महाभारत ५० | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाभारत ५० |
५०
" तो पहा, त्या ब्राह्मण कुमाराने मत्स्यभेद केला." असे
कुणीतरी ओरडले. लगेच ब्राम्हण कुमार की जय ! असा ललकारी घुमली. मघापासून अखंड फिरत असलेले मत्स्ययंत्र आता बंद पडले होते. धन्य आहे तो ब्राह्मण कुमार जे दिगग्ज महावीराना जमले नाही ते एका ब्राम्हण कुमार ने करून दाखविले. आतापर्यंत मी दोन महावीराना ओळखत होतो. एक माझा परम मित्र कर्ण आणि दुसरा अर्जुन आणि
आता हा तिसरा महावीर म्हणायला हवा. परंतु हा ब्राम्हण कुमार कोण कुठला ? हे जाणून घ्यायला हवे. असा विचार
सुरू असतानाच मी काय पाहिलं तळ्याच्या काठावर तो भगवी वस्त्र परिधान केलेला तो ब्राम्हण कुमार वक्ष ताणून उभा होता. त्याने माशाचा डोळा अचूक टिपला होता. कोण
असेल बरं हा ? असा प्रश्न माझ्या मनात आलाच होता.
इतक्यात मगध नरेश उठून उभा राहात बोलला की,
पांचाल नरेश आपण एका ब्राह्मणाला स्वयंवर मध्ये भाग घेण्याची परवानगी देऊन आम्हां सर्व क्षत्रियांचा अपमान केला
आहे. " तेव्हा पांचाल नरेश द्रुपद उद्गारले ," एकदम चुकीचे
बोलताय आपण मगध नरेश जरासंध !"
" ते कसं ?"
" आपल्याला असं नाही वाटत का ? क्षत्रियांनी लक्षभेद
न करून स्वतःच स्वतःचा अपमान केलाय म्हणून."
" पांचाल नरेश हा पण काय आम्हां क्षत्रियांचा अपमान करण्यासाठीच आपण बनविला होता का ?" सिंधू नरेश जयद्रथ उद्गारला. तसा लगेच जरासंध उद्गारला ," आपण लोकांनी आम्हां क्षत्रियांचा अपमान केला आहे , कारण खरं तर स्वयंवर मध्ये क्षत्रियाशिवाय अन्य कोणालाही त्यात भाग
घेण्याचा अधिकार ही नाहीये."
" असं कोणी सांगितले मगध नरेश ?" श्रीकृष्ण बोलला.
" मी गवळय्या शी बोलत नसतो कधी !" असे मगध नरेश
बोलताच बलरामचा राग अनावर झाला. तो म्हणाला, " असे
बोलून आपण द्वारका नगरीचा अपमान केलाय मगध नरेश ! तो दिवस विसरलात की काय ? आम्ही दोन बंधूंनी मिळून आपल्याला आपल्या सैन्यासह मथुरेतून पळवून लावले होते." तेव्हा वसुदेव श्रीकृष्णा आपल्या जेष्ठ बंधू बलरामची
समजूत काढत उद्गारला ," हे आमचे मातामंह लागतात दाऊ
ह्यांचा आपण आदर करणे हे आपले कर्तव्य आहे आणि
क्रोध जपायला हवा. तो असा वाया जाऊ देता कामा नये, कारण समोरील व्यक्ती आपल्या क्रोधाच्या लायक आहे किंवा
नाही हे देखील पाहायला हवे. आशीर्वाद किंवा शाप पूर्ण
विचार करूनच मग दिला पाहिजे."
" मी असभ्य लोकांच्या नादाला लागत नसतो." जरासंध उद्गारला.
" परंतु इथं प्रश्न हा नाहीये की मगध नरेश जरासंध वसुदेव श्रीकृष्णाशी काय नाते आहे ? प्रश्न इथं हा आहे की, पांचाल
नरेश ने स्वयंवर मध्ये एका ब्राह्मणाला भाग देऊन राजा लोकांचा अपमान केला आहे."
" आणि त्या अपराधाची शिक्षा पांचाल नरेशला मिळायलाच पाहिजे." मद्र नरेश शल्य उद्गारला.
" कोणत्या अपराधाची शिक्षा मद्र नरेश ? पांचाल नरेश ने
एका ब्राह्मणाला स्वयंवर मध्ये भाग घ्यायला दिला. ह्या गोष्टीला आपण अपराध कसे म्हणून शकता ? कारण क्षत्रियांना हा अधिकार सुद्धा ब्रह्मणांनीच दिलाय हे कसं तुम्ही
हेतू पुरस्कर विसरताय ?"
" आम्ही तुमच्या वक्तव्या मध्ये फसणार नाही वसुदेव कृष्ण !" दुर्योधन उद्गारला.
" मला ते चांगले माहीत आहे,गांधारी नंदन." कृष्ण उद्गारला.
" दादा, तू फक्त परवानगी दे मी ह्याला आताच धरून
चेंडू सारखा आपटतोय कसे ते पहा.?"
" क्रोध तर तुला बलराम पेक्षाही लवकर येतो. क्रोध
कधीही विनाशाला कारणीभूत ठरतो. मनुष्याने शांतीचा मार्ग
कदापि सोडू नये , कारण शांती पेक्षा दुसरे कोणतेही हत्यार
प्रभावी नाही." तेवढ्यात श्रीकृष्णा ने आपल्या नजरेने युधिष्ठिरला तेथून निघालाय सांगितले. मग युधिष्ठिर भीमाला
उद्गारला," तू इथंच थांब. आम्ही बाहेर जाऊन तुम्हां लोकांची
वाट पाहतोय." असे म्हणून अर्जुन आणि भीम व्यतिरिक्त
दुसरे पांडव तेथे न थांबता त्यांनी बाहेरचा रस्ता धरला. तेवढ्यात मगध नरेश उद्गारला ," आता एकच उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे राजकुमारी ने आमच्या पैकी कुणा एकाची निवड करावी. अन्यता ज्या अग्नितून ती उत्पन्न झाली आहे त्या अग्निकुंडातच आम्ही तिला फेकून देऊ." तसे सर्वजण एकदम ओरडले की , हां हां आम्ही तिला अग्निकुंडात फेकून देवू !" असे म्हणून सर्वजण याज्ञसेनी द्रौपदीच्या दिशेने धावले. धृष्टद्युम्न घाबरला.आता काय करावे ? तेव्हा ब्राम्हंण कुमारांच्या वेशातील अर्जुन उद्गारला ,
" धृष्टद्युम्न दादा आपण बाजूला व्हा ! पांचलीच्या सुरक्षेतेची जबाबदारी आता माझ्यावर आहे. चिंता करू नका. एकालाही पांचालीपाशी येऊ देणार नाही." असे म्हणून त्याने त्या धनुष्यावर बाण चढविला. तिकडे भीम ने मंडपातला एक खांब उखडून काढला नि अर्जुनच्या मदतीला धावला. त्याने एकट्याने दुर्योधन सहित सर्व राज्यांना मागे लोटले. ते पाहून कर्ण ने एक धनुष्य उचलून उद्गारला ," सावधान." असे म्हणून
त्याने धनुष्य उचलले नि त्यावर बाण चढविला. परंतु सावधान
म्हणताच अर्जुन सावध झाला नि त्याने आपल्या धनुष्यावर
बाण चढविला नि सोडला सुध्दा. कुणाला काही कळण्या
अगोदरच कर्णाच्या हातांतील धनुष्य तुटून पडले. ते पाहून
कर्ण त्याची प्रशंसा करत उद्गारला ," गुरुवर्य परशुराम , गुरुवर्य
द्रोणाचार्य , इंद्र आणि अर्जुन या व्यतिरिक्त अन्य कुणा मध्ये
कर्णाचे धनुष्य तोडण्याची क्षमता नाहीये. म्हणून ब्राह्मण कुमार तुझ्या गुरूला मी वंदन करतोय." असे म्हटले नि तुटलेले धनुष्य तेथेच फेकून दिले नि कर्ण तेथून चालता झाला.
" आतातरी मान्य करणार की नाही दाऊ ते ब्राह्मण कुमार
दुसरे कुणी नसून पांडव आहेत."
" मला तर कुंती आत्येच्या पुत्राना जिवंत पाहून फार
अत्यानंद झाला. हा जर अर्जुन आहे तर तो नक्कीच माझा
शिष्य भीम आहे."
" हां ! आणि तो तिकडे हरलेला उभा आहे . तो सुध्दा
आपलाच शिष्य आहे दुर्योधन." श्रीकृष्ण हसतच बोलला.
" हां ! ठीक आहे , ठीक आहे. आता जरा हा संघर्ष मिटवून टाक."
" जशी आपली इच्छा ! " असे म्हणून श्रीकृष्ण सर्वांना
उद्देशून उद्गारला," राज्यसभेचे सर्व सदस्यांना यादववंशीयाच्या
वतीने पांचाल नरेशना द्रौपदीच्या स्वयंवर यशव्ही होण्या बद्दल हार्दिक स्वागत करत आहे तसेच या नव युवक ने स्वयंवर मध्ये द्रौपदीच्या वरमाला वर आपला अधिकार सिध्द
केला आणि द्रौपदी ने सुध्दा त्याला वरमाला घालून आपला
पती म्हणून स्वीकार केला. अर्थात राज्यसभेच्या राज्यांना
क्रोधित होण्याचे कारणच नाही. उलट त्याना लज्जित व्ह्यायला पाहिजे." असे म्हटल्या नंतर कोणीच काही बोलले
नाही. त्यानंतर अर्जुन आणि द्रौपदी ने पांचाल नरेश द्रुपदांचे अर्थात आपल्या पित्याचे चरणस्पर्श केले. तेव्हा पांचाल नरेश द्रुपदांनी तिला " सौभाग्यवती भव ! " असा आशीर्वाद दिला.
त्यानंतर श्रीकृष्ण उद्गारला ," ब्राम्हंण कुमार आता आपल्या वधूला घेऊन आपल्या स्थानावर प्रस्थान करावे अशी मी आपणांस आम्ही विनंती करत आहोत."
अर्जुन आणि भीम या दोघांसह द्रौपदीही निघाली. द्रुपदांनी आपल्या पुत्रांस अर्थात धृष्टद्युम्न ला त्यांच्या मागोमाग जाण्याचा आदेश दिला. कारण त्याना संशय होता की हे नक्कीच ब्राम्हण कुमार नाहीयेत.
अर्जुन आणि भीम पांचलीसह चालत असताना मध्येच अर्जुन बोलला , " मजल्या दादा आपण असं केलं तर !" लगेच भीमाने विचारले ," असं म्हणजे कसं ?" त्यावर अर्जुन उद्गारला," आपण घरी जाऊन ना, आईला बोलू या की आई ,आज आम्हांला फार चांगली भिक्षा मिळाली आहे .
मग पाहू या मातोश्री काय आदेश देतात बरं ते. ?" त्यावर भीम उद्गारला ," काय ? राजकुमारीला भिक्षा म्हणून सांगायचं ?"
" त्यात काय मस्करी केली म्हणायची ! पांचाली तुझी
काही हरकत तर नाही ना ? "
" माझी कशाची असणार ? तुम्हाला जे काय सांगायचे ते
सांगा." घरी पोहोचताच दरवाजातूनच भीम अर्जुन एकदम बोलले," आज आम्हाला फार चांगली भिक्षा मिळाली आहे आई !" मागे वळून न पाहता नेहमीच्या सवयीनुसार त्या पट्कन बोलून गेल्या की , सर्व भावंडांनी आपसात वाटून घ्या." असे म्हणून सहज म्हणून त्यांनी मागे वळून पाहिले. त्या दोघां सोबत एका अनोळख्या स्त्रीला पाहून त्या उठून त्या दोघांजवळ आल्या नि उद्गारल्या ," ही देवी कोण आहे पुत्र ?" तसा भीम उद्गारला की, मातोश्री ही कांपिल्या नगरची राजकुमारी द्रौपदी आहे. अर्जुन ने स्वयंवरात हीला जिंकली आहे." पांचली लगेच खाली ओनावली नि तिने राजमाता कुंती चे चरणस्पर्श केले. तश्या त्या तिला आशीर्वाद देत उद्गारल्या , " अखंड सौभाग्यवती भव !" तेव्हा अर्जुन उद्गारला ," परंतु मातोश्री आपण हिचे विभाजन करायला सांगितले आहे त्याचे काय ?" त्यावर त्या गोंधळून उद्गारल्या,
" हिचे विभाजन आणि ते मी सांगितलं .....डोकं बिकं
फिरलंय का तुझं ? आपल्या पुत्रवधू चे कुणी विभाजन
करायला सांगेल का ? " बोलता बोलता किंचित थांबल्या. लगेच त्यांच्या द्याना आले तश्या त्या दोघांकडे पाहून उद्गारल्या," म्हणजे मघाशी तुम्ही भिक्षा बद्दल बोलतात ते
द्रौपदीच्या विषयी बोलले होते की काय ?" असे विचारताच
त्या दोघांनी आपल्या माना खाली घातल्या. तश्या त्या समजल्या नि चिडून बोलल्या ," आपल्या पत्नीला कुणी
भिक्षा म्हणून कुणी संबोधतोय का ?" परंतु त्यावर ते दोघेजण
काहीच बोलले नाही. जणू त्यांच्या मुखावर कुलूप लावले
होते की काय ते कोण जाणे ? ते दोघेही बोलत नाही हे
पाहून त्या उद्गारल्या ," माझ्याशी खोटे बोललास अर्जुन ?
आता आपसात वाटून दाखवा तिला.?" तेवढ्यात युधिष्ठिर
आपल्या धाकट्या बंधूसह तेथे आला नि आपल्या आईला विचारले ," काय झालं आई ? का रागवलीस त्यांच्यावर ?"
" ते तू आपल्या बंधूनाच विचार जे आपल्या पत्नीला
भिक्षा समजतात , वस्तू समजतात. भरतवंशी राजाची हीच
मर्यादा आहे काय ? तू तर धर्मराज आहेस ना , मग तू सांग."
" आई , स्त्री तर शक्तीचे रूप आहे, आईच्या रुपात , बहिणीच्या रुपात , मुलगीच्या रुपात , नणंद च्या रुपात बेटीच्या रुपात, पत्नी रुपात अर्थात स्त्री सदैव आदरणीय
आहे. भीम आणि अर्जुन या दोघांनी भिक्षा बोलून स्त्री जातीचा अपमान केलाय. आणि आई प्रथम गुरू आहे.
त्यामुळे आईचा आदेश अस्वीकार ही करू शकत नाही."
" दादा काय बोलतोयस तू हे ?"
" चुकीचे बोलत नाहीये. आईच्या तोंडून असे शब्द निघालेच नाहीत कधी आजपर्यंत. आईकडून आजाणतेंपणी
निघालेल्या आदेशाचे काही ना काही तोड जरूर असणार."
" तुला असं तर नाही म्हणायचं की द्रौपदी तुम्हां पाच
बंधू मध्ये वाटली जावी ?"
" असं मी म्हणत नाही आई तर आपण असं बोलला."
" मी तर भिक्षा समजून बोलली होती."
" ते काय असेल ते आपल्यालाच माहीत परंतु भविष्यात
जे काय होणार आहे ते ना आपल्याला माहीत आणि नाही
मला माहित आहे. हां परंतु हे होऊ शकते की आपल्या जिभेवर बसून स्वयं काळ बोलला असेल हे."
" युधिष्ठिर तू असं एखादे तरी उदाहरण देवू शकतोस का ?"
" अवश्य देवू शकतो मातोश्री ! " किंचित थांबून पुढे उद्गारला ," मातंग कन्या एकजला चा विवाह सात ऋषी सोबत
झाला होता. तसेच हिणाक्ष ची बहिणीचा विवाह दहा बंधुशी
झाला होता."
" परंतु विवाह आणि विभाजन मध्ये काही फरक आहे
की नाही दादा ?" नकुल ने विचारले.
" वास्तविकता अशी आहे की ह्या चक्रयुव्हातून बाहेर
पडण्यासाठी मला मार्ग ठाऊक नाहीये. प्रिय नकुल." तेवढ्यात तेथे वसुदेव श्रीकृष्ण आला नि कुंती ला प्रणाम
करत उद्गारला ," प्रणाम आत्ये !"
" औक्षवंत हो वत्स ! द्वारकेला सर्व क्षेमखुशल तर आहेत
ना सर्व ?"
" आपल्या आशीर्वादाने सर्वकाही क्षेमखुशल आहे तेथे.
परंतु इथं मात्र क्षेमखुशलता दिसत नाहीये."
" हां एका धर्म संकट मध्ये पडलोय आम्ही !"
" कोणते धर्म संकट ?"
" भीम आणि अर्जुन द्रौपदी घेऊन आले नि मला म्हणाले,
आई, आज चांगली भिक्षा मिळाली आहे. मी न पाहताच
म्हणाले की पाची बंधूनी वाटून घ्या. आता द्रौपदी वस्तू थोडीच आहे की तिचे विभाजन केले जाईल ?"
" हे तर द्रौपदीलाच विचारायला हवं."
" ती बिच्चारी काय सांगणार त्यात ?"
" तीच तर सांगेल , कारण मागील जन्मात तिनेच विचार
नव्हता केला की एका घड्या मध्ये पूर्ण सागराचे पाणी
नाही राहू शकत पण तरी ही हिने महादेव कडे पूर्ण सागराचे
पाणी माठात भरून मागितले. तेव्हा महादेव म्हणाले की हे अशक्य आहे. त्यावर ही म्हणाली की ईश्वराला भले काय अशक्य आहे ? परंतु महादेवला सुध्दा एका घागरीत संपुर्ण सागर भरणे शक्य नव्हते."
" तू असे काय मागितलेस पुत्री ?" कुंती ने विचारले.
" आता हे तू सांगणार आहेस का तेही मलाच सांगू .....? त्यावर द्रौपदी काहीच बोलली नाही. कदाचित तिला मागील जन्माचे आठवत नसावे. अखेर श्रीकृष्णच उद्गारला ," द्रौपदी ने महादेव कडे एक वरदानात पांच वरदान मागितले होते आत्ये. तिने एक असा पती मागितला की जो धर्माचे चिन्ह असेल. हनुमान प्रमाणे बलवान पण असला पाहिजेल.
परशुराम सारखा धनुर्धर पाहिजेल , सूंदर असा की काळ
सुद्धा आपल्या तोंडात बोटे घालील, आणि सहनशीलता मध्ये
असा पाहिजे की त्याचा सारखा दुसरा कुणी नसावा. असाच
मागितला होतास ना वरदान महादेव कडे द्रौपदी ? तेव्हा महादेव म्हणाले की हे सर्व गुण एका व्यक्ती मध्ये असू शकत नाहीत. वरदान मागण्या अगोदर हा तर विचार करायला हवा होता ना द्रौपदी की जे आपण मागत आहोत ते देणाऱ्याला तरी शक्य हवंय ना ? महादेव शी हट्ट करून तू वरदान तर मिळविलेस आणि आज आत्येच्या मुखी स्वतः महादेव
बोलले , कारण आधुनिक युगात युधिष्ठिर सारखा धर्मचिन्ह
दुसरा कुणी नाही. हे झाले तुझे पथम वरदान , भीमा सारखा
बलवान नाही कुणी दुसरा, हे झाले तुझे वरदान, अर्जुन सारखा धनुर्धर नाही कुणी दुसरा, नकुल सारखा सूंदर नाही
कुणी दुसरा हे झाले तुझे चौथे वरदान, आणि पाचवे वरदान
म्हणजे सहदेव सारखा सहनशील दुसरा कुणी नाही. आता हे
सर्व वरदान महादेवला परत देऊन टाकून महादेव तुला जर
अपमान करायचा असेल तर अवश्य कर द्रौपदी ! आणि
तुम्ही सर्वजण द्रौपदी कडे काय पहात आहेत ? पार्थ तू
स्वयंवर अवश्य जिंकलास परंतु त्याचा अर्थ असा नाही की
तू द्रौपदीला भिक्षा म्हणशील. आई परम गुरू असते. अर्थात
तुला आपल्या गुरुशी खोटे बोललास. आणि आत्या आई
होण्याचा असा अर्थ नाही की पाहिल्या शिवाय, विचार केल्याशिवाय, सत्य स्थिती जाणल्याशिवाय आपसात वाटून
घ्या हा आदेश देणे एकदम चुकीचा निर्णय आहे.आपण ममतांची मर्यादा ओलांडली. आजपासून हे जीवन आपल्या सर्वांसाठी तपस्या सुध्दा आहे आणि प्रायश्चित सुध्दा !"
वसुदेव श्रीकृष्णा जेव्हा द्रौपदीसह साऱ्या पांडवांना सांगत
असतो त्यावेळी झाडाच्या आड लपून द्रौपदी चा भाऊ धृष्टद्युम्न सारा वार्तालाप ऐकत असतो. सर्व वार्तालाप ऐकल्यानंतर धृष्टद्युम्न तेथून निघून जातो नि आपल्या पित्याला त्या विषयी सांगतो तेव्हा पांचाल नरेश द्रुपद ते ऐकून एकदम खुश होत म्हणाला ," म्हणजे आपण समजत
होतो की पांडुपुत्र लाक्षागृहात जळून भस्म झाले ही बातमी
खोटी आहे तर !"
" हां पिताश्री ! "
" याचा अर्थ पांडव जिवंत आहेत नि लक्षभेद अर्जुन ने केला...तरी वाटलंच की जो लक्ष अर्जुनला डोळ्यासमोर ठेवून
बनविला. तो एक साधारण ब्राम्हण कुमार कसा काय लक्षभेद
करू शकतो. शेवटी तो पण अर्जुन नेच जिंकला तर !"
" हां पिताश्री परंतु ....
" परंतु काय ? "
" महाराणी कुंती द्रौपदीचा विवाह आपल्या पाची पुत्रा सोबत करू इच्छित आहे ."
" काय ? महाराणी कुंती ला हे माहीत नाही की काय की
द्रौपदी वस्तू नाहीये जी पाच भावांमध्ये वाटली जाऊ शकते.
आणि असा विचार जर कुंती करत असेल तर मी द्रौपदी ला सांगेन की अर्जुनच्या गळ्यातून उतर ती वरमाला ."
" आणि वसुदेव श्रेकृष्ण द्रौपदीला म्हणत होता की ही तुझी तपस्या सुध्दा आहे नि प्रायश्चित ही !"
" असं वसुदेव कृष्ण बोलला.'
" हां पिताश्री !"
" मग तर गंभीर समस्या आहे आणि त्या विषयी वसुदेव
श्रीकृष्णाशीच बोलायला हवं ,कारण त्या मागचे नक्कीच काहीतरी कारण असावे. त्याशिवाय वसुदेव श्रीकृष्ण असं
बोलणार नाहीत. " असे म्हणून ते विचारमग्न झाले.
विदुर महाराज धृतराष्ट्राच्या कक्षेत जाऊन सांगतात
की महाराज आपल्यासाठी एक खुशखबर आलीय कांपिल्य
नगर मधून ."असे सांगताच महाराज धृतराष्ट्रा एकदम खुश
होतात. म्हणजे त्याना वाटतं की स्वयंवर आपल्या पुत्राने
अर्थात दुर्योधन ने जिंकले असावे म्हणूनच की काय ते एकदम
खुश होत उद्गारले ," याचा अर्थ स्वयंवर प्रिय पुत्र दुर्योधन ने
जिंकले असावे." त्यावर विदुर बोलला ," नाही महाराज स्वयंवर दुर्योधन ने नाही जिंकले." असे म्हटल्यावर त्याना
वाटले की दुर्योधन नाही जिंकले तर दुसऱ्या पुत्रा ने अर्थात
दु:शासन ने जिंकले असावे. तो पण तर शूर आहे. पण तोही
नाही म्हटल्यावर त्यांची घोर निराशा तर झालीच. परंतु त्या
विदूरचा फार राग आला. राग यासाठी आला की जर माझ्या
दोन्ही पुत्रानी पण जिंकला नाही तर हा खुखबर कशाची
द्यायला आला. म्हणूनच किंचित चिडून उद्गारले ," दुर्योधन नाही दु:शासन नाही मग जिंकले कोण ? आणि कुणाची खुश
खबर द्यायला आलास ? " त्यावर विदुर स्पष्टीकरण करत
बोलला ," आपले अनुज पांडुपुत्र अर्जुन ने पण जिंकला."
पांडवांचे नाव ऐकताच त्याना एकदम धक्काच बसला.
अचानक आकाशात वीज चमकावी नि अंगावर कोसळावी
असेच झाले जणू ! त्यांचे पाय लटपटत होते त्यांनी सिहांसन चाचपटून त्यावर बसले. आणि चेहऱ्यावर कृत्रिम हास्य प्रकट
करत बोलले ," प्रिय पांडुपुत्र जिवंत आहेत हे ऐकून मला
इतका आनंद झाला की तू त्याची कल्पना देखील करणार
नाहीस. गेल्या काही दिवसांत किती दुःखी मन होते माझे."
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा