महाभारत ४५ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाभारत ४५ |
४५
आज समारंभाचा शेवटचा दिवस होता. आणि रात्री
सर्वत्र सामसूम झाल्यानंतर लाक्षागृहाला आग लावली गेली
आग लावणारा आग लावून मागे फिरे पर्यंत अग्नीने मुख्य द्वार वेढले. त्यामुळे पुरोचन आतमध्येच अडकला.
पांडवांना जाळून मारण्यासाठी ज्याने भवन बनविले. अर्थात पुरोचन स्वतःच त्या आगीत सापडला. म्हणूनच की काय हे म्हटलं गेलंय की दुसऱ्या साठी जो खड्डा खणतो तो प्रथम स्वतःच त्या खड्ड्यात पडतो. अगदी तेच झाले . आग लावून मागे फिरे पर्यंत मुख्य द्वारापाशी आगीने एवढा पेट घेतला की पुरोचना बाहेर निघता आले नाही. तो स्वतःच त्यात त्या भडकलेल्या आगीत अडकला. पण म्हणतात ना देव तरी त्याला कोण मारी ! देवाच्या रुपाने त्यांचे रक्षण करण्यासाठी भुयार खोदनारा आला नि त्याने ठरलेल्या वेळात भुयार खोदून पांडवांना त्या भवनातून बाहेर काढले.
केवढा मोठा पराक्रम हा ! परंतु भवन बनविणारा मात्र स्वतःच
त्या आगीत जळून खाक झाला. म्हणून मनुष्याने दुसऱ्या चे कधीही वाईट चिंतू नये. जर कोणी आपल्या पेक्षा जास्त सुखी असेल तर समजावे की त्याने मागील जन्मी जरूर काही पुण्याचे काम केले असावे. त्याचे फळस्वरूप तो आज सुख भोगत आहे , मग आपल्याला दुःख का ? तर आपण मागील जन्मी काही चांगले कर्म केलेच नसणार म्हणून तर आपल्या नशिबी दुःख आलंय ना ? परंतु दु:खा मध्येही सुख असतं बरं का ? जर दुःखच नसेल तर सुखाचे महत्व तरी कसे कळणार ? नाही का ? म्हणून मनुष्याने सदैव चांगले कर्म करावे म्हणजे या जन्मी जरी सुख नाही मिळाले तरी पुढल्या जन्मी सुख नक्की भेटणार कारण देव स्वतःकडे कुणाचे कर्ज ठेवतच नाही मुळी ! आपण तरी रात्री झोपतो परंतु आपल्या अंरातील देव कधी झोपतच नाही. त्याचे कार्य सुरुच असते.
कारण रात्री सुद्धा कुणी ना कुणी जागा असतो आणि त्याला
हाका मारत असतो मग त्याला त्याच्यासाठी धावून जावेच लागतेच. असो.
भवनाला आग लागताच पांडव भुयारी मार्गाने सहीसलामत भवनाच्या बाहेर आले. तेव्हा भीमसेन भयंकर
चिडलेला असतो. त्याला वाटत असते की असेच जावे नि
गांधार कुमार शकुनी ला धरून असे मारावे की तो प्यायला
पाणी सुद्धा मागणार नाही. अर्जुनची तीच अवस्था होती.
म्हणूनच की काय जेव्हा युवराज युधिष्ठिर भीमाला समजविण्याचा प्रयत्न करत असताना म्हणजे युधिष्ठिर आपल्या भावाला समजविताना म्हणाला ," तुझ्या सारख्या
महावीरला क्रोध करणे शोभत नाही प्रिय भीम !" एवढे सारे
होऊन ही आपला जेष्ठ भाऊ आपल्या भावाला शांत राहायला सांगतो , म्हणून अर्जुनला राहवलं नाही त्याने
आपल्या थोरल्या भावाला विचारले की, मग काय रातोरात
असे पळून आपला प्राण वाचविणे कोणत्याही महावीराला
शोभून दिसते का दादा !" तेव्हा आपले डोके शांत ठेवून युधिष्ठिर उद्गारला ," आपण पळालो नाही अर्जुन नाही पळालो. परंतु हे कदापि विसरू नका. की राम जर वनवासात
गेलाच नसता तर रावण मारला गेलाच नसता. कुणास ठाऊक
ज्या मार्गाने आपण चालत आहोत तोच मार्ग आपल्याला
कोणत्यातरी अनमोल रत्ना जवळ घेऊन जात असावा. " परंतु युधिष्ठिर चे हे म्हणणे इतर बंधू ना देखील पटले नाही
म्हणूनच की काय नकुल म्हणाला ," परंतु आम्ही हस्तिनापुरचा त्याग कदापि करू शकणार नाही दादा ! कारण
ती माञभूमी आमची आई आहे." तसे त्याच्या या वक्तव्याला
विरोध करत सहदेव उद्गारला की ती नगरी आमची आई
नाहीये. आमची आई ही बघ इथं उभी आहे." कुंती कडे त्याने
इशारा करत पुढे म्हणाला ," परंतु हस्तिनापुरला तर जावेच
लागणार आई ! "
" का ? का जावं लागेल ? हस्तिनापुर ने आजपर्यंत अश्रू
शिवाय दुसरं दिलेच काय ? तुम्हां लोकांना हे कळत नाही का ? की हस्तिनापुरच्या राजभवन मध्ये आपल्यासाठी जागा
नाहीये. तातश्री आपल्याच वचनात अडकलेत. ते त्यामुळे
त्यांच्या मनात असूनही ते आपल्यासाठी काहीही करू शकणार नाहीत. आणि विदुर बिच्चारा लाचार आहे तो
आपले म्हणणे राजदरबारात फक्त मांडू शकतो. त्याची अंमलबजावणी मात्र तो करू शकत नाही आणि शकणार ही
नाही. परंतु ह्या दोघां व्यतिरिक्त बाकीचे सर्वजण फक्त दुर्योधन तोंड पाहत राहतात. त्याच्या वक्तव्याला विरोध
करण्याचे सामर्थ्य अन्य कुणा मध्येही नाही. म्हणून हे वनच आता आपली माता आहे, वृक्ष आपल्याला सावली देतो आणि अन्न शिजविण्यासाठी लाकडे ही देतो. आपल्या कडे
भोजन शिजविण्यासाठी जर सामुग्री नाहीये तर आपली
पिकलेली फळे आपल्याला खायला देतो. ह्या वणामध्येच मी
तुमच्या बाबा सोबत सुखी होते आणि पुत्रांनो आता तुम्हां लोकांसोबत ही मी सुखात राहीन. नाही पाहिजे आपल्याला असले राज्य जे आपल्या युवराजला रहायला लाक्षागृहा
सारखे घर देतो." त्यावर अर्जुन उद्गारला ," आई, जर तुला
या वणातच राहायचे असेल तर आमची काहीही तक्रार नाहीये . आम्ही इथं राहूनहीं तुझी सेवा करू , परंतु फक्त
एकवेळ हस्तिनापुरात जाणे अतिआवश्यक आहे."
" का ?"
" कारण त्याना हे जतावण्यासाठी की आम्ही या वनात
पळून नाही आलो तर आपल्या आईची आज्ञा मान्य करून
केवळ तिच्या इच्छेपूर्ती साठी आम्ही वनात राहणे पसंत केले." त्यावर युधिष्ठिर त्याची समजूत काढत बोलला ," मन
छोटे नको करू अर्जुन. आपण हस्तिनापुर ला जायचं परंतु
आता नाही."
" आता का नाही दादा ? का नाही ? " भीमसेन वैतागून बोलला.
" आचार्य द्रोणच्या या शिष्याला हा प्रश्न विचारणे शोभत
नाही. मला ठाऊक आहे की एकटाच दुर्योधन च्या सैन्याला
पुरेशा आहेस. परंतु हे कदापि विसरू नकोस की दुर्योधन
तेथे एकटा असणार नाही. त्याच्या सोबत पितामह असतील,
आचार्य द्रोण असतील ,कुलगुरू कृपाचार्य सुद्धा असतील.
म्हणून जोपर्यंत लढाई टाळता येईल तोपर्यंत ती अवश्य टाळत रहावी. कारण तू पितामहा समोर गदा घेऊन उभा
राहणार आहेस का ? अर्जुन तू गुरू द्रोणाचार्याच्या दिशेने
आपल्या बाणाचे टोक करणार आहेस का ? आणि काय द्रुपतला बंदी बनविलेस तसे आपल्या तातश्री धृतराष्ट्राना
त्यांच्या रथावर चढून बंदी बनवू शकतोस का ? तसेच
दुर्योधन आणि दु:शासन या दोघांना ठार मारून जेष्ठ मातोश्री
गांधारी समोर जाऊन उभा राहू शकतोस का ? नाही ना ?
म्हणून योग्य वेळेची वाट पहा." असे म्हणून युधिष्ठिर भीमसेन
कडे पाहत पुढे उद्गारला ," तुझे हृदय तर अनुज दुर्योधन पेक्षा
फार मोठे आहे, म्हणून तो तुझ्यावर जर आघात करतोय तर
करू दे त्याला. परंतु तू स्वत: मात्र त्याच्या वर आघात करू
नकोस. मोठा भाऊ होण्याच्या नात्याने तुझे हे कर्तव्य आहे
की त्याच्या आघाता पासून स्वतःचा बचाव करत त्याला
समजविण्याचा प्रयत्न कर की दुर्योधन भावंडांनी आपसात
लढायचं नसते. कारण तसे केल्याने आपल्याच घराण्याचे
नाव खराब होईल." त्यावर भीमसेन उद्गारला ," मी आपल्या
मताशी सहमत नाहीये दादा ,परंतु तुझा जर आदेशच आहे की भ्याड लोकांप्रमाणे वनात भटकत राहू या तर तसेच होईल. " असे म्हणून तेथून निघून गेला. त्याच्या पाठमोऱ्या
आकृती कडे पाहत युधिष्ठिर स्वतःच्या मनात उद्गारला की,
तुम्हा लोकांना मी आता कसं समजावू की घडणाऱ्या घटना
घडतच असतात. कारण त्या पूर्व नियोजित असतात.फक्त
आपल्याला त्या माहीत नसतात. परंतु त्या घटनांच्या मागे काही ना काही निमित्त मात्र जरूर असतेच फक्त आपल्याला वाटत असते की त्याने केल्यामुळे ते झाले. तो कोण करणारा ? त्यात ईश्वर ची मर्जी जर नसेल तर त्याच्या हातून काही होणारच नाही.अर्थात सर्वकाही ईश्वरच करत असतो. मात्र त्यासाठी निमित्ताला धनी कुणाला तरी करतो बस्स ! तो स्वतःच्या नावावर कधी बिल फाडत नाही की मी केलं म्हणून. परंतु मनुष्य प्रत्येक गोष्टीत मीपणा आणतो. मी केलं. मी केलं आणि त्यात त्याला धन्यता ही वाटते. आता त्या दोघांचा राग शांत करण्यासाठी युधिष्ठिर त्या दोघानाही आरसा दाखवावा लागला.
त्याच वेळी हस्तिनापुरात मात्र पितामह यांच्या कक्षेत
शोककळा पसरली होती. त्यांनी स्वत:ला आपल्या कक्षेतच
कोंढूण घेतले होते. कुणाशीही भेटू इच्छित नव्हते. धृतराष्ट्रा च्या कक्षेत ही शोककळा पसली होती का केवळ नाटक सुरू
होते ते कोण जाणे ? कारण त्याना पांडवांचा अंत झाला म्हणून दुःख अवश्य झाले असेल परंतु त्या पेक्षा आनंद अधिक झाला असेल की आता त्याच्या पुत्राच्या राजा बनण्याचा मार्गात कुणीच नव्हते. अगदी तीच अवस्था दुर्योधन
च्या कक्षेत होती. कारण तेथे कर्ण, दु:शासन , दुर्योधन इत्यादी
उपस्थित होते. तेथे कर्ण सोडून कुणीही दुःखी दिसत नव्हता.
कारण छळ कपट करून महावीरणा मारणे हे कर्णला
मुळीच मान्य नव्हते. परंतु तो लाचार होता. मनात असूनही
काहीही करू शकत नव्हता. म्हणून मनुष्याने कुणाचेही ऋणी
होऊ नये. ऋणी माणूस विरोध करण्याचे स्वातंत्र्य तो घालवून
बसतो आणि त्यामुळे मिंद्यापानांचे जीवन जगणे येथे त्याच्या
नशिबी! म्हणून माणसाने कुणाच्या उपकाराच्या ओझाखाली राहू नये. श्रीमती पेक्षा गरिबी बरी ! निदान आपला गैरवापर
कुणी करणार नाही. कर्ण अंगदेश चा राजा झाला म्हणून
त्यावेळी खुश झाला खरा परंतु त्याचे दुष्परिणाम आता दिसू
लागलेत. नाईलाजाने का होईना षडयंत्री माणसा सोबत राहणे भाग पडतेय त्याला. कुणीही कुणाची मदत उगाच
करत नाही त्या मागे लपलेला असतो त्याचा स्वार्थ ! परंतु
त्यावेळी तो आपल्याला दिसत नाही. हीच खरी शोकांतिका
आहे. सर्वजण एकदम चुपचाप बसलेले असतात. तेवढ्यातच
गांधार कुमार शकुनीचे तेथे आगमन होते. सर्वाना असे मान खाली घालून बसलेले पाहून ते कर्णला उद्देशून उद्गारले," अरे
अंगराज कर्ण तुला तर अत्यानंद व्हायला पाहिजे की दुर्योधनच्या मार्गातील सर्व कांटे एक चुटकी सरशी निघाले की ते कधी तेथे नव्हतेच ! आता दुर्योधनला शिंहासना पासून
दूर कुणीही ठेवू शकणार नाही. अंगराज कर्ण आता तू पाहशीलच की दुर्योधन अगोदर युवराज होईल नि मग
हस्तिनापुर नरेश होईल. हस्तिनापुर चा राजमुकुट आता कुणीही त्याच्यापासून हिरावून घेणार नाही. तेव्हा अंगराज
कर्ण हा समारंभ करण्याचा योग आहे."
" मी तुम्हां लोकांच्या आनंदात सहभागी आहे ,परंतु तेवढा दुःखी सुध्दा आहे. जर असे छळ कपट करून महावीरणा मारले जाईल तर त्याचे दुःख सर्व महावीरणा
करायला हवे आहे आणि मी त्या पाच महावीरांची हत्याचे
दुःख करत आहे." त्यावर दुर्योधन लगेच दुजोरा देत बोलला,
" कर्ण च्या या मताशी मी सहमत आहे मामाश्री ! आता
गदा युद्धात भीमाला हरविण्याची अभिलाषा अपुरीच राहिली.
भीमाला गदा युद्धात हरविण्याची जे सुख मिळाले असते ते हस्तिनापुरच्या राजमुकुट पेक्षाही मूल्यवान ठरले असते. जर
मी त्याला गदा युद्धामध्ये ठार मारले असते तर मी समारंभ
अवश्य केला असता." त्यावर गांधार कुमार शकुनी कुत्सितपणे उद्गारला ," महाविरा मध्ये फक्त हा एकच दोष
आहे पुत्र की ते महामुर्ख असतात. अरे तुम्हां लोकांना हे कुणी सांगितले की पांडव युध्दात मारले गेले नाहीत. षडयंत्र सुध्दा एक प्रकारचे शस्त्र आहे आणि जर या शस्त्राचा प्रयोग करायचे माहीत नाही तर त्याचा अर्थ हा कदापि नाही की ते शस्त्र नाहीये. तुझे शूरवीर पांडव युध्दात च मारले गेले.
म्हणून दुःख करू नका. ते मोठे वीर होते परंतु तुझा हा मामा
त्यांच्या पेक्षा महावीर निघाला. आ हा हा हा ss "
तेव्हा कर्ण दुःख व्यक्त करत बोलला ," परंतु त्या आगीमध्ये महाराणी कुंती जळून खाख झाली."
" मग काय झालं अंगराज ? एक जुनी म्हण आहे की गहू
सोबत तांदूळ पण दळला जातो. अगदी तसेच कुंतीच्या बाबतीत. बिच्चारी कुंती आ हा हा ss आणि सर्वात महत्त्वाचे
म्हणजे प्रिय पांडवांचे पितामहा सुध्दा हार मानून आपल्या कक्षेत जाऊन बसलेत ते बाहेरच पडत नाहीत . कदाचित तोंड दाखवायची त्यांना लाज वाटत असावी आ हा हा हा ss
या अगोदर असा कधीच हसलो नाही. आ हा हा हा s s
गांधार कुमार शकुनीला आज इतका आनंद झालेला असतो
की तो शब्दातून त्याचे वर्णन करू शकत नव्हता.
धृतराष्ट्रा
पांडवांचा असा अश्या प्रकारे अंत झाला. हे ऐकून मला
आनंद व्यक्त करावा की दुःख व्यक्त करावे हे कळत नव्हते.
खरं सांगायचं तर आनंद झालाच होता की माझ्या पुत्राच्या
राजमुकुटच्या आड ते पांडव येऊ लागले होते. आणि मला
ते अजिबात मान्य नव्हते. परंतु त्यांचा असा भयानक मृत्यू
व्हावा हेही मला मान्य नव्हते. म्हणून मला दुःख करायलाच हवे आहे, निदान तसा प्रयत्न तरी करायला हवा. नाहीतर
सर्वांना वाटेल त्यांच्या मृत्यूला मीच कारणीभूत आहे. परंतु
मी तर काहीच केले नाही. मग मला का बरं दोष देतील लोक ? तेवढ्यात माझ्या कक्षेत विदुर आला नि मला तातश्री
विषयी चिंता व्यक्त करत म्हणाला ," महाराज sss तसा मी
चिडून म्हटले ," मला महाराज म्हणू नकोस.कारण ही वेळ
मला महाराज म्हणण्याची नाहीये. "
" वेळ कोणतीही असो . परंतु माणसाने आपली पायरी
सांभाळूनच बोलायचे असते."
" तुला किती जरी सांगितले की दरबार सोडून माझ्या कक्षेत जेव्हा असशील तेव्हा मला फक्त दादा म्हणत जा म्हणून. परंतु तू ऐकणार थोडाच आहेस ? म्हण तुला काय
म्हणायचे ते."
" दादा, तातश्रीनी स्वतःला आपल्या कक्षेत बंद करून
घेतले आहे, ते काही केल्या दरवाजा उघडायला तयार नाहीत. तेव्हा आपण तरी एकदा त्याना हांक मारून पाहावे."
" जर तुझ्या हाकेने तातश्री दरवाजा उघडत नसतील तर
माझ्या हाकेने मुळीच दरवाजा उघडणार नाहीत. परंतु तरी
सुध्दा आपण प्रयत्न करू पाहू !" असे म्हणून आम्ही दोघेही तातश्रींच्या कक्षेच्या बाहेर म्हणजे द्वारापाशी गेलो नि त्याना
मोठ्या ने हाका मारू लागलो , परंतु ना ते ओ देत होते आणि
ना ही दरवाजा उघडत होते.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा