महाभारत - २७ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी, दिवाळी संग्रह | महेंद्रनाथ प्रभु.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाभारत - २७ |
महाभात - २७
युधिष्ठिर ने भीम ला पुढे बोलू दिले नाही ; परंतु विदुर ने अर्धवट वक्तव्याचा देखील पूर्ण अर्थ लावला. आणि त्याने ही
गोष्ट गंगापुत्र भीष्मां पाशी कथन केली. तेव्हा गंगापुत्र
भीष्म उद्गारले," हे ऐकल्यानंतर मला असं वाटू लागलंय की
माता सत्यवतीला दिलेले वचन मी पूर्ण करण्यात असमर्थ ठरलोय. होय ना ?" त्यावर विदुर बोलला ," नाही तातश्री
तुम्ही कुठं ही कमी पडलेले नाहीयेत."
" नाही कसा ? माता सत्यवती ने पांडू पुत्राना माझ्या
हवाली करून गेली होती. मी आपली पूर्ण जबाबदारी पार
पाडू शकलो नाही असेच मला आता वाटू लागलंय.
" एवढं मनाला लावून घेऊ नका तातश्री!"
" मग काय करू ?"
" दुर्योधन ला बोलवून घ्या. आणि त्याला थोडी समज द्या."
" तुला काय वाटतं दुर्योधन समजून घेईल .....कदापि
नाही. त्याला कारण काय माहितेय. दुर्योधन धृतराष्ट्रा ने लिहिले हस्ताक्षर आहे , त्याचं स्वतःच असं काहीही असित्व
नाहीये. आणि धृतराष्ट्र त्याच्या डोळ्यांनी आपली सर्व स्वप्न
पूर्ण करू इच्छितोय. हे लोक मला सुखाने मरू सुद्धा देणार
नाहीत.आणि माझी लाचारी बघ मी त्या राज सिंहासनाला म्हणू सुध्दा शकत नाही की मी तुझी रक्षा करण्यास असमर्थ
आहे म्हणून. म्हणून विदुर शपथ घेताना पूर्ण सावधानता पाळली पाहिजे , नाहीतर मग असं तोंडघशी पडायला लागतं."
" हे काय बोलताय तुम्ही तातश्री ! तुम्हीच जर असं बोलू
लागलात तर मग आम्ही काय करायचं ? कुणाकडे घेऊन
जावी आपली फिर्याद ? आणि कोण ऐकून घेणार ती ? तातश्री तुम्ही ह्या राज घराण्याचे मुख्य खांब आहात. तुम्ही जर डळमळू लागले तर ह्या राज घराण्याचे काय होईल याचा
विचार तुम्हीच करा."
" काय करावे तेच मला कळेनासे झालंय. वर्तमान काळात घडत असणाऱ्या घटना कडे पाहिल्या नंतर भविष्य काळात काय घडेल याची कल्पना देखील करवत नाही. धृतराष्ट्रा च्या उच्चकांक्षा इतकी फोफावली आहे,की त्याचं विषवृक्षात रुपांतर होऊ लागलंय म्हणून मनाला चिंता वाटून
राहिलीय. की उद्या ह्या विष वृक्षाची पूर्ण वाढ झाल्यानंतर काय होईल ."
" या बाबतीत राजनीती हेच सांगते अश्या वृक्षाला मुळा सकट काढून फेकून द्या."
" नाही विदुर नाही. असं नाही करू शकत."
" का नाही करू शकत ?"
" बाळाने आपल्या मांडीवर शौचास केला म्हणून आपण
आपली मांडी तर कापत नाही ना ? दुर्योधन अजून लहान
आहे, त्याला सुधारविता येईल. परंतु धृतराष्ट्र आणि दुर्योधन
यांच्या मनात विषारी खत पाणी घालायचे काम गांधार कुमार शकुनी करतोय. त्याचा असा समज झाला आहे की नेत्रहीन धृतराष्ट्राशी गांधारी चा विवाह करून हस्तिनापूर ने गांधार परिवार चा अपमान केलाय. आणि त्या अपमानाचा बदला घेण्याच्या हेतू नेच तो इथं हस्तिनापूरात तळ ठोकून बसलाय.
आणि त्यांने धृतराष्ट्र आणि दुर्योधन ह्या दोघांना आपला मोहरा बनविला आहे."
दुर्योधन आणि दु:शासन दोघेही एकदम खुश असतात.
त्याना वाटत असते की आपण पांडुची एक बोट कापून टाकले.परंतु परमेश्वराच्या इच्छे शिवाय झाडावरील एक पान
सुध्दा हलत नाही.मग पांडू पुत्रांस कोण मारणार बरे ?
भीम सहीसलामत परत आलेला पाहून ह्या दोघांची
पाचरधानी बसली. ते दोघेही आपल्या मामा जवळ आले.
शकुनी त्या दोघांना पाहून उद्गारला ," या भाच्या नो !"
" काय मामाश्री कसला फालतू उपाय सांगितला तुम्ही !"
" का ? काय झालं ?"
" मामाश्री भीम परत आलाय आणि तो सुध्दा पहिल्या पेक्षा ताकद वर बनून."
" असं कसं होऊ शकतं ? ते विष नागाने दंश केल्या शिवाय उतरणारच नाही. तुम्ही नेमकं काय केलंत ते सांगा ."
" आम्ही खिरीत विष घातले नि ती खीर भीमाला खायला दिली."
" बरं पुढे."
" तो मूर्च्छित होताच आम्ही त्याला गंगा नदीत फेकून
दिले."
" बस्स ! ही एकच चूक केली तुम्ही ! त्याला पाण्यात टाकल्या मुळे नागाने त्याला दंश केला असेल. कारण तिथे नागवंशी राहतात.आणि त्यामुळेच ते विष उतरले. जर तुम्हा लोकांना मी सांगितलेला उपाय करायचा होता तर त्या विषयीची संपूर्ण माहिती माझ्याकडून घ्यायची होती.
नि मगच तो उपाय करायचा होता; पण तुम्ही दोघे
नीट ऐकून घेत नाहीत त्यामुळे मग असं अपयश पदरात पडतं."
" मला तर गुरुकुलात जाऊ नये असं वाटतं. " दु:शासन
भीमाच्या भीतीने उद्गारला.
" असं मात्र अजिबात करू नकोस. गुरुकुलात जायचं सोडू नका. पण त्या अगोदर मला एक सांगा की तुम्ही दोघांनी त्याच्या सोबत काय केलंय ते त्याने कुणाला सांगितले आहे का ?
" अजून तर नाही."
" बस्स तर मग चिंता करण्याचे कारण नाही. त्याला जरूर कुणीतरी सांगितले असेल ,असे करायला. परंतु आपल्यासाठी तर ही सुवर्ण संधी आहे, ते लोक जर काही झालेच नाही असा दिखावा करत असतील तर आपण ही तसंच वागायचं की आम्हाला काही माहीतच नाही.कळलं.
दोघांनी होकारार्थी आपली मान डोलावली. तेव्हा शकुनी पुढे
बोलला ," आणखीन एक गोष्ट सांगतो ती द्यानात ठेवा. आणि
ती गोष्ट म्हणजे ते आता गप्प बसणार नाहीत. काहीतरी कुरापत काढणारच. तेव्हा एकच काम करायचं आणि ते म्हणजे आपल्या पिताश्री ना सरळ जाऊन सांगायचं पण
तिखट-मीठ लावून , कळलं." तसे ते दोघेही निघून जातात. शकुनी आपले फासे फेकत उद्गारला ," सात !" आणि काय आश्चर्य सातच आकडा आला.
एके दिवशी दुर्योधन आणि दु:शासन एका आंब्याच्या
झाडाखाली उभे असतात. झाडावर खूप पिकलेले आंबे त्या
दोघांना दिसतात. तेव्हा त्या आंबे खाण्याची फार इच्छा होते
परंतु आंबे खूप वरती असतात. हाताला येतील असे नसतात.
अर्थात ते काढण्यासाठी झाडावर चढण्या विषयी विचार करतच असतात. तेवढ्यात समोरून भीम आला. परंतु त्या
दोघांनी त्याच्याकडे पाहूनही न पाहिल्या सारखे केले. तेव्हा
भीम म्हणाला ," अरे दुर्योधन मला पुन्हा खीर कधी देणार आहेस ?" त्यावर दुर्योधन उद्गारला , " आम्हाला तुझ्याशी बोलण्यात काही रस नाहीये." भीम उद्गारला ," माझी जरा
पाठ खाजवून देतो का ?" त्यावर दुर्योधन चिडून बोलला,
" आम्ही तुझे नोकर नाही." असे म्हणून ते दोघेही आंब्याच्या झाडावर आंबे काढायला चढले. तेवढ्यात भीमा ने काय की झाडाला आपली पीठ घासू लागला. तसे ते झाडही हलु लागले. मग काय दोघेही झाडावरून खाली
पडले. त्यानंतर त्या दोघांनी भिमाची तक्रार आपल्या पिताश्री
जवळ केली. तेव्हा गांधारी पण तेथे होत्या. त्यांनी भीमाला
विचारले की, भीम हे खरंय का ?"
" मोठ्या आई माझ्या पाठीला खाज सुटली होती म्हणून
मी माझी पाठ झाडाला घासली. तेव्हा हे दोघे झाडावर चढले होते ते स्वतःच खाली पडले."
" नाही आई ,हा खोटे बोलतोय."
" बेटा भीम तू खोटं बोललास ! "
" होय आई !"
" का खोटं बोललास ?"
" कारण तुम्ही खरं ऐकू शकणार नाहीत. तुम्हाला फार वाईट वाटेल."
" दुर्योधन , तो ऐकत नव्हता तर युधिष्ठिर ला सांगायचं होतं."
" तो आपल्याच भावाची बाजू घेतो."
" असं नाही बोलायचे. युधिष्ठिर तुझा सुध्दा मोठा भाऊ आहे."
" नाही. त्या परिवारातील तो मोठा आहे, नि या परिवारातील मी मोठा आहे ." असे म्हणून तो तेथून निघून
गेला. तेव्हा गांधारी भीमाला उद्गारल्या ," बेटा भीम इथं ये
माझ्या पाशी ! " तसा भीम त्यांच्या जवळ जातो. तश्या त्या
भीमाला आपल्या छातीशी प्रेमाने कुरुवाळत त्या म्हणाल्या,
" भीम ,असं आपसांत भांडायच नसतं."
" मोठ्या आई, दुर्योधन काही ना काही खोड्या करत
राहतो. एके दिवशीची हकीकत सांगतो. " असे म्हणून त्याने
एके दिवशी काय घडले ते सांगायला सुरुवात केली. दुर्योधन
आणि दु:शासन दोघांनी मिळून झाडावर चढून आंबे काढले.
आणि खाली उतरल्यावर मला म्हणाले ," आंबे नदीवरून धुऊन आणतो. असे म्हणून ते घेऊन गेले नि थोड्या वेळा
नंतर फक्त ते आंबे खाऊन त्या आंब्याच्या बिया घेऊन आले नि मला सांगू लागले की नदीत धुवत असताना त्याचा सारा रस गळून गेला नि केवळ बिया तेवढ्या राहिल्या. मग मोठ्या आई मला सांग ही आपसात प्रेम वाढवायची लक्षणे आहेत का ?"
त्यावर गांधारी निउत्तर झाली. काय बोलावे न सुचल्याने
त्या म्हणाल्या ," त्याने तुझी काही खोडी काढली ना ,की मला
येऊन सांगायचे. आता तू जा तुझी आई वाट बघत असेल तुझी !" भीम दोघांनाही नमस्कार करतो नि तेथून निघून जातो. त्यानंतर गांधारी महाराज धृतराष्ट्रा कडे उद्गारली ,
" ऐकलेत आपल्या चिरंजिवाचे प्रताप."
" त्यात दुर्योधन चा काही दोष नाहीये. जे माझ्या सोबत
घडलंय ते आता त्याच्या सोबत घडू पाहतेय तर त्याचा रोष
असणार ना त्याच्या मनात ?"
" काय बोलावे तुमच्या पुढे मला खरंच काही कळत नाहीये. मुलाच्या चुकीच्या वागणूकी बद्दल त्याला उपदेश करायचे सोडून त्याचं समर्थन कसलं करता ?"
" गांधारी नेत्र हीन असल्यामुळे मला राज सिंहासन मिळाले नाही. परंतु माझा दुर्योधन तर नेत्र हीन नाहीये ना ?
मग त्याचा अधिकार त्याला का डावलला जातोय ? म्हणून मी सुद्धा पाहणारच आहे की ह्या वेळी विदुर कोणता
नीती बाण चालवतोय तो ?"
" जे तुमच्या भाग्यरेषे मध्येच नाही. ते मिळविण्याचा अट्टहास का धरताय तुम्ही ? आणि तसे पहायला गेले युधिष्ठिर जेष्ठ तर आहेच नि योग्यतेच्या बाबतीत म्हणाल तर युधिष्ठिर च उजवा ठरतो. अर्थात युधिष्ठिरलाच युवराज व्हायला हवे."
" गांधारी तू इतक्या सहजतेने हे कसे सांगू शकतेस ?"
" कारण हेच सत्य आहे आणि आपल्याला देखील ते
ठाऊक आहे ; परंतु आपल्याला स्वीकारायला ते जड जातेय इतकेच ! "
एके दिवशी सर्व मुले चेंडूचा खेळ खेळत असताना एकाने चेंडू फेकला तो विहिरीत जाऊन पडला. सर्व मुले विहिरी सभोवती गोळा होतात. परंतु विहीर फार खोल असते. त्यात
उतरण्याचे काही साधन नसते. कौरव ,पांडव याना कळत नाही की अश्या काय करायला हवे. तेवढ्यात पाठीमागून
एक भारदस्त आवाज आला की कोण पडलंय का आंत मध्ये ? सर्व मुले मागे वळून पाहू लागली. तेव्हा त्यांनी
पाहिले की कुणीतरी वृध्द ब्राम्हण त्यांच्या जवळ येत बोलला.
तेव्हा अर्जुन बोलला ," गुरूवर आम्ही खेळत असताना आमचा चेंडू विहिरीत पडला. आणि आम्हाला तो काढता येईना ? " तेव्हा ते गुरूवर म्हणाले ," तुम्ही राजपुत्र असून
तुम्हाला एक चेंडू विहिरीतून काढता येत नाही मग तुम्ही
या भूमंडाळाची रक्षा कशी करणार ? " असे बोलून ते पुढे
म्हणाले ," गवताच्या काढ्या घेऊन या. " ,तशी मुलं पळाली
नि गवताच्या काढ्या आणून त्यांच्या हातात दिल्या. मग त्यांनी एका पाठोपाठ एक काढ्या फेकल्या. त्या काढ्या एकमेकांना सांधून रस्सी तयार झाली. गुरुवरणी चेंडू विहिरीतून बाहेर काढला. हा अद्भुत प्रकार पाहून अर्जुन
पळतच गंगापुत्र भीष्मा जवळ गेला नि घडलेली सविस्तर
घटना त्याने सांगितली. ते ऐकून गंगापुत्र भीष्म आश्चर्य व्यक्त
करत म्हणाले ," कुठं आहेत ते महापुरुष ?" तेव्हा अर्जुन
बोलला ," मी त्याना विहिरीवरच सोडून आलो. " तेव्हा त्यांनी
तेथूनच हात जोडून नमस्कार केला. तसे अर्जुन ने विचारले
की आपण कुणाला प्रणाम केलात आजोबा ?" आचार्य द्रोणाचार्यांना ! चल माझ्या बरोबर." ते निघाले तसा अर्जुन
त्यांच्या मागोमाग आला. जिथे आचार्य द्रोणाचार्य बसले होते
तेथे गंगापुत्र भीष्म आले नि त्यांनी आचार्य द्रोणाचार्यांना वंदन केले. तसे आचार्य द्रोणाचार्य उद्गारले ," हस्तिनापूर नरेश
कडून का ?"
" हो !"
" द्रोण कडून ही आपले स्वागत आहे , गंगापुत्र भष्म ! कृपाचार्य कसे आहेत ?" तेव्हा गंगापुत्र भीष्म उद्गारले ," कृपाचार्य कृपीला भेटायला दोन दिवसांपूर्वी तुमच्या आश्रमात गेले आहेत. तुमची त्यांच्याशी भेट झाली नाही का ?"
" नाही."
" तुमच्या कडे एक काम आहे ."
" कोणतं ?"
" हस्तिनापूर च्या राजकुमारांना विद्या प्रधान करा."
" पण कृपाचार्य आहेत ना ?"
" कुलगुरू होण्याच्या नात्याने त्यांची जबाबदारी फार वाढली आहे, म्हणून त्यांच्याच कथनानुसार तुमची निवड केली आहे. आणि मला आशा आहे की तुम्ही राजकुमारचे गुरुत्व स्वीकारल. "
" ठीक आहे . " तेवढ्यात शकुनी दुर्योधन ला घेऊन तेथे
आला नि दुर्योधन मार्फत गुरू द्रोणाचार्यांना सोन्याची मुद्रा भेट
म्हणून त्यांच्या चरणावर ठेवतो. तसे ते चिडून बोलले ,' गुरू
दक्षिणा शिक्षण दिल्या नंतर स्वीकारली जाते अगोदर नाही.
" क्षमा असावी."
" विद्या सवर्ण मुद्राने विकत घेतली नाही. शिष्य आणि गुरू
यांच्यातले नाते म्हणजे भक्त आणि ईश्वर असं नाते असावे लागते शकुनी कुमार !" गंगापुत्र भीष्म उद्गारले.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा