महाभारत ५६ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाभारत ५६ |
५६
राधेय
काल राज्यसभेत हे काय घडलं ते सर्वकाही समजलं.
परंतु मला मात्र ते आवडलं नाही. संपत्ती आणि सत्ता मानवी मनाला कधीकधी पशुहूंनही क्रूर कार्य करवितात. अर्थात राज्यातील आपल्या नाय्य भाग मागणाऱ्या युधिष्ठिरला
हस्तिनापुरच्या मान्यवरांनी दिलेला न्याय तर अयोग्यच होता. जरी राज्याच्या विभाजनाचा प्रस्ताव पितामहांनी ठेवला असला तरी त्या मागची प्रेरणा शकुनीमामाची असावी.
म्हणजे पितामहांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सावजाला टिपण्याचे काम नक्कीच शकुनी मामानी केले असावे. परंतु
सर्वांसमोर असे भासविले की हस्तिनापुर च्या परिवारात
आपण हस्तक्षेप करत नसून केवळ आपल्या इच्छेखातर
आपण राज्यसभेत बसलो आहोत. काय हा निर्लल्जपणा !
मला तर असं वागणे अजिबात आवडलेले नाहीये. पण न आवडणाऱ्या साऱ्या गोष्टी काही नेहमी थोपविता येतातच असं नाही हं ! मला शकुनिमामा स्वतःचं राज्य गांधार
सोडून नेहमी हस्तिनापुरातच राहणे पसंत नव्हतं. सर्व कलहाचे मुळ तेच होते म्हणा. आपण कोण त्याना सांगणार ना ? कारण आपला मित्र दुर्योधन त्या शकुनिमामाच्या हातातला कठपुतली झाला आहे. मामाश्री जसे नाचविणार तसा आपला मित्र नाचणार. कधी कधी तर माझाच मला राग येतो. म्हणजे आपण एका अश्या माणसाशी दोस्ती केली की त्याला कपट कारस्थान शिवाय. दुसरं काही येतच नाही. अरे राज्यच मिळवायचे होते तर पाडवांशी युद्ध करून मिळवायचे होते ? असे कपट कारस्थान करून काय साधिले ? एका वीर पुरुषाला शोभते का हे ? पण काय करणार आपला नाईलाज आहे. जर दुर्योधनाचा मी ऋणी नसतो तर त्याच्या या कट कारस्थान मी अजिबात सामील झालो नसतो. परंतु जसे पितामहां आचार्य द्रोण , कुलुगुरु कृपाचार्य सर्वच गप्प आहेत. तसे मला ही गप्प राहणे भाग आहे. केवळ एक विदुरच आहेत की जे पांडवांच्या बाजूने सदैव बोलत असतात. म्हणूनच शकुनिमामानी ही चाल खेळली. पितामहां ना पुढे करून सर्वकाही आपल्या मना सारखेच करून घेतले. पाहू या खांडन प्रस्तचे राज्यात कसे रूपांतर करतात ते.
पांडव आपसात चर्चा करत असतात. युधिष्ठिरला
महाराज धृतराष्ट्रांनी दिलेले अर्धे राज्य म्हणजे खांडववन प्रस्थ म्हणजे घनदाट अरण्य तेथे जाऊन आपलं नवीन राज्य
वसवायचे म्हणजे फार काळ लागणार होता त्याला आणि
हे भीमाला अजिबात मान्य नव्हते. तो चिडून म्हणाला ,
" मोठ्या तातश्रीनी गोड बोलून आपले अर्धे राज्य तर बळकावलेच परंतु आपल्याला जे अर्धे राज्य दिलं ते राज्य नसून खांडववन आहे तेथे मनुष्य वस्ती नाही तर नागवंशीयांची वस्ती आहे. अश्या दुर्गम वन मुद्दाम दिलंय आपल्याला. काय करणार आहोत आपण तिथं जाऊन ? ही तर सरळ सरळ ठगबाजी झाली."
" भीम आपल्या पेक्षा मोठ्या माणसांचा आदर करावा."
" परंतु मोठ्यानी पण आपला मोठेपणा दाखवायला
पाहिजे ना ?"
" सहदेव आपल्या मोठ्या भावाशी असं असभ्य पणाचे
वर्तन करत का ?"
" क्षमा मागतो आई पंरतु...?
" आपल्या आई पाशी परंतु सारखे शब्द वापरले जात
नाहीत सहदेव."
" ठीक आहे, मग मी विना परंतु शब्द वापरता विचारतो
दादा की मोठ्या तातश्री ना हा अधिकार कोणी दिला की
आम्हाला न विचारता आमच्या राज्याचे विभाजन करण्याचा
निर्णय घेतला."
" युधिष्ठिर ने जो निर्णय घेतला तो निर्णय जर तुम्हा लोकांना मान्य नसेल तर ....." वक्तव्य पूर्ण करण्या अगोदरच
श्रीकृष्ण मध्येच बोलून त्यांच्या वक्तव्याचे खंडन करत उद्गारला ," रागामध्ये कोणताही निर्णय घ्यायचा नसतो आत्या.
मागून पश्चात्ताप करण्याची पाळी येते."
" मग तूच सांग वसुदेव ह्या लोकांना शोभते का ? आपल्या वडील बंधूं शी बोलणे ?"
" आई , दादाच्या निर्णयावर आम्ही आक्षेप घेत नाहीये."
तसा श्रीकृष्ण उद्गारला ," परंतु आत्ये हे सुध्दा सर्वांसमोर योग्यच तर बोलले निदान त्यामुळे परिवारात गैरसमज होत नाहीत. नकुल आता बोल. काय सांगायचं आहे तुला ?"
" मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की हस्तिनापुर राज्यावर आमचा अधिकार आहे. कारण मोठ्या दादाची निवड झाली होती. मग मोठ्या बाबांनी आमच्या वाट्याचे राज्य दुर्योधन का दिलं जात आहे ?
" ऐकलेस वासुदेव काय म्हणतोय ते. बरं ते जाऊ दे.
परंतु एक गोष्ट तुम्हां सर्वांना सांगावीशी वाटतंय आणि ती
म्हणजे राज्य विभाजनचा प्रस्ताव स्वतः तातश्रीनी मांडला. अर्थात त्या मागचे कारण निश्चितच काहीतरी असणार आहे, त्या शिवाय का त्यांनी राज्य विभाजनचा प्रस्ताव मांडला.
आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्ही सर्वांनीच द्यानात ठेवा.
ती गोष्ट म्हणजे सारे जग जरी भले तुमच्या विरुध्द झाले असले तरी भीष्म पितामहां तुमच्या विरोधात कदापि असणार नाहीत. मी हे खात्री ने सांगतेय."
" ते मान्य आहे आम्हाला आई की पितामहांचा आशीर्वाद
आमच्या पाठीशी सदैव आहे , आणि त्यांनी काहीतरी विचार
करूनच ह्या राज्याच्या विभाजनाचा प्रस्ताव घेतला असेल ही ! परंतु ते असे कदापि सांगणार नाहीत की हस्तिनापुर दुर्योधन द्या आणि तुम्ही खांडवन घ्या म्हणून. आम्ही राज्याच्या विभाजनाच्या प्रस्ताव स्वीकार अवश्य करू परंतु त्यासाठी आम्ही हस्तिनापुर का म्हणून सोडून देऊ ? दुर्योधन छोटा त्याला का नाही दिलं जात खांडव प्रस्थ ? नेहमी आम्हांलाच का देशाच्या बाहेर काढले जाते.? जर आपली आज्ञा असेल तर एकवेळ अवश्य आम्ही पितामहां ना भेटून
अवश्य त्यांच्या कडून आपल्या शंकेचे निरसन करून घेऊ शकतो की आमच्या राज्याचे विभाजन झाले परंतु आम्हाला काय मिळालं ?"
" हां काय मिळालं आम्हाला ?" भीमाने लगेच दुजोरा दिला.
" ह्या प्रश्नाचे उत्तर फक्त मी देवू शकतो."
" देवू शकत असाल तर अवश्य द्या."
" महाराज धृतराष्ट्रांनीही आपल्या लोकांसाठी ही कर्मभूमी
दिली आहे कर्मभूमी !" त्यानंतर कोणीच काही बोलले नाही.
परंतु युधिष्ठिर ने खुणेने सर्वांना संबोधित केले की नंतर माझ्या कक्षेत सर्वांनी हजर रहा. त्या प्रमाणे सर्वजण युधिष्ठिर
च्या कक्षेत जमा झाले. तेव्हा सर्वांनी एकदम म्हटलं ," प्रणाम
दादा !" त्यावर युधिष्ठिर उद्गारला ," या बसा सारेजण."
" परंतु आम्हां सर्वांना इथं का बोलविलेस ? म्हणजे अशी
कोणती गोष्ट आहे की तू आपल्या आईच्या समोर करू शकत
नाहीस. म्हणून आज तू पहिल्यांदाच आपल्या कक्षेत बोलविलेस."
" त्याचे असे आहे की आईला अजिबात असं वाटता काम नये की माझे धाकटे बंधूं माझ्यावर रुसले आहेत. कारण आईला त्याचे फार वाईट वाटेल."
" आम्ही तुझ्यावर रुसलो नाहीये परंतु दुःखी मात्र जरूर
झालो आहोत. कारण मोठ्या बाबांनी तुझ्या राज्याचा अर्धा हिस्सा दुर्योधन दादाला दिला."
" दुर्योधन ला दादा ही म्हणताय नि मोठ्या बाबांवर आरोप
पण करताय की त्यांनी अर्धे राज्य दुर्योधनला दिले."
" मग खोटे आहे का ते ?"
" खोटे नाही. परंतु दुर्योधन पण तर आपला भाऊ आहे."
" असं आपण म्हणतोय परंतु तो असं म्हणतोय का ? नेहमी आमच्या विरुध्द काही ना काहीतरी कट कारस्थान करतच असतो. अश्या व्यक्तीला भाऊ कोण म्हणेल ?"
" हे बघा. एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्या ने तिचं वासरू मारायचं असतं का ? तो मूर्ख झाला म्हणून आपण ही मूर्ख व्हायचं का ? मग त्याच्यात नि आपल्यात फरक तो काय उरला ?"
" दादा तू काही म्हण परंतु आम्ही त्याला आपला भाऊ
कदापि समजणार नाही. कारण तो आमच्याशी अत्यंत वाईट
वागला आहे. आता हेच बघ ना आमच्या पिताश्रीनी वाढविलेले राज्य तो आपल्याला द्यायला तयार नाहीये. खरं
तर ह्या राज्यावर आमच्याच अधिकार आहे."
" अधिकार या शब्दचा अर्थ साधारण नाहीये अनुज. एका
अधिकार सोबत अनेक कर्तव्यही पार पाडावी लागतात. राजाचे पहिले कर्तव्य हे आहे की तो जनसमुदायला सुख
आणि शांती चे जीवन देऊ शकेल. जर आपण खांडव प्रस्तला गेलो नाहीतर हस्तिनापुरातून शांती आणि सुखाची रेषाच मिटली जाईल. म्हणून मी हस्तिनापुर च्या हिताचा विचार करून हस्तिनापुर सोडण्याचा निर्णय घेतला."
" मग याचा अर्थ असा नाही का दादा की आपल्या राज्यभिषेकांनंतर हस्तिनापुरशी आपले असलेले नाते संपुष्टात येईल."
" आपलं नाते का तुटेल अर्जुन नाळ कापली म्हणजे आईचे आपल्या पुत्राशी असेलेले नाते संपून जाते का ? नाही
ना ? अगदी तसेच आहे हे आम्ही कुठं ही असलो तरी आपले
हस्तिनापुराशी आणि तेथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी आपले
नाते कायम राहणार ? उगाचच घरात वादविवाद नकोत म्हणून हा उपाय शोधला आहे बस्स ! अर्जुन नाते जिवंत राहावे यासाठी कधी कधी कठीण निर्णय ही घ्यावे लागतात."
" परंतु आम्ही लोकांनी आपल्या निर्णयाला विरोध तर
केलेलाच नाहीये."
" माझे भाऊ मला विरोध कदापि करणार नाहीत. हेही मला माहीत आहे. पंरतु प्रश्न विरोध करण्याचा नाहीये तर मला सहयोग देण्या बाबतचा आहे. आपल्या लोकांना खांडव प्रस्तला इंद्रप्रस्थ बनवायचे आहे. वसुदेव श्रीकृष्णा ने त्या दिवशी काय सांगितले होते ते द्यानात आहे ना ? मोठ्या बाबांनी आपल्याला आपली कर्मभूमी दिली आहे. आपण त्यात सफल झालो तरी आपणच आणि असफल झालो तरी आपणच जबाबदार असणार आहोत . परंतु मी एकटा तर काहीच करू शकणार नाहीये. कारण तुम्ही चार भाऊ माझी खरी ताकद आहे. भीम माझे पाय आहेत तर अर्जुन माझे हात आणि नकुल ,सहदेव म्हणजे माझे दोन डोळे ! अर्थात तुम्ही चारही भाऊ माझ्या सोबत राहिला नाहीत तर मी एक पाऊल सुध्दा पुढे चालू शकत नाहीये. मी तुमच्या विना अपंग आहे, म्हणून मला माझे भाऊ पाहिजेत हस्तिनापुरचे राज सिंहासन नकोय. कारण आपण तेथे सुखाने राहू शकणार नाही. अर्थात गांधार नरेश शकुनी आपल्याला सुखाने जगू देणार नाहीये. म्हणून खांडव प्रस्तला जाऊया नि एक नवीन नगर वसवूया ते इंद्रप्रस्थ जे सर्वगाहून ही सूंदर असेल. दुसरी
गोष्ट म्हणजे इथं युध्द आहे तर तेथे शांती इथं विनाश आहे तर तेथे प्रगती आहे. आणि मुख्य गोष्ट म्हणजे युध्द जितके टाळता येईल तेवढे टाळण्याचा मी प्रयत्न करतोय. इतके करून ही युध्द झालेच तर गंगा नदी सारखी अजून एक रक्ताची नदी वाहताना दिसेल आणि तिचा प्रभाव एवढा मोठा असेल की त्यात सारी नाती वाहून जातील. म्हणून शक्य तो युध्द टाळायचे आहे आपल्याला आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ही की शांती साठी जर श्रीकृष्ण मथुरा सोडून द्वारकेला जाऊ शकत असेल तर आपण खांडवप्रस्त का जाऊ शकत नाही. शिवाय आईची तर हस्तिनापुरात राहण्याची अजिबात इच्छा नाही. पण तरी देखील तुम्हाला वाटत असेल की माझा निर्णय चुकीचा आहे तर मी आता जाऊन मोठ्या बाबांना सांगतो की माझ्या भावंडांना हा प्रस्ताव मंजूर नाहीये. आम्हाला हस्तिनापुर पाहिजे. बोला काय म्हणणे आहे तुम्हचे ? आणि मला ही सुध्दा शंका आहे की गांधार नरेश शकुनी तिथं तरी आपल्याला सुखाने जगू देईल की नाही ?
धृतराष्ट्र
महाराणी गांधारी निश्चिंत पणे आपल्या शयनगृहात झोपली होती. परंतु मला झोप काही येत नव्हती, म्हणून
इकडून तिकडे सारख्या येरझाऱ्या घालत होतो. तातश्रीनी
हस्तिनापुर चे विभाजन करण्याचा प्रस्ताव माझ्या समोर
ठेवला. नाईलाजाने का होईना तो प्रस्ताव मला स्वीकारावच
लागला. राज्याचे विभाजन तर केले. परंतु का कुणास ठाऊक
माझे मन बेचैन होते. गांधारीला जाग आली तिने डोळे उघडून माझ्या कडे पाहत म्हटलं ," आर्यपूत्र अजून का जागे
आहात ? नाही म्हणजे राज्याचे विभाजन करून झाले .आता
तरी शांत झोपा." त्यावर मी म्हटलं की, झोप माझी गुलाम
नाहीये गांधारी की मी तिला आदेश देताच ती धावत माझ्या
पाशी येईल नि मला विचारील की काय आज्ञा आहे महाराज ? झोप तर एक असा पक्षी आहे की त्याची असेल
तेव्हाच तो येईल नि पापण्यांच्या घरट्यामध्ये येऊन तो आराम करेल. अन्यता ती जवळपास भटकणार सुद्धा नाहीये. आणि
सांगायचं तर झोप म्हणजे सुगंम संगीत आहे त्या तालावर
मनुष्य इतका धुंद होतो की त्याला साऱ्या जगाचा ही विसर
पडतो. परंतु माझ्या डोळ्यांच्या अंधकार गुहेत येण्यास ती तयार नाहीये. "
" तेच तर विचारतेय मी आता काय कारण आहे ? आपण मला काव्य तर ऐकविलंत परंतु माझ्या एका साध्या
प्रश्नांचे उत्तर दिलं नाहीत तुम्ही !"
" जर माझ्या जवळ तुझ्या ह्या साधारण प्रश्नाचे उत्तर असते तर मी ते अवश्य दिलं असतं. परंतु माझ्या जवळ तुझ्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नाहीच आहे.म्हणून त्या उत्तरा
साठी मी भटकतोय. रणभूमी सुद्धा मीच आहे आणि त्याचा
प्रतिस्पर्धी पण मीच आहे ,अर्थात मी स्वतःच स्वतः शी युद्ध
करत आहे आणि त्या मध्ये विजय कोणाचा होईल हे देखील
मला माहित नाहीये."
" तुमच्या या वक्तव्याचा अर्थ हाच आहे,की आपण माझ्या पासून काहीतरी लपवित आहेत आर्यपूत्र ."
" हां ! आणि ही एकच गोष्ट नाही तर अश्या अनेक गोष्टी
आहेत की त्या मी स्वतःशीच लपविण्याचा प्रयत्न करतोय.
तुला ह्या हस्तिनापुरात आल्या पासून काळोखा शिवाय दुसरं
दिसेलंच काय आहे तर मी तुला माझ्या जीवनात पसरलेल्या काळोखाचा भागीदार बनवू ?
" हा तर मोठा तुम्ही माझ्यावर फार मोठा अन्याय करत
आहात."
" मग मला सांग की हस्तिनापुर च्या ह्या विभाजनाने तू
खुश आहेस का ?"
" नाही."
" पाहिलेस तुला ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायला एक क्षण पण
लागला नाहीये. परंतु मी माझ्या पूर्वजांनी मिळविलेल्या
राज्याचे विभाजन करून देखील मी खुश आहे किंवा नाही
हे देखील मला सांगता येणार नाहीये."
" दुर्योधनच्या अभिमानाने आपले....? गांधारीला पूर्ण
बोलू न देता मध्येच बोलून तिच्या वक्तव्याचे खंडन करत
मी म्हटलं की त्याचा अभिमान माझी उच्चकांक्षाच्या झाडावरचे फळ आहे ते गांधारी आणि तू कदापि हे विसरू
नकोस की दुर्योधन माझ्या ह्या उच्चकांक्षा चा उत्तराधिकारी आहे मी त्याच्या वतीने मी राजसुख भोगू इच्छितोय. की ज्यावर माझा जन्मसिद्ध हक्क होता. परंतु मला ते मिळू शकले नाही. हे सारे राज्य दुर्योधनाचे आहे.तसेच ते पाडंवांचं
देखील आहे , हीच सर्वात मोठी खेदाची गोष्ट आहे.शिवाय असं करून मी दोघांवर सुद्धा अन्याय केला आहे.दोघांवर
सुद्धा......
तिकडे महाराज धृतराष्ट्राची झोप उडाली आहे हस्तिनापुर चे विभाजन झाले म्हणून. परंतु तशीच झोप
गांधार नरेश शकुनीची झोप उडाली. परंतु दोघांमध्ये किंचित
फरक आहे परंतु दोघांचा अर्थ मात्र एकच आहे.दोघांनाही
हस्तिनापुर चे विभाजन झालेले आवडले नाही. गांधार नरेश
शकुनी पांडवांना काहीच देऊ इच्छित नाही. धृतराष्ट्राच्या मनात पांडवांना देण्याची इच्छा तर आहे परंतु राज्याची विभाजन करण्याची मात्र तयार नाही. आणि हस्तिनापुर ही
पांडवांना देवू इच्छित नाही. मग हा पेच सुटणार कसा ?
हे तर त्या गोष्टी सारखेच झाले. म्हणजे आई जेऊ घालीत नाही आणि बाप भीक मागू देईना मग पोट भरायचं कसं ? फार अवघड प्रश्न आहे हा. कदाचित याचं उत्तर कोणापाशी नसावे. म्हणूनच की काय गांधार नरेश शकुनी बैचेन अवस्थेत आपल्या सोगट्यांना हातातच धरून विचार करतोय की पुढचा डाव काय असावा ? तेवढ्यातच तेथे दुर्योधन आणि
दु:शासन हजर होतात. आपल्या मामाश्रीला चिंतामय अवस्थेत पाहून उद्गारला," मामाश्री तुमच्या कपाळावर चिंतेच्या छटा का उमटल्या आहेत ?" त्याची री ओढत दु:शासन उद्गारला ," आता तर आपल्या छाती मध्ये रुतलेला
पांडवांचा पंचशूळ निघून गेला ना ? आता कशाची चिंता करता ? " त्यावर गांधार नरेश शकुनी उद्गारला ," हां पण त्या
पंचशूळा लपेटून अर्धे राज्य पण तर गेलं ना आपल्या हातून."
" हे तर मला देखील आवडलं नाही मामाश्री परंतु मी करणार तरी काय ? पिताश्रीची निष्ठा मध्येच कट झालेली
आहे , म्हणजे ते माझे तर आहेतच परंतु त्या पांडवांचे सुद्धा
आहेत. कारण छोटी आई त्यांच्या समोर आली की त्याना
काय होते ते कुणास ठाऊक ? ते काही बोलतच नाहीत.
म्हणून ते अर्धे राज्य जाऊ दे मामाश्री सारी पृथ्वी पडली आहे
आपल्यासाठी ! आणि मी माझ्या राज्याची सीमा वाढवू शकतो."
" त्यात काही मला संशय नाहीये. परंतु हस्तिनापुर चा एक हिस्सा आपल्या हातातून तर गेला ना म्हणून जोपर्यंत
तो टूटलेला तुकडा परत हस्तिनापुरात येऊन मिळत नाही
तोपर्यंत मला मी स्वस्थ बसणार नाहीये. म्हणून या बद्दल
विचार करण्याला आरंभ करा."
" मामाश्री अजून युधिष्ठिर दादाचा अभिषेक सुद्धा झाला
नाही तर आपण तो मिळविण्याचा ही विचार करू लागलाय."
राजकुमार दु:शासन उद्गारला.
" जर उद्या करायची गोष्ट आजच केली तर उद्याचा दिवस
आपल्या आराम करण्याचा असेल दु:शासन." त्यावर ते दोघेही खळखळून हसू लागले. ते पाहून गांधार नरेश भयंकर
चिडला नि उद्गारला ," हसू नका. तर विचार करा की यदुवंशीया ना कसं खुश करता येईल याचा ."
" आता हे यदुवंश मध्येच कुठून आलेत ? " दु:शासन उद्गारला.
" द्वारीका मधून आले पुत्र द्वारका मधून. वसुदेव कृष्ण तर
आपल्या जाळ्यात फसणार नाहीत. कारण ते स्वतःच उत्तम
खेलाडू आहेत. परंतु बलराम आपण आपल्या जाळ्यात ओढून. अर्थात त्याना चांगले पंच पकवन्ये खायला घालून
खुश करा. वाटल्यास चरणावर लोटांगण घाला. "
" काय ? चरणांवर लोटांगण .....मामाश्री मला आपले
नि पिताश्रींचे चरणस्पर्श करायला सुध्दा त्रास होतोय आणि
तुम्ही सांगताय की बलरामच्या चरणावर मी आपले मस्तक
ठेवायला ? कदापि शक्य नाहीये ते."
" माहितेय मला. परंतु माझ्या नि तुझ्या पिताश्री चे चरणस्पर्श केले किंवा नाही केले तरी आम्ही तुला आशीर्वाद
देणारच. परंतु इथं तसे नाहीये. बलराम ना तुझा मामा आहे
ना पिताश्री ! म्हणून आता बालपणीच्या गोष्टी करायच्या सोडून जरा मोठा हो नि मोठ्या माणसांच्या गोष्टी करायला शिक जरा. इथं प्रत्येकाला जर जीवनात यशस्वी व्हायला कोणाच्या ना कोणाच्या चरणांचे चुंबन घ्यावेच लागते.आणि हे जर तुला करायला जमत नसेल तर तुझं राज्य तूच सांभाळ नि निघालोय आपल्या गांधारला जायला." तसा दुर्योधन गांधार नरेश शकुनीला विनवीत म्हणाला," मामाश्री रागवू
नका. मी आतापर्यंत आपला एक तरी आदेश टाळला आहे
का ? जो आता टाळेन. आपली इच्छा आहे की बलराम चे
चरण धरावे तर हरकत नाही. बलरामचेही चरण धरतो.
परंतु आपण आमच्यावर रागावून गांधारला जाऊ नका.
आपल्या शिवाय हा दुर्योधन डोळे असून आंधळा नि कान
असूनही बहिरा. तेव्हा पुन्हा असं कधी बोलू नका."
" आता कसा माणसासारखा बोललास. असेच माझं ऐकत
चल. मी तुला एका उच्च स्थानावर नेऊन बसविण तेथून तुला
कोणीही हटवू शकणार नाहीये."
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा