Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

महाभारत ४८ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभू.

महाभारत ४८
महाभारत ४८

 


                                   ४८

     पांडव जसे ऋतू बदलण्याची वाट पाहत होते. अगदी
तशी वाट हस्तिनापुर नरेश धृतराष्ट्र ही ऋतू बदलण्याची वाट
पाहत होते. कधी एकदा सूर्योदय होतो नि आपल्या मनातील
साऱ्या आशा- आकांक्षा कधी पूर्णत्वास जातात. असे झालंय
होतं त्यांना. कारण त्यांच्या उच्चकांक्षा मार्गातले सर्व काटे दूर
झाले होते. परंतु ही खुशी कुणा जवळ ते जाहीर करू शकत
नव्हते. म्हणून ते योग्य वेळेची वाट पाहत होते. ते आपल्या
विचारात इतके मग्न झाले की त्याना गांधारी त्यांच्या कक्षेत
आल्याची पण जाणीव झाली नाही. हे गांधारी ने अचूक
जाणवले म्हणूनच की काय त्यांनी आंत प्रवेश करताच विचारले की , आपण कोणत्या विचारात मग्न आहेत एवढे ?"
     " हे तू कसे ओळखलेस की विचार करतोय म्हणून."
     " त्यात काय ? तुम्ही नेहमी माझ्या नुसत्या पावलांच्या
आवाजनेच मला ओळखता परंतु आज नाही ओळखले. त्यावरून समजले मी !"
      " अगदी बरोबर बोललीस तू ."
      " बरं ते जाऊ दे. काय करत होता ते सांगा बरं ."
      " आता आपली मुलं मोठी झाली. अर्थात त्यांच्या लग्ना
व्यतिरिक्त दुसरा कसला विचार करणार म्हणा !"
      "  मग काय करायचं ठरलं ?"
      " त्यात ठरवायचं काय ? पांचाल नरेश द्रुपद ने आपल्या
कन्येचे स्वयंवर मांडले आहे . त्या स्वयंवराचा पण दुर्योधन ने
जिंकला म्हणजे पांचाल नरेश सोबत ही हस्तिनापुर शी मित्रता होईल."
      " जर महादेवची तशी इच्छा असेल तर द्रौपदी हस्तिनापुर ची पुत्र वधू अवश्य होईल." गांधारी उद्गारली.
  
     पांडव भोजन करण्यासाठी बसणारच होते इतक्यात
समोरून काही ब्राम्हण येत असलेले दिसले. म्हणून पांडव
जेवायचे थांबले. ते ब्राम्हण जसे जवळ आले तसे कुंतीने त्याला विचारले की आपण आमचे अतिथी म्हणून भोजन
स्वीकारले तर आमच्या वर फार कृपा होईल आपली ."
       तेव्हा त्यातील एक ब्राम्हण उद्गारला ," मला असं वाटतंय की देवी आपण  आपले सारे जीवन क्षत्रियासोबत घालविले .
म्हणूनच की काय तू ब्राम्हणांची भाषा विसरलीस तू , परंतु
हरकत नाही. आम्ही तुझाकडचे भोजन अवश्य स्वीकारु."
    तसा दुसरा ब्राम्हण उद्गारला ,"  तुम्ही सुद्धा आपल्या पुत्रासह कांफिल्य नगरी मध्ये चाललीय का ?"
      " काय आहे समारंभ कांफिल्य नगरी मध्ये  ?"
     " तुला माहीत नाही...पांचाल नरेश ने आपल्या कन्येचे
स्वयंवर करावयाचे ठरविले आहे."
     " परंतु पांचाल नरेश ला एवढी मोठी पुत्री कुठं आहे ?"
     " आहे ना ? यज्ञातून उत्पन्न झालेली."
     " परंतु पांचाल नरेश ला यज्ञातून पुत्री का उपन्न करावी लागली."
     " त्याला पण एक कारण आहे ?"
     " काय कारण आहे ?"
      " ही कहाणी फार मोठी जेवण जेवून झाल्यानंतर सविस्तर सांगतो." असे तो म्हणाला. त्यानंतर जेवण जेवून
होईपर्यंत कुणीच काही बोलले नाही. जसे जेवण आटोपले.
तशी त्यांनी पांचाल नरेश द्रुपद आणि आचार्य द्रोण यांच्या मैत्री आणि दुश्मनी विषयी माहिती द्यायला सुरुवात केली.
   पांचाल नरेश द्रुपद आणि आचार्य द्रोण एकाच गुरुकुलात
प्रशिक्षण घेतले. त्यावेळी पांचाल नरेश मित्रता या नात्याने
उत्तेजित होऊन स्वतःच आचार्य द्रोण ला वचन दिले की माझे
जे काही आहे त्यातले अर्धा वाटा तुला. तेव्हा आचार्य द्रोण
सुध्दा विसरले की आपण ब्राम्हण आहोत आपल्याला राजपाट घेऊन काय करायचे ? परंतु द्रुपद जेव्हा राजा बनले
तेव्हा त्याना आपल्या मित्राला दिलेल्या वचनाचा विसर पडला. परंतु आचार्य द्रोण मात्र आपल्या मित्राने दिलेले वचन
विसरले ते पोहोचले द्रुपदच्या राज्यात आणि अधिकार पूर्ण
काय मागितली. परंतु द्रुपदला त्या गोष्टी राग आला नि त्याना देण्यास नकार दिला. आचार्य द्रोण त्यावेळी तर
चुपचाप निघून गेले आणि लवकरच त्याना हस्तिनापुर च्या
राजकुमाराना प्रशिक्षण देण्याची संधी प्राप्त झाली.
      आचार्य द्रोण ने त्याना शस्त्रविद्या शिकविली आणि त्यांच्या कडून गुरुदक्षिणा म्हणून पांचाल नरेश ला बंधी
बनवून माझ्या समोर  हजर करण्याचा आदेश दिला. त्यात
गांधारी नंदन अपयशी ठरले परंतु कुंती पुत्रानि पांचाल नरेश ला पराजित करून आचार्य द्रोण जवळ हजर केले. परंतु
आचार्य द्रोण यांनी आपल्या मैत्रीची लाज राखली. त्यांनी
जिंकलेल्या राज्यातील अर्धा वाटा पांचाल नरेश द्रुपदला दिला खरा.  परंतु पांचाल नरेश द्रुपद त्या गोष्टीला आपला अपमान समजून प्रतिशोधच्या अग्नीत तो जळू लागला. मग
प्रतिशोध  घेण्यासाठी उपाय शोधू लागला. तेव्हा मग त्याला
कुणीतरी पुत्रकामेस्टी यज्ञ करण्याचा उपाय सुचविला . कारण असा पुत्र केवळ यज्ञ द्वारा उत्पन्न होऊ शकतो. मग असा यज्ञ करण्यासाठी कुणी ब्राम्हण ऋषी मिळेना. शेवटी शोधता शोधता एक असा ब्राम्हण ऋषी मिळाला. मग त्याने यज्ञ केला. त्या यज्ञातून प्रथम एक पुत्र उत्पन्न झाला नि मग
एक कन्या पण उत्पन्न झाली. पुत्र जो उत्पन्न झाला त्याचे
नाव धृष्टद्युम्न ठेवले नि कन्या प्राप्त झाली याज्ञसेनी तिचे नाव द्रौपदी असे ठेवण्यात आले आणि आज त्याच द्रौपदी चे स्वयंवर होत आहे, जो युवती रुपात  उत्पन्न झाली होती. मला वाटत आपण ही आपल्या पुत्राना घेऊन तेथे जावे. भरपूर दान मिळण्याची शक्यता आहे." भीमसेन उद्गारला.
      " राजकुमारी तर अत्यन्त सूंदर असेल."
      " राजकुमारी खायची वस्तू नाहीये मजले दादा !" त्यावर
सर्वजण खो खो करून हसतात. अर्जुन उद्गारला ," म्हणजे  स्वयंवराला अवश्य जायला हवं." त्यावर एक ब्राम्हण उद्गारला, " असे स्वयंवर ना या आधी कधी झाले ना यानंतर
पुन्हा कधी होणार. साऱ्या भारतवर्षाचे राजे महाराजे स्वयंवराला येणार आहेत. इतकेच नाही तर द्वारका नगरीचे
राजा कृष्ण, बलराम सुध्दा येणार आहेत."
     " मग तर आपल्याला त्यांच्या दर्शनासाठी जायलाच हवं
माताश्री !" युधिष्ठिर उद्गारला.
     " हां अवश्य ! " कुंती उद्गारली.

      

                              दुर्योधन
    द्रुपद राजाचं  आमंत्रण आज सकाळीच आलं होतं. द्रुपद
राजाला साक्षात यज्ञापासून मिळालेली ही अग्निकन्या याज्ञसेनी आहे.तिच्या सर्वांगाला भुईचंपकाच्या फुला सारखा
सुगंध येतो. ती जन्मजातच सुगंधाची कृपी आहे. जशी कर्णाला जन्मजात कुंडलं प्राप्त आहेत. म्हणूनच मी द्रौपदीच्या स्वयंवरासाठी पांचालांच्या राज नगरीला कांपिल्य नगराला जायचे ठरविले.  अर्थात सोबत  कर्णाला सुद्धा घेऊन
जाणार आहे ,  कारण द्रुपद राजाने स्वयंवरासाठी जो पण ठेवला होता. तो फार कठीण होता .  मला तर तो पण
जिंकणे येणे शक्यच नव्हतं . पण हां माझा परम मित्र कर्ण जर माझ्या सोबत असेल तर कोणताही पण जिंकणे त्याला कठीण नाहीये. हे मला चांगले  माहित होते. म्हणूनच मी  त्याला सोबत घ्यायचे  ठरविले.शिवाय माझे बंधू दु:शासन आणि दुर्मर्ष ह्यानाही  बरोबर घेणारच होतो. खरं तर  मी स्वयंवराच्या पणात पांचालीला जिंकून हस्तिनापुराला आणावयाचे आहे मला. जसे  पितामह भीष्मांनी काशी राज्यातून आमच्या महामातेला अर्थात महाराणी अंबिकेला जिंकून आणून आणले होते परंतु स्वतःसाठी नव्हे तर आमच्या पुजनीय पितामह महाराज विचित्रविर्याना त्यांनी अर्पण केली. अगदी तसाच प्रसंग आताही आला होता. अंगराज कर्ण माझ्यासाठी त्या पांचालाच्या सुगंधी याज्ञसेनेला  जिंकून  आणेल याची  मला पूर्ण खात्री होती. जसा पितामह भीष्मांचा जन्म  केवळ करूंच्या कुलासाठी होता ,  तसाच  कर्णाचा जन्म देखील या दुर्योधनासाठी  अर्थात माझ्यासाठी होता !
    कर्ण माझ्यासाठी काय काय करील ? असा जर कोणी
मला  प्रश्न विचारला तर मी त्याला सांगेन की जे कोणी
स्वप्नात ही विचार करणार नाही ते सारे कार्य  कर्ण केवळ माझ्यासाठी करेल याच तिळमात्र शंका नाही. मी उगाच काही
अंगदेशाचा राजा बनविले नाही त्याला. त्या मागचा खरा उद्देश हाच होता. पांडवा विरुद्ध जर शस्त्र वापरायचे झाले तर ते शस्त्र कर्णच असेल . हां आता पांडव राहिलेत नाहीत म्हणा. असते तर कर्णच होताच म्हणा त्यांच्या विरुद्ध लढायला. जाऊ दे. मृत व्यक्ती बद्दल वाईट बोलायचे नसते
असं म्हणतात. परंतु त्यांच्या विषयी मला चांगले बोलतच येत
नाही त्याला काय करावे.
          कर्ण  माझा परम मित्र बनला. अर्थात वेळ प्रसंगी तो माझ्यासाठी आपल्या जीवांचे बलिदान ही करील म्हणा.
     कारण त्याला मी अंगदेशाचा राजाच नाही बनविले तर
    त्याच्या तारुण्यसुलभ कोमल भावना सुध्दा जपल्या.
अर्थात त्याचे प्रेम  वृषालीवर आहे हे जसे मला माहित पडले
तसा मी  त्याचा विवाह  वृषालीशीच लावून दिला होता आणि त्याला त्या सर्वांची जाणीव होती आणि म्हणूनच माझ्यासाठी तो काही दिव्य करील यावर माझा पूर्ण विश्वास होता !
  म्हणूनच मी  याज्ञसेनीच्या स्वयंवराला जाण्याचा निर्णय
घेतला.आता राहिला प्रश्न  स्वयंवरासाठी राजा द्रुपदांनी मांडलेला  पण   जरा अवघड आहे खरा परंतु कर्णा सारख्या
योध्याला काहीच कठीण नाही. याज्ञासेनी कुरूंची महाराणी व्हावी ही माझी मनापासून  इच्छा ! परंतु ती जर कुणी
पूर्णत्वास नेईल तर कर्णच ,कारण  द्रुपदांनी  मांडलेला पण सहजपणं  पूर्ण करू  शकतील असे दोनच धनुर्धर आहेत. एक कर्ण आणि दुसरा अर्जुन. अर्जुन तर या जगात नाहीये.
कदाचित स्वर्गात असेल तो.अप्सरा सोबत मजा मारत. किती
थोर भाग्य लाभले ना त्याला ते पण केवळ माझ्यामुळे ! खरे तर त्यांनी माझे उपकार मानायला हवेत.नाही का ? पण ते नाही मानणार उपकार , कारण ते मला आपला वैरी समजतात ना ? जाऊ दे बरं झालं नाहीये ते. नाहीतर अर्जुन
कर्णाचा प्रतिस्पर्धी ठरला असता नि कुणी सांगावे ? कदाचित
कर्णाला  सुतपुत्र म्हणून स्वयंवररात भाग घेण्यास परवानगी नाकारली असती तर ? छे छे छे ! असं कसं करतील बरं ते आता ! नाही म्हणजे आता माझा प्रिय मित्र अंगदेशाचा राजा आहे. आता त्याना माझा मित्राचा अपमान करता येणार नाही आणि समजा तसे  कुणी करण्याचा जर प्रयत्न केलाच तर मी गप्प बसेन का ? अजिबात नाही. भले मागच्या वेळी आम्हाला त्यांच्या राज्यातून पलायन  करावे लागले होते. परंतु यावेळी तसे होणार नाही. युध्द करून त्या पांचाल नरेश ला चांगलीच अद्दल घडवू यात तिळमात्र शंका नाही.
     असाही एक विचार माझ्या मनात येऊन गेला नि माझं
मलाच हसू आलं. माणसाचे मन किती विचित्र असतं नाही.
म्हणजे जे मन चिंती ते वैरी न  चिंती ! असं म्हणतात ते काही
खोटं नाही. म्हणजे जे घडलंच नाही त्याचा मी आधीच विचार
करून मोकळा झालो.कसं आहे ना ? मन एकदम सुसाट वेगाने पळते. त्याला आवरणे कठीण असतं नाही का ? असो.
अगोदर कर्णाला बोलुवून ह्या विषयी चर्चा करू ,असा विचार
करून मी सेवक प्रभंजन ला पाठवून कर्णाला बोलवून घेतले.
कर्ण आला नि मला विचारू लागला की , आज अवेळी बोलावयाचे कारण ? " त्यावर मी त्याला म्हणालो," वेळ कधीही अवेळ नसते आपण त्याला अवेळ ठरवतो. म्हणून
तो अवेळ ठरतो. वेळ सर्वांनाच सोयीस्कर असते. परंतु अवेळ
सोयीस्कर करून दाखवतो तोच खरा योध्दा ! "
     " बरं ते जाऊ दे. कामाचं बोल. म्हणजे मला कशासाठी
बोलविले ते सांग."
     " तुला तर माहीत असेलच की पांचाल नरेश द्रुपदांनी
आपल्या कन्येचे स्वयंवर मांडले आहे."
    " हां मग ?"
   " मग तुला नाही का असं वाटत  की आपणही त्या स्वयंवराला उपस्थितीत असायला हवं."
  " तिथं माझं काय काम ?"
  " म्हणजे ?"
  " हे बघ. ते स्वयंवर एका राजकुमारीचे आहे, अर्थात तेथे तुझ्या सारख्या राजकुमारांनी जायला हवं. माझ्या सारख्या
एका सुतपुत्राचे तेथे काय काम ?"
    " म्हणजे तू स्वतःला अजून सुतपुत्रच समजतोयस ?"
    " त्यात समजायचे काय ? सुतपुत्र आहेच मी !"
   " म्हणजे माझ्या दोस्तीची काहीच किंमत नाही तुझ्या नजरे
मध्ये ?"
    " तुझी मैत्री मला माझ्या प्राणापेक्षा ही प्रिय आहे. परंतु
जे सत्य आहे ते नाकारून चालणार नाही."
    " बरं. मी काय म्हणतो ते आता ऐक. तुला  स्वतःसाठी
नाही जायचं तर नको जाऊस परंतु माझ्यासाठी तरी चलू शकतोस ना ?"
      " हां तुझ्यासाठी मी अवश्य येईन."
      " बस तर मग तो पण तुला माझ्यासाठी जिंकायचा आहे."
     " म्हणजे ? मी नाही समजलो."
    " पांचाल नरेश ने फार अवघड पण ठेवलाय स्वयंवरासाठी !"
    " असा कोणता पण ठेवलाय त्याने स्वयंवरासाठी ?"
    " ऐक ! " असे म्हणून थोडक्यात त्याने त्याचे वर्णन केले.
ते ऐकल्यानंतर कर्ण उद्गारला ," पण तर खरंच कठीण आहे,
परंतु माझ्यासाठी तो कठीण नाही."
    " कर्णा , मला माहीत आहे , हा एवढा अवघड पण तू आणि अर्जुन यांखेरीज दुसरा कोणीच जिंकू शकणार नाही.
अर्जुन तर आता या जगात नाहीये. आता तूच हा पण जिंकला पाहिजेस."
    " मी ? राजा, मी सुतपुत्र आहे हे तू कसे विसरलास ?
एक क्षत्रियकन्या मला वरमाला घालावयास कधीतरी धजेल
काय ? "
      " कर्णा , तू याज्ञसेनीला पणात जिंक ! तिनं तुला नाकारलं तर मी पाहीन काय करायचं ते. तू स्वतःसाठी नाही तर माझ्याशी हा पण जिंक !"
    " तुझ्यासाठी मी हा पण अवश्य जिंकेन. जसा पितामह भीष्मांनी काशी नरेशच्या कन्या अंबिका आणि अंबालिका
याना  जिंकून तुझ्या पितामहांना अर्थात विचित्रविराना  अर्पण केल्या. तशाच मी देखील याज्ञसेनीला जिंकून तुला अर्पण करीन." असे म्हणताच मी एकदम खुश होऊन कर्णाला मिठीच मारली. त्यानंतर आम्ही संध्याकाळीच पांचाल नगरीला प्रस्थान करायचे ठरविले. त्यानंतर कर्ण उठला नि
धीमी पावलं टाकीत एखाद्या वनराजासारखा माझ्या कक्षेतून
निघून गेला.
    

                          
   मी कर्णासह कांपिल्यनगरला आलो. माझ्यासमवेत दु:शासन, निषंगी,अग्रयायीन,दुर्मिमोचन, विकर्ण,अयोबाहू,विवित्सू ,विकट , क्राथ आणि दण्डधार हे माझे दहा कनिष्ठ बंधू होते. स्वयंवर हा सामोपचाराने
सुटणाऱ्या विधी नसतो. त्यासाठी कधीकधी दोन हात करावे लागतात. त्यासाठीच साहाय्यार्थ म्हणून मी माझ्या बंधूंना समवेत घेतलं होतं . पण माझा सर्वात अधिक विश्वास होता तो कर्णवर.माझे मनोरथ साकार करण्यासाठी या विक्रमी वीराची प्राणाच  मोल देण्याची तयारी होती. त्यासाठी मी त्याला आग्रहाने पांचालांच्या नगरला आलो होतो. करूंचा
वतीने कर्ण मत्स्यभेद करणार होता. आमच्या समवेत अश्वत्थामा सुध्दा आला होता. शिवाय कर्ण पुत्र सुदामही आग्रहाने आला होता.
         आम्ही नगरात प्रवेश केला. तेव्हा  सगळे नगर आपल्या प्रिय युवराज्ञिच्या स्वयंवरानिमित्त नगराजनानी मोठ्या कौशल्याने सुशोभित केलं होतं. जागोजागी गुढ्या तोडणं उभी केली होती. नगरातील सर्व प्रशस्त चौक विविध रंगांच्या अरण्यफुलांच्या मालांनी सजविले होते.ठीकठिकाणी पाण्याची कृत्रिम कारंजी तयार केली होती. सर्व अंगणात ललनांनी  केशर मिश्रित  पाण्याने सडा घालून त्यावर ढंगदार रांगोळ्या चितारल्या होत्या.नगरे, तुताऱ्या आणि मृदंग   त्यांनी वातावरणाचा कणन्कण फुलवून टाकला होता. आम्ही नगरात प्रवेश केला. तेव्हा नगराज आमच्या दर्शनासाठी मार्गाच्या दुहाती उभे राहिले होते . करूंच्या वैभवशाली आणि विक्रमी कुलाचा सहजस्फूर्त जयघोष करीत होते. ते
पाहून मी मन ही मन सुखावलो. सूर्योदयाला घेऊनच पांचालच्या शोभिवंत राजवाड्या जवळ आम्ही आलो स्वयंवराचा भव्य मंडप दृष्टीपथात आला. त्या मंडपाच्या अवतीभवती जनसमुदाय नुसता खच्चून भरला होता.
   " या , कुरुश्रेष्ठ युवराज ! आज नगरजनांच्या उत्सुकतेची
भरतं येण्याची ही दुसरी वेळ आहे. पांचालचे अमात्य विरबाहु
मला रथातून उतरवून घेत म्हणाले. मी एकदम खुश होत विचारले ," अजून कोणाचे असे प्रचंड उत्साहानं स्वागत झालं?"  त्यावर अमात्य उद्गारला ,"  मथुरेहून यादवश्रेष्ठ भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे बंधू बलराम सकाळीच आलेत
ते. त्यांचं स्वागत अशाच किंबहुना याही पेक्षा जास्त उत्साहाने
झाले. मला किंचित शंका आली की श्रीकृष्ण सुध्दा स्वयंवर
जिंकण्यासाठी आला की काय ? छे छे ! मी तर असं ऐकून
आहे की श्रीकृष्ण याज्ञसेनीला आपली बहीण मानतो.असेल
ही कुणी सांगावे ? मनावर आलेले दडपण दूर करत म्हंटल,
अजून कोण कोण आलेत स्वयंवरासाठी ?" त्यावर अमात्य
उद्गारला ," महाराज भोज, सौबल, सहदेव, शल्य,शिशुपाल,
विराट, सुकेतू, चित्रायुध, जरासंध, चेकितान, भगदत्त, आलेत. तसेच भुरिश्रवा,सुषेण ,दृढधन्वा , सोमदत्त, वृषक ,बृहदबल , बृहन्त , मणिमान ,दण्डधार ,मेघसंधी , शंक,सुशर्मा ,शिवाय सेनाबिंदू ,सत्यधृती , सुर्यध्वज ,रोचमान,
सुदक्षिण,रुकमरथ शिबी, श्रीकृष्णपुत्र प्रधृम्न ,सात्थकी , सिंधूअधिपती जयद्रथ , असे अनेक देशाचे वीर राजे महाराजे आले आहेत. आम्ही प्रतीक्षा करत होतो ती एकट्या हस्तिनापुराधिपतींची ! 
    आम्ही स्वयंवर मंडपात आलो. कुणीतरी कंठरवानं ललकारी दिली, " हस्तिनापुराधिपती कौरवश्रेष्ठ , धृतराष्ट्र पुत्र,
युवराज दु s s र्यो s sध s sन ! चंपानगराधिपती ,अंगराज क s s र्ण !
  द्रुपदपुत्र युवराज धृष्टद्युम्न आम्हां सर्वांना समोरा आला. त्यानं माझा हात प्रेमभराने आपल्या हातात घेऊन आम्हांला
आमच्या आसनांकडं न्यावयास सुरुवात केली. सर्व आमंत्रित
राजे आणि योध्दे आदराने उठून उभे राहिले. माझी छाती
अभिमानाने भरून आली. आम्ही सर्वजण आसनस्थ झालो.माझ्या आसनासमोरचे एक आसन तसंच मोकळं होतं.
इतर सगळ्या आसनावर कोणी ना  कोणी बसलं होतं.

     क्रमशः



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..