Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

महाभारत - २३ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी, दिवाळी संग्रह | महेंद्रनाथ प्रभु.

महाभारत - २३
महाभारत - २३

 


                                       २३


   महर्षी व्यास यांचे हस्तिनापूर ला आगमन झाले. जेव्हा त्यांनी माता सत्यवती च्या कक्षेत प्रवेश केला तेव्हा माता सत्यवती फार मोठ्या विवंचनेत होती. त्यांनी आपल्या मातेला संबोधित करीत म्हंटले ," प्रणाम माते !" तश्या त्या
खडबडून उठत म्हणाल्या ," या महर्षी व्यास !"
    " माते माझ्या साठी उठून उभं राहायची गरज नाही."
    " मी माझा पुत्र आला म्हणून उठून  उभी राहिली नाही तर महर्षी व्यास माझ्या दारी आले म्हणून उठून उभी राहिली."
    " आईपुढे तर कधी कधी ईश्वरला  सुध्दा नतमस्तक व्हावे
लागते. आईच्या पुढे कुणी मोठे नाही.ना ईश्वर ना ऋषी !"
     " आज आपल्या आईची आठवण कशी झाली पुत्र ?"
     " मला आई साठी एक  शेटवचे कर्तव्य करायचं राहिलंय ते करायला  आलोय ."
      " शेवटचे कर्तव्य ?" न समजून त्या उद्गारल्या.
     " हां शेवटचे कर्तव्य !"
     " काळ एका नदी प्रमाणे फक्त वहात असतो. आणि शरीर
एक होडी समान आहे,आणि त्या होडीत आत्मा एक प्रवाशी आहे तो नेहमी आपले ठिकाण शोधतच असतो."
     "  हे आपण काय बोलताय मला खरंच कळलं नाहीये."
     " आई , तुला कसं माहीत असणार ,भविष्यात इथं काय
घडणार आहे ते."
      " भविष्यात काय घडणार आहे इथं ?"
      " जे घडणार आहे ते तू पाहू शकणार नाहीस ?"
     " म्हणजे काय घडणार ते मला सांग ना ?"
     " जे उद्या घडणार आहे ते आजच जाणून घेऊ का इच्छिते
आहेस ?"
     " मला जाणून घेणे फार गरजेचे आहे. सांग काय घडणार
आहे ?"
     " आई , भविष्यात काय घडणार ते ईश्वर सुध्दा सांगत नाही मग मी कसा सांगणार बरं ?"
     " एक पुत्र म्हणून सांगू शकत नाहीस का ?"
    " नाही. कारण विधिलिखित मध्ये स्वतः ईश्वर देखील
हस्तक्षेप करत नाही. अर्थात मला ही तो अधिकार नाही.
म्हणून तुला फक्त मी इतकेच सांगू शकतो की तुझा इथला
मुक्काम संपलेला आहे, अर्थात तुला ,अंबिका आणि अंबालिका तुम्ही तिघीनी माझ्या सोबत यायचंय."
    " कुठं ?"
    " तपोवनात ."
    " तपोवनात का बरं ?"
    " ते यासाठी की धृतराष्ट्र तर नेत्र हीन आहे, त्याला
काही दिसणारच नाही. मात्र ते पाहून तू दुःखी होशील."
    " तुम्ही असं का बोलू लागलाय आज ?"
    " एक चांगली गोष्ट आहे आई, की मनुष्य आपले भाग्यलिखित वाचू शकत नाही.त्यामुळे भविष्यात घडणाऱ्या
घटनेची त्याला कल्पना ही नसते.कारण ज्या घटना घडतात
त्या पूर्व नियोजितच असतात. फक्त त्या बद्दल आपल्याला
काही माहीत नसते. इतकेच."
    " तुम्ही काय बोलताय ते मला नक्कीच कळत नाहीये."
    "  कळत नाहीये तेच चांगले आहे,निदान ते जाणून दुःखी
तरी होणार नाहीयेस."
    "  म्हणजे इथं नक्कीच काहीतरी दुर्घटना होणार तर !"
    "  जे होणार आहे,ते तू पाहू शकणार नाहीस म्हणून तू
माझ्या सोबत तपोवन मध्ये चल. हेच तुझ्यासाठी योग्य आहे."
     " पुत्र जे होणार आहे त्याला आपण टाळू शकत नाही का ?"
    " नाही. त्याला कुणीही टाळू शकत नाही. कारण विधिलिखितात जे लिहिलंय तेच घडणार. म्हणून सांगतोय
तुम्ही तिघीही जनी माझ्या सोबत चला. मी तुम्हां तिघीनाही न्यायला आलोय." मग सत्यवती माते त्या दोघीना तपोवन
मध्ये जाण्यासाठी तयारी करायला सांगितली.तयारी जशी झाली तशी तिघीहीजनी महाराज धृतराष्ट्राच्या कक्षेत जाण्यास निघाले.

           धृतराष्ट्र

    गांधारी, माझ्या कानावर आलंय की हस्तिनापूरात महर्षी व्यासाचे आगमन झाले आहे."
    " आजीला भेटायला आले असतील."
    " नाही गांधारी महर्षी व्यास कारणाशिवाय कधी हस्तिनापूरात येत नाहीत."
     " याचा अर्थ नक्कीच काहीतरी गंभीर समस्या आहे."
     " बहुतेक तसेच काही !" तेवढ्यात महर्षी व्यास सहित
सत्यवती, अंबिका आणि अंबालिका सर्वजण  माझ्या कक्षेत प्रवेश करतात. नुसत्या त्यांच्या पावलांच्या आवाजाने मी त्याना ओळखले नि म्हटलं ," आपण माझ्याकडे येण्याचे का
कष्ट घेतलेत आजी  ! मला बोलवायचे होते ना ? " असे म्हणून चरणस्पर्श केले. तसा सत्यवती माते ने आशिर्वाद दिला ," चिरंजीवी भव !" गांधारी ने चरणस्पर्श केले. तसा
माता सत्यवती ने आशिर्वाद दिला," सौभाग्यवती भव !"
त्यानंतर  आम्ही उपयतांनी अंबिका आणि अंबालिका ह्या दोघीचेही चरणस्पर्श केले. महर्षी व्यास यांचे ही चरणस्पर्श
केले. तेव्हा आजी म्हणाली ," हे पुत्र महर्षी व्यास म्हणतात की आम्हां  तिघींचे हस्तिनापूरात राहण्याचे दिवस आता संपले आहेत. अर्थात आम्हां तिघीना यांच्या सोबत तपोवनात
जायला हवं आहे." त्यावर मी एकदम विनम्र स्वरात बोललो
की , माझ्या कडून काही चुकलं का आजी ?"
    " नाही. अजूनपर्यंत तर नाही. "
    " मग माताना का घेऊन चालले आहेत वनात ? "
   " जसे तू सर्वांना त्यांच्या पावलांच्या आवाजाने ओळखतोस की तुझ्या पाशी कोण येत आहे, तसेच ईश्वर करो येणाऱ्या काळाची गती ओळख."
     " हा नेत्र हीन धृतराष्ट्र काळाची गती काय ओळखणार
महर्षी !"
      " घटना आणि दुर्घटना साठी भाग्याला दोष देऊ नकोस पुत्र ! कारण  मनुष्याचे  भाग्य त्याच्या कर्मानुसार बदलते. कर्म न करिता केवळ भाग्यरेषेवरच अवलंबून  राहिला तर कर्माला काही अर्थच उरणार नाही.कारण फळ हे प्रत्येक मनुष्याच्या कर्मानुसारच मिळते. चांगले कर्म करा म्हणजे चांगले फळ मिळेल. म्हणून प्रत्येक कर्माला तो स्वतःच जबाबदार असतो. कोणता मनुष्य कधी काय करणार आहे, हे फक्त ईश्वराला माहीत असते ; परंतु त्यात तो हस्तक्षेप मात्र
अजिबात करत नाही. म्हणून तुला मी एवढंच सांगू इच्छितो की जशी गांधारी ने आपल्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे तशी आपल्या आत्मावर पट्टी बांधू नकोस. म्हणजे माझ्या वक्तव्याचा अर्थ इतकाच की दुर्योधन भले ही तुझा जेष्ठ पुत्र आहे ,परंतु युधिष्ठिर करुवंश जेष्ठ पुत्र हे कदापि विसरू नकोस." त्यावर मी म्हटलं की , तर मग ऋषीवर मला सुध्दा
घेऊन चला तुमच्या बरोबर."
     " संन्यास घेणे म्हणजे  आपल्या कर्तव्यापासून  मुक्त झालो.असे गृहीत धरणे एकदम चुकीचे आहे. आपले कर्तव्य पूर्ण केल्याशिवाय संन्यास घेणे म्हणजे आपल्या कर्तव्या पासून दूर पळणे होय. अर्थात गृहस्थाश्रमाची सर्व कर्तव्य पूर्ण
केल्याशिवाय संन्यास देखील प्राप्त होत नाही. म्हणून गृहस्थाश्रमची सर्व कर्तव्य पार पाडणे हेच तुझं प्रथम कर्तव्य आहे. याचा अर्थ इतकाच जी वस्तू तुझी नाही आहे ती मिळविण्याचा प्रयत्न करू नकोस. ती ज्याची अमानत  आहे
त्यालाच ती देऊन टाक."
      महर्षी व्यास ना नेमके काय सांगायचे आहे, ते मला कळलं. परंतु मन ही गोष्ट कदापि मान्य नाही की ज्यावर माझा अधिकार होता. ते राज सिंहासन मला मिळालं नाही.
ते राज सिंहासन कमीतकमी माझ्या जेष्ठ पुत्राला तरी मिळायला हवं होतं पण नियतीनं इथं ही माझ्यावर अन्याय केला. पांडू चा पुत्र युधिष्ठिर  करुवंश चा जेष्ठ पुत्र म्हणून जन्मला. माझं भाग्य माझ्याशी असं का खेळ खेळत आहे
तेच कळत नाहीये. असा विचार माझ्या मनात सुरू असतानाच आजी ने मला हांक मारून माझे विचार मध्येच
खंडित केले. " पुत्र धृतराष्ट्र !"
     " जी माते !"
    " मी महाराज पांडू च्या पाची पुत्राना तुझ्या हवाली करून
जात आहे, तू आपले द्यान यत्किंचितही त्यांच्या पासून हटवू
नकोस.फक्त एवढं च लक्षात ठेव की ती मुलं तुझ्या धाकट्या
भावाची अमानत आहे. त्याना तुझे प्रेम दे.आणि ती मुलं मोठी
झाल्यावर त्यांचा अधिकार त्याना देऊन टाक.  त्याना आपला अधिकार मागण्याची पाळी त्यांच्यावर आणू नकोस. कारण
अधिकार मागितल्यावर जो दिला जातो त्यात आपुलकी राहात नाही. आणि हे कदापि विसरू नकोस की दुर्योधन जसा तुझा जेष्ठ पुत्र आहे तसाच युधिष्ठिर महाराज पांडू चा
जेष्ठ पुत्र आहे,अर्थात हस्तिनापूर च्या राजगादी वर युधिष्ठिर चा अधिकार आहे." असे म्हणून किंचित थांबून सुस्कारा सोडत त्या गाधरीं कडे पाहत उद्गारल्या ," गांधारी मी हस्तिनापूर पुत्र धृतराष्ट्रा च्या स्वाधीन करत आहे नि धृतराष्ट्र
तुझ्या स्वाधीन करत आहे,  ह्याचा हात सोडू नकोस." तशी
गांधारी ने त्याना नमस्कार केला. तेव्हा आजी ने तिला आशिर्वाद देत म्हटलं की ,परमेश्वर तुला न्याय करण्याची शक्ती देवो ! हीच त्या ईश्वर चरणी प्रार्थना !" त्या जायला निघाल्या तसे मी सुध्दा त्यांच्या सोबत जायला निघालो तर
आजी मला म्हणाली ," तू इथंच थांब. मला मुख्यद्वारापर्यंत
गांधारी सोडायला येईल.चल गांधारी !" 
    मी तिथंच उभा राहिलो नि गांधारी त्याना मुख्यद्वारापर्यंत
सोडायला गेली. तेव्हा मला तर भयंकर राग आला सर्वांचा.
म्हणजे उठसुठ कुणीही मलाच उपदेशाचे धडे देऊ लागला
आहे. माझ्यावर अन्याय झालाय त्याबद्दल कुणी बोलतच नाहीये.
             

                         गंगापुत्र भीष्म

       मला दूत मार्फत सूचना मिळाली होती की महर्षी व्यास
आले आहेत नि ते सरळ माता सत्यवती च्या कक्षेत गेलेत हे
देखील समजले. कदाचित आपल्या आईची भेट घ्यायला आले असावेत असा मी प्राथमिक अंदाज लावला. त्यानंतर सूचना मिळाली की ते सत्यवती आईच्या कक्षेतून महाराज धृतराष्ट्राच्या कक्षेत गेले आहेत.असे समजले. आणि त्यांच्या
सोबत आई सत्यवती आणि अंबिका आणि अंबालिका सुध्दा
सोबत आहेत अर्थात काहीतरी गंभीर समस्या हे मी ओळखले नि तिकडे जाण्याची तयारी करत असतानाच ते
महाराज धृतराष्ट्रा च्या कक्षेतून बाहेर पडलेत.
           मुख्यद्वारापाशी येताच आई सत्यवती म्हणाली ,
    "  बस्स  गांधारी ! हीच तुझी सीमा यापुढे तू येऊ आमच्या सोबत येऊ नकोस. कारण हीच गृहस्थाश्रमची सीमा आहे.
मात्र कुंती आणि तिच्या मुलांवर लक्ष ठेव. बस्स ! यापेक्षा अधिक सांगणे नाही. " असे म्हणून त्या महामंत्री विदूरच्या कक्षेत गेल्या.महामंत्री विदुर आणि त्याच्या पत्नी ने त्या
स्वागत ही केले नि त्या सर्वांचे चरणस्पर्श करुन सर्वांचा आशिर्वाद ही घेतला. त्यानंतर गंगापुत्र भीष्म च्या कक्षेत गेले
असता त्या गंगापूत्र भीष्मांला उद्देशून म्हणाल्या ," आता तुझा
ही निरोप घ्यायला मी आली आहे." तेव्हा गंगापुत्र भीष्म उद्गारले ,"  मला सुध्दा तुझ्या सोबत तपोवन मध्ये येण्याची
आज्ञा दे आई !" त्यावर सत्यवती उद्गारल्या ," मी तुला आज्ञा
देऊ शकत नाही कारण तू  कुरु सिंहासनशी बांधलेला आहेस. अर्थात हेच तुझे तपोवन आहे नि हीच तुझी तापश्या !"
     " परंतु आई, कुरु सिंहासन तर चारही दिशानी एकदम
सुरक्षित आहे."
     " गंगापुत्र भीष्म तुम्ही हस्तिनापूर चे भविष्य पाहिले आहे
का ? आणि तुम्ही कधी पण हे विसरू नका की तुम्हाला फक्त
इच्छा मृत्यूचे वरदान मिळाले आहे , इच्छा जीवनाचे नाही.
मृत्यू येईपर्यंत तुम्ही या सिंहसनाशी  बांधील रहा नि जीवन
जगत रहा. जीवन जगणे फार कठीण असतं हे ब्राहस्पती शिष्याला सांगायला लागू नये." असे म्हणून ते आपल्या आईकडे वळून पाहत बोलले ," चल आई !"
     " संपूर्ण परिवारावर लक्ष ठेव. कारण आता सर्वात मोठा
तूच आहेस या करुवंशा मध्ये." तसा गंगापुत्र त्याना नमस्कार
करतात. तश्या त्या त्याना आशिर्वाद देतात ,आयुष्यमान भव ! " आणि  महर्षी व्यास " यशव्ही भव ! " असा आशिर्वाद
देतात. आणि मग सर्वजण तेथून प्रस्थान करतात.

                                   धृतराष्ट्रा
 
     महर्षी व्यास माझ्या कक्षेतून जाऊन बराच वेळ झाला तरी
मी आपल्याच विचारात गर्क आहे की नियतीने माझ्या सोबत
असा अन्याय का केला ? प्रत्येक जण येतो नि मलाच उपदेशाचे धडे देऊन जातो. पण कुणी हा विचार का करत
नाही की माझ्यावर जो अन्याय झालाय त्याचं काय ? तेवढ्यात गांधारी आल्याची चाहूल मला लागली. तसा मी उद्गारलो ," ये गांधारी तू पण ये आणि तुझ्या भात्यात जर तिर
असतील तर बेलाशक माझ्यावर सोड आणि मला रक्तबंबाळ कर. कारण माझा जन्म विषारी बाण खाण्यासाठीच झालाय गांधारी ! "
     " असं काहीतरी च काय बोलताय तुम्ही आर्यपूत्र ?"
     " मग आणखीन काय बोलू ? आता पाहिलेस ना महर्षी
व्यास काय म्हणाले ते."
     " महर्षी व्यास काही चुकीचे बोलले असे मला मुळीच वाटत नाही."
     " वाटणारच तुला. तू पण त्यातलीच ना ? मग तुला वेगळं
कसं वाटणार ? पण माझं दुःख दुसऱ्या कुणाला सांगू ?"
     " पण मी म्हणते एवढं मनाला लावून घ्यायचं कारण काय ? "
    " तुला नाही कळणार माझं दुःख काय आहे ते."
    " आपण सांगितलंत तर नक्की कळेल. सांगा बरं !"
     " माझ्या मनात एक भीती निर्माण झाली.'
     " भीती आणि ती कशाची ?"
      " हा राजमुकुट पुन्हा माझ्या डोक्यावरून खेचला जाणार."
     " केवळ राजमुकुट ही जीवनाचे लक्ष नाहीये आर्यपूत्र !"
     " ही पीडा तू नाही समजू शकणार गांधारी ! फक्त तोच
समजू शकतो की त्याच्या हातून त्याला प्रिय असणारी वस्तू
कुणीतरी हिरावून घेतली जाते.त्यालाच कळतात या वेदना.
अर्थात आपल्या जीवनाचे हे कटू सत्य मी विसरू शकत नाही
कितीही ते विसरण्याचा प्रयत्न केला तरी ही मला नाही विसरता येत. गांधारी. परंतु ते जाऊ दे मला हे सांग कुंतीला
भेटुन आलीस ?"
      " आता जाईन. तुमची परवानंगी घ्यायलाच आली होती
मी !"
     " माझ्या परवानंगीची तुला गरज काय ? तू तर पट्टराणी
आहेस पूर्ण राजभवणावर आहे तुझा अधिकार.म्हणून कुंती च्या सुख समाधानात काही अंतर पडू देऊ नकोस. तू मोठी
आहेस अर्थात त्याना कशाचीही कमतरता पडू देऊ नकोस.
आणि विशेष म्हणजे पांडू पुत्रावर विशेष लक्ष ठेव . त्याना अजिबात असं बाटतां कामा नये की ते इथं अनाथ आहेत."
     " असं का वाटेल  त्याना ? दुर्योधन चे भाऊ तर ते आहेतच. त्यात काय संशय आहे ?"
      " फक्त होऊन काही चालत नाही गांधारी ! म्हणायला तर
मी करुवंश चा जेष्ठ पुत्र परंतु आता ह्या राज्याचा जेष्ठ करुवंश
चा जेष्ठ पुत्र युधिष्ठिर आहे."
     " दुर्योधन ला मी हेच समजविण्याचा प्रयत्न करत होती आर्यपूत्र ! की युधिष्ठिर तुझा मोठा भाऊ आहे , परंतु त्याचा हट्टी स्वभाव तर तुम्हाला ठाऊक आहे ना , तेव्हा आपणच
त्याला समजवून सांगा."
   " जर मीच स्वतःला आजपर्यंत समजवू शकलो नाही तर
त्याला मी काय समजविणार  कप्पाळ ! म्हणजे बघ ना, पांडू
राजा झाला कारण मी आंधळा होतो म्हणून. परंतु मी दुर्योधन ला कसं समजावू , कारण तो माझ्या सारखा नेत्र हीन सुध्दा नाही. "
     " आपण ही जखम भरू का देत नाहीत ?"
     " नाही भरत तर त्याला मी काय करू ? आता तूच विचार
कर ना, दुर्योधन ला आतापर्यंत हेच सांगत आलोय की माझ्या मृत्यू नंतर ह्या राज सिंहासनांवर तुझाच अधिकार आहे म्हणून. कुलगुरू कृपाचार्य सुध्दा त्याला तेच सांगत आलेत. मग आता असं कसं सांगू की युधिष्ठिर तुझा थोरला
भाऊ आहे, म्हणून राज सिंहासन वर तुझा नाही तर त्याचा अधिकार आहे, तुला सिंहासन हवे असल्यास कर्मद्वारा आपली योग्यता सिध्द कर. आणि मगच राज सिंहासनावर आपला अधिकार सांग."
      " परंतु आपल्याला असं का वाटते की दुर्योधन आपली
योग्यता सिध्द करू शकणार नाही. तो सर्व बाबतीत पांडू
पुत्रा पेक्षा वरचढ आहे."
     " हो आता आहे ; पण पुढे असाच राहील कशावरून ?"
     " तो कायमस्वरूपी अग्रेसर नाही राहिला तर तो हस्तिनापूर चा युवराज होण्याच्या लायक नाही हे सिध्द होईल. आणि राजगादी मिळायला नशीब लागते."
     " परत नशीब ! हे नशीब माझाच रस्ता का रोखुन धरतो
ते मला कळत नाही."
     " आर्यपूत्र आपल्या ललाटी लिहिलेली भाग्यरेषा मिठविण्याचा प्रयत्न केला तरी ती मिटणार नाही."
      " याचा अर्थ असाच झाला ना , की आमच्या कर्माला
काहीच अर्थ नाहीये."
     " नाही. असा त्याचा अर्थ नाहीये. आपल्या कर्माचे भागीदार आपणच असतो. भाग्य तर आपला आरसा आहे,
आणि आरसा तेच दाखवतो जे त्याच्या समोर असते. भाग्यरेषा मनुष्याला बांधणारी दोरी नाहीये. भाग्य तर मनुष्याची जीवन कथा आहे. म्हणून भाग्याला दोष देणे सोडा." तसा मी चिडून बोललो ,"  मला उपदेश देऊ नकोस
गांधारी ! मला फक्त तुझी साथ हवीय. या दुवीधातून बाहेर
निघण्यासाठी ! मला तर कधी कधी स्वतःचीच भीती वाटते."
     " कुठल्याही भरतवंशी ला घाबरणे शोभा देत नाही आर्यपूत्र ! आणि जास्त महत्वकांक्षी होणे सुद्धा घातक आहे. आपण हा विचार करू नका की आपण दुर्योधन चे पिता आहात. परंतु हा विचार जरूर करा की आपण हस्तिनापूर चे
नरेश आहात. आणि न्याय करणे आपला धर्म आहे आणि
कर्तव्य सुद्धा !" गांधारी ने खूप महत्वाचा उपदेश दिला परंतु
माझी महत्वकांक्षा नेहमीच माझा पिच्छा करत राहिली. त्यामुळे योग्य निर्णय घ्यायला मला कधी जमलेच नाही.

     क्रमशः

    


    



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..