Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

महाभारत ५१ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

महाभारत ५१
महाभारत ५१

 


                           ५१

           " अर्जुन ..... परंतु  तो तर आपल्या पासही बंधू सोबत ..  . ?
     " बातमी ही आहे महाराज की आपल्या प्रिय पांडु पुत्र
जीवित आहे."
     " काय ? तू तर मोठी आनंदाची बातमी आणली आहेस
आता मी आपल्या पूर्वजांना तोंड दाखवायला लाजावे लागणार नाही.त्यामुळे माझ्या मनाला पडलेला प्रश्न दूर झाला. "
     " आपल्या पूर्वजा समोर लाजायचं कारणच नाही मुळी ,
कारण लाक्षग्रहाच्या कारस्थानात आपला हातच नाही मुळी !
परंतु जनसमुदाय च्या मुखातूनही विधात्याहीच बोलत असतो
अर्थात जनसमुदाय चे म्हणणे आहे की आपल्याला षडयंत्रा
विषयी माहिती जरूर असणार म्हणून आपल्या चेहऱ्यावर
लाक्षग्रहाची राख फासली गेली आहे आणि म्हणूनच ती राख
पुसून काढण्याची आपल्याला एक सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे अर्थात त्या संधी फायदा आपण जरूर उचलावा. "
     " त्यासाठी मला काय करायला हवं ?"
     " त्यासाठी आपल्याला एकच काम करायचं आणि ते काम म्हणजे कुण्या दूताला कांपिल्या नगरीला पाठवून त्या
दूताच्या मार्फत त्याना संदेश द्या की तुम्ही लोक जिवंत ऐकून
मला फार अत्यानंद झालाय. तेव्हा पुत्रवधू सहित आपण
सर्वांनी हस्तिनापुरला यावे ,कारण तुम्हां लोकांना भेटण्याची
आणि पुत्रवधूला आशीर्वाद देण्याची मला इतकी उत्सुकता आहे की त्याची तुम्ही लोक कल्पना देखील करणार नाही.
म्हणून तुम्ही सर्वांनी ताबडतोब हस्तिनापुर ला निघून यावे."
     " अरे वा फारच छान उपाय सुचविलास तू विदुर परंतु
त्या लोकाना विश्वास होईल ना माझ्या या वक्तव्यावर.त्या
सर्वांना विश्वास तर होईल ना की लाक्षग्रहाच्या षडयंत्रात
माझा काहीच सहभाग नाहीये."
      " दुसऱ्या कोणाला जरी विश्वास झाला नाही तरी युधिष्ठिर ला अवश्य होईल आणि बाकीच्या भाऊ त्याच्या आज्ञाच्या
बाहेर नाहीत म्हणून बाकीच्या ची आपण चिंता अजिबात  करू नका."
     " तर मग तू वाट कोणाची पाहतोहेस ? ताबडतोब कुण्या
दूताला पाठवुन कुलवधू कुंती आणि पांडवाना संदेश दर की
त्याना भेटण्यासाठी माझे मन फार आतुरले आहे , म्हणून त्यानी वेळ न दडविता ताबडतोब निघून  यावे.......आणि खरं
सांगू विदुर तुझा हा अभागी भाऊ एवढा दुःखी होता की त्याला अन्नपाणी ही गोड लागत नव्हतं परंतु आज इतका आनंदित झाला आहे की त्याचे मी शब्दात वर्णन करू शकत
नाही. म्हणून तू वेळ वाया न घालविता ताबडतोब कांपिल्या
नगरीला दूत पाठविण्याची व्यवस्था कर जा लवकर."
     तेव्हा विदुर बोलला ,"  अवश्य महाराज ! मी आताच दूत पाठविण्याची व्यवस्था करतो." असे म्हणून विदूर त्यांच्या कक्षेतून बाहेर पडतो नि तसाच आपल्या तातश्रींच्या कक्षेच्या
दिशेने निघाला. जेव्हा तो तेथे पोहोचला. तेव्हा तिने पाहिले
की गंगापुत्र भीष्म आपल्या बाणांच्या टोकांना धार लावत
असतात. त्याना त्या अवस्थेत पाहून विदुर किंचित गोंधळून
जातो. परंतु वास्तविकता जाणून घेण्याच्या निमित्ताने विदूरने
त्यांचे लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी उद्गारला ,' प्रणाम तातश्री !" लगेच त्यांनी विदूरला आशीर्वाद दिला की, आयुष्यमान भव ! ये विदुर बैस जरा. परंतु तू आता आलास
कुठून ?" विदुर उद्गारला , " मी महाराज्यांच्या कक्षेत गेलो
होतो. परंतु आपण यावेळी हे काय करत आहात म्हणजे
बाणांना धार लावायचे काय कारण ?"
     " धनुर्धर ला आपल्या बाणांच्या धारीवर लक्ष घ्यायलाच
पाहिजे. कारण कुणास ठाऊक ह्या बाणांची कधीही गरज
पडू शकते ,कारण हे बाण सुध्दा माझ्या प्रमाणे हस्तिनापुर च्या राज सिहांसन शी बांधील आहेत."
    " आपण एवढं निराश का आहेत तातश्री ?"
     " हे निराशाचेच युग आहे विदुर निराशाचे. जी जीवन
मूल्य आमच्या सामाजिक जीवनाची आधारशीला होती ती
वाळूच्या घरा प्रमाणे एक एक तुटायला लागलीत. आणि आम्ही त्यांची रक्षा करू शकलो नाहीत. हस्तिनापुर चे सिंहासन आज ज्वालामुखीच्या तोंडावर ठेवले आहे. कुणास
ठाऊक ? कधी सुध्दा भडका उडू शकतो. जर आपण लोकांनी ह्या स्फोटला होण्यापासून  रोखू शकलो नाही तर
काहीच शिल्लक राहणार नाही विदुर . नाही हे जीवन नाही जीवनाची मूल्ये ! आणि आता असं वाटू लागलंय की आपला
समाज सुधार की सारी सीमा पार करून झाला आहे. अर्थात
हे तुटणार  आणि तुटलेल्या पडक्या  घरातूनच एक नव्या
युगाची स्थापना होणार. आणि तुला खरं सांगू पिताश्रीचे
इच्छा मृत्यूचे वरदान माझ्यासाठी शाप ठरले विदुर शाप ठरले.
मी माता सत्यवती सोबत वनात जाऊ इच्छित होतो. पंरतु
जाऊ शकलो नाही. उलट सत्यवती मातेने जाता जाता आपल्या दुःखांचा बोजा माझ्या खांद्यावर टाकून गेली."
     " परंतु तातश्री .....
     " मला बातमी मिळाली आहे विदुर की धृतराष्ट्र तुला
कांपिल्या नगर ला पाठवत आहे आणि म्हणूनच मी बाणांचा
भाता खाली काढला."
      " तातश्री sss
      " तू हा नाही विचार केलास का ? की एका राज्यात दोन
युवराज असू शकत नाहीत ."
      " याचा अवश्य विचार केला आहे मी परंतु मी हा सुद्धा
विचार केला आहे की महाराजांची काही इच्छा असू दे ,परंतु
जनसमुदाय पुढे महाराज हतबल आहेत , कारण जनसमुदाय
युधिष्ठिर च्या बाजूला आहे."
     " पोरकटक्स वाणी बोलू नकोस विदुर. धृतराष्ट्र पुत्र मोहाने
फार आंधळा झालाय. त्याने माझा हात पकडण्या ऐवजी
गांधार कुमार शकुणीचा बोट पकडून तो स्वतःला जास्त सुरक्षित समजतोय."
    " मग काय आपली इच्छा आहे ? पांडवांना इथं बोलवायचं
नाही का ?"
    " नाही. परिस्थितीच अशी निर्माण झाली आहे की त्यातून
काही ना काही मार्ग काढला नाही तर  नदीला आलेल्या पूरात आपण सारेच वाहून जाऊ ! तेव्हा उपाय हा शोधवाच
लागणार आहे."
      " अशी परिस्थिती निर्माण व्हायला आपणच कारणीभूत
नाही आहोत का ?"
    " खरंय तुझं. परंतु जे काही होतं ते आपल्या मागील चुका
मुळेच होते. वर्तमान कधी भाग्यातून जन्मला येत नाही तर
आपल्या भूतकाळातून जन्माला येते. अर्थात हस्तिनापुर चे
भूतकाळ मी आहे."
     " मग माझ्यासाठी काय आदेश आहे तातश्री ?"
     " कांपिल्या नगरी मध्ये जाऊन पांडवांना घेऊन ये. परंतु
युधिष्ठिर जरा समजावून सांग की झाल्या गोष्टीला आता पर्याय नाहीये म्हणावे." त्यावर विदुर काहीच बोलला नाही
चुपचाप तेथून निघून गेला. त्यावेळी दुर्योधन आपल्या मित्रांसह आणि बंधू दु:शासन सोबत थट्टा मस्करी सुरू होती.
तेवढ्यात तेथे गांधार नरेश शकुनी चे आगमन होते. आपल्या
भाच्याला थट्टा मस्करी करण्यात दंग असलेला पाहून भयंकर
चिडून म्हणाला ," दुर्योधन तुझ्या सारखा मूर्ख माणूस दुसरा
कुणी नसेल." तसा दुर्योधन नाराज होत म्हणाला," आता मी
काय केलं मामाश्री "
     " अरे वत्स जो मनुष्य रडण्याच्या वेळी हसतो त्याला
मुर्खच म्हणावे लागेल , अंगराज कर्ण, राजकुमार दु:शासन
ह्यांचे काही बिघडणार नाहीये , कारण दु:शासन तर राजकुमार राहणारच. कर्ण कडून ते अंगदेश घेणार नाहीत."
      " ते कोण मामाश्री ?"
      " पांडव अंगराज कर्ण  पांडव !"
     " पांडव परंतु मामाश्री ते तर .....दु:शासन पूर्ण वक्तव्य
करण्या अगोदरच गांधार नरेश शकुनी उद्गारला," ते सर्व जिवंतही आहेत आणि सुरक्षितही ! आणि तुझे वडील ही
बातमी ऐकून अतिशय आनंदित  झाले शिवाय द्रौपदी स्वयंवर
त्यांच्या धाकट्या भावाच्या पुत्रांने म्हणजे अर्जुन ने जिंकले."
     " अर्जुन ! " कर्ण उद्गारला.
     " हां अर्जुन तोच अर्जुन ज्याच्या बंधूंवर तू आक्रमक
करायला सांगत होतास अंगराज ."
     " ते वाचले तर भले वाचू दे. ते आता माझं काय बिघडवणार आहेत. मी तर हस्तिनापुरचा युवराज बनलो."
     " तरी पुन्हा तेच. अरे पुत्र तू आपल्या बापाला अजूनपर्यंत
नाही ओळखलेस ते विदूरच्या नीती पुढे नि तुझ्या पिताम्हभीष्मांच्या बनावती निष्ट्ये पुढे एक क्षणभर पण  ठिकणार नाहीत. म्हणून ही वेळ हसण्याची नाहीये. तर
विचार करण्याची आहे."
     " हयात काय विचार करायचा ?" कर्णा ने उलट प्रश्न केला.
     " ज्यांना विचार करण्याचा कंटाळा येत तेच फसतात. तुम्हां लोकांना माहितेय माझ्या मेहुण्याने विदूरला आदेश
दिला सुध्दा की पांडूपुत्राना पुत्रवधू सहित हस्तिनापुर घेऊन
यायला सांगितले. कारण ते स्वतः माझ्या प्रिय बहीणी सोबत
त्याना आशीर्वाद सहित हस्तिनापुर चा राजमुकुट सुध्दा देऊन
टाकू इच्छित आहेत."
    " अशक्य ! मी जिवंत असेपर्यंत तरी मी तो राजमुकुट
त्याना घेऊ देणार नाहीये." दुर्योधन तावातावाने उद्गारला.
     " तू इथं बसून फक्त गप्पा मारत बसलास तर सर्वकाही
होईल आणि तुला माहीत देखील पडणार नाहीये."
      " मी जरा बोलू ." कर्ण ने विचारले.
      " मला माहित आहे तू काय बोलशील ते."
      " आणि मलाही माहीत आहे तुम्ही काय बोलाल ते."
कर्ण चिडून बोलला ," मी फक्त एवढंच सांगू इच्छितोय की
आम्हाला शत्रू प्रमाणे त्यांच्यावर आक्रमण करून त्याना
तेथेच ठार मारायला हवे."
     " ते लोक काय गाजर मुळ्या आहेत की काय जे जाऊन
कापाल आणि तसं पण द्रौपदी स्वयंवर मध्ये आम्हीं पाहिलंच
की एकाने तुझे धनुष्य तोडून टाकले आणि तू त्याला प्रणाम
करून आलास."
     " तेव्हा मी तयार नव्हतो मामाश्री ! आणि एका साधारण
ब्राम्हणाशी काय युद्ध करणार , आपण दुर्योधन सोबत इथंच
थांबा. मी एकटा जातो त्याना रोखायला."
     " बैस अंगराज बैस ! आणि मला विचार करू दे जरा."
     " मी अयशस्वी झाल्याची मला आठवण करून देण्या
अगोदर हा विचार अवश्य करायला हवा होता की पांडवांच्या
बालपणापासून आजपर्यंत असफल होत आलेत. आठवण
करून देतो. ऐका. भीमाला खिरीत विष चारून ठार मारण्याचा प्रयत्न केला. काय झालं त्याचं ? तो अजून बलवान होऊन परतला. आपण कट कारस्थान करून युधिष्ठिर ला युवराज होऊ न देण्याचा प्रयत्न केला. काय झालं त्याचं ...युधिष्ठिर युवराज बनला. आपण त्यांना लाक्षग्रहात जाळून ठार मारण्याचा प्रयत्न केला. काय झालं
त्याचं ? त्याना द्रुपद सारख्या शक्तिशाली साथ मिळाली.
म्हणून माझं म्हणणं असं आहे की , परिस्थिती नुसार  सामना
करायला पाहिजे. युध्दात हरणारा योध्दा जिंकणाऱ्या योध्दा पेक्षा कमी शूर नसतो. भ्याड हरत नाहीत तर पळ मारतात.
कारण युद्धात कोणाची ना कोणाची हार निश्चितच असते.
आणि जो आज युद्धात हरला तो उद्या जिंकणार नाही असे ही नाहीये."
    " मी तुम्हां लोकांची परीक्षा घेऊ इच्छित नाही."
     "  मामाश्री सुर्यदेवाची शपथ हे वक्तव्य तुमच्या व्यतिरिक्त
जर दुसऱ्या कोणी म्हटलं असते तर त्याची जीभ कापून त्याच्या हातावर ठेवली असती. परंतु....?
     " हां जर हे परंतु आहे तर उभा का आहेस बसून घे अंगराज आणि मोठ्या कडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न कर. आणि ही गोष्ट आपल्या डोक्यातून काढून टाक की
गांधार नरेश शकुनी भ्याड आहे. माझ्या जवळ भले दिव्यशक्ती बाण नाहीयेत.परंतु मला युध्द करण्याची कल्पना
चांगल्या प्रकारे येते."
      " मामाश्री मी आपल्या प्रिय मित्राच्या वतीने आपली माफी मागतो."
      " तर मग ह्याला सांग. बसून घे आणि मी जे सांगतो ते
ऐकून घे."
      " मित्र कर्ण हा माझ्या भविष्याचा प्रश्न आहे कृपा करून
बसून घे." कर्ण ने गांधार नरेश शकुनी ची माफी मागितली.
     " क्षमा मागतो मामाश्री ! सांगा अश्या परिस्थिती मध्ये काय करायला हवं."
     " परिस्थिती गंभीर आहे. हां , द्रौपदीला पाशा बनवून
त्या पांचा मध्ये फूट घाला."
     " मामाश्री ,एवढं तर तुम्हाला सुध्दा माहीत आहे की
त्यांच्यात फूट पाडणे अशक्य आहे,कारण त्या पांचा मध्ये
एकच आत्मा आहे. ते आपसात कधीच भांडणार नाहीत.
मग त्या पांचा मध्ये द्रौपदी सारखी सूंदर स्त्री असली तरीही !"
      " तर मग द्रुपद कडून चांगलेच धन प्राप्त करता येईल."
      " जावई सोडून ते आम्हाला कशाला देतील हिरेमाणके
मामाश्री तुम्ही पण ना .....?
     " कदाचित हा प्रयत्न आपल्याला महागात पण पडू शकतो." कर्ण उद्गारला.
    " ते कसं ?"
     " ते असं मामाश्री पांचाल नरेश द्रुपद मिळविण्याच्या नादात आपण द्रोणाचार्याना गमावून बसू कायमचे, कारण
ज्याने द्रोणला मारण्यासाठी यज्ञातून पुत्र प्राप्त करून घेतला.
तो जर आपल्या शिबिरात आला तर गुरू द्रोण त्याच्या सोबत
कसे बरे राहू शकतील ? शिवाय त्याच्या बद्दल माझ्या मनात
चांगले मत नाहीये.परंतु द्रुपद  मिळविण्यासाठी मी आचार्य
द्रोणाचार्यांचा मी त्याग करू शकत नाही , कारण द्रुपद च्या
सैन्यासाठी जर एकटा अर्जुन पुरेसा आहे तर आमच्या सैन्यासाठी द्रोणाचार्य आवश्यक आहे. आपण काही म्हणा
मामाश्री ! परंतु युध्द अवश्य होणार. यात तिळमात्र शंका नाहीये."
    " मग तर एकच उपाय आहे, आणि तो म्हणजे दुर्योधन
तुला बाळहट्ट करावा लागेल आपल्या पिताश्री जवळ."

     क्रमशः



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..