महाभारत ४६ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाभारत ४६ |
४६
धृतराष्ट्रा बाहेतून हाका मारतात परंतु गंगापुत्र भीष्म
काही दरवाजा उघडायला तयार झाले नाहीत. शेवटी कंटाळून
महाराज धृतराष्ट्र म्हणाले ," नाही विदुर, आता तर माझा देखील आवाज त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाहीये. परंतु
तुला देवाने डोळे दिले आहेत तेव्हा तू त्यांच्या कक्ष मध्ये जाऊन पाहू शकतोस की त्यांची अवस्था काय आहे. मी त्यांच्याकडे जाऊ शकत नाही. कारण देवाने मला डोळे दिले नाहीत. परंतु तू तर जाऊ शकतोस ना त्यांच्याकडे."
" त्यांच्या परवानगी शिवाय मीच काय परंतु प्रत्यक्ष यम जरी आला तरी त्याला त्यांच्या परवानगी शिवाय त्यांच्या कक्षेत जाता येणार नाहीये. म्हणून ते स्वतःच्या मर्जीने जोपर्यंत बाहेर येत नाहीत तोपर्यंत वाट पाहणे हे एकच काम
आता उरले आहे आपल्यापाशी !"
" तुझं म्हणणं अगदी खरं आहे. चल मला माझ्या कक्षेत
नेऊन सोड."
" बरं. चला." विदुर आपल्या मोठ्या बंधू चा हात पकडतो नि त्यांच्या भवनाच्या दिशेने निघून गेले.
काही दिवसानंतर जेव्हा दुःखाचा पूर ओसरला तेव्हा
गंगापुत्र भीष्म आपल्या कक्षेतून बाहेर पडले आणि कुणाशीही न बोलता सरळ गंगेच्या काठावर गेले नि गंगा नदीत प्रवेश केला आणि आपल्या ओंजळीत मृत व्यक्तीला जशी अर्ध्य देण्यासाठी जलांजली उचलली तशी गंगामाता पाण्याच्या वर येऊन त्याना म्हणाली ," पुत्र तू पांडू पुत्राना अर्ध्ज जलांजली वाहू नकोस ?"
" आई ,असं का बरं बोलते आहेस तू ? पांडू पुत्र अंतिम
संस्कार चे भागीदार नाहीयेत का ?" त्यावर गंगामाता उद्गाली,
" अंतिम संस्कार मृत व्यक्तीचे केले जातात पुत्र जिवंत
व्यक्तीचे नाहीत . आता ते वाचले कसे ? ते फक्त विदुरला विचारून घे." तेव्हा त्यांच्या मागोमाग विदुरही आला होता. तो उद्गारला ," नमस्ते तातश्री !" तसे गंगापुत्र रागाने गर्रकन मागे वळून विदूरला त्याचा जाब विचारले , " पांडु पुत्र जिवंत आहेत आणि तू मला एका शब्दाने देखील सांगितले नाहीस ? का अंधःकारात ठेवलेस मला ?...... हे मात्र तू चांगले केले नाहीस विदुर ."
" क्षमा असावी तातश्री ! परंतु राजनीती हेच सांगते."
" तुला राजनीती मीच शिकविली आणि तू आता मला शिकवितोस ? "
" जर मी आपल्याला तेव्हाच सांगितले असते की दुर्योधन आपल्या शकुनी मामाच्या नादी लागून पांडू पुत्राना आगीत
जाळून मारण्याचा कट रचत आहेत तर आपण काय केलं असतं ?"
" काय केलं असतं , हे तू मला विचारतोहेस ?"
" हां तातश्री !"
" मी धृतराष्ट्राला जाऊन त्याचा जाब विचारला असता."
" परंतु दादाला त्या कुटील कारस्थान विषयी फारसे
माहीत नाहीये."
" त्याला माहित नसले म्हणून काय झालं ? मी दुर्योधनला त्याचा जॉब अवश्य विचारला असता. "
" म्हणूनच तर मी आपल्याला संगितले नाही. कारण राजनीतीचे ज्ञान आपल्या कडूनच मिळाले आहे तातश्री ! आपण मला सांगितलं आहे की राजनीती साठी हे आवश्यक आहे की खऱ्या- खोट्याची शहानिशा करून त्या मागची वास्तविकता काय आहे हे जाणून घेणे फार गरजेचे आहे , आणि त्याचे योग्य वेळी सर्व पुराव्यानिशी लोकांसमोर मांडणे
हेही तेवढेच महत्वाचे आहे. म्हणून जर मी आपल्याला तेव्हाच सांगितले असते तर आपण लगेच दुर्योधन पाशी गेले असता. त्याने काय झालं असतं .... कारस्थान तर तात्पुरते टळलं असते , परंतु त्या मागचा त्यांचा खरा उद्देश काय आहे हे कधीच कळलं नसतं आपल्याला . दुर्योधन आपल्या मामाच्या नादाला लागून किती खालच्या पातळीवर उतरला
अशे, याची यावरून कल्पना येते. शिवाय त्या लोकांची या
पुढची काय योजना आहे हेहो आपल्याला कधीच कळलं नसतं. म्हणून मी आपल्याला सांगितले नाही.त्या बद्दल क्षमा
असावी. " त्यावर गंगापुत्र भीष्म उद्गारले ," ठीक आहे ठीक आहे , परंतु पांडव आता आहेत कुठं ?"
" जिकडे ते आहेत ना तिकडे एकदम सुरक्षित आहेत."
कुंती
दिवसभर पायी चालून चालून सर्वांचे तर पाय दुखू लागलेच होते परंतु त्यात खास करून माझे आणि माझ्या सहदेव पुत्राचे ही पाय दुखत होते आम्हां दोघांची तर चालण्याची अजिबात इच्छा नव्हती. म्हणून मी आपल्या पुत्राना म्हणाली ," आता बस्स करा, माझ्याने अजिबात चालवत नाही म्हणून थोडी इथं विश्रांती घेऊया." त्यावर युवराज युधिष्ठिर त्या सर्वांना उद्देशून म्हणाला," आपण इथं फार काळ थांबू शकत नाही. कारण येणाऱ्या- जाणाऱ्या कुण्या व्यक्ती ने आपल्याला इथं पाहिलं तर फार मोठी पंचायत होईल. आणि आपण जिवंत असल्याची खबर
सर्वांना मिळेल. म्हणून इथं न थांबता सरळ चालतच राऊया."
तेव्हा मी उद्गारली ," परंतु माझ्या आता पायात चालण्यासाठी अजिबात त्राण नाही." त्यावर युधिष्ठिर उद्गारला," आपली आज्ञा शिरसावंद्य आहे मातोश्री ! परंतु इथं आपण जास्त वेळ थांबू शकत नाहीये." तेव्हा भीमसेन उद्गारला ," आपण असं करूया."
" कसं ?"
" आई , नकुल ,सहदेव ह्या तिघांना नसेल चालायचे तर
नको चालू द्या. पण आपण तिघेजण तर चालू शकतो ना ?"
" म्हणजे आईला नि ह्या दोघांना इथंच सोडावयाचे ? असं
कसं बोलू शकतोस तू मजल्या दादा ?"
" अरे पण अर्जुन मी ह्या तिघांना इथंच सोडावयाचे असे
बोललोच नाही मुळी !"
" मग तुझ्या म्हणण्याचा अर्थ तरी काय ?" युधिष्ठिर न कळल्याने विचारले.
" मी म्हटलं , आपण तिघांनी चालू या या तिघांना नसेल
चालायचे ते नको चालू द्या."
" पुन्हा तेच . तुला नेमके काय सांगायचे आहे ?" युधिष्ठिर किंचित चिडून उद्गारला.
" अरे दादा..... थांब ! आता मी तुला कृतीच करून दाखवितो म्हणजे तुझ्या द्यानात येईल." असे म्हणून भीमसेन
ने मला उचलून आपल्या खांद्यावर घेतले नि नकुल,सहदेव ला त्याने आपल्या दोन्ही दंडावर घेतले. आणि दोन्ही बाजूला मदतीला म्हणून युधिष्ठिर आणि अर्जुन ने आपल्या हातांचा आधार दिला आणि आता ते तिघेही चालू लागले. खूप अंतर चालून गेल्यानंतर मी युधिष्ठिरला म्हणाली ," पुत्र युधिष्ठिर , आता चालणे खूप झाले.आता थोडी विश्रांती घेऊया. जर कुणी ओळखलेच तर भले ओळखू दे , परंतु इथं थांबणे आता फार गरजेचे झाले आहे. " त्यावर युधिष्ठिर उद्गारला ," जशी आपली आज्ञा मातोश्री !" एक उंचपूर्ण झाड पाहून त्या झाडाच्या सावलीत बण्याच्या उद्देशाने मी त्या झाडाखाली आली नि सर्वांना तेथे येण्यासाठी मी म्हटले ," या पुत्रांनो इथं सारे !" तसे सर्वजण माझ्या शेजारी येऊन बसले. भीमसेन मात्र बसला नाही , तो उभाच राहिला. तेव्हा मी त्याला उद्गारली ," पुत्र भीम फार तहान लागली आहे रे मला जरा पाणी आणून देतोयस का रे ?"
" जशी आपली आज्ञा आई !" असे म्हणून पाण्याच्या
शोधार्थ भीम निघाला. परंतु जंगलात पाणी कुठून असणार ?
खूप अंतर चालून गेल्यानंतर एका ठिकाणी सरोवर होते.
ते पाहून भीमसेनला फार अत्यानंद झाला. परंतु प्रश्न असा होता की पाणी तर होते पण ते न्यायचे कसे ? त्याला काय करावे ते सुचेना. त्याने आपल्या आजूबाजूला पाहिले. जवळपास कुणाचे घर आहे का ? परंतु तेथे जवळपास कुणाचेही घर नव्हते. आपल्या आईला पाणी तर न्यायचे आहे पण ते नेणार कसे ? विचार करता करता त्याला एक युक्ती सुचली. त्याने जवळपास असलेल्या वृक्षावर नजर फिरविली. त्याला एक मोठ्या पानांचा वृक्ष दिसला. त्याने लगेच त्या झाडाचे पाने काढली नि त्याचा त्याने द्रोण तयार केला नि त्यात पाणी भरून घेतले नि निघाला. झपाझप पावले टाकत तो आपली भावंड बसली होती तेथे आला. द्रोण ला बारीकबारीक छिद्र असल्याने त्यातून बरेच से पाणी वाहून गेले. थोडे से शिल्लक होते ते त्याने आपल्या आईला पाजले. आणि लज्जित पणे आपल्या आईला म्हणाला ," क्षमा असावी आई ! मी आणलेले पाणी रस्त्यावर सांडले. त्यामुळे आपली तहान मी भागवू शकलो नाही." त्यावर मी उद्गारली ," काही हरकत नाही पुत्र. तुझा प्रयत्न हा सर्वांत महत्त्वाचा आहे, आणि तहाण्याचा एक घोट सुध्दा पाणी मिळाले तरी ते पुष्कळ असते. म्हणून तू मुळीच वाईट वाटून घेऊ नकोस." युधिष्ठिर उद्गारला ," आपण असं करू या सर्वजनच त्या सरोवर पाशी जाऊ म्हणजे मनसोक्त पाणी सुध्दा पिता येईल नि थोडीशी विश्रांती सुध्दा घेता येईल. शेवटी सगळेच उठले नि चालायला लागले. आणि थोड्याच वेळात ते सर्वजण त्या सरोवर पाशी पोहोचले. त्यानंतर थंडगार असलेले पाणी मनसोक्त सर्वजण प्याले. त्यानंतर तेथेच एका झाडाखाली विश्रांती साठी बसले. दिवसभर चालून चालून थकल्या मुळे सर्वांना झोप येऊ लागली आणि सायंकाळ ही झाली होती. थोड्याच वेळात सर्वत्र अंधार दाटणार होता. अश्या परिस्थिती मध्ये निवाऱ्या साठी एक सुरक्षित जागा शोधणे जरुरीचे होते ; परंतु जंगलात त्यांना कुठली सुरक्षित जागा मिळणार शेवटी कंटाळून त्या वृक्षाखाली बसले नि तेथेच झोपी गेले. परंतु सर्वजण एकदम झोपून चालणार नव्हते. कारण हे जंगल आहे, इथं अनेक जंगली प्राणी असू शकतात. म्हणून भीमसेन पहारा देत जागत बसला. आणि इतर सर्वजण झोपी गेले. मध्यान्ह रात्रीच्या सुमारास मला जाग आली. मी उठून बसली. पाहते तर काय भीमसेन वृक्षांच्या बुंध्याजवळ वृक्षाच्या खोडाला टेकून जागत बसला आहे. मला त्याची दया आली. म्हणून मी उठून त्याच्या जवळ गेली नि त्याला म्हणाली , " पुत्र भीम !"
" काय आई ?"
" जा आता तू थोडा विश्राम करून घे."
" नाही आई, तूच थोडा विश्राम कर."
" मग अर्जुनाला उठव जा."
" आई , अर्जुन माझा लहान भाऊ आहे, त्याची निद्रा खराब करून मी बरं कसा झोपू शकतो आणि असे करणे मला शोभनारही नाही."
" असे आहे तर मग युधिष्ठिरला उठव. तो तुझा जेष्ठ बंधू आहे."
" आई , दादाचा मी लहान भाऊ आहे, लहान भावाने आपल्या थोरल्या भावाला त्रास देणे योग्य आहे का ? म्हणून
तू माझी चिंता करायची सोड आणि तू सुध्दा जाऊन आराम
कर."
" ठीक आहे पुत्र तू बैस पहारा देत मी जाऊन झोपते."
असे म्हणून मी उठली नि आपल्या स्थानावर जाऊन झोपली. त्यांच्या पासून अगदी थोड्याच अंरावर एका हिडींब
नावाचा राक्षसाचे घर होते आणि त्याला हिडींबा नावाची एक बहिण सुद्धा होती. बहीण-भाऊ दोघेही सोबत तेथे राहात होते. हिडींब वनात शिकारीला गेला होता पण त्याला शिकार
काही मिळाली नाही. तो हताश होऊन वापस माघारी परतला आपल्या बहिणीला म्हणाला ," खायला काय बनविलेस ते आण." हिडींबा त्याला मधीरा आणून देते. तो थोडीशी पितो. तेवढ्यात त्याला मनुष्य प्राण्यांचा वास येतो. तो आपल्या बहिणीला म्हणाला," हिडींबा मला ना मनुष्य प्राण्यांचा वास येतो आहे, असं वाटतं की इथंच जवळपास मनुष्य प्राणी आहे, तेव्हा तू एक काम कर आताच्या आता जा नि जो कुणी मिळेल त्याला घेऊन ये इकडे. मला मांस खाण्याची फार इच्छा झाली आहे ,कारण खूप वर्षे झाली. मनुष्य प्राण्यांचे मला मांस खायला नाही मिळाले. जा घेऊन ये. मला त्याचे रक्त प्राशन करून आपली तहान भागवायची आहे."
" पण दादा तुला माहीत आहे ना, मला मनुष्य प्राण्यांचे
मांस खायला आवडत नाही ते."
" तू राक्षस जातील कलंक आहेस. परंतु मी तुला
माझ्यासाठी आणायला सांगतोय. जा लौकर घेऊन ये."
नाईलाजाने हिडींबा ने अक्राळविक्राळ रूप धारण केले नि
निघाली सावज शोधायला. शोधता शोधता हिडींबा तेथे पोहोचली जेथे ही चार भावंड झोपली होती नि एक त्यांची
आई ! त्या सर्वांना पाहून ती एकदम खुश झाली. कारण तिच्या भावाने तिला शिकार आणायला पाठविले होते . परंतु भीमसेन कडे तिची नजर पडताच ती स्वतःच घायल झाली. भीमाच्या रुपाकडे पाहून ती एकदम त्याच्यावर भाळली नि त्याला आपले हृदय देऊन बसली. तिच्या मनात भिमाशी विवाह करण्याची इच्छा उत्पन्न झाली. तसे तिने एका सुंदर स्त्री चे रूप धारण केले नि मनुष्याला शोभेल अशी इतकी उंची तिने स्वतःची केली नि ती भिमापाशी येतच होती तेवढ्यात तेथेआपल्या बहिणीची वाट पाहून स्वतःच तेथे आला. आपली बहीण एका मनुष्यावर भाळलेली पाहून त्याला भयंकर राग आला. तो तिला म्हणाला ," तू एक राक्षसीन असून एका.साधारण मनुष्याशी लग्न करणार ?"
" हां दादा ! "
" तुला लाज नाही वाटत का असं बोलायला ?"
" मी माझे हृदय देऊन बसली या मानवाला."
" चूप ! तो तुझा पती कदापि होऊ शकणार नाही."
" का नाही होऊ शकणार ?"
" कारण मी आता त्याला खाणार !" त्या दोघांच्या आवाजाने झोपलेले सर्व उठून बसले. भीमसेन त्याच्याशी
युध्द करण्यास सज्ज झाला. परंतु हिडींब जवळ मायावी
शक्ती होती. परंतु हिडींबा भीमसेनला आपले हृदय देऊन बसल्या मुळे तिने भीमाला साह्य केलं. शेवटी हिडींब राक्षस
भीमसेन च्या हाताने मारला गेला. भिमाने त्याचे दोन्ही हात
सांध्यातून उखाडून फेकून दिले. हिडींब मृत पावताच हिडींबा
ने कुंती माते चे चरणस्पर्श करत म्हटले ," हे माते मी आपल्या
ह्या पुत्राशी विवाह करू इच्छिते. माझा आपण आपली सून
म्हणून स्वीकार करावा." त्यावर राजमाता कुंती उद्गारल्या ,
" पण तू आहेस कोण ? आणि तुला माझ्या पुत्राशी
विवाह का करायचा आहे ?" त्यावर ती म्हणाली ," मी राक्षस जातीची आहे, माझे नाव हिडींबा आणि इथं जो मरून
पडला आहे तो माझा भाऊ हिडींब ! परंतु मी आपल्या
पुत्रांस मन ही मन पती म्हणून मी वरले आहे. तेंव्हा आपण
माझा स्वीकार करावा." तेव्हा युधिष्ठिर उद्गारला ," आम्ही भीमसेनला इथं सोडून जाऊ शकत नाही आणि तू राक्षसीनी असल्यामुळे तुझ्याशी माझ्या बंधू चे लग्न होणे कठीण दिसते."
" जर आपल्याला आपल्या जेष्ठ पुत्रांचा हाच विचार जर पटत असेल तर मला आपल्या चरणा पाशी प्राण त्यागण्याची अनुमती द्यावी .परंतु मला एक सांगा , आपण जन्म कुणाच्या पोटी घ्यावा हे आपल्या हातात असते का "
" तू म्हणतेस ते मान्य आहे मला."
" मग आपले जेष्ठ पुत्र मी राक्षस जाती मध्ये जन्म घेतल्याचा दंड का बरं देत आहेत ? मी आपल्या पुत्राला आपलं हृदय देऊन बसली. जर प्रेम करणे हा गुन्हा असेल तर मला अवश्य दंड द्या." त्यावर मी उद्गारली , " परंतु हिडींबा माझ्या पुत्राला तुझ्या सोबत मी कायमस्वरूपी ठेवू शकत नाही."
" आणि माझी तशी इच्छाही नाही. फक्त एक संतान प्राप्ती होईपर्यंत त्याना माझ्या सोबत राहू द्या. मला संतान प्राप्ती होताच मी स्वतःच त्याना तुमच्या स्वाधीन करीन." तेव्हा मी युधिष्ठिरला विचारले ," धर्म काय सांगतो पुत्र ?" त्यावर युधिष्ठिर उद्गारला ," आपल्या सारख्या आईचा आदेश पाळणे. हाच आम्हां पुत्रांचा धर्म आहे आई !"
तशी हिडींबा खुश झाली नि तिने माझे चरणस्पर्श केले. मी तिला सौभाग्यवती भव ! आणि पुत्रवती भव ! " असे दोन आशिर्वाद दिले. त्यानंतर गंधर्व पध्दतीने त्या दोघांचे लग्न लावण्यात आले. हिडींबा ने माझे चरणस्पर्श तर केले. त्यानंतर युधिष्ठिरचे ही चरणस्पर्श केले. तेव्हा सहदेव भीमसेन ची थट्टा करत बोलला," चला.एक गोष्ट चांगली झाली बुवा ! आणि ती म्हणजे मजल्या दादाच्या भोजनाचा प्रश्न सुटला." तशी हिडींबा उद्गारली , आपणही चलावे आपणासही मी पोटभर भोजन वाढीन बरं का " त्यावर सर्वजण खळखळून हसू लागले.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा