महाभारत ७३ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाभारत ७३ |
महाभारत ७३
पांडव वनात निघून गेले.याचे दुःख जर कोणाला जास्त
झाले असेल तर गंगापुत्र भीष्माना ते एकदम दुःखी अंतकरणाने आपल्या कक्षेत काळोख करून बसले आहेत. तेवढ्यात तेथे महामंत्री विदुर आले नि सर्वत्र काळोख पाहून त्यांनी गंगापुत्र भीष्मांला विचारले ," आपण असा काळोख करून का बसलेत आहेत तातश्री ?" तेव्हा ते विदूरला आपल्या जवळ यायला सांगतात.तेव्हा विदुर त्यांच्या जवळ आला नि त्याने त्याना पुन्हा विचारले ," आपण अजून माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीत तातश्री " पण तरी त्यांच्या प्रश्नाचे
उत्तर न देता गंगापुत्र भीष्म म्हणाले ," ह्या युगात मोठ्या
आयुष्याचा आशीर्वाद मिळविणे सुध्दा त्रासदायकच आहे.
नाही का विदुर."
" आपल्या वडीलधाऱ्या माणसा कडून मिळालेला शाप अथवा आशीर्वाद वरदान समजून छोट्यानी स्वीकारायचे असते.परंतु आपण आपल्या कक्षेत काळोख का करून ठेवला आहे ? ते नाही सांगितलेत अजून."
" आता उजेडाची पण भीती वाटू लागलीय विदुर. .कारण हस्तिनापूर मध्ये संपूर्ण काळोख दाटला आहे आणि त्या काळोखात आपण सारे चाचपडत आहोत मार्ग सापडत नाहीये. परंतु तू हस्तिनापूरचा रखवालदार आहेस.अर्थात तुलाच यातून मार्ग काढायलाच पाहीजेल."
" मी मार्ग काय काढणार तातश्री ? ज्यांनी स्वतःच हा मार्ग निवडला आहे त्याना मी कोण अडविणार ?"
" एवढा कठोर होऊ नकोस विदुर. तू सुध्दा ह्या राज्याचा
एक अंग आहेस अर्थात तुझी पण तेवढीच जबाबदारी आहे तुला ती अशी झटकता येणार नाहीये."
" मी आपली जबाबदारी झटकत नाहीये तातश्री .परंतु
ज्यांना आपलं हित कशा मध्ये आहे ते कळतच नाहीये त्याना
कसे बरे समजविणार जसे की झोपलेल्याला जागे करता येते परंतु झोपेचे सोंग घेणाऱ्याला जागे करणार तातश्री ?
आणि आपण द्युतक्रीडा भवन मध्ये पाहिले सुद्धा आहे. मी महाराजाना अनेक प्रकारे समजविण्याचा प्रयत्न केला. परंतु महाराजांनी माझं ऐकून घेतलं का ? नाही ना ?"
" मला कल्पना आहे त्याची तू तुझ्या परीने सर्व प्रयत्न
करून पाहिलेस.मीच काही बोललो नाही.परंतु खरं सांगू का तुला मी का नाही बोललो ? का कुणास ठाऊक ? परंतु मला असं वाटत होतं की आता पुढचा डाव युधिष्ठिर जिंकेल अशी
उगाचच मनात आशा धरून बसलो होतो. शकुनी महाधूर्त आहे तो हा युधिष्ठिरला डाव जिंकू देणार नाही हे मला माहित नव्हते अशातला भाग नाही.परंतु कदाचित चमत्कार घडला तर आणि असे वाटणे चुकीचे आहे असे काही मला वाटत नाहीये. म्हणूनच मला आपलं सारखं वाटत होतं की युधिष्ठिर ने हा डाव जिंकावा. म्हणजे शकुनीचा हस्तिनापूरशी असलेला
संपर्क कायमचा संपुष्टात येईल, असं वाटत होतं. तुझ्या
व्यतिरिक्त बाकी सर्व लोकांचा थोडा फार दोष आहे नाही असं नाही.म्हणून मी तुला विनंती करतो की हस्तिनापूरला विनाशा पासून आता तूच वाचवू शकतोस.भरतवंश आज
ज्या रक्ताच्या समुद्रात उभा आहे तो समुद्र फार खोलवर तर
आहेच शिवाय अथांग ही आहे त्यात आमची सारी जीवन मूल्ये बुडणार त्याबद्दल तिळमात्र शंका नाहीये. म्हणून तुला सांगतोय की तू हस्तिनापूरला वाचविण्याचा प्रयत्न कर. अर्थात मी तुला हेच सांगेन की धृतराष्ट्राला झोपेतून जागे कर त्याला वाटते की पांडवांना वनवासात पाठवून युध्द होण्या पासून टाळले आहे. परंतु त्याचा हा गैरसमज आहे, युद्ध तर होणार आज नाही झाले तरी तेरा वर्षानंतर निश्चितच होणार आणि त्यात आम्हां सर्वांच्या प्राणांची आहुती सुध्दा द्यावी लागणार आहे, म्हणून ते जर टाळायचे असेल तर जा नि आपल्या जेष्ठ बंधुला समजावून सांग की एवढ्यातच शहाणा हो नि पांडवांना माघारी बोलवून घे.कारण पांडवांना वनात जाऊन आज तेरा दिवस होत आहेत. शास्त्राच्या नियमानुसार तेरा दिवस म्हणजे तेरा वर्षाचा काळ मानण्यात येते असा एक विशेष नियम आहे."
" परंतु दुर्योधन ला हे मान्य नसेल तर ?"
" माझी निष्ठा युवराजच्या प्रति नाहीये तर महाराजांच्या प्रति आहे जर त्याने महाराजांच्या आज्ञेचे पालन नाही केलं
तर मी त्याला राजद्रोहाचा आरोप लावून त्याला मोठ्यात मोठी शिक्षा द्यायला भाग पाडीन. खरं हे मीच केलं असतं परंतु मी महाराजा पेक्षा मोठा असल्याने हट्ट करू शकत नाही. परंतु तू महाराजा पेक्षा छोटा आहे अर्थात तुला महाराजा पुढे हट्ट करण्याचा अधिकार आहे. जा पुत्र नि धृतराष्ट्राला समजविण्याचा प्रयत्न कर. जा विदुर जा."
विदूरला माहीत होतं की महाराज काही आपलं ऐकणार
नाहीत. परंतु प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे असा
विचार करून महामंत्री विदुर महाराज धृतराष्ट्राना भेटायला
त्यांच्या कक्षेत गेले असता तेथे महाराणी गांधारी सुध्दा उपस्थित होती.म्हणून विदुर ने महाराजाना थोडासा उपदेश
करण्याचा प्रयत्न करत म्हणाला ," प्रणाम महाराज , प्रणाम
वहिनी !" त्यावर महाराज धृतराष्ट्र म्हणाले ," मला असं का
वाटतं की तू काहीतरी गंभीर विषयावर बोलायला आलास कारण तू सूर्य उदय होण्याची पण वाट पाहिली नाहीस ?"
" विषय तर महत्वपूर्ण आहेच परंतु आपल्या दोघांचे दर्शन
घेण्याची पण मनात इच्छा होती म्हणून मी तातडीने आलोय."
" याचा अर्थ असा आहे की तू असं काही सांगायला आला
आहेस जे मला आवडणार नाहीये."
" परंतु विदूर जे काही सांगतात ते सदैव आपल्या हिताचेच
असते." महाराणी गांधारी उद्गारली.
" माहितेय मला.परंतु जे कडू वक्तव्य असते त्याला कडूच
म्हणायला हवं ना ? जसे की कुंती ने राज महालात राहणे
पसंद न करता विदूरच्या झोपडीत राहणे पसंद केले. ही
माझ्यासाठी लाजीरवाणी गोष्ट नाहीये का ?"
" ज्या राज भवनात तिच्या कुलवधुचा अपमान झाला.
त्या राज भवनात कशी राहील बरं ती ? आणि खरं सांगायचं तर मी अजून इथं का राहात आहे. कारण द्रौपदी चे वस्त्रहरण
म्हणजे समस्त स्त्री जातीचे वस्त्रहरण होते ते, भरतवंशीच्या
मर्याद्याचे वस्त्रहरण होते ते. म्हणून कुंतीने जे काय केलं ते
योग्यच केलं. तिच्या जागी जरी मी असती तर मी सुध्दा हेच केलं असतं जे तिने केलं."
" याचा अर्थ ह्या राज भवनात मी एकटाच राहिलोय. परंतु
माझी लाचारी ही की मी माझ्या पुत्रा मध्ये नि माझ्या अनुजच्या पुत्रा मध्ये युद्ध व्हायला नकोय म्हणून मी हा मार्ग
पत्करला. तेरा वर्षे मी युद्धाला पुढे ढकललं आहे, हे तुमच्या
द्यानात येत नाहीये."
" पण त्याचा फायदा काय ? तेरा वर्षानंतर युध्द होणारच
ना ?"
" नाही. तेव्हा सुध्दा काहीतरी उपाय शोधून काढण्यात
येईल."
" असं आपणास वाटतं पण ते सत्य नाहीये."
" ते तेव्हाचे तेव्हा पाहता येईल. आता फक्त तू एक काम
कर कुंतीला कसे ही करून तिला राज भवनात राहण्यास
राजी कर आणि तिला जर राज भवनात राहणे मान्य नसेल
तर आपल्या पुत्रा सोबत वनात जाऊन राहायला सांग."
" महाराज हे काय बोलत आहात आपण ?"
" योग्य तेच बोलतोय मी ! ती तुझ्या घरी राहिली तर
हस्तिनापूर कधीही विसरणार नाही की पांडव वन वन भटकत
आहेत आणि हस्तिनापूरला ते विसरणे फार गरजेचे आहे."
" त्यासाठी मी एक उपाय सुचवायला आलोय इथं."
" कुंतीने वनात जाण्याचा निर्णय घेतला का ?" महाराज
धृतराष्ट्र एकदम खुश होत विचारले.
" नाही.वहिनीचे आता वय झाले आहे. वनात भटकण्या
एवढी त्यांच्या अंगात आता ताकद राहिली नाहीये."
" मग तू उपाय तरी काय घेऊन आला आहेस इथं ?"
" तुम्ही त्याना बोलू द्याल तेव्हा ना सांगणार ते."
" ठीक आहे. तूच बोल रे बाबा आता."
" पांडवांना वनात जाऊन आज तेरा दिवस झाले आहेत.
आणि शास्त्राच्या विशेष नियमानुसार तेरा दिवस म्हणजे तेरा
वर्षा प्रमाणेच मानले जातात. म्हणून आपण कुण्या दूताला
वनात पाठवून पांडवांना इथं बोलवून घ्या म्हणजे सर्वकाही
ठीक होईल." असे म्हणता क्षणीच महाराज धृतराष्ट्राना
भयंकर राग आला आणि ते संतापाने विदूरला म्हणाले ,
" पांडवांना इथं बोलवून घेऊ नि दुर्योधनला आत्महत्या
करायला देऊ ? तू नेहमी ना त्या पांडवांचाच पक्ष घेतोस.
तुला जर ते पांडव एवढे प्रिय आहेत तर त्यांच्या पाशीच
जाऊन तू का राहात नाहीस." महाराज धृतराष्ट्रांचे हे वक्तव्य
महाराणी गांधारीला अजिबात आवडले नाही. म्हणून ती
मध्येच मोठ्या ने ओरडली ," आर्यपूत्र sss
परंतु महाराज धृतराष्ट्रांचा राग यत्किंचितही कमी झाला
नाही. ते अजूनच चिडून म्हणाले , " मग ह्याला तूच विचार की
हा माझा महामंत्री आहे का त्यांचा ? मी एवढ्या मुश्किलीने
तेरा वर्षे युध्द पुढे ढकलले आणि हा त्याना इथं बोलवायला
सांगतोय. म्हणजे दिवसरात्र युध्दाच्या भीती चे जीवन जगू ?
असे कदापि होणार नाहीये विदुर..." परंतु हे सर्व ऐकायला
विदुर थांबलाच नाही. इथून निघून जा म्हणता क्षणीच विदुर
तेथून चालते झाले होते. दोन तीन वेळा विदुर विदुर म्हणून हांक मारून पाहिली. परंतु प्रत्युत्तर मध्ये काहीच उत्तर जसे आले नाही तसे ते समजून गेले की विदुर तेथून निघून गेला
आहे. तसे चिडून पुढे म्हणाले ," बघितलेस गांधारी माझी
परवानगी न घेता निघून गेला कसा तो ?"
" ज्याला हाकलून दिले जाते ना आर्यपूत्र तो जाताना कोणाची परवानगी घेत नाही आर्यपूत्र !"
" तो अवश्य पांडवांकडे गेला असणार , जाऊ दे गेला तर ! त्याच्या गुणी माझं काही अडत नाही.मी हे साम्राज्य
त्याच्या भरवश्यावर चालवत नाहीये. आणि मला माहित आहे तो कुठं गेला असेल तो. परंतु त्याने कितीही पांडवांना
फितवण्याचा प्रयत्न केला तरी मला युधिष्ठिर वर पूर्व विश्वास
आहे की तो कधी ही विदुर चे ऐकून शास्त्राचा आधार घेऊन तेरा वर्षाचा वनवास तेरा दिवसात मोजून तो इथं येणार
नाही तर तेरा वर्षाचा वनवास पूर्ण करूनच तो येईल."त्यावर
गांधारी काहीच बोलली नाही. कारण ऐकणाऱ्याला सांगितले
जाते ऐकून न घेणाऱ्यास सांगून त्याचा उपयोग नाही हे त्या
जाणून होत्या.
जसा इकडे म्हणजे हस्तिनापूरात गंगापुत्र भीष्म आणि
महामंत्री विदुर ने तेरा दिवस म्हणजे तेरा वर्षे असा शास्त्राच्या
विशेष नियमाचा वापर करून निर्णय घेतला होता. अगदी
तसाच निर्णय युधिष्ठिर व्यतिरिक्त इतर पांडवांनी घेतला नि
सर्व तयारीनिशी शस्त्र धारण करून युधिष्ठिर जिथे देवाची पूजा करत बसला होता. तेथे ते चारही भाऊ आले नि युधिष्ठिरला वंदन केले. तेव्हा युधिष्ठिर ने समजून विचारले,
" कुठे निघाले आहेत तुम्ही सर्वजण ?"
" आम्ही हस्तिनापूरवर आक्रमण करायला निघालोय."
" काय ?" एकदम धक्कादायक वक्तव्य ऐकून विचारले.
" हां आपण फक्त आज्ञा द्यावी."
" पण हा अचानक निर्णय घेण्याचे कारण काय ?"
" मला पांचालीचे खुले केस पाहवत नाहीत भ्राताश्री !"
भीमसेन उद्गारला.
" पांचालीचे खुले केस तर मला सुध्दा पाहवत नाहीत प्रिय
भीम परंतु त्याने हे सिध्द होत नाही की त्याबदल्यात तुला दुर्योधनला दंड देण्याचा अधिकार मिळाला. कारण द्रौपदी
सहित तुम्हां सर्वांना डावावर मी लावले होते. दुर्योधनाने नाही.
अर्थात द्रौपदीचा अपमान माझ्या मुळे झाला आहे.दंड द्यायचा
असेल तर मला द्या."
" आमच्या पैकी कोणीही आपल्याला दोष दिला आहे का
भ्राताश्री ?
" हे कवच, गदा याचा अर्थ काय समजावा मी ? आणि तुम्ही लोक हे कसे विसरलात की आपल्याला बारा वर्षाचा
वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवासाची शिक्षा झाली आहे
म्हणून."
" ते तेरा वर्षे आज पूर्ण झालीच भ्राताश्री ! " अर्जुन उद्गारला.
" नाही. शास्त्राचा वापर मार्गदर्शनासाठी करायचा असतो
प्रिय भीम. त्याना आपल्या हितासाठी तोडामोडायचा नसतो.
तेरा दिवस जरी तेरा वर्षाचा काळ विशेष स्थितीत गणला
गेला असला तरी ते मला अजिबात मान्य नाहीये."
तेव्हा त्यांचे वक्तव्य ऐकून न सहन झाल्या ने द्रौपदी मध्येच उद्गारली ," तुमचे भ्राताश्री योग्य तेच बोलताहेत.
शास्त्राचे नियम काही विशेष स्थिती मध्येच मोडले जातात.
जसे की स्वतः हरल्यानंतर पत्नीला डावावर लावणे.तसेच
पत्नीला एक वस्तू समजून डावावर लावणे वगैरे म्हणून
आपल्या भ्राताश्री बरोबर धर्मा संबंधी वादविवाद करू नका.
फक्त अपमान सहन करत रहा बस्स !"
" मी आपली चूक मान्य केली आहे पांचाली. म्हणून
प्रायश्चित्त घेणे अति आवश्यक झाले आहे. परंतु तुम्ही
माझ्या अपराधाचे भागीदार नाहीयेत. अर्थात तुम्हां
लोकांना माझ्या सोबत राहण्याची आवश्यकता सुध्दा नाहीये.
तुम्ही लोक दिवस कशाला मोजता आहात ? मला सोडून
जाऊ शकता. परंतु मी मात्र बारा वर्षाचा वनवास नि तेराव्या
वर्षाचा अज्ञातवास पूर्ण केल्यानंतर मी विचार करेन की मला
आता काय करायला हवं आहे."
" भ्राताश्री आपल्याला चांगलेच माहीत आहे की आम्ही
आपल्याला सोडून कुठंही जाऊ शकत नाहीये." तेवढ्यातच
घोड्यांच्या टापांचा आणि रथांचा आवाज ऐकू येऊ लागला.
म्हणून युधिष्ठिर उद्गारला ," सहदेव sss
" आज्ञा करा भ्राताश्री ?"
" बघ जरा कोण आलंय ते ?"
" भ्राताश्री हा एका घोड्यांच्या टापांचा आवाज नाहीये.
शेकडो घोड्यांच्या टापांचा आवाज आहे हा. कदाचित आम्हाला वनवासाला पाठवून ही दुर्योधनच्या मनाचे समाधान
झाले नसेल .म्हणून हस्तिनापूरचे सैन्य घेऊन आला असेल.
तेव्हा आता तरी आम्हाला शस्त्र उचलण्याची परवानगी द्या."
" मग तर तुम्ही लोकांनी शकुनिमामाला ओळखलेच नाहीये. शकुनिमामा अशी चूक कदापि दुर्योधनला करू देणार नाही. उलट ते वाट पाहत असतील की कधी एकदा आमचे बारा वर्षाचा वनवास नि एक वर्षाचा अज्ञातवास कधी सुरू
होतंय कारण त् अज्ञातवासाच्या काळात जर त्या लोकांनी आम्हाला ओळखण्यात यशस्वी झाले तर पुन्हा बारा वर्षाचा वनवास नि एक वर्षाचा अज्ञातवास कसा आम्हला प्राप्त होईल याचा विचार करत असावेत लोक आणि हे सैन्य
आक्रमण करणाऱ्याचे असते तर जवळ येऊन घोड्यांच्या टापांचा आवाज थांबला नसता. हे सैन्य कुण्या हितचिंतकाचे असावे."
" अजून कोण शिल्लक राहिला आपला हितचिंतक भ्राताश्री ?" अर्जुन उद्गारला.
" तर मग एवढी सैन्या घेऊन कोण येऊ शकतो भ्राताश्री ?"
" सैन्य कधीही मित्र अथवा शत्रू नसते प्रिय नकुल. मित्र अथवा शत्रू असतो त्यांचा सेनापती !" तेवढ्यातच सहदेव सोबत द्रौपदीच्या बंधू सोबत प्रवेश करतो. आपल्या मेहुण्याला पाहून युधिष्ठिर उद्गारला ," प्रणाम युवराज ! बसून घ्या." तेव्हा युवराज धृष्टद्युम्न उद्गारला , " माझ्या पिताश्री ने बसण्याची अनुमती दिली नाहीये मला."
" काय ? महाराजानी आपल्याला बसण्याची परवानगी दिली नाही. का बरं ?"
" मला त्यांनी आदेश आहे की मी इथं पोहोचल्यानंतर
आपली परवानगी घेऊनच मगच हस्तिनापूर वर आक्रमण
करावे आणि आमचे सारे सैन्य आपल्या ध्वजाच्या खाली युध्द करण्यास सज्ज आहे फक्त आपल्या होकाराची आम्ही वाट पाहत आहोत. तेव्हा आपला काय विचार आहे तो आम्हाला सांगावा."
" जर आम्हाला युध्द करायचं असतं तर हस्तिनापूरच्या
सैनिकांसाठी फक्त आम्ही पाच भाऊच पुरेसे आहोत. परंतु
आम्ही युध्द करू इच्छित नाहीये."
" युध्द करू इच्छित नाही पण का ?"
" ती वेळ अजून आलेली नाही ?"
" मग ती कधी येणार आहे वेळ ?"
" ते इतक्यात कसं सांगता येईल ."
" परंतु मला युद्ध करायचंच आहे, कारण अपमान माझ्या
बहिणीचा झाला आहे. भले तुम्ही त्याना माफ करा. परंतु मी
त्याना कदापि माफ करणार नाहीये.म्हणून आपण फक्त मला
आदेश द्या.बाकी मी पाहतो काय करायचे ते."
" आपले म्हणणे अगदी बरोबर आहे म्हणून मी आपल्याला रोखू शकत नाही. जर पांचालीचे म्हणणे असेल
की आमचा मान अपमान तिच्या माना अपमाना पेक्षा वेगळा
असेल तर तिच्या अपमानाचा प्रतिशोध आपण घेऊ शकता. अर्थात आपण हस्तिनापूरवर आक्रमण करू शकता."
त्यावर द्रौपदी आपल्या बंधुला समजावत म्हणाली ,
" भ्राताश्री आपण पिताश्रीना जाऊन सांगा की आता
माझं भाग्य नि दुर्भाग्य ह्या पाच जना सोबतच आहे अर्थात काठी पाण्यावर मारली तर कदाचित पाणी दूर होईल ही परंतु अपमानाची कोणतीही काठी मला ह्यांच्या पासून वेगळी करू शकत नाही. म्हणून आपण कांपिल्य नगरीला निघून जाणे हेच योग्य."
" तसे पिताश्रीना माहीत होतंच म्हणा की तुझ्या पती कडून युद्धाची परवानगी मिळणार नाही. तुझे पती म्हणजे धर्माचे प्रतीक आहेत. ते अधर्म कदापि करणार नाहीत. भले
त्यांच्या सोबत कोणीही कसा वागला तरीही ! परंतु मी काय
करू ? मी कांपिल्या नगरी वरून युध्द करण्याच्या विचाराने
निघालो होतो. पण काही हरकत नाही जेव्हा कधी तुम्ही युध्द करण्याचा निर्णय घ्याल तेव्हा मात्र आमचं सैन्य सज्जच असेल असं समजा."
" त्याबद्दल आम्हाला पूर्ण विश्वास आहे युवराज."
" जर आपली परवानगी असेल तर तेरा वर्षे मी द्रौपदीला
आपल्या सोबत कांपिल्याला घेऊन जाऊ ?"
" आमची काहीच हरकत नाहीये."
" नाही भ्राताश्री मी माझ्या पतींना सोडून कुठेच येऊ शकत नाहीये. कारण हा वनवास माझी रणभूमी आहे आणि
हे मोकळे केसच माझे शस्त्र आहे."
" ठीक आहे, मग मला आज्ञा द्या." त्यानंतर युवराज
धृष्टद्युम्न कांपिल्याला जायला प्रस्थान करतो.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा