Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

महाभारत ८३ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

महाभारत ८३
महाभारत ८३

 


                    महाभारत ८३

   महाराज विराट आणि कंक सारीपाटाचा खेळत असतात.
कंक ने फासा फेकत म्हटलं ," आठ आणि खरोखरच आठाचाच अंक आला होता. तेव्हा महाराज विराट ने विचारले ," कंक बृहन्नला तर खरोखरच नृत्य आणि गायन मध्ये निपुण आहे."
    "  फक्त नृत्य आणि गायन मध्येच निपुण नाहीतर महाराज तो शस्त्रज्ञान मध्ये सुध्दा निपुण आहे." कंक उद्गारला
     त्यावर उपहासाने  विराट महाराज हसत म्हणाले ," काही पण सांगू नकोस तू कंक बृहन्नला आणि शस्त्रधारी फासे फेक
कंक फासे आ हा हा हा  s s s " त्याना विश्वासच होई ना ! तेवढ्यात तेथे महाराणी सुदेष्णा आल्या तसे कंक ने त्याना
आदरपूर्वक वंदन केले. तेव्हा महाराणी सुदेष्णा ने विचारले,
    " कंक मी तुला काही प्रश्न विचारते आणि मला खात्री आहे
की तू त्या प्रश्नांची उत्तरे अवश्य देशील."
    " ठीक आहे, विचारा मी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करेन."
    " प्रश्न काही अवघड नाहीयेत फार सोपे आहेत तेव्हा तू
त्या प्रश्नाची उत्तरे देशील असे गृहित धरून मी प्रश्न विचारते.
असे म्हणून त्या किंचित थांबून दीर्घ श्वास सोडून त्या पुढे
म्हणाल्या ," महाराज युधिष्ठिर ची झालेली दुर्दशा पाहून ही
ह्यांना त्या सारीपाट खेळा पासून परावृत्त  न करता तु ही
त्यांच्या सोबत सारीपाटाचा खेळ खेळत बसतोस. ह्यांची पण
तशीच दुर्दशा झाल्या नंतर  तू इथून जाणार आहेस का ?"
    महाराज विराट ना कल्पना नव्हती की महाराणी असा काही प्रश्न विचारेल.म्हणून ते रागाने म्हणाले ," महाराणी !"
   परंतु महाराणी सुदेष्णा यांनी त्याना पुढे बोलू न देता त्या
म्हणाल्या ," कंक मी चुकीचा प्रश्न विचारला आहे का ?"
     " आपला प्रश्न एकदम बरोबर महाराणी परंतु...?
     " परंतु काय ?"
     " महाराजांच्या आदेशाचे पालन करणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे महाराणी."
     " अस्सं ! मग सांग. तुझ्या महाराजाना अर्थात युधिष्ठिरला कोणी आदेश दिला होता सारीपाट खेळण्याचा ?"
     " क्षत्रिय मर्यादा ने महाराणी क्षत्रिय मर्यादा ने."
     " मग क्षत्रिय मर्यादा ने हा सुध्दा आदेश दिला होता का ?
की आपले राज्य , आपले  बंधू ,  आणि आपली पत्नी
या सर्वांना सारीपाटाच्या डावावर  लावायला सांगितले होते का ? इतकेच बोलून न थांबता त्या पुढे म्हणाल्या , " मला हे कळत नाही की ते  फक्त नावानेच धर्मराज होते का  ?"
       त्यावर कंक म्हणाला ,"  जर त्यांनी स्वतःचे सर्वकाही डावावर लावले नसते तर हे कसे सिध्द झाले असते की सारीपाटाचा खेळ खरोखरच अशुभ आहे आणि विनाशकारी आहे. जुगार कधीही वाईटच असतो. कारण त्याची नशा दारूच्या नशे पेक्षा ही भयंकर असते की डाव जिंकणारा नि डाव हरणारा सुद्धा डाव सोडून दोघेही उठत नाहीत."
    " बरं ते जाऊ दे. पण  काय म्हणतेय की एकदा डाव
हरल्यानंतर आणि सारीपाटाचा खेळ समाप्त झाल्यानंतर पुन्हा सारीपाटाचा खेळ खेळायला बसायची काय गरज  होती ? कारण एकदा हरल्यानंतर महाराज धृतराष्ट्रानी सर्वकाही देऊन टाकले होते ना ? मग परत कशाला खेळायला बसायचे ?"
     " जर कोणी क्षत्रिय दुसऱ्याच्या कृपा प्रसादाने राजा बनला तर तो ना क्षत्रिय  राहात आणि नाही राजा म्हणता येत त्याला. राज्य कोणाच्या कृपेने नाही महाराणी तर आपल्या मनगटाच्या जोरावर जिंकायचे असते. संभवता मोठ्या तातश्रीच्या कृपेने मिळालेले राज्य मच्छलीच्या काट्या प्रमाणे त्यांच्या गळ्याला टोचत होते. म्हणून त्यांनी स्वतःच आदेश
दिला होता."
    " परंतु मला पटत नाहीये हे , महाराज त्यांचे मोठे तातश्री
होते. अर्थात त्यांचा आशीर्वाद अस्वीकार कसा असू शकेल ?"
    " ठीक आहे जर आपण ते मान्य नाही करत तर हरकत
नाही.परंतु हे तर मान्य कराल की नाही की पुन्हा एकदा
सारीपाटाचा खेळ खेळण्याचा आदेश ही त्यांचाच होता.
आम्ही फक्त त्यांच्या आदेशाचे पालन केले बस्स ! आणि
कदाचित आमची भाग्यरेषा त्याच दिशेला निघाली होती.
   तेवढ्यात सेनापती येण्याची सूचना मिळते. तशी ती खुश
होत म्हणाली ," माझा भाऊ येत आहे." किचक आला नि
त्याना दोघांना वंदन करत म्हणाला , " प्रणाम महाराज , प्रणाम महाराणी !"

    दुसऱ्या दिवशी महाराणी सुदेष्णा आपल्या कक्षेत होती नि
थोड्याच वेळाने तेथे सैरंधी आली तेव्हा महाराणी सुदेष्णा ने
विचारले ," सैरंधी sss
   " बोला महाराणीसाहेब  !"
  " मी बरेच दिवसापासून तुला विचारायचे म्हणतेय पण द्यानातच राहात नाही बघ."
    " काय विचारायचे होते तुम्हांला ?"
    " हेच की तुझे लांबलचक नि मुलायम असूनही तू त्यांची
नीट जोपासना का करत नाहीस. मला म्हणायचे की त्याना
मोकळे का सोडून ठेवले आहेस ? तुझं तुझ्या केसांवर प्रेम
नाही का ?"
    " अगोदर मी बांधायची त्याना महाराणी."
    " मग आता का मोकळे ठेवते आहेस ? जसे की ते केस
तुझे नसून कुण्या दुसऱ्या चे आहेत ?"
    " बस्स मन नाही."
    "  मन नसायला काय झालं ?"
    " त्याचं काय आहे महाराणीसाहेब  मी इथं येण्यापूर्वी इंद्रप्रस्थाची पट्टराणी द्रौपदी च्या सेवे मध्ये होती ना आणि सुध्दा आपले केस मोकळे सोडले आहेत. अर्थात त्यांच्या बद्दल माझ्या मनात फार आदर आहे म्हणून मी पण माझे केस बांधत नाहीत. ज्या दिवशी त्या आपले केस बांधतील त्याच दिवशी मी देखील बांधेन माझे केस."
   " तिचे केस बांधले जातील याची शक्यता कमी वाटते मला सैरंधी.कारण पांडवांचे अज्ञातवास सफल होईल असे मला वाटत नाही. कारण हस्तिनापूरचे सारे गुप्तहेर त्यांचा कसून
शोध घेत आहेत आणि तूच विचार कर सैरंधी गांडीव धारी अर्जुन, गदा धारी भीम , युधिष्ठिर , नकुल , सहदेव हे सर्वजण लपणार आहेत का ? एकवेळ शोधणाऱ्या आभाळात चंद्र मिळणार नाही. परंतु चंद्रवंशी पांडव शोधून सापडणार नाहीत. हे कदापि शक्य नाहीये."
    "पांडवांचा अज्ञातवास पूर्ण होऊ नये ? अशी आपली इच्छा तर नाही ?"
    " छे छे छे ! मी अशी  का बरं  इच्छा करेन. उलट मी त्यांचा अज्ञातवास यशस्वी व्हावा अशी देवाजवळ प्रार्थना करीन. परंतु मला एक गोष्ट खटकते आणि ती गोष्ट म्हणजे जुगार खेळावा युधिष्ठिर ने आणि त्याची शिक्षा मात्र  एका स्त्री ने भोगावी . ती का म्हणून ?  मला तर कधी कधी इतका राग
येतो की असं वाटतं की युधिष्ठिरला शाप देऊन टाकावा."
     " छे छे छे !  असं अजिबात करू नका महाराणी ,कारण दोष ना धर्मराजांचा आहे ना द्रौपदी चा जे काही झाले त्यात थोडा अधिक दोष द्रौपदीच्या अभिमानाचा पण आहे आणि असं पण ते होऊ शकतं पुढे जे काय होणार आहे  त्याची ही थोडीशी झुळूक  असावी."
   " तू भाषा तर क्षत्रियांची बोलते आहेस सैरंधी."
   " कारण मला महाराज द्रुपदच्या राजभवन मध्ये हीच भाषा शिकविली गेली आहे महारानी साहेबा.
    " अच्छा अच्छा म्हणजे तू कांपिल्या पासून द्रौपदी सोबत
आहेस तर ?"
     " हो कारण  मी त्यांच्या मागे सावली सारखी उभी असे.
महाराज तर मला आपली मुलगीच समजायचे जणू !"
    " सैरंधी ss
    " मला क्षमा असावी."
    " मी तुझे दुःख समजते सैरंधी आणि खरे सांगायचे तर
तुझ्या सारखी दासी मिळणे म्हणजे सौभाग्याची गोष्ट आहे तू आता जाऊ शकतेस."
    " क्षमा असावी." असे म्हणून सैरंधी तेथून निघून गेली.
परंतु जात असताना रस्त्यामध्ये  किचक आडवा आला. परंतु तिने स्वतः बाजूला सरकून त्याला रस्ता करून दिला. परंतु तिचे अलौकिक सौंदर्य पाहून तो पुरता घायाळ झाला. जसे
की ती पाहताच बाला खलिजा खलास झाला. अशी अवस्था
झाली त्याची जणू ! ती निघून गेली तरी तिच्या पाठमोरी आकृतीकडे पाहतच राहतो नि मंद मंद स्मित हास्य करत तो महाराणी सुदेष्णाच्या कक्षे जवळ गेला नि मागे वळून पाहू
लागला. तेव्हा महाराणी सुदेष्णा ने विचारले ," अरे दादा तेथे का उभा राहून मागे काय पाहत आहेस ?"
    " ह्या दासीला या अगोदर पाहिली नाही कधी येथे , कधी पासून आहे ती इथं ?"
    " तिला इथं येऊन तिला एक वर्ष व्हायला आले. दुःखी आहे बिच्चारी ! महाराणी द्रौपदीची प्रसादिका होती ती."
    " हो का ? द्रौपदीला नाही पाहता आलं परंतु तिची प्रसादिका खूप सूंदर आहे. माझ्या जवळून गेली तर मला क्षणभर असं वाटलं की आगीच्या गरम वाफा लागल्या माझ्या अंगाला."
    " दादा ! असं पर स्त्री बद्दल बोलू नये."
   " आता ती तुझी दासी म्हटल्यावर पर स्त्री कुठं राहिली ती
दासी म्हणजे आपल्या क्षत्रिय लोकांचा तिच्यावर पूर्ण हक्क
असतो. पाहिजे तेव्हा नदीत डुबकी मारावी नि त्यात स्नान करावे. नाही का ? आणि तुला खरं सांगू सुदेष्णा ही आग मला विझवावी लागेल.पूर्ण काळजाला भिडली ती. परंतु
तिची चाल पाहिलीस का ? दासी अश्या चालत नाहीत. ही
चाल तर क्षत्रियांनि जशी वाटत होती. तिला दासी बनवून
फार मोठा अन्याय केला आहेस  तू तिच्यावर. तिला म्हणावं माझ्या भवनात येऊन माझं भवन सांभाळ बस्स ! राणी बनवुन मी तिला."
    " असं बोलू नये परस्त्री बद्दल पण तू काय ऐकणार आहेस ? मी नको म्हटले  तरी तू थांबणार नाहीस हे मला माहित आहे." त्यानंतर किचक तेथून तसाच निघाला आणि सैरंधीला शोधत तो वाटिका मध्ये येऊन पोहोचला. तेथे सैरंधीला पाहून तो म्हणाला ," तू इथं वाटिका मध्ये येऊन बसली आहेस मी तुला कुठं कुठं शोधले ?"
     " कशासाठी शोधत होते मला ?"
     " तुझ्या सौंदर्याची प्रशंसा करण्यासाठी !"
     " परस्त्री विषयी असे बोलणे आपल्याला शोभत नाही."
     " मग माझा स्वीकार कर म्हणजे तू पर स्त्री राहणार नाहीस."
     " खबरदार , पुन्हा या शब्दांचा उच्चार कराल तर !"
     " अरे वा ! तुला राग पण येतो ही तर फारच चांगली गोष्ट
आहे मला ही फार राग येतो. आपल्या दोघांची जोडी तर
फारच शोभून दिसेल. मी तुला माझी पट्टराणी बनविन आणि
माझ्या साऱ्या पत्नींना तुझ्या दासी बनवून टाकीन." द्रौपदी
समजली ह्याच्या मनात आपल्या विषयी पाप आहे परंतु
ह्याला रोखणार कसे ? आपले पती पण आपली मदत करू
शकणार नाहीत. कारण अज्ञातवास अजून पूर्ण व्हायचा अश्या प्रसंगी ह्याच्याशी वादविवाद न करता जरा सबोरीने घ्यावे असा मनात विचार करून ती म्हणाली , " हे बघा मी साधारण स्त्री आहे आणि  विवाहिता आहे तेव्हा माझ्या विषयी असा विचार करणे ही पाप आहे."
    " मी पाप पुण्याचा विचार कधी केला नाही आणि कधी
करणार ही नाही. तेव्हा मुकाट्याने माझा स्वीकार कर."
    " सेनापती किचक मी सैरंधी अवश्य आहे.परंतु असाह्य
नाहीये.पाच शूरवीर माझा मान सन्मान आणि माझे अंगरक्षक
सुध्दा आहेत तेव्हा माझ्या जवळ येण्याची अजिबात करू
नकोस. त्याना जर समजलं की वाटिका मध्ये येऊन तू माझा
अपमान केलास. तर त्याचा दंड तुला ते अवश्य देतील तेव्हा
शहाणा असशील तर माझ्या पासून दूर रहा." असे म्हणून
ती तेथून निघून गेली. सावज हातातले निसटताच भडकलेला
किचक सरळ आपल्या बहिणीकडे म्हणजे महाराणी सुदेष्णा
जवळ गेला नि आपल्या बहिणीला म्हणाला ,"  तुझा
भाऊ  जिवंत राहावा असे जर तुला वाटत असेल तर तू तुझ्या
दासीला म्हणजेच सैरंधीला समजावून माझा स्वीकार करायला सांग. आणि जर तिने तसे नाही केले तर मी आत्महत्या करीन."
     " एका विवाहित स्त्रीला मी हे कसं सांगू बरं ? मला लज्जित करू नकोस. जर तू आपल्या बहिणीवर खरेखुरे प्रेम
करतो आहेस तर आपल्या मनातून पर स्त्री चा मोह त्याग कर. नाहीतर तुझ्या ह्या अपराधाची शिक्षा पूर्ण परिवाराला
भोगावी लागेल."
     " हेच का तुझं आपल्या भावावरचे प्रेम ?"
     " माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे तुला ही चांगले माहीत
आहे परंतु तू मला जे काम करायला सांगत आहेस ते कुण्या
बहिणीलाच नाही तर कोणत्याही स्त्रीला शोभणार नाहीये ते.
परंतु तू माझा भाऊ असल्याने तुझा मी त्याग पण करू शकत
नाही म्हणून... जा तू मी पाहते काय करायचे ते." किचक
तेथून निघाला तो आपल्या भवनात तिची वाट पाहू लागला.
त्यानंतर सुदेष्णा ने दासीला बोलवून सैरंधीला आपल्या
महालात पाठवायला सांगितले. ती दासी गेली नि थोड्याच
वेळात तेथे सैरंधी आली नि महाराणीला आपल्याला बोलविण्याचे कारण विचारले.तेव्हा सुदेष्णा म्हणाली," सैरंधी
माझ्या दादा ने ना महाराजा साठी उत्तम प्रतीची मधीरा आणली आहे तेव्हा तू जरा दादाच्या भवनात जाऊन तेवढी
मधीरा घेऊन ये." त्यावर सैरंधी म्हणाली ," महाराणी आपण
दुसऱ्या कुण्या दासीला पण हे काम सांगू शकता. मलाच
का पाठवित आहात ?"
    " सैरंधी किचक माझा भाऊ आहे , तेव्हा तुलाच जायला
हवं."
    " ठीक आहे महाराणी मी आपल्या आज्ञाचे पालन अवश्य
करेन.परंतु पुढे होणाऱ्या परिणामाला सर्वस्व आपणच जबाबदार असणार आहात." असे म्हणून सैरंधी किचकच्या
भवनात गेली असता तिथे अगोदरच वाट पाहत किचक तिला
पाहून खुश होतो. तिला म्हणाला ," ये सैरंधी मी तुझीच वाट
पाहत होतो."
     " मी महाराजा साठी आणलेली मधीरा न्यायला आलोय."
    " मधीरा तर तू स्वतः आहेस सैरंधी आज मी तुला मनसोक्त पिऊन घेईन." असे म्हणून तिला पकडायला पुढे
झेपावतो. तशी ती मागे सरकते.त्यावर तो हसून म्हणाला ,
    " मत्स्यदेशातून तू आता कुठेच पळून जाऊ शकत नाहीस
म्हणून तू चुपचाप माझ्या मिठीत ये." असे म्हणून तिच्या मागे
धाव मारत म्हणाला ," सैरंधी तू पळून पळून कुठपर्यंत पळणार ? सरड्याची धाव  कुंपणापर्यंत ना ? पळ शेवटी
पकडणारच आहे मी तुला." असे म्हणतच तिचा पाठलाग
करतो. तशी ती पळत राजभवन मध्ये पोहोचते नि
मोठ्या ने  ओरडते ," महाराज ssss " परंतु महाराज विराट
काहीच बोलत नाही.तसा किचक भेसूर पणे हसतो. अहाहाहा ss राजभवन मध्ये बसलेले सर्वजण आपल्या माना खाली
घालतात. परंतु तिच्या मदतीसाठी कोणीच पुढे येत नाही.
तसा किचक तिला पकडतो. तिच्या स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न करते. परंतु त्याचा दणकट हाता पुढे तिची
शक्ती अपुरी पडते. तरी पण त्याच्या हातातून सुटण्यासाठी
धडपड करतच असते. शेवटी किचक ने तिच्या कानशिलावर
चपराक ठेवून दिली. ती जमिनीवर कोसळते.तिच्या दातातून
रक्त वाहू लागले. ते पाहून युधिष्ठिरला भयंकर राग येतो.परंतु या क्षणी यत्किंचितही चूक घडली तर आपण ओळखले
जाऊ नि आपला अज्ञातवास भंग होईल आणि पुन्हा बारा
वर्षाचा वनवास नि एक वर्षाचा अज्ञातवास पुन्हा स्वीकारावा
लागेल म्हणून विराट बद्दल मनात संताप येत असूनही गप्प
बसावे लागले.परंतु भीमाच्या कानावर पांचाली चे शब्द पडताच भीम तेथे आला. पण त्याच वेळी युधिष्ठिरची नजर
भिमावर पडली. तसे युधिष्ठिर त्याला पाहून म्हणाला ," तू
इथं का आलास ?" त्यावर भीम म्हणाला , " मला स्वयंपाक
करण्यासाठी इंदन हवं होतं."
     " इंदन हवं तर बाहेर मिळेल ना ? आणि एक गोष्ट लक्षात
ठेव.ज्या वृक्ष आपल्याला सावली देतो तो सदैव आदरनिय
असतो आपल्यासाठी ! म्हणून तू इथून जा. " पण तरी देखील
भीम तेथून जायला तयार होईना तेव्हा युधिष्ठिर ने मोठ्या मुश्किलीने त्याला समजावत म्हणाले ," प्रिय भीम स्वतःवर
संयम ठेव नाहीतर आतापर्यंत केलेलं सर्व वाया जाईल तेव्हा
तू इथून जा." भीम आपल्या नाईलाजाने तेथून निघून. महाराज विराट आपल्या मेहुण्याला घाबरत असल्याने किचक ह्या असभ्य वर्तनावर काही न बोलता गप्प राहिले.
किंवा त्याला काही सुचल्या मुळे गप्प राहिले असावेत. परंतु
द्रौपदीला ते सहन झाले नाही. म्हणून ती रागाने म्हणाली ,
    " महाराज प्रजा ही राजाच्या संतती प्रमाणे असते.महाराज
राजमुकुटाच्या सोबत ही प्रतिज्ञा पण केली जाते की प्रजेच्या
सुरक्षेतेची जबाबदारी सुध्दा राजाची असते. सिंहासन वर
विराजमान होण्यापूर्वी ती शपथ घेतली जाते. आणि सिंहासन
बसणारी व्यक्ती धर्माचे प्रतीक असते.मी एक असाह्य स्त्री आहे माझी रक्षा करा महाराज. मी सेनापती किचक वर हा
आरोप करत आहे की त्याने माझ्या सतित्वावर घाला घालण्याचा प्रयत्न केला . आणि  महाराजा समोर त्याने
माझ्यावर हात सुध्दा उचलला. हे महाराजांनी सुध्दा पाहिले
आणि इथं उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी सुध्दा पाहिले.
ह्या सर्वांची साक्षी मानून आणि माझ्या ओठातून निघणाऱ्या
ह्या रक्ता कडे पाहून महाराजांनी अपराधी किचकला दंड
द्यावा." परंतु महाराज विराट काहीच बोलले नाही.त्यांनी तर
सरळ आपली मान खाली घातली. तेव्हा सैरंधी म्हणाली ,
    " हे मत्स्य नरेश आपण सुध्दा हस्तिनापूर महाराजा प्रमाणे
एक नारी चा अपमान सहन करणार का ?" किचक मोठ्या ने
हसतो.अहाहाहा !"
    " किचक हे तुला शोभत नाही." त्यावर किचक उपहासाने मोठ्या ने अहाहाहा sss ? तेव्हा सैरंधी चिडून म्हणाली,
    " काही हरकत नाही महाराज पण आपण असं समजू नका की सैरंधीचा अपमान करणारा जिवंत राहील ! महादेवाची शपथ मी त्या महावीरांची पत्नी आहे की ज्याने
नाव एकूणच मोठमोठ्या धनुर्धरांची धनुष्य हातातून गळून
खाली पडतात.आणि गदाधारींची गदा खाली पडतात. मी
अश्या दानवीरांची पत्नी आहे की मागणाऱ्याना ते काही मागण्यापूर्वीच त्याला हवी असलेली वस्तू देतात.जेणे करून
त्याना मागणाऱ्याना मागण्यांसाठी हात पुढे करण्याची
लाज वाटू नये. मत्स्य नरेश आपला धर्म ह्या किचकला फक्त
एवढंच म्हणून सोडणार आहात का ? " तेव्हा युधिष्ठिर म्हणजे कंक तिला समजावत सैरंधी कदाचित तुझे गंधर्व पती
यावेळी इथं येण्यास असमर्थ आहेत.तेव्हा हे समज की क्षमा
हाच सर्वात उत्तम धर्म आहे.क्षमा ही सत्य आहे , क्षमा ही धर्म
आहे , क्षमा ही सत्य आहे, क्षमा ही तपस्या आहे , क्षमा ही धर्म आहे.तुझ्या पतींना हे अवश्य माहीत आहे इथं तुझ्या
सोबत काय झालं आहे .तेव्हा हा निर्णय त्यांच्यावर सोड.
ते अपराध्याला योग्य दंड करतील. तेव्हा आता तू एकच कर
जा नि महाराणीचे प्रसादिका चे काम कर कारण सध्या तेच
तुझं कर्तव्य आहे." तेव्हा सैरंधी तेथून निघून गेली. तेव्हा
महाराज विराट म्हणाले ," कंक आज तुझ्या समजदारी बद्दल
तुझी प्रशंसा करावीशी वाटते.कारण मला तर का बोलावे तेच
सुचतच नव्हते."  त्यावर किचक म्हणाला ,"  जरी कंक मध्ये बोलला नसता आणि तुम्ही मला बोलण्याचा जरी विचार केला असता तरी ही मला काही बोलू शकले नसते तुम्ही !
आहाहाहा !"
 
   सैरंधी  सरळ महाराणी सुदेष्णाच्या  कक्षेत गेली तशी
महाराणी माहीत सुदेष्णा ने माहीत असूनही माहीत नसल्याचा
अभिर्वाव करत त्यांनी विचारले ," सैरंधी तुला काय झालं ?
    " माहीत असूनही माहीत नसल्याचे नाटक करू नका महाराणी आपणच मला आपल्या भावाच्या कक्षेत पाठविले
होते. हे देखील विसरलात ?"
    " हां मी तुझी अपराधी आहे मला माझ्या बंधू प्रेमाने माझा
नाईलाज केला होता. आणि तेव्हा मी देखील विसरुन गेली
की मी सुध्दा एक स्त्री आहे अर्थात मला दुसऱ्या कोणत्याही
स्त्री च्या अब्रू शी खेळण्याचा काहीही अधिकार नाहीये. क्षमा
कर मला.आणि  तू जर म्हणत असशील की माझ्या बधुंला
त्या बद्दल दंड मिळायला हवा तर मी तो अवश्य द्यायला लावीन."
     " त्याची आता काहीही आवश्यकता नाही.कारण त्याचा
दंड आता निश्चित झाला आहे. उद्याचा सूर्योदय तो आता
पाहू शकणार नाही."
     " हे काय बोलते आहेस तू सैरंधी  ?"
    " खरं तेच बोलतेय मी महाराणी."
    " एवढी निर्दयी  होऊ नकोस. एक वेळ क्षमा कर माझ्या
भावाला."
    " क्षमा करण्याची वेळ आता निघून गेली , कारण त्याने फक्त माझाच अपमान नाही केला तर माझ्या पाच पतींचा पण त्याने अपमान केला. मी त्याला जीवदान द्यायचे म्हटलं तरी माझे पती त्याला जीवदान देणार नाहीत.तेव्हा त्याचा मृत्यू अटळ आहे. असेच आता समजा."
     " एवढी कठोर  नको बोलुस सैरंधी ."
    " या पेक्षा कठोर शब्द माझ्या शब्दकोषात नाहीयेत."
    " क्षमाच दया आहे सैरंधी , क्षमाच धर्म आहे, क्षमाच सत्य
आहे , क्षमच यज्ञ आहे, माझ्या बंधुला क्षमा कर सैरंधी."
    " असं आहे तर क्षणभर माझ्या जागी स्वतःला उभे करा
नि मग सांगा हा अपराध क्षमा करण्या योग्य आहे का ? मग
मी त्या राक्षसाला क्षमा करते." त्यावर महाराणी सुदेष्णा
निरुत्तर होते नि काहीच बोलत नाही.परंतु सैरंधी तेथून जाऊ
लागते तशी ती नकळत तिच्या मुखातून स्वर बाहेर पडतात
की , नको सैरंधी ! " परंतु ते ऐकायला सैरंधी थांबली नाही.
तिकडून निघाली ती थेट स्वयंपाक घरात गेली. स्वयंपाक
घरातील सर्व काम उरकून भीमसेन नुकताच जमिनीवर
पडला होता. तेवढ्यात तेथे द्रौपदी पोहोचली. भीमसेनला
झोपलेला पाहून ती म्हणाली ," वा ! पत्नीच्या अब्रूचे धिंधवडे
भर दरबारात काढले जातात. आणि तिचे पती इथं आरामात
विश्राम करताहेत. " तसा भीमसेन उठून उभा राहत म्हणाला,
" मघाशी मोठ्या दादा ने मला रोखले नसते तर भर दरबारात
त्या किचक ला धर्ती नि आसमान एकदम दाखविले असते.
जशी करवत लाकडाला चिरून टाकते तसे मी त्याला उभे
चिरून टाकले असते."
    " तुमच्या मोठ्या बंधूंना रोखण्या पलीकडे दुसरे येतच काय ? त्याना फक्त सारीपाट खेळत असताना आपला हात
आवरता येत नाही बस्स !"
    " तसं नाहीये पांचली."
    " मला काहीही समजविण्याचा आता प्रयत्न करू नका.
मी काहीही ऐकून घेणार नाहीये तुमचे. मला फक्त एवढेच
सांगा माझा अपमान करणाऱ्याला तुम्ही असेच सोडणार
आहेत का ?"
    " माझं ऐकून तर घे."
    " मला काहीही ऐकायचं नाहीये.तुमच्या पत्नीच्या वस्त्रा
पर्यंत ज्या राक्षसाचे हात पोचले तो राक्षस उद्याचा सूर्योदय
पाहता कामा नये जर त्याने उद्याचा सूर्योदय पाहिला तर तुमची ही पत्नी उद्याच सूर्यास्त पाहणार नाही.तेव्हा तुम्हांला
काय मंजूर आहे ते पहा." त्यावर भीमसेन म्हणाला ," पांचली
तू समजत का नाहीयेस ? मी केलेल्या सर्व प्रतिज्ञा माझ्या
लक्षात आहेत. परंतु त्यासाठी अज्ञातवास यशस्वी होणे आवश्यक आहे म्हणून मोठ्या दादा ने पण मला मघाशी रोखले." 
    " मग काय इच्छा आहे आपली की मी उद्याचा सूर्यास्त
नको पाहू ?"
    " ठीक आहे, जर तुझी इच्छा आहे की किचक ने उद्याचा
सूर्योदय पाहू नये. तर तसेच होईल. पण त्या साठी तुला
एक काम करावे लागेल. आणि ते काम म्हणजे  किचक
समोर तू असे जाहीर कर की तू त्याच्यावर फार फिदा आहे
परंतु आपल्या पाच गंधर्व पती ना घाबरतेस. असे सांगून त्याला नृत्य शाळेत घेऊन ये तेथे मी त्याची नि मृत्यू शी
ओळख करून देईन.तेव्हा तू इथून आता जा कारण तुला
माझ्या सोबत इथं कोणी पाहिले ते फार मुश्किल होईल."
असे म्हणून भीमसेन  ने तिच्या ओठावर आलेले रक्त आपल्या हाताने फुसले. त्यानंतर द्रौपदी तेथून निघून गेली.

    क्रमशः








   
   



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..