महाभारत ८० | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाभारत ८० |
महाभारत ८०
सिंधू नरेश तपस्या करत असतो आणि त्याच वेळी
कैलाश पर्वतावर महादेव आपल्या समाधीतून जागे होतात
नि आपले डोळे उघडून पाहतात. तेव्हा माता पार्वती त्याना
प्रश्न करते की , आपण फार चिंतेत दिसताय प्रभू ! "
" माझ्या चिंतेचे कारण आहे सिंधू नरेश जयंद्रथ पांडवांवर
विजय मिळविण्यासाठी माझी तपस्या करत आहे."
" मग आता तुम्ही काय करणार ? आणि पांडव तर धर्तीवर
धर्माचे प्रतिबिंब आहेत.शिवाय ते नारायणच्या छत्र छायेत आहेत."
" जर माझ्या जागी तू असतीस तर काय केलं असतं देवी ?"
" मी त्याला कोणताही वरदान न वापस घालवून दिलं असतं."
" मागणाऱ्याला वापस पाठवायचं नसतं हो ना ? जर
माझ्या जवळ कोणी काही मागायला आला तर त्याच्या
भक्तीचा मी ऋणी होतो अर्थात त्याचे ऋण उतारावेच लागेल ना मला . कारण माझ्या कडे मागायला येणाऱ्याना मी खाली
हाताने कधी पाठवत नाही."
" मग काय खरंच तुम्ही पांडवांवर विजय मिळविण्याचा
वरदान देणार का त्याला ?"
" तीच तर चिंता आहे, मी त्याला हवे असलेले वरदान
देवू शकत नाही.परंतु काही ना काही तर द्यावेच लागणार .
आणि मी ते त्याला देणार ही परंतु तू अजिबात चिंता करू नकोस. फक्त चुपचाप बघत रहा. असं समज की समुद्राचे
मंथन करण्याची वेळ जवळ आली आहे."
बारा वर्षाचा वनवास काळ जवळजवळ संपत आला तेव्हा पांडवांना ही कुटी सोडून त्याना आता दुसरीकडे
कुठेतरी सुरक्षित स्थान शोधावे लागणार होते. आणि त्या
विषयी निश्चित विचार केला होता म्हणा. त्यामुळे की काय
सर्व भाऊ पांचाली सह नवीन मुक्काम स्थान शोधण्यासाठी
निघाले. बरेच जंगल तुडविल्यावर त्या सर्वांना फार तहान
लागली. द्रौपदी तर चालून चालून थकली होती. म्हणून ती
युधिष्ठिर ला म्हणाली ," आर्यपूत्र जरा इथं विश्रांती घेऊ या
नि मग पुढचा प्रवास आरंभ करू या. " त्यावर युधिष्ठिर
म्हणाला ," ठीक आहे." असे म्हणून सर्वजण एका वृक्षा खाली वृक्षाच्या सावलीत बसले. तेवढ्यात द्रौपदी म्हणाली,
" आर्यपूत्र फार तहान लागली आहे, पाणी मिळालं असतं
तर बरं झालं असतं." तेव्हा युधिष्ठिर म्हणाले ," प्रिय अनुज
सहदेव जरा ह्या वृक्षावर चढून पहा जरा. जवळपास कुठं
पाणी दिसते का ते. फार तहान लागली आहे."
" ठीक आहे दादा !"
" सांभाळून चढ हां सहदेव." अर्जुन उद्गारला. तेव्हा सहदेव आपले धनुष्य अर्जुनच्या हातात देतो नि झाडावर
चढून चोहीकडे आपली नजर फिरवू लागला.
तेव्हा युधिष्ठिर , भीम आणि अर्जुनला उद्देशून म्हणाला ," आता आपल्याला अज्ञातवासात विषयी विचार करायला पाहिजे . कारण दुर्योधन ने आतापासूनच गुप्तहेर लावले असतील आपल्या मागे.परंतु मला कळत नाही की माझ्या तेजस्वी बंधूंचे रूपे लपणार तरी कसे ? " त्यावर नकुल म्हणाला ," मजले दादा तर स्वयंपाकी एकदम चांगले शोभतील." त्यावर द्रौपदी हसून म्हणाली , " आणि जेवणाची फार रुची आहे, स्वयंपाकी बनून राहिलात तर एक वर्ष कधी निघून जाईल हे कळणार सुध्दा नाही. " तेव्हा युधिष्ठिर म्हणाला ," माझ्या भीमाला चिडवू नकोस पांचाली. परंतु तुम्हां लोकांच्या मताशी मी सहमत आहे." तेव्हा नकुल म्हणाला ," मी कुणाच्या राज्यात घोडेस्वारी सांभाळेन आणि सहदेव गोशाळा सांभाळेल."
" आणि महाराज कुण्या राज्याच्या राजदरबारात कंक
बनून राहतील. परंतु गांडीव धारी आपण कसे स्वतःला
लपविणार ?"
तेव्हा त्याला एक कोस भर दूर बंगळ्याचा थवा उंच झाडावर बसलेले दिसले. त्याचा अर्थ जवळपास कुठेतरी जलाशय नकीच असणार , असा अंदाज लावला आणि तो खाली उतरला. तसे युधिष्ठिर ने विचारले ," पाणी जवळपास आहे का कुठं ?"
" एक कोस दूर वृक्षावर बगळे बसलेले दिसतात."
" याचा अर्थ जवळपास कुठं तरी पाणी असणार तेव्हा नकुल जा नि पाणी घेऊन ये बरं." तेव्हा नकुल ने होकारार्थी
मान डोलावली नि तेथून निघाला आणि शोधत शोधत तो एका सरोवराच्या काठी पोहोचला. त्यानंतर खाली वाकून पाणी ओंजळीने पाणी घेतले. तेवढ्यात एक आवाज उमटला.
" थांब. पाणी पिण्या अगोदर माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावी
लागतील तेव्हाच पाणी प्यायला मिळेल." त्यावर नकुल
प्रत्युत्तर मध्ये बोलला ," आणि मी प्यालो तर काय करशील ?"
" पियुन तर बघ." असे म्हणताच नकुल पाणी प्याला. तसाच मृत होऊन जमिनीवर कोसळला. बराच उशीर
झाला तरी नकुल आला नाही म्हणून युधिष्ठिर ने सहदेवला
पाठविले. तसा सहदेव तेथून निघाला नि थोड्याच वेळात
सरोवरा जवळ पोहोचला. तेव्हा त्याला त्या आवाजाने अर्थात
यक्षाने रोखले. परंतु सहदेव ने त्याचे म्हणणे न जुमानले
नाही आणि त्याने ही पाणी प्याले. परिणाम व्हायचा तोच झाला. सहदेव ही तेथेच मरून पडले. सहदेव ही आला नाही म्हणून युधिष्ठिर अर्जुनला म्हणाला ," नकुल सहदेव अजून कसे आले नाहीत? त्यांच्या सोबत काही अघटीत तर घडलं
नसेल ना ? जाऊन तर बघ ना जरा. मला फार चिंता वाटू लागली आहे त्यांची."
" आपण अजिबात चिंता करू नका त्यांची मी जाऊन
पाहतो." अर्जुन म्हणाला नि निघाला. थोड्याच वेळात अर्जुनही सरोवराजवळ पोहोचला. आपले दोन्ही भाऊ मृत्युमुखी पडलेले पाहून तो भंयकर चिडला नि म्हणाला ," कोणी मारले माझ्या बंधूंना ? ज्याने कोणी हे कृत्य केले आहे
त्याने निमूटपणे माझ्या समोर येणे."
" ह्यांची हत्या मी केली आहे." यक्ष प्रगट होऊन म्हणाला.
" का मारलेस त्यांना ?" अर्जुनाने विचारले.
" हे सरोवर माझे आहे , ह्या दोघांनी माझ्या सरोवरातील
पाणी पिण्याचा अपराध केला."
" त्याना तहान लागली होती."
" तहान लागली म्हणून काय दुसऱ्याच्या सरोवरा मधले
पाणी चोरून पिणार का ? जर तुम्हाला सुद्धा पाणी प्यायचे
असेल अथवा घेऊन जावयाचे असेल तर अगोदर माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. नाहीतर तुमची सुध्दा तीच अवस्था होईल जी तुमच्या बंधूंची झाली आहे." त्यावर अर्जुन चिडून म्हणाला ," पाणी आणि वारा ह्यावर प्रत्येक प्राण्यांचा अधिकार आहे. अर्थात ह्या सरोवर तुझा काही अधिकार नाहीये. म्हणून मी तुझ्या प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय मी स्वतः
पाणी पिणार आणि सोबत घेऊन ही जाईन आणि जर का तू
मला रोखण्याचा प्रयत्न जरी केलास तरी एका बाणाने तुझ्या
सरोवरातील सारे पाणी आटवून टाकीन समजलं का ?"
" पाणी पिऊ नकोस अर्जुन ऐक माझं.....माझ्या प्रश्नांची
उत्तरे दिल्याशिवाय माझ्या सरोवरातील पाणी कोणीही पिऊ शकणार नाही." परंतु अर्जुन त्याचे न ऐकता बेफिकीर पणे पाणी प्याले नि मरून जमिनीवर कोसळले. खूप उशीर झाला तरी अर्जुन माघारी आला नाही म्हणून युधिष्ठिर ने भीमाला म्हटलं , भीम अर्जुनही आला नाही तेव्हा जाऊन बघ जरा तेथे काय घडलंय ते." तेव्हा भीम उद्गारला ," बरं. मी जाऊन पाहतो." असे म्हणून भीम तेथून निघाला तो शोधत तेथेच पोहोचला. जेथे त्याचे भाऊ मरून पडले होते. त्यांची ही झालेली अवस्था पाहून भीम भयंकर चिडला नि इकडे तिकडे
नजर फिरवून पाहिले .परंतु कोणीच काही दिसले नाही. तसा तो ओरडून म्हणाला ," माझ्या बंधूंची ज्याने कोणी हत्या केली आहे त्याने माझ्या समोर यावे." असे म्हणताच यक्ष प्रगट झाला. तसे भीमाने विचारले की माझ्या बधुंची तू हत्या केलीस का ?"
" हां मीच केली."
" का ?"
" त्यांनी माझ्या प्रश्नांची उत्तरे न देता माझ्या सरोवरातील
पाणी प्याले. म्हणून तुला देखील माझी चेतावणी आहे की
माझ्या प्रश्नांची उत्तरे न देता जर पाणी प्यालास तर तुझी अवस्था तुझ्या बंधू प्रमाणेच होईल."
" ठीक आहे ,मग मी तुला पाणी पिऊन हे सिध्द करून
दाखवितो की ह्या पाण्यावर तुझा काहीही अधिकार नाहीये.
आणि मग माझ्या बंधूची हत्या केल्या बद्दल तुला त्याचा दंड
देईन." असे म्हणून भीम त्या सरोवरातील पाणी प्याला नि
लगेच मरून पडला. थोड्या वेळाने युधिष्ठिर तेथे पोहोचला.
आपल्या सर्व भावंडांना मृत अवस्थेत पाहून तो विचार करू
लागला , की कोण असेल बरं हा ? अर्जुन सारख्या धनुर्धरची हत्या करणारा ? मनुष्य तर नक्कीच नाही. मग कोण असेल हा ? परंतु ह्यांच्या शरीरावर एक पण घाव दिसत नाही. याचा अर्थ ह्या सरोवरातील पाणी विषारी तर नाही ना ? पाणी
पाहून तर असं वाटत नाही की पाणी विषारी असेल ! परंतु
गांधार नरेश शकुनीचा काही भरवसा नाही. तो काहीही करू
शकतो. परंतु शरीरावर विषाची चिन्ह सुध्दा उमटलेली नाहीत. त्यामुळे पाणी विषारी नाहीये. मग ह्यांची हत्या कोणी
केली नि का केली असेल ? मला वाटतं ह्या सरोवरा मध्येच काही तरी रहस्य लपले आहे पण हे कळणार कसं ? पाणी
पिऊन पाहतो म्हणजे खरे कारण कळेल. असा विचार करून
जसे त्याने पाणी ओंजळीत घेतले. तसा एक आवाज उमटला- थांब. पाणी पिण्याच्या अगोदर माझ्या प्रश्नांची
उत्तरे द्या. " तसा युधिष्ठिर ने विचारले की , आपण कृपा करून मला हे सांगा की आपण रुद्र , वसू , मरुद्ध देवता या पैकी कोण आहात आपण ?"
" मी यक्ष आहे आणि मीच तुझ्या ह्या वीर बंधूंची ही दशा
केली आहे.मी या सर्वांना रोखले होते की माझ्या सरोवरा मधील पाणी पिण्या अगोदर माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या.परंतु ते ऐकलेत नाहीत , म्हणून मृत्युमुखी पडले. तुला जर पाणी
प्यायचे असेल तर तुला ही माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील."
" मी प्रयत्न अवश्य करीन. विचार प्रश्न ...?
यक्ष : भूमि पेक्षा जास्त जड वस्तू कोणती आहे ?"
युधिष्ठिर : आपल्या उदरात मूल ठेवणारी माता भूमि पेक्षा
जड असते.
यक्ष : आकाशापेक्षा उंच कोण आहे ?"
युधिष्ठिर : पिता."
यक्ष : वाऱ्या पेक्षा तीव्र गती कोणाची आहे ?"
युधिष्ठिर : मनाची !"
यक्ष : जन्माचे कारण काय आहे ?"
युधिष्ठिर : अतृप्त इच्छा , कामना , आणि कर्मफल
हेच जन्म घेण्याचे कारणे आहेत."
यक्ष : मृत्यूच्या जवळ असलेल्या पुरुषाचा मित्र कोण आहे ?"
युधिष्ठिर : दान, कारण मृत्यूनंतर फक्त दानच मनुष्या सोबत असते."
यक्ष : धर्म , यश , स्वर्ग अथवा सुखाचे मुख्य स्थान काय आहे ?"
युधिष्ठिर : धर्माचे मुख्य स्थान आहे दक्षता , यश चे मुख्य
स्थान आहे दान, स्वर्गाचे मुख्य स्थान आहे सत्य , आणि सुखाचे मुख्य स्थान आहे शील.
यक्ष : मनुष्याचा आत्मा काय आहे ?"
युधिष्ठिर : पुत्र.
यक्ष : जगाला कोणत्या वस्तू ने झाकले आहे ?"
युधिष्ठिर : अज्ञान.
यक्ष : आळस म्हणजे काय आहे ?"
युधिष्ठिर : धर्म न करणे आळस आहे.
यक्ष : सुखी कोण आहे ?"
युधिष्ठिर : जो ऋणी नाही.
यक्ष : खरं स्नान कोणते ?"
युधिष्ठिर : जो आपल्या मनातील मळ स्वच्छ करील.
यक्ष : काजळ पेक्षा काळे काय आहे ?"
युधिष्ठिर : कलंक.
यक्ष : लोका मध्ये श्रेष्ठ धर्म कोणता ?"
युधिष्ठिर : दयाभाव हाच श्रेष्ठ धर्म आहे.
यक्ष : कोणाला वश ठेवले तर शोक होत नाही ?"
युधिष्ठिर : मनाला वश ठेवले तर शोक होत नाही.
यक्ष : लज्जा काय आहे ?
युधिष्ठिर : न करण्या योग्य कामापासून दूर राहणे ह्यालाच
लज्जा म्हटलं जाते."
यक्ष : दया काय आहे ?
युधिष्ठिर : सर्वांच्या सुखाची इच्छा करणे ह्याला दया असे म्हणतात.
यक्ष : राष्ट्राच्या मृत्यू चे कारण काय आहे ?"
युधिष्ठिर : अराजकता
यक्ष : हे राजन वास्तविक ब्राह्मणत्वाचे प्रमाण काय आहे ?
कुल , चरित्र , शास्त्र ,या शास्त्रज्ञान
युधिष्ठिर : हे यक्ष कुल , शिक्षा हे ब्राम्हणत्व सिध्द करत नाही. ब्राम्हणाचे प्रमाण निःसंदेह चारित्र्यच आहे. एक चांगले
चारित्र्य असलेला शूद्र सुध्दा त्या ब्राह्मणा पेक्षा श्रेष्ठ ठरतो.
कारण जो मनुष्य जन्माने तर ब्राम्हण आहे आणि शास्त्रांचा
ज्ञान सुध्दा आहे . परंतु त्याचे चारित्र्य चांगलं नसेल तर ब्राम्हण असून नसल्या सारखा आहे.
यक्ष : गवता पेक्षा तुच्छ काय आहे ?"
युधिष्ठिर : चिंता.
यक्ष : कोणती वस्तू हरवल्यावर जास्त दुःख होते ?
युधिष्ठिर : क्रोध
यक्ष : संसार मध्ये सर्वांत मोठी आश्चर्याची गोष्ट कोणती ?
युधिष्ठिर : सर्वांत आश्चर्याची गोष्ट ही आहे की प्रत्येक
मनुष्याला माहीत आहे की मृत्यू अंतिम सत्य आहे, की जो प्राणी जन्माला आला आहे त्याला एक ना एक दिवस मृत्यू प्राप्त होणारच आहे ; परंतु तरी ही तो विचार करतोय की कदाचित मृत्यू हे अंतिम सत्य नाहीये. अर्थात आपण अमरत्व प्राप्त करू शकतो. हेच सर्वात महान आश्चर्य आहे." त्यावर यक्ष खुष होऊन म्हणाला ," भरतश्रेष्ठ तू माझ्या
सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली आहेस म्हणून मी तुझ्यावर
प्रसन्न झालोय म्हणून चार बंधू पैकी एक बंधुला जीवदान मी
देऊ शकतो तेव्हा बोल तू कोणाला जीवित पाहू इच्छित आहेस ?"
" जर ह्या चारांमधून एकच जिवंत होणार असेल तर हे
यक्ष मी आपल्या प्रिय अनुज महावीर नकुल ला जिवंत पाहू
इच्छितोय." त्यावर यक्ष ने प्रश्न केला की हे कुंती नंदन भीम
आणि अर्जुन सारख्या बंधूंना सोडून तू नकुलला जिवंत
करण्याची इच्छा का केलीस ?"
" माझ्यासाठी कुंतीमाता आणि माद्री मध्ये काही फरक
नाहीये. मी दोन्ही मातोश्रीशी समान भाव ठेवतो. म्हणून भीम
अथवा अर्जुनला जिवंत करण्याची इच्छा केली असती तर
मातोश्री माद्री वर अन्याय झाला असता. मातोश्री कुंतीच्या तीन पुत्रा पैकी एक पुत्र म्हणजे मी जिवंत आहे. म्हणून माझी
इच्छा मातोश्री माद्री हिचा सुध्दा एक पुत्र जिवंत असावा. कारण मातोश्री माद्री ला वाटू नये की मी तिच्या सोबत अन्याय केला. म्हणून माझ्या चार बंधू मधून एकच जिवंत होणार असेल तर मला माझ्या प्रिय धाकट्या बधुंस अर्थात नकुलला जिवंत पाहू इच्छितोय. जर मातोश्री कुंती चा एक पुत्र जिवंत आहे तर मातोश्री माद्री चा पण एक पुत्र जिवंत असावा.
" आणि जर मी म्हणालो असतो की तुझे दोन बंधू जिवंत
होऊ शकतील, तर तू दुसरे नाव कोणाचे घेतले असते ?"
" तर मी दुसरे नाव सहदेव चे घेतले असते , कारण सहदेव
भीम आणि अर्जुन पेक्षा लहान आहे."
" तुझ्या या उत्तराने मी अति प्रसन्न झालोय भरत श्रेष्ठ
तू भरतवंशाचा गौरव आहेस म्हणून तुला तुझे सारे भाऊ जिवंत मिळतील."
" भगवन्त आपण यक्ष असू शकत नाही. कारण यक्ष
कोणाला जीवदान देवू शकत नाही. म्हणून आपण कोणते
देवता आहात ? कृपया आपला परिचय द्या."
" हे कुंतीपुत्र मी धर्मराज आहे आणि तुला भेटण्यासाठीच
इथं आलो होतो. तुझं मंगल होऊ दे." असे म्हणून ते अदृश्य
झाले." तसे चार ही पांडव जिवंत झाले. त्यानंतर सर्वजण
निघाले. तेवढ्यात पांचाली पळत त्यांच्या जवळ आली नि
म्हणाली ," आर्यपूत्र !"
" काय झालं पांचाली ?"
" दुर्योधनाचे गुप्तहेर आपल्याला शोधत इथपर्यंत येऊन
पोहोचले." पांचाली उत्तरली. तेव्हा अर्जुन म्हणाला ," चिंता
करू नकोस पांचाली. " असे म्हणून अर्जुन ने आपल्या
गांडीव धनुष्यावर बाण चढविला नि मंत्र म्हणून आकाशाच्या
दिशेने सोडला आणि थोड्याच वेळात सर्वत्र धुके पसरले.
आणि त्याच संधि चा फायदा घेऊन पांडव फरार झाले.
अभिमन्यू अंगावर युद्धावर जाण्याच्या वेळी जे वस्त्र चढवित असतो तेवढ्यात तेथे सुभद्रा येते नि त्याला विचारू
लागली की , पुत्र अभिमन्यू sss
" प्रणाम माताश्री !"
" आयुष्यमान भव !"
" तू कुठं युद्धावर निघाला आहेस का ?"
" नाही मातोश्री परंतु मामाश्री चे म्हणणे आहे की जोपर्यंत
सेनापती कृतवर्मा पराजित करत नाही तोपर्यंत ते मला योध्दा
म्हणणार नाहीत."
" काय द्वारीकेच्या सेनापतीला हरविणार ?"
" का नाही महावीर बनण्यासाठी महारथीला पराजित
करावेच लागेल. आणि आपण हे विसरू नका मातोश्री की
मी वसुदेव कृष्णा चा शिष्य आहे ते मला नेहमी सांगत असतात की पुत्र अभिमन्यू इतिहास तुझी वाट पाहतोय .परंतु
ते मला हे सांगत नाहीत की इतिहास माझी कुठं वाट पाहत
आहे ?"
" जर तुझे मामाश्री सांगत आहेत की इतिहास तुझी वाट
पाहतोय तर अवश्य वाट पाहत असेल. परंतु तुला हे सिध्द करावे लागेल की तुझी इतिहास वाट पाहण्यासाठी तू योग्य
आहेस का ? "
" आपला आशीर्वाद मातोश्री !"
" आयुष्यमान भव !"
त्यानंतर अभिमन्यू तेथे आला जेथे कृतवर्मा त्याची वाट
पाहत होता नि कृतवर्मा ने तलवार उपसून म्हणाला ,
" सावधान वत्स !"
" आपण मला वत्स म्हणून निःशस्त्र केलं कृतवर्मा जी खरे सांगायचे तर मी ह्या क्षणी आपला प्रतिस्पर्धी आहे." तेवढ्यात तेथे श्रीकृष्ण पुढे येत म्हणाले ,
" प्रिय अभिमन्यू युध्दा मध्ये सर्वकाही शक्य आहे जसे की तुला अश्या लोकांशी सुध्दा युध्द करावे लागेल की ज्यांना तुला वत्स म्हणण्याचा अधिकार सुद्धा आहे. पण तरी देखील
तुला त्यांच्याशी युध्द करावे लागेल. कारण अश्या युद्धा मध्ये कोणी कुणाचा नसतो, म्हणून तलवार उचल आणि कृतवर्माशी युध्द कर."
" जशी आपली आज्ञा !" असे म्हणून अभिमन्यू सेनापती
कृतवर्मा कडे पाहत म्हणाला ," आपण माझ्या पेक्षा मोठे
आहात म्हणून मला आपण आशीर्वाद द्या. " असे म्हणून
अभिमन्यू त्याना वंदन केले. तसा त्यांनी " विजयी भव !"
असा आशीर्वाद दिला व ते पुढे म्हणाले ," खरे सांगायचे तर
तू खरोखरच आपल्या मामाश्रीचा शिष्य आहे युद्ध आरंभ होण्यापूर्वीच विजयी होण्याचा आशीर्वाद मिळविला."
त्यानंतर युद्धाला सुरुवात झाली. दोघांची चांगलीच जुंपली.
कोणी ही हटेना परंतु शेवटी कृतवर्माच्या हातून तलवार खाली पडली नि अभिमन्यू विजयी ठरला. तेव्हा अभिमन्यू ने
त्याना वंदन केले. तेव्हा कृतवर्मा ने त्याला आशीर्वाद दिला
नि श्रीकृष्णा कडे वळून ते पुढे म्हणाले ," वसुदेव हा युवक
असा आहे की भीम आणि अर्जुन सुध्दा त्याच्यावर अभिमान करतील." त्यावर वसुदेव श्रीकृष्ण म्हणाले , " ते तर त्याच्यावर अभिमान करतीलच पण मला स्वतःला त्याच्या बद्दल अभिमान आहे आणि त्याचे वैरी सुध्दा त्याचे नाव
आदरपूर्वक घेतील."
" परंतु माझे शत्रू कोण आहेत मामाश्री ?"
" कोणी साधारण तर तुझे शत्रू असणार नाहीत तर महावीर , महारथी ही तुझा शत्रू होण्याचा प्रयत्न करतील."
दुर्योधनाला पांडवांचा एवढा तिरस्कार की त्याने गदा युद्धाचा अभ्यास करण्यासाठी त्याने भिमा चा लोखंडी पुतळा
तयार करून घेतलेला असतो. त्या पुतळ्यावर गदा मारून
गदा युद्धाचा अभ्यास करत असतो. तेवढ्यात तेथे दु:शासन
आला. त्याच्या चेहऱ्यावर उमटलेल्या चिन्हा वरून दुर्योधन
समजला की वार्ता शुभ नाहीये. म्हणूनच दुर्योधन विचारले,
" मला वाटतं की तू शुभ वार्ता नाही आणलीस होय ना ?"
" दादा, सारे गुप्तहेर निराश होऊन परत आले आहेत."
" काय निराश होऊन परत आले ? पण ते तर त्यांच्या
पाठलागावर होते ना ?"
" ते सांगत आहे की अचानक धूर कुठून आला काय माहीत ? पुढचे काहीही दिसेना आणि जेव्हा धूर गायब
झाला तेव्हा ते पांडव पण गायब झाले होते. "
" गायब झाले ....कसे गायब झाले ? त्याना जमीन ने
गिळले की आकाशात उडून गेले. दु:शासन त्याना म्हणावे
त्यांचा पत्ता शोधून काढा. नाहीतर ह्या पुतळ्याच्या जागी मी
त्याना उभे करीन आणि गदे मारून त्यांचा जीव घेईन."
असे म्हणून पुन्हा रागाने पुतळ्यावर प्रहार करू लागला.
पांडवांचा अज्ञातवास सुरू झाला होता. दुर्योधनाचे
गुप्तहेर सर्वत्र त्यांचा शोध घेत होते. पण यश येत नव्हते.
म्हणून दुर्योधन मोठ्या चिंतेत होताच पण गंगापुत्र भीष्म सुध्दा चिंतेत होते. दोघांच्या चिंतेत जमीन आसमानाचा फरक होता म्हणा. दुर्योधनाची चिंता यासाठी होती की त्याला पांडवांचा शोध लागत नव्हता. तर गंगापुत्र भीष्मांची चिंता
यासाठी होती की पांडवांचा अज्ञातवास संपल्या नंतर काय होईल ? तसे त्यांनाही चांगले माहीत होते की युध्द निश्चितच
होणार आहे परंतु त्यांचे मन मात्र हे मानायला तयार नव्हते की असेच होईल. म्हणून की काय ते महामंत्री विदूला आपल्या कक्षेत बोलवतात. त्यांच्याशी विचारविनिमय करतात. त्यांनी विदूरला विचारले की, विदुर पांडवांचा अज्ञातवास सुरू झाला. तेव्हा हे वर्ष हस्तिनापूरला फार
कठीण जाणार आहे. माझ्या मनात तर कधी कधी असे विचार येतात की दुर्योधनच्या गुप्तहेरांनी पांडवांना ओळखले
तर काय होईल ?" त्यावर विदुर उलट प्रश्न करतो की , आणि
नाही ओळखू शकले तर ?" त्यांच्या मनात जे आहे ते न सांगता ते म्हणाले ,
" फार काही नाही पांडव महाराज धृतराष्ट्राना भेटायला
येतील. मग महाराज त्यांना इंद्रप्रस्थ देतील आणि ते इंद्रप्रस्थाला जातील."
" आपल्याला खरंच असं वाटतं की दुर्योधन त्यांचे इंद्रप्रस्थ
राज्य त्याना परत देईल ?"
" का नाही देणार ? द्यायलाच लागेल ते त्याला."
" मग तर आपण दुर्योधनाला ओळखलेच नाहीये. कारण
दुर्योधनला त्यांचे इंद्रप्रस्थ हवे म्हणून तर त्याने द्युतक्रीडा
खेळून कपटाने त्यांचे राज्य बळकावले. वस्त्रहरण करविले.
परंतु हातात आलेले सर्व गमावल्यामुळे त्याने बारा वर्षाचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास हा पण ठेवला.आणि
त्यात ही एक अशी अट ठेवली की अज्ञातवासात जर पांडव
ओळखले गेले तर पुन्हा बारा वर्षाचा वनवास नि एक वर्षाचा
अज्ञातवास पांडवांनी स्वीकारावा याचा अर्थ पांडवांनी कायम
वनवास भोगत राहावे नि आम्ही राजसुख भोगावे असा त्याचा अर्थ नाहीये का ?
" दुर्योधन असे करू शकणार नाहीये."
" हे तर आपण आपल्या मनाची समजूत काढण्यासाठी
बोलत आहात तातश्री नाहीतर आपल्याला ही चांगले माहीत
आहे की दुर्योधन काय करू शकतो ? कारण त्याला स्वतःचे
मत असे नाहीच आहे त्याला गांधार नरेश शकुनी त्याला जसे
सांगेल तेच तो ऐकेल. आपल्याला जर असे वाटत असेल की
दुर्योधनाच्या बाजूने आपल्याला युध्द करायला लागू नये तर
महादेवला सांगा की पांडवांचे अज्ञातवास सफल होऊ नये."
" पांडवांना त्यांचा अधिकार मिळू नये हे देखील मला मान्य
नाहीये. माझी इच्छा आहे की दोघेही सुखी राहावेत. एक
हस्तिनापूरात आणि दुसरा इंद्रप्रस्थाला."
" परंतु आपण अशी का इच्छा करता ?" विदुर उद्गारला.
पण का कुणास ठाऊक त्याना संशय आला म्हणून त्यांनी
विचारले ," तुला माहीत आहे का पांडव ह्या वेळी कुठं आहेत
ते ?" असे विचारताच विदुर गडबडला. पण लगेच स्वतःला
सावरत तो म्हणाला ," हां ते अज्ञातवासात आहेत."
" विदुर तू मला आपल्या चतुर वक्तव्यात अडकवू नकोस.
लाक्षागृहाची दुर्घटनाच्या वेळी तू तेच केलेस आणि आता हा
अज्ञातवास त्याचाच परिणाम आहे.जर तू कर्ण , दुर्योधन ,
शकुनी च्या कारस्थान बद्दल मला वेळीच सांगितले असतेस
तर युधिष्ठिर आणि त्याच्या भावंडांना मारण्याचा कट केल्या
बद्दल मी महाराजा कडून मृत्यूदंडाची शिक्षा द्यायला भाग पाडले असते नि महाराज सुध्दा पुत्र मोहा ने काही करू
शकले नसते. परंतु ती वेळ आता निघून गेली. आता आपण
फक्त एवढंच करू शकतो. येणाऱ्या संकटाशी सामना करणे
बस्स ! एवढं च उरले आपल्या हाती."
महामंत्री विदुर आणि गंगापुत्र भीष्म या दोघांनाही माहीत
असते की आपण जशी आशा करतोय तसे कदापि होणार
नाहीये.कारण धृतराष्ट्र , शकुनी आणि दुर्योधन हे हस्तिनापूर
साठी अभिशाप आहेत.परंतु खोटी आशा बाळगणे मनुष्याचा
स्वभावगुणच आहे नाही का ? इकडे विदुर आणि गंगापुत्र भीष्म चिंतेत तर दुसरीकडे गांधारी नि कुंती चिंतेत.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा