महाभारत ८२ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाभारत ८२ |
महाभारत ८२
नकुल सहदेवला भेटायला आला. तसे सहदेव ने आपल्या
आजूबाजूला पाहिले जवळपास कोणीही नाही असे पाहून
नकुल जवळ येत सहदेव नकुलला म्हणाला ," नकुल मोठ्या
दादाने सांगितले आहे की एकमेकांना भेटू नका जेणे करून
कोणाला संशय येईल असे वागू नका." त्यावर नकुल म्हणाला, " दादा , काय करू ? तुला भेटून दोन महिने होत
आले मला राहावे ना म्हणून तुला भेटायला आलो मी."
" तुला काय वाटतं मला इच्छा होत नाही तुला भेटण्याची ?
खूप होते. कारण आपण एकमेकांना पासून कधी दूर राहिलोच नाही. पण काय करणार नाईलाज आहे."
" खरंय तुझं पण तुला माहितेय एके दिवशी मी महाराजा
साठी अश्व घेऊन राजभवन ला गेलो होतो तेव्हा त्यांच्या एका
दासा ने मला सांगितले की भोजन करून जा. नवीन स्वयंपाकी खूप रुचकर जेवण बनवितो. आणि का नाही
बनवणार तो स्वयंपाकी सम्राट युधिष्ठिरचा स्वयंपाकी आहे.
असे म्हणून तो मला स्वयंपाक घरात घेऊन गेला.मला पाहून
मजल्या दादाला इतका आनंद झाला की त्याना रडू आले.
त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहून त्या दासा ने विचारले ," हे काय
बल्लव महाराज आपल्या डोळ्यात पाणी ?" त्यावर मजले दादा म्हणाले ," आताच कांदे कापले ना , म्हणून डोळ्यात
पाणी आले. " त्यावर तो दास म्हणाला ," आपण तर ओळखच असणार कारण ह्या सम्राट युधिष्ठिर कडे घोडेस्वारी
सांभाळत असे." त्यावर मजले दादा म्हणाले ," हां एक दोन
वेळा पाहिले होते मी ह्याला." असे म्हणून नकुल कडे पाहत
भीम ने विचारले ," कसा आहेस बंधू ?" मी म्हटलं ," देवाची
कृपा आहे नि आपली दया आहे." तेव्हा मजले दादा म्हणाले,
" आता तू आलासच आहेस तर जेवून जा."
" म्हणूनच सोबत घेऊन आलोय त्याला बिचारा एक दिवस
तरी चांगले भोजन करील. आपण त्याला जेऊ घाला मी येतो." असे म्हणून तो दास तेथून निघून गेला. तो गेल्या नंतर
भीमाने इकडे तिकडे पाहिले नि मग नकुलला बैस !" असे
म्हणून एका साथीदाराला एक थाळी आणायला सांगितली.
त्यानंतर भीम त्याच्या शेजारी बसत म्हणाला,
" सहदेव कसा आहे ?"
" दोन तीन दिवसांपूर्वी मी गेलो होतो घोडे घेऊन तिकडे
तेव्हा त्याच्या शी भेट झाली होती. आपल्या दर्शनासाठी तो फार व्याकुळ आहे." त्यावर भीम म्हणाला ," त्याला म्हणावे
अजून थोडे दिवस दुरावा सहन कर ,मला जर अगोदर माहीत
असते की तू येणार आहेस तर तुझ्या आवडीचा पदार्थ तरी
बनविला असता. "
" हे घ्या गरम गरम आणलंय."
" ही डाळ खाल्लीस तर तुला आईची आठवण येईल.
लहानपणी भरपूर डाळ खाल्ली आपण लोकांनी."
" मोठे दादा कसे आहेत ?"
" जर सम्राट नोकरी करू लागला कसे वाटेल सांग बरं.
आणि अर्जुन बृहन्नलाचे रूप घेऊन राजकुमारी उत्तरा ला
नृत्य शिकवत आहे, आणि हजारो दासी जिच्या मागे पुढे
पळत असत तीच द्रौपदी मत्स्य देशाच्या पट्टराणी चे केस
विंचारत आहे.त्याच्या नंतर पुन्हा कधी अश्व घेऊन राजभवन
ला गेलोच नाही." पुन्हा त्याचे डोळे पाणावले. तसा सहदेव
म्हणाला ," रडू नकोस नकुल.तू इथं रडलास तरी मातोश्री ला
कळल्याशिवाय राहणार नाही.म्हणून दुःख सहन करायला
शिक."
" माझ्या मध्ये तुझ्या एवढी सहन करण्याची क्षमता नाहीये.दादा नाहीये."
" तर मग माझी एक गोष्ट ऐक नकुल. मजल्या दादाने तर
दुर्योधन आणि दु:शासन ला निवडले आहे, छोट्या दादाने
सूत पुत्र कर्णाला निवडले.परंतु शकुनिमामा ला सर्वजण कसे
विसरले ? खरा अपराधी तर शकुनी आहे म्हणून मी आज
प्रतिज्ञा करत आहे की शकूनिमामाचा वध मी करणार."
गांधार नरेश शकुनि आपल्या तलवारीला धार लावत
असतो. त्याच एक दूत येऊन संदेश दिला की गांधार मधून
युवराज आले आहेत. आणि ते आपले दर्शन करू इच्छित
आहेत. तेव्हा शकुनी ने आश्चर्य व्यक्त करत विचारले ," गांधार
वरून कधी आलेत ?" त्यावर दूत म्हणाला ," संध्याकाळी."
" जा घेऊन ये त्याना."
" जशी आपली आज्ञा !" असे म्हणून तो निघून गेला नि
थोड्याच वेळात गांधार युवराज उल्लूक आला.त्याला पाहून
हर्षभराने गांधार नरेश शकुनि उद्गारला ," उल्लूक माझ्या बाळा."
" बाबा !" असे म्हणून खाली वाकून शकूनि चे चरणस्पर्श
करतो.तसा शकुनि त्याला आशीर्वाद देत म्हणाला ," आयुष्यमान भव ! किर्तीमान भव ! ये माझ्या जवळ बैस !
माझ्या तलवारी जवळ बैस आता मला हे सांग गांधार कसा
आहे ?" त्यावर उल्लूक म्हणाला ," अगदी तसाच आहे जसा
आपण सोडून इथं आला होता."
" चुकीचे बोलतो आहेस तू , मी गांधारला कधीच सोडलं
नाहीये. मी दररोज रात्री स्वप्नात गांधारला जाऊन नमस्कार
करतो नि तिथल्या सुगंधीत वायू लहरींच्या मुक्तपणे श्वास
घेऊन माघारी परततो पुत्र."
" तर मग आपण एक वेळ गांधारला जाऊन का येत नाही ?
" नाही पुत्र मी आता जाऊ शकत नाही म्हणूनच मी आपल्या तलवारीला धार लावत आहे."
" बाबा काय बोलताय हे ? मला खरंच काही कळत नाहीये."
" तू फक्त एवढं समज की आता शस्त्रा जवळ राहायचे
दिवस आले आहेत. उल्लूक ऋतू बदलत आहे म्हणून मी
माझे फासे सुध्दा ठेवून दिले आहेत हे बघ माझे विना फाशाचे
किती अधुरे वाटतात ते. खरे सांगायचे तर माझ्या फाशानी
भरपूर सारे डाव जिंकले. परंतु आता मला असं वाटू लागलंय
की सर्वकाही जिंकूनही मी सर्वकाही हरलो. पांडवांचा अज्ञातवास सुध्दा समाप्त व्हायला काहीच महिने उरलेत.
परंतु आम्ही लोक अजून त्यांचा शोध घेऊ शकलो नाहीत.
याचा अर्थ अज्ञातवास समाप्त होताच पांडव आक्रमण करतील.म्हणून युद्धाची तयारी करणे आवश्यक आहे. आणि
हे युध्द नाही तर महायुद्ध असेल.आता युध्दाचा परिणाम
काय असेल हे नाही सांगता येणार . परंतु या युद्धा मध्ये
शकुनि चे एक स्वप्न मात्र जरूर साकार होईल.आणि ते स्वप्न
म्हणजे करुवंशाचा सर्वनाश होईल. त्यांची शवं उचलायला
सुध्दा कोणी वाचणार नाही."
" हे आपण काय बोलत आहात बाबा ?"
" माझी प्रिय बहिण गांधारी हिचा विवाह नेत्रहीन धृतराष्ट्राशी करण्याचा प्रस्ताव गंगापुत्र भीष्मांनी आणून
गांधार देशाचा जो अपमान केला होता उल्लूक तो अद्याप
मी विसरलो नाहीये. मी जेव्हा ही राजभवन मध्ये जातो नि
आपल्या बहिणीला पाहतो तेव्हा माझा क्रोध अनावर होतो
की मी त्याचे शब्दात वर्णन करू शकणार नाही.परंतु तू चिंता
करू नकोस तू तर गांधार ला एकदम सुरक्षित राहशील."
" परंतु बाबा आपल्याला पांडव आणि कौरवांचा भांडणात
भाग घ्यायची काय गरज आहे ? आपण आपल्या गांधार
जाऊ."
" नाही पुत्र नाही मी हा डाव अर्ध्यावरच सोडून येऊ शकत
नाही. दुःख एकाच गोष्टीचे आहे आणि ते म्हणजे हा अंतिम
डाव द्युतक्रीडेत नाही लागणार तर रणभूमीवर लागेल.
आणि दोन्ही बाजूनी फासे फेकण्याचे काम काळ करणार
आहे.मी द्युतक्रीडेत निपुण अवश्य आहे . परंतु काळ तो काळच ना तो कोणाच्या हाती सापडणार नाही.शिवाय मी त्या
सुतपुत्र कर्णा सारखा ही नाही जय पराजय चा विचार न करता सरळ रणभूमीच्या दिशेने चालायला लागू. कर्णाला
फक्त स्वतःला सर्वश्रेष्ठ धनुर्धर असल्याचे सिध्द करायचे आहे.
म्हणून तो सदैव युद्धाच्या वार्ता करतो.आणि मला साऱ्या
करुवंशाचा विनाश करायचा आहे बस्स !"
आचार्य द्रोणाचार्याना भेटायला कर्ण स्वतःहून त्यांच्या
कक्षेत गेला.त्याला पाहताच आचार्य द्रोण उद्गारले ," या अंगराज या !" तेव्हा अंगराज कर्ण म्हणाला ," प्रणाम आचार्य !" त्यावर ते म्हणाले ," आयुष्यमान भव ! आज तुला
ह्या ब्राम्हणाची आठवण कशी झाली ?" तेव्हा कर्ण म्हणाले,
" खरं सांगायचं तर खाता-पिता , झोपता उठता मी फक्त
तुमच्या बद्दल विचार करतोय.
" कारण अंगराज ?"
" कारण आपणच माझे अस्त्र विद्या शिकण्याचे सर्व दरवाजे बंद केले होते म्हणून मी आज मी आपल्याला
विचारू इच्छितोय की अस्त्र विद्या कुण्या सुतपुत्राला
शिकण्याचा अधिकार नाहीये का ?"
" असं नाहीये.अस्त्र विद्या कोणीही शिकू शकतो.परंतु तू
ज्या गुरुकुल मध्ये विद्या शिकायला आला होतास तेथे फक्त
राजकुमारांना विद्या शिकविली जाते."
" ते पण मी मान्य करतो. परंतु तुमच्या त्या एक नकाराचा
काय परिणाम झाला ते माहीत आहे का आपल्या ?"
" परिणाम तर चांगला आहे तुला माझ्या पेक्षा चांगले गुरू
मिळाले. तू परशुराम चा शिष्य झालास."
" हा तर अर्धा परिणाम आहे आचार्य पूर्ण परिणाम तर
हा आहे की परशुराम शिष्याला त्याच्या गुरूचा शाप पण
मिळाला."
" शाप .....?
" हां शाप आता पांडवांचा अज्ञातवास ही समाप्त होत
आहे, परंतु मी आपल्या जे सांगायला आलोय की माझ्या
गुरू ने जो मला शाप दिला तो वास्तविक आपणच दिलात.
आणि तो शाप स्वीकार केल्यानंतर ही मी आपल्याला हे
सांगायला आलोय की मी फार आनंदित आहे की माझा मित्र
दुर्योधन चे गुप्तहेर पांडवांचा अज्ञातवास भंग नाही करू शकले. अर्थात युध्द निश्चितच होणार त्या युद्धात आपण ही
असणार आणि अर्जुनशी युध्द केल्यानंतर मी आपल्याला
युध्द भूमीवरच विचारीन की आता तुम्हीच सांगा सर्वश्रेष्ठ
धनुर्धर कोण आपला शिष्य अर्जुन का मी ? आणि अर्जुन शी
हे मला माहित असूनही युध्द करीन की त्याच्या सह्याला गुरूंचा शाप पण असेल."
" ही भाषा क्षत्रियांना शोभून दिसते अंगराज."
" माझ्या गुरू ने सुध्दा हेच सांगितले होते आचार्य फरक
फक्त इतकाच आहे आपण भाषा बद्दल बोललात आणि ते सहनशक्ती बद्दल बोलले." असे म्हणून कर्णाच्या डोळ्यासमोर
ते दृश्य चित्रपटा प्रमाणे दिसू लागले.
" तुझी अस्त्र विद्या शिकून पूर्ण झाली आहे वत्स उद्या तुझी
आणि माझी ताटातूट होण्याची वेळ जवळ आली आहे."
" आपण तर सांगितले की मी आपल्याला गुरू दक्षिणा दिल्या शिवाय निघून जाऊ , परंतु मी आपल्याला गुरू
दक्षिणा दिल्याशिवाय कसे बरे जाऊ शकतो ?"
" तुला अस्त्र विद्या शिकविताना मला जो आनंद प्राप्त
झाला. त्यालाच गुरू दक्षिणा मान वत्स ! कारण तुझ्या सारखे
शिष्य फार मुश्किलीने मिळतात आजकाल. परंतु तू हे सदैव
लक्षात ठेव की तू एक ब्राम्हण आहेस अर्थात क्षत्रिय धर्माची
सेवा करणे तुझे कर्तव्य आहे आणि हे सुध्दा तुला द्यानात
ठेवायचे आहे की क्षत्रिय धर्माचे उल्लंघन करत असेल तर
त्याला तू विरोध करावयाचा आहे. जसा की मी केला."
असे म्हणत असतानाच त्यांचा चटकन डोळा लागला. त्यांचे
डोळे कर्णाच्या मांडीवर असल्याने त्यांची झोप मोड होऊ नये म्हणून कर्ण आपली मांडी अजिबात हलवत नाही. पण
तेवढ्यात एक कुठून तरी भुंगा तेथे येतो नि कर्णाच्या मांडीवर
चढतो नि कर्णाच्या मांडीला कडकडून चावा घेतो नि अजून
मांडी पोखारत नेतो.कर्णाला त्याच्या भयंकर वेदना होत
असतात.परंतु आपल्या गुरूंची झोप मोड होईल म्हणून
तो त्या भयंकर वेदना सहन करतो. तेवढ्यात गुरूंनी आपले
डोळे उघडले नि उठून बसले. तेव्हा त्यांची नजर त्या भुंग्यावर
पडली. तेव्हा त्यांनी झट्कन त्या भुंग्याला आपल्या हाताने
बाजूला फेकत म्हणाले ," अरे वत्स तू आपली स्वतःची रक्षा
का नाही केलीस ?" त्यावर कर्ण म्हणाला ," जर मी स्वतःची
रक्षा केली असती तर आपली झोप मोड झाली असती. म्हणून मी सारे सहन केले." असे म्हणताच परशुराम उठून
उभे राहात रागाने म्हणाले ," याचा अर्थ तू माझ्याशी खोटे
बोललास ?" कर्णाने न समजून विचारले ," काय खोटे बोललो
मी गुरुवर्य ?" त्यावर ते म्हणाले ," हेच की तू ब्राह्मण नाहीयेस. कोण आहेस तू ? कारण ब्राह्मणा मध्ये एवढी
सहनशक्ती नसते. तू क्षत्रिय आहेस आणि ब्राम्हण बनून
माझ्या कडून अस्त्र विद्या संपादन केलीस."
" मी एक सुतपुत्र आहे."
" नाही.तू पुन्हा खोटे बोलतो आहेस. एवढी सहनशक्ती
ब्राम्हणा व्यतिरिक्त अन्य कोणामध्ये कदापि नसते. तू क्षत्रिय
आहेस आणि तू आपल्या गुरू सोबत कपट केलं आहेस.
म्हणून मी तुला शाप देतो की जेव्हा तुला माझ्या कडून प्राप्त
केलेल्या विधेची जास्त गरज असेल तेव्हा तुझ्या ती कामी
येणार नाहीये."
" अंगराज sss अंगराज कुठं हरवलास ?"
तेव्हा कर्ण एकदम भानावर येत उद्गारला ," गुरुवर्य चे दर्शन
करायला गेलो होतो."
" गुरुचे दर्शन तर वास्तविक आराधना आहे अंगराज माता पिता आणि गुरुचे आशीर्वाद ला महादेवाचे वरदान आहे."
" माता-पितांचा आशीर्वाद आचार्य का फक्त ब्राम्हण
आणि क्षत्रिय माता-पित्यांचे आशीर्वाद...?"
" माता-पित्याची कोणतीही जात नसते.किंवा त्यांची एक
स्वतःची एक जात असते. आणि खरे सांगायचे तर गुरूंची
कोणतीही जात नसते.स्वता ईश्वराचीही कोणतीही जात नसते. हां आई-वडील चांगले पण असू शकतात किंवा वाईटही असू शकतात.तसेच गुरू सुध्दा चांगला पण असू
शकतो किंवा वाईट पण असू शकतो.परंतु तरीही ते सदैव
आदरणीय आहेत. परंतु तू तर मोठा भाग्यवान आहेस कर्ण
तुला असे गुरू मिळाले आहेत.ज्यांना प्रणाम करणे मी माझे
भाग्य समजतो. रणभूमीवर जाण्या अगोदर आपल्या आई-वडिलांचे नि गुरुचे आशीर्वाद घ्यायला विसरू नकोस."
" योध्दा आशीर्वाद या अस्त्राचा वा शस्त्राचा प्रयोग करत
नाहीत आचार्य. ते आपल्या मनगटाच्या जोरावर आणि
धनुष्याच्या मदतीने युध्द भूमीत उतरतो. मी आपल्याला
हेच सांगायला आलो होतो आचार्य आपण आपल्या प्रिय
शिष्याला आपल्या आशीर्वादाचे कवच अवश्य घाला. प्रणाम." असे म्हणून तेथून चालता झाला. त्यावर आचार्य
द्रोण फक्त स्मित हास्य करतात. बोलत काहीच नाहीत.
अर्जुन अर्थात बृहन्नला उत्तरला नृत्य शिकवीत असताना
महाराज विराट आणि महाराणी सुदेष्णा तेथे येतात नि त्याना
बृहन्नला आणि उत्तरा वंदन केले. तसे महाराज विराट म्हणाले," तुम्ही तर आमच्या मुलीचे मन मोहिले बृहन्नला
उठता बसता तुझ्या बद्दलच बोलत असते. ती आम्हाला सांगत असते की इंद्र लोकांतील अप्सरा सुध्दा नृत्य गायनाचे
प्रदर्शन तुझ्या पेक्षा चांगले करू शकणार नाही."
" हा तर आपल्या गुरुसाठी राजकुमारीचा आदरपूर्वक
प्रेम आहे महाराज नाहीतर मी कुठं नि नृत्य कुठं ?"
" आज तर आम्ही तुम्ही आमच्या उत्तरायला काय शिकविले आहे ते पाहायला आलोय."
" अर्थात तुम्ही माझी परीक्षा घ्यायला आलाय का उत्तराची ?"
" आम्हाला माहीत आहे की तुम्ही इंद्रप्रस्थाचे लोक
कलाप्रेमी आहेत.त्याना तुमच्या सारख्या कला प्रेमींची
चांगली पारख आहे परंतु आम्ही सुध्दा कलेची थोडी फार
पारख करतो म्हटलं."
" जशी आपली आज्ञा ! बसून घ्या." त्यानंतर उत्तरा ने
एक सुंदर गायन आणि नृत्य करून दाखविले.त्यावर महाराज
खुश होऊन म्हणाले ," बृहन्नला तू तर आमचे मन एकदम
खुश केलेस. आमच्या उत्तरा पेक्षा चांगले नृत्य तर स्वर्गातील
उर्वशी सुध्दा करू शकत नाहीये." त्यावर बृहन्नला म्हणाला,
" उर्वशी तर माता आहे महाराणी !" त्यानंतर महाराज
विराट आणि महाराणी सुदेष्णा तेथून निघाले.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा