महाभारत -२९ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी, दिवाळी संग्रह | महेंद्रनाथ प्रभु.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाभारत -२९ |
महाभारत २९
" मी आपल्याला एक प्रश्न विचारू शकतो का ?"
" अवश्य !" अश्वत्थामा कडे खूण करत विचारले,
" तो तरुण कोण आहे ?"
" अश्वत्यामा माझा मुलगा !"
" अर्थात तो ना राजकुमार आहे नाही क्षत्रिय .....पुढेच
वक्तव्य न बोलताच तडक निघून जातो. अधिरथ ने आपल्या
मुला तर्फे आचार्य द्रोणाचार्यांची माफी मागितली आणि अधिरथ सुध्दा आपल्या मुलाच्या अर्थात कर्णच्या मागोमाग निघून गेले. आचार्य द्रोणाचार्य आश्चर्यकारक नजरेने त्याच्या
पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहतात. पण बोलत काहीच
नाही. ते पुन्हा अश्वत्थामा जवळ येऊन बसतात नि त्याला
चक्रव्यूहा विषयी माहिती देत असतात. ते अर्जुन पाहतो.
तसे तो खेळायचं टाकतो नि सरळ आचार्य द्रोण जवळ
आला. नि म्हणाला ," मी इथं बसू शकतो का गुरुवर्य ?"
" तुझं खेळामध्ये मन रमत नाही का ?"
" जर गुरुजी काही शिकवत असतील तर ती वेळ निश्चितच खेळाची नसणार."
" मला वाटतं तू माझ्या जवळ शिल्लक काही ठेवणार नाहीस बैस !" अर्जुन बसला तेथे.
सांदीपनि ऋषींच्या आश्रमात शिकवत असताना श्रीकृष्ण
उद्गारला ," जर गुरू कडून शिकायचं काही शिल्लक ठेवलं
तर गुरुजी गुरुदक्षिणा कशी मागणार ? " सुदाम उद्गारला,
" ह्याचे प्रश्न कधी संपणार नाहीत गुरुदेव."
" आपल्याला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर जरूर शोधायांचे असते सुदामा जर आपल्याला येत नसेल तर आपल्या
गुरूला जरूर विचारावे.आणि असा एखादा शिष्य येतो
गुरुपाशी की त्याला शिकायचं नसतं काही फक्त आपल्या
गुरूचा मान वाढवायचा असतो त्याला."
" गुरुजी कुणा संबंधी बोलताहेत ते माहीत आहे का तुला ?" सुदामा नकारात्मक मान डोलावली." तसा बलराम पुढे बोलला ," आपल्या कृष्णा संबंधी बोलताहेत ते."
तेवढ्यात सांदपनि ऋषी उद्गारले ," आता चला पाहू !
गुरुमाता वाट पाहत असेल. भोजनाचा सुध्दा निर्धारित वेळ
असतो. तेव्हा भोजनच्या वेळी भोजनच करायचं असतं. आणि अभ्याच्या वेळी अभ्यास." सर्वजण जाऊ लागतात.
अर्जुनाला संशय येतो म्हणून अर्जुन लपत छपत स्वयंपाक घरात जाऊन पाहतो तर भीम काळोखा तच जेवत
असतो. अर्जुन त्याला पाहून उद्गारला ," भीमदादा इथं काय करतोयस ? "
" भोजन करतोय. तू पण ये भोजन करायला. पण थोडंस
घे हां नाहीतर मला उपाशी राहावे लागेल."
" मला नको तूच खा. पण मला एक सांग काळोखा मध्ये
तू जेवू कसा शकतोस ? म्हणजे घास तोंडात बरोबर जातो
कसा ?"
" त्याचं काय आहे,तोंड तर आपल्या जाग्यावरच आहे.नि
हाताला पण डोळे असतात.अर्थात त्याचा अभ्यास करावा
लागतो." असं म्हणताच अर्जुन स्वतःशीच पुटपुटला. हां अभ्यास करायला पाहिजे. असे म्हणून बाहेर गेला नि धनुष्य
उचलून एका फिरणाऱ्या चक्राच्या बरोबर मध्य बिंदू वर नेम
धरून बाण सोडतो. बाण बरोबर मध्य बिंदूवरच लागतो.
मग दुसरा तिसरा असे एका पाठोपाठ एक सोडू लागला.
त्याच वेळी आचार्य द्रोण आपल्या कक्षेत झोपण्याचा प्रयत्न
करत असतात ; परंतु त्याना झोप अशी ती येत नाही.
त्यांच्या मित्राने अर्थात धृपत राजाने त्यांचा केलेला अपमान
त्याना स्वस्थ झोपू देत नव्हता. त्याने म्हटलंल वक्तव्य सतत
त्यांच्या कानावर आदळत असतात की बालपणीच्या गोष्टी विसरायच्या असतात. मी एक क्षत्रिय आहे आणि तू एक ब्राम्हण आहेस. अर्थात या दोघांची दोस्ती कदापि होऊ शकत
नाही. कारण दोस्ती बरोबरीवाल्याशी केली जाते. दान म्हणून
काय हवे तर माग मी देईन ते.परंतु अधिकाराने काही मागू नकोस. हेच वक्तव्य सारखे कानावर पडत असतात म्हणून ते अस्तवस्थ होतात.आणि त्याच वेळी बाणांचा आवाज येत
असतो. एवढ्या रात्री बाण कोण चालवयोय हे पाहण्यासाठी
ते उठून बाहेर येतात. आणि पाहतात तर काय अर्जुन
काळोखा मध्येही बाण सोडत असतो.आणि ते बाण न चूकता अचूक फिरत्या चक्राच्या मध्य बिंदू वर लक्ष भेद करत असतात. हे अद्भुत दृश्य पाहून आचार्य द्रोण
आश्चर्यचकित होतात. नि त्याच्या जवळ येऊन ते उद्गारले ," अर्जुन हे मी तुला अद्याप शिकविले नाही. अर्थात तुला कसं
येऊ लागलं ?" त्यावर अर्जुन उद्गारला ,' हे मी आपल्या
कडूनच शिकलोय गुरुदेव. फक्त त्याची प्रेरणा भीम दादांच्या भोजनच्या रुचितून मिळाली." त्यावर न समजून आचार्य द्रोण
म्हणाले ," मी समजलो नाही." तेव्हा अर्जुन उद्गारला ,' आपल्याला तर माहीतच आहे की भीम दादाला भोजनात किती रुची आहे ती. ते काळोखात न चुकता खात होते. मी
त्याना विचारले की तुमचा हात बरोबर तोंडातच कसा जातो ?
तर ते मला म्हणाले ," आपल्या हाताला सुध्दा डोळे असतात.
ते बरोबर तोंडापर्यंत घास नेतात. मग काय फक्त तोंडच तर उघडायचे असते. बस्स ! अर्थात भीम दादाचे ऐकून प्रयत्न केला . नि बरोबर जमले सारे ! परंतु माझ्या कडून काही चुकले असले तर क्षमा असावी गुरुदेव ." त्यावर आचार्य द्रोण उद्गारले ," छे ,छे ,छे ! तुझं काहीच चुकलं नाहीये. उलट तुझ्यावर मी अति प्रसन्न झालोय तुला सर्वांत मोठा धनुर्धर बनविण्याची जबाबदारी माझी ! कारण तुझ्यात मी ते सर्व गुण पाहत आहेत जे एका महान योध्यात असायला हवे. सर्वात महत्वाची ची गोष्ट म्हणजे शिकणाऱ्याला शिक्षणाची आवड असायला पाहिजे जर शिकायची आवडच नसेल तर शिकविणारा तरी काय शिकविणार आपले कप्पाळ ! म्हणजे शिकविणारा भलेही तो ढीग शिकवेल परंतु त्याच्या रिकामी डोक्यात काही शिरायला तर पाहिजे ? अर्जुन ज्ञान एक बीज आहे तर मन आहे त्याची सुपीक जमीन परंतु मनात जर इच्छा नसेल तर ते बीज त्या जमिनीत कसं रुजनार. म्हणून प्रत्येक मनुष्या मध्ये धैर्य नि चिकाटी पाहिजे. तरच तो सर्व संकटावर मात करू शकतो. अन्यता नशिबाला दोष देत तिथंच बसून राहतो. ज्याला रस्ता पार करायचाच आहे तर त्याने सतत चालत राहायला हवे न थकता न चिडता. जसे की वारुळातील कीटक सतत वारूळ बांधतच राहतात. त्यांच्या वैऱ्या ने कितीही वेळा वारूळ तोडले तरी ! न थकता आणि न चिडता ! मनुष्याचे दोन शत्रू असतात. एक आळस आणि दुसरी झोप ! जो झोपला त्याचा कार्यभाग संपला. तसेच मनुष्याचे दोन मित्र सुध्दा असतात एक परिश्रम आणि दुसरा सावधानी या दोन्ही गोष्टी वर ज्याने विजय मिळविला तो अजय होतो. आज तुला मी हाच आशिर्वाद देतो. " असे म्हणून ते जातात.
दुसऱ्या दिवशी सरोवरात स्नान करण्यासाठी आचार्य द्रोण
पाण्यात उतरतात. स्नान करून उगवत्या सूर्याला अर्ध देत असतात. इतक्यात कुठूनतरी एक मगर येते नि गुरू द्रोणाचार्यांचा तो पाय धरतो. तसे ते किंचाळता. राजकुमार
ते पाहून घाबरतात नि मागे पळतात. परंतु अर्जुन मागे न पळता आपले धनुष्य बाण उचलून त्या मगरीवर शर संधान
करतो नि त्या मगरी चे तोंड असे काही बंद करतो की तिचे
तोंड उघडेच राहते. आचार्य द्रोणाचार्यांचा पाय मोकळा होताच ते सरोवर च्या बाहेर येतात. तेव्हा सर्वात अगोदर त्यांच्या मदतीला धावून पांडवच येतात. नंतर दुर्योधन आपल्या भावंडांना घेऊन पोहोचला. आणि उद्गारला ," गुरुवर्य आम्ही आपल्या मदतीसाठी गेलो होतो. तसा भीम म्हणाला ," हे का नाही सांगत पळून गेलो होतो म्हणून. भ्याड कुठला."
दुर्योधन ते सहन झाले नाही तो भिमावर चिडून म्हणाला , भीम मी भ्याड नाहीये. " तेव्हा आचार्य द्रोणाचार्य म्हणाले,
" तू भ्याड नाहीयेस परंतु अहंकारी आहेस. अहंकार हा
माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे ,राजकुमार दुर्योधन. अगोदर
नम्र बनायला शिक. कारण नम्रपणाच प्रगतीचा मार्ग आहे."
महामंत्री विदुर गंगापुत्र भीष्म च्या कक्षेत प्रवेश करत
बोलला ," प्रणाम तातश्री ! "
" आयुष्यमन भव !"
" तातश्री आपण काय विचार करत आहात ?"
" मी जेव्हा एकटा असतो तेव्हा पूर्वजांनी केलेल्या गोष्टीचा विचार करत असतो. म्हणजे असे करत असताना
आपल्याला त्यांच्याकडून बरेच काही शिकता येते. म्हणजे
त्यांनी केलेली चांगली कार्ये तसेच त्यांनी केलेल्या चुका !
त्या वरून आपण शिकायचं असतं की तशी चूक आपल्या
कडून होऊ नये तर आपल्याला काय करायला हवे आहे."
" आपण धृतराष्ट्र दादा बद्दल बोलताय का ?"
" हां ! मी धृतराष्ट्रा विषयीच तो पुत्र मोहाने इतका आंधळा
झालाय की त्याला योग्य काय अयोग्य काय यातला फरकच
कळेनासा झालाय. मी एक वचन बध्द आहे ,परंतु तुला बोलायला काय हरकत आहे ?"
" मला माझ्या मर्यादा ठाऊक आहेत तातश्री ! परंतु जेव्हा बोलायची पाळी माझ्यावर येईल तेव्हा मी बोलल्या
शिवाय राहणार नाही."
" विदुर तुझ्याकडे शकुनी च्या काट्याचा मंत्र ठाऊक आहे
का ?"
" नाही. तातश्री !"
" मला ठाऊक आहे , त्याच्या मनात कोणती आग पेटत
आहे ती ! "
" असं जर आहे तर आपण गप्प का आहात ? जेष्ठ पुत्र
युधिष्ठिर ला युवराज घोषित करून टाका. ते मोठे होण्याची
वाट पाहू नका."
" तसं करू शकत नाही आपण !"
" का ?"
" समज तसं केलं तर लगेच तो शकुनी पात्रता चा प्रश्न
उभा करील. आणि योग्यता तेव्हाच सिध्द होईल जेव्हा सर्व
राजकुमार मोठे होतील."
" आपण असं का म्हणता ? आपण तर करुवंश चे सर्वात
जेष्ठ आहात. आपली आज्ञा सर्वाना मान्य करावीच लागेल."
" हां मी सर्वांत मोठा आहे,परंतु वचन बध्द आहे पिताश्रीना दिलेल्या वचनात अडकल्यामुळे मी कुणाला काही बोलू पण शकत नाही."
" आपल्याला प्रतिज्ञा केल्याचा पश्चाताप तर होत नाहीये
ना ?"
" छे छे छे ! तसे मुळीच नाही. त्यासाठी जर मला शंभर जन्म घ्यावे लागले नि प्रत्येक वेळी तीच परिस्थिती ओढवली तर मी प्रत्येक-वेळी हीच प्रतिज्ञा करीन. परंतु मी जे तुला
म्हटलं की आपल्याला इतिहासा मधून काहीतरी शिकायला
पाहजे. पिता मोह अथवा पुत्र मोह .....व्यक्ती प्रथम नागरिक
असतो. या व्यतिरिक्त तो जे काही असेल ते नागरिकच्या
नंतरच आणि जेव्हा मनुष्य हे सर्व मागे सारतो तेव्हा देशाची
हानी होते."
" महाराज पांडू कडून ऋषी किंदंम हत्या होण्या मागे नागरिकाचा हात नव्हता. पण कधी कधी असं काही घडून
जाते की त्याचा त्रास त्या व्यक्तीलाच नाही तर साऱ्या राष्टाला
भोगावा लागतो."
" म्हणूनच तर घाबरतोय मी !"
" नाही तातश्री ! जर समुद्रच आपल्या थेंबाला घाबरू
लागला तर प्रलय होईल.म्हणून भूतकाळात जे घडलंय
त्यातून काही शिकले पाहिजे, त्याची पुनवृत्ती होता काम नये. धृतराष्ट्र दादा नेत्रहीन आहे, परंतु महाराणी गांधारी वहिनी तर दैवाने दिलेले डोळे बांधून घेतले आहेत. "
" म्हणून तर त्या दिवसाची चिंता कर, की ज्या दिवशी ती आपल्या डोळ्यावरील पट्टी सोडेल तेव्हा तिला काय दिसेल नि काय नाही याचा विचार कर."
गंधारीला आपल्या कुंतीच्या कक्षेतून बाहेर पडताना
पाहून शकुनी विचारले ," गांधारी कुठून येते आहेस तू आता ?"
" मी जरा कुंतीच्या कक्षेत गेली होती का रे ?"
" गांधारी तुला हे कधी कळणार की तू एक महाराणी
आहेस तुला दुसऱ्या च्या कक्षेत जाण्याची काय आवश्यकता
आहे, जर तुला कुणाला भेटण्याची इच्छा झाली तर तू तिला
आपल्या कक्षेत बोलवू शकतेस ."
" कुंती कुणी परखी नाही दादा ! ती आपलीच आहे."
" मग मी कुठं तिला आपली नाही म्हटलं. ती आपली आहे, तुझ्या पेक्षा लहान. पांडू च्या मोठ्या भावाची पत्नी
तू आहेस. आणि ती महाराज धृतराष्ट्राच्या धाकट्या
भावाची पत्नी ! आणि ती पण विधवा !"
" विधवा होणे हा काही तिचा दोष नाहीये."
" गांधारी गाधरीं तू कधी समजशील. पांडू पुत्रानी हे
संपूर्ण राज्य बळकावल्यावर ?"
" दादा मी कुंती आणि तिच्या मुलाबद्दल वाईट कधीच
चिंतनार नाही."
" तू मूर्ख आहेस !"
" दादा, तुम्ही असं का नाही करत ,काही दिवस गांधार ला
जाऊन या !"
" जोपर्यंत दुर्योधनला त्याचे सारे अधिकार मिळत नाहीत
तोपर्यंत मी कुठंही जाणार नाही."
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा