महाभारत ७८ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाभारत ७८ |
महाभारत ७८
अर्जुन दिव्य अस्त्रांसाठी इंद्र लोकांत गेला.तेथे इंद्र दरबारात अप्सरा उर्वशी नृत्य करत आहे नि इंद्र सहित अन्य
देव नृत्य पाहण्यात मग्न आहेत. तेवढ्यात समोरून अर्जुन
इंद्र दरबारात प्रवेश करतो. त्याच्या वर उर्वशी ची नजर पडताच ती एकदम मोहित होते नि त्याच्या कडे पाहतच राहते. इंद्रदेव च्या ती गोष्ट द्यानात येते परंतु इंद्रदेव त्या गोष्टी कडे दुर्लक्ष करतात. कारण त्याना माहीत असते की अर्जुनला
भविष्यात त्याचा फार उपयोग होणार आहे. म्हणून ते पाहून
ही न पहिल्या सारखे करतात. अर्जुन इंद्रदेवाला वंदन करून
म्हणाला ," प्रणाम भगवन्त !" तेव्हा इंद्रदेवाने अर्जुनला आशीर्वाद देत म्हटलं ," आयुष्यमान भव !" असे म्हणून ते
पुढे म्हणाले ," तुला दिव्य अस्त्रे प्राप्त झालीत का कुंतीपुत्र ?"
" आपल्या नि अन्य पूज्य देवतांच्या आशीर्वाद मुळे ना
केवळ शस्त्र प्राप्त झाले तर त्याचा प्रयोग कसा करायचा तेही
शिकलो.आता मला पृथ्वीवर जाण्याची आज्ञा द्या."
" अजून तुला गंधर्व अस्त्र कुठं प्राप्त झाला आहे कुंतीपुत्र ?"
" गांधार अस्त्र ?"
" हां स्वत: चित्रसेन तुला गांधार अस्त्र शिकविणार आहेत."
" परंतु प्रभू मी इथं अंतिम युद्धासाठी दिव्य अस्त्र प्राप्त
करायला आलो होतो. संगीत आणि नृत्याशी एका योध्याचा
काय संबंध ?"
" कला सुध्दा दिव्य अस्त्रा मध्ये सफल अस्त्र आहे कुंतीपुत्र ."
" जर असं आहे भगवन्त अंतिम युद्धाच्या नंतर हे अस्त्र
सुध्दा प्राप्त करेन."
" युध्दा नंतर अस्त्रांचे काय करणार आहेस कुंतीपुत्र ?
आणि हे विसरू नकोस तुला एक वर्षाचा आज्ञातवास मध्ये
घालवायचा आहे त्या एक वर्षांत तुझं हे रूप कोणापासून
लपणार आहे का ? सूर्य , चंद्र , धर्ती आणि आकाश पृथ्वी
आणि पाण्या प्रमाणे तुझ्यासाठी आज्ञातवास असंभव आहे.
म्हणून चित्रसेन ला नमस्कार कर आणि संगीत आणि नृत्य
शिकायला आरंभ कर."
" जशी आपली आज्ञा भगवंत !" असे म्हणून अर्जुन ने
चित्रसेन चे चरणस्पर्श करत म्हटलं ," प्रणाम गुरुदेव !"
त्यानंतर अर्जुन चित्रसेन कडून नृत्य संगीत शिकायला
सुरुवात केली. ता तैय तक तक अर्जुन नृत्य करत असताना
उर्वशी मंत्रमुग्ध होऊन त्याचे नृत्य पाहत होती. तेव्हा इंद्रदेवची
नजर उर्वशी वर पडली असता तिची मनोदशा पाहून इंद्रदेव
काय समजायचे ते समजून गेले.तिचे अर्जुन वर मोहित होणे
अर्जुन साठी वरदान ठरेल असा विचार करून त्यांनी उर्वशी ला मुद्दाम विचारले ," उर्वशी काही समस्या आहे का ?"
" माझे मन कुठंतरी हरवले आहे प्रभुवर ."
" इंद्र दरबारातील अप्सरांचे मन हरवणे हे इंद्र दरबारातील
लोकांसाठी शुभ वार्ता नाहीये. कारण तुमचे काम आहे लोकांचे मन भटकावणे स्वतःचं मन भटकावण्याचे नाहीये.
तुझं मन भटकलं असेल तर त्यावर उपाय कर."
" काय उपचार करू प्रभू वर ?"
" जे तुझ्या मनात आहे ते त्या व्यक्ती समोरून बोलून टाक." असे म्हणून इंद्रदेव अदृश्य झाले. तेव्हा उर्वशी अर्जुन
जिथे नृत्य करत येते नि मंत्रमुग्ध होऊन पाहत असते.
" ता ता तय तक तक " अर्जुन एकदम तल्लीन होईन नाचत
होता. नृत्य करून पूर्ण होताच अप्सरा उर्वशी अर्जुनला
उद्देशून म्हणाली ," तू तर एकदम प्रवीण झालास. तू आता
आपल्या गुरुला सुध्दा मात देशील. " त्यावर अर्जुन म्हणाला,
" नाही देवी. कोणताही शिष्य आपल्या गुरुला मात देवू शकत नाही.तो फक्त एवढं करू शकतो की झोळी आपल्या हातात घेऊन गुरूच्या पुढे उभा राहू शकतो. कारण विद्या दान
तर गुरुवर्य करतात ना ? पण हा तुला जर माझं नृत्य खरंच
आवडलं असेल तर मी स्वतःला धन्य समजेन की माझ्या
मुळे माझ्या गुरुला लाज वाटणार नाहीये."
" जर तू अप्सरा असतास तर इंद्रदेवाच्या मेनका उर्वशीच्या
मध्ये असतास.तुझ्या सारख्या योध्दाला नृत्य करायला येते
ही अशक्य गोष्ट तू शक्य करून दाखविलीस."
" अशक्य तर काही असंच नाही देवी."
" माझं नाव उर्वशी आहे मग तू मला देवी का म्हणतो आहेस माझं नाव घे."
" हे अशक्य नाहीये देवी."
" आताच तर म्हणत होतास की अशक्य काही असतंच नाही म्हणून."
" मर्यादित पुरुषांना मर्याद्याचे उल्लंघन करणे अशक्य असते देवी."
" तुझं मन कधी भटकले आहे का ?"
" मन भटकण्यासाठीच असते.
" आम्हां इंद्र दरबारातील लोकांना त्याचा अनुभव नाहीये.
मनाचा उदासीपणा कधी जाईल कुंती पुत्र अर्जुन ?"
" भटकण्याचा अर्थ हा आहे की मन कुठंतरी हरवले
आहे.अर्थात त्याला त्याचा उपाय करायला पाहिजे."
" परंतु ते मिळविण्यासाठी मन व्याकुळ असेल तर !"
" त्याला मन भटकले असे म्हणता येणार नाही. जर मनाला काही हवं आहे तर त्याने ते मिळविण्याचा प्रयत्न अवश्य करावा."
" म्हणजे तुम्हाला ही मान्य आहे की आपल्याला जे हवं आहे ते मिळविण्याचा प्रयत्न करायला काहीच हरकत नाहीये. होय ना ?"
" हो , नक्कीच !"
" मग माझे लक्ष तू आहेस. अर्थात तुझ्यावर माझं मन बसलं आहे म्हणून तू माझा स्वीकार कर."
" हे अशक्य आहे." त्यावर ती चिडून म्हणाली , " कधी तू
म्हणतोस की काहीच अशक्य नाही. तर कधी म्हणतोस हे
शक्य नाही ते शक्य नाही. " किंचित मृदू स्वरात म्हणाली ,
" मी सुंदर नाहीये का ?"
" असं कोण म्हणेल ? तुझं सौंदर्य तर ऋषी मुनींना पण
भुरळ पाडील असं आहे."
" तर मग ते सौंदर्य तुला का भुरळ पाडत नाहीये ?"
" कारण मी ऋषी नाहीये."
" वादविवाद मध्ये वेळ घालवू नकोस अर्जुन माझ्या मिठीत ये."
" आईच्या मिठीत जाणे हा पुत्रासाठी सौभाग्याचा क्षण आहे."
" आई sss आई म्हणालास तू मला ?"
" आईला आई नको तर दुसरं काय म्हणू ? तुम्हांला ही
आठवत असेल की माझ्या पूर्वज राजा पुरु आपल्या सौंदर्यावर मोहित झाले होते आणि तू त्यांची पत्नी बनून
राहात होतीस म्हणून मी तुला मातोश्री कुंती आणि माद्री यांच्या रूपातच पाहू शकतो." त्यावर अप्सरा उर्वशी भयंकर
चिडली नि म्हणाली ," अप्सरा ना कोणाची पत्नी असते ना
कोणाची माता असते. त्या केवळ सौंदर्याची प्रतिमा असते.
म्हणून तू ह्या सौंदर्याच्या प्रतिमाचा स्वीकार कर."
" आईच्या रुपात तर तुझा स्वीकार केला आहे देवी. अर्थात माता नि पुत्र या दोघांमध्ये दुसरं कोणतेही नाते असू
शकत नाहीये.म्हणून मी फक्त तुझा सदैव पुत्र होऊ शकतो पुरुष कदापि होऊ शकणार नाही देवी."
" तर मग मी तुला शाप देते की तू सदैव पुत्रच बनून रहा.
पुरुष कधीच बनू नकोस. आणि आज पासून नपुसक चे जीवन जग यापुढे." असे म्हणून उर्वशी रागाने तेथून निघून
गेली. अर्जुन मात्र खिन्न मनाने तसाच निघाला इंद्रदेवाला भेटायला. त्या अगोदर इंद्रदेव जवळ अप्सरा उर्वशी आली
नि तिने घडलेली हकीगत इंद्राला सांगितली तेव्हा इंद्र तिला
म्हणाला ," त्याने तुझा अपमान नाही केला. जर अप्सरा कुणाची पत्नी अथवा माता बनू शकत नाही ती फक्त सौंदर्याची प्रतिमा आहे तर तिला काही सुध्दा इच्छा करण्याचा
अधिकार नाहीये. ना ती कुणावर प्रेम करू शकत नाही कुणावर क्रोध .अर्थात तू अप्सरांच्या मर्याद्याचे उल्लंघन केले
आहेस."
" मी आपली क्षमा मागते प्रभू परंतु मी आता शाप देऊन
झाले. तो मी परत घेऊ शकत नाहीये."
" परंतु तू त्याचा अवधी तर कमी करू शकतेस. आपल्या
शापाची मर्यादा फक्त एक वर्षाची कर आणि ती सुध्दा त्याच्या इच्छेनुसार."
" जशी आपली आज्ञा !" असे म्हणून उर्वशी तेथून निघून
गेली. थोड्या वेळानंतर एकदम उदास मनाने तेथे अर्जुन आला नि इंद्रदेवाला वंदन करून म्हणाला , " प्रणाम भगवन्त !" इंद्राने आशीर्वाद देत म्हटलं ," आयुष्यमान भव !"
" हे वरदान आता देऊ नका भगवन्त ."
" का ?"
" नपुसकाचे जीवन जगून मी काय करू ?"
" हा शाप नाही वरदान आहे असे समज कुंती पुत्र तुला
हा शाप आज्ञातवासात कामास येईल. अर्थात तू आता पृथ्वीवरची यात्रा आरंभ करू शकतोस."
"जशी आपली आज्ञा भगवन्त . परंतु एक वर्षाच्या अज्ञातवासा साठी एवढा मोठा शाप."
" उर्वशी ने स्वतःच आपल्या शापाची आयु मर्यादा कमी
करून फक्त एक वर्षाची केली आहे आता फक्त एक वर्षं तू
नपुसक राहशील.आणि ते वर्ष ही तू आपल्या इच्छेनुसार
निवडू शकतोस. हे तुझ्यासाठी वरदान नव्हे काय ?"
अर्जुन ने इंद्रदेवाला वंदन केले नि तेथून निघाला. तेव्हा
त्याच्या मनात विचार आला की अभिमन्यू आता केवढा झाला असेल ?
अभिमन्यू पळत असतो नि सुभद्रा त्याच्या मागे पळत असते आणि त्याला दम भरत असते. तो पळत पळत
तो श्रीकृष्णा जवळ येतो नि आपल्या तोंडावर बोट ठेवून
तो आपल्या मामाला खुणेने सांगत असतो की मी कुठं लपलो
आहे हे आईला सांगू नका. अशी खुण करून श्रीकृष्ण जिथे
बसलेला असतात अभिमन्यू त्यांच्या मागेच लपतो. ती शोधत
शोधत श्रीकृष्णा जवळ येऊन इकडे तिकडे अभिमन्यू ला शोधत असते. तेव्हा श्रीकृष्ण मुद्दाम विचारले ," सुभद्रा मी इथं
बसलो आहे तू कुठं शोधते आहेस मला ?"
" आपल्याला चांगले माहीत आहे दादा मी कुणाला शोधत आहे ते.? पण तरी ही सांगते मी त्या नटखट ला शोधत आहे ."
" नटखट हे तर माझ्या अनेक नावा मधले एक नाव आहे.
आणि हे नाव मला नंदगाववाल्यानी दिले होते. मी कुणाचं
लोणी चोरून खायचा , तर कुणाची मटकी फोडायचा यशोदा
आई कडे तर इतक्या साऱ्या तक्रारी यायच्या की विचारू नकोस."
" मी अभिमन्यूला शोधत आहे दादा."
" बरं बरं !"
" आपण मला नदंगावच्या कितीही कथा सांगितल्यास
तरी मी त्याला आज सोडणार नाही."
" मामाश्री सांगू नका मी कुठं लपलोय ते." अभिमन्यू
पट्कन बोलला. त्यामुळे सुभद्राला समजले की अभिमन्यू
कुठं लपलाय तो. तिने पाठीमागे जाऊन त्याला पकडत
म्हणाला ," चोरा इथं लपला आहेस होय ?"
" त्याला सोड सुभद्रा तो आता माझ्या शरण मध्ये आहे.
आणि हे कदापि विसरू नकोस सुभद्रा की हा जर जन्मला
येणार नसता तर तुझं अर्जुन शी लग्न ही झालं नसतं हा बाळ
तुझ्या जीवनाचे सार्थक करेल. हा तुझा पुत्र म्हणून कोणी
लक्षात ठेवणार नाही परंतु तू त्याची माता आहेस हे सारे जग
ओळखेल."
" मग काय मी त्याचे चरण धरू ?"
" नाही. तू धरू नकोस त्याचे चरण कारण तसे केल्याने
मुलाचे आयुष्य कमी होते. म्हणून मुलाने आपल्या आईचे चरण धरायचे असतात. म्हणून तुझ्या माया ममतेचा सारा
कोष त्याच्यावर उधळण कर ." असे म्हणून अभिमन्यू कडे
पाहून त्याला समजावत श्रीकृष्ण म्हणाले ," अभिमन्यू तू
आपल्या आईला अवश्य त्रास दे कारण तो तुझा अधिकारच
आहे. परंतु इतका पण त्रास देऊ नकोस ज्यामुळे तुझी आई रडू लागेल. कारण आई रडलेली ईश्वरला ही आवडत नाही."
" पण आपण तर मला सांगितले होते की मला माझ्या
पिताश्री सारखे धनुर्धर व्हायचे आहे. असे सांगितले होते की
नाही ?" त्यावर श्रीकृष्ण हसून म्हणाले ," हां सांगितले होते
आणि तुला अर्जुन सारखा धनुर्धर बनायचे आहे."
" मग तुम्ही आईला हे का सांगत नाही. मी जेव्हा अभ्यास
करायला बसतो तेव्हा आई म्हणते हा जेवण करण्याची वेळ
आहे जेवण केल्यावर म्हणते की ही विश्राम करण्याची वेळ
आहे." त्यावर श्रीकृष्ण हसतात.तशी सुभद्रा म्हणाली ," ऐकलेस दादा तो काय म्हणाला ते."
" हाच त्याचा मोक्षाचा मार्ग आहे.म्हणून तू त्याला रोखू
नकोस. हा मनुष्याच्या इतिहासा मध्ये सर्वात कमी वया मध्ये
सर्वात मोठा महारथी होणार आहे आणि हा असे युध्द करील
की भूत , भविष्य आणि वर्तमान तिन्ही काळातील लोक ह्याला सदैव प्रणाम करतील."
" हे आपण कोणत्या युध्दा विषयी बोलत आहात दादा ?"
" मी त्या युध्दा विषयी बोलतोय सुभद्रा की जे युद्ध ह्या
युगा मध्ये सत्य आणि असत्य , प्रकाश आणि काळोख
याच्या मध्ये होणारे अंतिम युद्ध आहे ह्या युद्धा मध्ये कोणीही
निपक्ष राहणार नाही सुभद्रा तू सुध्दा अभिमन्यू बनून युध्द करशील."
" आणि आपण ... ?"
" सर्वकाही आताच विचारणार आहेस ? सुभद्रा घेऊन
जा ह्याला.आणि ह्याच्या प्रति तुझं जे कर्तव्य आहे ते कर.
ह्याच्या धनुष्यावर आपल्या आशीर्वादाचा बाण लाव.आणि
आपल्या आशीर्वादाचे कवच ह्याला घाल. कारण मी ज्या
युध्दा विषयी बोलतोय सुभद्रा तो दिवस पूर्ण त्याच्या नावाने
ओळखला जाईल.
" ह्या युध्दा मध्ये आपला विजय तर होईल ना दादा ?"
" हे असे युध्द असेल सुभद्रा संसार मध्ये मोठ्यात मोठे
योद्धे महारथी ह्याला प्रणाम करतील. म्हणून ह्याला घेऊन जा नि आपले कर्तव्य करत रहा.बस्स !"
गंगापुत्र भीष्म आणि आचार्य द्रोण मोठ्या चिंतेत बसले
आहेत त्याना कळत नाही की भविष्यात होणाऱ्या युद्धाला
कसे थांबवावे ! त्याना कोणताही मार्ग सुचत नव्हता. तेवढ्यात तेथे महामंत्री विदुर येतात. त्या दोघांना चिंतामय
अवस्थेत पाहून ते काय समजायचे ते समजून गेले. परंतु तसे
न भासविता त्यांनी त्याना वंदन करत म्हटलं ," प्रणाम तातश्री! " तसे ते म्हणाले ," ये विदुर तू पण बैस आमच्या
सोबत आणि तू सुध्दा आमच्या प्रमाणे विचार कर , की तेरा
वर्षा नंतर होऊ घातलेल्या युद्धाला कसं थांबविता येईल."
" पण आपण का रोखू इच्छिता युध्द ?"
" म्हणजे काय युद्ध होऊ द्यायच महात्मा विदुर आचार्य द्रोण ने विचारले.
" पांडुपुत्रा सोबत अन्याय झालाय हे माहीत असतानाही
युध्द थांबविण्याच्या वार्ता करताय आपण ?"
" हां विदुर हां !"
" पण का ?"
" समज माझा ह्यात स्वतःचं स्वार्थ आहे ."
" परंतु युध्द कसं थांबविणार ते नाही सांगितले."
" त्याचसाठी तर तुला त्यातून मार्ग काढायला सांगतोय."
" मी काय काढणार यातून मार्ग ? आणि समजा काढला
तरी कोण ऐकणार आहे माझं ? पांडुपुत्र माझं ऐकतील ही
कदाचित. परंतु दुर्योधनला तर माझं काहीच सांगणे पटत
नाही आणि महाराज त्याना फक्त गांधार नरेश शकुनी सांगतात तेच योग्य वाटतं."
" हां हे म्हणणे तुझं खरं आहे , परंतु युध्द व्हावे असे गांधार नरेश शकुनीला सुध्दा वाटणार नाही."
" परंतु मला एक कळत नाहीये की युध्द होऊ नये असे का वाटतं आपणाला ?" विदुर उद्गारला.
" एवढा निर्दयी होऊ नकोस महात्मा विदुर ज्या प्रश्नांचे
उत्तर तुला माहीत तोच प्रश्न गंगापुत्र भीष्माना विचारतो आहेस." आचार्य द्रोण म्हणाले.
" करू दे त्याला आपला प्रश्न आचार्य द्रोण करू दे त्याला
प्रश्न " असे म्हणून गंगापुत्र भीष्म महामंत्री विदुर कडे पाहत
म्हणाले ," आता ऐक मी युध्द का नको म्हणतोय युध्द झालंच
तर धर्म ना पांडुपुत्रा सोबत आहे आणि नाही दुर्योधन सोबत
असेल कारण दुर्योधन अधर्माचा पूर्ण सागर आहे. ज्याने माझ्या डोळ्यासमोर माझी कुलवधू द्रौपदी चे वस्त्रहरण करण्याचा आदेश दिला. मी अद्याप विसरलो नाहीये ते.परंतु
युध्द झालेच तर मला अधर्माच्या बाजू ने युध्द करावे लागेल."
" आणि प्रतिज्ञा चे निमित्त पुढे करून अधर्माच्या बाजूने
युध्द करणार ..... हे आपल्याला शोभत नाहीये तातश्री !"
" माहीत आहे ते मला पण तरी देखील मी तुला प्रश्न
विचारतोय की मला काय करायला पाहिजे ते तूच सांग.
पण त्या अगोदर मी काय सांगतो ते ऐक. माझी प्रतिज्ञा
माझे वडील आणि आई सत्यवती यांच्या विवाह संबंधी होती.
आता मला तू हे सांग त्या प्रतिज्ञाचे मी काय करू ? कुठं फेकू
ती प्रतिज्ञा ? तुला बोलायला सोपे यासाठी वाटते कारण तू
कधी प्रतिज्ञा केलीसच नाहीस. मला माहित आहे तुझं पांडवावर खूप प्रेम आहे. परंतु माझंही तेवढंच प्रेम आहे
पांडवांवर किमान तुझ्या पेक्षा जास्तच. आणि तू हे समजू
नकोस की मला धर्म आणि अधर्म सत्य आणि असत्याची
भाषेचे ज्ञान नाहीये. परंतु युध्द होणारच असेल तर अवश्य
होईल. पण त्या युद्धात माझे सारे अस्त्र शस्त्र दुर्योधन सोबत
असतील. परंतु माझे सारे आशीर्वाद युधिष्ठिर आणि त्याच्या
बंधू सोबत असतील. म्हणून लक्षात ठेव महात्मा विदुर ज्या
दिवशी हस्तिनापूरचे विभाजन झाले होते ना त्याच दिवशी
माझे सुध्दा दोन भागात विभाजन झाले होते." त्यावर कोणीच
काही बोलले नाहीत. इथं ह्या लोकांमध्ये युध्दा संबंधी वार्ता
सुरू आहेत. तशाच वार्ता दुर्योधनाच्या कक्षेमध्ये सुध्दा युद्धाच्या चर्चा सुरू आहेत. म्हणजे झाले असे की ,
दुर्योधन आपल्या कक्षेमध्ये मोठ्या चिंतामय अवस्थेत
बसलेला असतो. तसे त्याला बसलेले पाहून अंगराज कर्णाने
त्याला विचारले ," तुझ्या या मित्राला तू असा चिंतेत बसलेला
अजिबात आवडत नाहीये युवराज."
" तुला हे चांगलेच माहीत आहे की मी भ्याड नाहीये मित्र
आणि मला हे सुद्धा माहीत आहे की मृत्यू जीवनाचे अंतिम सत्य आहे.परंतु मी भीमाच्या हातून मरू इच्छित नाहीये. आणि जस जसा तेरा वर्षांचा काळ लोटत चालला आहे तस
तसे भिमाच्या प्रतिज्ञाचे स्वर माझ्या कानावर आदळत आहेत."
" भिमाची भीती वाटते का तुला ?"
" भीती हा शब्द गुरू द्रोणाचार्यानी आमच्यापैकी
कोणालाही शिकविलेला नाहीये. नाही पांडवांना आणि नाही
आम्हाला."
" मग तुझ्या स्वरात कंपन का ? तू तर महारथी आहेस."
" तो सुध्दा महारथी आहे शिवाय आम्ही दोघांनी एकाच
गुरू कडून युध्द कला शिकली आहे. जे मला येते ते त्याला
सुध्दा येते. आणि युध्द काही सारीपाटाचा खेळ नाहीये की
जे मामाश्री कपटाने जिंकतील. माझ्या म्हणण्याचा अर्थ इतकाच आहे की युध्द झालंच तर युद्धात विजय त्याचा ही
होऊ शकतो किंवा माझाही विजय होऊ शकतो. हार त्याची
पण होऊ शकते नि माझी ही हार होऊ शकते.मी युद्धाला भीत नाही परंतु मी भीमाच्या हातून हरू इच्छित नाहीये."
दुर्योधन उद्गारला. तेव्हा युत्सुस उठून उभा राहत म्हणाला ," हे तर आपल्याला वहिनी चे वस्त्रहरण करण्याचा आदेश देण्यापूर्वी विचार करायला हवा होता भ्राताश्री !" तसा दुर्योधन चिडून म्हणाला ," तू माझा भाऊ आहेस का पांडवांचा गुप्तचर."
" ते सुध्दा आपले भाऊच आहेत भ्राताश्री !"
" नाही ते आमचे भाऊ नाहीयेत."
" भ्राताश्री एकदम बरोबर बोलत आहे. आणि तुला ही
चांगले माहीत आहे की ते आमचे भाऊ नाहीयेत. काकी ने
वनातून आणलेले पाच मुलं आमचे बंधू बनवू शकत नाही.
केवळ काकीच्या सांगण्याने आम्ही ते सत्य मानू शकत नाही."
दु:शासन उद्गारला.लगेच दुर्योधन त्याला दुजोरा म्हणाला,
" हां !" त्यावर अंगराज कर्ण म्हणाला ," जर महाराणी कुंती
सांगत आहे की ते पाचजण पांडुपुत्र आहेत तर पांडुपुत्रच आहेत राजकुमार दु:शासन माता तुझी असो अथवा अन्य
कोणाची माता सदैव आदरणीय आहे."
" मग काय हस्तिनापूर मी त्याना देऊन टाकू ?" दुर्योधन
उद्गारला.
" माझ्या म्हणण्याचा अर्थ तसा कदापि नाहीये.हस्तिनापूर
राज्य तुझं आहे नि तुझंच राहील. परंतु त्यासाठी कोणाच्याही आईचा अपमान करण्याचा अधिकार तुला नाहीये."
" चला मानलं ते माझे भाऊ आहेत. परंतु ह्याला माझ्या
नजरे समोरुन आताच्या आता जायला सांग.कारण हा सुध्दा
काकाश्री विदुर प्रमाणे सदैव त्या पांडवांचा पक्ष घेतो. म्हणून
माझ्या नजरे समोरून दूर हो युत्सुस !"
" मला आज्ञा असावी भ्राताश्री ! परंतु मी आपला धाकटा
भाऊ आहे या नात्याने माझे हे कर्तव्य होतं की विनाशाच्या
पावलांची कधी चाहूल लागत नाही."
" काय म्हणालास ? " दुर्योधन मोठ्या ने ओरडला. आणि
त्याला मारायला आपला हात उगारला.परंतु अंगराज कर्णाने
त्याचा हात पकडला. नि उद्गारला ," तू इथून जा युत्सुस !
" प्रणाम भ्राताश्री !" असे म्हणून तो चालता झाला.
" तू मला का रोखलास मित्र ?"
" कारण तो तुझा भाऊ आहे मित्र ."
" नाही पाहिजे मला असला भाऊ जो नेहमी माझ्या शत्रूंच्या हिताचे बोलतोय. आणि तो माझा सख्या भाऊ नाही
तर सावत्र आहे."
" त्या लोकांचा आदर करायला तुला शिकले पाहिजे जे
लोक तुझ्या समोर सत्य बोलण्याची हिंम्मत करतात.म्हणून
महात्मा विदुर , युत्सुस सदैव आदरनिय आहेत. आपल्या
कानांना विरोध ऐकण्याची सवय लाव मित्र कारण जे लोक
तुझ्या समोर विरोध करतात हे त्यांच्या दृष्टीने सत्य सांगत आहेत. आणि तो साहसी सुध्दा आहे. युत्सुस माझ्या पेक्षा ही
चांगला आहे. कारण तो विरोध तरी करतो परंतु मी तेही करत नाही."
" तुझ्या मनात इच्छा आहे तर तुही कर ना माझा विरोध !"
" मी नाही करू शकत तुझा विरोध कारण माझ्या जीवना मध्ये फक्त दोनच लक्ष आहेत. एक तुझी साथ देणे आणि दुसरा अर्जुनचा वध ... एक ना एक दिवस नीतीला माझी किंवा अर्जुनची निवड करावीच लागेल. मला मरणे मंजूर आहे परंतु अर्जुन सोबत एका युगात जगणे मंजूर नाहीये."
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा