Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

महाभारत - २८ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी, दिवाळी संग्रह | महेंद्रनाथ प्रभु.

 

महाभारत - २८
महाभारत - २८


                               २८

     सांदीपनि ऋषींच्या आश्रमात स्वतः ईश्वर जो विद्याचा सागर आहे तो नदीकडून विद्या शिकण्यासाठी गेलाय. ऋषी सांदीपनि एक श्लोक म्हणतात तो असा, 
एको देव: सर्व भूतेषु गुढ: सर्वव्यापी सर्वभूतान्तरात्मा! कर्माध्यत्यक्ष: सर्वलोकाधिवास ,! साक्षी चेता केवलो निर्गुणश्च!!
     श्रीकृष्ण सुदाम शी मुद्दाम बोलला की, गुरूंनी शिकविलेला आज चा श्लोक मला समजला नाही. तू ब्राम्हण
आहेस ,अर्थात तुला नक्कीच माहीत असेल याचा अर्थ ?"
    तसा सुदाम अभिमानाने श्लोकचा अर्थ सांगू लागला की,
अर्थात ईश्वर एक आहे,  सर्व पदार्थामध्ये ही त्याचा वास आहे.
आणि सर्व जिवा मध्येही तोच विराजमान आहे. तो सर्वाला व्यापून आहे, तोच सर्व प्राण्यांचा अन्तरात्मा आहे, तोच सर्व कर्मांचा ज्ञाता आणि निर्णयक आहे, तोच सर्व प्राण्यांची चेतना ही आहे आणि निर्गुण आहे. ज्या मध्ये ना काही  मनोभाव ना काही गुण !" असे म्हणून  बोलता-बोलता मध्येच थांबला. 
     तेवढ्यात श्रीकृष्ण त्याचे अपूर्ण वाक्य पूर्ण करत म्हटले,
साक्षी ला विसरलास तू ! सर्व कर्माचा तोच साक्षी आहे, तो सर्वकाही पाहत असतो. आणि सर्व काही  करत असतो."
    " कधी कधी मला कळत नाही की तू काय बोलतो आहेस
ते, परंतु  बोलतोस छान !" कृष्ण काही न बोलता तेथून निघून
गेला. सुदाम आश्रमात पोहोचला. त्याला फार भूक लागली
होती म्हणून तो गुरुमातेला उद्गारला ," गुरुमाता मला फार
भूक लागली आहे." तेव्हा गुरू माता त्याला म्हणाली ," तू
ब्राम्हण आहेस, तुला भूक सहन करता येईल परंतु ते दोघे.....
    " त्या दोघां विषयी तर फार चिंता आहे तुम्हाला. पण तुम्हाला माहितेय कृष्ण तर नंद गावात लोणी चोरून खायचा
आणि बलराम पण त्याच्या पेक्षा काही कमी नाही. आपण
मला जेवायला वाढा ना, मला फार भूक लागली आहे.
     " जोपर्यंत कृष्ण, बलराम येत नाहीत तोपर्यंत तुला जेवण
मिळणार नाहीये."
    " मग मी स्वयंपाक घरात जाऊन बसू का ? मणजे जेवणाचा सुगंध तरी घेता येईल." तेव्हा गुरुमाता चिडून बोलली ," तुला फक्त जेवायचेे कसं सुचते रे , त्या पेक्षा शिक्षणाकडे जरा लक्ष दे." तेवढ्यात समोरून सांदीपनि ऋषी
येताना दिसतात. ते जवळ येताच त्या उद्गारल्या ," ह्या मुलांच्या जेवणाचे भान ठेवा म्हटलं."
      " पूजा आत्माचे जेवण आहे."
      " परंतु शरीरासाठी जेवणाची आवश्यकता आहे का नाही ? का फक्त विद्यायनम ! " त्यावर सांदपनि ऋषी हसतात. तश्या त्या श्रीकृष्णाला म्हणाल्या ," चल तुझ्यासाठी
मी लोणी काढलं आहे." श्रीकृष्ण उद्गारला ," नंद गावा सोबत मी लोणी खायचंही सोडलं गुरुमाता !"
     " असं का बोलतो आहेस कृष्णा मी भले यशोदा नाही.परंतु  आई तर आहे ,त्यामुळे माझ्याही ममता आहे .
चल हात तोंड धुऊन ये मग मीच भरवते तुला." असे म्हणून
त्या स्वयंपाक घरात निघून गेल्या. तेव्हा पट्कन सुदामा
श्रीकृष्णा जवळ येत उद्गारला ," कृष्णा आता ह्या ब्राम्हण वर
कृपा कर. आणि जेवायला चल."
     " हां चल. " श्रीकृष्ण , बलराम हात-पाय धुऊन येतात नि
पानावर बसतात. नि जेवू लागतात. गुरुमाता त्याला अजून
वाढू लागली तर तो म्हणाला," बस बस गुरुमाता अजून नाही."  त्यावर गुरुमाता उद्गारली," जेवलास नाही तर अभ्यासात तुझं मन कसं लागेल बरं ?"
     " मला भूक नाहीये आई !" तसा सुदाम लगेच त्याची थाळी खेचत बोलला ," तुला भूक नाही आहे तर तुझी थाळी मला देऊन टाक." तशी त्याच्या हातावर आपला हात मारत
गुरुमाता उद्गारली ," चूप ! मी आपल्या हाताने भरविते आपल्या श्रीकृष्णाला. त्यावर बलराम उद्गारला ," अरे वा !
गुरुमाता सेवा तर मी करतो ,आणि तू माया ह्याच्यावर करतेस." त्यावर श्रीकृष्ण उद्गारला ," मोठा भाऊ कशाला
बनलास ? छोटा भाऊ बनला असतास तर हे सर्व सुख तुला
मिळालं असतं."
    " छे छे ! मी मोठाच ठीक आहे."
   " तुम्ही लोकं भोजन करून लौकर झोपा. कृष्ण आणि सुदाम तुम्ही दोघांनी उद्या सकाळी जंगलात लाकडे गोळा करायला जायचं आहे."
    " जशी आपली आज्ञा गुरुदेव !"
    " मी पण जाऊ का जंगलात गुरुजी !"
    " नाही. वत्स बलराम , उद्या तुला शेतात नांगर धरायला आहे."
     " जशी आपली आज्ञा गुरुदेव !" त्यानंतर रात्री एकांत मध्ये गुरुमाता ऋषी सांदीपनिना विनंती करते की , कृष्ण आणि बलराम विद्या शिकविण्याची घाई करू नका. ते दोघेही
आल्यामुळे पुत्र वियोग चे दुःख जरा कमी झाले."
     " कृष्ण ला कुणीही थांबहूं शकत नाही."
     " का ?"
     "  अगं ज्याला यशोदा रोखू शकली नाही त्याला  मी कसा
बरं रोखणार !" ऋषी सांदपनि उद्गारले.
    " तुम्ही त्याचे गुरू आहात. अर्थात तो तुमचं ऐकेल."
    " नाही.गुरू मेंढपाळ नाही.जसे मेंढ्याना गोट्यात कोंडून
ठेवले जाते. आणि कृष्णाला तर विद्याची आवश्यकताच नाही. त्याला तर प्रत्येक प्रश्नांचे उत्तर ठाऊक आहे. तो कायमस्वरूपी एकाच ठिकाणी राहू शकणार नाही. आणि तुला तर पुत्र वियोगाचे दुःखही ठाऊक आहे, मग देवकीचा विचार कर."
   " तर मग त्याच्या कडे हीच गुरू दक्षिणा मागा की तो कायमस्वरूपी इथंच राहील."
    " हे होऊ शकत नाही."
   " पुत्रा शिवाय जगणे तर मी शिकली होती ; परंतु कृष्ण
आल्या ने ती  जखम पुन्हा चिंगळली. तुम्ही पाहताय ना तो
आल्या पासून मी किती आनंदात आहे."
     " आईचा हात फक्त मुलाला आशिर्वाद देण्यासाठीच उठला पाहिजे. काही घेण्यासाठी नव्हे !"

     मथुरेथ देवकी कृष्णाच्या आठवणीने एकदम व्याकुळ झालेली असते ती वसुदेवला विनंती करते की कृष्णाला आता
बोलवून घ्या. मला त्याचा विरह आता सहन होत नाहीये. तेव्हा वसुदेव तिची समजूत काढत म्हणाले ,"  तू समजत का नाहीयेस ? तो काय तेथे मौज मजा करायला गेलेला नाहीये. त्याचे शिक्षण होणे फार जरुरी नाहीये का ?"
     " मी असं कुठं म्हटलं त्याने शिक्षण घेऊ नये म्हणून.
पण तो भेटायला पण येऊ शकत नाही का ?"
     " गुरुकुल सोडून ?"
     " मग काय झालं त्यात ?"
     " तुला गुरुकुलातले नियम माहीत नाही म्हणून तू असं बोलतेस ."
     " तुम्हाला ना आईची मायाच कळणार नाही. पुरुष ना तुम्ही ! "
     " का ? फक्त  तुम्हां स्त्रीयांनाच हृदय असतं. पुरुषांना ते नसतं."
     " मान्य आहे तुम्हाला सुध्दा तेवढंच दुःख झाले असेल परंतु.....?
    " हे बघ एवढी वर्षे काढलीस ना  त्याच्या शिवाय ? मग अजून थोडी कळ काढ ना ? शिक्षण पुर्ण होताच येईलच तो. शिवाय आता त्याच्यावर फक्त आपलाच अधिकार नाहीये तर साऱ्या जगाचा त्याच्यावर अधिकार आहे , तेव्हा त्याच्या शिवाय राहायला शिक. कारण तो आता आपल्या कडे कायमस्वरूपी राहणार नाही."
     " राहणार नाही म्हणजे कुठं जाणार आहे तो ?"
    " त्याचा जन्म जण कल्याण हेतू झाला आहे, अर्थात तो आपले कार्य करायला जाणार ना ?"
     " म्हणजे आमच्या नशिबी  उपेक्षा तर !"
     " जगाचा पालनहार तुझ्या पोटी जन्मला हे थोडे का झाले
तुझे भाग्य !" त्यावर देवकी निरुत्तर झाली.

      श्रीकृष्ण आणि सुदाम जंगलात लाकडे गोळा करायला
गेले असता अचानक पाऊस सुरू होतो. श्रीकृष्ण आणि सुदाम आसऱ्यासाठी झाडावर चढून बसतात. सुदामाला फार
भूक लागलेली असते ; परंतु श्रीकृष्ण त्याच्या पासून दूर असतो. म्हणून तो विचार करतो की ह्या पुडीतील थोडेसे पोहे
खाल्ले तर काय त्यात काय बिघडणार आहे ,असा विचार करून थोडे थोडे खाता खाता संपुर्ण पोहे त्याने खाऊन संपविले. आणि जेव्हा त्याच्या हे लक्षात येते तेव्हा दिलगिरी
व्यक्त करत श्रीकृष्णाला बोलला ," कृष्णा मला माफ कर, मी तुझ्या वाट्या चे पण पोहे खाऊन टाकले."  त्यावर श्रीकृष्ण हसून म्हणाले ," काही हरकत नाही खाल्लेस तरी ! तशी पण मला भूक नाहीये. परंतु हे पोहे तुझ्यावर माझे उदार राहिले बरं का ? आणि ते मी घेणार बरं का ?" सुदामाचे तेवढ्या पुरते समाधान झाले खरे ! परंतु त्याचे मन आतल्या आंत टोचू लागले की, तू एकट्यानेच कसे पोहे खाल्लेस गुरुमातेने
तुम्हां दोघांसाठी दिले होते ते पोहे. त्याने श्रीकृष्णा कडून
वचन घेतले की गुरुमातेला या बद्दल काही सांगणार नाही म्हणून. परंतु त्याचे मन स्वस्थ बसू देईना, तू एकट्याने पोहे खाल्लेस ! इतका कसा रे तू स्वार्थी ! उद्या गुरुमातेला समजले तर काय होईल ? गुरुमाता तर आपल्याला शापच देईल. छे छे छे ! शाप नको आपल्याला ! मग काय करायचं ? गुरुदेवना
खरे काय ते सांगून टाकू !  तेच त्यावर काय तो उपाय सांगतील. हो ,असेच करतो.असा मनातल्या मनात विचार करून तो सरळ सांदपनि ऋषी कडे जातो. तेव्हा ते द्यान मग्न
असतात ते द्यानातून बाहेर येईपर्यंत वाट पाहत बसतो. जेव्हा
ते ध्यानामधून बाहेर येतात तेव्हा सुदाम त्यांच्या जवळ गेला.
नि त्याना इत्यंभूत सविस्तर काय घडले ते सांगून टाकले. तेव्हा सांदपनि ऋषी म्हणाले ," हे तू काय केलेस ? स्वत:साठी द्रारिद्रता मागून घेतलीस. आता यातून तुझी सुटका श्रीकृष्ण करील." असे म्हणून ऋषी सांदपनि तेथून निघून गेले ; परंतु सुदाम तेथेच इतक्यात श्रीकृष्ण पळत
त्याच्या जवळ आला नि म्हणाला ," गुरुमाता ने तुला बोलविले आहे." तेव्हा तो मानातून घाबरला, त्याला वाटले की श्रीकृष्णा ने सांगितले असावे. म्हणूनच की काय बोलविले
असावे. परंतु माहीत तर करून घेऊ असा विचार करून त्याने
श्रीकृष्णाला विचारले ," याचा अर्थ तू सारे सांगितलेस गुरुमातेला. " त्यावर श्रीकृष्ण उद्गारला ," मी का सांगेन ,मित्रा
मधल्या गोष्टी मित्रा मध्येच ठेवलेल्या बऱ्या. नाही का ?"
    " मग गुरुमाते मला कशाला बोलविले आहे ?"
    " तुझ्यासाठी गुरुमाते ने खीर बनविली आहे,ती खायला
बोलविले आहे. आणि गुरुमाते आपल्या साठी हा बघ चेंडू
बनविला आहे." तसा सुदाम श्रीकृष्णा सोबत निघाला.

          इकडे हस्तिनापूरला आचार्य द्रोणाचार्यांनी राजकुमारांना शस्त्रविद्येचे ज्ञान द्यायला आरंभ केला. परंतु शकुनी मामाच्या मात्र मळमळायला लागले. कारण त्यांनी दुर्योधन मार्फत दिलेल्या सुवर्ण मुद्रा गुरू द्रोणाचार्यांनी स्वीकारल्या नाहीत. अर्थात ते आपल्या इच्छेनुसार वागणार नाहीत. या वरून सिध्द झाले. परंतु महाराजांच्या हे गळीं उतरावायचं कसं असा प्रश्न पडला होता खरा परंतु त्याचं
उत्तर सापडलं. ? की गुरू द्रोणाचार्य पक्षपाती आहेत हे ठासून सांगायचं , आणि तसं पण महाराजांना आपण सांगू ते
पटतेच म्हणा. फक्त भीती आहे ती गांधारी ची ती बहीण माझी आहे ; परंतु माझ्यातला एक पण गुण तिच्यात नाही.
त्यामुळे च अडतेय सारे आपले. पण हरकत नाही. महाराज
धृतराष्ट्र जोपर्यंत आपल्या मुठीत आहेत तोपर्यंत आपलं कुणीच काही बिघडविणार नाही. असा विचार करून मी
महाराजांच्या कक्षेत गेलो नि महाराजाना आचार्य द्रोणाचार्यांच्या विरुध्द कान भरले. मी त्याना म्हटले ," महाराज दुर्योधन वर अन्याय होतोय नि तुम्ही मूग गिळून
गप्प बसलात. काहीच बोलत नाहीये."
     " आता काय दुर्योधन बरोबर ?"
     " अहो ,काय व्हायचे बाकी राहिले आहे ?"
     " म्हणजे ?"
     " मला वाटतं ही सर्व चाल गंगापुत्र भीष्मां ची असणार."
     " तातश्री ने काय केलं ?"
     " आचार्य द्रोणाचार्य यांना बोलविले शस्त्रविद्या शिकवायला."
     " मग चांगले केले ना ?"
     " चांगले काय केले ? गुरू द्रोणाचार्यांचा जास्त कल
अर्जुन कडे आहे , असे मी जाहीर पणे सांगू शकतो. "
     " परंतु ते बाकीच्या राजकुमारांना शत्रविद्या शिकविणार
नाहीत असं थोडेच आहे ."
      " भाऊजी महाराज तुम्ही फार लोकांवर विश्वास करता
परंतु लोक तशी विश्वासपात्र नाहीयेत ना ?"
    "  शकुनी दादा तुम्ही काय बोलताय ते मला कळत नाहीये."
    " ते समजून घेण्याची पण गरज नाहीये. तुम्ही फक्त
मी सांगतो तेवढेच करा."
     " मग मी काय करावे अशी आपली अपेक्षा आहे ?"
    " तुम्ही गांधारी चा हात सोडा नि फक्त माझा हात पकडा
आणि मग बघा मी काय करतो ते. एकदा दुर्योधनचा राज्यभिषेक झाला की मी गांधार ला जायला मोकळा झालो."
    " ठीक आहे, जसे तुम्ही म्हणाल तसं करतो. बस्स !"

    गुरू द्रोणाचार्य  सर्व मुलांना खेळायला सांगतात. फक्त
आपल्या पुत्राला चक्रयुव्ह मध्ये प्रवेश कसा केला जातो नि
त्यातून बाहेर कसे पडायचे या विषयी सांगत असतानाच
अधिरथ आपल्या पुत्राला अर्थात राधेय्य ला घेऊन त्यांच्या
जवळ येतात नि त्याना प्रणाम करतात. तेव्हा आचार्य द्रोणाचार्य उद्गारले ," तुम्ही महाराजांचे सारथी ना ?"
     " होय आचार्य !"
     " आणि हा कोण ?"
     " माझा पुत्र राधेय्य !"
     " राधेय्य हे  नाव सुर्यासारख्या तुझ्या रुपाला शोभत नाही
ते. " असे म्हणून अधिरथ कडे पाहत ते म्हणाले ," ह्याचे नाव
कर्ण ठेवा.  आता बोला काय काम काढलंत माझ्याकडे ?"
     " ह्याला धनुर्विधा शिकायची आहे. आणि त्यासाठी तुमच्या व्यतिरिक्त दुसरा कोण आहे ?"
     " मला तुमच्या पुत्राला विद्यादान द्यायला आवडलं असतं."
     " माफ करा गुरुवर्य  मी दान घेत नाही. आणि विद्यादान
केलं ही जात नाही."
    " अधिरथ हे गुरुकुल आहे नि इथं फक्त राजकुमार आणि क्षत्रिय यांनाच शत्रविद्या शिकविली जाते. अर्थात तुमचा पुत्र ना क्षत्रिय आहे ना राजकुमार त्यामुळे तुम्ही तुमच्या पुत्रासाठी
दुसरा गुरू शोधा.
   "  माफ करा गुरुवर्य पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारू
शकतो का ?"
    " अवश्य विचार ."
    " तो तरुण कोण आहे ?" आचार्य द्रोण म्हणाले," माझा  पुत्र अश्वत्थामा !त्यावर राधेय्य हसून बोलला ," तो ना राजकुमारआहे ना क्षत्रिय  मग ..... ? " असे म्हणून तेथून चालता झाला. अधिरथ उद्गारला ," मी आपल्या पुत्रा तर्फे
माफी मागतो. " असे म्हणून तेथून निघाला. त्यानंतर गुरू
द्रोणाचार्य आपल्या पुत्रा जवळ गेले आणि पुन्हा चक्रयुव्ह
विषयी सांगत असताना अचानक अर्जुनचा लक्ष त्याच्या कडे
जातो. तसा अर्जुन खेळायचं सोडून गुरू द्रोणपाशी आला.
तेव्हा आचार्य द्रोणाचार्यांनी विचारले ," तुझं खेळात मन
रमत नाहीये का ?" अर्जुन उत्तरला ," गुरू इथं विद्या शिकवत
असताना मी तिथं कसा राहीन बरं !"
    " मला वाटतं तू माझ्या पाशी काहीच शिल्लक ठेवणार नाहीस तर !"

       क्रमशः



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..