महाभात ५३ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाभात ५३ |
५३
धृतराष्ट्र
दुर्योधन आत्महत्या करिन असं सांगून गेल्यामुळे मी मोठ्या चिंतेत पडलोय की आता काय करावे ? कारण
पांडवांना घेऊन येण्यासाठी मी विदूरला कांपिल्या नगरात
पाठविले होते. अर्थात काही दिवसांत पांडव हस्तिनापुरात
येऊन पोहोचणार ....मग ते इथं आल्यानंतर युवराजाचं स्थान
त्याला द्यावेच लागणार नाहीतर जनसमुदाय भडकल्या शिवाय राहणार नाहीये. आणि जर आपण युधिष्ठिरशी न्याय
करायला जातोय तर दुर्योधन गप्प बसणार नाही. अश्या
परिस्थिती मध्ये काहीतरी मार्ग शोधून काढणे अनिवार्य आहे.
असा विचार करीत असल्यामुळे गांधारी कधी आपल्या कक्षेत
येऊन पोहोचली हे मला कळलं देखील नाही. त्यामुळे झाले
काय ...? गांधारीच्या द्यानी अवश्य आले. तिने ताबडतोब
मला विचारलेच ," आर्यपूत्र "असे तिने मला दोन वेळा म्हटलं.
परंतु मी माझ्याच विचारात मग्न असल्याने मला कळलेच नाही. तिने पुन्हा एकदा मोठ्या ने म्हटले मात्र मी लगेच
भानावर येत फक्त " हूं ! " म्हटलं नि लगेच स्वतःची झालेली
चूक सुधारण्यासाठी मी म्हटलं ," गांधारी तू कधी आलीस ?
आणि ती पण पायाचा आवाज न करता ?"
" नाही. मी नेहमी प्रमाणेच आली. परंतु मला असं का
वाटतं की आज कोणत्यातरी विचारात मग्न आहात म्हणूनच
तुम्हाला मी आल्याचे कळले नाही."
" तुझे एकदम रास्त आहे की मी खरंच आता चिंता युक्त
आहे म्हणून कदाचित मला कळलं नसेल बहुतेक."
" अशी कोणती चिंता आपल्याला भेडसावतेय ती कळेल
का मला ?'"
" अवश्य !"
" मग सांगा बरं."
" परंतु ही चिंता तर मी स्वतःलाच सांगायला घाबरतोय."
" सोडून द्या ती चिंता ,कारण खूप वर्षानंतर हस्तिनापुर ला एक सूंदर एक आनंदाची बातमी मिळाली आहे ती ऐकल्यानंतर तुमची ही चिंता कुठच्या कुठे पळून जाणार आहे, कारण ती खुशीच तशी आहे."
" खरंच ?" मी एकदम स्मित हास्य प्रकट करत म्हटलं.
मला असं वाटलं की गांधारी दुर्योधन चे मत परिवर्तन झाले
की काय ? कारण माझ्यासाठी ह्या खुशी व्यतिरिक्त दुसरी
कोणतीही खुशी ऐकण्याची इच्छा नव्हती. म्हणूनच मी म्हटलं
अशी कोणती खुशी आहे बरं असे स्वतःला संबोधून म्हटलं
की खरंच सांगतेस ?"
" प्रिय पांडव जिवंत असल्याची आताच बातमी मिळाली
आहे. अर्थात ही खबर अनेक चिंता मनातून काढून टाकण्या
सारखी आहे." हे ऐकून मी अधिकच चिंता व्यक्त करत म्हटलं
की ही खुशीच तर माझ्यासाठी चिंताच कारण असेल तर ?"
" काय सांगता काय आपण हे ? ही खुशी चिंताचं कारण
का होईल बरं ? आणि आपल्याला पांडू पुत्र जिवंत असल्याचं ऐकून आनंद झाला नाही ?"
" माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढू नकोस गांधारी !
पांडव जिवंत असल्याची बातमी ऐकून फार अत्यानंद झाला.
परंतु त्याच बरोबर दुःख ही झाले."
" चिंतेचे कारण ?"
" माझी सर्वात मोठी अडचण म्हणजे मला डोळे नाहीत.
नेत्रहीन आहे त्यामुळे कोण खोटे बोलत आणि कोण खरे हेच
कळेनासे झालंय मला. म्हणून तू आपल्या डोळ्यावरील
पट्टी आता सोडून टाक गांधारी !" असे म्हणून मी तिच्या
एकदम पट्टीलाच हात घातला. तशी ती एकदम ओरडून बोलली ," नाही आर्यपूत्र माझ्या तपश्येला भंग करू नका.
आपण आपली चिंता मला सांगा. मी तुमची चिंता दूर करण्याचा प्रयत्न करेन."
" चिंतेचे मुख्य कारण आहे की माझा पुत्र मोह त्यामुळे
पांडवावर अन्याय होऊ नये हीच अपेक्षा !"
"अन्याय का बरं होईल त्यांच्यावर. दुर्योधन ला आपण
जेव्हा युवराज म्हणून नियुक्त केलात तेव्हा आपल्याला हे
कुठं माहीत होते की पांडव जिवंत आहेत म्हणून. देवाची
आपल्या वर कृपा आहे की ती बातमी खोटी निघाली. आता
राहिला प्रश्न युवराज होण्याचा तर युधिष्ठिर असताना दुर्योधन
युवराज होऊच शकत नाहीये आर्यपूत्र !"
" प्रश्न तर तोच आहे ना गांधारी ! म्हणजे असे की दुर्योधन
किती हट्टी आहे हे तुला ही माहीत आहे आणि मलाही ! तो
युधिष्ठिर साठी त्याला मिळालेलं युवराज पद सोडणार नाही."
तशी गांधारी किंचित चिडून उद्गारली," परंतु ते स्थान त्याचे नाहीच आहे आर्यपूत्र !"
" ते स्थान त्याचे नाही असं कसं म्हणतेस तू ? तो माझा
जेष्ठ पुत्र आहे."
" परंतु करुवंशच्या नियमानुसार युधिष्ठिर फक्त जेष्ठ पुत्रच
नाही तर सर्वोत्तम आहे. हे कसं विसरता तुम्ही !"
" मान्य आहे युधिष्ठिर सर्वगुण संपन्न आहे, परंतु मी माझ्या पुत्रावर अन्याय कसा बरं होऊ देवू ?"
" आपण पुत्र मोहातून बाहेर का पडत नाहीयेत."
" ते शक्य नाही मला. परंतु यातून काही ना काही मार्ग
तर काढावाच लागणार आहे."
दुर्योधन
मी जेव्हा मामाश्री च्या कक्षेत प्रवेश केला तेव्हा मामाश्री
एकटेच सारीपाटाचा खेळ खेळत बसलेले दिसले. परंतु त्यांचे
मात्र धाऱ्यावर नव्हते. ते पाशा फेकण्याचे काम सत्यत्याने
करत होते मात्र त्यांचा एक सुध्दा पाशा त्यांच्या मनानुसार
पडत नव्हता. म्हणून ते स्वता:वर चिडत होते. मी प्रवेश करताच मामाश्री ना विचारले की काय झालं मामा ? आपण
आज फार क्रीधित दिसता ."
" हां क्रोध तर आहेच परंतु मी तुझ्या पिताश्रीवर रागावू
सुद्धा शकत नाही.परंतु तुझ्या पिताश्री खेळ माझ्या द्यानात
येत नाहीये. आणि तो खेळ म्हणजे जर त्यांच्या मनात पांडवांना बोलवायचेच होते तर त्यांनी मला का नाही पाठविले ? मी काही ना काही उपाय शोधून काढला असता.
की पांडव इथं येण्यास स्वतःच तयार झालेच नसते.परंतु
त्यांनी त्या विदूरला पाठविले. ज्याची प्रथम निष्ठा पांडुवर होती नि आता त्यांच्या पुत्रावर. अर्थात त्या दासी पुत्राची
तुझ्यावर निष्ठा नाहीच आहे. परंतु भावोजी ना हे सांगणार कोण ?" त्यावर मी उद्गारलो ," पक्षपातचा आरोप मी सुध्दा
त्यांच्यावर लावू शकत नाहीये मामाश्री ! हां ही गोष्ट खरी आहे
की त्यांच्या निष्ठेने जास्त करून आमचंच नुकसान झालंय.
पण तरी देखील ते पक्षपाती आहेत हे मी कदापि मान्य करू शकत नाही."
" ह्या करुवंश मध्ये सर्वात मोठा दोष हाच आहे की ते लोक ती गोष्ट कधीच मान्य करत नाही की जी गोष्ट त्यांच्या
साठी लाभदायक ठरेल. हा परिवार स्वतःच स्वतःचा मोठा
शत्रू आहे. दुर्योधन भाच्या ना तू नेत्रहीन आहेस आणि नाही
तू स्वतःच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आहेस म्हणून पाहण्याचा
प्रयत्न कर , कांपिल्या नगरी मध्ये गेलेला विदुर कांपिल्या
नगरात कोण कोणते जाळे तयार करणारा आहे."
विदुर
मी पांडवांना घेऊन जायला तर आलोय परंतु महाराज
धृतराष्ट्रपुत्र दुर्योधन युवराज पद सोडील असे वाटत नाहीये.
परंतु युधिष्ठिरला त्याचा अधिकार त्याला द्यायला लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाहीये. असा विचार
माझ्या मनात सुरू असतानाच तेथे कुंती वहिनी आल्या नि
त्यांनी मला हांक मारली," विदुर." मी त्यांच्या हाके सरशी
भानावर येत म्हटलं ," वहिनी आपण. " असे संबोधून लगेच
त्याना नमस्कार करत म्हटलं , " प्रणाम !" त्यानी लगेच मला
प्रश्न केला ," कसे आहात विदुर भावोजी ?"
" हे सांगणे कठीण आहे वहिनी ! "
" ठाऊक आहे ते मला "
" हस्तिनापुर चे वातावरण अनुकूल नाहीये वहिनी पुत्रमोह
हस्तिनापुर ची आधारशीला ला चाटत चाललाय दुर्योधनचा
अभिमान आकाशाला छेद करू पाहतोय. आणि दादावर त्या
गांधार नरेश शकुनी ची पक्कड दरदिवशी घट्ट होत चाललीय."
" तर मग तुम्ही हस्तिनापुर चे आमंत्रण घेऊन माझ्या
पुत्राकडे का आला आहात ? का तुमचे त्यांच्यावर प्रेम नाहीये का ?"
" हस्तिनापुरात प्रेम करण्या योग्य दुसरा आहेच कोण ?
परंतु माझी समस्या ही आहे वहिनी की माझे हस्तिनापुरवर सुध्दा तेवढेच प्रेम आहे आणि आपली मुलं तर हस्तिनापुरची
आत्मे आहेत. त्याना तेथे जाणे आवश्यक आहे."
त्यावर महाराणी कुंती उद्गारली ," मी तुमची ऋणी आहे विदुर. जर तुम्ही योग्य वेळी आम्हाला सावध केले नसते तर
आज आमचा परिवार जिवंत दिसला नसता.अर्थात केवळ
तुमच्या मुळेच त्या अग्नितून वाचलो. राजगादी ज्या माणसांनी
आमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. त्याच राजमहालात
माझ्या पुत्राना घेऊन जायला आला आहात ?"
" जर आपला माझ्यावर जरासा सुद्धा विश्वास असेल तर
दादाचे आमंत्रण स्वीकार करा नि माझ्या सोबत हस्तिनापुरला चला , कारण ते राजसिंहासन युधिष्ठिरचे आहे आज नाहीतर
उद्या त्यावर युधिष्ठिर लाच विराजमान व्हावयाचे आहे."
" ठीक आहे, तू म्हणतोयस तर मी ते मान्य करतो."
" असे तर मग मला आता आज्ञा द्या. महाराज द्रुपदाना
भेटवयाचे आहे मला."
" यशव्ही भव !" विदुर ने महाराणीची आज्ञा घेतली नि
तेथून निघाला.
राजदरबारात सर्वजण उपस्थित होते.बलराम , कृष्ण,
धृष्टद्युम्न , द्रुपद आणि महामंत्री त्यांची आपसात चर्चा सुरू
असतानाच एका द्वारपाल ने येऊन सूचना दिली की हस्तिनापुर नरेश महाराज धृतराष्ट्राचे धाकटे बंधू आणि महामंत्री विदुर येत आहेत. महाराज द्रुपद आपल्या पुत्रांस
आज्ञा केली की महामंत्री विदुर ना सन्मान सहित राजदरबारात घेऊन यायला सांगितले." जो आज्ञा पिताश्री !"
असे धृष्टद्युम्न तेथून विदूरच्या सामोरी गेला नि म्हटलं ," कांपिल्या मध्ये आपले स्वागत आहे विदूरजी आणि आपण माझा प्रणाम स्वीकार करावा अशी मी आपणास विनंती करत आहे."
" युवराज मी आपल्याला काय आशीर्वाद देवू बरं ?"
" मला आपल्या आशीर्वाद पासून वंचित ठेवू नका.
कारण आपल्यासारख्या बुद्धिमान लोकांचा आशीर्वाद मिळविण्याचा सौभाग्य सर्वांच्या वाट्याला येत नाही."
" आशीर्वाद तर द्यावाच लागणार आहे, परंतु आपल्याला
आशीर्वाद कोणत्या देवू कारण आपल्याकडे तर सर्वकाही आहे. देवां ने आपल्याला पांचाल नरेश सारखे पिता आणि
द्रौपदी जशी बहीण दिली आहे आणि करुवंश सारखे राजघराण्याची मित्रता लाभली आहे. त्यामुळे मला कळेनासे
झालंय की आपल्याला आशीर्वाद काय देवू ?"
" मला आपल्या जीवन लक्ष मध्ये सफल होण्याचा आशीर्वाद द्या."
" विधात्याच्या योजनेत हस्तक्षेप करण्याचा मला काय
अधिकार ? जर विधिलिखित मध्ये तसे होणे लिहिले असेल
तर तसे अवश्य होईल. आणि जर का तसे होणे नसेल लिहिलंय तर तसे होणे कदापि शक्य नाही. अर्थात विधिलिखित कधी टळले नाही आणि टळणारही नाहीये."
" पुत्र ते तुझ्या शब्दांच्या जाळ्यात कधी अडकणार नाहीत.तेव्हा त्यांचा पिच्छा सोड. या विदूरजी , द्रुपदांच्या भवनात आपले स्वागत आहे."
" मी हस्तिनापुर महाराज धृतराष्ट्राच्या वतीने आपल्यासाठी शुभ कामानांचा उपहार आणला आहे महाराज."
" मी आपल्या ह्या उपहाराने धन्य झालो.आता इथं येण्याचे कारण सांगावे."
" महाराज धृतराष्ट्रा ने आपल्या पुत्रवधू साठी आशीर्वाद
आणि त्याच बरोबर काही भेटवस्तू पाठविल्या आहेत त्याचा
आपण स्वीकार करावा...... अर्थात आपली असेल तर आपल्या समोर त्या भेटवस्तू सादर करतो."
" माझ्या पुत्रीसाठी त्यांचा आशीर्वादच पुरेसा आहे ,परंतु
त्यांनी जर भेटवस्तू पाठवून आम्हाला सन्मानित केले आहे.
त्याबद्दल मी आपला नि हस्तिनापुर महाराजांचा आभारी आहे. आता आपण बसून घेण्याची कृपा करावी."
" अजून माझं कार्य समाप्त झालेलं नाहीये महाराज.
हस्तिनापुर नरेश आपल्या पुत्रवधूला हस्तिनापुर ला आमंत्रित
केले आहे. जर आपली परवानगी असेल तर मी पांडुपुत्र
आणि गृहलक्ष्मी द्रौपदीला हस्तिनापुर ला घेऊन जाईन असं
मी म्हणतोय ,कारण महाराज आपल्या धाकट्या भावाच्या
पुत्रांच्या मस्तकावर आपला वरदहस्त हात ठेवून आशीर्वाद
देण्यासाठी व्याकुळ आहेत. तसेच गंगापुत्र भीष्म करुवंश
आणि पांचाल राजवंश मध्ये होणाऱ्या नात्याने अति प्रसन्न
झाले आहेत.तसेच आपले परम मित्र द्रोणाचार्यानी सुध्दा आपल्यासाठी स्नेह आणि शुभ कामना पण पाठविल्या आहेत. परंतु त्याना हे कळेनासे झालंय की द्रौपदीला पुत्रवधू म्हणावे का पुत्री मानावे ? कारण ते आपले मित्र सुध्दा आहेत
नि गुरुबंधू सुध्दा आहेत. अर्थात द्रौपदी त्यांची पुत्री समान होते. परंतु पांडू पुत्राना सुध्दा ते आपल्या पुत्र समानच मानतात. त्यामुळे त्यांच्या सामोर प्रश्न उभा राहिला की तिला कोणत्या नात्याने संभोदावे ? अर्थात पुत्रवधू का पुत्री ? परंतु उत्तर अद्याप सापडलेले नाहीये. परंतु दुसऱ्या आनंदाच्या
गोष्टी बऱ्याच आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या
राज्यांची सीमा हस्तिनापुर राज्याशी भिडली हे काय कमी आहे शिवाय दोन राज्यांत मित्रता वाढली. म्हणून द्रौपदी ला
हस्तिनापुरात घेऊन जाण्याची परवानगी द्यावी."
" माझी पुत्री द्रौपदी आता आपली झाली आहे,तिला
आपण केव्हाही घेऊन जाऊ शकता. परंतु पांडू पुत्र फक्त
माझे अतिथी नाहीत तर जावई सुध्दा आहेत अर्थात त्याना जाण्याचा आदेश देवू शकत नाही. जर ते स्वतःहून जायला
तयार असतील तर मी त्यांना थांबवू पण शकणार नाहीये."
तेव्हा श्रीकृष्ण उद्गारला ," मला वाटतं की पांडू पुत्राना
हस्तिनापुर जाणे अति आवश्यक आहे ,कारण वृक्ष हा आपल्या मुळापासून वेगळा राहू शकत नाही. आणि त्याने
जर तसे केले तर तो निश्चितच सुखून जाणार .....जर आपण
आम्हाला सुध्दा परवानगी दिलीत तर आम्ही सुध्दा आपल्या आत्येच्या सासरला जायचं म्हणतोय कारण तिच्या सासरच्या मंडळीला भेटण्याची माझी तीव्र इच्छा आहे. हो ना दाऊ ?"
" हां महाराज मला सुध्दा आपल्या आत्येच्या घरी जाण्याची फार इच्छा आहे." बलराम उद्गारला.
" पुत्र धृष्टद्युम्न द्रौपदी ला हस्तिनापुर ला जाण्यासाठी
तयार करा नि तिच्या सोबत एक हजार हत्ती , चार हजार
घोडेवाले रथ , पाच हजार दासीयां , दहा हजार गाई आणि
सोने चांदीची भांडी दिली जावी. कारण उद्या कोणी असं म्हटलं नाही पाहिजे की पांचाल नरेश ला आपल्या पुत्रीला
पाठवणी करता येत नाहीये." द्रुपद उद्गारला.
" जशी आपली इच्छा !" धृष्टद्युम्न आपल्या बहिणीची
पाठवणी करण्यासाठी तयारी करण्यासाठी निघून गेला.
विदुर ने एका दूत मार्फत हस्तिनापुर साठी संदेश पाठविला की मी पांडू पुत्राना पुत्रवधू द्रौपदी सहित हस्तिनापुर साठी रवाना होत आहोत. ही बातमी मिळताच
गंगापुत्र ही खुश खबर देण्यासाठी धृतराष्ट्राच्या भवनात गेले तेव्हा गांधारी ने त्यांचे चरणस्पर्श केले. तेव्हा त्यांनी तिला
आशीर्वाद देत म्हटलं," पुत्री धृतराष्ट्रा कुठं दिसत नाही तो ?
गेलाय कुठं ?"
" तातश्री ते तर शकुनी दादाच्या भवनात भोजन करण्यासाठी गेले आहेत."
" तू नाही गेलीस पुत्री ?"
" मी जाणार होते परंतु जाण्याची इच्छा झाली नाही.परंतु
मी आपणास एक गोष्ट विचारू ?"
" अवश्य !"
" आज आपण फार खुश दिसता ....काही विशेष घडलंय
का आज ?"
" होय.आज फार आनंदाची बातमी आलीय पांचाल वरून."
" पांचाल वरून ?"
" हां पुत्री पांचाल वरून विदुर ने संदेश पाठविला आहे की
महाराज द्रुपद ने पांडू पुत्राना द्रौपदीसह इथं पाठविण्याची परवानगी दिली आहे."
" ही तर फारच आनंदाची बातमी आहे."
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा