महाभारत - ४९ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाभारत - ४९ |
४९
मी उत्सुकतेने विचारले की , हे खाली आसन कोणाचे
आहे ?" त्यावर धृष्टद्युम्न उद्गारला ," ते आसन भगवान श्रीकृष्णाचे आहे आणि ते आल्याशिवाय स्वयंवराला सुरुवात
होणार नाहीये." खरं सांगायचं तर त्यावेळी मला खूप राग आला धृष्टद्युम्नचा म्हणे , श्रीकृष्ण आल्याशिवाय स्वयंवराला
सुरुवात होणार नाही. एवढा का बरं मान देतात त्याला. परंतु
काही न बोलता गप्प बसावे लागले मला आणि थोड्याच
वेळात मथुराधिपती , यादवकुलोत्पन्न , भगवान श्री s s कृ s s ष्ण s मंडपात आल्याची आणखी एक ललकारी वातावरणात घुमली. प्रवेशद्वारातून निळ्या वर्णाचा श्रीकृष्ण प्रवेशत होता. त्याच्या समवेत त्याचा बंधू बलराम , प्रद्युम्न , रुक्मरथ, उध्दव ,सात्यकी इत्यादी यादव होते मंडळातील सर्व नरेश, इतकेच काय पुरोहितांसह राजस्त्रियांच्या सौधातील सर्वजण आदराने उभे राहिले. माझ्या शेजारी बसलेले कर्ण, शकुनीमामा , दु:शासन, अश्वत्थामा सर्व उभे राहिले. मला मात्र उठावंस वाटलं नाही. त्यामुळे मी उठलो नाही. माझ्या मनाला राहून राहून एकच गोष्ट खटकते की त्याला लोकं
इतका मान का देतात ? मी हस्तिनापुरचा युवराज असूनही
मला इतका मान मिळत नाही. परंतु त्याला मात्र न मागताच
सर्वकाही मिळते. असं का ? कुणास ठाऊक त्याला जरी आपल्या आसपास पाहिलं ना , तरी मला त्याचा संताप येतो. परंतु मला हे कळत नाहीये की त्या कृष्णाला एवढा मान का देतात लोकं. काही कळलं नाही. मी मात्र उठलो नाही. का कुणास त्याला पाहिलं की मला त्या अर्जुनची आठवण येत होती. श्रीकृष्णा ने बसायला सांगितल्यावरच सर्व राजे महाराजे आपल्या आसनावर बसले. एवढा मोठा मान अन्य कोणाला मिळत असेल असं वाटत नाही. असो-
द्रुपद
स्वयंवर ला आरंभ होण्यापूर्वी मी आपल्या पुत्रांस
अर्थात धृष्टद्युम्नला आपल्या जवळ बोलविले नि म्हंटल " पुत्र
हे लक्ष तर मी कुंतीपुत्र अर्जुनला डोळ्यासमोर ठेवून बनविले
होते. परंतु आता जमलेल्या वीर योध्दामध्ये एक पण वीर हा पण जिंकेल असं मला वाटत नाही."
" असं का म्हणता पिताश्री ? पूर्ण भारतवर्षाचे महावीर इथं उपस्थित आहेत . त्या मध्ये कोणी ना कोणी वीर निश्चितच असेल. शिवाय आचार्य द्रोण चे अन्य शिष्य पण आले आहेत इथं."
" हूं ते दिसेलच म्हणा. कोण वीर आहे तो ? जा द्रौपदीला
मंडपात घेऊन ये." मी म्हटलं.
" जशी आपली इच्छा ! " असे म्हणून धृष्टद्युम्न तेथून
निघून गेला. तेव्हा दुर्योधन गुरुपुत्र अश्वत्थामा कडे पाहून
उपहास पूर्ण स्वरात उद्गारला," गुरुपुत्र अश्वत्थामा आपण पण
स्वयंवर जिंकायला आले की काय ? "
" छे छे छे ! मी या स्वयंवरात भाग घेऊ शकत नाही."
" का बरं ?"
" द्रौपदी माझी गुरू बहीण आहे."
" मग तर आम्हां सर्वांचीच ती गुरू बहीण होईल."
" नाही, केवळ माझी गुरू बहीण आहे ती , कारण महाराज द्रुपद माझ्या वडिलांचे गुरू बंधू आहेत. या नात्याने
ती माझी बहिण झाली पण जर का तू पण जिंकलास तर
मी तुझे अभिनंदन अवश्य करीन."
" दुर्योधनच्या शब्द कोषात जर तर हा शब्दच नाहीये.
त्यामुळे हा पण मीच जिंकणार आहे, कारण माझ्या शिवाय दुसरा कोणालाही हा पण जिंकता येणार नाही." असे म्हणून
मी सर्व मंडपभर आपली दृष्टी फिरविली. तेथे भारतवर्षातले सर्व राजे महाराजे आले होते. द्रौपदीच्या सुगंधाने सर्वांनाच वेड केलं होतं तर ! मगधाधिपती जरासंध, मद्राधिपती शल्य, सिंधूअधिपती जयद्रथ , चेदिराज शिशुपाल असे एकापेक्षा एक सामर्थ्यशाली वीरांचे संमेलन होतं. परंतु स्वयंवर पण जिंकण्याचं सामर्थ्य कर्णा व्यतिरिक्त अन्य कोणामध्ये असेल असं मला अजिबात वाटत नव्हतं. मी त्याला काहीतरी सांगावे म्हणून त्याचा कडे पाहिले असता मला जाणवले की तो एकटक श्रीकृष्णा कडे पाहत होता. त्याने आपल्या कडे पाहावे म्हणून मी त्याला कोपरखळी मारली. तसा तो चमकून माझ्या कडे पाहू लागला आणि तेवढ्यातच धृष्टद्युम्न आपल्या भगिनीला घेऊन मंडपात आला. याज्ञसेनी द्रौपदीला पाहताच माझी नजर तिच्यावरच खिळवून राहिली. सावळ्या वर्णाची द्रौपदी शरदातल्या अबोल, लोभस संध्येसारखी दिसत होती.
आपला उजवा हात मस्तकापर्यंत वर उंचावीत पांचालांचा युवराज धृष्टद्युम्न बोलू लागला, " कांपिल्य नगरी
साठी ही मोठी गौरवशाली गोष्ट आहे की आज आपल्या पिताश्रीच्या वतीने मी आपणा सर्वांचे हार्दीक स्वागत करत आहे .भारतवर्षातील प्रत्येक वीर, महावीर इथे उपस्थित आहात. अर्थात माझ्या भगिनेच्या स्वयंवरासाठी आपण इथं आला आहात. तेव्हा स्वंरावरासाठी मांडलेला पण जो कोणी वीरपुरुष पूर्ण करील त्याला माझी बहिण याज्ञसेनी आपल्या हातांतील वरमाला त्याच्या गळ्यात घालील आणि आपला पती म्हणून त्याचा स्वीकार करील. आता स्वयंवराचा पण काय आहे तो जरा ऐकून घ्या. " असे म्हणून पणा विषयी माहिती देत तो पुढे म्हणाला ," पणासाठी सर्वांसमोर मंडपाच्या छताला टांगलेले एक मत्स्ययंत्र आहे. हे आत्ताच ते कुशल कारागीर सुरू करतील. त्या गोल फिरणाऱ्या गतिमान मत्स्ययंत्रातील लाकडी माशाचा उजवा नेत्र धनुष्याची प्रत्यंचा ताणून तिच्यावर एक सूची बाण चढवून यंत्राखाली तळ्यातील त्या माशाच्या प्रतिबिंबाकडे पाहून जो कोणी अचूकपणे लक्षवेद करील. तो आम्हां पांचालांचा आजपासून आप्तेष्ट होईल. यासाठी कोणीही धनुर्धराला पाच बाण फेकण्याची आम्ही अनुज्ञा देत आहोत." असे म्हणून त्याने आमच्याकडे एक दृष्टीक्षेप टाकला आणि लगेच अमात्यांनी मंडपाच्या छतावर उपस्थित असलेल्या कारागिरांना संकेत केला. त्याक्षणीच त्या कारागिरानी ते मत्स्ययंत्र सुरू केलं. भारतवर्षातील एक जात सर्वच महावीरांचे नजर त्या मत्स्ययंत्रा कडे स्थिरावली आणि आत्ताच काही वेळापूर्वी पाच धिप्पाड मल्लांनी मोठ्या कष्टाने धापा टाकीत पांचलांच्या शस्त्रगारातून वाहून आणून ठेवलेल्या विख्यात शिवधनुष्यावर गेली. जे पाण्याच्या तळ्याजवळ ठेवलं होतं आणि सुटकेचा निःश्वास टाकून त्यानी आपल्या मस्तकावरचा घाम टिपला आणि तेथून निघून गेले होते.
सर्वत्र शांतता पसरली. नुसती मत्स्ययंत्राची घरघर तेवढीच स्पष्टपणे ऐकू येत होती. तलावातील पाण्यात त्याचे प्रतिबिंब
स्पष्टपणे दिसत होते. ते अवजड शिवधनुष्य पाहून त्याला
उचलण्यासाठी पुढे येण्याची कोणीची हिंमतच होत नव्हती. सगळेजण एकमेकाकडे टकमक पाहू लागले होते.
वसुदेव श्रीकृष्ण
तेवढ्यात तेथे पाच ब्राम्हण कुमार आलेत. त्या पाचा मध्ये एक धिप्पाड आणि उंचापुरा होता. त्याला पाहून दाउ हळूच म्हणाला, " हा ब्राम्हण भरपूर खाऊन पिऊन एकदम दस्टपुस्ट आहे बघ." तेव्हा मी म्हटलं ," तो ब्राह्मणपुत्र नाहीच आहे मुळी दाऊ !" तेवढ्यात ब्राम्हण वेशात असलेल्या अर्जुनची नजर माझ्यावर पडली. तसे त्याने मला अभिवादन केले. दाउच्या नजरेतून मात्र सुटले नाही. म्हणून दाऊ ने मला प्रश्न
केलाच ,की " त्याने तुला अभिवादन का केले ?" मी माहीत नसल्याचा अभिर्वाव करून म्हटलं ," कुणास ठाऊक . का केलं ? मला नाही माहीत. "
" तू माझ्या प्रश्नांचे सरळ उत्तर का देत नाहीस बरं ?"
" कारण आपला प्रश्न सरळ असंतच नाही."
" याचा अर्थ तू त्याला नक्कीच ओळखतोस ?"
" त्याला तर आपण सुध्दा ओळखता दाऊ , सर्वात पुढे
आहे तो युधिष्ठिर , आणि दुसरा पेहलवान दिसतोय ना, तो
आहे भीम ! " पुढे बोलू न देता बलराम मध्येच श्रीकृष्णाचे
वक्तव्य खंडीत करीत म्हणाला ," मग अर्जुन मग नकुल आणि सहदेव असेच ना ?"
" हां तेच तर सांगत होतो मी !"
" तुला ना पांडवांशिवाय दुसरा कोणी दिसत नाही. पांडव
बिच्चारे वारणावंतच्या अग्नीत जळून भस्म झाले."
दुर्योधन
अचानक माझ्या मनात काय आले ते कुणास ठाऊक मी उठलो नि सरळ धनुष्यबाणच्या दिशेने निघालो. महाराज द्रुपदला अभिवादन केले नि धनुष्याला हात घातला. परंतु धनुष्य जागचे हलेना , म्हणून दोन्ही हाताने ते उचलण्याचे प्रयत्न करु लागलो. परंतु अपयशी ठरलो. खरं तर माझाच मला संताप आला. म्हणजे मला माहीत असून सुध्दा मी इतका उत्तजित झालोच कसा याचे मला मला कोडे पडले. परंतु मान खाली न घालता आपल्या स्थानावर जाऊन बसलो. त्यानंतर विशाल छातीचा आणि नावाप्रमाणे दृढ शरीराचा राजा दृढधन्वा उठला . अभिमानाने सर्व मंडपभर दृष्टी फेकत त्याने उत्तरीय सावरीत शिवधनुष्याला हात घातला. सर्व प्रेक्षकांचे डोळे त्याच्यावर ताणले गेले. प्रथम त्याने एका हाताने ते शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला. परंतु ते यत्किंचितही हलले नाही. शेवटी दोन्ही हाताने ते शिवधनुष्य पकडून उचलण्याचा पुन्हा प्रयत्न केला. पण दृढधन्वाचे डोळे पांढरे झाले . तरीही त्याला ते प्रचंड शिवधनुष्य जागचे हलले सुध्दा नाही. लज्जित होऊन त्याने आपली मान खाली घातली आणि निमूटपणे आपल्या स्थनावर जाऊन बसला. त्यानंतर जरासंध राजाने प्रयत्न केला. परंतु त्याना ही अपयश आले. त्यानंतर मद्रनरेश शल्य, चेदिराज शिशुपाल, शिंधुअधिपती जयद्रथ असे अनेक महावीरांनी प्रयत्न केला. परंतु सगळे अपयशी ठरले." तेव्हा गांधार कुमार शकुनी उद्गारला," भाच्या तू हस्तिनापुर चे नाक कापलेस." तेव्हा कर्ण उद्गारला," कर्ण असताना हस्तिनापुरचे नाक कधी कापले जाणार नाही मामाश्री ! " कर्म उठला नि महाराज द्रुपदाना अभिवादन केले. धनुष्या जवळ गेला. एकवेळ नजर त्या मत्स्ययंंत्रावर स्थिर केली नि धनुष्याला प्रथम वंदन केले नि हात घातला नि एका झटक्यानिशी धनुष्य उचलले. नि त्यावर प्रत्यंता चढविली. तसा जमलेल्या जससमुदाय ललकारी उमटली , अंगराज कर्ण की जय " त्यावेळी द्रौपदी ने श्रीकृष्णा कडे पाहिले. तेव्हा श्रीकृष्णा ने मान हलवून नकारात्मक संकेत दिला. तशी द्रौपदी उद्गारली ," थांबा. आपण क्षत्रिय नाहीत.मी कोणत्याही सारथ्थाची पत्नी
वा सून होणं कदापिही मान्य करणार नाही. अर्थात माझी वरमाला कुण्या सुतपुत्रासाठी नाहीये." असे म्हणताच धनुष्यबाण खाली ठेवत कर्ण उद्गारला ," जर असं आहे तर तुझी वरमाला प्रतीक्षा करत करत पार सुखून जाईल राजकुमारी जी !"
कर्णाचा झालेला अपमान दुर्योधनला सहन झाला. अथवा
द्रौपदीला आपली महाराणी बनविण्याचे स्वप्न भंग पावले
म्हणूनही असेल. परंतु तो जे काही बोलला ते योग्यच होते म्हणा. तो म्हणाला ," ऋषी मुनींचे आणि नदीचे गोत्र कधी कुणी शोधू नये महाराज द्रुपद ! आपल्या दरबारात माझ्या
परम मित्राचा अपमान झाला आहे. आपल्या स्वयंवरा मध्ये जर अशी अट होती तर ती कार्यक्रम सुरू होण्या अगोदर जाहीर करायला हवी होती."
युवराज धृष्टद्युम्न
मी बोललो ," हस्तिनापुरच्या युवराजाना एवढ्या मोठ्या
आवाजात बोलून आपल्या यजमानाचा अपमान करण्याचा काहीही अधिकार नाहीये. अंगराज आमचे अतिथी आहेत त्याबद्दल वाद नाही. परंतु त्याना स्वयंवराची परंपरा माहीत असायला हवी आणि द्रोण शिष्य दुर्योधनला हे चांगले माहीत असायला हवं की मित्रता आणि नातं आपल्याशी बरोबरी करण्याऱ्यांशीच केलं जातं. आणि माझी बहिण द्रौपदी हिच्या हातात वरमाला आहे, जर तिला कुण्या सुतपुत्राच्या गळ्यात घालावयाची नसेल तर तिचा विवाह सुतपुत्रा सोबत नाही होणार आणि जाता जाता अंगराज कर्ण जे बोलून ते योग्यच आहे , कारण मी विचार केला होता की युवराज दुर्योधन, राजकुमार दु:शासन , सत्यकी , सिंधुअधिपती जयद्रथ और महाराज जरासंध,मद्र नरेश शल्य सारखे महावीर इथं उपस्थित आहेत. तेथे लक्षाचा वेध घेण्यास काही अडचण येईल असे मला वाटलंच नाही मुळी ! परंतु इथं अंगराज कर्ण व्यतिरिक्त दुसरा कुणी महावीर नाहीये. त्यामुळे कुंतीपुत्र अर्जुनची प्रकर्षाने आठवण येत आहे . तो जर आता असता तर त्याने हा पण नक्कीच जिंकला असता. परंतु आता असं वाटतंय की अर्जुन सोबत धनुर्विद्या सुध्दा लाक्षागृहात जळून भस्म झाली. अर्थात या स्वयंवर मंडपात असा कोणी वीर नाहीच आहे का ? जो लक्षाचा वेध घेऊन भारतवर्षाच्या धनुर्विद्याची लाज राखण्याचे कार्य करील.
असेल तर त्याने पुढे यावे."
असे म्हणताच ब्राम्हण वेशामध्ये असलेल्या युधिष्ठिर ने अर्जुनला अनुज्ञा दिली. तसा अर्जुन उठला नि सामोरी गेला. त्याच्या कडे पाहून उपहासाने दुर्योधन उद्गारला," ब्राम्हण, हे धनुष्य वेद शब्दांपासून बनले नाहीये. हे स्वयंवर आहे, इथं जमलेल्या साऱ्या भारतवर्षातील महावीरांना जे साद्य झाले नाही ते तुझ्या सारख्या ब्राम्हणाची काय बिशाद लागली आहे. तेव्हा मुकाट्याने आपल्या स्थानावर जाऊन बैस ! " तेवढ्यात कुणीतरी कुजबूला की ह्याच्या चालीवरून तर वाटत नाही की हा ब्राम्हण असावा." लगेच दुसरा एकजण उद्गारला ," त्याची मनगट पहा .कुण्या क्षत्रियाला शोभतील अशीच आहेत." त्यावर आणखीन कुणीतरी बोलला ," विजयी होण्याचे हीच तर लक्षण आहेत."
दुर्योधन
त्या ब्राह्मण कुमारांने शिवधनुष्य कर्णासारखं एका हातांने उचलले. क्षणात ऐटदार विरासन घेतले. ते बघताच मंद असणारा श्रीकृष्ण उठला नि तसाच खाली बसला. ते पाहताच मला आश्चर्याचा धक्का बसला. या घटनेने क्षणापूर्वी कर्णाचा झालेला अपमान सर्वजण विसरले जणू ! सर्वांनी टाळ्यांचा वर्षाव करून त्या नव्या स्पर्धकाला चेतावणी दिली. ब्राम्हणकुमार मान वळवून श्रीकृष्णाकडे आपली दृष्टी फेकली. ते पाहून मला अधिकच राग आला. त्याला सर्वजण इतका मान का देतात तेच मला कळत नव्हते. इतर तर इतर पण माझा परम मित्र सुध्दा ! त्याच्या पायाकडे सारखा एकटक लावून पहात बसला होता. आणि आता तो ब्राह्मण कुमारही त्या दिशेने पाहत होता. कृष्ण म्हणजे या सर्वांना वाटतो तरी कोण ? देवांचा राजा इंद्र का सृष्टीकर्ता ब्रह्मदेव ? मी माझ्या बैठकीचं असं उद्वेगाने उलट दिशेला परतवुन घेतलं . मला श्रीकृष्ण आणि तो ब्राह्मण कुमार आणि मंडपातील मूर्खासारखे टाळ्या फिटणारे प्रेक्षक मला सगळ्यांचाच राग आला म्हणूनच मी त्यांच्याकडे पाठ फिरवून बसलो. परंतु तो ब्राम्हण कुमार लक्षवेध घेतो की नाही ही पाहण्याची मनात उत्सुकता असल्याने पुन्हा वळून बसलो. आणि काय आश्चर्यकारक दृश्य होते ते. त्या ब्राम्हण कुमारने डोळ्यांची पापणी लवते ना लवते तोच मत्स्ययंत्राच्या माशाच्या डोळ्याचा अचूक वेध घेतला. सर्वांनी टाळ्यांचा गजराने त्या ब्राह्मण कुमारांचे स्वागत केले. माझ्यासाठी तो क्षण एकदम लाजिरवाणी होता.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा