महाभारत ५२ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाभारत ५२ |
५२
गांधार नरेश शकुनी दुर्योधन ला उपाय सुचविला की
आपल्या वडिलांकडे जाऊन बाळहट्ट कर. असे म्हटल्याक्षणी
लगेच तो तयार ही झाला आणि गेला ही आपल्या बापाला
भेटायला.त्याला स्वतःचं असं काही मतच नाहीये. शकुनी
मामा सांगेल ती पूर्व दिशा ! एका अर्थाने शकुनी मामा बोलला
ते देखील खरेच आहे म्हणा. बाळहट्ट प्रभावी शस्त्र आहे, आई-वडील त्या शस्त्रापुढे शरणांगती पत्करतातच. त्यामुळे
दुर्योधन सुद्धा तेच केलं.गेला महाराज धृतराष्ट्राच्या कक्षेत
नि उद्गारला ," हे काय ऐकतो आहे मी पिताश्री ?"
" ते तूच सांग बरं काय ऐकलेस ते ."
" मी असं ऐकलंय की आपण विदुर काकांना हा आदेश
दिला की कांपिल्याला जाऊन पांडवांना घेऊन यायला सांगितले."
" त्या शिवाय दुसरं काय करू शकतो मी ! जर तुम्ही
लोकांनी लाक्षग्रहा बद्दल मला विचारले असते तर मी तुम्हां
लोकांना मी हेच सांगितले असते की ते करू नका. कारण
शेवटी करून काय फायदा झाला ? आता ते लोक जिवंत
आहेत हे कळल्यावर ही मी स्वस्थ बसलो लोक काय म्हणतील याचा विचार केला आहे का कधी नाही ना ?
मग मी जे करतोय ते मला करू द्या. ? अर्थात ते लोक जिवंत असल्याचे कळल्यावर आनंद व्यक्त करणे माझे प्रथम कर्तव्यच आहे. तू स्वतः त्याना आणायला जाणार नाहीस हे
मला ठाऊक आहे म्हणूनच मी विदूरला पाठवत आहे. कळलं."
" परंतु आपण एवढं त्याना घाबरत कशासाठी ?"
" मी त्याना घाबरत नाही तर जनसुमदायला घाबरतो. नाहीतर माझी सुध्दा तीच इच्छा आहे जी तुझी आहे. माझे
कान तुला हस्तिनापुरचे वाशी हस्तिनापुरचा नरेश म्हणतील
ते ऐकण्यासाठी आतुरले आहेत. महावीर,परमवीर,सर्वश्रेष्ठ गदाधर हस्तिनापुर नरेश दुर्योधन."
" जर आपण असा खरोखर विचार केला असता तर विदूरला संधीचं दिली नसती की त्यानी राजनीतीचे नाटक
करून युधिष्ठिर ला युवराज बनविले नसते."
" विदूरचे नाव आदरपूर्वक घे पुत्र नितीचे ज्ञान जे त्याच्या
जवळ आहे त्यातला अर्धा भाग सुध्दा संपूर्ण संसार मध्ये नसेल. त्याच्याशी जरा जुळवून घ्यायला शीख , कारण तो
कधीही चुकीचे बोलत नाही. त्यामुळे तो काय म्हणतोय ते अगोदर ऐकून घेकून घेत जा आणि मग त्यावर तोड शोधून काढण्याचा प्रयत्न कर. त्याने निराधार आणि असह्य असलेल्या युधिष्ठिरला जर युवराज बनविले. आणि आता तर युधिष्ठिर असह्य सुध्दा नाहीये. पांचाल नरेश आता त्याच्या सोबत आहे, द्वारकेची शक्ती सुध्दा त्याच्या सोबत आहे. म्हणून पांडवांचे स्वागत कर .जर तू माझे ऐकले असतेस आणि बालपणापासून आपल्या मनातील वैर भावना सर्वांपासून लपविली असतीस तर आज परिस्थिती काहीतरी वेगळी असणार होती. आपल्या मनातील भाव लपवून ठेवणे हा राजनीतीचा पहिला अध्याय आहे पुत्र ." त्यावर दुर्योधन उद्गारला ," परंतु मी अपमान सहन करणार नाही. युधिष्ठिर इथं आल्यानंतर युवराजाचे स्थान मला खाली करायला सांगाल तर मी ते कदापि करणार नाही. स्वतः नारायण आला तरी ते मी स्थान त्याला देणार नाही. जर का आपण तसा आदेश दिला तर मी आत्महत्या करीन." त्यावर महाराज धृतराष्ट्र घाबरून उद्गारला ," नाही ! पुत्र नाही असा विचार मनात आणू पण नकोस. तुझा हा नेत्रहीन बाप तेवढा लाचार नाही जेवढा तू समजतोयेस. ज्या सिंहासनावर मी बसलो आहे त्या सिंहासनावर तुझ्या व्यतिरिक्त दुसरा कुणी बसणार नाही. तो तुझा अधिकार आहे आणि तो तुलाच मिळणार. तसं मी तुला वचनही देतो. परंतु हे समज की जीभ सुध्दा घोड्या सारखीच सैरावैरा पळत असते. तेव्हा तिला सुध्दा घोड्या प्रमाणे लगाम घालणे आवश्यक आहे. उत्तम घोडेस्वार त्यालाच म्हटलं जातं जो घोड्याला आपल्या काबू मध्ये ठेवतो. परंतु तो स्वतः घड्याच्या काबू मध्ये मात्र जात नाही. त्याना फक्त एवढेच माहीत आहे की ह्या षडयंत्रात माझा हात नाहीये. पण ते असं ही म्हणू शकतात की मी सुध्दा या षडयंत्रात भागी आहे. म्हणून फार सावधानता बाळगणे जरुरीचे आहे." दुर्योधनाचे जसे समाधान झाले तसा तो तेथून निघून गेला.
कर्ण इथं एकटाच इकडून तिकडे येरझाऱ्या घालत आहे,
तेवढ्यात एक द्वारपाल येऊन उद्गारला ," अंगराज की जय हो." अंगराज कर्ण ने त्याला प्रश्न केला ," काय आहे ?"
" युवराज दुर्योधन आपल्या कडे येत आहेत."
" या वेळी ?" तेवढ्यात दुर्योधन प्रवेश करत बोलला,
" काय विचारतो आहेस मित्र ? मी तर ऐकलं होतं की
भले मी दुसरीकडे कुठंही सापडलो नाही तरी तुझ्या हृदयात नक्की सापडेन."
" हो ,योग्य तेच ऐकले आहेस तू मित्र आणि हे पण ऐकून
ठेव की माझं हृदय तुझ्या राज्याचा एक भाग आहे. जे तू कधी
हरू शकत नाहीस."
" तू जय पराजय विषयी काय बोलू लागला आहेस ?
तुझ्या सारखा मित्र असताना सुईच्या टोका इतका भाग सुध्दा
कुणी जिंकू शकत नाही. परंतु तुझ्या चेहऱ्यावर जो क्रोध दिसतोय तो मला कळत नाहीये मित्र !"
" मी गांधार नरेश शकुनी वर क्रोधीत आहे."
" का ? मामाश्री ने काय केलं ?" दु: शासन ने विचारले.
" त्यांनी आम्हाला पाडवांशी नजर मिळविण्याच्या लायक
सुध्दा ठेवले नाही. लोकांना माहीत पडो अथवा न पडो परंतु
पांडवांना हे जरूर माहीत पडले असणार की वारणावंत मध्ये
त्याना जाळून मारण्याचे कुटील कारस्थान कोणी केले असेल
आणि त्या मध्ये कोण कोण सामील असेल. त्यामुळे त्यांच्या
समोर आपण भ्याड ठरलोय. खरं तर तुझ्या सारख्या
महावीरला हे शोभले नाही. म्हणून मी तुला विचारतोय की
तुला आपल्या गदावर जास्त भरवसा आहे का आपल्या
मामाश्रीच्या षडयंत्रावर ते आधी मला सांग."
" कर्ण तू जे म्हणतोयस ते सारं पटतंय मला परंतु मामाश्री
जेव्हा बोलायला सुरुवात करतात तेव्हा त्यांचे म्हणनेच मला
जास्त योग्य वाटतंय. ही माझी सर्वात मोठी कमजोरी आहे."
तेवढ्यात दु:शासन उद्गारला ," परंतु अगोदर आपल्याला
हा विचार करायला पाहिजे की ते पाचजण आणि छोटी आई
कुंती वाचले कसे ? कारण पाहाऱ्याला ठेवलेला सेनापती
खास मामाश्रींचा विश्वासू माणसांपैकी एक होता."
" निष्ठावंतांना त्यांच्या निष्ठेपासून दूर करणारी रेषा एकदम
बारीक असते तो विकला गेला असेल युधिष्ठिर हातात."
" नाही. मामाश्री विक्रीला जाणाऱ्या लोकांवर कधी
भरवसा करत नाहीत. परंतु दु:शासनचा प्रश्न विचारनिय आहे.
परंतु मला आश्चर्य या गोष्टीचे वाटते की हे मामाश्रीच्या द्यानात
अजून आलं कसं नाही ?" असे म्हणून सर्वजण विचारमग्न
होतात. त्याच क्षणी गांधार नरेश शकुनी आपल्या त्या विश्वासू
सेनापतीला आपल्या कक्षेत बोलविले असते."
" प्रणाम नरेश !"
" ये भक्त मी तुझीच वाट पाहतोय."
" माझ्या लायक काही काम...?"
" आहे ना , त्याचसाठी तर मी तुला बोलविलं आहे."
" आज्ञा व्हावी !"
" तू माझी फार सेवा केली आहेस आणि त्याचसाठी तू
गांधार सोडून इथं राहतो आहेस."
" आपली सेवा करणेच माझे कर्तव्य आहे नरेश जिथं आपण तिथं माझ्यासाठी गांधार आहे."
" परंतु मी आता मी विचार करतोय की तू इथं भरपूर दिवस राहिलास."
" आपली आज्ञा असेल तर मी उद्याच गांधार रवाना होईन."
" उद्या नाही भक्त आज आणि आताच !"
" जशी आपली इच्छा !"
" परंतु गांधारला नाही."
" जशी आपली इच्छा ! "
" लाक्षागृहातून निघालेले ते सात सांगाडे कोणाचे होते
भक्त ?"
" ते पाच पांडव महाराणी कुंती आणि पुरोचन."
" ते पाच पांडव कुंतीसहित कांपिल्या मध्ये जिवंतही आहेत नि स्वास्थ सुध्दा ! तुला माझ्याशी खोटे बोलायला नाही पाहिजे होते. तुला माहिती आहे, राजनीती मध्ये जर खोटं पकडले तर संपूर्ण योजना अयशव्ही होऊ शकते. तेव्हा आता तू सांग. तुला ह्या अपराधाची काय शिक्षा मिळायला पाहिजे ?"
" ह्या अपराधाची एकच शिक्षा आहे आणि ती म्हणजे
मृत्यूदंड! "
" अगदी बरोबर बोललास. दासी sss असे म्हणताच एक
दासी एका जामात दूध घेऊन येते. त्यात गांधार नरेश शकुनी आपल्या बोटातील अंगुटी मधले विष त्या दुधा मध्ये टाकून
त्या भक्तांकडे देत म्हटलं ," हे घे आणि पी पट्कन. " असे म्हणताच त्या भक्ताने गांधार कुमार शकुनी च्या आदेशाचे पालन केले. एका झटक्यात विषाचा प्याला तोंडाला लावला." तसा गांधार नरेश शकुनी पुढे उद्गारला ," जर तू
मला प्रिय नसतास तर मी तुला इतकी सोपी शिक्षा दिली नसती. विचार करतोय की तुला हा दिलेला सोपा मृत्यू म्हणजे तू आतापर्यंत केलेल्या स्वामी निष्ठेचे हे बक्षीस आहे
माझ्याकडून. आणि हां तू यमलोकांत गेल्यावर जर तुला
माझे वडील भेटले तर त्याना सांगायचे की हस्तिनापुर ने
माझ्या प्रिय बहिणीचे लग्न एका नेत्रहीन धृतराष्ट्राशी करून जो गांधार देशचा जो अपमान केला. त्याची परफेड केल्याशिवाय मी स्वस्थ राहणार नाहीये. आता यम लोकांकडे
प्रस्थान कर भक्त." भक्ताला अंगात विष भिंनल्यामुळे चक्कर
येत असते त्याचा तोल ही जात असतो म्हणून तो गांधार
नरेश ला बोलला," नरेश मी जरा खाली बसू शकतो का ?"
" अवश्य बैस तो तुझा अधिकार आहे त्यामुळे तुझ्या कोणत्याही अधिकार पासून तुला मी वंचित ठेवून मी तुझ्या
ऋणात राहू इच्छित नाही. तो अधिकार फक्त युधिष्ठिर ला
मिळणार नाहीये." भक्त खाली बसला नि थोड्याच वेळात
जमिनीवर कोसळला. थोड्यावेळ तडपला नि शांत झाला.
" तर आपणे काय निर्णय घेतला आहे युधिष्ठिर ? "
" मी युध्द करू इच्छित नाहीये वासुदेव ."
" तर मी कुठं सांगतोय तुला युध्द कर म्हणून. माझं म्हणणं फक्त इतकेच आहे की तुम्ही लोक जिवंत आहात हे आता त्या लोकांना माहीत पडले आहे. तर तुम्ही सुध्दा त्यांच्या कडे आपला अधिकार मागा. आपला अधिकार मागणे हे प्रत्येक माणसाचे कर्तव्यच आहे जर आपण लोकांनी असं केलं तर एक अजून संकट येऊ शकते. आणि ते म्हणजे दुर्योधन म्हणू शकतो की तुम्ही लोक वेळेवर न आल्यामुळे तुम्ही तुमचा अधिकार घालवून बसलात."
" परंतु दुर्योधन वीर पुरुष तो असं का करेल बरं ?"
" निहित स्वार्थासाठी दाउ निहित स्वार्थ !"
" वसुदेवाचे म्हणणे एकदम योग्य आहे युधिष्ठिर. राजमुकुट वस्तूही अशी आहे की जिथे द्रोणाचार्या सारखे
आचार्य सुध्दा स्वतःची आत्मशक्ती हरवून बसतात. परंतु तुमचा तो अधिकार आहे आणि त्यासाठी आपल्या लोकांना
फक्त पांचालचे सैन्य नाहीतर त्यांच्या मित्रांचे सैन्य सुद्धा
आपल्या मदतीला तुम्ही सांगाल तेव्हा हजर होईल. "
" नाही पांचाल नरेश नाही. अधिकार मागण्यांसाठी
सैन्या पेक्षा आत्मविश्वासाची गरज आहे. सैन्य घेऊन गेले तर
उद्या लोक म्हणतील की युधिष्ठिर आपल्या काकावर आक्रमण केले. म्हणून त्याना स्वतःच्या संरक्षणासाठी युद्धात
उतरणे भाग पडले. म्हणून तसे न करता आपण नम्रपणे
आपला अधिकार मागून पहा. सत्य तुमच्या गाठीशी आहे,
शिवाय तुमची न्यायाची बाजू आहे अर्थात विजय तुमचाच होईल. म्हणून युद्धात उतरायचेच झाले तर प्रथम त्याना
उतरू दे . आपण त्याना प्रतिकार अवश्य करायचा .परंतु उद्या
तुमच्यावर कोणीही असा आरोप करणार नाही की पांडवाणी अगोदर आक्रमण केले म्हणून."
" परंतु युद्धनीती हे नाही सांगत की अगोदर आक्रमण
कोणी करायला हवे ?" धृष्टद्युम्न उद्गारला.
" खरं आहे परंतु मी युद्धाची गोष्टच करत नाहीये.मी
शांतीची गोष्ट करत आहे युवराज."
" जर आपण युवराजच्या स्थानी असता आणि आपल्या
चारही भावंडांना त्यांच्या मातोश्रीसह लाक्षग्रहात जाळून
मारण्याचे षडयंत्र केले असते तर आपण काय केले असते ?"
" तू माझ्याशी भावंडा विषयी बोलतो आहेस. तुला महिततेय काय माझी चार नव्हे सहा भावंडांना ठार मारण्यात
आले. माझ्या माता -पित्याना त्याने एका अंधार कोडडीत
कित्येक वर्षे त्याना माझ्या मामाने कैद करून ठेवले होते.
पण तरी देखील मी आधी त्याच्यावर आक्रमण केले नाही.
जेव्हा त्यांनी स्वतः मला बोलवून घेतले तेव्हा मी नांदगाव सोडून मथुरेला आलो."
" मग काय इथं बसून त्यांच्या आमंत्रण पत्राची वाट पाहत
बसायचे काय ?" भीम उद्गारला.
" मग तुम्हीच सांगा काय करावयाचे ते."
" सर्वात आधी मी दुर्योधन ला पकडून त्याला आपटुन
आपटून मारणार."
" हा मजला कुंती आत्येचा पुत्र युध्दा शिवाय दुसरं काही
बोलतच नाही." बलराम उद्गारला. तेवढ्यात द्वारपाल येऊन
बोलला की महाराज की जय हो. हस्तिनापुरच्या महाराज
धृतराष्ट्राचे दूत बनून स्वतः विदुर आले आहेत आणि ते आपल्याला भेटण्याची परवानगी मागत आहेत." तसे पांचाल
नरेश द्रुपद आपल्या पुत्रांस आदेश देतात की पुत्र जा आणि
महामंत्री विदुर ना आपल्या विशेष अतिथीगृहात थांबवून
त्यांना सांग की अगोदर आपल्या प्रवासातून आलेले थकवा
घालवावा. उद्या दरबारात भेट घेतली जाईल त्यांची !"
" जशी आपली आज्ञा पिताश्री !"
" विदुर येणार आहेत हे तुम्हाला माहीत होते का ?"
" हे तर आपल्याला ही माहीत असायला हवे की हस्तिनापुर नरेश धृतराष्ट्रा समोर दुसरा काही पर्यायच नव्हता. खरं तर दुर्योधन ला पाठविणार होते परंतु त्याचा जवळ फक्त अभिमान जास्त प्रमाणात आहे. म्हणून तो येऊ
शकणार नाही." श्रीकृष्ण उद्गारला.
" जर आपल्या सर्वांची परवानगी असेल तर मी काकाश्री
ना भेटू शकतो काय ?"
" नाही. युवराज आज ते तुमचे काकाश्री नाहीत. आज तर ते हस्तिनापुर नरेशचे दूत आहेत. म्हणून त्याना आज
भेटणे योग्य नाही. त्याना भेटावायचे झाल्यास सर्वांसमोर
भेटायला जाणेच योग्य होईल. " श्रीकृष्ण उद्गारला ," कारण
त्यांनी काय सनाचार आणलाय हस्तिनापुरहून आणि त्यांनी
विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही काय दिलीत ?
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा