महाभारत ५४ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाभारत ५४ |
५४
गंगापुत्र भीष्म
एका म्यानात जश्या दोन तलवारी राहू शकत नाहीत. अगदी तसेच एका राज्यात दोन युवराज असू शकत नाही.
परंतु हे धृतराष्ट्राला कसे समजविणार ? कारण तो पुत्र मोहात इतका आंधळा झालाय की त्याला आपल्या पुत्रा शिवाय दुसरे काही दिसतच नाही आणि मी त्याच्या वर बळजबरी
करू शकत नाही. किंवा आदेश ही देऊ शकत नाही. की तुला
मी म्हणतो तेच करावे लागले. त्याला कारण मी केलेली प्रतिज्ञा आज माझ्यासाठी अडसर बनली आहे. मी एकदम
लाचार झालोय त्यामुळे. अशा वेळी माझी माता गंगाच मला
योग्य ते मार्गदर्शन करील असा विचार करून मी गंगेच्या
काठावर गेलो. परंतु काय आश्चर्य ते पहा. मी आईला हात
जोडून नमस्कार केला. परंतु नेहमी प्रमाणे आज आई पाण्यातून बाहेर आली नाही. म्हणून मी तिला हांक मारली.
मी म्हटलं , " आई , मला तुझ्या मदतीची आज फार गरज
आहे, अश्या प्रसंगी तू माझ्यावर रागावून रुसून बसू नकोस."
तेवढ्यात गंगामाता पाण्याच्या बाहेर येत मला म्हणाली,
" तू एकदम भ्याड लोकासारखा प्रत्येक संकटाला माझ्याकडे का धावत येतोस. ? तू प्रतिज्ञा केलीस तर पण
मला न विचारता तसेच आपल्या वडिलांना आणि हस्तिनापुर ला वचन दिलेस तेही मला न विचारता मग येणाऱ्या संकटांना
तोंड देण्याचे काम तुझेच आहे पुत्र."
" आपली आज्ञा शिरसावंद्य माते यापुढे मी येणार नाही
आपल्याकडे तर आपल्याला यायला लागेल माझ्याकडे."
असे असे म्हणून मी पुन्हा एकदा गंगा मातेला वंदन केले नि मग तेथून निघालो. परंतु जेव्हा मी राजवाड्यात प्रवेश केला.
तेव्हा मला रस्त्यात गांधार नरेश शकुनी भेटला. घाईघाईने कुठून तरी आपल्या कशेकडे निघाला होता. मला पाहताच
तो मला प्रणाम केला आणि मी त्याला प्रश्न विचारण्या अगोदर त्यानेच मला प्रश्न केला की, आपण एवढया रात्री
कुठून आलात तातश्री ?" तेव्हा मी म्हटलं की , हाच प्रश्न मी
तुला विचारत आहे गांधार नरेश ?" तेव्हा गांधार नरेश शकुनी उद्गारला की , मी तर आपल्या भाच्याला अर्थात दुर्योधन ला समजावत होतो की युधिष्ठिर तुझा मोठा भाऊ आहे. तेव्हा त्याचा सन्मान करणे हे तुझे प्रथम कर्तव्य आहे.
परंतु आपल्याला तर ठाऊक आहेच ना ,की दुर्योधन फक्त
शरीराने वाढला आहे. परंतु त्याची बुध्दी लहान बाळासारखीच आहे." मी म्हटलं की , ज्या बाळाला मोठा
होऊच दिला नाही तो मोठा होणार तरी कसा ? गांधार नरेश .
" हां ! खरंय ."
" दुर्योधन तर वर्षाऋतु प्रमाणे आहे जर कधी एखादे घर पावसाच्या तडाख्याने कोसळून खाली पडले तर त्यात दोष पावसाचा नसून त्यासाठी ते घरच दोषी आहे ,कारण जर त्यात पावसाचा दोष असता तर ते एकच नव्हे तर सगळीच घरे जमीनदोस्त झाली असती. होय ना गांधार नरेश ?"
" हां तातश्री !"
" मी दुर्योधन साठी चिंतीत आहे ,कारण तोच हस्तिनापुर चे
वर्तमान आहे."
" आणि भविष्य तातश्री ?"
" हा प्रश्न घेऊन तू विधात्या कडे जा अथवा काळा कडे.
नाहीतर तू ह्या आकाशाला पण विचारू शकतोस की ज्याच्या
कडे भविष्याचे बीज आहे. किंवा ह्या धर्तीला विचारु शकतोस
कारण कोणतेही बीज जमिनीतूनच उगवते. अर्थात बीजाचा
अंकुरण जमिनीतच होतो. मी तर एकदम शून्यात जमा आहे.
माझं अस्तित्व असून नसल्यासारखेच आहे. त्यामुळे कुणीही
काहीही करते." असे म्हटले नि तेथून निघालो. तसे माझ्या
कानावर शकुनी चे शब्द पडले , " जर माझी योजना पूर्णत्वास गेली तर आपण सदैव एकटेच रहाल गंगापुत्र भीष्म !" आणि मी जेव्हा दुर्योधन च्या कक्षेतून आंत प्रवेश केला तेव्हा माझ्या कानावर दुर्योधनचे स्वर पडले की , मामाश्री काही म्हणू देत परंतु मी हे सहन करणार नाहीये."
मी लगेच त्याला विचारले की, तसे तुझे मामाश्री तुला काय करायला सांगत होते ? " मला पाहतच ते सारेजण एकदम चपापले. अर्थात तेथे दुर्योधन सोबत कर्ण आणि दु: शासन होते आणि त्या सर्वांची कसलीतरी मसलत सुरू होती. मला
पाहताच मात्र त्यात खंड पडला नि मला पाहताच दुर्योधन
घाईघाईने उद्गारला की पितामह आपण ....आणि इथं ? परंतु
लगेच त्याच्या द्यानात आले की ते आपले पितामह आहेत अर्थात त्याना कुठंही जाण्याची मुबा आहे. तो उद्गारला की , प्रणाम पितामह !" तसा मी त्याला आशीर्वाद देत म्हटलं की , आयुष्यमान भव !" असे म्हणून मी पुन्हा तोच
प्रश्न केला की, तुझे मामाश्री काय सांगत होते ? " आता मात्र
तो पूर्ण भांबावला. कदाचित माझ्या या प्रश्नाचे उत्तर काय द्यावे हे त्याला लगेच न सुचल्याने त्याची कमतरता कर्ण ने
पूर्ण केली. अर्थात ते मला आवडले नाही , कारण कर्ण
आमच्या परिवारचा सदस्य नव्हता. अर्थात त्याने त्यात भाग
घ्यावे हे मला रुचले नाही. परंतु मी काही न बोलता त्याचे
म्हणणे ऐकून घेतले. कर्ण उद्गारला ," आपल्या बहिणीच्या
घरी राहणाऱ्या व्यक्तीच्या वक्तव्याला काहीही अर्थ नसतो.
परंतु आपण या कुटूंबाचे सदस्य आहात अर्थात आपल्या
विधानाला फार अर्थ आहे. आपण सर्वात वयस्कर असल्याने
आपले वक्तव्य महाराजाना सुध्दा ऐकावे लागेल नि या परिवारातील
इतर सदस्यांनाही ! अर्थात कौरव पुत्राणाही आणि पांडू पुत्राना ही !" त्यावर मी म्हटलं की , अंगराज कर्ण ही समस्या
आमच्या परिवाराची आहे अर्थात..... मी पुढचे बोलण्या अगोरच तो माझ्या वक्तव्याचा अर्थ समजला. तसा तो समजला नि लगेच क्षमा मागत बोलला ," मी समजलो आपल्याला काय बोलावायाचे आहे ते." असे म्हणून तो
ताबडतोब तेथून निघून गेला. तसा मी दुर्योधन कडे पाहत
म्हटलं ," मला बसायला पण सांगणार नाहीस का ?"
" माफ करा पितामहा माझ्या द्यानात नाही राहिलं. बसून
घ्या पितामहां !" तसा मी त्याला प्रश्न केला की, तुम्ही लोक
अजून का जागत आहात ?" त्यावर दुर्योधन उद्गारला ," जागणार नाहीतर अजून काय करणार पितामहां ? कारण मी
स्वतः काही पिताश्रीना सांगितले नव्हते की मी आपला जेष्ठ
पुत्र आहे अर्थात हस्तिनापुर च्या राजमुकुटावर माझाच अधिकार आहे आणि मीच त्या सिहांसनांवर बसणार. आणि
आपणही त्यावेळी बोलले नाही की युधिष्ठिर सर्वांत मोठा
असल्याने तोच राजसिहांसन वर विराजमान होणार." त्यावर
मी म्हटलं की, भरतवंशयांची परंपरा आहे की सिहांसन वर
केवळ जेष्ठ पुत्राचा अधिकार नाहीये. त्यासाठी अंगी पात्रता
असावी लागते. जर तू युधिष्ठिर ला आपला जेष्ठ बंधू मानला
असतास तर हा प्रश्न ऊद्भवलाच नसता. परंतु तू त्याला आपला प्रतिद्वंद्वी समजलास."
" प्रतिद्वंद्वी तर तो आहेच आणि क्षत्रिय होण्याच्या नात्याने
हे माझे कर्तव्य नाहीये का ? की मी माझ्या अधिकारांची रक्षण करू ?"
" अवश्य ......अवश्य ! परंतु तुझ्या अधिरांची रक्षा करण्याचे काम महाराज चे आहे आणि या परिवाराचा सर्वांत
मोठा सदस्य मी आहे अर्थात ते माझे कर्तव्य आहे आणि ते
मी पूर्णपणे पाळणार. तुझा अधिकार तुझ्यापासून कुणीही
हिरावून घेणार नाही याची हमी मी देतो परंतु तुला सुध्दा
अधिकाराची परिभाषा एकदम समजून घेणे आवश्यक आहे."
" याचा अर्थ मी हा समजू की आजपासून मी ह्या राज्याचा
युवराज नाहीये. कारण मला जेव्हा पिताश्रीनि युवराज म्हणून घोषित केले त्यावेळी आपण सुध्दा तेथे उपस्थित होता. अर्थात आपण सुध्दा त्याला साक्षी आहात."
" हां परंतु मी युधिष्ठिरला युवराज म्हणून घोषित केले त्याचा ही साक्षी आहे."
" म्हणूनच तर मी आपल्याला विचारतोय की आजच्या
या घडीला युवराज कोण ? महाराज धृतराष्ट्र पुत्र दुर्योधन का
पांडू पुत्र युधिष्ठिर आणि मी सुध्दा आपल्याला वचन देतो की
आपण जो काही निर्णय घ्याल तो मला मान्य असेल."
" ह्याच प्रश्नाने तर माझी झोप उडविली आहे पुत्र ,कारण
हे अघटीत तर वास्तविकता आहे की तू सुध्दा युवराज आहेस
आणि युधिष्ठिर सुध्दा युवराज आहे. अर्थात युधिष्ठिर इथं
येण्यापूर्वी हा निर्णय घेणे अत्यावश्यक आहे की हस्तिनापुरचा युवराज कोण राहील आणि कोण राहणार नाही. परंतु ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव की जेव्हा तुम्ही दोघे नव्हता तेव्हा
सुध्दा हे हस्तिनापुर होते नि उद्या तुम्ही दोघे नसल्यावर ही
हे हस्तिनापुर इथंच असणार आहे." असे म्हणून मी तेथून
निघून आलो.
दुसऱ्या दिवशी राजदरबारात महाराज धृतराष्ट्रानी निर्णय घेतला की पुत्रवधू द्रौपदी आणि पांडु पुत्रांचे प्रवेश
द्वारा जवळ सर्वांनी उपस्थित राहून त्यांचे स्वागत करावे.
तसे सर्वजण तेथे हजर होते मात्र दुर्योधन कुठेच दिसत नव्हता. म्हणून मीच दु:शसनला विचारले ," दु:शासन , दुर्योधन कुठे आहे ?" त्यावर दु:शासन उद्गारला ," पितामह
दादा ने सांगितले आहे की जोपर्यंत युवराज कोण याचा निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत मी दरबारात उपस्थित
राहणार नाही." त्यावर मी म्हटलं ," दुर्योधन ला असं नाही
करायला पाहिजे होते.परमेश्वरा आता तूच ह्या हस्तिनापुर ची
रक्षा कर." तेवढ्यात नगरवाशियानी महाराणी कुंती की जय
आणि युवराज युधिष्ठिर की जय असा घोषणा द्यायला सुरुवात केली. कुंती आपल्या पुत्रासह रथातून खाली उतरून
आम्ही त्यांच्या स्वागतासाठी जिथे उभे होतो तेथे आली तिने
प्रथम माझे चरण स्पर्श केले. मी तिला सुखी भव असा आशीर्वाद दिला. त्यानंतर ती आपल्या पुत्रवधू द्रौपदीशी माझ्याशी ओळख करून देत म्हणाली ,"द्रौपदी हे आहेत करुवंश सर्वांत श्रेष्ठ गंगापुत्र भीष्म अर्थात माझे तातश्री नि
तुझे पितामह यांचे चरणस्पर्श कर." असे म्हणताच द्रौपदी ने
माझे चरणस्पर्श केले. मी तिला अखंड सौभाग्यवती भव !"
असा मी तिला आशीर्वाद दिला.त्यानंतर कुलगुरू कृपाचार्यांची ओळख करून दिली. तेव्हा द्रौपदी ने कुलगुरू कृपाचार्यांचे चरणस्पर्श केले. त्यांनी देखील अखंड सौभायवती भव असा आशीर्वाद दिला. त्यानंतर आचार्य द्रोण
ची ओळख करून देताना कुंती त्याना उद्देशून म्हणाली ,
ही आपली पुत्री सुद्धा आहे नि पुत्रवधू सुध्दा अर्थात दुहेरी नाते आहे. तेव्हा पुत्री समजा किंवा पुत्रवधू आशीर्वाद तर द्यावाच लागणार आपल्याला. तेव्हा आचार्य द्रोणाचार्यानी तसे म्हटलं कारण त्याना ठाऊक होते की आपल्या मित्राने
आपला वध करण्यासाठी यज्ञाद्वारा पुत्र प्राप्त केला. आणि
ही यज्ञासेनी द्रौपदी त्याच याज्ञातून निर्माण झालेली आहे.
अर्थात तिच्या मनात आपल्या विषयी स्नेह भावना तर अजिबात नसणार म्हणून की काय द्रौपदीला आशीर्वाद
देण्या व्यतिरिक्त तेउद्गारले ," तुला मी आशीर्वाद काय देऊ तेच मला कळत नाहीये. कारण माझ्या जवळ शस्त्र आणि अस्त्रा शिवाय दुसरे काही नाहीये. तेव्हा तुझं मन पसंद शस्त्र उचल." असे म्हणताच द्रौपदी गोंधळात पडली. परंतु कुंती लगेच बाजू सांभाळून घेत बोलली ," छे छे छे शस्त्र घेऊन ती काय करणार तिला तुमच्याशी लढायचं थोडंच आहे ? आणि ती
त्यासाठी थोडीच इथं आली आहे ? " तेवढ्यात दु:शासन
कुंतीचे चरणस्पर्श करत बोलला ," प्रणाम छोटी आई !"
कुंती त्याला आशीर्वाद देत त्याला म्हणाली ," औक्षवंत हो !"
लगेच त्यांच्या लक्ष्यात येते की दुर्योधन कुठं दिसत नाही म्हणून त्यांनी त्याला विचारले ," माझा प्रिय पुत्र दुर्योधन कुठं
आहे दु:शासन ?" आता कुंती च्या प्रश्नांचे काय उत्तर द्यावे असा प्रश्न दु:शासनला पडला. परंतु लगेच स्वतःला सावरून
तो उद्गारला ," दादा कोणत्यातरी कामात व्यस्त आहे त्यामुळे
तो येऊ शकला नाही." त्यानंतर कुंती द्रौपदीला उद्गारली ," हा तुझा धाकटा दिर बरं का ? दु:शासन . " तेव्हा दोघांनी एकमेकांना हात जोडून नमस्कार केला. तेव्हा दु:शासन थट्टा
करत उद्गारला ," वहिनी मला चांगले बघून ठेव हं ! नाहीतर विसरशील." असं म्हणताच त्याच्या या वक्तव्यावर खळखळून सर्वजण हसतात. त्यानंतर श्रीकृष्ण पुढे येतात
माझे चरणस्पर्श करण्या हेतू खाली वाकले असता मी त्यांच्या
खांद्याला पकडून वरचेवर उठवून आपल्या हृदयाशी धरले.
तेव्हा श्रीकृष्ण उद्गारला ," पितामह आपण मला आशीर्वाद
दिला नाही. मला आपल्या आशीर्वाद पासून वंचित ठेवले का
बरं ?" त्यावर मी उद्गारलो ," तुला आशीर्वाद देण्यासारखा
माझ्या जवळ एक सुध्दा आशीर्वाद नाहीये." तसा श्रीकृष्ण
मला म्हणाला ," इतकी मोठी कंजूशी पितामहां हे बरोबर नाही हं !" तसे माझ्या वक्तव्याला दुजोरा देत कुलगुरू कृपाचार्य उद्गारले ," जर एक झरा समुद्रला म्हणू लागला की मी तुला पाणी देतो तर त्याचे ते वक्तव्य लहान तोंडी मोठा
घास नाही का होणार ?" तेव्हा श्रीकृष्ण उद्गारला ," वादविवाद
मध्ये ब्राम्हणशी कोणी जिंकू शकणार नाही कृपाचार्य जी !"
असे म्हणून श्रीकृष्ण आपल्या मोठ्या बंधू कडे पाहत म्हणाला ," चलो दाऊ ह्या लोकांनी मला आशीर्वाद दिला तेथे
आपल्याला पण हे आशीर्वाद देणार नाहीत. चलो विना आशीर्वाद शिवाय निघू या. असे म्हणून पुढे गेले तर आचार्य
द्रोणाचार्य उभे होते त्याना पाहून बलराम ने हात जोडले.
तसे त्यानी सुध्दा हात जोडले. त्यानंतर श्रीकृष्ण ने आचार्य
द्रोणाचार्याना हात जोडले तसे त्यांनी देखील श्रीकृष्णाला
जोडले. त्यानंतर युधिष्ठिर ने माझे चरणस्पर्श केले. मी त्याला
दिग्विजयी भव असा आशीर्वाद दिला आणि कृपाचार्यानी
युधिष्ठिरला चक्रवर्ती सम्राट हो असा आशीर्वाद दिला. त्यानंतर
भीम ,अर्जुन , नकुल ,सहदेव असे एका पाठोपाठ माझ्या नि
कुलुगुरु कृपाचार्य यांच्या पाया पडले. सर्वांना त्यांच्या योग्यतेनुसार आशीर्वाद दिला. अर्जुन मात्र मी म्हटलं की, आज मला आलिंगन देणार नाहीस ना ? " त्यावर अर्जुन
उत्तरला ," पितामहा मी आताच प्रवासातून आलोय तेव्हा
माझे सारे कपडे धुळीने माखले आहेत. आपल्या कपडे मैली
होतील." त्यावर मी म्हटलं ," धुळच लागेल ना ? लागू दे लागली तर मला त्याची चिंता नाही. माझे बाहूं तुला सदैव आपल्या मिठीत घेण्यासाठी आसुरलेले असतात. ये माझ्या
मिठीत." असे म्हणताच अर्जुन एकदम माझ्या मिठीत आला.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा