महाभारत २२ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी, दिवाळी संग्रह | महेंद्रनाथ प्रभु.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाभारत २२ |
महाभारत -२२
दैव मला अजून काय काय दाखविणार होते ? ते कुणास
ठाऊक ? मध्यम वयातच मी विधवा म्हणून जगणार होते. पतीशिवाय स्त्रीच जीवन म्हणजे ज्योतीशिवाय वात. पतीशिवाय जगणे हा विचारच मला सहन होत नव्हता मुळी ! असं वाटतं की माद्री ला अगदी स्पष्ट शब्दात सांगून टाकावे की तुला तर मी सर्वकाही दिलं. स्त्रीच सर्वात मोठं धन काय असतं तर तिचा तो पती ! ते धन सुध्दा मी तुला मोठ्या
उदार मनाने ते वाटलं. तुला मातृत्व लाभलं नसतं
म्हणून मला दुर्वास मुनींवरनी दिलेला दिव्य मंत्र ही तुला मी देऊन टाकला. परंतु पती सोबत सती जाण्याचा अधिकार माझा आहे, तोही तू मागीतलास ? तेही मुलांचे कारण सांगून ? इतकी कशी तू स्वार्थी निघालीस ? हा अधिकार तरी
तू माझ्यासाठी सोडायचा होतास पण तेही नाही जमलं तुला.
अशी कशी गं तू स्वार्थी ! सती जाण्याचा हक्क सुध्दा मला
असू नये. महाराज गेले नि आता तुही निघालीस ! मग मी
कशाला राहू मागे ? आणि कुणासाठी ? मी माझ्याच विचारात गर्क असतानाच माद्री सरोवरातून स्नान करून
आली. तिने पांढरे वस्त्रे घातली होती. माझ्या जवळ येताच तिने माझ्या पायांना स्पर्श केला नि तोच हात आपल्या कपाळावरुन मागे नेला. आणि एका क्षणाचाही विलंब न करता आणि मागे वळून न पाहता , तिने सरळ त्या अग्नीत प्रवेश केला ! क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले.तिचं पांढरं वस्त्र काळपट पडून करपून गेलं. ते पाहून माझं मलाच वाईट वाटलं. आणि पश्चातापही झाला. मघाशी मी केलेल्या कृत्याचा ! तिच्या मुस्कटात मी मारली होती ! मला ती भावनेच्या राज्यातली दुबळी स्त्री वाटली होती. परंतु किती तत्परतेने तिनं निर्णय घेतला होता , सती जाण्याचा. खरं तर किंदंम ऋषींच्या नाकावर टिच्चून तिनं पाय दिला होता. जणू तिला किंदंम ऋषीवर ना दाखवून द्यायचं होतं की आपल्या प्रियकराने दिलेले आलिंगन मृत्यूच्या मोलानं चितेवरही मी स्वीकारलं. आता कुणाचाही शाप तिला आपल्या प्रियकराच्या मिठीतून सोडवून घेणार नव्हता. मीही तिचाच मार्ग अवलंबला असता आणि तसा विचारही माझ्या मनात
आला होता. परंतु दुसऱ्या क्षणी पाच ही मुलं मला येऊन बिलगली. तेव्हा मी भानावर आले. अरे मी काय करायला निघाले होते माद्रीला दिलेलं वचन ही मी विसरले. मी माझ्या निष्पाप मुलांना देखील विसरले. असं कसं झालं बरं ? कदाचित महाराजांच्या अकस्मात जाण्याने मी हतबल झाली होती. माझीच मी राहिली नव्हती. जर मी आज अग्नीत उडी घेतली असती तर ते नक्कीच पाप झालं असतं. मी त्या सर्वांना एकदमच कवेत घेतलं आणि ढसढसा रडू लागले.
चिता पेटून शांत झाली होती. कालपर्यंत माझ्याशी
सुखदुःखाच्या गोष्टी करणारे दोन जीव आज कुठे होते ?
मृत्यू ! हे जन्माला येणाऱ्या प्रत्येक सजीवांचे अंतिम सत्य
आहे ,म्हणजे जन्मला येणारा प्रत्येक जीव एक ना एकदिवस या मातीत मिसळून जातोच म्हणा! मग जीवनाच्या अंतिम
क्षणापर्यंत जगण्यासाठी आटापिटा करतो तरी कशासाठी ?
कदाचित हेच आहे मानवी जीवन. ते जगावेच लागते सर्वांना.
ज्या शापा पायी आम्ही वनवास पत्करला. त्या शापाने ने
मात्र आमचा पिच्छा सोडला नाही. महाराज जर राहिले नाहीत तर आपण तरी आता वनात राहायचं कशासाठी ? मी हस्तिनापूरला जाण्याचा निर्णय घेतला. माझ्या धाकट्या भावाला अर्थात वसुदेवला ही खबर कशी लागली ती कुणास ठाऊक ? वसुदेव आणि देवकी मला आणि माझ्या मुलांना सोबत घेऊन जायला आले परंतु हस्तिनापूर चे राजकुमार दुसरीकडे कसे जातील बरं ? मी माझ्या धाकट्या भावाला समजावले की हे पाच पुत्र महाराजांची माझ्या जवळ अमानत आहे, तेव्हा मला हस्तिनापूर ला जाणे अनिवार्य आहे. तेव्हा
नाईलाजाने का होईना माझं ऐकावेच लागले त्याला. तो म्हणाला ," ठीक आहे, तुझी जर इच्छा नसेल तर मी जबरदस्ती नाही करणार तुझ्यावर. परंतु तुझ्या सोबत मी
हस्तिनापूर पर्यंत तरी येतो. नाही म्हणू नकोस."
" नाही वसुदेव हा माझा एकटीचाच प्रवास आहे, आणि
मला तो एकटीलाच करू दे. म्हणून तू इथूनच माघारी घरी जा." अखेर वसुदेव चा नाईलाज झाला. तो माघारी परतला.
आणि आम्हीही हस्तिनापूर चा रस्ता धरला.
धृतराष्ट्र
प्रिय पांडू हे जग सोडून गेला. ही वार्ता आम्हाला दूत मार्फत समजली.तशी साऱ्या हस्तिनापूर ला शोक कळा
पसरली. आई अंबालिका ने तर हंबरडा च फोडला. गांधारी
स्थिती त्याहून वेगळी नव्हती. हमसून हमसून रडत होती.
मला मात्र रडू येत नव्हते.जणू माझ्या डोळ्यातील अश्रूंचा झरा आटला होता. त्यात अश्रूंचा एक थेंब ही शिल्लक नव्हता. असं का बरं व्हावे ! प्रिय पांडु माझा धाकटा भाऊ
अर्थात मला तर अतोनात दुःख व्हायला हवं होतं. परंतु तसे
झाले नाही. मग काय मला आनंद झालाय ? छे ! आनंद कसा
होईल ? मग काय दुःख समजायचं ? परंतु दुःखाची चेहऱ्यावर एक छटाही दिसत नाही. कदाचित राजगादी हातातून जाईल म्हणून सतत मनात भीती जी होती ती कायमची दूर झाली म्हणून मनाला आनंद झाला होता का ?
परंतु हे कसे मी विसरलो की पांडु जरी आम्हाला सोडून
गेला तरी त्याचा तो मोठा मुलगा युधिष्ठिर आहे ना ? माझ्या
पुत्रा पेक्षा ही तो जेष्ठ असल्याने हस्तिनापूर च्या राजगादी वर
पांडू पुत्राचा अधिकार नाही का ? कदाचित हेच कारण असावे. शेवटी नियती ने माझ्याशी क्रूर खेळ खेळला च की !
मला नाही तर पण माझ्या मुलाला तरी राजगादी मिळायला
हवी होती. परंतु आमचं नशीबच खोटे त्याला कोण काय
करणार ? तेवढ्यात तेथे तातश्री येतात. परंतु मला त्यांच्या
पाऊलांची चाहूल अगोदरच लागली. म्हणूनच की काय मी
माझ्या चेहऱ्यावर कृत्रिम दुःख दाखविण्याचा प्रयत्न करत
म्हटलं ,' तातश्री खरं सांगायचं तर खऱ्या अर्था ने मी आजच
नेत्रहीन झालो.प्रिय पांडु म्हणजे माझे दोन डोळे च होते.
तेव्हा कुंती च्या स्वागातासाठी मी स्वतः जाणार मुख्यद्वारा पाशी " तातश्री म्हणाले ," महाराज तुम्ही इथंच थांबा. कुंती च्या स्वागता साठी मी जाणार आहे." असे म्हणून तातश्री
निघून ही गेले. तेव्हा दुर्योधन उद्गारला ,' हे लोक वनातून इथं
का येत आहेत ?" तशी गांधारी उद्गारली , " ते इथं येणार नाहीत तर दुसरीकडे कुठं जातील ? हे घर त्यांचे सुध्दा आहे
प्रिय पुत्र दुर्योधन ." मी म्हटलं ," हां पुत्र दुर्योधन तुझी आई एकदम बरोबर सांगत आहे की,हे घर त्यांचे पण आहे तसा दुर्योधन उद्गारला ," नाही. हे घर फक्त नि फक्त माझं आहे."
असे म्हणून तेथून बाजूला जाऊन उभा राहिला. गांधारी उद्गारली , " मला ना कधी कधी दुर्योधन च्या अश्या वागण्याचं
भय वाटू लागतं. " त्यावर मी म्हटलं ," अग तर खरी ओळख
आहे , एका राजकुमार साठी ! " म्हणजे मला त्यात काय वावगं वाटलं नाही. उलट अभिमान वाटला. पण खरं सांगायचं तर मला त्यावेळी राग यायला पाहिजे होता. आणि
सरळ सरळ दुर्योधन ची कान उघडणी करायला पाहिजे होती
की ही राजगादी माझी नसून पांडू ची आहे, अर्थात ह्या घरावर
पहिला अधिकार तर पांडू पुत्रांचाच आहे. परंतु मला असे दुर्योधन ला सांगणे कधीच जमले नाही. कारण मला सुध्दा दुर्योधन प्रमाणे वाटत होते की ह्या राजगादी वर वारसा हक्क
माझा नि माझ्या नंतर माझ्या मुलाचा अर्थात दुर्योधनाचा
अधिकार आहे, म्हणून मला दुर्योधन च्या ह्या वागण्याने राग
नाही तर अभिमान वाटला. की माझा मुलगा माझ्या सारखाच
महत्वकांक्षी आहे, आणि कुणालाही महत्वकांक्षी असणं जरुरी आहे, खरी वीरांची ओळख आहे ती. परंतु ही गोष्ट
मी गांधारी ला समजावून सांगू शकत नाही. की पांडू की किंवा त्याची ती मुलं हस्तिनापूरात कधीच येऊ नये. म्हणून
मी फक्त वर करणी म्हंटल ," दुर्योधन असं बोलू नये." परंतु
तो हे ऐकायला होताच कुठं होता तिथं ? म्हणजे मला तसं
जाणवलं होतं. पण तरी देखील तो आपल्या आसपासच
आहे असे समजून म्हटलं ," पुत्र दुर्योधन जरा आम्हाला
मुख्य द्वार पाशी घेऊन चल. असे म्हणून तो येण्याची किंचित
वाट पाहिली. परंतु पुत्र दुर्योधन काही आला नाही.
गंगापुत्र भष्म
मी मुख्य द्वार पाशी असलो नि कुंती येण्याची वाट पाहू लागलो. तेवढ्यात कुंती आपल्या पाच मुलांना सोबत घेऊन तेथे पोहोचली. मला पाहताच तिला आपला हुंदका रोकता आला दाटून आलेला कंठ मुखावाटे बाहेर पडला.तिने रडूच
माझे चरण पकडले. मी तिच्या खांद्याना पकडून तिला
वर उठविले नि तिला आपल्या छातीशी धरिलें. थोड्या वेळाने ती दूर झाली नि आपल्या मुलांची ओळख करून देऊ
लागली. युधिष्ठिर ,भीम, अर्जुन ,सहदेव नि नकुल. जशी तिने
ओळख करून दिली तसे मी एकेकाला पोटाशी धरिलें.
नि मायेनं गोंजारले. त्यानंतर युधिष्ठिर च्या हातातला
अस्थीकलश स्वतःच्या हातात घेत म्हटलं ," प्रिय पांडू , काय
केलेस हे ? इतक्या लवकर आम्हाला सोडून का बरं गेलास ? " त्यानंतर पुन्हा तो अस्थी कलश युधिष्ठिरच्या हातात दिला. त्यानंतर त्या सर्वांना घेऊन राजवाड्यात प्रवेश
केला. आणि सर्व प्रथम महाराज धृतराष्ट्रा च्या कक्षेत निघाले.
धृतराष्ट्र
मी दासीला विचारले की इथून मुख्यद्वार अजून किती
दूरवर आहे ? " परंतु दासी काही उत्तर देण्याच्या अगोदर दुसऱ्या दासी ने खबर दिली की महाराणी कुंती आपणास
भेटायला येत आहे. नि खरोखरच तेथे कुंती आली नि सरळ
रडतच तिने माझ्या पाया पाशी वाकली अर्थात नमस्कार करायला. मी तिच्या खांद्याना पकडून वर उठवत म्हंटले, उठ
कुंती ,पांडूच्या अकस्मात जाण्याचे माझ्या हातातील बळ
सुध्दा गेलं. मी नाही उठवू शकत तुला." त्यानंतर कुंती ने
गांधारी चे नक्कीच चरणस्पर्श केले असणार. कारण गांधारी
च्या पुढील वक्तव्याने सिध्द झाले. कारण गांधारी उद्गारली,
कुंती आपल्या ताई चरण न पकडता माझ्या छातीशी लाग."
तेवढ्यात कुंती उद्गारली ," ताई ,मी रिकाम्या हाताने आली."
त्यावर गांधारी बोलली ," खाली हात का ? पांच रत्न आणलीस ना ?" त्यानंतर कुंती आपल्या जेष्ठ पुत्राची माझ्याशी ओळख करून देताना म्हणाली ," जेष्ठ श्री हा आपला जेष्ठ पुत्र युधिष्ठिर असे म्हणताच मी म्हटलं की
आयुष्यमान भव !" मी असे म्हटले खरे ! परंतु त्यात आपुलकीपणा नव्हता. केवळ दिखावा होता. परंतु गांधारी
दिखावा करत नव्हती. ती प्रिय पुत्र दुर्योधन ला म्हणाली ,
दुर्योधन आपल्या थोरल्या भावाला प्रणाम कर." परंतु दुर्योधन
कसले ऐकतोय तो उलट नाराजी ने उद्गारला ," उ हूं ! याचा
मी नाही असाच होता. पण तरी देखील मी त्याला दम न देता म्हटलं ," दुर्योधन आपल्या भावाला प्रणाम कर." पण दुर्योधन ठस का मस नाही झाला.तेवढ्यात माझी आई अंबिका तेथे आली नि म्हणाली ," कुंती चल. आई ,तुझी वाट
पाहत आहे.अर्थात सत्यवती आजी बद्दल बोलत होती ती.
कुंती आपल्या मुलासह तिकडे जायला निघाली.
सत्यवती
पांडू च्या अकस्मात जाण्याने माझ्या मनाला फार मोठी
जख्यमशी झाली होती. खरं सांगायचे सर्व माझ्या पेक्षा अंबालिका चे दुःख फार मोठे होते. कारण तिच्या काळजाचा तुकडा पांडू तिच्या पासून दूर झाला होता. मी तिचे सांत्वन
करायला हवं होतं परंतु उलट तीच माझं सांत्वन करत होती.
परंतु माझं मन एकदम खिन्न झालं होतं. मला काहीच सुचत
नव्हतं. मी तिला म्हणाली ," माझी समजूत काढू नकोस
अंबालिका ,माझं दुःख तू जरा समजून घेण्याचा प्रयत्न कर. की मला जीवनात किती कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला ते बघ बरं , अगोदर मी माझ्या नवऱ्याच्या शवावर रडली, नंतर मुलांच्या शवावर रडली. नि आता तर मुलाच्या ही
मुलाच्या शवावर रडत आहे. आणि हे सारे कशा मुळे घडले तर , गंगापुत्र भीष्मांवर जो अन्याय झाला होता त्याचीच फळे
ही मिळताहेत. परमेश्वर मला अजून किती शिक्षा देणार आहे
ते कोण जाणे ! " तेवढ्यात माझे लक्ष कुंती वर जाते तशी
अंबालिका कुंती ला मिठी मारत उद्गारली ," कुंती ,माझ्या
मुलाला जंगलात कुठं सोडून आलीस तू ?" तेव्हा मी अंबालिका ला उद्देशून बोलली ," कुंती चं तर सर्वस्व लुटलं
गेलंय. तिचे दुःख तुझ्या दुःखा पेक्षाही जास्त आहे. तिचे सांत्वन करायचे सोडून आपलंच दुःख काय तिच्या समोर
गात राहीलीस काय ? असे म्हणून मी कुंती ला उद्देशून
उद्गारली ," कुंती माझ्या जवळ ये बरं ! " कुंती जवळ येताच
मी तिला घट्ट मिठीच मारली. किती वेळ तरी आम्ही दोघी
मिठीतच राहिलो. परंतु मला आपल्या कर्तव्याची जाणीव झाली. मी तिला माझ्या पासून दूर करत म्हटलं ," पाहिलंत
कुंती एक पांडू ला आपल्या सोबत घेऊन गेली होती. ,मात्र
परत येताना पांच पांडू ना घेऊन आली. असे म्हणून पाचीही
पांडु पुत्राला जवळ घेतले.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा