महाभारत ७४ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाभारत ७४ |
महाभारत ७४
महाराज धृतराष्ट्राने विदूरला राज्यातून हाकलून दिले ही
खबर जशी गंगापुत्र भीष्मां ना एका दूता मार्फत समजली
तसे ते संतापाने महाराज धृतराष्ट्राच्या कक्षेत तावातावाने
गेले नि गर्जले ," धृतराष्ट्र sss " तसे महाराज धृतराष्ट्रानी
घाबरून विचारले ," काय झाले तातश्री ? इतके का संतापले
आहेत ?" त्यावर गंगापुत्र भीष्म उद्गारले ," तू काय हस्तिनापूरचा सर्वनाश करण्याचाच विचार केला आहेस का ?
" परंतु मी केलं तरी काय ? ते सांगा ना ?"
" काय केलं ? काय केलेस ते तुला ठाऊक नाहीये का ?
आणि जर का ते तुला ठाऊक नसेल तर तू राजा बनण्याच्या लायकच नाहीयेस. " तेव्हा महाराज धृतराष्ट्र एकदम विचारात पडले. कळेना की तातश्री आपल्या वर का रागावले आहेत ते. म्हणून त्यांनी न समजून विचारले ," तातश्री माझं काय चुकलं ते नीट आणि स्पष्ट पणे सांगाल का ?" गंगापुत्र भीष्म म्हणाले , " हस्तिनापूरात एकच तर आहे सत्य आणि कडवे बोल बोलणारा. परंतु आज त्याला सुध्दा तू राज्यातून हाकलून दिलेस. अरे मूर्खा सत्य कितीही कडवे असले तरी ते सत्यच असते. ते नाकारून चालत नाही.म्हणून कोणी जर आपल्या हिताचे सांगत असेल तर त्याचे जरूर ऐकले पाहिजे. नाहीतर मग पश्चात्ताप करण्याची पाळी येत.म्हणून एवढ्यातच सावध हो नि कोणाला तरी पाठवून विदूरला परत बोलवून घे. नाहीतर याचे फार भयंकर परिणाम भोगावे लागतील हेही द्यानात ठेव." असे म्हणाले नि जितक्या त्वेषाने आले होते. तेवढ्यात त्वेषाने निघून ही गेले.महाराज धृतराष्ट्र फक्त त्यांच्या आवाजाच्या दिशेने पाहतच राहिले. गंगापुत्र भीष्मांना यापूर्वी इतके संतापलेले कधीच पाहिले नव्हते. क्षणभर त्याना सुचलेच नाही काय करावे ? परंतु क्षणभर वेळाने ते सावध झाले तसे त्यांनी लगेच आपल्या सारथी संजय ला बोलवून विदुरला बोलवून आणण्याचा आदेश दिला. संजय लगेच महाराजांच्या रथात चढला नि निघाला.
युवराज धृष्टद्युम्न निघून गेल्यानंतर पुन्हा रथांचा आवाज
आला म्हणून भीमसेन बाहेर गेला आता कोण आला ते पाहायला. परंतु रथातून विदुरला खाली उतरताना पाहून
हर्षभराने पुढे येऊन वंदन करत म्हणाला ," या काकाश्री ! "
असे म्हणून त्याना आपल्या पर्णकुठीत घेऊन येतो. तेव्हा
द्रौपदी चुलीवर काहीतरी बनवत असते. विदूरला पाहून
सर्वजण एकदम खुश होतात. त्याना बसायला आसन देतात.
म्हणजे रशीने विणलेल्या खाटीवर ते बसतात. तेव्हा युधिष्ठिर त्यांची विचारपूस करत म्हणाला ," काकाश्री सर्व क्षेमकुशल तर आहे ना हस्तिनापूरला ? "
" हे सांगणे तर मुश्किल आहे."
" काकाश्री पितामहा कसे आहेत ?" अर्जुन ने विचारले.
" एकदम दुःखी आहेत." तेवढ्यात द्रौपदी तेथे आली नि
त्यांचे चरणस्पर्श केले. तेव्हा विदुर उद्गारले ," तू पांडूपुत्र परिवारच्या पाठीचा कणा आहेस. तुला माझ्या आशीर्वादा
शिवाय तू आपलं लक्ष प्राप्त करू शकतेस." असे म्हणून
युधिष्ठिर सहित सर्वांकडे पाहत म्हणाला ," वहिनीचे आता
वय झाल्याने ती तुम्हां सोबत नाहीये.परंतु तिच्या बद्दल
अजिबात चिंता करू नका ती एकदम क्षेमकुशल आहे.
तातश्री, आचार्य द्रोण , भ्राताश्री महाराज धृतराष्ट्र हे सर्व
आता भूतकाळात जमा झाले. परंतु तुम्ही सर्वजण वर्तमान
आहात. म्हणून आपल्या भविष्याचा विचार करा आणि त्या
नुसार आपली पाऊले उचला."
" म्हणजे आम्ही समजलो नाही काकाश्री ?"
त्यावर ते आपल्या मनात बोलले की अरे, पुत्रांनो तुम्हांला
आता कसं समजावू की तुम्ही समजताय की तेरा वर्षे पूर्ण
झाल्या नंतर दुर्योधन तुम्हांला तुमचे राज्य परत देईल तर
तुमची ती समजूत एकदम चुकीची आहे. तो तुम्हांला तेरा वर्षा नंतर ही तुमचे इंद्रप्रस्थ तुम्हा लोकांना परत करणार नाहीये. कारण गांधार नरेश शकुनी हस्तिनापूरला मिळालेला शाप आहे. तेवढ्यात अर्जुन ने मध्येच बोलून त्यांची विचार
शुंखला मधेच खंडित केली. अर्जुन ने विचारले ," काकाश्री
तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे ते आम्हाला कळले नाही
तेव्हा आम्हाला समजेल असं सांगा. "
" ते मी सांगण्या पेक्षा तुम्हीच विचार करा की तुम्हांला
काय करायला हवं. कारण नियमांचे पालन तेव्हाच केलं जातं
जेव्हा आपला प्रतिस्पर्धी नियमांचे पालन करत असेल. तो
जर नियमांचे पालन करत नसेल केवळ आपण नियमांचे
पालन करून काहीही साध्य होणार नाहीये. बाकी तुमचा तुम्ही निर्णय घ्यायचा आहे." तेवढ्यात एक रथ येऊन उभा राहिला. त्याला पाहून नकुल उद्गारला ," आपले स्वागत आहे
आमच्या पर्णकुठीत ." असे म्हणून नकुल समजला पर्णकुठीत घेऊन येतो तेव्हा विदुर उद्गारले ," ये संजय
कायदा आज्ञा आहे महाजांची ?"
" आपल्याला बोलविले आहे महाजांनी !"
" कमाल आहे स्वतःच मला हाकलून दिले नि आता तुला
पाठविले मला बोलवायला. कारण काय ?"
" ते मला माहित नाही.परंतु मला एवढं समजलं की त्याना
भेटायला गंगापुत्र भीष्म गेले होते आणि ते भेटून गेल्यानंतर
मला लगेच बोलवून घेतले नि लगेच आदेश दिला माझ्या
अनुजला माझ्या तर्फे विनंती करून सोबत घेऊन ये आणि
तरी देखील नाही ऐकला तर माझा आदेश आहे म्हणून सांग."
" आता तर जावेच लागणार कारण महाराजांचा आदेशांचे पालन करावेच लागणार."
" आता पुन्हा कधी भेट होईल आपली ?"
" माहीत नाही पुत्र परंतु आपल्या मातोश्री विषयी अजिबात चिंता करू नका."
" काकाश्री भ्राता दुर्योधन हे जरूर सांगा.....
" थांब अर्जुन , दुर्योधन ला संदेश माझ्या तर्फे जाऊ दे."
असे म्हणून तो विदूरला उद्देशून बोलला ," दुर्योधनला म्हणावे
फक्त तेरा वर्षे वाट पहा आमची ! तेरा वर्षे पूर्ण होताच
दुर्योधनची मांडी फोडण्यासाठी आणि दु:शासन ची छातीचे
रक्त पिण्यासाठी मी अवश्य येईन." त्यानंतर विदुर संजय सोबत निघून गेला.
दुर्योधनला जसे समजले की आपल्या वडिलांनी काकाश्रीला हाकलून दिले म्हणून खुश झाला होता. परंतु विदूरला पुन्हा बोलवून आणण्यासाठी आपल्या सारथीला अर्थात संजयला पाठविले ही जेव्हा वार्ता समजली तसा तो बेचैन झाला. त्याला काही कळायला मार्ग नाही असे आपल्या का केला असेल ? परंतु उत्तर काही मिळत नव्हते. म्हणून तो
इकडून तिकडे येरझाऱ्या घालत असतानाच सर्वाना उद्देशून
बोलला ," मला एक कळत नाही की काकाश्री ना जर आपल्या राज्यातून काढलेच होते तर पुन्हा त्याना बोलवून
घेण्याची पिताश्रीना काय गरज होती. " त्यावर कर्ण उद्गारला,
" मला तर वाटतं की विदूरला परत बोलवून घेतले ते चांगलेच केले म्हणायचे महाराजांनी."
" ते कसे ?" दु:शासन ने विचारले.
" ते असे दु:शासन विदूरचे विचार जे आहेत ते गंगापुत्र
भीष्म , आचार्य द्रोण आणि कुलगुरू कृपाचार्य सारखे निर्मळ
नि स्वच्छ आहेत. ते बोलून दाखवत नाहीत परंतु विदुर बोलून
दाखवितात.म्हणून आपल्याला समजते की त्यांच्या मनात
काय सुरू आहे, तेव्हा विदुर नसतील तर त्यात आपलेच
नुकसान आहे."
" अगदी बरोबर अंगराज मला वाटतं की तू सुध्दा राजनीतीची भाषा बोलू लागलास."
" परंतु काकाश्री परत येण्याचा परिणाम हाच होणार ना , की पिताश्री पांडवांना माघारी बोलवतील."
" असं जर झालं तर मी अन्न पाण्याचा त्याग करीन. नाहीतर विष पियुन आत्महत्या करीन. हे द्यानात ठेवा मामाश्री !"
" भाच्या तू नेहमी आत्महत्या करण्याची भाषा का करतो
आहेस ? मला माहित आहे की तू पांडवांचा तिरस्कार करतोस पण मी देखील तुझ्या प्रमाणेच पांडवांचा तिरस्कार
करतोय तुला कित्येक वेळा समजावून सांगितले तरी तुझ्या
द्यानात येत नाहीये. भाच्या युध्दाचा पहिला नियम हा आहे
की आपल्या शत्रुची ताकद ओळखण्याचा प्रयत्न करायचा
असतो की तो कोणत्या वेळी कोणता निर्णय घेईल.त्या शिवाय हे देखील माहीत करून घेणे आवश्यक आहे की त्याचे शक्तिशाली शस्त्र कोणते आहे ? तुला पांडवांच्या
शक्तिशाली शस्त्रा विषयी काही माहीत आहे का ? माहीत
असेल तर सांग बरं."
" भिमाचे शक्तिशाली अस्त्र अर्थात गदा आहे." दुर्योधन
उद्गारला.
" आणि अर्जुन चे आपले गांडीव धनुष्य." कर्ण उद्गारला
" आणि जेष्ठ भ्राताश्री चे आपल्या भाल्यावर." दु:शासन
उत्तरला.
" नाही.अजिबात नाही. युधिष्ठिर चा सर्वांत अधिक शक्तिशाली शस्त्र जर कोणते असेल तर त्याचा धर्म अर्थात
तो धर्मा विरुध्द कोणतेही कार्य करणार नाही.याचा अर्थ असा
की महाराजांनी जरी पांडवांना बोलवून घेण्याचा प्रयत्न केला
तरी बारा वर्षाचा वनवास आणि एक वर्षाचा आज्ञातवास
पूर्ण केल्या शिवाय तो वापस येणार नाहीये. म्हणून चिंता
करायचे सोडून द्या. कारण तेरा वर्षे आहेत आपल्याकडे."
महर्षी व्यास हस्तिनापूरला येतात ते सरळ महाराज
धृतराष्ट्राच्या कक्षेत जातात.तेव्हा महाराज धृतराष्ट्र उठून
उभे राहतात नि महर्षी व्यासाचे चरणस्पर्श करत ते म्हणाले,
" आपल्या दर्शन झाल्याने मी एकदम धन्य झालो ऋषींवर."
" शब्दांचे जाळे फेकू नकोस राजन, जे मी सांगायला ते लक्ष देऊन ऐक. तू स्वतः उपस्थित असताना तुझ्या अनुज
बंधूंच्या पुत्रावर अन्याय झाला तरी तू गप्प राहिलास.म्हणून
या अन्यायाला संपूर्ण तू स्वतः जबाबदार आहेस , अर्थात
त्याचे दृश्य परिणाम ही तुलाच भोगावे लागणार. "
" असं म्हणू नका ऋषींवर."
" असं का नको म्हणू ? ते सांग बरं. तू आणि तुझ्या पुत्रांनी
पांडवा सोबत केले ते योग्य होते का ? तू जरी नाही बोललास
तरी मी सांगतो ते कोणत्याही दृष्टीने योग्य नव्हते. अर्थात
तेरा वर्षाचा वनवास संपल्या नंतर पांडव गप्प राहतील असे
मुळीच समजू नकोस."
" मी काय करू ? दुर्योधन माझं काहीच ऐकत नाहीये."
" मग मी तुला असं विचारतो की दुर्योधन जर तुझा पुत्र
नसता तर तू काय केलं असतं म्हणजे तुझ्या राज्यात राजाची
आज्ञा न मानणाऱ्याला कोणता दंड दिला जातो ? "
" तो माझा पुत्र आहे ऋषींवर."
" पुत्र सुध्दा एक नागरिकच असतो आणि न्याय कधी नाते पाहत नाही. म्हणून तू त्याला समजावून सांग की करुवंशाचे जेष्ठ गंगापुत्र भीष्म आहेत . अर्थात तुम्हां लोकांना त्यांच्या आज्ञेचे पालन करणे अनिवार्य आहे. त्याना न विचारता तुम्हा लोकांना राजनीतीचा कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नाहीये. म्हणून दुर्योधनाला जरा समजावून सांग की पांडवांशी
वैरत्व करायचे सोडून त्यांच्याशी संधि कर आणि ते त्याच्या हिताचेही आहे आणि तरी देखील तो ऐकत नसेल तर त्याला तू आदेश दे आणि जर का तुझ्या आदेशाचे पालन करत नसेल तर त्याला दंड दे. कारण राजा होण्याच्या नात्याने हेच तुझं परम कर्तव्य आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेव की अहंकारच्या झाडाला विनाशाची फळे येतात. येतो मी." असे म्हणून ते चालते झाले.
महाराज धृतराष्ट्राना भेटायला महर्षी व्यास भेटून गेले नि
त्यानी महाराज धृतराष्ट्राना केलेला उपदेशा विषयीची संपूर्ण
माहिती गांधार नरेश शकुनीच्या गुप्तचराणे येऊन जशी माहिती दिली तसा शकुनी मनातल्या मनात म्हणाला ," महर्षी व्यास आपला उपदेश महाराजांच्या कानापर्यंत पोहोचनारच नाहीये.कारण पुत्रा मोहाच्या जाळ्यात अडकलेल्या मनुष्याला काय योग्य नि काय अयोग्य हे कळतच नाही मुळीे. मग त्यासाठी कितीही प्रयत्न करा." असे ते स्वतःशी बोलून दुर्योधन , दु:शासन आणि कर्ण जेथे बसले होते तेथे गेले असता त्यांनी पाहिले की दुर्योधन आपली योजना दु:शासन आणि कर्णाला सांगत असतो की, पांडवांच्या अज्ञतवास कसा भंग करायचा म्हणजे अज्ञातवास जेव्हा सुरू होईल तेव्हा आपण आपले गुप्तचर पांडवांच्या मागे लावू नि त्याना शोधून काढू."
" हूं !" असे म्हणून दीर्घ श्वास घेतला.तेव्हा कर्ण उद्गारला,
" आपण कोणत्या विचारात मग्न आहात मामाश्री ?"
" महाराज फार दुःखी आहेत भाच्या. महर्षी व्यास त्याना
उपदेश देऊन गेले."
" ह्या ऋषी मुनींना दुसरे काही काम नाही का ? फुकटचा
उपदेश देत राहतात. मी ह्या लोकांना हस्तिनापूरला येण्याची
बंदी करू का ?"
" नाही. असा मूर्खपणा कदापि करू नकोस दुर्योधन.
कदापि करू नकोस अशी चूक. अरे भाच्या ऋषी मुनींची सेवा
करायची असते नि त्यांचे आशीर्वाद घ्यायचा असतात त्यांचा शाप नव्हे ! "
" परंतु ते जर चुकीचा उपदेश देत असतील तर ! "
" ऐकून घ्यायला काय हरकत आहे हे जरुरी थोडे आहे की
त्यांनी सांगितलेले सर्व करायला हवे आहे."
" परंतु ते असे पिताश्रीना काय सांगून गेले ?"
" माझ्या गुप्तचराणी तर मला आवश्यक ती माहिती येऊन
दिली.परंतु तुम्हांला ती सांगण्या सारखी नाहीये आणि जर का ती माहिती मी तुम्हां लोकांना ऐकविली तर दुर्योधन लगेच
आपली गदा घेऊन महर्षी व्यासना मारायला धावेल.म्हणून
एकदम संचिप्त स्वरूपात सांगतो की महर्षी व्यास सुध्दा
पांडवांच्या बाजूने आहे."
" हा तर शुभ वार्ता नाहीये मामाश्री ! " कर्ण उद्गारला.
" हेच तर मी सांगतोय की ते महाराजाना सर्वनाश होण्याची सूचना देऊन गेले आहेत."
" कोणाचा सर्वनाश ?" कर्णाने विचारले.
" तुझा सर्वनाश , पुत्र दुर्योधनचा सर्वनाश , दु:शासनचा सर्वनाश आणि माझा ही सर्वनाश होण्याची भविष्यवाणी केली आहे त्यांनी ." हे ऐकून दुर्योधन एकदम सुन्न झाला.
तेव्हा त्याची हिंम्मत वाढवत म्हणाली ," हे करुवंशच्या राजकुमारा आपला पराक्रम द्यानात ठेव. महर्षी व्यास ना
काही म्हणावयाचे ते म्हणू दे. ह्या हस्तिनापूरावर फक्त तुझा अधिकार आहे अर्थात जसा इंद्र राज सुख भोगतो तसे
तुही सुख भोगशील. आपल्या बाहूबळावर विश्वास ठेव.चारही दिशांचे राजे तुझ्या ध्वजाला प्रणाम करत आहेत. जी इंद्रप्रस्थ राजधानी पांडवणाची होती ती आता तुझी झाली आहे. मला
वाटतं महर्षी व्यास यांच्या बेरीज वजाबाकीच्या गणिता मध्ये
काहीतरी चूक झाली आहे. पांडवांच्या जागी त्यांनी तुझं
नाव घेतलं असावे .दुर्योधन सर्वनाश तर त्यांचा होणार आहे.
छे छे छे होणार नाहीतर त्यांचा सर्वनाश झाला आहे. असं
म्हणायचं होतं मला. म्हणजे बघ ना त्यांचा ती मय दानव सभा
जिथं तुझा द्रौपदी ने अपमान केला होता. ती मय दानव सभा आता आहे का त्यांच्याकडे ? नाही ना ? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सम्राट युधिष्ठिरचा राजमुकुट आता त्याच्या डोक्यावर नाहीये . तसेच भीमाचे ते बाहू बळ आता कुठे गेले ? आणि अर्जुन चे ते गांडीव धनुष्य काय करते आहे या क्षणी ? त्याला आपल्या त्या गांडीव धनुष्यावर फार मोठा अभिमान होता ना परंतु आज ते सर्वजण वन वन भटकत आहेत. तुला तर खुश व्हायला पाहिजे. तुझी इच्छा असेल तर एकाच बाणाने तुझ्या रोखाने येणाऱ्या वाऱ्याची मी दिशा बदलू शकतो. तसेच तू जर म्हणालास तर तुझ्या दिशेने येणाऱ्या प्रत्येक वादळ ही मी नेस्तनाबूत करून टाकीन. म्हणून उदास होऊन माझा अपमान करू नकोस."
" तू तर भाषण देऊ लागला आहेस अंगराज म्हणून आता
भाषण देण्याचे सोड. शिकार करण्याच्या निमित्ताने वनात जा नि पांडवांच्या दुर्दशेवर पोटभर हसा नि आपल्या वैऱ्यांची
जेवढी कुचेष्टा करता येईल तेवढी कुचेष्टा करा. त्यांच्या वर
व्यंगाचे बाण चालवून हरणाची शिकार करण्याच्या बदली त्यांच्या आत्म सन्मानाची शिकार करा. तेव्हाच माझ्या
मनाला खरी शांती लाभेल. "
" परंतु पितामहां ...
" त्यांची तर तू चिंताच करू नकोस.कारण गंगापुत्र भीष्म
हस्तिनापूरच्या शिंहासनाशी बांधील आहेत.ते फक्त उपदेश
देऊ शकतात बाकी काहीही करू शकत नाहीत."
कुलगुरू कृपाचार्य जेव्हा हे समजले की दुर्योधन पांडवांना हिंणवण्यासाठी शिकारीचे निमित्त करून पांडव
ज्या वनात वास्तव्य करून राहिले आहेत तिकडेच दुर्योधन
सुध्दा गेलाय हे ऐकून तर त्याना अजिबात आवडले नाही.
परंतु त्याना हे देखील माहीत आहे त्या विषयी महाराज
धृतराष्ट्राच्या कानी घालून काहीही साद्य होणार नाहीये. कारण
महाराज धृतराष्ट्रांना त्याचे कोणतेही कार्य अनुचित वाटत नाहीये. म्हणून ते सरळ गंगापुत्र भीष्म यांच्या जवळ गेले तेव्हा गंगापुत्र भीष्मांनी त्यांचे स्वागत करून त्याना आसन
ग्रहण करायला सांगितले. त्यानंतर गंगापुत्र भीष्मांनी त्याना
विचारले ," माझ्या साठी काय आदेश आहे कुलगुरू ?"
त्यावर कुलगुरू कृपाचार्य उद्गारले ," गंगापुत्र भीष्मांला
काळाच्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही आदेश देऊ शकत नाहीये."
" मग एवढ्या रात्री माझ्याकडे येण्याचे कारण ?"
" जे हस्तिनापूरचे हितचिंतक आहेत त्याना रात्रीची सुध्दा
झोप येत नाहीये गंगापुत्र ? ते सर्वजण आपल्या निष्ठाशी बंदीस्त आहेत नि भयभीत सुध्दा आहेत."
" कोणाला घाबरत आहेत ते ?"
" भविष्याला."
" कोणाच्या भविष्याला ?"
" आपल्या सर्वांच्या !"
" म्हणजे ?"
" मी आपल्या भविष्या विषयी चिंतीत आहे नि आपण
माझ्या भविष्या विषयी चिंतीत आहात. आचार्य द्रोणची पण
तीच अवस्था आहे. माहीत नाही मागच्या जन्मी आपण सर्वांनी कोणते पाप केले होते.त्या पापाचा दंड आपल्या लोकांना ह्या जन्मात मिळत आहे.म्हणूनच की काय आपण
सर्वजण दुर्योधनच्या प्रत्येक चुकीच्या कार्यात सहभागी आहोत.अर्थात त्याला आपण विरोध करत नाहीये."
" इतिहास आपल्या ह्या लाचारीला कदापि माफ करणार नाहीये."
" हे तर मला माहित नाही गंगापुत्र. परंतु हे मला अवश्य
माहीत आहे कपटाने पांडवांचे सर्वकाही जिंकल्या नंतर ही
गांधार नरेशचे मन काही भरले नाहीये. म्हणून एका पाठोपाठ एक अपमानाचे बाण पांडवांवर सोडत आहेत."
" आता आणखीन काय केलं त्याने ?"
" त्यांनी दुर्योधन ला शिकारीच्या निमित्त करून पांडव
ज्या वनात कुटी बांधून राहात आहेत पाठविले आहे. मला
युधिष्ठिरची अजिबात चिंता नाहीये . अर्जुन आपल्या जेष्ठ
बंधूंच्या आदेशा बाहेर जाणार नाहीये. परंतु भीम एक वाऱ्या
प्रमाणे आहे एकदा सुटला की मग त्याला कोणीही अडवू
शकणार नाहीये."
" ते जरी खरं असलं तरी ही भीम युधिष्ठिरची आज्ञा कदापि मोडणार नाही . एवढा त्याच्या बद्दल मला विश्वास
नक्कीच आहे."
" विश्वास तर मला सुध्दा आहे. नाहीतर त्यांच्या जागी दुसरा कुणी असता तर वनात न जाता सरळ हस्तिनापूरवर
आक्रमण केले असते."
" आक्रमण तर करावेच लागणार आहे त्याना. आज नाही
तर तेरा वर्षा नंतर.युध्द तर होणार यात तिळमात्र शंका नाहीये."
अर्जुन आपल्या बाणांना धार लावत असतो नि भीम लाकडे आणायला गेलेला असतो. तेव्हा तो दुर्योधनच्या
पडाव पाहतो नि रागाने आपल्या कुटीत परततो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर चा रागाला पाहून अर्जुन ने विचारले,
" एवढे रागवण्याचे काय कारण मजले दादा ?"
" माझाच मला राग येतोय आता."
" का ? आपल्या कडून काय अपराध घडला ?"
" मी सर्वकाही सहन केलंय हाच माझा सर्वांत मोठा अपराध आहे. जर त्या दिवशी म्हणजे द्युतक्रीडे मध्ये
दुर्योधनची मान कोंबड्यानी मुरगळुन टाकली असती तर आज ही वेळ माझ्यावर आली नसती."
" अर्थात तू सुध्दा त्यांचा पडाव पाहिलास तर !"
" पाहणार कसे नाही जरी डोळे मिटून घेतले तरी त्यांची
अश्लील थट्टा कानावर पडल्या शिवाय राहणार आहे काय ? कान बंद करून घ्यावे तरी नाकाला त्यांच्या भोजनाचा दुर्गंधी येणारच , जसे काही आम्ही चांगले भोजन कधी खाल्लेच नाहीये. त्याचे सारे दास त्यांची उष्टी भांडी धुत होते.जिथे
मी आपली भांडी धुत होतो." तेवढ्यात च तेथे युधिष्ठिर आला नि त्या दोघांचे संभाषण ऐकले होते म्हणूनच की काय
तो भीमाच्या वक्तव्यावर उद्गारला , " मग त्यात ईर्ष्या करण्याची काय गरज आहे प्रिय अनुज ?"
" आम्हाला त्यांची ईर्ष्या अजिबात करायची नाहीये भ्राताश्री ! परंतु दुर्योधनला पाहिले की तळ पायाची आग मस्तकाला जरूर भिडते. जेष्ठ पिताश्री चे जेष्ठ पुत्र त्याला हे माहीत नाही काय तेरा वर्षा नंतर आम्ही त्याच्या कडून
आमची एक एक वस्तू परत घेऊ."
" तेरा वर्षानंतर तर दुर्योधन स्वतःच आमचे सर्वकाही देवून टाकेल प्रिय अर्जुन."
" अरे दादा, तुला असं वाटतंय की तो सर्वकाही देऊन टाकेल.परंतु तसे अजिबात नाहीये. त्याच्या कडून भाकरीचा
एक चतकोर सुध्दा घ्यायचा झाला ना तर त्याच्या टाळ्यात
हात घालून तो काढून घ्यावा लागेल. जर काळ वृक्ष असता
तर त्याला मुळासकट तोडून जमीनदोस्त केला असता मी."
" काळ वृक्ष नाहीये अनुज म्हणून त्याला कोणीही तोडू शकणार नाहीये. काळ आपल्या निर्धारित वेळेनुसार चालत
राहतो. तो कधीही आपल्या नियमांचे उल्लंघन करत नाहीये." असे म्हणून युधिष्ठिर कशी तरी त्या दोघाची समजूत घालतो. परंतु त्याच क्षणी त्यांच्या जवळच असणाऱ्या पडाव
मध्ये दुर्योधन नि त्याचे साथीदार पांडवांच्या लाचारी वर उपहासाने मोठमोठ्या ने हसत हसतात. त्या वेळी अंगराज
कर्ण आपल्या मित्राला उद्देशून म्हणाला ," प्रिय मित्र दुर्योधन
या वेळी पाच वनवासी काय करत आहेत ?" त्यावर दु:शासन
उद्गारला ," मी सांगतो.....अर्जुन तर वनात लाकडे गोळा
करायला गेला असेल."
" आणि भीम पाला-पाचोळा गोळा करत असेल." दुर्योधन
उत्तरला. या वक्तव्यावर सर्वजण खो खो करून मोठ्या ने हसले. तेव्हा उपहासाने कर्ण उद्गारला ," आणि धर्मराज युधिष्ठिर एखाद्या कोणामध्ये मान खाली घालून पश्चात्ताप करत बसला असावा." कर्णाच्या या वक्तव्यावर पुन्हा सर्वजण हसले.
" आणि ती याज्ञसेनी द्रौपदी चूल फुकत असेल आता."
असे बोलून दुर्योधन किंचित थांबला. पण लगेच दु:शासनाला
म्हणाला ," अरे दु:शासन शिल्लक राहिलेले भोजन पांडवांच्या कुटीत पोहोचविण्याची व्यवस्था तर कर."
" चिंता करू नकोस भ्राताश्री अगोदर आपले पाळीव प्राणी
तर खाऊ दे." असे म्हणून तो मोठ्या ने हसला.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा