Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

महाभारत २६ | मराठी स्टोरी, मराठी शॉट स्टोरी, मराठी कथा, दिवाळी संग्रह | महेंद्रनाथ प्रभु.

महाभारत २६
महाभारत २६

 


                       महाभारत -२६

     कुंती ने आपल्या मुलांसाठी खीर बनविली होती. त्यातले
अर्धे भांडे खीर तर एकट्या  भीमालाच द्यावी लागे आणि उरलेली अर्धे भांडे खीर बाकीच्या चार भावांसाठी होती. परंतु खीर एकदम स्वादिष्ट बनली होती म्हणून अर्जुन ने भीमाला ठेवलेल्या खिरी मधून थोडीशी खीर खाल्ली ! मग भीमाचा
पारा चढला. तो त्याला मारण्यासाठी त्याच्या अंगावर धावून
गेला. तशी अर्जुन ने सुध्दा धूम ठोकली. म्हणून भीमाने त्याच्या पाठलाग सुरू केला. अर्जुन पळत पळत पितामह
भीष्मांच्या मांडीवर जाऊन बसला. तेवढ्यात भीम पण तेथे
पोहोचला. नि त्याने अर्जुनाला पितामह भीष्म च्या मांडीवरुन
खाली उतरायला सांगितले. तेव्हा पितामह भीष्म ने भीम ला
त्याच्या क्रोधाने कारण विचारले. तेव्हा भीम ने सांगितले की, पितामहा ,अर्जुन ने माझी खीर खाल्ली ! " तेव्हा पितामहा
भीम ला समजावत बोलले ," अरे भीम बेटा, अर्जुन लहान
भाऊ आहे ना तुझा ? मग खाऊ दे ना खाल्ली तर !"
    " पण त्यामुळे  माझे पोट रिकामी राहिले त्याचे काय पितामहा ?"
    " अरे खीरच खाल्ली ना ! उद्या तुझ्यासाठी मी खूप सारी खीर बनवायला सांगतो ,मग तर झालं." त्यावर भीमा ने होकारार्थी मान डोलावली. तसे गंगापुत्र भीष्म उद्गारले ," आता तुम्ही दोघे पण जा, तुमची आई तुमची वाट पाहत असेल."
     तेव्हा अर्जुन हळूच त्यांच्या कानाजवळ बोलला," तातश्री मी नंतर जाईन , आता जर मी भीम दादा सोबत गेलो तर मला खूप मार देईल. "  त्यावर गंगापुत्र भीष्म स्मितहास्य करत म्हणाले ," म्हणजे समस्या गंभीर आहे तर ! " असे म्हणून ते भीमा कडे पाहत बोलले की,भीम बेटा ,तू आता आणि आपल्या आईला सांग. अर्जुन राहू दे माझ्या जवळ मी
नंतर आणून सोडीन त्याला." भीमा ने होकारार्थी आपली मान
डोलावली आणि तेथून निघाला. तेव्हा गंगापुत्र भीष्म ने अर्जुनाला विचारले की तू गुरुकुलात का नाही गेलास ?"
तेव्हा अर्जुन बोलला की, आम्हाला काकाश्री विदुर गुरुकुलात घेऊन गेले तेव्हा जेष्ठ पिताश्री कडून त्याना बोलावणे आले. आणि तेव्हा जे गेले ते अजून परतलेच नाहीत गुरुकुलात ? अर्थात ते तेथूनच आपल्या बहिणीच्या घरी गेले."
   

      दुर्योधन आपल्या मामाश्री शकुनी च्या कक्षेत सारीपाट खेळत असताना मामा शकुनी दुतक्रीडा विषयी माहिती देत
असताना सांगतात की, चांगला खिलाडी त्यालाच म्हटलं पाहिजे की  ज्याचे म्हणणे त्याचे फासे सुध्दा  ऐकतात. जर मला पाचाची आवश्यकता आहे तर तेथे बारांचे काय काम ! आता हेच बघ तुझ्या ह्या सोंगटी ला मारण्यासाठी मला सहाची आवश्यकता आहे तर बघ. " असे म्हणून मामा शकुनी फासे फेकले. आणि काय आश्चर्य एकदम सहाचाच आकडा
आला. शकुनी मामांचे खेळण्यातील कसब पाहून दुर्योधन एकदम थक्कच झाला. तसे शकुनी मामा पुढे म्हणाले ," दुर्योधन खेळ कधीही जिंकण्यासाठीच खेळायचा असतो. मग त्यासाठी जे आवश्यक आहे ते करायचं असतं. मग  त्यासाठी कपट नीती वापरावी लागली तरी ही चालेल. परंतु प्रतिस्पर्धी हरलाच पाहिजे."
     " परंतु मामा श्री ...?"
     " मध्ये मध्ये बोलू नकोस. मी काय सांगतो. ते नीट द्यानात
घे." असे म्हणून ते किंचित थांबून ते पुढे उद्गारले ," काही वर्षांपूर्वी  तुझ्या आजोबांनी अर्थात भीष्म ने विदुर मार्फत एक
बाण सोडला होता आणि त्यात तुझे वडील घायाळ झाले. नाहीतर आज हस्तिनापूर चे नरेश तुझे वडील असणार होते.
आता ही मागचाच इतिहास पुन्हा घडविण्याचा प्रयत्न सुरू
आहेत. अर्थात तो दासीपुत्र विदुर हे नक्कीच सिध्द करेल की
युधिष्ठिर ही करुवंशचा जेष्ठ पुत्र आहे, अर्थात हस्तिनापूर चा युवराज युधिष्ठिर आहे, शिवाय इतकेच नाहीतर पुढे
राज सिंहासन वर सुध्दा त्याचाच   पहिला अधिकार आहे, परंतु माझ्या मता प्रमाणे युधिष्ठिर करुवंश जेष्ठ पुत्र अवश्य आहे, परंतु तो पांडू पुत्र आहे, आणि आता राज सिंहासन वर कोण विराजमान आहेत ? तर तुझे पिताश्री आणि त्यांचा तू जेष्ठ पुत्र आहेस. अर्थात राज सिंहासनावर तुझाच जन्म सिध्द  अधिकार आहे. म्हणून मी जसे सांगेन तसे करत जा बस्स ! मग जरी काळाने सुध्दा मनात आणले की राजा युधिष्ठिर व्हायला हवा तर ते त्याला ही शक्य होणार
नाहीये. फक्त सर्वकाही माझ्या योजने नुसार व्हायला हवं."
    " त्यासाठी मला काय करायला हवंय."
    " एक गोष्ट लक्षात घे. पांडव पाच आहेत. अर्थात पाच
बोटे. आणि पाच बोटांपासून बनते मुठ्ठी ! ह्या मुठ्ठी मध्ये खूप
ताकद असते. "
   " परंतु आम्ही शंभर आहोत मामाश्री !"
   " तुम्ही   शंभर आहात परंतु शंभर बोटांनी कधी मुठ्ठी बनत नाही दुर्योधन."
    " मी तर त्या वनवाशीयांचे तोंड सुद्धा पहायची इच्छा नाहीये."
     " त्यांचे तोंड पाहण्याची माझी पण इच्छा नाही ; परंतु तुला नि मला आपला हेतू साध्य होईपर्यंत त्यांचे तोंड तर
पाहावे तर लागणाच आहे."
    " पण त्यावर उपाय नाही का काही ?"
   " उपायच तर करायचा आहे आपल्याला. परंतु त्यांच्याशी
वैर करून नाही."
     " मग कसं ?"
    " गोड बोलून काटा काढायचा ." शकुनी मामा उद्गारला.
    " तो कसा ?"
    " सांगतो. ऐक. "
    " सांगा."
    " एक एकाचा काटा काढायचा."
    " पण कसा ?"
    " भीमाला खीर आवडते."
    " हां पेटूराम तर आहेच तो."
    " हां तो बस्स ! मिळाला उपाय."
     " उपाय मिळाला ....कोणता ?" दुर्योधन ने न समजून विचारले.
     " त्याला खीर मधून विष चारायचं." शकुनी मामा उद्गारला.
    " असं करता येईल ?"
     " हां जरूर करता येईल."
     " मग ठीक आहे, आम्ही उद्याच हे काम फत्य करून टाकतो." असे म्हणून त्याने आपल्या मामाला टाळी दिली.

     दुसऱ्या दिवशी बाकी सर्वजण काही ना काही खेळ खेळत
होते. मात्र भीम गंगेच्या काठावर बसून पाण्यात छोटे छोटे खडे फेकण्यात दंग होता. खरं सांगायचं तर खेळात त्याचे मन रमत नव्हते. कारण त्याला फार भूक लागली होती.
शिवाय पितामह भीष्म ने रात्री वचन दिल्या प्रमाणे भरपूर सारी खरी दिली नव्हती. म्हणून तो नाराज होता. म्हणून च
की काय तो कुणा सोबत ही न खेळता एकांत मध्ये एकटाच
जाऊन बसला होता. हे दुर्योधन ने पाहिले. तशी त्याच्या मनात एक कपट योजना सुचली. तो भीमा जवळ गेला नि
म्हणाला ," सगळे जण तिकडे खेळत असताना तू एकटाच का इथं बसलास भीम भाई ?"
    " माझं खेळात अजिबात मन नाही."
    " का बरं ?"
    " मला फार भूक लागली आहे."
    " सफरचंद खाशील का ?"
     " अवश्य " दुर्योधन ने एक सफरचंद घेतले नि ते अंगावरच्या वस्त्रा ने पुसून भीम ला दिले नि दुसरे स्वतःखात
बसला. तेव्हा भीम सफरचंद खाता खाता म्हणाला ," तुला
माहितेय  कल रात्री अर्जुन ने माझ्या वाट्याची खीर खाल्ली !
आणि मी जसा त्याला मारायला धावलो. तर तो पितामहांच्या
मांडीवर जाऊन बसला ने त्यांच्या जवळ माझीच तक्रार करू
लागला. मग मी त्याना खरं काय झालं ते सांगून टाकले.
मग पितामहानी सांगितले आज जास्त खीर बनवितो म्हणून.
पण पितामहानी खीर बनविलीच नाही. मग मला सांग पोटात
काहीं नसताना खेळायला आवडेल का मला ?"
     " बरोबर आहे तुझं. तू एक काम करतो का ?"
     " खायचं काम सोडून मला दुसरं काही सांगू नकोस."
     " खायचंच रे ,म्हणजे कसं आहे, खीर  भरपूर बनविली
आहे , तुला पाहिजे तर आम्ही देऊ शकतो."
     " खरंच ?"
    " हां पण फक्त तुलाच हां नाहीतर तू म्हणशील आम्हां पाची  भावाना पण दे तर मात्र मिळणार नाही हं !" दुर्योधन असं काही जणू त्याचे त्याच्या वर अति प्रेम आहे ; परंतु भीम
मात्र त्याच्या मधुर भाषेवर पूर्ण फसला.नि त्याच्या सोबत त्याच्या शिबिर मध्ये गेला तेव्हा त्या दोघांना युधिष्ठिर त्याच्या जवळू जाताना त्या दोघांना एकत्र जाताना पाहून आपल्या
इतर भावंडे त्याच्या सोबतच होती त्याना म्हणाला ," दोघांचा
मिलाप झालेला पाहून उद्गारला ," अरे वा ! पूर्वेला
उगवणारा  सूर्य आज पश्चिमेला कसा काय उगवला !"
      त्यावर अर्जुन उद्गारला ," आपण त्याला रात्री समजावले
होते ना त्याचाच हा परिणाम !"
     " दोघांची मैत्री झाली तर सोन्याहून पिवळे झाले म्हणायचे." युधिष्ठिर उद्गारला
    दुर्योधन त्याला आपल्या शिबिरात घेऊन गेला. तेथे खीर ची राखण करत दु्:शासन बसला होता. खिरीचा पूर्ण भरलेला टोप देताच  भीम म्हणाला ," तुम्ही दोघे पण खा. "
   तसा दु:शासन उद्गारला ," आम्हाला नको तूच खा."तसे भीम ने लगेच विचारले ," का बरं ? "  तसा दुर्योधन  लगेच
उद्गारले ,"  तू अगोदर खा. तू खाऊन शिल्लक राहिली तर मग
ती आम्ही खाऊ !" त्यावर भीम म्हणाला ," शिल्लक नाही राहणार." दुर्योधन उद्गारला ," ठीक आहे, आम्हाला नाही
राहिली तरी चालेल. पण तू  खा." मग काय भीम ने पोटभर
खीर खाल्ली! थोडीशी शिल्लक राहिली ती नंतर खाईन आता मला जरा झोपू दे. " असे म्हणून  बसलेल्या आसणावरच आडवा झाला. थोडा वेळाने त्याला हांक मारून
पाहिले परंतु  भीम नर ओ दिला नाही. कारण भीम दुर्योधन दिलेली खीर खाऊन तो मूर्च्छित झाला होता.
       मग त्या दोघांनी त्याचे हात पाय बांधले नि गंगेच्या काठावर घेऊन गेले. नि त्याला गंगेच्या पाण्यात फेकून
दिले. आणि चुपचाप आपल्या शिबिर मध्ये आले.

  बराच वेळ झाला तरी भीम आला नाही म्हणून युधिष्ठिर ला
मोठी चिंता वाटू लागली. त्याने दुर्योधन जवळ चौकशी केली
तर दुर्योधन उद्गारला ," हो माझ्या सोबत आला होता तो, परंतु
नंतर तुझ्या कडे जातो म्हणून सांगून गेला तो आमच्या कडून.
   सगळीकडे शोधा शोध सुरू झाली परंतु भीम कुठं गेला
हे कुणालाच माहीत नाही. सैनिकांनी तिथला सारा परिसर
पिंजून काढला परंतु भीम चा कुठंच सुगाव लागला नाही.
काही सैनिकांनी तर  हे काम दुर्योधन चे असावे. असा संशय ही पण व्यक्त केला. उघड मात्र कुणी काही बोलत नव्हते.

      भीम नदीच्या तळाशी गेला तेव्हा त्याच्या नागानी त्याला
दंश केला. त्या बरोबर खीर मार्फत त्याच्या शरीरात गेलेले विष उतरले. आणि शुध्दीवर आला. आणि नागवंशी वर प्रतिहल्ला केला. शेवटी नागवंशी त्याला पकडून आपल्या
राजाकडे हजर केले. तेव्हा नागवंशी त्याला विचारले ," बाळ
कोण आहेस तू ? " तेव्हा त्याने सांगितले की मी कुंती पुत्र
भीम आहे." कुंती चे नाव ऐकताच तो प्रमुख आपल्या
स्थानावरून उठून म्हणाला ," मग तर तू आपल्या आजोळी
आहे." असे म्हणून त्यांनी आपली ओळख सांगत म्हणाले,
    " मी तुझ्या आईच्या ही आईचा बाप आहे म्हणून."
     त्यानंतर त्याला सुधा रस प्यायला दिला. त्या एका प्याला
मध्ये दहा हत्तीचे बळ होते. एक नव्हे सात प्याला तो रस प्याला. त्यानंतर त्याला किनाऱ्यावर आणून सोडण्यात आले.
  तसा तो राज भवनात परतला.तेव्हा त्याला सुखरूप आलेला पाहून सर्वांना आनंद तर झालाच ; परंतु जेव्हा त्याने
घडलेली हकीकत युधिष्ठिर जवळ कथन केली. तेव्हा युधिष्ठिर त्याला सांगितले की ही गोष्ट तू कुणा जवळ बोलू
नकोस. " त्यावर भीम चिडून उद्गारला ," मग काय त्याला
जाऊन धन्यवाद देऊ नि सांगू  की खीर खूप रुचकर होती. पुन्हा कधी बोलविणार आहेस  खीर खायला   ?" त्यावर युधिष्ठिर उद्गारला ," तू हे सुद्धा करायचं नाहीये. ही आपल्या घरातील गोष्ट आहे तेव्हा ती घरातच राहायला हवीय.कारण ही गोष्ट मोठ्या आईला समजली तर त्याना फार दुःख होईल." परंतु अर्जुन आणि भीम या दोघांना ते पटले नाही. तेव्हा अर्जुन ने युधिष्ठिर ला विचारले की, हा आपला आदेश समजायचा का आम्ही ! " तेव्हा युधिष्ठिर उद्गारला ," जर आदेशा शिवाय तुम्ही दोघे गप्प बसणार नसाल तर हा माझा आदेशच आहे असे समजा." तेव्हा कुंती सुध्दा उद्गारली ," माझा ही हा आदेश आहे."  शेवटी दोघांचा ही नाईलाज होतो. म्हणून ते दोघे गांधारीला सुध्दा काही सांगत नाहीत.


क्रमशः
    



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..