकला होता , की आता युध्द होणे अटळ आहे. म्हणून त्याने युध्दाची जोरदार तयारी सुरू केली. दु:शासन नि दुसऱ्या एका व्यक्तीला सोबत घेतले नि त्या दोघांना दोन्ही कडून म्हणजे मागून आणि पुढून गदेने स्वत:वर  प्रहार करायला सांगितले. असे करून तो आपले शरीर वज्राचे करू उच्छित होता. त्यांचा सराव सुरू असतानाच तेथे कर्ण आला
नि त्यांचा हा सराव थांबविला.नि  दुर्योधनला विचारले ,
     " मित्र दुर्योधन काय हे , तू युद्धाची तयारी करण्यात इतका मग्न आहेस की तुला बाकीच्या साऱ्या गोष्टींचा तुला
विसर पडलाय की काय ? असे मला वाटू लागले."
    " पण झाले काय ते तर सांगशील."
    " दुर्योधन स्वयंवरासाठी सर्व राजे जात आहेत. तुला
स्वयंवराला जायला नाहीये का ? मला वाटतं तुला स्वयंवराला
जायला हवं ,  कारण शाल्व नरेश तुझी वाट पाहत आहे असा
त्याचा निरोप आला होता." तेव्हा  दु:शासन उद्गारला ,
    " दादा अंगराज कर्ण एकदम बरोबर बोलत आहे."
     " मग मी असं कुठं म्हणालो की माझा मित्र चुकीचे बोलतोय म्हणून. परंतु मला भीम आणि अर्जुन या दोघां व्यतिरिक्त दुसरे कुणी दिसतच नाहीये."
    " परंतु हा तर विचार कर सिंधू नरेश जयंद्रथचा संदेश आला की ते तुझ्या सोबतच जाणार आहेत. मग ते आल्यानंतर त्याना काय सांगणार आहेस ?"
     " मी त्यांना सांगेन की अर्जुन स्वर्गातून दिव्य अस्त्रे घेऊन
आला आहे याचा अर्थ त्या लोकांनी युध्द करण्याचा निर्णय
घेतलाय.शिवाय कोण जाणे अज्ञातवासात जाण्या अगोदरच
त्यांनी हस्तिनापूर वर आक्रमण केले तर ...म्हणून मी हस्तिनापूर सोडून कुठंही जाऊ इच्छित नाहीये आणि जयद्रथ
स्वतः सुध्दा एक राजा आहे , समजेल माझी अडचण !"
त्यावर बिच्चारा कर्ण काय बोलणार त्याला गप्प बसावे लागले.

     सिंधू नरेश जयंद्रथ आपल्या काही निवड सैनिकां सोबत
शाल्व नगरला जात होता. तेवढ्यात त्याला समोरून द्रौपदी
पाण्याची घागर घेऊन येत असलेली त्याला दिसली. तसा
त्याने आपल्या सारथीला रथ रोखण्याचा आदेश दिला.
     " सारथी रथ थांबव." लगेच सारथी ने रथ थांबविला.
तसा तो रथातून खाली उतरून द्रौपदीच्या दिशेने निघाला.
आपल्या समोर सिंधू नरेश जयंद्रथला पाहून तिने विचारले,
    " जावई बापू आपण इथं कसे ?"
    "  त्याचं काय आहे मी शाल्वला जात होतो. तुला पाहिलं नि रथ थांबविला. बाकी तुम्ही सर्वजण क्षेमकुशल तर आहात ना ? "
    " महादेवाची कृपा आहे , दु:शाला कशी आहे ?"
   " चांगली आहे परंतु तुझ्या पेक्षा सुंदर नाही....महाराज कुठं आहेत ?"
   " ते सर्वजण शिकार खेळायला गेले आहेत. येतीलच
इतक्यात. आमची कुटी इथंच जवळच आहे म्हणून आपण
आमच्या कुटीत चालावे आणि जल पण पान करावे, तोपर्यंत
येतीलच सर्वजण ."
    " एक सांगू ?"
    "  अवश्य !"
    " तुझी ही हालत पाहून मला फार वाईट वाटतं."
    " वाईट वाटायचे कारण ?"
    " तू एक राजकुमारी नि राजवाड्यात राहिलेली आणि आता ही अवस्था ?
    " हे बघा  जावई बापू सुख आणि दुःख हे प्रत्येकाच्या
वाट्याला येतातच असतं म्हणून त्याला घाबरून जायचं नसतं.आलेल्या प्रसंगाला धर्याने तोंड द्यायचे असतं नाही का ? आणि माझ्या बद्दल म्हणाल तर मी  इथं ही सुखी आहे आणि राजवाड्यात ही सुखी होती."
     " तू काही म्हण पण मला तुझी ही दशा पाहवत नाहीये
द्रौपदी."
   " मला माझ्या नावाने हांक मारण्याचा अधिकार आपल्याला नाहीये कारण आपण माझ्या धाकट्या नणंदेचे
पती आहात. ह्या नात्याने तर मी आपल्या पेक्षा मोठी आहे."
    " नाते बदलायला कितीसा उशीर लागणार आहे द्रौपदी
मी तुझ्या नणंदेचा पती आहे तसा तुझा पण मी पती होऊ
शकतो." तशी द्रौपदी भयंकर चिडली नि रागानेच म्हणाली,
     " जयंद्रथ मी  म्हणजे रस्त्याच्या कडेला उभे असलेले चिंचेचे झाड वाटली का तुम्हांला ?....कोणी पण या  नि त्यावर दगड मारून जा. मी इंद्रप्रस्थची पट्टराणी द्रौपदी आहे, मी सम्राट युधिष्ठिरंचा भाला,  भीमसेनांची गदा , अर्जुनचे गांडीव धनुष्य आणि नकुल सहदेवची तलवार पण मीच आहे.समजलं."
    " आहाहाहा तू रागावलीस ना की फार  सूंदर दिसतेस."
    " हे तू नाही तर तुझा काळ बोलतोय म्हणून माझे पती
इथं यायच्या अगोदर तू इथून पळायचं बघ.कारण  ते आल्यावर तुझं काय करतील हे मला सांगता येणार नाहीये."
    " मी इथून पळून जाण्यासाठी नाही आलो राणी तर तुला सोबत घेऊन जाण्यासाठीच आलोय. म्हणून बऱ्या बोलाणं चल माझ्या बरोबर नाहीतर....?
    " नाहीतर काय ?"
    " उचलून घेऊन जाईन मी तुला."
    " अगदीच कशी रे लाज सोडलीस , अरे निर्लज्ज ! तू माझा नंदावा आहेस आणि मी तुझ्या मोठ्या बहिणी सारखी आहे म्हणून स्त्री चा आदर करायला शिक मूर्ख माणसा ! कारण तुझी आई सुध्दा एक विवाहित स्त्री च होती."
  " वादविवाद करण्यात  वेळ वाया घालवू नकोस राणी कारण तुझी मदत करायला इथं कोणी नाहीये."
   " दुर्योधन असेच समजत होता की मी असह्य आहे म्हणून
तो माझा अपमान करू शकतो परंतु ती चूक तू करू नकोस."
  त्यावर तो मोठ्या ने हसला. अहाहाहा sss "
     " हसू नकोस तुझ्या ह्या हास्य मध्येच तुझ्या विनाशाचा अंकुर आहे."
    " ए s चल भरपूर ऐकलं तुझं.आता माझं ऐक."  असे म्हणून त्याने तिचा हात पकडला तसे तिच्या कमरेवर असलेली घागर खाली जमिनीवर पडली नि फुटली. तिने त्याच्या हातून सुटण्याचा खूप प्रयत्न केला.परंतु त्याच्या पुरुषी ताकदी पुढे तिची ताकद कमी पडली.त्याने तिला अलगद उचलली नि आपल्या रथात टाकली नि सारथीला रथ सिंधू देशाला घेण्याचा आदेश दिला. ती मोठ्या ने विलाप करू लागली. त्याच क्षणी पांडव शिकार करायला गेलेले परतले होते. परंतु कुटीत पांचाली नसल्याचे जाणवताच
युधिष्ठिर उद्गारला ," अरे पांचाली दिसत नाही घरात ,कुठं गेली
असेल ?" त्यावर  भीमसेन उद्गारला ," जाईल कुठं असेल इथंच कुठंतरी ! "
    " मोठ्या दादा बरोबर एवढ्या कठोर भाषेत बोलू नकोस
मजल्या दादा !"
    " बोलू दे त्याला सहदेव तू वाईट वाटून घेऊ नकोस. मला
सवय झाली आहे त्याच्या ह्या कठोर शब्दांची आणि खरं सांगू का ? त्याच्या ह्या कठोर शब्दात ही प्रेम आणि वात्सल्य दिसतेमला. " असे म्हणून युधिष्ठिर भीमाकडे पाहत बोलला ," प्रिय भीम पांचाली घराच्या बाहेर आहे म्हणून मला तिची फार चिंता वाटते. म्हणून तू आणि अर्जुन दोघेही तिला शोधायला जा. कारण हे वन आहे  , वनात काही पण घडू शकते."
    " जशी आपली आज्ञा !" असे म्हणून दोघेही तेथून बाहेर
पडले. थोडे अंतर चालून गेल्यानंतर भीमाला रस्त्यावर फुटलेल्या घागरीचे तुकडे दिसले.तसा तो अर्जुनला म्हणाला,
    " अर्जुन हे तर पांचाली च्या फुटलेल्या घागरीचे तुकडे आहेत." तेवढ्यात अर्जुनला रथांचा नि घोड्यांच्या टापांच्या खुणा दिसल्या.त्याने सूक्ष्म निरीक्षण केले असता त्यांच्या द्यानात आले की रथ कोणत्या दिशेला गेला आहे. तसे त्या
दोघांनीही आपली चालण्याची गती वाढविली. थोड्याच वेळात त्या दोघांना एक वाटसरू  भेटला. त्या वाटसरू कडे
दोघांनी चौकशी केली असता. त्या वाटसरू ने त्याना सांगितले की एका स्त्री चे जबरदस्तीने हरण करून घेऊन
गेले. तेव्हा अर्जुन ने विचारले ," किती दूर गेले असतील ते
हे सांगू शकता का ?" त्यावर ती वृध्द व्यक्ती म्हणाली ," कोस
भर दूर गेले असतील." भीमाने आपल्या चालण्याची गती अजून वाढविली. अर्जुन ने मात्र आपले गांडीव धनुष्य हातात
घेतले नि त्यावर एक बाण चढवून तो सोडला. तो बाण
सिंधू नरेश जयंद्रथ च्या रथाच्या पुढे पडला नि अग्नि प्रगट
होऊन रथांचा मार्ग अडविला. तेव्हा द्रौपदी जयंद्रथ ला उद्देशून म्हणाली ," हा बाण ओळख जयंद्रथ गांडीव धनुष्यातून निघालेला बाण आहे."  त्यानंतर एका पाठोपाठ
एक असे बाण येऊन सैनिकांना लागू लागले आणि सैनिक मृत्युमुखी पडू लागले .ते पाहून भयभीत झालेला जयंद्रथ रथ तेथेच सोडून पळत सुटला.तशी द्रौपदी त्याला म्हणाली ,
    "  आता पळतोस कुठं भ्याड ? " परंतु जयंद्रथ सारखा मागे पाहत असे  नि पुढे पळत असे पण तेवढ्यात समोरून येणाऱ्या भीमसेन वर जाऊन आदळला. भीमाने त्याला पकडले नि त्याला इतके बेदम मारले की त्याचा जीवच घेतला असता जर योग्य वेळी अर्जुन पोहोचला नसता. अर्जुन ने भीमाला जयंद्रथला जीवदान देण्याची विनंती केली. परंतु भीम त्याला काही सोडेना तेव्हा अर्जुन त्याला म्हणाला ,
     "  ह्याला दंड देण्याचा अधिकार तुला नाहीये मजले दादा ह्याला महाराजा कडे घेऊन जाऊ या !" असे म्हणताच भीमाने त्याची मान सोडली नि त्याला उचलून आपल्या खाद्यावर घेतले नि दोघेही निघाले तशी त्यांच्या पाठोपाठ द्रौपदी सुध्दा निघाली. त्यानंतर थोड्याच वेळात ते सर्वजण आपल्या कुटीत पोहोचले. भीमाने जयंद्रथ ला खाली उतरविले. तेव्हा युधिष्ठिर ने न समजून भीमाला विचारले की,
    " प्रिय भीम हा काय प्रकार आहे ? सिंधू नरेश जयंद्रथला
का पकडून आणलं इथं ?"
    " का आणलं ते त्यालाच विचारा."
    " मी तुला विचारतोय."
    " ह्या नराधमाने पांचली चे हरण केले होते.म्हणून ह्याला
मृत्यूदंड द्या."
    " ह्याला मी मृत्यूदंड देऊ शकत नाही प्रिय भीम !"
    तसा अर्जुन चिडून म्हणाला ," का नाही ह्याला मृत्यूदंड देवू
शकत ? ह्याचा अपराध मृत्यूदंड  देण्याच्या योग्य नाही आहे का  महाराज ?"
   " हां परंतु हा आपल्या बहिणीचा म्हणजे दु:शालाचा पती  आहे अर्जुन."
    " न्याय कधी पासून नात्यांचा आदर करू लागला आहे मोठ्या दादा ? ह्याला तर मृत्यूदंड च मिळायला पाहिजे. आणि मी यासाठी बोलत नाहीये की ह्याने पांचालीचे हरण
करण्याचा अपराध केला आहे. मी हा दंड यासाठी द्यायला
सांगतोय की ह्याने एका विवाहित स्त्री चे हरण करण्याचा
अपराध केला आणि ज्या राज्यामध्ये स्त्री चा अपमान करणाऱ्याला केवळ राज्याचा मेहुणा आहे म्हणून त्याला सोडलं गेले तर न्याय देवतेचा अपमान नाही का होणार ?
सहदेव उद्गारला. त्यावर युधिष्ठिर म्हणाला ," न्याय आणि अन्याय या बद्दल बोलायचे झाले तर वादी कोण आहे तुम्ही का पांचाली ? शिवाय आपल्यावर हा आरोप पण तर लागू शकतो की आपण  लोकांनी आपल्या पत्नीला एकटीला घरात सोडून शिकार करायला वनात गेलो होतो. म्हणून पांचालीलाच  ठरवू दे की ह्याला कोणता दंड द्यायला हवा."
    " असा कोणताही दंड द्या आर्यपूत्र की ज्या मुळे दु:शालाला त्याचे परिणाम भोगावे लागणार नाहीत.कारण दु:शालाचा तर यात काहीच दोष नाहीये. म्हणून ह्याला आपला दास बनवून ठेवा." त्यावर सिंधू नरेश जयंद्रथ गयावया करत म्हणाला , " माझ्यावर दया कर देवी मला मृत्यूदंड स्वीकार आहे परंतु..."
    " दंड अपराधीच्या इच्छेनुसार मिळत नाही सिंधू नरेश !
ह्याचा डोक्यावर  पाच शेंड्या ठेवून बाकी चमनगोटा करून टाका."
    " नको नको असं करू नका." सिंधू नरेश म्हणत राहिला.
परंतु भीमसेन त्याचे काही एक न ऐकता त्याच्या डोक्यावर  पाच शेंडी ठेवून  बाकी चमनगोटा करून टाकला नि मग भीम म्हणाला ,
    " आपल्या स्वामींचे चरण धर."  असे म्हणताच नाईलाजाने
सिंधू नरेश जयंद्रथ ने युधिष्ठिरचे चरण धरले. तसा युधिष्ठिर
म्हणाला ," बस्स बस्स ! तुझा दंड पूर्ण झाला.  तुझी मी आताच्या आता  दासत्वातून  मुक्तता करत आहे. "

     शकुनिमामा एकटेच बसले नि विचार करत दुर्योधन तर
आपले काहीच ऐकायला तयार नाहीये. त्याला कसे समजावे
की अजून आपल्या हातात सर्वकाही आहे जर बाणाने अचूक
वेद घेतला तर युध्द करण्याची गरजच भासणार नाहीये.पण दुर्योधनला विश्वासच नाही. काय करावे बरे ? विचार करता
करता अचानक आठवले की दुर्योधन फक्त एकाच व्यक्तीचे
ऐकेलं आणि ती व्यक्ती म्हणजे अंगराज कर्ण ! अगदी बरोबर
असा विचार करून त्याने एका दूताला आदेश दिला की कर्णाला बोलवून आण." त्या प्रमाणे कर्ण आला नि शकुनिमामा वंदन करत म्हणाला ," प्रणाम मामाश्री !"
    " ये अंगराज बैस !"
     " मी तर समजत होतो की चिंता करणे तर आमचे काम
आहे , परंतु आज आपण चिंता करत असलेले पाहून आपण
सुध्दा आमच्या जाती मध्ये आलेत मामाश्री !"
    " सारी चिंताये एक समान थोडीच असतात अंगराज. तुम्ही लोक चिंताचे विश्लेषण करत नाहीत म्हणून तुम्ही लोक
परिणाम पर्यंत पोहोचत नाहीत.दुर्योधनला तर नेत्रहीनता
त्याला त्याच्या वडिलांकडून मिळाली आहे. भावोजी तर नत्रेहीन तर आहेतच आणि माझ्या बहिणीने आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून ठेवली आहे , परंतु तुला काय झालं
आहे अंगराज ? तुला तर कळायला पाहिजे की  दुर्योधनाचे हित कशात आहे ? परंतु तुला स्वतःचे स्वार्थ साधण्या पलीकडे दुसरे येतेच काय म्हणा ?"
    " गांधार नरेश तुम्ही जर दुर्योधनाचे मामाश्री नसता तर
ह्या क्षणी मला स्वार्थी म्हणणाऱ्याची जीभ  मुळासकट छाटून टाकली असती. परंतु मी दुर्योधनाच्या उपकाराच्या ओझा खाली दबलोय. म्हणून मी हे सर्व ऐकून घेतोय इतकंच ! पण
एक सांगू ...  मी दुर्योधन साठी काही वाट्टेल ते करायला  तयार आहे. आणि मी जिवंत असेपर्यंत दुर्योधनच्या केसाला ही धक्का लागू देणार नाहीये."
   " अंगराज मी  हे केस उन्हात पांढरे केले नाहीत. माझ्या जीवनात मी अश्या अनेक गोष्टी   पाहिल्यात की ज्या अगोदर शक्य वाटत होत्या पण त्या शेवटी अशक्य  ठरल्या. जसे की  द्युतक्रीडेत मी जिंकतो अवश्य .परंतु पाण्या प्रमाणे सारे निसटून जाते माझ्या मुठीतून. आता हेच बघ ना पांडवांचा
वनवास समाप्त होणार आहे आणि आता अज्ञातवास सुरू
होणार आहे आणि अज्ञातवासच माझा अंतिम डाव आहे
अंगराज आणि इथं किती दिवसापासून मी पाहतोय की
दुर्योधन पहिल्या सारखा माझ्यावर विश्वास करत नाही. तो
मला आता प्रश्न विचारू लागला. म्हणून अंगराज  मी आज
मुद्दामच तुला बोलविले आहे. तू त्याचा मित्र आहेस आणि
तो फक्त तुझ्यावर विश्वास करतो म्हणून त्याला सांग की
तुझ्या जवळ अजून एक वर्षाचा काळ आहे आताच त्यांच्या मागे गुप्तचर पाठव. जर आपण त्याना एका वर्षात शोधू
शकलो नाही तर वर्ष संपताच युध्द होणार हे निश्चित आहे.
मला तुमच्या वीरतावर अजिबात शंका नाही. परंतु युध्द तर
युध्द असते ना म्हणून माझी अशी इच्छा आहे की युध्द
केल्याशिवाय दुर्योधन जिंकत असेल तर प्रयत्न करायला
काय हरकत आहे ? मी काय म्हणतोय ते येतंय ना तुझ्या
ध्यानात." त्यावर कर्ण काहीच बोलला नाही.परंतु चुपचाप
तेथून निघून गेला.

     दुर्योधन आपल्या बहिणी कडे गेला होता  तेव्हा त्याला
तिच्या कडून  समजले की सिंधू नरेश जयंद्रथ शाल्व  देशला गेला होता तेथून अद्याप परतलाच नाही म्हणून सिंधू नरेश
जयंद्रथला शोधण्यासाठी तो निघाला. त्याच रथ एका वनातून
जात असताना त्याची नजर एका वृक्षा खाली बसून तपस्या
करत असलेला सिंधू नरेश जयंद्रथ त्याला दिसला. त्याची ती
अवस्था पाहून दुर्योधन संभ्रमात पडला. दुर्योधन ने लगेच आपल्या  सारथीला आदेश देतो की ," सारथी रथ थांबव."
      " ओम नम शिवाय !" रथ थांबला तसा तो रथातून खाली
उतरला नि सरळ सिंधू नरेश जयंद्रथ जवळ जाऊन मोठ्या ने
हांक मारत म्हटलं ," सिंधू नरेश जयंद्रथ ? " असे म्हणताच
सिंधू नरेश जयंद्रथ ने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिले. तेव्हा
दुर्योधनाने विचारले ," आपण इथं का करत आहात ? तिथं
दु:शाला तुमची वाट पाहत आहे. आणि तुम्ही आपली ही
दशा काय करून घेतली आहे ?"
    " मी आपला हा चेहरा ना मित्रांना दाखवू शकत ना शत्रू ना
म्हणून मी महादेवाची तपश्या करत आहे."
    " परंतु तुमची ही दुर्दशा केली कोणी ?"
    " त्या पाच पांडवांनी !"
    " काय ? पांडवांनी तुझा अपमान केला ? त्याना तुझ्या सोबत असलेले त्यांचे नाते आठवले नाही का ? दु:शाला
त्यांची सुध्दा बहीण आहे हे कसे विसरले ते. पण हरकत
तुझी अशी दशा करणाऱ्याना मी कदापि माफ करणार नाहीये."
    " तुम्ही त्याना क्षमा करा अथवा करू नका. परंतु हा अपमान जयंद्रथ कदापि क्षमा नाही करणार युवराज.ह्या पाच
शेंड्या दिसताहेत ना , त्या शेंड्या नाहीत तर पाच सर्फ आहेत त्या पाच जणांना डसण्यासाठी ! अर्थात जोपर्यंत मी प्रतिशोध घेत नाही तोपर्यंत मी त्या शेंड्या तश्याच ठेवणार आहे मला
आठवण करून देण्यासाठी !"
     " त्या लोकांनी माझ्या हृदयावर अजून एक जखम केली.
दु:शाला अनाथ नाहीये सिंधू नरेश तिच्या पतीचा अपमान
करणाऱ्याना मी कदापि क्षमा करणार नाहीये. परंतु तुम्ही
आता हस्तिनापूरला चला."
    " नाही. मी आता कुठंही जाणार नाही. इथं राहून मी महादेवाची तपस्या करणार आहे आणि महादेवाला प्रसन्न
करून त्या पाचावर विजय मिळविण्याचा आशीर्वाद प्राप्त
करणार आहे." असे म्हणून पुन्हा तपस्या करण्यासाठी जयंद्रथ बसला नि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करू लागला.नाईलाजाने दुर्योधन तेथून हस्तिनापूरला जायला
निघाला.

   क्रमशः
      

टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..