पोस्ट्स

जानेवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

महाभारत ८३ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत ८३                       महाभारत ८३    महाराज विराट आणि कंक सारीपाटाचा खेळत असतात. कंक ने फासा फेकत म्हटलं ," आठ आणि खरोखरच आठाचाच अंक आला होता. तेव्हा महाराज विराट ने विचारले ," कंक बृहन्नला तर खरोखरच नृत्य आणि गायन मध्ये निपुण आहे."     "  फक्त नृत्य आणि गायन मध्येच निपुण नाहीतर महाराज तो शस्त्रज्ञान मध्ये सुध्दा निपुण आहे." कंक उद्गारला      त्यावर उपहासाने  विराट महाराज हसत म्हणाले ," काही पण सांगू नकोस तू कंक बृहन्नला आणि शस्त्रधारी फासे फेक कंक फासे आ हा हा हा  s s s " त्याना विश्वासच होई ना ! तेवढ्यात तेथे महाराणी सुदेष्णा आल्या तसे कंक ने त्याना आदरपूर्वक वंदन केले. तेव्हा महाराणी सुदेष्णा ने विचारले,     " कंक मी तुला काही प्रश्न विचारते आणि मला खात्री आहे की तू त्या प्रश्नांची उत्तरे अवश्य देशील."     " ठीक आहे, विचारा मी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करेन."     " प्रश्न काही अवघड नाहीयेत फार सोपे आहेत तेव्हा तू त्या प्रश्नाची उत्तरे देशील असे गृहित धरून मी प्रश्न विचारते. असे म्हणून त्या किंचित था

महाभारत ८२ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत ८२                   महाभारत ८२   नकुल सहदेवला भेटायला आला. तसे सहदेव ने आपल्या आजूबाजूला पाहिले जवळपास कोणीही नाही असे पाहून नकुल जवळ येत सहदेव नकुलला म्हणाला ," नकुल मोठ्या दादाने सांगितले आहे की एकमेकांना भेटू नका जेणे करून कोणाला संशय येईल असे वागू नका." त्यावर नकुल म्हणाला, " दादा , काय करू ? तुला भेटून दोन महिने होत आले मला राहावे ना म्हणून तुला भेटायला आलो मी."    " तुला काय वाटतं मला इच्छा होत नाही तुला भेटण्याची ? खूप होते. कारण आपण एकमेकांना पासून कधी दूर राहिलोच नाही. पण काय करणार नाईलाज आहे."      " खरंय तुझं पण तुला माहितेय  एके दिवशी मी महाराजा साठी अश्व घेऊन राजभवन ला गेलो होतो तेव्हा त्यांच्या एका दासा ने मला सांगितले की भोजन करून जा. नवीन स्वयंपाकी खूप रुचकर जेवण बनवितो. आणि का नाही बनवणार तो स्वयंपाकी सम्राट युधिष्ठिरचा स्वयंपाकी आहे. असे म्हणून तो मला स्वयंपाक घरात घेऊन गेला.मला पाहून मजल्या दादाला इतका आनंद झाला की त्याना रडू आले. त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहून त्या दासा ने विचारले ," हे काय बल्लव महाराज

महाभारत ८१ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत ८१                         महाभारत ८१        कुंती विदूरच्या कुटीत राहात असल्यामुळे गांधारी स्वतः तिला भेटायला जाते.त्यावेळी प्रथम इकडच्या तिकडच्या चर्चा सुरू होतात  तेव्हा इतकी वर्षे म्हणजे तब्बल बारा वर्षे कुंती हस्तिनापूरला गांधारी ला भेटायला जात नाही म्हणून गांधारी तिच्या वर फार नाराज असते. ती नाराजी पुढील चर्चेत जाहीर करते. परंतु त्या अगोदर पांडवांचा बारा वर्षाचा वनवास समाप्त झाला नि तेरावे वर्ष म्हणजे अज्ञातवास देखील पूर्ण होऊन पांडव  पुन्हा हस्तिनापूरला येतील आणि आपला राजमुकुट घेऊन इंद्रप्रस्थाला जातील. तेव्हाच मला शांती लाभेल. अशी आशा व्यक्त करत त्या पुढे म्हणाल्या, आणि खरं सांगू मला  त्या दिवसाचा फार अभिमान वाटतो ज्या दिवशी मी आपल्या डोळ्यावर पट्टी बांधली. नाहीतर विष पिऊन मला आत्महत्या करायला लागली असती असे घृणात्मक दुष्कृत्य माझ्या मुलांनी केले. त्या बद्दल मला स्वतःला त्यांची आई म्हणून घ्यायला सुध्दा लाज वाटते."      " जे काही झाले त्यात आपला दोष नव्हता ताई मग आपण का वाईट वाटून घेता ? आणि ज्यांनी हे केले त्याना त्या बद्दल अजिबात खेद नाहीये."

महाभारत ८० | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत ८०                                 महाभारत ८०         सिंधू नरेश तपस्या  करत असतो आणि त्याच वेळी कैलाश पर्वतावर महादेव आपल्या समाधीतून जागे होतात नि आपले डोळे उघडून पाहतात. तेव्हा माता पार्वती त्याना प्रश्न करते की  , आपण फार चिंतेत दिसताय प्रभू ! "     " माझ्या चिंतेचे कारण आहे सिंधू नरेश जयंद्रथ पांडवांवर विजय मिळविण्यासाठी माझी तपस्या करत आहे."    " मग आता तुम्ही काय करणार ? आणि पांडव तर धर्तीवर धर्माचे प्रतिबिंब आहेत.शिवाय ते नारायणच्या छत्र छायेत आहेत."    " जर माझ्या जागी तू असतीस तर काय केलं असतं देवी ?"    " मी त्याला कोणताही वरदान न वापस घालवून दिलं असतं."    " मागणाऱ्याला वापस पाठवायचं नसतं हो ना ? जर माझ्या जवळ कोणी काही मागायला आला तर त्याच्या भक्तीचा मी ऋणी होतो अर्थात  त्याचे ऋण उतारावेच लागेल ना मला . कारण माझ्या कडे मागायला येणाऱ्याना मी खाली हाताने कधी पाठवत नाही."     " मग काय खरंच तुम्ही पांडवांवर विजय मिळविण्याचा वरदान देणार का त्याला ?"      " तीच तर चिंता आहे, मी त्याला

महाभारत ७९ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत ७९                       महाभारत ७९      अर्जुन स्वर्गातून दिव्य अस्त्र प्राप्त करून परतलेला  पाहून सर्व भावंडांना फार आनंद झाला.तेव्हा युधिष्ठिर म्हणाला ,     " तुला माहितेय अर्जुन तू गेल्यापासून आमचं मन कशातच रमत नव्हते. सारखी तुझीच आठवण यायची!"      " माझी ही त्याहून वेगळी अवस्था नव्हती दादा ! मला ही तुमच्या विना तेथे करमत नव्हते."      " पण स्वर्ग दिसायला कसे आहे दादा ?"      " अतिसुंदर ! परंतु तुम्ही सर्व सोबत नसल्यामुळे मजा काही  घेता आली नाही मला.असं वाटायचं की माझं शरीर तेथे आहे परंतु आत्मा इथं आहे."     " दिव्य अस्त्र मिळाले का ?"     " हो मिळाले."     " पाशुपाअस्त्र कसे दिसते दादा ?' नकुल ने विचारले.     " थांब  दाखवतो." असे म्हणून मनात मंत्र म्हणताच पाशुपाअस्त्र प्रगट झाले तसे अर्जुन ने पाशुपाअस्त्र  युधिष्ठिरच्या हातात दिले. युधिष्ठिर ते नीट निरखून पहात म्हणाले ,"  जरा हे शस्त्र चालवून ह्याचा चमत्कार दाखव बरं आम्हां सर्वांना."      " अवश्य मोठ्या दादा !"