Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

महाभारत ५५ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

महाभारत ५५
महाभारत ५५

 



                    महाभारत ५५

       कुंती आपल्या पुत्रासह द्रौपदी ला घेऊन महाराज
धृतराष्ट्राच्या कक्षेत जातात तेव्हा दुर्योधन पत्नी भानुमती
तेथे गांधारी सोबत उपस्थित होती. ती आपल्या सासूबाईला
अर्थात गांधारीला छोटी आई अर्थात कुंतीच्या आगमनाची सूचना देत म्हणाली ," आई, छोटी आई आपणास भेटायवास
आल्या आहेत." तश्या गांधारी उठून उभ्या राहतात.कुंती
त्यांच्या जवळ आली तशी उद्गारली ," प्रणाम ताई !"
    " प्रणाम मोठ्या आई !"
    " सुनबाई , आपल्या छोट्या आईला नि थोरल्या जाऊबाई
चे स्वागत कर बरं."
     " आपल्याच घरात स्वागत करायची काय गरज आहे ताई !"
    " गरज आहे तर !  तुला माहितेय वारणावंतच्या दुर्घटना नंतर मला असं वाटत होतं की सारे हस्तिनापुर  उजाड पडले
नि हस्तिनापुर ची सारी खुशीच निघून गेली. परंतु आता असं वाटू लागलंय की गेलेली खुशी वापस परतून आली. अर्थात
ह्या या खुशी अभिनंदन करायलाच हवे कुंती !"
     " जशी आपली मर्जी !"
    " तू नव्हतीस तर दुर्योधनच्या विवाहाच्या वेळी माझं मन एकदम उदास झालं होतं असं वाटायचं की कोणत्याही समारंभात भाग घेऊ नये. परंतु न करून सांगते कुणाला ?
ज्या गोष्टी आपण दोघीनी मिळून केल्या असत्या त्या मला
एकटीला कराव्या लागल्या. त्यामुळे क्षणोक्षणी तुझी आठवण
येत होती मला. असं वाटायचं की  तू असतीस तर मला काहीच करावे लागले नसते. फक्त असे जाणवत राहिले असते की तुझ्या रुपात मी वावरते आहे. परंतु हे काहीच लाभले नाही. बरं जाऊ दे ते. मी तुला तुझ्या पुत्रवधूची ओळख करून देते. ही तुझी पुत्रवधू काशीची राजकुमारी !"
असे म्हणताच भानुमती ने प्रथम आरतीने ओवाळले नि नंतर चरणस्पर्श केले. कुंती ने तिला आशीर्वाद देत म्हंटले ," सुखी
रहो. पुत्रवती भव !" त्यानंतर कुंतीने द्रौपदी ची गांधारी शी ओळख करून देत उद्गारली ," ताई , ही द्रौपदी तुझी पुत्रवधू !"
       द्रौपदी ने खाली वाकून गांधारीचे  चरणस्पर्श केले. तसा
त्यांनी तिला आशीर्वाद देत म्हटलं की , सौभाग्यवती भव !
पुत्रवती भव !" त्यानंतर महाराज धृतराष्ट्रा चे चरणस्पर्श केले असता त्यांनी सुध्दा आशीर्वाद देत म्हटलं की , सौभाग्यवती
भव ! नेत्रहीनाचे दुःख मला सदैव राहील. जर मला डोळे असते तर मी तुला माझ्या वतीने तर पहिलंच असतं परंतु
माझ्या धाकट्या भावाच्या वतीने सुध्दा पाहिलं असतं नि
आशीर्वाद ही दिला असता. परंतु तुझ्या शुभ आगमना मुळे
मला माझे अनुज पांडू पुत्र वापस मिळाले. म्हणून मी तुझा
ऋणी ही आणि आभारी सुध्दा ! परंतु माझे अनुज पांडू पुत्र आहेत कुठं ? जर मी त्याना पाहू शकलो असतो तर मी स्वतः
जाऊन त्याना घेऊन आलो असतो." तसा युधिष्ठिर पुढे होतो नि त्यांचे चरणस्पर्श करत उद्गारला ," आम्ही तर आपल्या
चारणापाशी आहोत तातश्री !" असे म्हणून पाय पडतो.
तेव्हा ते आशीर्वाद देत म्हणाले ," चक्रवर्ती भव ! " किंचित थांबून पुढे म्हणाले ," माझ्या मनाची काय दशा झाली आहे
हे तू ओळखू शकतोस. परंतु मी तुम्हां लोकांची क्षमा मागत
आहे. शक्य असेल तर मला क्षमा करा."
     " हे आपण काय बोलत आहात जेष्ठ पिताश्री ! दुर्घटना
तर आपल्या जीवनाचा भाग आहे त्याला आपण दोषी कसे
बरे होऊ शकता ?"
      " आपण मला ह्यांना भेटण्याची संधी द्याल का नाही आर्यपूत्र ?"
     " नेत्रहीन व्यक्ती मध्ये सर्वांत मोठा दोष हाच आहे गांधारी
जर त्याने कुण्या व्यक्तीला किंवा वस्तूला एकदा पकडलं की
तो सोडत नाही. का माहितेय ? नाही माहीत ना ? मी सांगतो.
त्याला कारण एकच आहे आणि ते म्हणजे एकदा का आपल्या हातातून ती वस्तू सुटली तर पुन्हा मिळेल किंवा
नाही याची शाश्वती नसते म्हणून. परंतु नेत्र असलेल्या लोकांचे तसे नाहीये. त्याना दोघां मधील अंतर मोजता येते. परंतु आमच्या सारखे नेत्रहीन लोकांची वास्तविकता हीच आहे की जे हातात आहे ते सोडू नका.नाहीतर बसाल रिकामी  हात हलवत." असे म्हणून द्रौपदी ला जा सुनबाई
आपल्या मोठ्या आई पाशी !"
       गांधारी उद्गारली ," कुंती तू जरा आपल्या पुत्रवधू चे वर्णन कर. " त्यावर कुंती उद्गारली ," रंग अग्नी सारखा आहे."
    " अरे वा छान !"
    " डोळे मोठे कमळ सारखे !"
    " कुंती तू पुत्रवधू आणलीस का पुजाचे ताट. " असे म्हणून
किंचित थांबून पुढे म्हणाली ," ईश्वर जवळ मी प्रार्थना करते की तुझ्या हिस्सा ला येणारी सर्व दुःख माझ्या पदरात टाक नि
माझ्या हिस्साला येणारी सर्व सुखें तुझ्या पदरात टाक."
     " मग आपल्या कडे काहीच राहणार नाहीये." श्रीकृष्ण
मध्येच हसून म्हणाला.
     " कुंती हे कोण बोलला ?"
     " माझा भाऊ वसुदेव त्याचा हा पुत्र श्रीकृष्ण आमच्या
सोबत आलाय आपल्याला प्रणाम करायला."
     " आणि मी नाही का आलो ?   मला तर विसरूनच गेलीस तू आत्ये. मी श्रीकृष्णा चा मोठा भाऊ बलराम सुध्दा आपल्याला प्रणाम करायला आला आहे महाराज ."
     "  आणि कोणी विसरलाच तरी मी नाही दाउ कारण आपण मला विसरच पडू देणार नाहीये."
     " आपल्या धाकट्या पुत्रांस माझ्या जवळ आण कुंती !"
     " तसा मी देखील लहानच आहे आत्ये." बलराम उद्गारला.
     " बरं बरं दोघेपण या." तेव्हा कुंती बलराम आणि श्रीकृष्ण
दोघानाही पुढे करते. तेव्हा बलराम आणि श्रीकृष्ण दोघेही
एकदम गांधारी ला प्रणाम करतात. तेव्हा गांधारी विचारते की
या दोघांमधील गिरीधर कोण आहे ?" तेव्हा बलराम उद्गारला,
         " गिरीधर तर माझा लहान भाऊ आहे."
        " परंतु तू मला एवढा रुसलेला का वाटतोयस ?"
        " कारण ही वेळ त्यांच्या भोजनाची आहे महाराणी !"
        " माझा पुत्र भीम त्याला सुध्दा भोजनाची विशेष रुची
आहे."  त्यावर भीम उद्गारला ," आम्ही इतक्या वर्षानंतर येऊन ही मोठी आई विसरली नाही."
      " मोठी आई आपल्या भोजनाला नाही विसरली मजले
दादा !" नकुल थट्टा करत बोलला. सर्व हसतात.
     " भीम ss
     " काय मोठ्या आई ?"
    " मी तुझ्यासाठी एक वेगळी खीर बनविली आहे."
तसा श्रीकृष्ण उद्गारला ," तेव्हाच दाउ आपल्या हृदयात भीमसेन साठी विशेष स्नेह आहे." असे म्हणताच पुन्हा सर्वजण हसू लागतात. भोजनाचा कार्यक्रम उरकल्यानंतर
सर्वज झोपण्यासाठी आपापल्या कक्षेत गेलेत. श्रीकृष्ण आणि अर्जुन दोघेही झोपले नाहीत.बऱ्याच उशीरापर्यंत दोघेही बोलत बसले. त्यांच्या बाजूला बलराम झोपला होता.
बोलता बोलता मध्येच श्रीकृष्ण उद्गारला ," पार्थ मला उद्या
मी इथून निघायचं म्हणतोय." त्यावर अर्जुन उद्गारला ," पण
एवढी घाई का ? रहा ना काही दिवस."
      " जास्त दिवस मला इथं राहून चालणार नाही पार्थ."
     " का बरं ?"
     "  जास्त दिवस मी राहिलो ना इथं तर तेथे गेल्यावर सुभद्रा इतके सारे प्रश्न करील की त्या प्रश्नांची उत्तरे देता देता
माझे नाकी नवं येतील."
     " एवढी मोठी झाली तरी रुसते ?"
     " हां लाडली आहे ना, आणि मीच तिचे जास्त लाड करतो
म्हणून ती मलाच जास्त त्रास देते.सर्वात लहान आहे ना, दाउला घाबरते म्हणून दाउ कडे जात काही तक्रार घेऊन.
माझ्याकडेच येते. तशी ती सर्वांचीच लाडकी आहे, दाऊ तर
रोज माझ्याशी भांडण करतात. मला म्हणतात की हे बघ कृष्ण मी मोठा भाऊ आहे ना, मग माझा अधिकार जास्त."
तेवढ्यात बलरामला जाग आली. श्रीकृष्ण अजून जागत
असलेला पाहून तो उद्गारला ," कृष्ण अजून का जगत बसलाहेस ? जा झोप जा." तेव्हा श्रीकृष्ण मुद्दाम थट्टा करण्याचा हेतूने म्हणाला ," दाउ , मी अर्जुनला हेच सांगत होतो की आपण स्वतःच असं म्हणता की सुभद्राच्या देखभालीचा अधिकार आपल्या अधिकारापेक्षा जास्त आहे नाही का ?"
      " असं मी कुठं म्हणालो ? दाउ तू आहेस का मी ?"
      " दाऊ आपणच आहात. परंतु मी सुध्दा तिचा कोणीतरी
लागतोच ना ."
     " मी असं कुठं म्हणालो की तू तिचा कोणीच लागत नाहीस म्हणून. तू पण तिचा भाऊ आहेस. परंतु मी तुम्हां दोघापेक्षा मोठा आहे अर्थात माझा अधिकार तुझ्या अधिकारा पेक्षा जास्त असणार ना ?"
     " अगदी बरोबर. परंतु सुभद्रा अजून आहे, जेव्हा तिच्या
जीवनाविषयी निर्णय घ्यावे लागतील तेव्हा पाहता येईल.
     " बरं बरं झोप आता."
     " दाउ मी झोपलो तरी पोटातून जागाच असतो. आणि आज तर हस्तिनापुर ची रात्र सुध्दा जागत आहे. तुळाच्या मध्यभागी गंगापुत्र भीष्म काट्या प्रमाणे उभे आहेत. पाण्यावर काठी मारल्याने पाणी काही क्षणापूरते वेगळे केले
जाते. परंतु पुन्हा एक होते.पण इथं तसं नाहीये. सागराचे मंथन करून विष आणि अमृत हे वेगळे करायलाच हवे आहे." अर्जुनला मात्र त्याच्या ह्या साहस्यमय बोलण्याचा
अर्थ कळला नाही. म्हणून त्याने विचारले ," तू काय म्हणतोयस ते मला कळलं नाहीये. " त्यावर श्रीकृष्ण उद्गारला," जे उद्या घडणार त्याची आज चौकशी कशाला
करतो आहेस पार्थ ? उद्याच पहा ना ?" त्यावर बलराम उद्गारला, " पाहिलेस ना अर्जुन  हा नेहमी  असंच  काहीतरी बोलून जातो की मग मी कोड्यात पडतो. पण नंतर ह्यांचेच
म्हणणे शेवटी ते खरे होते . हा असा बोलला ना उद्या बघ नक्कीच काहीतरी घडेल."

      दुसऱ्या राजदरबार भरला. त्या दरबारात आचार्य द्रोण,
कुलगुरु कृपाचार्य , महामंत्री विदुर आणि गंगापुत्र भीष्म उपस्थित होते. थोड्याच वेळात गांधार नरेश शकुनी आपल्या
मेहुण्याचा अर्थात महाराज धृतराष्ट्राचा हात पकडून राजदरबारात घेऊन आला आणि त्यांच्या स्थानावर नेऊन बसविले. त्यानंतर सर्वांकडे नजर फिरवून म्हटलं ," ही राज्यसभा आपल्या परिवाराची असल्याने मला इथं थांबण्याचा अधिकार नाहीये. तेव्हा महाराजची आज्ञा असेल
तर मी निघतो. तेव्हा गंगापुत्र भीष्म उद्गारले ," अतिथीचा अपमान करण्याची परंपरा आमची नाहीये. तेव्हा तुम्ही पण
बसून घ्या." गांधार नरेश जे हवं होतं ते आपोआपच मिळाले.
त्यामुळे एकदम खुश हसून ही तसे न दाखविता तो एकदम
नम्रपणे उद्गारला ," जशी आपली आज्ञा !" एका आसनावर
जाऊन बसला. तेव्हा महाराज धृतराष्ट्रा ने विचारले," सगळे
आले का तातश्री ?" गंगापुत्र भीष्म उद्गारले ," हां महाराज !"
     " मी आपल्या लोकांना यासाठी बोलविले आहे की मी
एका धर्म संकटात पडलो आहे. मला आपल्या सर्वांच्या मदतीची फार गरज आहे."
     " धर्म संकट काय आहे महाराज ?"
     " धर्म संकट हे आहे तातश्री की हस्तिनापुरात आता दोन
युवराज झाले आहेत. अर्थात एका राज्यात दोन युवराज असत नाहीत . " तसा लगेच सेनापती उद्गारला ," युवराज
युधिष्ठिर आल्यानंतर राजकुमार दुर्योधन ने युवराज चे स्थान
सोडायला हवे." तसा गांधार नरेश शकुनी दुजोरा देत उद्गारला, " ह्या समस्या चे दुसरे निदान काही होऊच शकत नाही." त्यावर सर्वजण आश्चर्यकारक नजरेने गांधार नरेश
शकुनी कडे पाहू लागले. एका सेनापतीच्या वक्तव्याचे सर्मथन
गांधार नरेश शकुनी केलं. हा चमत्कार तर पूर्वेला उगवणारा
सूर्य आज पश्चिमेला उगवला असेच नाही का ? आणि ही
गोष्ट गांधार नरेश शकुनीच्या द्यानात येणार नाही असेहोणे
शक्य नाही. म्हणूनच की गांधार नरेश शकुनी पुढे म्हणाला,
   " माझ्या या वक्तव्याचे आपल्या सर्वांना आश्चर्य जरूर वाटले असणार , कारण मी दुर्योधनच्या बाजूने बोलतोय.
अर्थात आज विरुद्ध जसे बोलतोय असे वाटले असेल
आपल्याला ? परंतु मी दुर्योधन च्या विरुद्ध नाहीये. दुर्योधन
तर माझा प्राण आहे. मी त्याच्यासाठी काहीही करीन,परंतु ही वेळ हस्तिनापुर च्या हिताची नाहीये. जनसमुदायच्या विरुद्ध
जाणे हिताचे ठरणार नाहीये. म्हणून माघार घेतोय इतकेच ! "
     " ही समस्या इतकी सोपी नाहीये गांधार नरेश.की ज्याचे
उत्तर इतक्या सहज गतीने मिळेल."
     " मग आपल्याला काय म्हणायचंय की राजकुमार युधिष्ठिर ह्या राज्याचा युवराज नाहीये ?"
     " युवराज तर युधिष्ठिर च आहे द्रोणाचार्यजी परंतु आपल्याला ही गोष्ट सुध्दा लक्षात ठेवायला पाहिजे की
ह्याच दरबारात नि सर्वांच्या संमत्ती ने राजकुमार दुर्योधन ला
युवराज घोषित केले होते."
     " आणि माझ्या दुर्योधन ने त्यागपत्र येऊन दिले नाहीये
अद्याप. निदान मला तरी तसे आठवत नाहीये."
     " राजकीय निर्णय त्यागपत्राद्वारे घेतले जात नाहीत
गांधार नरेश आणि तसे पाहिले तर त्यावेळी मी उपस्थित
नव्हतो." विदुर उद्गारला.
     " जर असता तर काय केले असते ?" महाराज धृतराष्ट्राने
प्रश्न केला.
     " मी असतो तर हा प्रस्ताव जरूर ठेवला असता की एवढ्या जलद गतीने निर्णय घेऊ नका , कारण हे पहिलेच
सिध्द झाले होते की दुर्योधन युवराज बनण्याचा लायक नाहीये." तेव्हा गंगापुत्र भीष्म समजले की विदुर वारणावंत
च्या षडयंत्रा विषयी बोलतोय. म्हणून त्यांनी लगेच विषयांतर
करत म्हटले की , " आता हा प्रश्न का उपस्थित करतो आहेस विदुर ? कारण जे काही झाले त्याला आपण झालेच नाही असे म्हणू शकत नाहीये. परंतु राजनीतीचा हा अध्याय परत जाऊन वाच विदुर. राष्टीय महत्व कुण्याच्या रचनेवर केवळ तुझाच अधिकार असू शकत नाही." परंतु महाराज धृतराष्ट्रा
ना शंका आलीच की विदुर आपल्या सर्वांपासून काहीतरी लपवित आहे म्हणूनच की काय त्यांनी विचारले, " विदुर ,तू आमच्या पासून काय लपवितो आहेस  ?"
      " त्या विषयावर आता चर्चा करणे योग्य नाहीये , कारण
स्वतः विदुर सुध्दा गेलेला काळ परतवून आणू शकत नाहीये.
म्हणून आपल्याला वर्तमान काळाकडे पाहायला हवंय."
     " फिरून फिरून आपण पुन्हा तिथेच आलोय जेथून
आपण विषयाला सुरुवात केली होती." कृपाचार्य उद्गारले.
     " मग आपण एखादा उपाय सुचवा." महाराज धृतराष्ट्र उद्गारले.
     " मला वाटतं की कोणाला ही युवराज पदावरून हटवलेत
तरी तो त्याच्यावर अन्याय झाल्या सारखाच आहे."
     " तोच तर मुख्य प्रश्न आहे की अन्याय कोणावर ही होऊ
द्यायचा नाहीये." गंगापुत्र भीष्म उद्गारले.
     " मला वाटतं की ही जबाबदारी गंगापुत्र भीष्म यांनीच
घ्यावी." गांधार नरेश शकुनी बोलला. कारण आतापर्यंत च्या
वक्तव्यावरून गांधार नरेश अनुमान लावले होते की गंगापुत्र
भीष्म सुध्दा दुर्योधन वर अन्याय करू इच्छित नाहीयेत. परंतु
विदूरला जर बोलायची संधी मिळाली तर तो युधिष्ठिर युवराज
बनण्यास कसा योग्य आहे नि दुर्योधन युवराज बनण्यास योग्य नाही हे पटवून देईल. तेव्हा आपण गंगापुत्र भीष्म
यांनाच पुढे करावे. म्हणजे आपल्यावर पक्षपात आरोप
कोणी लावणार नाहीये. हे हेरूनच त्याने तसा पाशा फेकला
असावा. आणि त्या पाशा रुपी बाणा ने  अचूकपणे सावधचा  वेध घेतला. कारण महाराज धृतराष्ट्रा ने सुध्दा गांधार नरेश शकुनीच्या वक्तव्याला दुजोरा देत म्हटलं की, एकदम बरोबर
तातश्री आपण सर्वात जेष्ठ तर आहातच शिवाय ह्या हस्तिनापुर च्या राजगादीवर आम्हां सर्वांपेक्षा जास्त अधिकार
आपलाच आहे शिवाय आपल्या निर्णयावर कोणीही विरोध
करू शकणार नाही." शेवटी नाईलाजाने गंगापुत्र भीष्म उठून
उभे राहिले नि उद्गारले ,"  दोन्ही युवराजावर अन्याय होऊ
नये यासाठी एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे ह्या हस्तिनापुर राज्याचे विभाजन करा. अर्धे राज्य युवराज युधिष्ठिरला द्या. आणि दुसरे अर्धे राज्य युवराज दुर्योधनला
द्या. " असे म्हणून गंगापुत्र भीष्म किंचित थांबले. लगेच पुढे
बोलले ," असे करत असताना मला असंख्य यातना होत आहेत. परंतु दुसरा पर्याय नाहीये." असे म्हणून ते ताबडतोब
तेथून निघून गेले. त्यानंतर सभा बरखास्त झाली.

                            धृतराष्ट्र
     रात्रभर मी विचार करत होतो की राज्याचे विभाजन करायचे म्हणजे दुसरे नवीन राज्य निर्माण करायला लागणार.
खरे सांगायचे तर तातश्रींचा हा निर्णय मला मान्य नव्हता. परंतु दुसरा काही पर्याय पण नव्हता. हस्तिनापुर राज्याचे विभाजन होणार म्हटल्यावर हे सिहांसन एकाला मिळणार
नि दुसरे सिंहासन दुसऱ्या ला मिळणार शिवाय हा भाग युधिष्ठिरला दिला तर मला हे सिंहासन सोडावे लागणार. छे छे छे ! हे सिंहासन मी कदापि सोडणार नाहीये. परंतु युधिष्ठिर ला राज्याचा कोणता भाग द्यावा ? या कामात आपल्याला
शकुनी दादाच मदत करतील. त्यांनाच इथं बोलवून घेऊ नि
त्यांच्याशी सल्लामसलत करू काहीतरी मार्ग निघेलच. असा
विचार करून मी एका दूता मार्फत गांधार नरेश शकुनीला
बोलवून घेतले. त्यानंतर त्यांच्याशी राज्याच्या विभाजन विषयी चर्चा केली असता. त्यांनी सुचविलेला उपाय मला
एकदम पसंद पडला. म्हणजे पांडवांना राज्य तर द्यायचं परंतु
राज्याचा असा भाग त्याना द्यायचा की बस्स ! तेथे ना अन्न धान्य पिकणार ना तेथे मनुष्य वस्ती करू शकणार कारण
ते घनदाट अरण्य आहे. तेथे फक्त जंगली श्यापद असणार
अर्थात वाघ, शिंह, लांडगे वगैरे ? ते काय करणार तर पांडवांची शिकार करणार अजून काय ? परंतु पांडवांच्या गळी उतरावायचे कसे ? कारण भीम आणि अर्जुन हे अजिबात मान्य करणार नाहीत. मग दुसरा कोण ?" किंचित विचार करून नंतर अचानक युक्त सुचली. असा अभिर्वाव करून तो उद्गारला ," मग आपण असेच करू की युधिष्ठिरलाच इथं बोलवू. कारण युधिष्ठिरच  जरा काय तो समजदार  आहे नि आपले सांगणे ऐकेलही ! त्याने एकदा
आपल्या मनावर घेतले की त्याचे भाऊ  त्याच्या विरोधात जाणार नाहीत कधी . म्हणून आपण त्यालाच नवीन राज्याच्या निर्मितीसाठी प्रेरित करू. कसं ? हो हेच योग्य ठरेल."
     
     दुसऱ्या दिवशी मी युधिष्ठिरला मला भेटायला बोलविले.
त्याला अनेक प्रकारे समजावून सांगितले तेव्हा सुरुवातीला
त्याला असे भासविले  की खरे तर मी  तुला हस्तिनापुरचेच
राज्य देणार होतो. आणि मीं खांडववन मध्ये नवीन राज्य
बसवायला दुर्योधनला सांगणार होतो. परंतु तुला माहीत
आहे ना ,  दुर्योधन किती हट्टी आहे तो, त्याचे म्हणणे आहे की मी सुध्दा त्याच्या सोबत खाडंव प्रस्त  मध्ये चालावे. आता या वयात मी कुठं जाणार बरं ? म्हणून मी काय म्हणतोय तू आपल्या बंधू सोबत खांडव  प्रस्त मध्ये जाऊन स्वत:साठी नवीन राज्य निर्माण कर." युधिष्ठिर उद्गारला ," आपली आज्ञा
शिरसावंद्य." असे म्हणून तो तेथून निघाला.

क्रमशः



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..