Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

महाभारत ५९ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

महाभारत ५९
महाभारत ५९

 



                          महाभारत ५९

   पांडव खांडव प्रस्त निघाले. त्यांच्या सोबत , ब्राम्हण ,  क्षत्रिय , वैश्य , शूद्र सुद्धा जात आहेत. कारण त्यांच्या सोबत
हस्तिनापुर ची आत्मा सुद्धा जात आहे. श्रीकृष्ण , नांगरधारी
बलराम , द्रोणाचार्य  , कृपाचार्य , गंगापुत्र भीष्म  सुद्धा भूमी
पूजनासाठी जात आहेत. शिवाय महर्षी व्यास सुद्धा आहेत.
त्याना जाणे तर आवश्यकच होते , कारण  तेथे जाऊन त्यांच्या शिवाय दुसरा भूमी पूजन कोण करणार ? नाही का ?
आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे खांडव प्रस्त ला श्रीकृष्णाने पांडवांची कर्मभूमी म्हटलं आहे ,अर्थात अवश्य
तेथे काहीतरी चमत्कार होणार हे निश्चितच आहे ,कारण
श्रीकृष्ण विना कारण  काही बोलत नाहीत. श्रम आणि प्रकृती
यांचा संघर्ष पाहण्या सारखा निश्चितच आहे. खांडव प्रस्त ही
एक  आबड-धोबड जमीन तर आहेच. शिवाय नापीक ओसाड ही आहे इथं पायाला टोचून रक्तबंबाळ करणारे  काटे सुद्धा आहेत. आणि जंगल आहेत, त्यात जंगल  प्राणी , असुर आणि नागवंशी ही इथं राहतात. ते कोणाला ही तेथे
येऊ देत नाहीत.असे ओसाड प्रदेश पांडवांना दिलेला पाहून
हस्तिनापुर ची प्रजा आपसात कुजबुजत आहेत की महाराज
ने आपल्या धाकट्या भावाच्या पुत्रावर फार अन्याय केलाय.
हा ओसाड प्रदेश त्यांनी पांडवांना देऊन काय सिध्द केलं?
तेव्हा दुसरा एकजण म्हणाला ," तिकडे बघ. स्वत:गंगापुत्र
भीष्मानी सुध्दा आपली मान खाली घातली. " त्यावर आणखीन कुणीतरी म्हणाला ," त्यांचे काही विचारू नका.
ते सुद्धा हा अन्याय रोखू शकत नाहीत कारण ते प्रतिज्ञा बद्ध
आहेत." आणि मला तर आश्चर्य तर पांडू पुत्रा बद्दल वाटते.
आपल्या मोठ्या चुलत्याने आपल्यावर अन्याय केला हे
दिसत असूनही काही न बोलता जे त्यांनी दिलं ते ह्यांनी
स्वीकारले. कोणाच्याही चेहऱ्यावर अजिबात उदाशी नाहीये.
सर्वांचे रथ मध्य स्थानी आल्यानंतर थांबले.त्यानंतर सर्वजण
रथातून खाली उतरले. तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनला विचारले,
     " ही कशी  वाटली आपली कर्मभूमी ?" तेव्हा अर्जुन
उद्गारला ," ही कर्मभूमी आमच्यासाठी पूर्वजनिय आहे. केशव
इथं प्रश्न हा नाहीये की ही आम्हाला कशी वाटली ? त्यावरून
मला एक प्रसंग आठवला सांगतो ऐक. एके दिवशी आमच्या
गुरुवर्यानी आमची परीक्षा घेण्याच्या इच्छेने एका झाडावर पक्षी यंत्र ठेवून आम्हाला सर्वांना विचारले की तुम्हाला ह्या
झाडावर काय दिसत आहे ? आम्ही सर्वांनी गुरुवर्यांच्या
ह्या प्रश्नाचे उत्तर दिले. मला जेव्हा विचारले की तुला काय
दिसत आहे ?  तेव्हा मी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले की मला
फक्त पक्षाचा एक डोळा दिसत आहे . आज सुध्दा तसाच दिवस आहे. ही नापीक ओसाड ढोंगराळ आणि झाडा-झुडपाणी वेढलेली असली तरी मला फक्त आपला आशीर्वाद
दिसयोय बस्स ! या व्यतिरिक्त दुसरे काहीही दिसत नाहीये मला ." त्यावर श्रीकृष्ण उद्गारला ," तर मग एकच काम कर
पार्थ आपले धनुष्य उचल नि इंद्राला सादर प्रणाम
करून कार्याचा आरंभ कर. " अर्जुन उत्तरला ," जशी आपली
आज्ञा !" असे म्हणून प्रथम  कुलगुरू कृपाचार्याना  प्रणाम केला. तेव्हा कृपाचार्यानी विजयी भव असा आशीर्वाद दिला.
त्यानंतर अर्जुनाने गुरुवर्य द्रोणाचार्याना वंदन केले. तेव्हा
आचार्य द्रोणाचार्यानी आशीर्वाद देत म्हटलं ," इंद्र तुझी सहायता करेल आणि सूर्य तुला आशीर्वाद देईल." त्यानंतर
गंगापुत्र भीष्मां चे चरणस्पर्श करतो तेव्हा ते त्याला आशीर्वाद
देत म्हणाले ," यशस्वी  भव ! भूमी पूजन केल्यानंतर कार्याला आरंभ कर वत्स ! " त्यानंतर ब्राह्मणांनी वेद मंत्र पठण केले.
यथासांग भूमी पूजन केले. श्रीकृष्णा ने बलराम ला त्याचा
नांगर भीमसेन जवळ द्यायला सांगितला. भीमाने नांगर
हातात घेऊन जमिनीवर मारायला सांगितले. भीमाने तसे केले. भूमी पूजनाचा कार्यक्रम आटोपतच पांडव सोडून बाकीचे सर्वजण म्हणजे गंगापुत्र भीष्म , आचार्य द्रोण ,
कुलगुरू कृपाचार्य , आणि बलराम आणि इतर सर्वजण
हस्तिनापुर ला परतले. ऋषींवर आपल्या आश्रमात परतले.
आता फक्त पांडव आणि काही नगरजन थांबले होते.
त्यानंतर इतरांनी सुध्दा तलवारी ने वगैरे झाडे झुडपे तोडून जमीन साफ करू लागले.केवळ सहा महिन्यांतच त्या पाच शक्तिशाली वीरांनी खांडव वनाचं घनदाट अरण्य तोडून टाकलं होतं.  त्यातील गगनचुंबी वृक्ष होत्याचे नव्हते केले होते . नेहमी खांद्यावर गदा बाळगणारे राजपूत भीम प्रातःकाळी खांद्यावर धारदार परशु टाकून रानात  गेले की सारे अवाढव्य वृक्ष आणि काटेरी लतावेली त्या नाहीशा करून ते  परत फिरत पाचांपैकी एकाला आपल्या मातेजवळ आणि पांचली जवळ रक्षणासाठी ठेवून सकाळी चार दिशांना चार जात आणि कामाला लागत. त्यांच्या कर्तुत्वाने हजारो वर्षात कधी सूर्यप्रकाशाचा स्पर्शही झालेला नव्हता ती आता प्रकाश स्पर्शाने पावन   होत होती. खांडववणाचे पठारात रूपांतर झाले.त्यावेळी नागवशीयांनी त्याना प्रतिकार केला.परंतु अर्जुनाने अग्निबाण सोडल्यामुळे अग्नीदेवाने  संपूर्ण जंगल जाळून भष्म केले. शिवाय प्रसन्न होऊन वरुनदेवाला प्रार्थना केली की तू अर्जुनची सहायता कर. तेव्हा वरुनदेव ने अर्जुनला गांडीव धनुष्य आणि अक्षय तुनीर , वानर चिन्ह ध्वज आणि दिव्य रथ ही दिला. तसेच अग्नीच्या साहाय्याने आणि श्रीकृष्णाच्या कृपेने खांडव प्रस्त एकदम स्वच्छ झाले. दानव शिल्पी मय  राक्षस अत्यन्त घायाळ अवस्थेत असताना त्याने अर्जुन कडे शरणांगती मागितली आणि अर्जुन ने देखील मोठ्या मनाने त्याला जीवदान दिले. त्यानंतर मय राक्षसाने श्रीकृष्णाच्या अज्ञानुसार पांडवांसाठी त्याने अश्या एका राजसभा भवनाची निर्मिती केली.कि तसे
राज्यसभा भवन  साऱ्या त्रैलोक मध्ये ही नव्हते. शिवाय मय शिल्पी इतकेच करून थांबला नाही तर त्याने बिंदू सरोवर मधून दानवराज ऋषीपर्व कडून देवदत्त नावाचा शंक आणि भीमसेन साठी गदा आणून दिली. त्यानंतर अर्जुनाने  आपले धनुष्य उचलून आकाशाच्या दिशेने पर्जन्य बाण सोडला. आणि थोड्याच वेळात मेघ दाटून आले नि मुसळदार पाऊस पडू लागला. त्यामुळे हिरवीगार गवत उगवले. झाडांना नवीन पालवी फुटली. त्यानंतर श्रीकृष्णा ने देव वास्तू शिल्पी विश्वकर्माला बोलवून सांगितले की," इंद्र दरबार पेक्षाही सूंदर इंद्रप्रस्थ नगर तयार कर."
     " जशी आपली आज्ञा !" असे म्हणून त्याने एका सुंदर
नगरीचे निर्माण केले. नि श्रीकृष्णा समोर हात जोडून उभा
राहात बोलला ," प्रभू अजून काही सेवा !" तेव्हा श्रीकृष्ण
उद्गारला ," नाही. देव लोक शिल्पी  विश्वकर्मा तुझं काम झाले
आहे ,आपण आपल्या स्थानी निघायला आता काही हरकत
नाहीये." तसा तो गुप्त झाला. त्यानंतर युधिष्ठिर सहित साऱ्या पांडवांना दाखवायला आणले. पांडवांना ते खूप आवडले.
तेव्हा युधिष्ठिर त्याचे आभार प्रकट केले. तर तो म्हणाला आभार माझे नाही तर वसुदेव श्रीकृष्णाचे माना , कारण मी
फक्त त्यांच्या आदेशाचे पालन केले आहे बस्स !"
तेव्हा श्रीकृष्ण युधिष्ठिर ला म्हणाले ," महाराज कशी वाटली
आपली कर्मभूमी ?" त्यावर युधिष्ठिर उद्गारला ," माझी कर्मभूमी तर आपली कृपा आहे वसुदेव ."
      " नाही महाराज कुणाची कृपा प्रसादाची कर्मभूमी कदापि
नसते. आपल्या कर्मभूमीच्या शिला आपल्यालाच तोडायला
लागतात. त्यानंतर त्यात आपल्या श्रमाचे खत घालावे लागते. आपण तर राज्य स्थापन केले आहे महाराज आतापासूनच त्याच्या सुरक्षेतेचे विषयी विचार करणे आरंभ
करा." तेव्हा सहदेव ने शंका प्रकट करत म्हटले ," काय ? ते
लोक आम्हाला इथं ही सुखाने जगू देणार नाहीत का ?"
तेव्हा श्रीकृष्ण उद्गारला ," सहदेव , कर्मयोगाच्या भट्टी मध्ये
सर्वांनाच जळावे लागते त्या शिवाय ते मातीचे मटके पक्केही होते नाही नि उजळून दिसत नाहीये. त्याक्षणी तर अर्जुन काहीच बोलला नाही. परंतु नंतर एकांत मध्ये असताना
अर्जुन ने श्रीकृष्णा ला विचारले की केशव आपण राज्याच्या
सुरक्षेतेचे विषयी बोललात त्याचा अर्थ काय आहे ?"
     " राजनीतीचा अध्याय हा सुध्दा आहे ,अर्जुन की आपल्या
आजूबाजूच्या राज्यांशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करायचे असतात. आणि जर कोणी राजा आपली मित्रता स्वीकारत
नसेल तर त्याचे पुढील नि मागील दरवाजा खटखटवायला
पाहिजे. म्हणजे त्याच्या दोन्ही सीमा असुरक्षित राहिल्या
पाहिजेत म्हणजे तो आपोआपच शरणांगती पत्करायला
भाग पडेलच."
     " मग मला त्यासाठी काय करावे लागेल केशव ?"
     " विवाहात बंधनाची मारलेली गाठ एकदम घट्ट असते . परंतु हे सुद्धा द्यानात ठेवायला पाहिजे खांद्यावरचा शेला
खांद्यावरून खाली पडला नाही पाहिजे. अर्थात जे करणार
आहेस याची चाहूल गांधार नरेश शकुनीला कळले नाही पाहिजे. म्हणून सर्व सैन्य सोबत घेऊन न जाता एकटाच
जाण्याचा प्रयत्न कर पार्थ ! जर सैन्य  सोबत नेलेस तर ही
गोष्ट गुप्त राहणार नाहीये. इंद्रप्रस्थ निर्माण केले म्हणजे
तुमचे कार्य संपले असे नाहीये. हा तर केवळ पहिला अध्याय
समाप्त झाला. परंतु इथंच न थांबता पुढील अध्यायाचे वाचन
करणे आवश्यक आहे. कारण आता जरी इंद्रप्रस्थ मध्ये शांती
दिसत असली तरी नदीच्या पलीकडे वादळ घोंगावत आहे,
त्या चक्री वादळ पासून सावध राहा." त्यावर अर्जुन न समजल्याने गोंधळून बोलला ," तुला काय म्हणावयाचे आहे
ते मला कळलेच नाही तेव्हा जरा स्पष्टीकरण करून सांग "
      " तुला काय वाटतं ? तुम्हाला खांडव प्रस्त देवून गप्प
का बसला असेल दुर्योधन ? नाही अर्जुन तिकडे षडयंत्रा चे
धडे आज सुध्दा गिरविले जात आहेत. तेव्हा सदैव सतर्क
राहणे हेच प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य आहे आणि कर्म सुद्धा
आहे."
     एके दिवशी एक ब्राह्मण अर्जुन कडे मदत मागण्यासाठी
पळत आला. त्याची काही लोकांनी पळवून नेली होती.
परंतु  त्यावेळी अर्जुन चे गांडीव धनुष्य द्रौपदीच्या महालात
होते. आणि  त्या क्षणी द्रौपदीच्या शयनगृहात एकांत मध्ये
युधिष्ठिर होता.अर्थात त्यांच्यात एक नियम बनला होता. की
एका कुणा सोबत द्रौपदी एकांत मध्ये असेल तर दुसरा कोणीही तिच्या महाली जाणार नाही. आणि समजा तसे
कोणी केलेच तर त्याला एक वर्ष प्रायश्चित्त यात्रेला जावे लागणार. असा नियम बनविला असताना त्या दोघांनच्या
एकांतात जावे तरी  कसे ? परंतु नाही गेले तर ब्राह्मणाला  त्याच्या गायीचे रक्षण करण्याचे दिलेले वचन व्यर्थ जाईल. आणि अर्जुनला ते कदापि मान्य नव्हते. म्हणून परिणामाची
पर्वा न करता बेधडकपणे युधिष्ठिरच्या कक्षेत शिरला.
      अर्जुनला आपल्या कक्षेत आल्याचे पाहून युधिष्ठिर ने
अंदाज लावला की नक्कीच काही महत्त्वाचे काम असणार
त्याशिवाय अर्जुन अश्या आमच्या एकांताच भंग नाही करणार , असा विचार करून काही काम होतं का अर्जुन ?
असे तो अर्जुनला विचारतच होता. पण त्या अगोदरच अर्जुन
स्वतःहून बोलला ," माफ करा दादा मला माझ्या धनुष्याची
यावेळी गरज नसती तर मी नियमाचा भंग कदापि केला नसता ." त्यावर युधिष्ठिर हसून म्हणाला ," काही हरकत नाही. हा तुझ्या दादाचा कक्ष आहे इथं तू केव्हाही येऊ शकतोस." त्यावर अर्जुन उद्गारला ," दादा मी एक जरूरी कामासाठी जात आहे तेथून आल्यानंतर सर्वकाही सांगतो."
असे म्हणून अर्जुन तेथून निघाला ही !
       अर्जुन त्या ब्राम्हणा सोबत गेला नि त्याच्या गायी त्या
चोरा कडून वापस  मिळवून दिल्या. त्यानंतर नियमाचा भंग
केल्याने प्रायश्चित्त करण्याचा निर्णय त्याने स्वतःच घेतला.
युधिष्ठिर नको नको म्हणत असतानाही तो निघालाही यात्रेला.
परंतु खरे सांगायचे तर हे फक्त निमित्त होते. त्याला यात्रेला
जाण्यासाठी ! कारण श्रीकृष्णा ने त्याला सांगितले तू कुठं
निघाला आहेस हे कोणालाही कळता कामा नये. म्हणून ही
खबरदारी घेतली गेली. परंतु गांधार नरेश शकुनीच्या गुप्तहेर
ने ही बातमी शकुनीला पोहोचविली. तसे गांधार नरेश शकुनीचे एकदम टवकारले. नि म्हणाला ," ही अर्जुनची प्रायश्चित्त यात्रा मला काही कळेनाशी झालीय."
     " का मामाश्री ?"
     " प्रायश्चित्त यात्रा विवाह करण्यासाठी नसते अंगराज आणि त्याने एक विवाह आमच्या मगध नरेश च्या मागे केला
आहे अर्थात पांडव मैत्री वाढवत आहेत अंगराज मैत्री ! याचा
अर्थ येतोय का तुम्हां लोकांच्या लक्षात ? आपली ताकद
वाढवत आहेत."
      " आपल्याला काय   द्यानी , मणी , स्वप्नी सदानकदा पांडवचा दिसतात का ? नाही म्हणजे उठता बसता त्यांच्याच
नावाचा जप तुमच्या मुखी सुरू असतो म्हणून म्हणतोय . "
दुर्योधन उपहासपूर्ण स्वरात उद्गारला.
        " दुर्योधन मूर्खां सारखा हसू नकोस. अगोदर मी काय
म्हणतोय ते द्यानात घे." गांधार नरेश शकुनी एकदम चिडून
म्हणाला. तसा दुर्योधन चपापला. तसा गांधार नरेश शकुनी
पुढे म्हणाला ," आता तूच मला सांग ,अर्जुन चे धनुष्य द्रौपदी च्या कक्षेत काय करत होते ? मला तर वाटत की हे सर्व पूर्व
नियोजित होतं.वसुदेव श्रीकृष्णाने काही तरी मोठा खेळ
खेळलेला दिसतोय." त्यावर दु:शासन उद्गारला ," मामाश्री
एकदम बरोबर बोलताहेत दादा !" तसा कर्ण उद्गारला ," माझं
तर म्हणणं आहे की क्षत्रियांनी नेहमी क्षत्रिया प्रमाणेच चाल
खेळायला पाहिजे. अर्थात सरळ रणभूमीकडे चालायला हवं
आहे." त्यावर गांधार नरेश शकुनी संतापाने उद्गारला ," कर्ण
कधीतरी रणभूमी सोडून दुसरे काहीतरी बोलायला शीख अंगराज कर्ण रणभूमी तर क्षत्रियांची सासर आहे तेव्हा आपल्या सासरी पूर्ण तयारी करूनच जायला हवं अर्थात
ह्या रणभूनितीची आखणी करण्यास  सुरुवात करा पुत्रां नो!
अर्जुन या क्षणी भारताच्या पश्चिम टोकाला पोहोचला आहे.
अर्थात तो आपली यात्रा द्वारीकेला समाप्त करेल."
     " द्वारीकेलाच ना ? पोहोचला तर पोहोचू दे ,द्वारीका आमचे काही बिघडवू शकत नाहीये."
     " नाही कर्ण नाही द्वारकेला आपल्या मुठीत बंध करून
ठेवणे अत्यन्त आवश्यक आहे. आपल्या एका टोकाला मणिपूर तर दुसऱ्या टोकाला द्वारीका.......जर वसुदेव ची पुत्री
सुभेद्रा हीचा  विवाह दुर्योधन सोबत झाला तर विवाह राजनेहचे हे जबरजस्त उत्तर असेल आपल्या कडून."
     " विवाह राजनेह ? " दुर्योधन ला याचा अर्थ न कळल्याने
त्याने गोंधळून विचारले.
     " हां पुत्र हां विवाह राजनेह अर्थात जे घराणे आपली
मुलगी देईल ते विरोधाच्या बाजूने उभे तर राहणार नाही ना ?
अर्थ समजला " तेव्हा सर्वांनी नकारात्मक आपली मान डोलावली. तसा गांधार नेरश शकुनी उद्गारला ," प्राचीन
काळापासून ते आधुनिक काळातही राजा नि महाराजा मध्ये
राजभवन राणी आणि पट्टराणी ने भरलेले असतात ते केवळ
कामुक्ता संतुस्टी साठी करत नव्हते काही तर हे विवाह मैत्री करून आपसातील वैर संपविण्यासाठी केले जात होते. अर्थात कुणी आपल्या जावयाशी युध्द तर करणार  आहे का ? नाही ना ?"
      " तर मग मला काय करावे लागेल मामाश्री ते सांगा."
      " तुला सुध्दा विवाह करायला पाहिजे दुर्योधन."
      " हां पण कोणाशी ?"
      " वसुदेव पुत्री सुभद्रा हिच्याशी !"
      दुर्योधन ने आपल्या मनात निश्चय केला की सुभद्रा चा
मोठा भाऊ तर सध्या आपल्याला गदा युध्द चा अभ्यास करवतोय तर हीच संधि आहे बलरामला खुश करून सुभद्रा
हे मोती आपल्या पदरात पाडून घेणे.अर्थात त्यासाठी बालरामला खुश करणे जरुरी आहे. असा विचार करून
दुसऱ्या दिवशी बलराम शी गदा युध्दा चे असे प्रदर्शन घडविले
की बलराम खुश झाला नि दुर्योधन ला म्हणाला ," प्रिय शिष्य
दुर्योधन खऱ्या अर्थाने तू आज गदा युद्धात इतका प्रवीण झालास की  सर्वश्रेष्ठ गदाधर म्हणून मी तुला घोषित करतोय."
     " धन्यवाद गुरुदेव !"
     " मी तुझ्यावर अति प्रसन्न आहे मांग तुला काय पुरस्कार
पाहिजे ?"
      " मागू ....द्याल ?"
      " हां हां अवश्य !'"
      " मला दुसरे काही नको. आपल्या बहिण सुभद्रा हिचा हात माझ्या हातात द्या." त्यावर बलराम किंचित विचारमग्न
होऊन पुढे म्हणाला ," जर तू माझा हात मागला असतास तर
मी तुला अवश्य दिला असता. परंतु तू माहितलास सुभद्राचा
हात. तो हात तर तिच्या जवळ आहे ना ? शिवाय ह्या विषयी
मला पिताश्री शी बोलावे लागेल.परंतु पिताश्री माझे म्हणणे
टाळणार नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे. म्हणून तू निश्चित रहा सुभद्रा तुझीच होईल."

क्रमश:



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..