महाभारत ६० | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाभारत ६० |
महाभारत ६०
सुभद्रा एकटीच बगीच्या मध्ये फिरत असते. तेवढ्यात
समोरून अर्जुन येतो.अर्जुनाने पाहून तिला एकदम चपापली.
तेवढ्यात अर्जुन उद्गारला ," जर आपल्याला मान्य असेल तर
मी आपल्याला प्रणाम करतो." त्यावर ती त्यावर आपली नाराजी दाखवत उद्गारली ," बोलू नका माझ्याशी मी तुमच्यावर खूप नाराज आहे." त्यावर अर्जुन उद्गारला ," माझ्यावर नाराज .....अरे बापरे ! परंतु अपराध काय आमुचा
हे आम्हास कळले असते तर फार बरं झालं असतं ."
" आपणच अर्जुन आहात ,हे का नाही सांगितलंत आम्हाला ? "
" परंतु आपण हा प्रश्न केलाच नाहीये. उलट आपण असं
विचारलात की आपण अर्जुनला ओळखता का ? आणि मी
सांगितले हो म्हणून. मग आमुचे काय चुकले ते आम्हांस
कळेल का ?" त्यावर ती त्याला चिडवत बोलली " आंहाहा
काय सांगितले की मी पाहिलाय परंतु त्यात काही विषेश गुण
नाही असे आपण बोलले नव्हते का ?" त्यावर अर्जुन बोलला
की माझ्या मते तर नाही परंतु आपल्या मतानुसार जर विशेष
गुण आहे तर तो सांगायला पाहिजे होता ना ? परंतु ते सांगता
आपण कट्यार काढली." असे म्हणताच ती लाजली नि तेथून
पळ काढला. परंतु समोरून येणाऱ्या श्रीकृष्णाच्या अंगावर
आदळली.तेव्हा श्रीकृष्ण उद्गारला ," अरे रे माझी लाडकी बहीण कोणाला पाहून पळतेय ?" परंतु ती काहीच उत्तर देत
नाही. त्यावर श्रीकृष्ण म्हणाला ," हां समजलं."
" काय समजलं ?"
" हेच की तुला अर्जुन एकदम पसंत आहे .आता फक्त आई नि बाबांना भेटून तुझ्या लग्ना विषयी त्यांच्या जवळ चर्चा करायला हवी आहे, होय ना ?" त्यावर ती अजूनच लाजून चूर्ण झाली नि फक्त " दादा ss" असे संबोधून तेथून निघून गेली. तसा श्रीकृष्ण तिच्या पाठमोऱ्या आकृती कडे पाहून हसला.
वसुदेव आपल्या कक्षेत बसले आहेत. तेवढ्यात तेथे
देवकी येते नि त्यांना संबोधून बोलली ," आपण कृष्णाच्या
स्नेहात इतके तल्लीन आहात की आपल्या बाकीच्या कर्तव्याचा आपणास विसर पडला की काय असं कधी कधी
वाटू लागतं."
" तुला असं नाही का वाटत की , हा तर तुझा माझ्यावर आरोप करते आहेस म्हणून. कारण विसरणे किंवा लक्षात ठेवणे हे वय तर आपण कधीच मागे टाकले. आणि खरं सांगायचं ते आपल्या श्वासाना कोण कसा विसरेल बरं ."
" बस बस बस त्यावर काव्य करण्याची आवश्यकता नाही.कारण मला चांगले माहित आहे की हे वय आपले
कविता करायचे नाहीये. परंतु मी आपल्या विषयी बोलतच
नाहीये."
" मग कुणा बद्दल बोलते आहेस तू ?"
" मग तू कोणाबद्दल बोलते आहेस ? मी कोणते कर्तव्य
पार नाही पाडले ते सांग बरं."
" मी सुभद्रा बद्दल बोलते आहे."
" काय झाले सुभद्राला ?"
" ती आता उपवर झाली तिच्या विवाहा विषयी विचार करायला नको का ?"
" हूं आई मध्ये हा दोष असतोच म्हणा की ज्या ज्या वेळी ती आपल्या मुलीला पाहते त्या त्या वेळी तिला वाटते की आपली मुलगी उपवर झाली आहे तिचे आता लग्न करायला
हवे. पण मी असं विचारतो की एवढी काय घाई लागली असते तुम्हां बायकांना ?" त्यावर देवकी उद्गारली ," आणि
बापा मध्ये हा दोष असतो की त्याना कधी कळतच नाही की
आपली मुलगी आता मोठी झालीय तिचा विवाह करायला
हवाय."
" परंतु सुभद्रा तर.....?
" पण आणि परंतु आता बाजूला ठेवा नि आता तिच्या
लग्नाचे पहा. कारण काल मी तिला आरशा समोर उभी राहून
आपले रूप न्याहाळत होती नि स्वतःशीच स्मित हास्य ही करत होती. अर्थात मुलगी असं करू लागली की माता नि पित्यांनी समजायचे असते की आपली मुलगी आता उपवर झाली आहे आणि तिला आता तिच्या स्वप्नातील राजकुमार
आणून द्यायला पाहिजे."
" पण देवकी , सुभद्रा कोणी साधारण कन्या तर नाहीये.
ती तर ......त्यांचे वक्तव्य मध्येच खंडित करत देवकी म्हणाली," पित्या मध्ये हा दुसरा दोष आहे की त्याना आपली
कन्या साधारण वाटतच नाही. चला मानलं की आपली कन्या
विशेष आहे परंतु याचा अर्थ असा तर नाही ना की साऱ्या
भरतवर्षा मध्ये चांगल्या युवकांचा दुष्काळ पडला आहे आणि
जरा पण तिच्यातल्या विशेषतः सांगा बरं."
" तिच्यात सर्वांत मोठी विशेषतः म्हणजे ती श्रीकृष्णाची
फार लाडकी बहीण आहे." तेवढ्यात तेथे बलराम आला नि
आपल्या वडिलांना वंदन करत म्हटला की , प्रणाम तातश्री !"
" आयुष्यमान भव !" तसा तो देवकीला वंदन करत म्हटला
" प्रणाम मातोश्री !"
" बैस ! बलराम हस्तिनापुराहून कधी आलास ?"
" हा काय येयोय हाच."
" मग तातडीने आम्हाला येऊन भेटायची काय गरज होती.
स्नान संध्या करून थोडा विश्राम करून मग जरी आला असतास आम्हाला भेटायला तरी चाललं असतं पुत्र !"
" जर हा महत्वाचा विषय नसता तर मी स्नान संध्या करूनच मग आपल्याला भेटायला आलो असतो."
" बरं बरं मग सांग बरं काय आवश्यक बोलायचं होतं तुला ?" वसुदेव ने विचारले. तशी देवकी लगेच त्याला म्हणाली ," नाही थांब. अगोदर तुझी कुंती आत्या कशी आहे ते सांग."
" आत्या आता हस्तिनापुरात नाही तर इंद्रप्रस्थ मध्ये आहे
आणि एकदम सुखात आहे, कारण युधिष्ठिरच्या नावाचा
तिकडे उदो उदो सुरू आहे."
" परंतु हे तर तू अर्जुन कडूनही ऐकलेस ना ?"
" अर्जुन ...?
" हां अर्जुन !"
" काय अर्जुन इकडे आहे ?"
" हां तो श्रीकृष्णाच्या भवनात थांबला आहे." हे ऐकून तर
बलरामला धक्काच बसला नि बलरामच्या मनात एक शंका
आली की माझ्या अगोदर श्रीकृष्णा ने सुभद्राच्या लग्नाचा
विषय काढला तर नसेल ना ? मला वाटत की नसेल केला
म्हणूनच त्या विषयी कुणी काही बोलले नाही काही पण तरीही वास्तविकता काय आहे ती जाणून घ्यायला हवी असा
विचार करून तो उद्गारला .
" कृष्णाने त्याच्या समोर प्रस्ताव तर नाहो ठेवला ना ?"
" कसला प्रस्ताव ?" असे विचारल्यामुळे बलरांमच्या
द्यानात आले की अजून श्रीकृष्णा ने कोणताही प्रस्ताव
आपल्या आई-बाबांकडे ठेवलेला नाहीये. म्हणूनच त्यानी
कसला प्रस्ताव म्हणून विचारले. एका अर्थाने हे चांगलेच झाले म्हणा. म्हणजे आता मी आपला प्रस्ताव आई- बाबा
जवळ ठेवायला हरकत नाहीये. असा विचार करून तो बोलला ," मग हरकत नाही. परंतु देवकी-वसुदेव मात्र त्याच्या
ह्या वक्तव्याने फार गोंधळले नि त्यांनी न समजून विचारले
की , हरकत नाही..... नेमकं म्हणायचंय काय तुला ?" तेव्हा
बलराम उद्गारला ," मातोश्री मी यासाठी चिंतीत होतो की मी
इथं येण्या अगोदर तुम्ही सुभेदाराच्या लग्न दुसरीकडे कुठं ठरवलेले असू नये.कारण मी हस्तिनापुरच्या राजकुमारशी सुभद्राचे लग्न पक्के करून आलोय."
" हो .परंतु कोणा सोबत ?"
" हस्तिनापुर चे युवराज महारथी दुर्योधन सोबत.सुशील
आहे ,सुंदर आहे शिवाय तो माझा परम शिष्य पण आहे."
" परंतु ....?
" परंतु काय मातोश्री ?"
" परंतु तुझ्या कुंती आत्येला आवडेल का ते ?"
" आत्येला का नाही आवडणार ? आता त्यांच्या राज्याचे विभाजन आहे त्याना अर्धे राज्य दिलं गेलं आहे ,तेव्हा आता
त्याना भांडण करण्याचा प्रश्नच कुठं येतोय ?"
" परंतु विभाजन कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नाहीये. कारण
विभाजन तर दोन परिवारा मध्ये दुरावा निर्माण करते. शिवाय
दोन्ही राज्यांची सीमा छोटी होते. अर्थात कोणीही समाधानी राहात नाहीये. आणि एकमेकांना ते स्वतःचा शत्रू मानतात."
" परंतु मी तर दुर्योधन ला वचन देऊन आलोय. त्याच काय ?"
" आता जर तू वचन देऊन आलास तर.... परंतु वक्तव्य पूर्ण होण्या अगोदरच तेथे श्रीकृष्णा चे आगमन होते नि
वक्तव्य मध्येच खंडित होते. श्रीकृष्णा ने आपल्याला काही
माहीत नसल्याचा बहाणा करत बोलला ," प्रणाम दाऊ !"
" आयुष्यमान भव !" लगेच श्रीकृष्ण विषयांतर करत बोलला," वाटतंय की दुर्योधन ने आपली भारीच सेवा केलेली
दिसतेय." तेव्हा देवकी म्हणाली ," एक खुशखबर सुध्दा आणलीय बलराम ने तुझ्या लाडक्या बहिणीसाठी एक चांगला वर शोधला आहे."
" हां श्रीकृष्ण ! अभिनंदन तुझे !"
" मला माहित होते मातोश्री ,एवढ्या दिवस दाऊ हस्तिनापुरला राहिलाय तर काही ना काही भेट घेऊन येईलच
आमच्यासाठी ! है ना दाऊ ? काय आणलं माझ्यासाठी ?.
" पाहिलेस मातोश्री ! आमचं बोलणं कोणत्या विषयावर
चाललंय नि ह्याला फक्त आपल्या भेटीचं पडलंय.? एवढा पण लालची होऊ नये माणसाने." त्यांवर श्रीकृष्ण उद्गारला,
" आपल्या दाऊ जवळ कोणतीही वस्तू मागणे म्हणजे
ह्याला काही लोभ म्हणत नाही तर स्नेह म्हणतात. एका बंधूंचा दुसऱ्या बंधूंच्या प्रति !" खरे सांगायचे तर श्रीकृष्ण
बलरांमचे द्यान दुसरीकडे वळवू इच्छित होता. बलराम च्या ते द्यानात चट्कन आले तसा बलराम उद्गासरला ," बघ श्रीकृष्ण
माझे मन दुसरीकडे कुठंतरी भटकविण्याचा प्रयत्न करू नकोस. कारण तू इथं येण्या अगोदर आम्ही एका गंभीर विषयावर चर्चा करत होतो."
" ते तर मित तेव्हाच ओळखले की आपण स्नान संध्या न
करता सरळ आई-बाबांच्या कक्षेत निघून आलास म्हणून मी
ही लगेच निघून आलोय."
" मी तर आई-बाबांना सांगत होतो की मी सुभद्राचे लग्न
जवळजवळ पककेच करून आलोय." तसा श्रीकृष्णा उघड
उघड विरोध न करता आपले म्हणणे अश्या प्रकारे त्यांच्या
समोर ठेवतो की त्याना वाटावं की जणू आपला सुध्दा त्या
गोष्टीस पाठींबा आहे असेच जणू सुचवितोय पहा.
" आपल्या घरची चंद्रकोरिला तर चंद्रवशी कडेच जायला
हवंय दाऊ." श्रीकृष्णाच्या ह्या वक्तव्यावर बलराम एकदम
खुश झाला. कारण त्याने स्वप्नातही असा विचार नव्हता केली
की श्रीकृष्ण आपले समर्थन करेल. म्हणूनच तो खुश होत
उद्गारला ," घ्या बाबा आता श्रीकृष्णाची पण संमत्ती मिळाली.
आता आपल्याला होकार देण्यास काय अडचण आहे ?"
" परंतु हा निर्णय रात्रीच्या वेळी नाहीतर सूर्य उदय झाल्यानंतर करायला हवाय दाऊ. कारण सुभद्राच्या जीवनाचा प्रश्न आहे हा "
" हां मला वाटतं श्रीकृष्ण म्हणतोय ते अगदी बरोबर आहे."
" ठीक आहे .परंतु तू काही गडबड करू नकोस म्हणजे
झालं."
" मी काय गडबड करणार म्हणा आणि ती सुध्दा सुभद्राच्या बाबतीत हे आपल्याला वाटलं तरी कसं ? आणि
आपण सुध्दा तिचं थोडेच वाईट करणार आहात ?"
" बस्स बस्स हा वाद आता इथंच संपवून आताव विश्राम
करायला जा उद्या बोलू या विषयी !" देवकी उद्गारली.
दुसऱ्या दिवशी सकाळी बलराम आपल्या कक्षेत व्यायाम
करत असताना तेथे अर्जुन येतो नि बलराम चे चरणस्पर्श करतो तसा बलराम त्याला आशीर्वाद देत म्हणाला ," धनुष्यबाण घेऊन कुठं युद्ध करायला निघाला का ?"
त्यावर अर्जुन उद्गारला ," मी शिकार करायला चाललोय
दाऊ."
" बरं बरं !"
" आपण हस्तिनापुर हुन आल्याचे ऐकले नि आपला आशीर्वाद घेण्या करता मी आलोय इथं."
" तुम्हां सर्व बंधूंच्या आज्ञाधारक पणावर तर मी अत्यन्त
खुश आहे, जा विजयी हो !" बालरामला आशीर्वाद मिळताच
अर्जुन सरळ श्रीकृष्णाच्या भवनात गेला नि उद्गारला," प्रणाम केशव !"
" ये मित्रा ये !" असे म्हणून किंचित थांबून पुढे उद्गारला,
" दाऊला भेटून आलास का ?"
" हां भेटलो."
" बरे केलेस. त्यांचा आशीर्वाद मिळणे फार आवश्यक होते. आता जा परंतु एक गोष्ट लक्षात ठेव की द्रौपदी अग्नितून उत्पन्न झाली आहे. तिचा स्वभाव अग्नि प्रमेच असेल. सुभद्रा हरण पेक्षाही कठीण कार्य आहे ते म्हणजे
सुभद्राची ओळख द्रौपदी शी करून देतांना हे लक्षात असू दे
की द्रौपदी चे मन नाराज होणार नाहीये.द्रौपदी भले ही तुम्हां
पाच बधुंची पत्नी आहे . परंतु स्वयंवर तू जिंकिले होतेस पार्थ !" त्यावर अर्जुन उद्गारला की , हे तर पक्के आहे की
द्रौपदी सुभद्राचे स्वागत कदापि करणार नाहीये."
" स्वागत पण करेल परंतु तू हे द्यानात ठेवशील की सुभद्रा
माझी बहिण तर आहेच परंतु द्रौपदी सुध्दा माझ्या बहीणी सारखीच आहे. आणि मला ती प्रिय देखील आहे. जर सुभद्राचे तुझ्या सोबत जाणे आवश्यक नसते तर मी तुला
सुभद्रा हरण करण्याचे सुचविले नसते.परंतु तू असा विचार
मुळीच करू नकोस की मी नाईलाजाने तुझी सहायता करतोय म्हणून. "
" म्हणजे ? मी काही समजलो नाही केशव ."
" तुझ्या साठी ते जाणून घेणे सध्या आवश्यक पण नाहीये. फक्त एवढेच द्यानात ठेवायचे की सुभद्रा तुम्हा चंद्रवंशीची अमानात आहे.जा पार्थ माझा रथ तुझी वाट पाहत
आहे." अर्जुन बोलला ," प्रणाम केशव !" असे बोलून तो तेथून
जाऊ लागताच पाठीमागून श्रीकृष्ण उद्गारला ," अजून एक
गोष्ट ऐक पार्थ ह्या प्रवासात सारथी सुभद्रा ला बनविणे योग्य
ठरेल."
" पण सुभद्रा ला बरं ?"
" कारण हा प्रवास तुझा नाहीये तर तिचा आहे."
" जशी आपली आज्ञा !" असे म्हणून तेथून निघून गेला.
सुभद्रा आपल्या सखी सोबत पूजेची थाळी घेऊनि मंदिरात
जायला निघाली. तिच्या सोबत तिचे अंगरक्षक ही होते.
ती जशी मंदिरा जवळ पोहोचली तसा तेथे अर्जुन रथ आला.
अर्जुनला पाहताच ती पुढे होऊन तिने आजूनच्या हातात आपला हात दिला. अर्जुन ने तिचा हात पकडला नि आपल्या
रथात घेतले. त्या सरशी सुभद्रा ने अर्जुनाच्या हातातून लगामाचे दोर पाहत ती सारथी बनली.ते पाहून तिच्या सख्या
आणि अंगरक्षक मागच्या मागच्या मागी पळाले.
अर्जुन ने सुभद्रा चे हरण केले ही वार्ता वाऱ्या सारखी
सर्वत्र पसरली.बलराम ला ही खबर मिळताच संतापाने
त्याचे डोळे लालबुंद झाले त्याने लगेच आपल्या सैन्याला
आदेश दिला की कुंती पुत्र अर्जुन ने अतिथी मर्यादाचे उल्लंघन केले आहे त्याने आमच्या बहिणीचे अपहरण केले
आहे.अर्थात आपल्याला त्याचा पाठलाग करत इंद्रप्रस्थला जावे लागले तरी हरकत नाही आम्ही अवश्य इंद्रप्रस्थला जाऊ !" तेव्हा सैन्यातूनही आवाज उमटले की आम्ही अवश्य
इंद्रप्रस्थ ला जाऊ !" असे म्हणत सर्वजण श्रीकृष्णा पाशी
येतात परंतु श्रीकृष्णा त्यावर आपली प्रतिक्रिया काहीच देत
नाहीत. त्यावर बलराम समजला की श्रीकृष्ण आपल्या मताशी सहमत नाहीये. म्हणून व्यक्तिशः त्याने विचारले ,
" श्रीकृष्ण तुला आमचा निर्णय मान्य नाही का ?"
" मी असं कुठं म्हटलं ?"
" तू काहीच बोलत नाहीस याचा अर्थ काय होतो ? शिवाय
तू जेव्हा रुक्मिणी चे हरण केले होतेस तेव्हा तिच्या भावाने
अर्थात रुक्मी ने तुझा रस्ता अडविला नव्हता काय ?"
" पहिली गोष्ट म्हणजे मी रुक्मिणी चे हरण केले नव्हते.
हे आपल्याला सुध्दा माहीत आहे की रुक्मिणी ने मला आपली सहायता करायला बोलविले होते. कारण तिचा भाऊ
तिचे लग्न तिच्या मना विरुध्द शिशुपाल शी करून देत होते.
मी फक्त तिची मदत केली होती दाऊ !"
" हे तू काय सांगत आहेस ?"
" मी तेच सांगत आहे जे तुम्ही ऐकत आहात. असं तर नाही ना दाऊ तुम्ही सुभद्राचे लग्न तिच्या मना विरुध्द दुर्योधन
शी करत आहेत म्हणून तिने अर्जुनची सहायता मागितली असेल."
" परंतु सुभद्राला हे कुणी सांगितले की तिचे लग्न मी दुर्योधन ठरविले आहे ? आणि तुला कोणी सांगितले की सुभद्रा दुर्योधन शी लग्न करू इच्छित नाहीये म्हणून."
" मला स्वता सुभद्राने सांगितले दाऊ की ती दुर्योधन शी
लग्न करू इच्छित नाहीये."
" परंतु तिला सांगितले कोणी ?"
" मी जेव्हा तिला ही आनंदाची बातमी ऐकली तसा लगेच तिच्या भवन मध्ये गेलो नि तिला झोपेतून जागे करून
ही खुशखबर दिली."
" म्हणजे तू तिला जागे करून सांगितलेस."
" हां !"
" मग तिने तुझ्याकडे मदत का नाही मागितली ?"
" मागितली ना, पण मी नाही म्हणालो. म्हटलं की दाऊ
दुर्योधनला वचन देऊन आले आहेत."
" अस्स मग तिने अर्जुन कडे मदत कधी मागितली ?
म्हणजे तिचा हा संदेश घेऊन अर्जुन कडे कोण गेला ? अर्जुनला कोणी सांगितले की ती देवदर्शन करायला मंदिरात
जाणार आहे म्हणून."
" ह्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे तुला स्वता सुभद्राच देऊ शकेल
दाऊ ! परंतु हे तर मला तिच्या अंगरक्षकानी सांगितले की
जेव्हा अर्जुन तिला आपल्या रथात घेत होता तेव्हा सुभद्राने
आपल्या अंगरक्षकाकडे मदत नाही मागितली. आणि एकाने
तर असं सांगितलं की सुभद्रा स्वतःच अर्जुनच्या रथाची सारथी होती याचा अर्थ असा होत नाही का दाऊ ? जर हरण
झालंय तर अर्जुन ने सुभद्राचे नाही केले तर सुभद्राने अर्जुन चे
केलंय. " तेवढ्यात कोणीतरी म्हणाले ," अर्जुन ने ज्या भांड्यात अन्न खाल्लं त्याच भांड्याला छिद्र पाडले. त्याने आमच्या अतिथी धर्माचा अपमान केला आहे कृष्ण आणि हे
मी कदापि सहन करणार नाहीये." लगेच दुसरा एकजण बोलला ," त्याने आपल्या मृत्यूला आमंत्रण दिले आहे."
" हां हां अपमान आम्ही सहन करणार नशीये."
" मी आपल्या सोबतच आहे .परंतु माझ्या एका प्रश्नाचे
उत्तर तुम्ही द्या सर्वजण. प्रश्न असा आहे की रुक्मीनी हरण
मध्ये ह्यांनी आणि आपण सर्वांनी मला मदत का केली होती ?
स्वतः दाऊ पांडवांच्या सेवेचे गुणगान गात असतात. त्याच्या
मध्ये असा कोणी आहे जो आपल्या आत्येच्या घराचा अपमान करील. खरं सांगायचं तर अर्जुन ने आपला मान
वाढविला आहे. द्रौपदी स्वयंवरात कर्णाने सुद्धा मत्स्यभेद केला असता तर ह्या अश्या स्वयंवरांची काय गरज आहे की
पुत्री आपल्या इच्छेनुसार आपला वर निवडू शकत नाहीये.
पुत्री कोणी पशु नाहीये की तिला पुरस्काराच्या रुपात कोणालाही दिली जावी. ती काही वस्तू नाहीये हरल्यावर अथवा जिंकल्यावर दिली जाते. अर्जुन ने आमच्या ह्या
विवाह प्रथे मध्ये दोष पाहिला आणि सुभद्रा हरण द्वारा आमचा मान राखला. आम्हाला तर त्याचे आभार मानायला
पाहिजे शिवाय त्याच्या मध्ये काय खोट आहे ? पार्थ पांडुपुत्र
आहे , द्रोण शिष्य आहे , सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे , योध्याच्या गर्दी मध्ये असा कोणी वीर आहे का जो अर्जुनची मैत्री नाकारेल ? तो भारत आहे, शंतनू चा नातू , कुंतीभोज चा नातू , त्रैलोकात सुभद्रा साठी मला ह्याच्या पेक्षा चांगला दुसरा
कोणी वीर नाहीये. महादेवच्या व्यतिरिक्त असा कोण आहे जो
रणभूमी मध्ये त्याला हरवू शकेल ? मी तर म्हणतोय आपण
सर्वांनी जाऊन त्याना सन्मानपूर्वक द्वारकेला घेऊन येऊ या
जर तो आपल्या लोकांना हरवून इंद्रप्रस्थ ला पोहोचला तर
द्वारीकेचे हसे होईल. जर आपल्या हेच हवंय तर उचला आपले धनुष्य बाण आणि तुनीर आणि करा पाठलाग त्यांचा." त्यावर बलराम उद्गारला ," मला हे चांगले माहीत होते
की जर ह्यला बोलायला संधि दिली तर हा आपल्या सर्वांना
गप्प केल्याशिवाय राहणार नाही आणि शेवटी तेच झाले.
आता पाहताय काय असेच जा नि जावई बापुना सन्मानपूर्वक घेऊन या इकडे. " असे म्हणून तो श्रीकृष्णा च्या
खांद्यावर आपला हात ठेविला.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा