महाभारत २५ | मराठी स्टोरी, मराठी शॉट स्टोरी, मराठी कथा, दिवाळी संग्रह | महेंद्रनाथ प्रभु.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाभारत २५ |
२५
धृतराष्ट्र
मला वाटलं होतं पांडू प्रमाणे पांडू पुत्र सुध्दा हस्तिनापूर ला
कधी येणारच नाहीत. अर्थात माझ्या नंतर ह्या राज सिंहासन वर माझ्या पुत्राचा म्हणजेच दुर्योधनाचा अधिकार असे मी धरून चालत होतो. परंतु म्हणतात ना, म्हटलेले साधेल तर
द्रारिद्रता का बाधेल ? अगदी तसेच घडले माझ्या बाबतीत.
ज्याची अपेक्षा केली नव्हती तेच घडले. नियती सुध्दा माझ्या
सोबत असा का डाव खेळतेय ते कोण जाणे ? आता पांडु
पुत्र आले. नियमानुसार त्याना सुध्दा गुरुकुलात पाठवायला
हवं. परंतु मुद्दामच त्या विषयी काही चर्चा केली. कारण माझी
अशी इच्छा होती की त्याना शिक्षण मिळूच नये. कारण माझा
पुत्र श्रेष्ठ ठरला तर राज सिंहासन मिळणार ना ? परंतु आज
तातश्रीनी पांडू पुत्राना गुरुकुलात पाठवून माझ्या स्वप्नांवर
पाणी ओतले. पण हरकत नाही. कुलगुरुला इथं बोलवून
घेतले आहे, अधिरथ चे कारण पुढे करून. त्यांना थोडीशी समज देवू की पांडू पुत्रा पेक्षा दुर्योधन जास्त लक्ष द्या. कारण
तो उद्याचा हस्तिनापूर चा नरेश होणार म्हणून. अर्थात ही माझी इच्छा आहे, त्यात तातश्री नि विदुर अडथळा जरूर
आणतील म्हणा. कारण त्यांच्या दृष्टीने तर युधिष्ठिर हस्तिनापूर चा राजा व्हायला पाहिजे. असा विचार माझ्या
मनात सुरू असतानाच तातश्री माझ्या कक्षेत आले. तेव्हा
मी इथं का बोलविले त्याचे कारण सांगितले. मी कुलगुरू
कृपाचार्याना गुरुकुल वरून तातडीने बोलवून घेतले म्हणून
तातश्री माझ्यावर रागवत म्हणाले , " परंतु अधिरथ च्या
समस्येशी कुलगुरू कृपाचार्याचा काय संबंध ? गुरुकुल वरून
का बोलविले आहे त्याना ?" त्यावर मी त्याना नम्रपणे सांगितले की, कृपाचार्य आपले कुलगुरु आहेत तात तातश्री !
म्हणून मी त्याना बोलविले."
" परंतु पांडू पुत्राना मी आजच गुरुकुलात पाठविले होते.
कमीत कमी आज तरी त्याना तेथे उपस्थित राहणे आवश्यक
होते."
" काही हरकत नाही तातश्री ! तेथे दुर्योधन आहे, ना तो लक्ष ठेवील सर्वांवर."
" दुर्योधन किती लक्ष ठेवील याची कल्पना आहे मला महाराज !" तेवढ्यात कुलगुरू कृपाचार्य आणि विदुर प्रवेश
करतात. विदुर प्रवेश करताच उद्गारला ," प्रणाम महाराज !"
" मी आपल्या सोबत विदुर ना सुध्दा घेऊन आलोय महाराज !"
" आपल्या स्थानावर विराजमान व्हा !" असे म्हणून कुलगुरू कृपाचार्या कडे पाहत मी म्हटलं ," कुलगुरू पांडु
पुत्राच्या शिक्षणा मध्ये काही कमी तर नाही ना राहिलं ?"
" आपण निश्चिंत रहा राजन. माझं सर्वांकडे सारखे लक्ष
आहे, कुणाकडे ही दुर्लक्ष केलं जाणार नाही याची हमी देतो."
त्यानंतर मी कृपाचार्याना दुर्योधन विषयी विचारले तर
ते दुर्योधनची प्रशंसा करत बोलले की, दुर्योधन मध्ये योग्यता
काही कमी नाही. परंतु घोड्या प्रमाणे मनालाही लगाम घालणे आवश्यक आहे,नाहीतर ते मन मानेल तेथे घावत सुटते. परंतु राजन आपण चिंता करू नका. कुमार दुर्योधन किंचित हट्टी आहेत ; परंतु त्याचे मन फार उदार आहे,मनात आले तर तो एखाद्याला काय वाटेल ते देऊन टाकतील. आणि मनात जर नाही आहे तर सुईच्या टोकाला उभी राहण्या एवढी पण जागा देणार नाही."
" पण मन लावून शिकतो तर आहे ना ?"
" मी मन लावून शिकवतो आहे, त्याबद्दल चिंता नसावी महाराज."
" अर्थात मी निश्चिंत व्हायला हरकत नाही तर !"
" निःसंदेह !" हे मी मुद्दाम तातश्री समोर विषय काढला
कारण मला दाखवून द्यायचं होतं की माझा पुत्र हस्तिनापूर चा
नरेश होण्यास योग्य आहे. कारण केवळ जेष्ठ असून चालत
नाही तर राजा बनण्याची त्यात योग्यता पण असायला लागते. आणि पांडु पुत्रा मध्ये ती योग्यता नाहीये. कारण ते
वनात पशु पक्षांच्या सानिध्यात राहिलेली मुलं आहेत. त्याना
काय माहीत मी राजा होण्यासाठी काय काय गुण अंगी असावे लागतात. परंतु माझ्या एक गोष्ट खटकली ती ही कुलगुरू कृपाचार्य पांडू पुत्रांचे पण गुण वर्णिले ते मला अजिबात आवडलं नाही. परंतु समोर तातश्री बसले असल्याने काही बोलता आले नाही. परंतु लगेच मी विषयांतर करत म्हटले की आता आपण अधिरथ विषयी बोलू अर्थात अधिरथ सेवा निवृत्त होऊ इच्छितोय."
" का ?" विदुर ने विचारले.
" त्याचे म्हणणे आहे की, त्याला आता माझी चाकरी करायला जमणार नाही. कारण त्याला त्याच्या मुलांकडे
लक्ष द्यायला वेळ हवाय."
" कोण आहे त्याचा मुलगा ?"
" राधेय !"
" राधेय ...हे नाव मी प्रथमच ऐकलं."
" म्हणून म्हणतोय बाकीचे त्याच्याच तोंडून ऐकलेलं बरं."
असे म्हणून टाळी वाजवली. तसा एक दूत समोर येऊन
उभा राहिला. तसा मी त्याला आदेश दिला की अधिरथ इथं
बोलवून आण." दूत गेला नि अधिरथ ने आंत प्रवेश करत
वंदन करत म्हटलं ," प्रणाम महाराज !" तेव्हा त्याला म्हटलं ,
" अधिरथ हा राधेय्य कोण आहे ?"
" राधेय्य माझ्या मुलाचे नाव आहे."
" तुझा मुलगा ?" विदुर ने न समजून विचारले.
" माझा म्हणजे मी त्याला जन्म नाही दिला. परंतु मी त्याला माझ्या मुला सारखे वाढविले आहे."
" मग तो कुणाचा मुलगा आहे ?" तातश्री नी त्याला विचारले. तेव्हा अधिरथ म्हणाले ," आपल्याला तर माहिती
आहेच की माझे घर भागीरथी तीरावर आहे, एके दिवशी पूर्ण रात्र उलटून पहाट होत आली तरी माझी पत्नी राधा घरी आली नाही.मी फार मोठ्या चिंतेत पडलो होतो. सकाळ होताच मी विचार केला की राधाची सखी सुशीला कडे जाऊन चौकशी करतो कदाचित तिला ठाऊक असावे. मी पायात पादत्राणे घातलीच होती एवढ्यात राधा घरी आली. तेव्हा मी तिला विचारले की रात्रभर कुठं होतीस ? त्यावर ती म्हणाली ,
" मी माझ्या सखी कडे होती. तिला पुत्र झाला. " एवढं
म्हणून ती रडू लागली. मला तिच्या रडण्याचे कारण कळेना
म्हणून मी तिला विचारले ," अगं राधा काय झालं ? तू का रडतेस ?" त्यावर राधा उत्तरली ," मीच काय पाप केलं जे
मला देवाने संतान सुख दिलं नाही." त्यावर मी म्हटलं ," अगं ,
राधा, देवांचा सर्व प्राणी मात्रावर सारखाच लक्ष असतो तो
कुणावरही अन्याय कधी करत नाही."
" मग माझी कुश कशी त्याने वांझ का ठेवली?" मी म्हटलं,
" अगं त्या मागे काहीतरी कारण असावे, कदाचित आपल्यासाठी त्याने काहीतरी वेगळा विचार केला असावा.
म्हणजे आम्हाला संतान सुख प्राप्त होईल. परंतु त्यासाठी
थोडी वाट पाहावी लागेल."
" थोडी म्हणजे किती ?" असे म्हणत असतानाच जवळच
कुठंतरी लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला.तसे ते
दिघेही आवाजाच्या दिशेने धावले. पाहतात तर काय एक संदुक दिसली. त्या संदुकीतून आवाज येत होता. आम्ही दिघेही त्या संदुकीत एक छोटेसे बाळ होते. राधाने त्या बाळाला उचलून घेतले नि पटापट त्या बाळाच्या गालाचे
मुखे घेतले. तेव्हा मी तिला म्हटले ," पाहिलेस ह्या बाळासाठीच आपल्याला देवा ने पुत्र नाही दिला होता."
त्या बाळाला आम्ही घरी आणले त्याला आपल्या पुत्रा प्रमाणे
लालनपालन केलें. आणि त्यानंतर राधाला सुध्दा दोन पुत्र
झाले. परंतु त्या दोघां पेक्षा फार लाडाने कुणाला वाढविले असेल तर राधेय्यालाच ! कारण त्याच्या मुळे च आम्हला
संतान सुख प्राप्त झाले. परंतु राधेय्य माझा पुत्र नाहीये
हे आम्हां दोघां व्यतिरिक्त अन्य कुणालाही माहीत नाही.
तेव्हा त्याच्या प्रति माझी जास्त जबाबदारी वाढली. म्हणून
मला आता निवृत्ती द्या."
" परंतु सारथी शिवाय राजा म्हणजे.....?"
" चिंता करू नका. माझ्या सोबत एक सारथी सुद्धा आणला आहे मी !"
" परंतु निष्ठावंत आहे ना ?"
" त्याला माझंच प्रतिरूप म्हटलं तर वावगं ठरणार नाही."
" ठीक आहे बोलव त्याला आंत ." त्याला आंत बोलविले.
विदुर ने काही वाजवी प्रश्न विचारले.त्याची त्याने एकदम तंतोतंत उत्तरे दिली. त्याच्या उत्तराने सर्वजणच संतुष्ट झाले.
नि लगेच संजय ला अधिरथ च्या ठिकाणी नियुक्त केले नि
अधिरथाला सेवा निवृत्ती केले.
सभा बरखास्त झाली तसे प्रत्येक जण आपापल्या स्थानी
निघून गेले. कुलगुरू कृपाचार्य मात्र गुरुकुलात न जाता परस्पर आपल्या बहिणीला अर्थात कृपा ला भेटायला निघून
गेले. इथं गुरुकुलात आचार्य नाही म्हटल्यावर गोंधळ सुरू
झाला. दुर्योधन आणि भीम या दोघांचे अजिबात पटत नव्हते.
युधिष्ठिर आपल्या सर्व भावंडांना घेऊन राजभवनवर परतला. ही गोष्ट विदुर ला समजली. तसे महामंत्री विदुर
तातडीने युधिष्ठिर ला भेटायला राजभवन आले. विदुरला पाहताच युधिष्ठिर ने नम्रतेने त्याना नमस्कार केला. तेव्हा
त्यांनी विचारले की, तुला तर गुरुकुलात असायला पाहिजे
होते तू इथं कसा ? " तेव्हा युधिष्ठिर त्याना सांगितले की
आचार्य गुरुकुलात नाहीयेत. आणि दुर्योधन आणि भीम या
दोघां मध्ये अजिबात पटत नाहीये." त्यावर विदुर फार नाराज
होताच नि त्याला उपदेश करतात की जरा धीर धरायला शिक
असा उतावीळ पणा योग्य नाही. शिवाय गुरुकुल सोडून असं
घरी कधीच यायचं नाही कळलं. " असे म्हणून काही राजनीती च्या गोष्टी सांगितल्या. आणि एक राजाला काय
आवश्यक आहे तेही सांगितले. त्यावर युधिष्ठिर ने त्यांची
माफी मागितली नि पुन्हा अशी चूक घडणार नाही अशी ग्वाही दिली. आणि ताबडतोब आपल्या भावंडांना घेऊन
गुरुकुलात जायला निघाला.
अधिरथ आपल्या घरी पोहोचला. तेव्हा राधेय्य धनुष्यावर
प्रत्यांता चढवत होता. ते त्याच्या जवळ गेले नि त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हणाले," वसू चल तुला
मी सारथ्थाचे धडे शिकवितो. त्यावर कर्ण उद्गारला ," बाबा ,
मला सारथी नाही व्हायचंय."
" मग काय बनवायचा तुला ?"
" मला धनुर्धर व्हायचंय."
" पण तर क्षत्रिय शिकतात.आणि आपण सारथी आहोत."
" मला धनुर्विधाच शिकायची आहे."
" ठीक आहे बाळा, मी महाराजा विचारतो की त्यांच्या
गुरुकुलात तुला सामील करून घेतील का ते ?" असे म्हणून
अधिरथ तेथून निघून गेले. कर्ण मात्र तेथेच उभा राहून अधिरथ ने केलेल्या वक्तव्यावर विचार करू लागला.
राधेय्य
मी आणि माझा धाकटा भाऊ - शोण आम्ही दोघेच.
आणि आमचं चिमुकलं ते जग. शोण ! होय शोणच ! त्याचे खरे नाव होते शत्रूंतप परंतु आम्ही त्याला शोण म्हणत असू !
मला आणखीन एक भाऊ होता. त्याचे नाव होते वृकरथ !
परंतु तो बालपणी मावशी कडे राहायला गेला आणि तिथलाच होऊन गेला. आम्ही मात्र दोघेच राहिलो आई-बाबां कडे. आई मला वसू म्हणून हांक मारायची ! दिवसभर सारखी
वसू वसू करत माझ्या मागे राहायची ! जरा कुठे नजरे आड झालो की बस्स नुस्ती खासावीस व्हायची ! मला नेहमी सांगायची नदी जवळ जाऊ नकोस हां ! का कुणास ठाऊक
मला नदीवर जायला फार आवडे.कारण नदीच्या किनाऱ्यावरुन चालत असताना आम्ही शिंपले
गोळा करत असू ! आम्ही दोघे भाऊ असूनही दोघांच्या सवयी
मध्ये आकाश-पाताळाचा फरक होता. मला धनुष्य बाण चालवायला आवडे तर शोण ला रथ हाकायला आवडे. असे
का ते मला आद्यप समजले नाही. परंतु आईच्या बाबतीत
सांगायचे तर माझी आई म्हणजे मायेचा विशाल सागरा सारखी होती. जसा सागर अथांग पसरलेला असतो. त्याची
कुठून सुरुवात आहे नि कुठे संपणार आहे हे जसे कळत नाही. तसेच असते आईचे प्रेम त्याचे मोजमाफ़ करता येत नाही. मला आठवतं लहानपणी नगरातील सर्व जण वसुसेन म्हणत . माझा छोटा भाऊ मला नेहमी वसुदादा म्हणत असे. आई मला दिवसातून हजार वेळा वसू वसू म्हणून बोलवत असे. तिने मला केवळ आपल्या दूध पाजलं नव्हतं तर तिच्या प्रेमाचा विशुद्ध मी सतत मनसोक्त पीत आलो होतो. सर्वांवर एक जात प्रेम करण्यासाठी जणू तिच्या जन्म होता. सगळी चंपानगरी तिला राधामाता म्हणत असत. सर्वांसाठी अविरत कष्ट आणि पोटी अमाप माया यामुळे तिचा शब्द कधी पण खाली पडत नसे. माझ्या कानात जन्मताच दोन कुंडले होती.एकटक बघत राही त्यात तिला काय नवल वाटत होते ते कोण जाणे ! आणि शोण तर मला नेहमी म्हणे की आई तुझ्यावरच जास्त प्रेम करते म्हणून फक्त तुझ्या कानात च दोन कुंडले आहेत. मला कुठे कुंडले आहेत ? मग मला ही वाटे की खरंच की काय आई माझ्यावरच जास्त प्रेम करते. परंतु तिच्या स्पर्शा मध्ये असे कधीच जाणवले नाही की ती आम्हां दोघां मध्ये फरक करते. खरे तर आईचं आपल्या सर्व मुलांवर सारखेच प्रेम असते. परंतु आम्हां मुलांना मात्र वाटत असते. माझ्यावर जास्त प्रेम नाही म्हणून ती माझ्यावर सारखी रागवत असते. म्हणजे तिच्या प्रेमात कधी फरक जाणवला नाही.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा