महाभारत -१९ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी, दिवाळी संग्रह | महेंद्रनाथ प्रभु.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाभारत -१९ |
१९
श्यामसखा एकटाच एका झाडापाशी उभा असतो. तेवढ्यात तेथे श्रीकृष्ण आला नि त्याला तिथे एकट्याला पाहून विचारले ," अरे,बंधूं तू एकटा इथं काय करतो आहेस ?" त्यावर श्यामसखा बोलला," काय करणार ?
मी नेत्र हीन असल्यामुळे एकट्या ला इथं सोडून ते सारेजण
निघून गेले. मला म्हणाले, तू श्याम सखा आहेस ना, मग
श्याम सोबतच ये."
" कोण बोलतोय तू नेत्र हीन आहेस म्हणून."
" माझ्या सहित सर्वजण च !"
"नेत्र हीन तर थोडे थोडे सर्वच असतात. जे पाहायला पाहत नाहीत आणि नको तेच पाहतात."
" मला तर बस्स आपल्या श्याम ला पाहायचंय."
" एक दिवस जरूर पाहशील तू मला."
" परंतु कधी ?"
" सांगतो. अगोदर मला तू हे सांग मी कसा दिसत असेंन ?
म्हणजे कल्पना कर." त्यावर श्यामसखा बोलला ," तुझ्या
मुखमांडळावर सुर्यासारखे तेज असेल , डोक्यात मयूर पंख
कमरेला बासरी, पितांबर नेसलेला."
" अरे वा ! तू तर मला न पाहताच अचूक ओळखलेस
ह्यालाच म्हणतात मनातील डोळे. मनातील डोळे ओळखतात
ते डोळे असलेली माणसं पण ओळखू शकत नाही .मग मला
सांग. नेत्र हीन कोण डोळे असलेले की नसलेले ?"
" माझं मन राखण्यासाठी बोलतोयस ना तू हे ?"
" नाही. खरंच तसं नाहीये." पण तेवढ्यात च त्याला काही
आठवते तसे तो विषयांतर करत बोलला ," बरं ते जाऊ दे, परंतु आपल्याला आज एक काम करायचं आहे."
" कोणतं काम ?"
"आजपासून मथुरेला लोणी न्यायचं बंद करायला हवं."
असे बोलून तो तेथून निघाला त्याच्या सोबत श्यामसखा होताच. त्या दोघांनी मथुरेला जाणाऱ्या गवळणी ना रस्तात
अडविले. म्हणाला ," आज पासून मथुरेला लोणी न्यायचे नाही ."
" बाजूला हो नंदलाल ,दुपार होत आली आहे, जास्त उशीर झाला तर सर्व लोणी खराब होईल."
" आणि वेळेवर लोणी मथुरेत पोहोचले नाही तर महाराजांचा राग अनावर होईल."
" अरे कान्हा तुला माहीत नाही. महाराज कंस ला क्रोध
आला तर साऱ्या नंद गावाला आग लावेल."
" यमुना असताना आग कशी लागेल बरं !"
" तुला नाही माहीत तो फार दुष्ट आहे, तो काय करेल हे
सांगता येणार नाही."
" कान्हा तू आपल्या सख्या सोबत खेळ जा बरं !"
" खेळच तर खेळतोय.
" कान्हा , असं करू नकोस. आतापर्यंत चे तुझे सर्व हट्ट
आम्ही पुरविले. परंतु हा हट्ट बरा नव्हे ! कारण यामुळे कंस
भयंकर चिडणार ! " तेवढ्यात त्याचे सारे सवंगडी सुध्दा आले. त्याना पाहून श्रीकृष्ण बोलला ," घ्या. सवंगडी पण आलेत."
" कान्हा ऐक आमचं. आम्हाला मथुरेला जाऊ दे."
" अजिबात नाही. आजपासून मथुरेला लोणी घेऊन
जाणे बंद." शेवटी नाईलाजाने ते सर्व न्याय मागायला नंदराय
कडे जातात. आपलं गाराने नंदराय पुढे मांडतात. शेवटी विनंती करतात की आता तुम्हीच काहीतरी समजावून
सांगा त्याला." नंदराय उद्गारले ," ते काम तुम्ही यशोदेला सांगा. तिचे ऐकेल तो माझं अजिबात ऐकणार नाही."
" नाही नाही. यशोदाताई त्याला काही बोलणार नाही त्यापेक्षा तुम्हीच बोला. " तेवढ्यात तेथे श्रीकृष्ण आला
नि म्हणाला ," आजपासून मथुरेला काहीही जाणार नाहीये."
" पण कान्हा हे आम्ही त्याला काराच्या रूपाने देतो."
" कर का द्यायचा त्याला ? तो आपले संरक्षण करतो का ? का द्यायचा आपण त्याला कर."
" कान्हा आजपर्यंत तू जे जे करायला सांगितले ते मी आम्ही केलं पण हे म्हणजे अतीच होतंय असं नाही वाटत तुला."
" बाबा, पहिल्या लोणीवर हक्क कुणाचा आम्हां मुलांचा
नंतरच राहील ते मथुरा वाल्याना द्या."
" कान्हा तू सांगितले स की पाहिलं दूध गाईच्या वासरांना
आम्ही तेही मान्य केलं. लोकांच्या घरचे लोणी चोरून खाल्लेस , गवळणी च्या घागरी फोडल्यास तेही आम्ही मान्य
केलं परंतु महाराज कंस ला हे लोणी नाही पोहोचले तर फार
मोठी आपत्ती या गावांवर येईल."
" काहीही होणार नाहीये."
" तू ऐकत का नाही ?"
" नाही म्हणजे नाही आणि तरी ही तुम्ही त्याला लोणी दिलात तर आजपासून मी लोणी खाणार नाही."
तसा नंदराय उद्गारला ,' कान्हा नको म्हणतोय तर आजपासून मथुरेला दूध, दही,लोणी काहीही जाणार नाही."
मथुरेला दूध ,दही,लोणी सर्वकाही जाणे बंद झाल्यामुळे
महाराज कंस भयंकर चिडला नि उद्गारला," नंद गाववाल्यांची
ही हिंम्मत ! " असे म्हणून त्याने सैनिकांना आदेश दिला की,जा नी नंद गाव पूर्ण बेचिराख करून टाका. आणि नंद गावातील साऱ्या गाई पकडून इथं घेईन या. " कंस चे सैनिक नंदगावात शिरले गाई ना पिटाळत घेऊन जाऊ लागले. तेव्हा फक्त नदी पार करण्याचे तेवढे राहिल्या होत्या. लगेच कुणीतरी येऊन श्रीकृष्णाला खबर दिली. श्रीकृष्णाने आपली मुरली वाजवायला सुरुवात केली. जसा मुरली चे मधुर स्वर गाईच्या कानी पडले तश्या गाई माघारी वळल्या. सैनिकांनी त्याना पुन्हा परतवण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ गाई मागे फिरल्या नाहीत. उलट त्यांनी आपल्या पायांच्या टापाखाली सैनिकानाच तुडविले. सैनिकांनी तेथून पळ काढला. ही गोष्ट
जेव्हा कंस ला समजली तसा तो आपल्या सैनिकांवर भंयकर
चिडला नि त्याना मृत्यूदंड ची शिक्षा फर्मावली. त्यानंतर त्याने
दोन राक्षसाना आदेश दिला की नंद गावात जा नि साऱ्या
गावाची पूर्ण राख रांगोळी करा." लगेच ते दोन्ही राक्षस नंद गावात जायला निघाले. नंद गावात पोहोचताच त्यांनी नंद
गावच्या लोकांच्या घरांना आग लावण्याचे काम सुरू केले.
गावातील लोकांनी ही सूचना श्रीकृष्ण आणि बलराम या दोघांनी दिली. तेव्हा लगेच श्रीकृष्ण आणि बलराम निघाले
त्या दोघांचा समाचार घ्यायला . जेव्हा ते दोघे तेथे पोहोचले
तेव्हा त्यांनी पाहिले त्या दोन राक्षसानी बऱ्याच लोकांची
घरे जाळली होती. श्रीकृष्णाला पाहून एका राक्षसा ने आपल्या मायावी शक्ती च्या जोरावर श्रीकृष्णाला जाळून मारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात तो यशस्वी झाला नाही.
उलट श्रीकृष्णा ने त्याच्यावर सोडलेल्या अग्नि चक्रात जळून
भष्म झाला. आणि दुसऱ्या राक्षसाला बलराम ने ठार केले.
त्यानंतर सारे गावकरी श्रीकृष्ण आणि बलराम ची
प्रशंसा करतात. तेव्हा नंदराय हसून म्हणाले ," दरवर्षा प्रमाणे
या वर्षी सुध्दा इंद्र देवाची पूजा करण्याची तयारी सुरू करा."
तसे सर्वजण इंद्र देवाच्या पूजेची तयारी सुरू करतात. यशोदा सुध्दा पूजेची तयारी करत असते. तेवढ्यात तेथे श्रीकृष्ण आला नि विचारू लागली की ही कशाची तयारी
सुरू आहे ?" तेव्हा यशोदा उद्गारली ,' इंद्र देवाच्या पूजेची
तयारी सुरू आहे." तेव्हा श्रीकृष्णा ने विचारले की, इंद्र देवाची
पूजा आपण का करायची ?" यशोदा म्हणाली ," कान्हा असं
नाही बोलायचं नाहीतर इंद्रदेवाला भयंकर राग येईल."
" रागावणाऱ्या देवाची पूजा आपण का म्हणून करायची ?"
" अरे कान्हा, इंद्र देवामुळेच धरतीवर पाऊस आणि पडल्यामुळे आपल्याला प्यायला पाणी, अन्नधान्य पिकते हे
केवळ पावसामुळे आणि पाऊस कोण पाडतो तर इंद्र देव !
म्हणून आपण त्याची पूजा करतो."
" नाही नाही नाही इंद्र देवामुळे पाऊस पडत नाही. तर
पाऊस पडतो या गोवर्धन पर्वतामुळे आणि झाडांमुळे ! आणि आपले अमृता सारखे झाडांना पाणी पाजून त्याना वाढविण्याचे काम यमुना नदी करते. अर्थात यमुना नदीची पूजा करायला पाहिजे. आणि ढोंगरामुळे ढग अडविले जातात म्हणून पाऊस पडतो. त्यामुळे ढोंगरावर गवत उगवते आणि गवत खाऊन गाई आपल्याला दूध देतात. म्हणून या गोवर्धन पर्वताची पूजा करायला पाहिजे इंद्राची नव्हे !" श्रीकृष्णाचे ऐकून नंद गाववाले गोवर्धन पर्वताची पूजा करायला घेतात. परंतु दरवर्षा प्रमाणे आपली पूजा न केल्यामुळे इंद्र देव भयंकर चिडला. नि त्याने वरुण देवला आदेश दिला की नंद गावांवर भयंकर वर्षावृष्टी कर." त्या प्रमाणे वरुण देव भयंकर वर्षावृष्टी करतो. नदीला पूर येतो. जिकडे तिकडे पाणीच होते. तेव्हा सुदामा म्हणाला ,
" पाहिलंस कान्हा इंद्र देवाची पूजा न केल्याचा परिणाम ! एवढ्यात च माफी माग इंद्र देवाची ! नाहीतर सारा गाव पाण्याखाली बुडून जाईल ."
तेव्हा श्रीकृष्ण गोवर्धन पर्वताला एका बोटाने उचलतो.
तेव्हा सारे नंद गाववाले ,नि गुरे वासरे, त्या गोवर्धन पर्वताच्या
आश्रयाला जातात. इंद्र देव पाऊस पाडून-पाडून थकतो नि
शेवटी श्रीकृष्णाला शरण जातो. श्रीकृष्ण त्याला मोठ्या मनाने माफ करतात. ही गोष्ट मथुरा नरेश कंस च्या कानावर
जाते. तसा तो समजला. एका करंगळी वर गोवर्धन पर्वत उचलणारा सामान्य मनुष्य होऊ शकत नाही. अर्थात हा देवकीचा आठवा पुत्र श्रीकृष्ण च असणार. हे त्याच्या द्यानात
येताच पुतना मावशीच्या हातून मारला गेला अशी खबर देणाऱ्या दूतावर भयंकर चिडला. म्हणाला ," ही तूच दिली होतीस ना खबर ?" त्यावर तो दूत म्हणाला," हो ! परंतु हा
दुसरा मुलगा असला पाहिजे." त्यावर कंस म्हणाला ," नाही.
हा दुसरा तिसरा कुणी नाही. हा देवकीचा आठवा पुत्रच आहे.
कारण गोवर्धन पर्वत उचलणे हे सामान्य मनुष्याचे काम नव्हे ! शिवाय आकाशवाणी हीच होती ना की तो मला
ठार मारील. परंतु माझे म्हणणे आहे की मी त्याला ठार मारीन."
" कसा मारणार.....तिथं जाऊन ?" महामंत्री ने विचारले.
" मी तिथं जाणार नाही. तर तो इथं येईल." कंस उद्गारला.
" तो इथं का येईल बरं ?"
" त्याला वसुदेव चा मित्र अक्रूर जाऊन घेऊन येईल. "
" पण नंदराय पाठविणार नाही."
" अक्रूर ला नाही म्हणणारच नंदराय !" असे म्हणून महाराज कंस ने महामंत्री ला आदेश दिला की अक्रूर ला
निरोप पाठवा. राजदरबारात हजर होण्याचा!" तसा लगेच
महामंत्री ने अक्रूर ला राजदरबारात हजर राहण्याचा आदेश
पाठविला. आणि थोड्याच वेळात अक्रूर राजदरबारात हजर
झाला. त्याला पाहून त्याच्या सामोरी जात महाराज कंस उद्गारला ," ये मित्रा ! फार दिवसांनी भेट होतेय आपली ."
" हो , कारण राजदरबाराशी आपलं काही देणं घेणं च नाही ना ?"
" मला कल्पना आहे,तुझ्या जिवलग मित्राला मी कारागृहात टाकले. म्हणून तू माझ्यावर नाराज आहेस ना,
परंतु आता असं होणार नाही. आणि खरं सांगायचं तर मला
पश्चात्ताप माझ्या वागण्याचा ! पण मी तरी काय करणार ?
आकाशवाणी ऐकून मी घाबरलो होतो. म्हणून माझ्या कडून
ते कृत्य घडलं. परंतु मी आता ठरवलं की विधात्या कडून जर
मला मरण येत असेल तर चांगली गोष्ट आहे ना !"
" म्हणजे ? आता तुमचा विचार बदलला."
" अरे बदलला म्हणजे काय ? बदलायलाच पाहिजे ना ?
विधात्या ला आपण मारू शकतो का नाही ना ?"
" मला अजूनही विश्वास होत नाहीये."
" अरे कसा विश्वास होणार ? मी वागलोच तसा तर ! पण
आता माझ्यात खूप बदल झालाय. म्हणून मी तुझ्या मित्राची माफी मागणार आहे,परंतु त्याला देण्यासाठी काहीतरी मोठा उपहार पाहिजे ना ?"
" उपहार ?"
" हां म्हणजे भेट !"
" काय भेट देणार तुम्ही माझ्या मीत्राला ?"
" तुझ्या मित्रासाठी एकच अनमोल भेट आहे,आणि ती भेट गोकुळात राहणारा श्रीकृष्ण ! त्याला तू जाऊन घेऊन ये." अक्रूर ला त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून श्रीकृष्णाला
आणायला तो तेथून निघाला.
राधा नि श्रीकृष्ण एका झाडाखाली बसलेले असतात. तेव्हा
राधा त्याला विचारले की तू मुरली कुणासाठी वाजवतोस ?
त्यावर श्रीकृष्ण उद्गारला ," मुरलीचे स्वर तर सर्वच ऐकतात.
परंतु मी मुरली केवळ तुझ्यासाठी वाजवतोय." तेव्हा राधा
उद्गारली ," मग आता इथं कुणी नाही आहे,तेव्हा आता तू फक्त माझ्यासाठीच मुरली वाजव." श्रीकृष्ण मुरली वाजवू
लागला. आणि राधा एकदम मुरलीची मंजुळ धून ऐकण्यात एवढी मग्न झाली की बस्स ! तिला बलराम आल्याचे पण नाही कळाले. बलराम थोड्या वेळ तसाच उभा राहून आळीपाळीने दोघांकडे पाहत राहिला. दोघेही एकदम मग्न
होते. थोड्या वेळाने बलराम ने राधाला हांक मारली. तशी
राधा भानावर आली. परंतु काही न बोलता फक्त बलराम
कडे पाहत राहिली. परंतु तिचा चेहरा स्पष्ट सांगत होता की
बलराम आलेला तिला आवडले नाही. बलराम स्मित हास्य करत बोलला ," कान्हा ss "
" दादा काय झालं ?"
" जागांच्या कल्याणाविषयी काही विचार करणार आहेस का नाही ?"
" अरे,नाही कसा त्या साठीच तर आलो आपण ना ?"
" मग चल." श्रीकृष्ण उठला नि बालराम सोबत निघाला
परंतु निघण्यापूर्वी राधाला म्हणाला ," राधा मला जायला हवं." त्यावर राधा काहीच बोलली नाही.
अक्रूर चा रथा ने नंद गावात प्रवेश केला. तेव्हा नंद गावातील सारे अक्रूर कडे आश्चर्या ने पाहू लागतात. आणि
थोड्याच वेळात अक्रूर नंदराय च्या घरी पोहोचला. आणि आपण इथं कशासाठी आलोय हे देखील सांगितले. तेव्हा नंदराय कान्हाला त्यांच्या सोबत पाठवायला तयार होत नाही.
तेव्हा अक्रूर उद्गारला ," नंदराय आपल्याला मला आणि
महाराजांना सुध्दा माहीत आहे की कान्हा कुणाचा मुलगा आहे?" तेव्हा नंदराय म्हणाले ," ते काही जरी असले तरी ही
कान्हाला आम्ही महाराज कडे पाठवू इच्छित नाही. कारण
माझा महाराजावर माझा अजिबात विश्वास नाहीये."
" नंदराय जी कान्हा ला मथुरेला न पाठविण्याचा परिणाम
किती भयंकर असेल याची आपण कल्पना केली आहे का ?"
" मला कल्पना त्याची पण ......?"
" आता पण बिन काही नाही. नंद गावच्या सुरक्षेसाठी
कान्हाला मथुरा पाठविणे जरूर आहे. आणि तुम्ही हा विचार
का करत नाही. की ज्याने एका बोटावर गोवर्धन उचलले त्याला कोण मारू शकतो ?" दोघांचा एवढा वार्तालाप होत
नाही तोपर्यंत श्रीकृष्ण आणि बलराम तेथें कधीचेच येऊन
दोघांचे संभाषण ऐकत होते. अक्रूर ची नजर त्या दोघांवर
पडताच ते दोघेही एकदम उद्गारले ," नमस्ते काका ! कसे
आहात ?" अक्रूर उद्गारला ," एकदम मस्त ! पण तुम्ही दोघे
कसे आहात ?" श्रीकृष्ण उद्गारले ," आम्ही तुमचीच वाट पाहत होतो." तेव्हा नंदराय ," कान्हा तुला माहीत आहे, अक्रूर जी इथं का आले आहेत ?"
" आम्हाला मथुरेला घेऊन जाण्यासाठी ! ऐकलं आहे, मथुरा रावणच्या लंके पेक्षा ही सुंदर आहे म्हणून."
" कान्हा त्यांनी रावणाची लंका पाहिलीच नाहीतर त्या
विषयी ते काय सांगणार ?"
" मथुरा सुंदर आहे. म्हणून आम्ही दोघेही ती बघायला
जाणार आहोत."
परंतु ही गोष्ट जेव्हा यशोदा ला समजते तेव्हा यशोदा त्याला मथुरेला पाठवायला अजिबात तयार होत नाही.
तेव्हा नंदराय तिला समजविण्याचा प्रयत्न करत म्हणाले,
" ह्याला रोखू नकोस यशोदा !" नंदराय उद्गारले.
" तुम्ही आई नाही आहात ना, म्हणून असं म्हणताय ; परंतु
मी एक आई आहे, मी कसं जाऊ देईन त्याला तिथं. त्या
दिवशी जन्मलेल्या मुलांपैकी केवळ हाच तर वाचला आहे.
आणि तुम्ही म्हणताय मी त्याला कसाई कडे पाठवू ? हे तर माझ्या कडून होणार नाहीये."
" आई,मी महाराज ला हे थोडेच सांगायला जातोय की
मी कोणत्या दिवशी जन्मलोय."
" तू चूप रे ! एकदा सांगितले ना,मी तिथं नाही पाठविणार."
" अरे यशोदा ,तिकडे ह्याच्यावर लक्ष ठेवायला अक्रूर आहे
ना "
" घ्या. ह्यांचे ऐका आता कौतुक ! इथं मी त्याच्या वर लक्ष
ठेवायला असमर्थ ठरते. तेथे अक्रूर कुठं पुरे पडणार ! शिवाय
हा नंद गाव आपला आहे,ह्या गावातील लोक त्याला काही
बोलत नाही. त्यांचे लोणी चोरून खातो, तर कुणाचे मटके फोडतो पण कुणी काही बोलत नाही. तिथं कोण लक्ष
ठेवणार ह्याच्या वर बरं !"
" अगं यशोदा तिथं तुझी मैत्रीण देवकी पण तर आहे, ती
ठेवेल त्याच्यावर लक्ष !"
" ती बिचारी स्वतःच कारागृहात आहे. ती कसं ठेवील लक्ष ?"
" आई मी मथुरा पाहायला अवश्य जाईन."
" तू मथुरा पाहण्याच्या लालच मध्ये आपल्या आईला
पण सोडून चाललास !"
" आई ,मथुरा इथून किती दूर आहे, तू जरी मोठ्या ने
मला हांक मारलीस ना ,तरी मी धावत येईन तुझ्या कडे."
राधा फुले वेचत असताना तिच्या सख्या तेथे आल्या नि
तिला म्हणाल्या ," राधा, तू इथं फुल वेचत राहिली आहेस."
" का ? काय झालं ? तुम्ही एवढ्या घाबरलेल्या का दिसता ?"
" तुला नाही माहीत ,कान्हा नंद गाव सोडून मथुरेला
चाललाय ?"
" बरं मग ?"
" त्याला फक्त तूच थांबवू शकतेस. कारण तो तुझंच ऐकतोय ."
" मी कसे रोखू त्याला. मी फक्त त्याची भक्त आहे. आणि
मला माहित आहे, प्रसाद वाटण्यासाठी असतो. मी तुम्हां
लोकांना नाही का वाटला ? आणि मोहन फक्त राधाचा थोडाच आहे ? ते मी त्याला कुंटीला बांधून ठेवू ? तो साऱ्या जगाचा आहे. आणि साऱ्या जगाचाच त्याला राहू दे. त्याच्या
वर जे आपले प्रेम आहे ते त्या धना सारखे आहे , जे वाटल्याने अधिकच वाढत जाते."
" तू सरळ असं का सांगत नाहीस की त्याला तुला रोखायच नाहीये."
" वाहणारी नदी आणि वाहणाऱ्या वाऱ्याला रोखणे योग्य
नाहीये. त्या पाण्याने आपली तहान जरूर भागवा परंतु त्याला अडवू नका. ते इतरांना पण प्यायला मिळायला पाहिजे. वाटीत पडलेल्या चंद्राच्या चांदण्याला पाहून जर वाटी समजली की मी चंद्राला कैद केले तर तो दोष वाटीचा
आहे, चंद्र आपल्या जाग्यावरच स्थिर आहे नि तो साऱ्यांना
प्रकाश वाटत आहे. जो सर्वांचा आहे, त्याला फक्त आपला
समजणे म्हणजे मूर्खपणा नव्हे काय !"
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा