महाभारत ७७ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाभारत ७७ |
महाभारत ७७
अंगराज कर्ण विजयी यात्रा वरून परत आला आहे नि
भरपूर साऱ्या राज्याचे राजमुकुट घेऊन आला आहे. तेवढे
सारे राजमुकुट पाहून तर दुर्योधनाची छाती गर्वाने फुगली आहे तो उठून उभा राहत म्हणाला ," पाहिलंत पिताश्री आणि
पितामहा माझा मित्र विजयी यात्रा करून आला आहे."
अंगराज कर्ण महाराज धृतराष्ट्राना वंदन करतो.तेव्हा विदुर
महाराजांना सांगतात की महाराज अंगराज कर्ण आपल्याला
प्रणाम करत आहे." तेव्हा महाराज धृतराष्ट्रा एकदम प्रसन्न
मनाने म्हणाले , " अभिनंदन कर्ण मी तुझे अगदी मनापासून
अभिनंदन करत आहे. " त्यावर अंगराज कर्ण उद्गारला,
" आपण आणि आपले मित्र आपत्त सोडून बाकी सर्व
राजांचे राजमुकुट आणले आहेत आणि ते सर्व राजमुकुट मी आपल्या चारणापाशी ठेवण्यासाठी आपली परवानगी मागत आहे. " तेव्हा महाराज धृतराष्ट्र एकदम हर्षभराने म्हणाले ,
" पाहिलंत तातश्री आपल्या त्या रात्रीच्या प्रश्नाचे उत्तर
अंगराज कर्ण ने दिले आहे अर्थात युवराज दुर्योधन आपल्या
मित्राच्या ध्वजा खाली एकदम सुरक्षित आहे."
" नाही महाराज. माझं अजूनही हेच म्हणणे आहे की
पांडवांशी संधि करण्यातच दुर्योधनाची भलाई आहे. जरी
कर्ण दिग्विजयी यात्रा करून आला असला तर तो अर्जुनच्या
एक चतुर्तांश हिस्सा सुध्दा नाहीये."
" नाही पितामहा कदापि नाही. आज अर्जुन माझ्या मित्राच्या चौथांश पण नाहीये.अर्जुन दिव्य अस्त्रांच्या
शोधार्थ गेला तर जाऊ दे त्याला. माझ्यासाठी दिव्य अस्त्र
माझा मित्र कर्ण आहे बस्स !"
शकुनिमामाचे एका मागोमाग एक कुटील डाव सुरूच आहेत. दुर्वास ऋषी आपल्या शिष्यासह हस्तिनापूरला आले.
शकुनिमामानी त्यांचा आदरातिथ्य मोठ्या भक्ती भावाने केले
त्याना आग्रह करून भोजन वाढत असतो. ते पाहून दुर्योधनला त्यांचा भयंकर राग आला.तो शकुनिमामा ला एका
बाजुला घेत म्हणाला ," मामाश्री हे काय पाहतोय मी ? तुम्ही
कधी पासून ऋषींचे आदरातिथ्य करू लागलेत. ? बंद करा
हे ? आणि हाकलून द्या त्याना." त्यावर शकुनिमामा एकदम हळू आवाजात म्हणाले , " अरे भाच्या हे दुर्वास ऋषी आहेत. ह्यांना जायला सांगू नकोस. त्याना जेव्हा जायचं असेल तेव्हा ते स्वतःच्याच मर्जीने जातील. आणखीन एक
महत्वाची गोष्ट ऐकून ठेव. ह्यांना जर प्रसन्न नाही ठेवलं तर
ते लगेच क्रोधीत होतात नि शाप देतात. कारण शाप त्यांच्या
जिभेच्या पुढच्या टोकावर असतो."
" गांधार नरेश sss
" आज्ञा ऋषींवर ." शकुनिमामा पळतच त्यांच्या जवळ
येतात नि हात जोडून नम्रपणे विचारणा केली.
" मला वाटतं ऋषी सेवा करून तुझे मन भरलं आहे."
" छे छे छे तसं नाही काही आपली सेवा करण्याचे भाग्य
तर फार मुश्किल ने मिळते."
" परंतु दुर्योधनच्या चेहऱ्यावर हा आनंद दिसत नाहीये.
जर असे असेल तर राजन....?"
" क्रोधीत होऊ नका ऋषींवर दुर्योधन हेच सांगत होता की
पांडव इथं असते तर त्याना सुध्दा आपला आशीर्वाद मिळाला
असता परंतु आपल्याला हे सांगण्याची त्याला हिंम्मत होत
नाहीये की आपण स्वतः च त्यांच्या जवळ जा म्हणून."
तसा दुर्योधन लगेच म्हणाला ," हां ऋषींवर मी फक्त एवढंच म्हणत होतो." त्यावर ऋषी दुर्वास त्याच्या या वक्तव्यावर अत्यन्त खुश होत म्हणाले ," तुझे बंधू प्रेम पाहून
मी अति प्रसन्न झालो आहे म्हणून त्याना आशीर्वाद देण्यासाठी मी अवश्य त्यांच्या कडे जाईन."
" धन्य हो ऋषींवर धन्य हो !" शकुनिमामा उद्गारला.
पांचली अर्जुन सोडून शेष पांडवांना जेवण वाढत होती.
तेव्हा तिच्या चेहऱ्यावर फार उदासीनता पाहून धर्मराज
युधिष्ठिर उद्गारला ," इतकी उदास का आहेस पांचाली ?"
" मला हस्तिनापूरहून वनवासाला निघतानाचा प्रसंग
आठवला. त्यावेळी सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते फक्त चारजण सोडून ते चारजण म्हणजे दुर्योधन , कर्ण , कपटी
शकुनी नि विषेला दु:शासन ."
" मग त्यात आश्चर्य वाटण्याचे काय कारण आहे ? त्या
चांरांचे डोळे तर वज्राचे आहेत त्यातून अश्रू येण्याची शक्यताच नाहीये.उलट त्याना तर फार आनंद झाला असेल."
" तुम्हां लोकांची ही अवस्था माझ्याने पाहवत नाहीये."
" पाहवत नसली तरी ती पहावीत लागणार आहे आणि
ती सुध्दा एक दोन वर्षे नाही तर तब्बल तेरा वर्षे अशीच
परिस्थिती राहणार आहे, तुला फार वाईट असेल तर तू
कांपिल्या नगरीला जा तेरा वर्षे पूर्ण झाल्या नंतर आम्ही तुला
आमच्याकडे बोलवून घेऊ." त्यावर द्रौपदी म्हणाली ," मी
माझ्या विषयी बोलत नाहीये महाराज मी तर फक्त शोक
करतेय त्या क्रोधाचा जो हस्तिनापूर वून निघण्यापूर्वी तुमच्या
मनात होता. परंतु लवकरच तो थंड ही झाला. आणि त्यानंतर मी तुम्हां लोकांना युध्दा विषयी एकमेकांशी बोलताना कधी पाहिले नाही. याचा अर्थ मी काय समजावा ? "
" क्रोधाचा पण आपली एक सीमा असते पांचाली. अनावश्यक क्रोध कधी कुणाची हित करू शकत नाही.म्हणून
डोकं शांत ठेवून कोणताही निर्णय घ्यायला हवाय. अति क्रोध
संकटात नेई म्हणून क्रोधावर नियंत्रण करायला शिकले पाहिजे. क्रोधाला अनाडी बाण होऊन चालणार नाही त्याला
अर्जुनचा बाण व्हायला पाहीजेल. जसे की एकदा धनुष्यातून निघाला की त्याने लक्षाचा वेध घ्यायला पाहिजेल. क्रोधाला
सभ्य असणे आवश्यक आहे. व्यक्तीला आंधळा करणारा
क्रोध ना कोणाची ढाल बनू ना कोणाची तलवार ,आणि खरं
सांगायचं तर अनुज दुर्योधन तर ईर्षाने पार आंधळा झाला आहे म्हणून त्याचा नादाला लागून आपल्या डोळ्यात क्रोधाची धूळ चारून आंधळे होऊ या का ? क्रोधाला कधी कधी पाणी समजून पिणे आवश्यक आहे पांचाली. क्षमा धर्म आहे पांचाली , क्षमा ही यज्ञ आहे , क्षमा ही वेद आहे क्षमा ही ब्रंम्ह आहे , क्षमा ही पाणी आहे , क्षमा ही तप आहे , क्षमा ही शक्तिशाली बळ आहे , म्हणून क्षमा हा मार्ग मी कधीही त्यागणार नाहीये."
त्यावर द्रौपदी म्हणाली ," हे जेष्ठ कुंती पुत्र माझी जरा
अवस्था तर पहा.मी आपल्याला डरपोक पण म्हणू शकत नाहीये. कारण मला कल्पना आहे की आपण डरपोक नाही
आहात. तुम्ही स्वतः धर्म आहात.म्हणून अधर्माला कधी क्षमा करणार नाही. आणि दुर्योधन एका अधर्माचा प्रतीक आहे."
" आपल्या क्रोधाला जरा शांत कर पांचाली."
" का क्रोधला शांत करावे भ्राताश्री ? पांचाली क्रोधाला
करील ही शांत परंतु मला माझ्या क्रोधाला शांत करता येणार
नाहीये. माझे डोळे उघडे असो वा बंद त्यांच्या समोर एकच
दृश्य दिसते ते हे की दु:शासन पांचाली चे केस पकडून
खेचून भर दरबारात घेऊन येतो. आणि दुर्योधन आपली मांडी
पिटुन सांगत आहे नि आमच्या सहित सारा करुवंश चुपचाप
पाहत आहे ही क्रोधाची अग्नी कधीही शांत होणार नाहीये.
असे म्हणून भीमाने पत्रवळीला नमस्कार केला नि तेथून
उठला नि घेऊन गेला. त्याच्या पाठोपाठ एक एक करून सर्वजण उठून गेले. शेवटी फक्त युधिष्ठिर उरला तोही उठला
निघून गेला त्यानंतर पांचाली ने सर्व पत्रावळी उचलल्या.
नि स्वतः ही थोडेसे खाऊन घेतले.
नकुल आणि सहदेव आपला सर्व राग सरपणासाठी लाकडे पुरेशी असूनही उगाचंच लाकडे तोडून त्यांची रास
घालत होते ते पाहून युधिष्ठिर त्यांच्या जवळ येत म्हणाला ,
" नकुल सहदेव हे काय करत आहात तुम्ही लोकं ?
कोणतीही वस्तू गरजे पुरती घेणे आवश्यक आहे.प्रकृतीचे
नुकसान होईल असे कोणतेही कार्य करू नये."
" भ्राताश्री आम्हाला सहनच होत नाहीये नि आपण दुर्योधन , दु:शासन , कर्ण आणि शकुनिमामा याना दंड देण्याची पण आपण आज्ञा देत नाहीयेत."
तेवढ्यातच समोरून ऋषी दुर्वास आपल्या शिष्यासह
येत आहेत त्याना पाहून युधिष्ठिर आपल्या बंधूंना म्हणाला ,
" ऋषी दुर्वास आहेत तेव्हा आपला क्रोध त्यांच्या समोर
जाहीर करू नका.नाहीतर ते समजतील की त्यांच्या येण्याने
आम्ही नाखूष आहोत. तेव्हा जरा शांत राहा. "असे म्हणून
युधिष्ठिर त्यांच्या सामोरी जाऊन त्यांचे नम्रपणे म्हणाला ,
" प्रणाम ऋषींवर."
" कल्याणंवस्तू !"
" आमच्या कुटी येऊन आमच्या कुटीची शोभा वाढवा."
" ऋषी शोभा वाढवण्याची वस्तू नाहीये राजन."
" क्षमा असावी ऋषींवर."
" जर तुम्ही कुंती पुत्र नसता तर मी तुम्हांला अजिबात
क्षमा केलं नसते. मी हस्तिनापूरला ही जाऊन आलो. तेथे
दुर्योधनाने माझी खुप चांगली सेवा केली. आणि मला हात
जोडून विनंती केली की भ्राताश्री युधिष्ठिरला ही आपल्या
आशीर्वादाची गरज आहे तेव्हा कृपा करून त्यांच्या कुटीत
जा. म्हणून मी तुम्हां लोकांना आशीर्वाद द्यायला आलोय."
" आपल्या पद स्पर्शाने आमची कटी पावन होईल."
" आम्ही स्नान करायला चाललोय स्नान करून आल्यानंतर आम्ही भोजन करू."
" जशी आपली आज्ञा !" असे म्हटल्यानंतर दुर्वास ऋषी
आपल्या शिष्यासह स्नान करण्यासाठी नदीवर निघून गेले.परंतु पांडवांना मात्र चिंता पडली. कारण त्याना चांगले
ठाऊक होते की आपल्या नंतर द्रौपदी सुध्दा जेवून झाले असतील. आता भोजन शिल्लक असणे मुश्किलच आहे.
पण तरी देखील तिघेही कुटी मध्ये जाऊन द्रौपदीला
दुर्वास ऋषी आपल्या कडे आल्याची सूचना देऊन त्यांच्या साठी भोजनाची व्यवस्था करावयाची आहे.असे म्हणताच
द्रौपदी सर्व भांडी उघडून पाहते तेव्हा एका भांडयाला एक
भाताचे एक शीत चिटकलेले असते. ते पाहून ती म्हणाली ,
" असा कुणी स्वप्नात तरी विचार केला असेल का ? की
इंद्रप्रस्थ महाराजां कडे ऋषी जेवायला येतील नि त्यावेळी
इंद्रप्रस्थाच्या महाराजां कडे पाच ब्राम्हण ऋषींना भोजन
घालण्या एवढी पण क्षमता नसेल. एक भाताचे शीत आहे ?
आता काय करावे बरे ? असे द्रौपदी ने श्रीकृष्णा चे स्मरण
केले. तसे थोड्याच वेळात श्रीकृष्ण तेथे हजर होतात.
नि युधिष्ठिर पाहत म्हणाले ," प्रणाम भ्राताश्री !" असे म्हणून
पुढे म्हणाले ," मला वाटतं की माझ्या येण्याने तुम्ही खुश नाही
आहात." त्यावर द्रौपदी उद्गारली ," हे काय बोलत आहात आपण ? आमच्या जीवनात आपल्या व्यतिरिक्त दुसऱ्या
कोणाचे स्थानच नाहीये. तेव्हा माझी बहिण सुभद्रा कशी
आहे ते फक्त सांगा."
" अगोदर मला काहीतरी खायला दे. फार भूक लागली आहे."
" ह्या पात्रा मध्ये फक्त एक शीत आहे. त्यातले अर्धे आपण खावे नि उरलेले अर्धे संसार ला खायला घालावे."
असे म्हणून ते पात्र श्रीकृष्णा समोर धरते. श्रीकृष्ण ते एक
शीत उचलून तोंडात टाकत म्हणाला ," इतके खूप झाले."
त्याच क्षणी नदीवर स्नान करत असलेल्या ऋषींची पोटे आपोआपच भरली.तेव्हा त्यातील एक म्हणाला ," अरे काय
आश्चर्य आहे न खाता-पिता पोट आपोआपच कसे काय भरले."
" असे का म्हणतो आहेस थोड्या वेळापूर्वी तर आपण
पोटभर खीर खाल्ली होती."
" हां स्वाद तर खीर खाल्या सारखाच वाटतोय.आणि आता झोप येऊ लागलीय."
" आता झोपण्याचा विचार करू नकोस. कोणी बोलायला
येण्या अगोदरच इथून पलायन करू." असे म्हणून त्या सर्वांनी
तेथून पळ काढला.
" तुम्ही लोकांनी खीर फार चविष्ट बनविली होती. मला
आता झोप पण येऊ लागलीय." असे श्रीकृष्णा ने म्हणताच
युधिष्ठिर म्हणाला , " झोप येते तर इथं झोपून जा." तेव्हा श्रीकृष्ण उद्गारला, " हेच तर कठीण आहे भ्राताश्री मी इथं झोपू नाही शकणार." तेव्हा युधिष्ठिर आपल्या अनुज बंधूंला म्हणाला , " सहदेव , जरा जाऊन तर बघ. ऋषींवराचे स्नान
आटोपले का ते ." त्यावर श्रीकृष्ण म्हणाले ," अरे सहदेव बैस
इथं. त्याना बोलवायला जाण्याची गरज काय आहे ? यायचे
असेल तर स्वतःच येतील."
" ते जेवणासाठी बोलून गेलेत वसुदेव."
" हां पण हा त्यावेळचा निर्णय असेल त्यांचा. आता ते दुसऱ्या कुणाचे तरी अतिथी बनले असतील भ्राताश्री ! परंतु
मला एक कळत नाहीये की अर्जुन दिव्य अस्त्र आणण्यासाठी
इंद्र लोक गेलाय हे तर मला माहित आहे परंतु भीमसेन कुठं
दिसत नाहीये ? कुठं गेलाय का बाहेर ?"
" भिमाचे सोडा. तो येईल कुठं फिरायला गेला असेल
तेथून.परंतु आपले अचानक कसे काय येणे झाले ?"
" बस्स ! यायची इच्छा झाली आलो भूक पण तर लागली
होती. भीम कधी येईल ? मला परत जायचे पण तर आहे."
" आता सूर्य अस्ताला निघालाय आता कुठं जाता ? इथंच
झोपा मग उद्या सकाळी जा कुठं जायचं तेथे."
" त्याना सुध्दा ह्या गवताच्या बिच्छांण्यावर झोपायला
सांगताय की काय ?" असे पांचाली युधिष्ठिर उद्देशून म्हणाली,
त्यानंतर श्रीकृष्णा कडे पाहत म्हणाली ," आपण भिमसेनांची
वाट पाहू नका. कारण या क्षणी कोठे असतील कोण जाणे ?
कारण ते गेले तेव्हा फार रागात होते. त्यामुळे ते परत कधी
येतील हे सांगणे मुश्किल आहे."
भीमसेन चालत चालत एका ठिकाणी एक वृध्द वानर च्या
रुपात प्रत्यक्ष हनुमान बसले होते.परंतु भीमसेन ला वाटले की वानर आहे आणि आपली शेपटी रस्त्यावर सोडून ठेवली होती म्हणून भीमसेन त्या वृध्द वानरला उद्देशून म्हणाला ,
" कृपा करून आपली शेपटी तेवढी बाजूला घ्या." त्यावर हनुमान म्हणाले ," श्रीराम चे नाव घ्या. आणि मला थोडा विश्राम करू दे." परंतु भीमसेन त्याना म्हणाला ," बऱ्या बोला ने आपली शेपटी उचलतोस का मी उचलून फेकून दिले."
" हां तूच हटव जरा." असे म्हटल्यानंतर भीमसेन वाटले की शेपटीचा तर आहे आपण ती सहजच हटवू शकतो असा
विचार करून प्रथम एका हाताने शेपटी उचलण्याचा प्रयत्न
केला .परंतु शेपटी जागची हलली सुध्दा नाही म्हणून मग दोन्ही हातानी शेपटी पकडून उचलण्याचा प्रयत्न केला. परंतु
शेपटी जागची हलली नाही.पूर्ण ताकदीने शेपटी उचलण्याचा
प्रयत्न केला. परंतु शेवटी जागची हलत नव्हती. तसा भीमसेन चा गर्व हरण झाला. त्याने दोन्ही हात जोडून उभा
राहत नम्रपणे म्हणाला ," मला क्षमा करा. आपण साधारण
वानर वाटत नाहीये. म्हणून आपला परिचय द्या मला."
" रामाचा नाव घे कुंतीपुत्र सेवक चे नाव ऐकून काय करणार आहेस तू ? त्या पेक्षा स्वामीच्या दर्शनाची अभिलाषा
बाळग." तसा भीमसेन समजला की हा राम भक्त हनुमान शिवाय अन्य कोणी नाहीये. असा विचार करून त्याने लगेच
विचारले ," याचा अर्थ आपण राम भक्त पवन कुमार हनुमान आहेत.होय ना ?" असे म्हणताच हनुमान म्हणाले ," जय श्रीराम ! जर मी पवन कुमार नसतो तर तुला बंधू का म्हटलं
असतं ? "
" परंतु आपण ह्या अवस्थेत का आहेत ?"
तसे हनुमान आपल्या खऱ्या रुपात येत म्हणाले ," मी तुझी परीक्षा घेत होतो आणि त्याच बरोबर तुला एक उपदेश
पण करायचा होता की निर्बल आणि वृध्द व्यतीचा आदर
करायला पाहिजे. त्या शिवाय तुला हे सुद्धा शिकविणे जरूर
होते की जे आपल्या डोळ्यांना दिसतोय ते नेहमी सत्य नसते.
तुला वाटले म्हातारा वानर आहे त्याची शेवटी आपण सहज
उचलून फेखु शकतो. म्हणून तू हे आवाहन स्वीकारले. परंतु
तुला माहीत आहे का जीवन मध्ये व्यक्तीला कोणत्या परिस्थिती शी सामना करावे लागेल ते ?"
" क्षमा असावी. अशी चूक पुन्हा होणार नाही."
" बरं तू आता जाऊ शकतोस ."
" आमचे निवास स्थान फार दूर नाहीये.इथं जवळच आहे.
म्हणून आमच्या कुटीत या नि माझ्या बंधूंना आशीर्वाद द्या."
" माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे."
" मग आमच्या कुटीत चला नि आम्हाला युध्दनीती विषयी
थोडी माहिती द्या. कारण आम्ही लोक एका महायुद्धाची
तयारी करत आहोत. आपण तर रावण, कुंभकर्ण , मेघनाथ
सारख्या योध्याना हरविले आहे."
" मी युध्द अवश्य केलं होतं .परंतु त्यात जित श्रीरामाची
झाली होती. सत्य नि असत्य च्या लढाईत दोन्ही बाजूने
योध्याच युध्द करतात. परंतु विजय सत्याचाच होतो. आणि
पराजय असत्याचा होतो.म्हणून सत्याला ओळखा नि त्याला
गच्च पकडून ठेवा. हीच युध्द नीती आहे."
" तर मग ह्या सत्य नि असत्याच्या लढाईत आमच्या कडून युध्द नाही करणार का ?"
" हे युग मी युध्द करण्याचे नाहीये.परंतु माझा आशीर्वाद
तुम्हां लोकांच्या ध्वजा सोबत सदैव असेल." असे म्हणून ते
अदृश्य झाले. तसे भीमसेन तेथून पुढे निघाले. थोडे अंतर
चालून गेल्यानंतर भीमसेन ने पाहिले की एक ब्राम्हण कुटूंब
रस्त्याने निघाले. त्यांच्या वार्तालाप वरून हे जाणवत होते
की ते लोक हस्तिनापूरला गेले होते नि तेथून ते आपल्या
घरी निघाले होते. तेव्हा ते आपसात काहीतरी कुजबूजत
होते. ब्राम्हण पत्नी आपल्या मुलास सांगत होती की थोडे अजून चाल बेटा आपले घर लवकरच येईल. तेवढ्यात एक
भीमकाय राक्षसाला पाहून त्या ब्राम्हण कुटुंबातील लोकांची
बोबडी वळली. तेव्हा घटोत्कच उद्गारला ," तुमच्या पैकी कुणा
एकाला माझ्या सोबत चालावे लागेल."
" कुठे ? " ब्राम्हणाने न समजून विचारले.
" माझी आई शक्ती मातेची पूजा करत आहे अर्थात देवी
मातेला प्रसन्न करण्यासाठी एक बळी ची गरज आहे म्हणून
बोला तुमच्या पैकी माझ्या सोबत कोण यायला तयार आहे ?" तेव्हा तो ब्राम्हण म्हणाला ," मला घेऊन चला."
तशी त्याची पत्नी म्हणाली ," नाही नाही तुम्ही नका जाऊ,
तुम्ही तर माझे सर्वस्व आहात." त्यावर घटोत्कच उद्गारला,
" घाबरू नकोस देवी मी ह्यांना घेऊन जाणार नाही कारण
बळी उत्तम असायला पाहिजे."
" तर मग मला घेऊन चला." त्या ब्राम्हणाचा मोठा मुलगा
म्हणाला. तेव्हा त्याचा बाप म्हणाला ," छे छे छे तू नको जाऊस तुझ्या शिवाय मी जगू शकणार नाहीये."
तेवढ्यात ब्राम्हण पत्नी म्हणाली ," छे छे छे हे पुत्र मला
पाहिजे." तेव्हा मग मधला पुत्र स्वतःहून पुढे येत म्हणाला ,
" बळी साठी मला घेऊन चला श्रीमान. कारण मोठा दादा
बाबांना प्रिय आहे. धाकटा आईला प्रिय आहे.आता राहिलो
फक्त मी आणि माझ्यावर कोणीही प्रेम करत नाहीये म्हणून मला बळी साठी घेऊन चला." त्या सर्वांचे संभाषण ऐकून
भीमसेन पुढे येत म्हणाला ," तू यांच्या पैकी कोणालाही
घेऊन जाऊ नकोस राक्षस." असे म्हणून त्या दोन नंबरच्या
ब्राम्हण मुलास उद्देशून म्हटलं ," ब्राम्हण पुत्र आई-वडिलांच्या
स्नेहाला शंका पूर्ण नजरेने पाहणे पाप आहे.त्यांच्या कडून
जेवढे प्रेम मिळेल तेवढे आशीर्वाद समजून स्वीकारायचे असते. मी सुध्दा तुझ्या प्रमाणे मधला आहे म्हणून एक नजर
माझ्याकडे पाहून अंदाज लाव की माझ्या आईचे माझ्यावर
किती प्रेम आहे. जर तुला आपल्या आई-वडिलांच्या जीवणापेक्षा स्वतःचे जीव अधिक प्रिय असेल तर तू बळी
साठी योग्य नाहीयेस.कारण डरपोक आणि रोगीला बळी
दिले जात नाही." असे म्हणून मग त्या ब्राम्हणाकडे पाहून
भीमसेन पुढे म्हणाला ," कोणत्याही पुत्राला कमी लेखू नये.
सर्वांवर सारखेच प्रेम करायला हवे.परंतु आपल्या पुत्रावर
दुजाभाव करून एका पित्याचाच नाहीतर ईश्वरचाही अपमान
केला आहे.अर्थात आपल्याला प्रायश्चित्त करणे आवश्यक
आहे म्हणून आपला दोष स्वीकारून आपल्या मुलाची माफी
मागणे काही पाप नाही." त्यावर तो ब्राम्हण कुमार म्हणाला,
" नाही नाही मी आपल्या पित्याला क्षमा मागू देणार नाहीये. जरी ते दोषी असले तरी मीच त्यांची माफी मागेन."
असे म्हणून तो आपल्या वडिलांचे चरण पकडतो." त्यानंतर
भीमसेन त्या घटोत्कच ला उद्देशून म्हणाले ," मला घेऊन चल." असे म्हटल्यानंतर घटोत्कच त्याना आपल्या निवासस्थानी घेऊन येतो. प्रथम भीमसेन आंत प्रवेश करतात
नि त्यांच्या पाठोपाठ घटोत्कच प्रवेश करून आपल्या मातेला
म्हणाला ," मातोश्री !"
" बळी आणलास का पुत्र ?"
" हां मातोश्री ! मी असा बळी घेऊन आलोय की शक्ती माता सुध्दा प्रसन्न होईल." असे म्हणताच त्याच्या मातेने मागे
वळून पाहिले.नि समोर आपल्या पतीला पाहून ती आश्चर्यकारक नजरेने उठून भीमसेन जवळ येत म्हणाली ,
" आर्यपूत्र !" असे म्हणताच घटोत्कच आश्चर्यकारक नजरेने
भीमसेन कडे पाहू लागला तशी त्याची आई त्याला म्हणाली,
" आश्चर्य करू नकोस पुत्र हे तुझे पिताश्री कुंतीपुत्र भीम !
आहेत."
" नाही. मी केवळ एक बळी आहे.अगोदर मला बळी दे नि
मग आपल्या पुत्राशी माझी ओळख करून दे."
" आर्यपूत्र हे काय बोलताय आपण ?"
" जर तुला बळी द्यायचा होता तर आपल्या पतीचा द्यायचा होता. परंतु हा तुला अधिकार कोणी दिला ? की
स्वतःच्या स्वार्थ साधण्यासाठी लोकांच्या पुत्राचा बळी
द्यायचा . अश्या ने देवी माता तुला प्रसन्न होणार आहे का ? कदापि नाही. म्हणून तू माझा बळी दे.तुझा पुत्र मला त्याचसाठी घेऊन आलाय.त्याचे परिश्रम वाया घालवू नकोस."
" बळी देणे ही प्रथा आहे फार पूर्वीपासून आर्यपूत्र !"
" कसली प्रथा माता ने कधी मागितला आहे का बळी ?
धर्म जीवनाला सुंदर अथवा खराब करण्याचे मार्ग आहेत प्रिये. धर्माशी असलेले नाते तोडू नकोस."
" मी क्षमा मागते आर्यपूत्र ."
" मी कोण तुला क्षमा करणार ? तुला जर क्षमा मागायचीच असेल तर शक्ती मातेची माग जिचा तू अपमान
करायला निघाली होतीस ?" तशी हिडिंबा शक्ती मातेला
हात जोडून माफी मागत म्हणाली ," मला क्षमा कर माते क्षमा
कर." तसे भीमसेन आपला पुत्राला अर्थात घटोत्कचला उद्देशून म्हणाला ," जोपर्यंत तुझी आई शक्ती मातेची क्षमा
मागत नाही तोपर्यंत तू माझ्या गळ्याला लाग."
त्यावर घटोत्कच म्हणाला ," नाही. आधी अलिंगण नाही
पिताश्री चरणस्पर्श करीन."
" आपल्या पित्याची आज्ञा नाही का पाळणार ?"
" मला क्षमा करा पिताश्री परंतु ही माझी फक्त मातोश्री
नाहीतर माझी गुरू पण आहे म्हणून तिच्या आज्ञेचे पालन
करणे हे माझे परम कर्तव्य आहे. म्हणून अगोदर चरणस्पर्श
करण्याची आज्ञा द्या." असे म्हणून घटोत्कच ने त्याचे चरणस्पर्श केले. तेव्हा भीमसेन उद्गारला ," आयुष्यामान भव !" त्याचे धिप्पाड शरीर पाहून भीमसेन म्हणाले ," परंतु
मी तुला अलिंगन कसे देऊ शकतो पुत्र ?"
" जशी आपली आज्ञा !" असे म्हणून बाल्य रूप घेतले.
जास्तच लहान झाला. त्यावर भीमसेन म्हणाले ," अरे आता
तर एकदमच लहान झालास. माझ्या उंची एवढा तरी हो."
असे म्हणताच घटोत्कच लगेच त्यांच्या उंची एवढा उंच झाला. तसे भीमसेन ने त्याला अलिंगन दिले नि अभिमानाने
म्हटलं ," माझ्या पुत्राचे शरीर तर वज्राचे आहे."
" पिताश्री आपल्या पुत्राचे शरीर आपल्या मातोश्री च्या
आशीर्वादाने झाले आहे."
" आपला पुत्र कुठं पळून जात नाहीये.पण आधी थोडे
जेवून घ्या."
" जेवणार नाही."
" जेवणार नाही पण का ?"
" मी जेऊनच निघालो होतो कुटीतून."
" कुटी मध्ये ? कुटी मध्ये आपण काय करत आहात ?"
" मी एकटा थोडीच आहे आम्ही पाची भाऊ आहोत नि
पांचाली पण आहे आणि ही फार मोठी कहाणी आहे. "असे
म्हणून थोडक्यात माहिती दिली. आम्हाला बारा वर्षाचा वनवास आणि एक वर्षांचा आज्ञातवासाचे आहे.वनवासाची
पाच वर्षे तर झालीत."
" मग शिल्लक राहिलेली वर्षे इथं घालवावीत आर्यपूत्र.
मला राणी द्रौपदी आणि बाकी आपले साऱ्या भावंडांची
सेवा करण्याची संधि पण प्राप्त होईल. आणि आपल्याला
इथं कोणी शोधू पण शकणार नाहीये."
" हे संभव नाहीये प्रिये !"
" का पिताश्री ? आपल्याला असं तर वाटत नाहीये ना की
आपला हा पुत्र आपल्या लोकांची सेवा करू शकणार नाही."
" तू सर्वांची रक्षा करू शकतोस पुत्र परंतु इथं राहण्या ने
त्याला वनवास तर नाही म्हणता येणार ना ? आणि आम्हाला
तर बारा वर्षाचा वनवास भोगायचाच आहे. थोड्या वेळ तुमच्या सोबत राहून निघून जाईन."
" मी सुध्दा येईन तुमच्या सोबत.जेष्ठ पिताश्री चा आशीर्वाद
घेईन. आणि काकाश्री अर्जुन कडून धनुर्धर चे धडे घेईन."
" तुझे काकाश्री अर्जुन दिव्य अस्त्रांच्या प्राप्ती साठी इंद्रा कडे गेले आहेत."
" दिव्य अस्त्र ....युध्द होणार आहे का ?"
" हां पुत्र महायुद्ध होणार आहे. जर का ते साधारण युद्ध
असते तर अर्जुनला दिव्य अस्त्रांसाठी इंद्राकडे जाण्याची
गरज भासली नसती."
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा