महाभारत ५८ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाभारत ५८ |
महाभारत ५८
एकीकडे युवराज युधिष्ठिरच्या राज्यभिषेकाची तयारी जोरदार सुरु आहे, तर दुसरीकडे पांडू पुत्र राज दरबारात
जाण्यापूर्वी राज टिळक करण्यासाठी आपल्या आई कडे
येतात नि आपल्या आईला विनंती करतात की , आई, दादाला टिळक कर." सहदेव उद्गारला.
" अरे , मी कसा टिळक करणार ?"
" आई, हा टिळक नाही तर आपला आशीर्वाद असेल."
अर्जुन उद्गारला.
" माझा आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे अर्जुन.
आणि घरात सून आल्यानंतर काही विशेष अधिकार सून
आणि सासू या मध्ये वाटले जावेत. मर्यादांची काही सीमा
आखल्या गेल्या पाहिजेत. सासू बनल्यानंतर जे अधिकार
पत्नी चे आहेत ते तिने आपल्या सूनबाईला देणे आवश्यक आहे.त्यामुळे घरात नेहमी शांती राहील नि वादविवाद होणार
नाहीत.अर्थात टिळक लावण्याचा अधिकार द्रौपदीचा आहे तेव्हा तिनेच तो करायला पाहीजेल." त्यावर द्रौपदी उद्गारली ," जशी आपली आज्ञा !" असे म्हणून प्रथम तिने राजमाता कुंतीचे चरणस्पर्श केले .तेव्हा त्यांनी आशीर्वाद देत म्हटलं ," सौभाग्यवती भव ! पुत्रवती भव ! आरती कर पुत्री !"
असे द्रौपदी ला बोलून युधिष्ठिर के पाहत त्या पुढे उद्गारल्या,
" आता राजा झाल्यानंतर द्रौपदी ची रक्षा करणे तुझे प्रथम कर्तव्य आहे. आपल्या अनुज भावापेक्षाही कळलं."
" आपली नि पंचलीचीच नाहीतर माझे अनुज भाऊ आणि जनसमुदाय यांच्या सुरक्षेतेची संपूर्ण जबाबदारी माझीच आहे आणि मला त्याची कल्पना आहे माताश्री !"
" नाही पुत्र युधिष्ठिर माझी जबाबदारी अजून तुझ्यावर नाही तर तुझ्या जेष्ठ तातश्रीवर आहे. परमेश्वर करो आणि त्याना दिर्घयुष्य लाभो !" एवढं बोलून दीर्घ श्वास सोडत त्या
पुढे म्हणाल्या ," आज मी माझ्या ह्या पाची पुत्राना तुझ्या स्वाधीन करत आहे पांचली. ह्यांना आता तू सांभाळ आणि विशेष करून माझ्या सहदेव वर विशेष द्यान ठेवावयाचे आहे
तुला." त्यावर द्रौपदी उद्गारली ," हे आपले पुत्र आहेत माताश्री ! अर्थात ह्यांच्यावर माझ्या पेक्षा आपलाच अधिकार
जास्त आहे आणि राहीलही! शिवाय मी ह्या परिवाराशी आणि परंपराशी अजून परिचित नाहीये. अर्थात आपल्या मदतीशिवाय मला काहीही करणे शक्य नाहीये माताश्री !"
" मी कुठं जाणार ? मीही सदैव तुझ्या सोबतच राहणार
आहे. परंतु ह्यांना सांभाळायची जबाबदारी तुझीच राहणार आहे." असे म्हणून भीमसेन कडे पाहून त्या पुढे म्हणाल्या,
" पुत्र भीम, आपल्या दादाला राज दरबारात घेऊन जा."
" जशी आपली आज्ञा ! "
" आपण नाही का येणार माताश्री ?" द्रौपदी ने प्रश्न केला.
" नाही पुत्री ! तू जा मी आजपर्यंत राजसभा पाहिलीच नाही कधी ! कारण मी जेव्हा महाराजशी लग्न करून इथं आली होती तेव्हा माझे महाराज विजयीयात्रा वर निघून गेले.तिकडून आल्यानंतर ही विश्राम करण्याच्या हेतूने विश्राम वाटिका मध्ये निघून गेले. तेव्हा ऋषी किंदंम च्या येथे दुर्घटना झाली. मग माझे महाराज वनात निघून गेले. जी राजसभा महाराणी असताना पण पाहिली नाही ती आता राजमाता झाल्यावर काय पाहणार ? तेव्हा तू जा पुत्री आज चा दिवस
तुझा आहे. माझं हृदय तर आता केवळ तपोवन आहे,मी इथं
बसून तुम्हां सर्वांना फक्त आशीर्वाद देत राहीन." असे म्हटल्यानंतर नाईलाजाने पांचली सहित सर्व भाऊ राज दरबारात जायला निघाले.
राजसभा मध्ये सर्व सदस्य उपस्थित होते.फक्त दुर्योधन
उपस्थित नव्हता. ते कर्णाला अजिबात आवडले नाही. म्हणून तो गांधार नरेश शकुनीला उद्देशून बोलला," मामाश्री
आपल्याला असं नाही वाटत का ? की कमीत कमी आजच्या
दिवशी तरी दुर्योधन ला राजसभा मध्ये उपस्थित राहणे गरजेचे होते." त्यावर गांधार नरेश शकुनी उद्गारला ," अर्धे राज्य हातातून गेले त्याचे दुःख तर होणार ना अंगराज कर्ण !"
" अर्धे राज्य गमावले नाही मामाश्री तर अर्धे राज्य मिळाले."
" हा तर प्रत्येकाचा आपापला विचार असू शकतो ना ?"
तेव्हा विदुर कुलगुरू आपल्या स्थानावरून उठून महाराज धृतराष्ट्रा जवळ येत उद्गारला, " महाराज ,जर आपली आज्ञा असेल तर कुंती जेष्ठ पुत्र युधिष्ठिरला राजसभेत उपस्थित राहण्याची घोषणा करू."
" शुभ मुहूर्त कोणाची वाट पाहत नाही कुलगुरू कृपाचार्य! " तेवढ्यात युधिष्ठिर आपल्या बंधूं सोबत पांचली
सहित राजसभेत उपस्थित होतात नि महाराज धृतराष्ट्रा ना
प्रणाम करतात. तेव्हा महाराज धृतराष्ट्रा त्याना आशिर्वाद देत
म्हणाले ," आयुष्यामान भव !"
" या युवराज आपण येथे बसून घ्या." असे म्हणून महाराज कडे पाहत पुढे म्हणाले ," महाराज आता घोषणा करा." तेव्हा महाराज धृतराष्ट्र उद्गारले ," मी सर्वांत पहिल्यांदा
ब्रह्म, विष्णू आणि महेश या सर्वांना वंदन करतो. कारण त्यांची कृपा या हस्तिनापुरवर असल्यामुळेच सारा जनसमुदाय सुखी आहे आणि राजा न्याय करू शकत आहे.
त्यानंतर दुसरा प्रणाम तातश्री अर्थात ऋषी भार्गव आणि
ब्रहस्पती चे शिष्य गंगापुत्र भीष्म याना प्रणाम करतो. की
ज्यांच्या मुळे हे राज्य चारीही दिशानी सुरक्षित आहे. त्यानंतर
प्रणाम करतो माझ्या पूर्वजांना कारण मी फक्त त्यांच्या उत्तराधिकारी आहे बस्स ! या व्यतिरिक्त माझी अन्य ओळख नाहीये. आणि शेवटी प्रणाम करतो हस्तिनापुर च्या नागरिकाना की ज्यांनी माझ्या सारख्या नेत्रहीन राजाला स्वीकारले. आणि आपला पूर्ण सहयोग दिला. आज मी सर्वांना साक्षी मानून ही घोषणा करत आहे की हस्तिनापुर
राज्यावर माझा जन्मसिध्द अधिकार नाहीये. हे राज्य माझ्या
धाकट्या भावाचे अर्थात पांडू चे आहे. मी फक्त त्याचे प्रतिनिधित्व करतो आहे, म्हणून मी जो काही निर्णय घेतो
तो निर्णय माझा नसून अनुज पांडूचाच असतो. म्हणून मी
आज आमच्या वडिलांचे राज्य दोन भागात वाटत आहे. एक
भाग अनुज पांडूच्या थोरल्या मुलाला देण्यात येत आहे. आणि राहिलेला दुसरा भाग माझ्याकडे राहील आणि माझ्या
नंतर माझा जेष्ठ पुत्र दुर्योधन चा होईल. म्हणून माझा पूर्वज
ययाती चे राज्य खांडव प्रस्त युधिष्ठिर ला दिले जात आहे. राहिलेला दुसरा भाग माझ्याकडे राहील. तातश्री भीष्म, महामंत्री विदुर आणि राज्याचे अन्य सदस्य ह्या निर्णयाशी
सहमत आहेत. पांडुपुत्र आणि यदुवंशी सुध्दा ह्या निर्णयाचे
स्वागत केले आहे.माझी प्रार्थना आहे की युधिष्ठिर आणि चार
बंधूं नि खांडव प्रस्त चे स्वर्गात रूपांतर करून युधिष्ठिर ने राजसुन्य यज्ञ करावा आणि मला विश्वास सुद्धा आहे की युधिष्ठिरच्या कार्यकाल मध्ये सर्वजण सुखी आणि सुरक्षित राहतील."
" जर महाराज ची परवानगी असेल तर राज्यभिषेकला
आरंभ केला जावा." गंगापुत्र भीष्म उठून उभे राहत म्हणाले.
" आज्ञा तर आपण द्यायची आहे तातश्री !" महाराज धृतराष्ट्र उद्गारले. तेवढ्यात महर्षी व्यास येत असल्याची आरोळी ऐकू आली. आणि थोड्याच वेळात महर्षी व्यासानी
राजसभेत प्रवेश केला. तसे सर्वजण उठून उभे राहिले. सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांनी आपला हात वर केला.
तसा गांधार नरेश शकुनी त्यांच्या सामोरी जात म्हणाला ,
" प्रणाम महर्षी ! " कर्णाची त्यांच्याशी ओळख करून
म्हटलं ," हा अंगराज कर्ण आहे ऋषींवर." त्यावर महर्षी व्यास
उद्गारला ," ज्याला त्रैलोकाचे ज्ञान आहे तो ह्या महावीर ला
ओळखत नाही काय ? परंतु शकुनी तू मोठा भाग्यवान आहेस. म्हणून ह्या महान योध्याच्या काळात जन्माला आला
आहेस." असे म्हणून ते पुढे सरकले. तसे वसुदेव श्रीकृष्ण
उद्गारला ," प्रणाम ऋषींवर." तसे व्यास हसून म्हणाले,
" देवकीनंदन प्रणाम नाही तर परिणाम बोला." त्यानंतर
गंगापुत्र भीष्म उद्गारले," प्रणाम ऋषींवर. तसे महर्षी व्यास
उद्गारले ," प्रणाम गंगापुत्र भीष्म ! " त्यानंतर महमंत्री विदुर उद्गारला ," प्रणाम ऋषींवर. " त्यावर महर्षी व्यास उद्गारले ,
आयुष्यमान भव !" त्यानंतर विदुर उद्गारला ," ह्या वहिनी गांधारी !" लगेच महाराणी गांधारी ने खाली वाकून महर्षी व्यासांना वंदन केले. तसे महर्षी व्यास त्याना अखंड सौभाग्यवती भव !" असा आशीर्वाद दिला. त्यानंतर युधिष्ठिर
ने महर्षी व्यास यांना प्रणाम केला. तेव्हा महर्षी व्यास उद्गारले, " आपला अधिकार प्राप्त कर. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव पुत्र की जीवन एक समुद्र आहे. आणि त्याचे मंथन करणे तुझे कर्तव्य आहे. परंतु समुद्र मंथन करत असताना अमृत सोबत विष सुध्दा प्राप्त होईल. तेव्हा तेही
स्वीकारण्याची तयारी असायला हवी. काय ? लक्षात येतंय मी काय म्हणतोय ते.?"
" हां ऋषींवर." युधिष्ठिर उद्गारला. त्यानंतर द्रौपदी सुध्दा महर्षी व्यासांच्या पाया पडली . परंतु द्रौपदी काहीच आशीर्वाद महर्षी व्यासांनी दिला नाही. म्हणून युधिष्ठिर ने त्याना विचारले ," आपण पांचलीला काहीच आशीर्वाद दिला नाही ऋषींवर ?" तेव्हा महर्षी व्यास उद्गारले, " हिच्यातील आत्मशक्ती इतकी प्रचंड आहे की तिला कोणत्याही आशीर्वादाची आवश्यकता नाही." असे म्हणून ते द्रौपदी कडे पाहत पुढे म्हणाले ," आपल्या केसांची नीट काळजी घे
पुत्री !" तेव्हा महाराज धृतराष्ट्र आपल्या स्थानावरून उठून महर्षी व्यास जवळ येऊन उद्गारले ," प्रणाम ऋषींवर. "
" तू आपले स्थान सोडू नकोस राजन .मी इथं केवळ
युधिष्ठिर चा राज्यभिषेक पाहायला आलोय." तेव्हा गंगापुत्र
भीष्म उद्गारले ," तर मग आपणच का करत नाही राज्यभिषेक ऋषींवर."
" नाही गंगापुत्र भीष्म ! मुकुट डोक्यात घालणे किंवा काढणे हे माझे कार्य नाहीये. हा अधिकार तर कुलगुरू कृपाचार्याचा आहे."
" परंतु आपण आपले स्थान तर ग्रहण करा."
" नाही राजन. माझ्यासाठी इथं कोणतेही स्थान नाहीये."
असे म्हणून ते किंचित थांबले. आणि क्षणभर वेळाने उद्गारले,
" शुभ कार्याला विलंब का कृपाचार्य ? खांडव प्रस्त मोठ्या उतावीळ पणाने युधिष्ठिर ची वाट पाहत आहे."
लगेच कृपाचार्य पुढे आले नि काही ऋषीगण पुढे आले त्यांनी मंत्र म्हटले नि कुलगुरू कृपाचार्य यांनी युधिष्ठिर च्या मस्तकावर राजमुकुट ठेवताच सर्वजनांनी महाराज युधिष्ठिरची
जय अशी गर्जना केली. त्यानंतर युधिष्ठिर ने प्रथम महाराज
धृतराष्ट्राचे चरणस्पर्श केले. तेव्हा महाराज धृतराष्ट्रा त्याला
आशीर्वाद देत म्हटले ," यशस्वी भव ! अक्षम भव ! न्यायकरी
भव !" असा आशीर्वाद देऊन ते पुढे म्हणाले," तू आपल्या
बंधूंना घेऊन खांडव प्रस्त ला जरी जात असलास तरी एक गोष्ट लक्षात ठेव की खांडव प्रस्त जरी गेला तरीही तुम्हां पांडवांचे स्थान माझ्या हृदयाच्या गाभाऱ्यात कायम राहील." त्यानंतर युधिष्ठिर आणि द्रौपदी दोघेही महाराणी गांधारी च्या पायी पडला.तेव्हा गांधारी त्याला आशीर्वाद देत म्हणाली , " आज मी चंद्रमौळी ईश्वरशी एकच मागणे मागते ते हेकी पुत्र ह्या राज्याचे भले ही विभाजन झाले असले तरी माझ्या परिवाराचे विभाजन कधीही होणार नाहीये."
" मी पूर्ण प्रयत्न करेन जेष्ठ माताश्री ! जर आपला आशीर्वाद माझ्या मस्तकावर राहीला तर ह्या परिवाराचे विभाजन मी होऊ देणार नाही.याची खात्री बाळगा माताश्री !"
" परमेश्वर करो तुमच्या जीवनातील सारी रात्री पौर्णिमा प्रमाणे उजळू दे आणि तुझ्या भाग्यातील सारी अमावश्य रात्र
माझ्या वाट्याला येऊन दे ,कारण मी तर अंधःकार चे जीवन
जगत आलेय." त्यानंतर युधिष्ठिर द्रौपदी समेत गंगापुत्र भीष्मांच्या चरणस्पर्श केले. नि म्हटले ," प्रणाम पितामहां !"
तेव्हा गंगापुत्र भीष्म उद्गारले ," ह्या राज्या सोबत माझंही विभाजन झाले पुत्रा जनसमुदाय चे अधिकार ,त्यांचे सारे जीवन आणि आत्मसन्माना ची रक्षा करण्याचा प्रयत्न कर
पुत्रा की येणाऱ्या उद्याचा इतिहास तुझ्यावर गर्व करेल.
आणि तू आमच्या गौरवशाली पूर्वजांच्या उत्तराधिकारी आहेस अर्थात त्यांच्या नावाला काळिमा फासला जाईल असे
कोणतेही कार्य करणार नाहीयेस. कारण क्षत्रियांचे जीवन
स्वतःसाठी नसून इतरांसाठी असते. अर्थात त्या धर्माचे पालन
करणे तुझे प्रथम कर्तव्य आहे." त्यानंतर युधिष्ठिर आचार्य
द्रोणाचार्यांचे चरणस्पर्श करतो. तेव्हा आचार्य द्रोण यांनी
आशीर्वाद देत म्हटले की, तुम्ही पाची बंधू गुरूचा गौरव आहात. म्हणून महाराज युधिष्ठिर मी आपल्या शिष्याला
शेवटचा धडा शिकवीत आहे तो हा की क्षत्रियांनी रणभूमीकडे
तेव्हा पाहायचं जेव्हा ती व्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय
शिल्लक असेल तेव्हाच रणभूमीकडे वळाचे. कारण केवळ
विजयासाठी युध्द करणे योग्य नाहीये. युद्ध केवळ जीवन मूल्य आणि शांती राखण्यासाठीच करायला पाहीजेल. आणि
मला पूर्ण विश्वास आहे की तू कधीही क्षत्रिय धर्माचे उल्लंघन
करणार नाहीयेस." त्यावर युधिष्ठिर एकदम अतिशय नम्रपणे
उद्गारला," मी आपल्याला वचन देतो की मी सदैव क्षत्रिय धर्माचे पालन करीन."
" तर मग प्रगती आणि उन्नती च्या मार्गाने आपली यात्रा
आरंभ कर." त्यानंतर कुलगुरू कृपाचार्यांचे चरणस्पर्श केले.
तसे कुलगुरू कृपाचार्य उद्गारले ,"यशस्वी भव ! हा आशीर्वाद
युधिष्ठिर साठी होता नि सौभाग्यवती भव ! हा आशीर्वाद
द्रौपदी साठी होता. त्यानंतर महामंत्री विदूरचे चरणस्पर्श केले.
परंतु त्यांनी काहीच आशीर्वाद दिला नाही म्हणून त्याना प्रश्न
केला की आपण मला आशीर्वाद दिला नाही. तेव्हा विदुर
उद्गारला ," मी इथं तुझा काकाश्री नसून हस्तिनापुर चा महामंत्री आहे या नात्याने मी तुला फक्त शुभ कामना देऊ
शकतो बस्स !" तेव्हा युधिष्ठिर उद्गारला ," आपला आशीर्वाद
घेतल्या शिवाय इथून जाऊ शकत नाही म्हणून मी आपल्या
घरी येईन जिथे आपण फक्त माझे काकाश्री असणार आहात.
महामंत्री नाहीत. आणि मी तीन मातांचा पुत्र आहे. पहिली माता महाराणी कुंती दुसरी माता गांधारी आणि तिसरी माता
हे हस्तिनापुर नगरी आज शुभ मुहूर्तावर मी आपल्या मातेला
प्रणाम करून आशीर्वाद मागत आहे. मी खांडव प्रस्ताचा राजा अवश्य बनलो आहे .पुत्र तर मी सदैव हस्तिनापुर चाच
राहीन." असे म्हणताच महाराज युधिष्ठिर ची जय ची आरोळी
ऐकू येऊ लागल्या.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा