Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

महाभारत -२१ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी, दिवाळी संग्रह | महेंद्रनाथ प्रभु.

महाभारत -२१
महाभारत -२१

 


                             २१

    महाराज उग्रसेंन ला सिंहासनावर बसवून त्यांच्या डोक्यावर सुवर्ण राजमुकुट स्वतः श्रीकृष्णाने ठेवला नि सर्व
प्रजेला उद्देशून म्हटलं ," मी वसुदेव कृष्ण मथुरा नरेश उग्रसेंन,
आणि मथुरा नगरी आणि माझ्या नंद बाबा ना प्रणाम करून
बोलतोय की, महाराज उग्रसेंन की जय ! तेव्हा उग्रसेंन उद्गारले ," महाराज  उग्रसेंन ची नाही तर जय वसुदेव श्रीकृष्णची बोला. " तशी मथुरा नगरी वसुदेव कृष्ण की जय असे बोलतात. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला ,"   वसुदेव श्रीकृष्णाची जय नाही तर बोला जय मथुरा नगरीची  ,जय नंद बाबाकी जय , बोला यशोदा आई ची जय ! आणि शेवटी  भारतवर्ष की जय ! " असे श्रीकृष्णाने म्हणताच त्याचेच अनुकरण सर्वांनी केले.
      त्यानंतर श्रीकृष्ण आपल्या आई-वडिलांच्या सोबत आपल्या घरी आला. तेव्हा त्याची  आई देवकी त्याला नि
बलराम ला आपल्या हाताने भरविते. तेव्हा वसुदेव श्रीकृष्णाला विचारतात  की मथुरेचे लोणी चवीला कसं आहे ?"  तेव्हा श्रीकृष्ण उद्गारला ," नंद गावाच्या लोणीची चव ह्या लोणीला अजिबात नाहीये हो ना  दादा ?" बलराम लगेच " हां 'म्हणाला. रोहिणी सुद्धा आपल्या हाताने श्रीकृष्णाला लोणी भरविते. तेवढ्यात तेथे नंदराय आले. त्याना पाहून  वसुदेव म्हणाला ," ये मित्रा बैस !" नंदरायला म्हणाला ," नाही
मित्रा  आता बसायला सांगू नकोस. यशोदा एकटीच आहे घरी ! मला घरी गेलं पाहिजे. ती माझी वाट पाहत असेल."
      " आपण असं कारण सांगितलंत की आम्ही पुढं काही
बोलूच शकत नाही." तेव्हा श्रीकृष्ण चट्कन उठून नंदराय
जवळ येत म्हणाला," मग तर मी पण येणार बाबा !"
     तेव्हा नंदराय उद्गारला ," नाही काना तू आता इथंच राहाचंय."
     " नाही मी येणार."
     " काना हट्ट करू नकोस."
     " लहान मुलांना आपल्या आई-वडिलांकडे हट्ट करण्याचा
अधिकारच आहे,बाबा ! जसा एका भक्ताचा हट्ट देवाजवळ ."
     तेव्हा नंदराय उद्गारले ," देवाला भक्तांच्या हाकेला धावायचं असतं. तसेच मुलांनी आपल्या आई-वडिलांचे सांगणे ऐकायचं असते." त्यावर श्रीकृष्ण म्हणाला ," ठीक आहे बाबा. मी इथंच राहीन. परंतु यशोदा आईला सांगा की मी लवकरच भेटायला येईन म्हणून." तेव्हा वसुदेव उद्गारले,
     " अवश्य जा काना, कारण यशोदा आणि नंदराय चा तुझ्यावर आमच्या पेक्षा जास्त अधिकार आहे ; परंतु अगोदर
ऋषी सांदीपनि च्या आश्रमात शिकायला जायचंय उज्जैनला.
      " शिक्षण कुठं पळतंय घेईल सावकाश !"
      " शिक्षण पळत नाही तर वेळ पाळतोय. कोणतीही
योग्य वेळीच होणे अतिआवश्यक आहे देवकी !"
      " तू तर पंधरा वर्षे बलराम आणि बारा वर्ष श्रीकृष्ण सोबत राहीलीस. तुझी तहान भागली असेल ; परंतु जरा माझा विचार कर. माझे अर्धे आयुष्य बंदिग्रहात गेले. आज
दिवस कधी उजाडतोय याची बसली होती वाट पाहत."
      " कानाला राजकुमार तर बनावे लागेल ना , देवकिताई !"
      " तुझा हा मुलगा भविष्याचा आधार आहे,देवकी !"
      " ठीक आहे , जशी आपली इच्छा !" तेव्हा नंदराय ने
देवकीला विचारले की, यशोदे साठी काही निरोप आहे का ?"
     देवकी म्हणाली ," हां , यशोधरला म्हणावे की मी तुझी
कायमची ऋणी झाली. ते ऋण  कशाने ही फेडता येणार नाही
मला." नंदराय घरी आल्यावर यशोदेला वाटले की काना सुध्दा
त्यांच्या सोबत आला आहे, परंतु मुद्दाम लपून राहिला आहे, असे समजून ती पूर्ण घर त्याला शोधते. शेवटी नंदराय म्हणाले ,' काना आला नाहीये यशोदा ! " तशी यशोदा उद्गारली ," आलं लक्षात त्याला इथं येण्यास देवकी नेच मनाई
केली असेल. कारण तो तिचा मुलगा आहे ना, तिने जन्म
दिलाय त्याला. जर तो माझ्या पोटी जन्मला असता तर आज
तिची हिंम्मत झाली असती का मनाई करायची ! मी त्याची
जन्मदात्री नाहीये ना ? मग माझा अधिकार कसा असेल त्यावर." नंदराय उद्गारला ," अगं यशोदा , नको गैरसमज करून घेऊस. काना तुझाच मुलगा आहे, आणि तुला माहितेय काना ने भर महाराज उग्रसेंन च्या भरदरबारात काय
सांगितले ते.... काना म्हणाला , जय वसुदेव कृष्ण बोलू नका.
बोला, बाबा नंदराय की जय बोला यशोदा आई ची जय !"
    " असं म्हणाला काना ?"  यशोदा ने एकदम खुश होऊन
विचारले.
    " हां !"
    " मग आला का नाही तो ?"
   " अगं  आता फक्त तुझाच नाही राहिला तो. साऱ्या त्रैलोक्याचा झाला तो आता." त्यावर यशोदा उद्गारली ,
    " त्याच्यासाठी मी रात्र रात्र जागून काढली तेव्हा त्रैलोक्य
आलं होतं जागायला ?"
    " यशोदा एवढी स्वार्थी बनू नकोस. आणि एक गोष्ट नेहमी
लक्षात ठेव. तो साऱ्या जगाचा पालनहार ; परंतु त्याचे पालन
करण्याचे भाग्य आपल्यास लाभले हे काय कमी आहे ?"
     " खरंय तुमचं ! परंतु मी माझ्या ममतेला कंस समजावू ?"
     " यशोदा  ! तुझं स्थान अढळ आहे, ते कुणी हिराहून घेऊ
शकत नाही. आणि काना तुला भेटायला येणार आहे."
     " खरं सांगताय ?"
     " अगदी खरं ! "
     " म्हणजे माझा काना मला नाही विसरला तर !"
     " कसा विसरेल तू त्याच्यावर मायाच तशी केली आहेस."
असे म्हणून नंदराय तिला आपल्या कवेत घेतात.




                  कुंती

    वर्षामगून वर्षे मागे पडत चालली. मुलं मोठी होऊ लागली.
अरण्यात निर्भयपणे फिरू लागली. कुठंही जा त्याना आता
शतश्रृंग पर्वत ही कमी पडू लागला. आणि खरं सांगायचं तर
माणसाचे जीवन आजूबाजूच्या परिस्थिती वर अवलंबून असते.जसा ज्यांचा सहवास असेल तसं मानवी मन आकार
घेते. लहान मुलं तर अनुकरण प्रिय असतात. आमच्या व्यतिरिक्त ते अरण्य त्याना जे शिकवील तेच त्यांचे संस्कार होते. ते त्या नैसर्गिक संस्कारांत मोठे होऊ लागले. आता ते
दहा बारा वर्षाचे झाले होते.
     अरण्यातल्या नद्या त्यांना जीवन हे सतत वाहण्यासाठी
असते हे शिकवू लागल्या. उंच उंच कडे त्यांना शिकवू लागले
की तुम्ही सुध्दा आमच्या सारखे  उंच व्हा !  पक्ष्यांच्या उंच
भराऱ्या त्यांच्या धाडसाला आव्हान करू लागल्या. एकंदरीत
आमचे जीवन आनंदात जाऊ लागले होते. तो शतश्रृंग पर्वत
सोडावा असं आम्हाला वाटेना. जिथं मनुष्य वस्ती करतो त्या
ठिकानाशी त्याची श्रध्दा निगडित होते. त्या जागे बद्दल त्याला एक आगळीक जवळीक वाटू लागते. आमचं ही तसंच
झालं.  शतश्रृंग पर्वत आता आमचं कायमचं निवासस्थान झालं होतं. त्यामुळे त्याला सोडून दुसरीकडे कुठे जावे असे
अजिबात आम्हाला वाटत नव्हते.
      एके दिवशी मात्र मनाला थरकाप निर्माण करणारी घटना
घडली. झाले असे की सकाळची वेळ होती नि माद्री पाणी
आणायला सरोवरावर गेली होती. थोड्या वेळानंतर  महाराजही नेहमी प्रमाणे कंदमुळे आणि फळे आणायला
अरण्यात गेले होते. मुलं बाहेर खेळायला गेली हाती. परंतु
भीम सर्वांच्या आधी घरी परतला. मी त्याला विचारले ," तू
का आलास रे घरी ? खेळात मन रमलं नाही का तुझं ?"
    भीम उत्तरला ," नाही आई !"
    " का रे ?"
    " मला फार भूक लागली आहे, आधी खायला दे काहीतरी ! "
    " अरे पण तुझे बाबा अजून वनातून आले नाही कंदमुळे
घेऊन."
    " ते मला काही माहीत नाही. मला आधी खायला दे."
    " काल आणलेली फळे काही शिल्लक आहेत. ती देऊ ?"
    " मला कशी माहीत नाही फळे शिल्लक होती ती ?"
    " मी लपवून ठेवली होती. "
    " का बरं ?"
    "  तुझ्यासाठी ! तू असा येतोस ना मध्ये च मागायला."
    " हो का ? मग दे लवकर." कुंती ने त्याला फळे काढून दिली. तेवढ्यात च माद्री मोठ्या ने ओरडतच आली. पण
तिच्या काळीज फोडणाऱ्या टाहोनं आणि हृदयविदारक मर्मभेदी हंबरड्यानं मी घाबरून पर्णकुटीबाहेर आले. तिच्या
हातात पाण्याचा घडा नव्हता. आपली छाती पिटीत आणि
झिंज्जा उपटीत ती कशीतरी वेड्यासारखी ' ताई s ताई '
असा हंबरडा फोडत वाऱ्याच्या वेगाने धावतच येत होती.
अंगावरच्या वस्त्राचंही तिला भान नव्हतं. तिच्यापुढे त्यावेळी
कुणी जरी आडवे आले असते तर ती त्याच्यावर धाडकन
आदळून खाली कोसळली असती. नेमके काय घडले ते मला
कळेना भीतीची एक सणसणीत शिरशिरी माझ्या सर्वांगातून
चमकून गेली. म्हणजे काय झाले होते तिला ? तिच्या हातात
पाण्याचा घडा नाही. अर्थात तो फुटला असावा. परंतु त्यासाठी एवढं कशाला घाबरायला हवं ? कदाचित मी रागवेन असं वाटलं असेल का तिला ? हो नक्की हेच वाटलं असणार ! पण घडाच फुटला ना ? त्यात काय घाबरायचं ?
फुटला तर फुटला त्यात काय विशेष ! नाही का ? माणसा पेक्षा वस्तू प्रिय असते का ? हे कसं कळत नाहीये माद्रीला!
आता आपणच तिची समजूत काढू ! कसं ? असा माझ्या
मनात विचार सुरू होता इतक्यात माद्री माझ्या जवळ येताच ती माझ्या अंगावर कोसळली.
      ती नुसती ' ताई s s ताई ' असा हंबरडा फोडत होती. हनुवटी वर करून मी तिला विचारलं ,' माद्री का रडतेस तू ? घडा फुटला ना, फुटू दे की ! त्यात काय घाबरायचं असतं ? मी तिला धीर देत म्हटलं." त्यावर ती उद्गारली ," नाही ताई, मातीचा घडा नाही आपलं नशीब फुटलं ! " हे वक्तव्य ऐकून माझ्या मनात एका अनामिक भीतीने धास्ती घेतली. पण तरी ही मनावर आलेले धडपण दूर करत म्हटलं," माद्री काय घडलं ते आता नीट सांगणार आहेस का ?"
     " ताई गं .. महाराज......' म्हणत तिनं मला छातीशी घट्ट
धरलं. कितीतरी आर्तता होती तिच्या मिठीत ! तिचं हृदय भीतीनं थडथड उडत होतं. मी जोराने किंचाळत म्हटलं की,
काय झालं महाराजांना ? बोल माद्री ,महाराज कुठं आहेत ?"
     " सरोवराच्या काठी !"
       ते शब्द ऐकताच कानांत वारं  भरलेल्या वासरासारखी
माझी स्थिती झाली. माद्रीला दूर लोटून मी सरोवराकडे धावू
लागले. माद्री माझ्या मागून धावू लागली. सरोवराच्या काठी
येताच मी त्यांना पाहिलं नि माझ्या पाया खालची जमीनच सरकल्याचा भास झाला जणू ! माझा प्राणेश्वर निपचित लाकड्याच्या ओंडक्यासारखा पडला होता तेथे. त्यांचे शरीर सुर्यदेवाच्या उष्ण किरणांनी तापून काळे ठिक्कर पडले होते.
मला वाटलं ते मूर्च्छित असतील म्हणून मी त्याना हलविण्यासाठी त्यांच्या अंगाला स्पर्श केला. तेव्हा मला जाणवलं की त्यांचे शरीर थंडगार होतं. मी चट्कन उभी
राहून माद्रीला विचारले की, माद्री हे असे कसे घडले ?"
     तोंड फिरवून ती घोगऱ्या आवाजात बोलू लागली ,' ताई,
माझा काहीच दोष नाही. मी घड्यात पाणी भरून सरोवरातून
बाहेर पडले. तेव्हा महाराज सरोवराच्या काठीच उभे होते.
वाऱ्यांन माझा पदर उडत होता,परंतु डोक्यावरच्या घड्यामुळे
मला तो नीट आवरता येईना ! मी सरोवराच्या बाहेर आले.
महाराज एकटक माझ्या कडे पाहत होते. आज त्यांच्या
नजरेत नेहमीचे भाव नव्हते. ते माझ्याकडे येऊ लागले.
मी देखील भावनावश झाली नि त्यांच्या मिठीत गेली. माझ्यावर त्यांनी चुंबनाचा वर्षाव केला. परंतु मी लगेच भानावर आली नि त्यांच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागली. परंतु महाराज मला काही सोडीतच नव्हते. शेवटी जे व्हायला नको होते तेच झालं. विषारी नागिणीला ढकलावं तसं त्यांनी मला दूर लोटलं ! पण - पण क्षणात त्यांची चर्या बदलू लागली. ते डोळे परतू लागले. उभ्याउभ्यानंच ते धाडकन खाली कोसळले. जिवाच्या आकांताने ते आपले हातपाय झाडू लागले होते  आणि
' माद्री, माद्री ' म्हणत तळमळू लागले. मी भीतीनं गारठून गेली नि तुझ्याकडे धाव घेतली.
     माझ्या तळपायाची आग मस्तकाला भिडली. मी रागासरशी माद्री च्या खाडकन मुस्कटात चपराक लावून दिली. आणि मला त्या ऋषी चे शब्द आठवले ," राजा ,तू एका प्रियकराला प्रेयसीपासून दूर खेचले आहेस , जेव्हा भविष्यात तू आपल्या स्त्रीला असाच कवेत घेशील तेव्हा तू
देखील असाच माझ्यासारखाच तडफडून तडफडून मरशील !" माझा जीवनसाथी मला सोडून अंनताच्या प्रवाशाला निघून गेला होता. केवळ  एकाच क्षणात दुबळ्या मनाचा भोगी ठरला. कामवासना ! कामवासना म्हणजे माणसाचा पाय केव्हाही घसरेल अशी बर्फाची फसवी दरी ! त्यातून कुणीही वाचत नाही. मग तो कुणी असो. शेवटी महाराजांची भीती खरी ठरली. मी महाराजांना दिलेलं वचन खोटं ठरलं. परंतु त्यात माझा काय दोष ? म्हणजे मी तर मर्यादेचे उल्लंघन केले नव्हते . पण कुणाच्या हातून का होईना पण उल्लंघन घडलं ना  ! त्यानंतर अरण्यातच त्यांची चिता रचली नि त्यांच्या चितेला अग्नि दिला. खरे तर मी त्यांच्या सोबतच सती जाणार  होती परंतु माद्री ने माझे पाय मागे खेचले. ती मला म्हणाली ," ताई, मला सती जाऊ दे." तेव्हा मी तिला  म्हटलं  ," मी मोठी आहे, अर्थात तो माझा अधिकार आहे, माझा अधिकार तू कशी काय घेऊ लागलीस ?"  त्यावर माद्री म्हणाली ," ताई , तू मोठी आहेस तसेच तुझे हृदय ही विशाल आहे, तू माझ्या मुलांवर स्वतःच्या मुला एवढीच किमान जास्त करत आहेस नि करत राहशील ही परंतु माझं हृदय एवढं विशाल निश्चतच नाही. त्यामुळे मी तुझ्या मुलांवर तेवढी माया मी  करू शकणार नाही. अर्थात आपल्या मुलांसाठी तरी आपला हा निर्णय बदल. आणि महाराजा सोबत मला जाऊ दे. " शेवटी नाईलाजाने माद्रीला तो अधिकार द्यावा लागला.

      क्रमशः



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..