महाभारत ५७ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाभारत ५७ |
महाभारत ५७
द्वारकेवरून बलराम आणि श्रीकृष्ण हस्तिनापुर ला येऊन बरेच दिवस झाले होते. त्यामुळे द्वारीकेवरून सुभद्राचे
पत्र आले होते. ते श्रीकृष्ण वाचत होता. तेव्हा तेथे बलराम
आले नि श्रीकृष्णा ला विचारू लागले की कोणाचे आहे ते पत्र ? " त्यावर श्रीकृष्ण उत्तरला ," द्वारीकेवरून सुभद्राचे पत्र आले आहे दाऊ ." बलराम ने विचारले ," काय लिहिलंय त्यात ?" श्रीकृष्ण उत्तरला ," काही नाही क्षेमखुशलचे पत्र आहे दाऊ !" तेव्हा बलराम ने फ़क्त " हूं s ss म्हटलं. इतक्यात द्वारपाल उद्गारला ," युवराज आपल्या दर्शनाचे अभिलाशी आहेत." तेव्हा श्रीकृष्णाला वाटले की आपल्याला भेटायला युवराज युधिष्ठिर की काय येत आहेत. म्हणून हर्षभराने श्रीकृष्ण बलरामला म्हणाला ," दाऊ युवराज युधिष्ठिर येत आहेत आपल्याला भेटायला मी घेऊन येतो त्याना." तेव्हा द्वारपाल उद्गारला ," मी युवराज युधिष्ठिर विषयी खबर द्यायला नाही आलोय तर युवराज दुर्योधन बद्दल सांगायला आलोय." तेव्हा श्रीकृष्ण उद्गारला ," दाऊ ,
दुर्योधन फक्त आपल्या दर्शनाचे अभिलाशी आहेत. आम्हाला कोण विचारतोय म्हणा." त्यावर बलराम उद्गारला ," तुला कोण विचारत नाही असं कसं म्हणतोयस ? आणि कोणीही घरातील मोठ्या व्यक्तीलाच भेटायला येणार ना ? छोट्याना थोडीच कोणी भेटायला येतं ? छोट्याना फक्त आशीर्वाद दिला जातो."
" हूं बरोबर आहे आपलं ." तेवढ्यातच दुर्योधन प्रवेश करत उद्गारला ," प्रणाम दाऊ !"
" ये बैस ! " असे म्हणून बलराम पुढे म्हणाला ," कृष्णाला ओळखतो की नाहीस ?"
" मला कसा ओळखणार तो त्याची नि माझी भेट तर आजच होतेय ना दाऊ आणि ओळख होणार तरी कशी ? तो
तर आपल्या प्रिय बंधूंच्या स्वागताच्या तयारीला लागला होता ना ? प्रणाम दुर्योधन दादा !" श्रीकृष्ण मुद्दाम असे म्हणाला.
" प्रणाम " दुर्योधन ने दोन्ही हात जोडून नमस्कार केला
आणि म्हणाला, " माझ्याही मनात आपल्याला भेटण्याची
फार इच्छा होती ती आज पूर्ण झाली आणि खरं सांगायचं तर मला तुमच्या मुरलीतून निघणारे सुमधुर सूर ऐकण्याची फार इच्छा आहे अगदी मनापासून." त्यावर श्रीकृष्ण उद्गारला ," परंतु आपली ही इच्छा मी पूर्ण करण्यास मी असमर्थ आहे."
" का बरं ?"
" कारण मुरली मी नंद गावालाच ठेवून आलोय."
" मग तर नंद गावाच्या बाहेर राहणाऱ्या लोकांवर आपण
फार मोठा अन्याय केलाय वसुदेव बरोबर ना दाऊ ?"
" हूं s s ह्याच्या गोष्टी ह्यालाच ठाऊक ? कोणाला कधी
सोडेल नि कोणाला कधी पकडेल याचा काही नेम नाही."
" परंतु दाऊ आपल्याला तर मी कधीच नाही सोडलं."
" मी सोडायला देईन तेव्हा ना ?" तसा लगेच दुर्योधन
विषयांतर करत बोलला ," चला दाऊ मी आपल्याला आमचे
हस्तिनापुर दाखवून आणेन असं मी म्हणतोय. तशी मला
कल्पना आहे की आंमचे हस्तिनापुर आपल्या द्वारका नगरी
इतके सूंदर तर नाहीये, परंतु तरी देखील पाहण्या सारखे
बऱ्याच काही गोष्टी आहेत येथे."
" हां दाऊ अवश्य जाऊन या."
" तू येणार नाहीस का ?"
" नाही. दाऊ मी जरा महामंत्री विदूरला भेटू इच्छितोय.
शिवाय आचार्य द्रोण, पितामहा भीष्मां चे दर्शन घेऊ म्हणतोय. कारण या लोकामुळेच आपले हस्तिनापुर आदरनिय आहे युवराज दुर्योधन."
" बरं मग तू या सर्वांना भेटून ये मी जातो युवराज दुर्योधन
सोबत."
" हो, चालेल."
" चल दुर्योधन." असे म्हणून दुर्योधन सोबत बलराम जातात. त्यानंतर श्रीकृष्ण तेथून महामंत्री विदूरच्या कक्षेत
निघून जातात. विदुर त्यांचे आदर पूर्वक स्वागत करून त्याना
एका आसनावर बसून घेण्याची विनंती करतात. महामंत्री विदूरची पत्नी त्याना भोजन करून घेण्याचा आग्रह करतात.
तेव्हा श्रीकृष्ण त्यांस आपली स्वीकृती देतात. तेव्हा विदूरच्या
पत्नीला फार आनंद होतो. ती श्रीकृष्णा साठी भोजन वाढते
ते श्रीकृष्ण फार आवडीने भोजन करून भोजन फार चविष्ट
झाल्याची ते प्रशंसा करतात. असं भोजन मी प्रथमच खातोय
काकाश्री ! कारण राजभवन चे भोजन खाऊन खाऊन मला
कंटाळा आला होता. परंतु या पुढे कधीही मी इथं हस्तिनापुर ला जर आलो तर अतिथी म्हणून मी आपल्याच घरी
जेवायला येणार." त्यावर स्मितहास्य करत महामंत्री विदुर
उद्गारले ," मग तर आमचे भाग्यच फळफळले म्हणावयाचे."
" परंतु आपले हे वचन विसरू नका म्हणजे झालं."
विदूरची पत्नी उद्गारली.
" नाही भाग्यवान हे कधी काही विसरत नाहीत हीच खरी खास खासियत आहे ह्यांची !" किंचित थांबून ते पुढे म्हणाले," जर आपली परवानगी असेल तर एक प्रश्न विचारू वसुदेव."
" का नाही. अवश्य विचारू शकता आणि खरं सांगायचं तर मी आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठीच इथं आलोय."
" कांपिल्या नगर वरून कोणत्याही मार्गात हस्तिनापुर
पडत नाही मग इथं येणं कसं झालं ?"
" खरं सांगायचं तर आजच्या युगात कोणताही मार्ग
हस्तिनापुर चुकवून पुढे जाऊच शकत नाहीये. शिवाय आपण
स्वतः सुध्दा हे ओळखून आहात. जे काही होत आहे ते विना कारण होत नाहीये आणि जे पुढे होणार आहे तेही विना कारण होणार नाही. कारण प्रत्येक गोष्टीला काही ना काही
कारण असतंच. फक्त योग्य वेळेची वाट पाहणे गरजेचे आहे.त्याशिवाय अन्य मार्ग नाहीये."
" माझ्या ह्या हस्तिनापुरात सध्या फार वाईट दिवस आलेत वसुदेव , नाहीतर युधिष्ठिर सारखा धर्मशीर युवराजला राज्यातून थोडेच काढले जाते."
" कोणताही दिवस शुभ वा अशुभ नसतोच मुळी ! त्यांना
अशुभ आपले कर्म बनविते. फक्त कर्म !"
" जर असा नियम आहे तर वसुदेव युधिष्ठिर ला कोणत्या कर्माची शिक्षा मिळत आहे ? " त्यावर महामंत्री विदुर काहीच
बोलला नाही. परंतु आचार्य द्रोण ने सुध्दा हाच प्रश्न श्रीकृष्णा ला केला. तेव्हा श्रीकृष्णा ने काय उत्तर दिले ते पहा.
" परंतु आपण त्याला शिक्षा का समजता ? नवीन नगरीचा निर्माण करणे म्हणजे दुर्भाग्य नव्हे ! आता मी आपल्याच असा प्रश्न करतो की हे कार्य दुर्योधन करू शकतो
का ? नाही ना ? मग जे होत आहे त्याला होऊ द्या. राजकुमार
युधिष्ठिर आपल्या धाकट्या बंधूं सोबत प्रगतीच्या मार्गावर
चालला आहे. परंतु दुर्योधन लाचार आहे, तो ही यात्रा करू
शकत नाहीये."
" पण असं का ?"
" असं यासाठी आचार्य दुर्योधन स्वतः काहीच नाहीये. तो
महाराज धृतराष्ट्र सारख्या वृक्षाची फक्त एक फांदी आहे.
आणि वृक्षांची मुळे जमिनीत असतात. अर्थात धरतीला गच्च पकडून ठेवतात. पंरतु ती मुळे ती जागा सोडून दुसरीकडे कुठेही जाऊ शकत नाहीत. अथवा आपल्या स्थानावरून ना पुढे सरकू शकत ना मागे सरकू शकत. फक्त ती तुटून खाली पडू शकतात. तीच अवस्था दुर्योधनाची आहे." हे ऐकून आचार्य द्रोण ना धक्काच बसला. कारण श्रीकृष्णा च्या वक्तव्यातून हेच सूचित होतेय की दुर्योधन विनाशाच्या मार्गावर चालला आहे. त्यातून त्याला कोणीही वाचवू शकणार नाही. त्यामुळे की काय ते एकदम ओरडले ,
" वसुदेव काय बोलताय तुम्ही हे ?"
" आचार्य जर आपण प्रश्न करत असाल तर त्याचं उत्तर
ऐकण्याची पण तयारी असणे आवश्यक आहे आचार्य आणि
आपल्या बद्दल मी काय बोलावे ? आपण तर स्वतःशीच
झुंज लढत आहात. कारण आपणच दुर्योधन आहात नि आपणच अर्जुन. परंतु एक गोष्ट द्यानात ठेवा आचार्य की अर्जुनच एक असा नर आहे जो आपल्याला नारायणचे
दर्शन घडविल. " एवढे बोलून श्रीकृष्ण आचार्य द्रोणचा
निरोप घेतात."
युधिष्ठिर ने एवढे समजावून ही अर्जुनला ते पटलं नाही.
परंतु जेष्ठ बंधूचा विरोध करणे हे पांडवांच्या रक्तामध्ये नव्हतेच. म्हणून आपला सारा राग तो एका वृक्षावर काढत
होता. एका पाठोपाठ एक बाण तो त्या झाडावर सोडून तो
त्या वृक्षाला घाव करीत होता. ते गंगापुत्र भीष्म यांनी पाहिले.
तसे ते त्याच्या पाशी आले नि त्यांनी त्याच्या खांद्यावर आपला हात ठेवला. तसा अर्जुन गर्रकन मागे वळला. समोर
पितामहा ना पाहून उद्गारला ," पितामहां आपण ?"
" हा वत्स ! परंतु वृक्षावर आपला राग का काढत आहेस ?
हा वृक्ष तुझा वैरी आहे का ? "
" नाही पितामहां परंतु आपल्याला माहीत असेलच. मी
असं का करतोय."
" क्रोध करणे हाच मनुष्यामध्ये सर्वात मोठा अवगुण आहे. कारण त्यावेळी त्याला दोषी आणि निर्दोष मधला फरक कळत नाहीये. त्यामुळेच तो आपला राग निर्जीव वस्तूवर किंवा सजीव परंतु ते काही बोलू शकत नाही अश्या सजीवावर आपला राग काढतात. अर्थात तू धृतराष्ट्राने केलेल्या अन्यायाचा राग तू ह्या निष्पाप वृक्षावर काढत आहेस आणि तो बिचारा वृक्ष स्वतःची रक्षा पण करू शकत नाही. परंतु खरं पाहायला गेलं तर क्षत्रियाचे पहिलं कर्तव्य असतं की लाचार लोकांची मदत करणे होय."
" जर आपल्याला माहीत होते पितामहां की मोठे बाबा
आमच्यांवर अन्याय करत आहेत तरी पण आपण गप्प राहिलेत ? काहीच कसे बोलले नाहीत त्याना ? असं का
केलात तुम्ही पितामहा ? असं का केलात ? "
" वत्स मी वचनात अडकलोय. फक्त उपदेश करू शकतो.
आदेश देऊ शकत नाही. "
" मग मला सांगा.आपल्यावर अन्याय केला जातोय हे माहीत असूनही गप्प राहणे म्हणजे अन्याय करणाऱ्या व्यक्तीला आपण मुबा दिली असा त्याचा अर्थ होत नाही काय पितामहां ? "
" अवश्य पुत्र अवश्य ! परंतु हस्तिनापुर ला विनाशापासून
वाचविण्याचा दुसरा कोणता उपायच नव्हता."
" जर मोठे बाबा बाजूला झाले तर माझे हे धनुष्यच सर्व
समस्याचे समाधान होऊ शकते."
" केवळ युद्ध केल्याने सर्व प्रश्न सुटतील असं नाहीये पुत्र.
खरं सांगायचं तर हे सारे कशा मुळे घडले ते माहितेय तुला.
नाही ना ? मग ऐक. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. असे
म्हणतात आणि खरेही आहे ते. आपला पुत्र पुढे काय करील
हे त्याच्या बालपणाच्या वगण्यावरून त्याच्या माता-पित्यानी ओळखायांचे असते. अर्थात मी ते ओळखले होते म्हणूनच मी धृतराष्ट्राला हस्तिनापुर चा भावी नरेश म्हणून घोषित केले होते. एक नेत्रहीन व्यक्ती राजा बनू शकत नाही हे मला माहीत नव्हते अशातला भाग नाही. मला माहीत होते. परंतु धृतराष्ट्र करुवंशचा जेष्ठ पुत्र तर होताच शिवाय माझा शिष्य ही होता. त्याशिवाय मला हे देखील माहीत होते की जर ह्याला हस्तिनापुरचा नरेश बनविले नाही तर तो विचार करू लागेल की आपल्यावर अन्याय झालाय आणि हीच समजूत पुढे त्याची महत्वकांक्षा ठरेल आणि तीच समजूत हस्तिनापुर साठी हानिकारक ठरेल. म्हणून मी धृतराष्ट्रालाच हस्तिनापुरचा नरेश बनविण्याचा विचार केला होता. परंतु विदुरचे नीतिज्ञान पुढे मला काहीच करता आले नाही. अर्थात त्याला नीतिज्ञान मीच शिकविले होते. म्हटल्यावर मीच त्याचे पालन केले नाही तर लोकां सांगे ब्रम्हज्ञान आणि स्वतः राहावे कोरडे पाषाण असे नाही का होणार ते. म्हणूनच मला त्यावेळी गप्पच बसावे लागले. त्यानंतर माता सत्यवती ने पांडूला हस्तिनापुरचा नरेश म्हणून घोषित केले. तेव्हा जर तसे केले नसते नि धृतराष्ट्रा लाच नरेश केले असते तर त्याची उच्चकांक्षा तेव्हाच पूर्ण आता संपुष्टात झाली असती नि आता जी समस्या उद्भवली आहे ती उद्भवली नसती. कारण त्याला स्वतःलाच हे जाणवले असते की युधिष्ठिरच नरेश बनण्याच्या योग्य आहे. परंतु जे झाले नाही त्यावर आता पश्चात्ताप करून काय फायदा त्यासाठी भविष्याकडे पाहिले पाहिले. शांतीचा मार्ग स्वीकारला पाहिजे."
" मग ठीक आहे. आपण आमच्या सोबत चला पितामहां
आम्ही हे राज्याचा त्याग अवश्य करू शकतो. परंतु आपल्याला आम्ही त्यागू शकत नाही पितामहा !"
" तुझ्या सोबत मी येऊ शकत नाही वत्स ! जशी गाय आपल्या गोट्यात कुंटीवरच बांधलेली असते. अगदी तसेच मी हस्तिनापुरच्या सिहांसनाशी बांधलेला आहे." असे म्हणून
अर्जुनला आलिंगन देतात. नि तेथून निघून जातात.अर्जुन
त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे फक्त पाहतच राहतो.
विदुर गंगापुत्र भीष्मां ना भेटण्यासाठी त्यांच्या कक्षेत आला
नि त्याना अभिवादन करत म्हणाला ," प्रणाम तातश्री !"
" आयुष्यमन भव. काही खबर आणलीस का विदुर ."
" हां तातश्री ! दुर्योधन बलरामना हस्तिनापुर दाखवायला घेऊन गेलाय."
" आता काय हवंय त्याला ?"
" ह्या राज्याचे झालेले विभाजन त्याला आवडलेले नाहीये. अर्थात त्याची इच्छा नेहमी हीच राहील की आपल्या हातातून गेलेले अर्धे राज्य वापस हस्तिनापुर ला कसे मिळेल."
" आता त्याच्या जवळ असं कोणतं राज्य आहे की त्याची
तो सीमा वाढवू पाहतोय."
" महाराज धृतराष्ट्र आपल्या पुत्राच्या डोळ्याने स्वप्न पाहत
आहेत तातश्री !"
" अरे , देवा ! ही ईर्ष्या ची आग विझणार आहे किंवा नाही?" तेवढ्यात तेथे श्रीकृष्णाचे आगमन होते. श्रीकृष्णाला
पाहून गंगापुत्र भीष्म उद्गारले ," या देवकीनंदन आणि माझा
प्रणाम स्वीकार करा. "
" आपण वडीलधारी माणसे आहात आपल्या सारख्यानी
आमच्या सारख्या लहानांना आशीर्वाद द्यायचा असतो. नमस्कार नव्हे !"
" हां परंतु मी आपल्या पेक्षा मोठा नाहीये देवकीनंदन."
" परंतु वयाने तर मोठे आहात ना ?"
" आणि आपण आमचे अतिथी आहात वसुदेव. अतिथी
देवभव असं म्हटलं जाते. हे तर तुम्ही नाकारू शकत नाही ना ?"
" बोलण्या मध्ये आपल्याशी कोणी जिंकू शकत नाही
विदूरजी !"
" बसून घ्या."
" अगोदर आपण बसावे पितामहा." असे म्हटल्यानंतर
गंगापुत्र भीष्म बसून घेतात. तेव्हा गंगापुत्र भीष्म उद्गारले,
" राज्यभिषेक नंतर पुढील काय संकल्प आहे वसुदेव.?"
" मी तर पांडवा सोबत खांडव प्रस्त जाऊ इच्छित आहे
पितामहा."
" बलराम नाही येणार का सोबत ?"
" दुर्योधन त्याना फिरवायला घेऊन गेलाय. ते काय अजून
आलेले नाहीत. बहुधा काही दिवस ते इथंच राहण्याची शक्यता आहे. मोठे बंधू आहेत माझे ते.त्यामुळे मी त्याना
काही बोलुही शकत नाही." त्यावर कोणीच काही बोलले नाही. तर दुसरीकडे दुर्योधन मामाश्री च्या कथनानुसार बलराम ला खुश करण्यासाठी पंच पक्वांने आग्रह करून करून खाऊ घालतात. तेव्हा बलराम उद्गारला ," अरे बस बस
अजून किती खाऊ मी ! "
" अजून थोडी खीर तर खा." दु:शासन कडे पाहत दुर्योधन उद्गारला ," दु:शासन अजून वाढ थोडी !"
" अजिबात नको."
" दाऊ, आपल्या मताने सर्वात उत्तम शत्र कोणते ?"
" माझ्यासाठी म्हणशील तर नांगरच सर्वात उत्तम. परंतु
सर्वांत उत्तम शस्त्र गदा आहे.आणि तुम्ही सर्वांनी आचार्य द्रोण
सारख्या आदरनिय गुरू कडून शस्त्रविद्या प्राप्त केली आहे.
त्यांचा शिष्य होणे हे सुध्दा सौभाग्यच आहे."
" आपला शिष्य होणे हे पण तर सौभाग्य आहे ना दाऊ !"
" नाही. मी कुठला गुरू होतोय. मला फक्त गदा चांगली
शिकविता येते बस्स !"
" आपण भीमसेन ला शिष्य बनविले होते हो की नाही ?"
" माझ्यासाठी तर जसा भीम तसाच दुर्योधन.तेव्हा मी तुला सुध्दा अवश्य गदा युध्द शिकवींन. खांडव प्रस्त चे कार्य
उरकताच मी श्रीकृष्णाला द्वारकेला पाठवून देईन काही दिवस
मी इथं अवश्य राहीन."
" काही दिवस नाही मी जोपर्यंत गदा युद्ध मध्ये सर्वश्रेष्ठ
गदाधर ठरत नाही तोपर्यंत मी शिकत राहणार."
" ठीक आहे. मी तुला शिकवींन. अगोदर राज्यभिषेक होऊ द्या. मग पाहू !"
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा