Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

महाभात - २० | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी, दिवाळी संग्रह | महेंद्रनाथ प्रभु.

महाभात - २०
महाभात - २०

 

                                    २०

      सकाळ झाली तरी श्रीकृष्ण अजून उठला नव्हता.
आणि यशोदे ने सुध्दा त्याला उठले नाही. ती एकटक त्याच्या
चेहऱ्याकडे पाहत असते. किती शांत मुद्रा दिसत होती त्यावेळी त्याची. आज तिचा लाल तिला सोडून मथुरेला जाणार होता. हा विचारच मुळात तिला सहन होत नव्हता.
परंतु त्याचे मथुरेला जाणे ही तितकेच गरजेचे हॊते. कारण
महाराज कंसचा तसा आदेश होता. आणि कंस चा आदेश डावलने नंद गावाच्या लोकांच्या हिताचे ठरले नसते. तो राजद्रोह ठरला असता. त्याची महाभयंकर शिक्षा साऱ्या नंद गावच्या लोकांना भोगायला लागली असती , म्हणून आपल्या हृदयावर दगड ठेवून श्रीकृष्णाला मथुरेला पाठविण्याचा  निर्णय घेण्यात आला होता. अर्थात हा निर्णय घेणे यशोदा आणि नंद गावातील लोकांसाठी कठीण होता म्हणा.
     परंतु श्रीकृष्ण  आणि बलराम ह्या दोघांना ठाऊक होतं की
  आता आपल्याला जन कल्याणार्थ मथुरेला जाणे अतिआवश्यक आहे, म्हणून श्रीकृष्णा ने आपल्या आई जवळ हट्ट धरला की मला मथुरा बघायला जायचंच आहे.
अन्यता ती त्याला तेथे पाठवायला तयार झालीच नसती.
परंतु म्हणतात ना बाळहट्ट , स्रीहट्ट, आणि राजहट्ट हे तीन
हट्ट असे आहेत. की त्यापुढे कुणाचेही काही चालत नाही ते
अगदी खरंय. आता हेच बघा ना, राज हट्ट म्हणजे महाराज
कंस ने सांगितले की श्रीकृष्णाला इथं हजर करा. आणि तिकडे श्रीकृष्णाने हट्ट धरला मला मथुरेला जायचंच आहे.
बाळ हट्टा पुढे आईला सुध्दा माघार घ्यावी लागली. असो.
     अक्रूर आणि बलराम त्याला सोबत घेण्यासाठी तेथे येतात. परंतु त्याला अजून झोपलेला पाहून बलराम म्हणाला,
     " आई, उठव त्याला." यशोदा उद्गारली ," त्याला झोपू दे रे
बलराम . बघ किती शांतपणे झोपला आहे तो."
     " आई , त्याला झोपून चालणार नाही. खूप दूर जायचं आहे." तेवढ्यात श्रीकृष्ण चाळवला नि डोळे उघडून आपल्या आईकडे पाहिले .नंतर बलराम कडे पाहिले नि पट्कन उठून बसत म्हणाला , " अरे , दादा मला उठवायचं  नाही का ?" बलराम उद्गारला ," उठवायलाच आलोय तुला."
    " चल , आज मीच तुला स्नान घालतेय." तसा बलराम हसून म्हणाला ," आई ,  तू आता त्याला स्नान घालायला तो आता लहान आहे का ? " त्यावर यशोदा उद्गारली ," मुलगा कितीही मोठा झाला तरी आईसाठी तो लहानच असतो रे बलराम !"
     यशोदा श्रीकृष्णाला घेऊन जाते नि त्याला स्नान घालून
वस्त्रे नेसवून तयार करते. त्यानंतर त्याला दूध भात भरवते.
कारण पुन्हा भरवायला भेटेल न भेटेल असा विचार करून
प्रत्येक जण अगदी प्रेमाने एक एक घास भरवितात. श्रीकृष्ण
सर्वांच्या हातातून खाऊन सर्वांची इच्छा पूर्ण करतो. त्यानंतर
रथात स्वार होतात. रथ निघाला तशी नंद गावचे सर्व रहिवाशी
त्याला सोडायला नंद गावच्या वेशी पर्यंत येतात. सर्वांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची दुखत वेदना जाणवत असते नि डोळ्यात अश्रू ही उभे असतात. पुढे गेल्यावर राधा त्यांच्या
रथाच्या पुढे  उभी असलेली दिसली. तसा श्रीकृष्ण
सारथ्याला रथ थांबवायला सांगितले. तेव्हा अक्रूर विचारले,
    " ही कोण म्हणायची ? " तेव्हा श्रीकृष्ण उद्गारला ," ही राधा आहे, माझी सखी ! सर्वजण माझ्याकडे येतात ; परंतु मी मात्र हिच्याकडे जातो." असे म्हणून तो रथातून खाली उतरून राधा जवळ गेला. तशी राधा त्याला ओवाळते. तेव्हा तिला श्रीकृष्णाने  विचारले  की , काही बोलणार नाहीस का ?"  त्यावर राधा उत्तरली ," तुला बोलण्या सारखे माझ्या जवळ काहीच नाही. कारण मला जे.बोलावयाचे आहे ,ते तुला माहीत आहे, आणि तुला बोलायचे आहे, ते मला माहित आहे, अर्थात तू जण कल्याण हेतू निघाला आहेस त्यासाठी शुभेच्छा एवढं च मी तुला देऊ शकते." त्यावर श्रीकृष्ण उद्गारला ," परंतु तुला मी माझी ही मुरली देऊ शकतो."
     " ती तुझ्याकडेच राहू दे, माझी अमानत म्हणून."
     " ही मुरली फक्त तुझेच सूर गाईल. शिवाय आपल्या दोघात काही भेद नाही. जिथं तू तिथं मी ! आणि जिथं मी तिथं तू ! चल येऊ ?"  राधा उद्गारली ," हो ,आनंदाने !" असे म्हणून रथा समोरून बाजूला सरकली. तसा श्रीकृष्णाचा रथ पुढे निघाला तशी यशोदा राधा जवळ आली. तेव्हा दोघीनाही आपला हुंदका आवरता आला नाही.  एकमेकांच्या गळ्यात पडून दोघीहीं हमसून हमसून रडू लागल्या.
     श्रीकृष्णाच्या रथाच्या पाठोपाठ त्यांच्या सवंगड्या चा रथ
सुध्दा मथुरेला निघाला आहे,मथुरा पाहायला. आणि थोड्याच
वेळात ते सर्वजण मथुरेला पोहोचले. अक्रूर त्याना आपल्या निवासस्थानी थांबहून स्वतः महाराज कंस ला खबर द्यायला निघाला तेव्हा श्रीकृष्णाला उद्गारला ," मी महाराज कंस ला तू आल्याचे सांगायला जातो तोपर्यंत तुम्ही दोघेही इथंच थांबा." तेव्हा श्रीकृष्णाने अक्रूरला विचारले ,"  आम्ही मथुरा पाहायला  जाऊ शकतो का ?" तेव्हा अक्रूर  उद्गारला ," जा परंतु हे नंद गाव नाहीये. ही मथुरा आहे, इकडचे लोक तुला फारसे ओळखत नाहीत. तेव्हा तिकडची चपळता इथं दाखवू नकोस. आणि मला मामा म्हण."
    " तू आईचा भाऊ आहेस ?"
    " हां ! पण यशोदेचा नाही."
    " मग ?"
    " तुझी जन्मदात्री आई ,देवकीचा भाऊ मी !"
    " माझी जन्मदात्री कुणी ही असो परंतु माझी खरी आई
यशोदामाई राहील."
     " ठीक आहे, मी येऊ ?"
    " तुम्ही जाऊन या आम्ही पण फिरून येतो."
    अक्रूर महाराज कंस ला खबर द्यायला गेले नि श्रीकृष्ण ,बलराम आपल्या सवंगडीसह मथुरा फिरायला
जातात. मथुरा मधील लोक श्रीकृष्णाला पाहण्यासाठी गर्दी
करू लागले होते. ते दोघे फिरता- फिरता बाजारपेठ मध्ये आले त्यांनी एका कमरेतून वाकलेल्या खूबड्या मुलीला पाहिले नि तिला सुंदरी म्हणून हांक मारली. एका खूबडी मुलीला सुंदरी म्हणून हाक मारणारी ही पहिली व्यक्ती होती म्हणून तिला प्रथम वाटले की हा आपली चेष्टा करतोय म्हणून ती त्याच्या कडे रागाने पाहते. परंतु श्रीकृष्णाच्या मनमोहक चेहऱ्याकडे पाहता क्षणीच तिचा राग क्षणात गायब झाला. ती त्याच्याकडे हसऱ्या चेहऱ्याने म्हणाली ," काय श्याम !"
    " तुझ्या हातात काय आहे ?" श्रीकृष्णाने तिला विचारले
खूबडी उद्गारली ," हा चंदनाचा लेप आहे, महाराज कंस साठी
घेऊन जात आहे."  श्रीकृष्ण उद्गारला ," ह्या लेप मधील थोडासा लेप मला मिळेल का ?"
    " अवश्य !" असे म्हणून तिने आपली बोटे त्या चंदन लेप
मध्ये बुडविली नि त्याच्या कपाळी लावली. तेव्हा श्रीकृष्ण
उद्गारला ," तू अशी खाली का वाकली आहेस ? नीट उठून
उभी रहा ना ? निदान तसा प्रयत्न तरी कर तुझ्या मदतीला
आम्ही दोघे आहोत की !" मग तिने उठण्याचा प्रयत्न केला
नि सरळ झाली सुध्दा ! तशी ती आनंदाने नाचू लागली.
तिला खुश पाहून श्रीकृष्ण नि बलराम तेथून निघून गेले.
नाचता - नाचता तिला अचानक श्रीकृष्णाची आठवण झाली
तशी नाचायची थांबून ती श्रीकृष्णाला शोधू लागली. आणि
श्याम ,श्याम म्हणून मोठ्या ने हाका मारू लागली. परंतु
तोपर्यंत श्रीकृष्ण, बलराम धोबिघाटावर पोहोचले होते.
महाराज कंस चे राजवस्त्र ते धोबी धुवत होते. श्रीकृष्णाने
त्याना विचारले की तुम्ही हे कुणाचे वस्त्रे धुत आहात ?
तेव्हा एक धोबी उद्गारला ," आम्ही महाराज कंसची वस्त्रे आहेत." तेव्हा श्रीकृष्ण उद्गारला ," मग आम्हां दोघांसाठी ही
वस्त्रे मिळतील का ? तेव्हा एकजण म्हणाला ," इकडे ये तुला
वस्त्रे देतो." बलराम समजला की तो धोबी काय करणार आहे,  म्हणून त्याने फक्त श्रीकृष्णालाच पुढे जाऊ दिले.
श्रीकृष्ण जसा पुढे गेला तसा त्याने त्याच्या हातात असलेली
लाठी उचलून श्रीकृष्णाच्या अंगावर टाकली ; परंतु श्रीकृष्णाच्या अंगाला ती एकदा पण स्पर्श करू शकली हे
दृश्य पाहून सर्वांनी  आपल्या तोंडात बोटे घातली. अखेर श्रीकृष्णाने त्या लाठीमार च्या डोक्यावर फक्त टपली मारली
तर तो लाठीमार सरळ जमिनीत रूतला नि तेथून पाण्याच्या
फवारा बाहेर निघाला. तसा सर्वांनी त्या दोघांना हात जोडून
नमस्कार केला. त्यानंतर ते दोघेजण फिरत फिरत एका शिव
मंदिर पाशी आले. तशी दोघांची पाऊले शिव मंदिर च्या दिशेने
वळली. त्यानंतर शिव मंदिरात प्रवेश करून त्या दोघांनी शिवलिंगाला प्रणाम केला. तेव्हा तेथे ठेवलेल्या धनुष्याकडे
पाहून श्रीकृष्ण म्हणाला ," दादा, मी ह्या धनुष्यावर प्रत्यंता
चढवू का ?"  त्यावर तेथे उपस्थित असलेले द्वारपाल हसू लागले. आणि म्हणू लागले , बालक ,ह्या धनुष्यावर प्रत्यंता
चढविणे एवढे सोपे नाहीये." लगेच दुसरा द्वारपाल उद्गारला की प्रत्यंता चढविणे तर दूरची गोष्ट आहे, तू तर त्याला उचलू
सुध्दा शकणार नाहीस ." त्यावर ते दोघे भाऊ फक्त स्मित हास्य करत श्रीकृष्ण पुढे सरसावला नि त्याने ते अवजड धनुष्य  इतक्या सहजगत्या रीतीने उचलले की जणू ते शिव
धनुष्य नसून खेळण्यातील धनुष्य आहे, त्यानंतर त्यावर
प्रत्यंता चढविताना ते खाडकन मोडले. त्याचा द्वनी सर्वत्र उमटला. ते पाहून तेथे उपस्थित असलेल्या सर्व सैनिकांनी आश्चर्याने आपल्या तोंडात बोटे घातली. द्वनिचा आवाज ऐकून कंस हादरला तो म्हणाला ," कसला हा भयंकर आवाज
आहे ?" तेवढ्यात तेथे एक संदेश दूत आला नि म्हणाला ," महाराज की जय हो !" कंस म्हणाला ," बोल ,काय वार्ता आणलीस ?"
    तेव्हा त्या संदेश दूत ने सविस्तर कथन केले. ते वक्तव्य
ऐकून कंस चांगलाच हादरला. म्हणाला ," ते धनुष्य एका बालकाने तोडले ? कसं शक्य आहे ?  ज्या धनुष्यावर प्रत्यंचा चढविताना मला  स्वत:ला त्रास होतोय. असे धनुष्य एका बालकाने तोडले याचे मला आश्चर्य वाटते." त्यावर तो संदेश दूत म्हणाला ," परंतु  ही गोष्ट सत्य आहे." त्यावर कंस ने विचारले ,"  कोण आहे तो बालक ?"
तेव्हा तो संदेश दूत बोलला," तो बालक कोण आहे , ते मला माहीत नाही. कारण मथुरा मध्ये या पूर्वी कधी त्याला पाहिले नाही." हे ऐकून त्याने संशयाने अक्रूर कडे पाहिले. कारण अक्रूर आला त्याअर्थी त्याच्या सोबत  देवकीचा आठवा पुत्र श्रीकृष्ण आला असावा. आणि तो बालक श्रीकृष्णा व्यतिरिक्त दुसरा कोणी नसावा. असा प्रार्थमिक त्याने अंदाज
लावला असावा म्हणूनच की काय त्याने अक्रूर कडे संशयाने पाहिले. परंतु अक्रूरच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य त्याला जाणीव करून देत होते की आपला संशय अकारण नाहीये.
कारण अक्रूर ने खरोखरच श्रीकृष्णाला घेऊन आल्याची खबर द्यायला आला होता. परंतु कंस च्या  चेहऱ्यावर प्रथमच भययुक्त चिन्ह उमटले होते . आणि त्याने ते स्वतः कबूल ही केले. कारण महाराज कंस अक्रूर ला स्वतःच म्हणाला की , जीवनात आज प्रथम च मला भय वाटू लागले आहे. " परंतु त्यावर कुणीच काही बोलला नाही. मात्र कंस म्हणाला की मला एकांत पाहिजे. तसे सर्वजण तेथून निघून जातात.

     दुसऱ्या दिवशी कुस्तांच्या स्पर्धा भरविल्या होत्या. तेथे कंस स्वतः हजर झाला. कंस ने अगोदरच माऊथला सांगून ठेवले होते की श्रीकृष्ण स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचेल तेव्हा
त्याच्या अंगावर पिसाळलेला हत्ती सोडणे. अगदी तसेच त्या
माउताने ने केले. परंतु घोर आश्चर्य घडले. त्या हत्ती ने श्रीकृष्णाला पाहताच खवळलेला हत्ती एकदम शांत तर झालाच उलट त्याने श्रीकृष्णाला प्रणाम केला. ही वार्ता
कंस ला जशी कळली तसा त्याचा जोश एकदम थंड पडला.
आता फक्त त्याची मदार फक्त कुस्तीगीरांवर होती. कारण
ते एक एक पैलवान पिळदार दंडांचा तर होताच परंतु त्यांचे
शरीर पण धिप्पाडा सारखे दिसायला होते. कंस त्या दोघांची
आतुरतेने वाट पाहत होता.परंतु  पैलवान ला त्याने अगोदरच सांगून ठेवले होते  की ह्या कुस्ती मध्ये श्रीकृष्णाला फक्त पराजित करायचे नसून तर त्याला ठार सुद्धा मारावयाचे आहे. सर्वकाही तयारी झाली होती. आता फक्त अक्रूर येण्याची कंस आतुरतेने वाट पाहत होता.तेवढ्यात अक्रूर ही
आला.

      श्रीकृष्ण बलराम या दोघांनी आंत प्रवेश करताच  त्या दोघांनी कंस ला प्रणाम करत म्हटले की, नमस्कार मामा !"
कंस ने हात उचलून त्या दोघांचा स्वागत केल्याचे नाटक केले. त्यानंतर स्पर्धेला आरंभ करण्याचा आदेश महाराज कंस ने स्वतःच दिला होता. त्या दोघांकडे पाहत बोलला, आज मृत्यू लिला होईल. त्यावर श्रीकृष्ण उद्गारला ," ज्याची  जशी इच्छा तशी ती पूर्ण करण्यात येईल . कुस्तीला सुरुवात झाली. अगोदर दोन पैलवानांना दोन पैलवाना ने पराजित केले. तेव्हा श्रीकृष्ण आणि बलराम  त्या दोन विजयी पैलवान
यांच्याशी भिडले. आणि काही क्षणात च त्या दोघांनी त्या दोन्ही पैलवानाना पराजित केले. एक एक करता सर्व पैलवान
पराजित झाले. शेवटी  ते दोघेही कंस ला भेटायला त्याच्या
जवळ जातात तर त्याला आपल्या मिठीत घेऊन पूर्ण ताकदीने त्याला यमसदनास पाठवायचे असा त्याच्या मनात विचार होता. परंतु त्याचा मनातील हा विचार श्रीकृष्णाने  लगेच ओळखला होता. परंतु चेहऱ्यावर कोणतेही भाव न दाखविता त्याच्या समोर जाताच कंस ने त्याला आपल्या मिठीत घेण्याचा प्रयत्न केला. परंतु श्रीकृष्ण त्याच्या कवेत आलाच नाही. अर्थात अदृष्य झाला. नि त्याच्या दुसऱ्या बाजूला उभा असलेला दिसू लागला. पुन्हा मिठीत घेण्याचा प्रयत्न केला तर गायब झाला नि त्याला पाठीमागे प्रगट झाला. अशी बराच वेळ लपा-छुपीचा खेळ खेळल्यानंतर शेवटी कंसला उचलून वर आकाशात भिरकावून दिला. कंस वरचेवर गोल गोल फिरून जमिनीवर धाडकन आदळला. तो
इतक्या जोरात आपटला होता की बस्स   त्याला उठता ही येत नव्हते. त्याला आता श्रीकृष्णाच्या जागी चक्रधारी विष्णू दिसू लागला . तसे त्याने श्रीकृष्णाला दोन्ही हात जोडले नि शेवटचा श्वास सोडला. आणि त्याचा प्राण अनंतात विलीन होतोय. अर्थात देवाच्या हातून त्याला मोक्षप्राप्ती झाली म्हणा. परंतु मथुरा वाशियानी श्रीकृष्णाचा  जयजयकार केला.

   त्यानंतर श्रीकृष्ण आणि बलराम दोघेही आपल्या आई-वडिलांना भेटायला कारागृहात जातात. तेव्हा दूत येऊन खबर देतो की कंसचा सासरा जरासंध आपल्या जावयाच्या वधाचा सूड घेण्यासाठी मथुरेवर चाल करून येत आहे. हे ऐकताच बलराम श्रीकृष्णाला म्हणाला ," त्याचा समाचार मी घेतो. तोपर्यंत तू आई-बाबांची सुटका कर." असे म्हणून बलराम त्या सौनिका सोबत निघून गेला. तेव्हा श्रीकृष्ण उद्गारला ,
     " आई -,बाबांना जेथे बंद करून ठेवले आहे तेथे मला घेऊन चला." तसे ते सैनिक श्रीकृष्ण घेऊन कारागृहात गेले.
दरवाजा उघडून  श्रीकृष्ण आंत प्रवेश केला. तसे देवकी ने
विचारले ," कोण आहेस तू बाळा ? आणि इथं का आला आहेस ?" त्यावर श्रीकृष्ण उद्गारला ," मी कोण आहे तो ओळखा पाहू !" परंतु ते दोघेही त्याच्या कडे नुसते पाहत
राहतात नि त्याला ओळखण्याचा प्रयत्न करतात. परंतु ओळख पटत नाही. शेवटी श्रीकृष्ण आपली ओळख सांगत
बोलला ," मी नंदराय नंदन आणि यशोदेचा काना ! आणि आपल्या दोघांचा आठवा पुत्र !" असे म्हणताच त्याची ओळख पटली. तशी देवकी धावत येऊन श्रीकृष्णाला मिठी मारत म्हणाली ," माझ्या बाळा तुला पाहण्यासाठी माझे डोळे किती आतुरले होते; परंतु तू इथं का आलास ?"  तेव्हा श्रीकृष्ण उद्गारला ," मी इथं येण्यासाठीच तर जन्म घेतला होता आई !" तेवढ्यात वसुदेव उद्गारले ,
      " परंतु जर महाराज कंस ला हे कळलं तर मोठा अनर्थ
होईल."  तेव्हा अक्रूर हसून म्हणाला ," आता त्याला कळणार पण नाही आणि कळलं तरी तो काय करूही शकणार नाही . तेव्हा त्याची चिंता आता सोड." तेव्हा न समजून वासुदेव ने विचारले ," मला कळले नाही तुला काय म्हणावयाचे आहे ते ?"  तेव्हा अक्रूर उद्गारला, " कंस चा आपल्या कानाने वध
केला आणि आता  आपली या कारागृहातून सुटका करण्यासाठी तो इथं आला आहे." तेव्हा वसुदेव एकदम खुश होत म्हणाले की असं असेल तर प्रथम महाराज उग्रसेनची कारागृहातून  सुटका कर कारण पहिला अधिकार त्यांचा आहे." त्यावर श्रीकृष्ण म्हणाला ," जशी आपली आज्ञा !" असे म्हणून अक्रूर सोबत महाराज  उग्रसेंन ज्या कोठडीत  कैद असतात. त्या कैद खाण्याचा दरवाजा उघडला गेला नि श्रीकृष्ण ने आंत प्रवेश केला. तेव्हा महाराज उग्रसेंन ने श्रीकृष्णाला विचारले ," बाळा कोण आहेस तू ?"
    " मी नंदरायचा नंदन आणि यशोदेचा काना ! तुमची कैद खान्यातून सुटका करण्यासाठी इथं आलोय." तेव्हा उग्रसेंन महाराज ओळखतात की हा देवकीचा आठवा पुत्र  श्रीकृष्ण आहे." तेव्हा ते म्हणाले ,"  तू आधी आपल्या आई-वडिलांची
कैद खान्यातून सुटका केलेस का ?" त्यावर श्रीकृष्ण उद्गारला,
    " त्यांच्या आदेशानुसार मी आपली अगोदर सुटका करायला आलोय. असे म्हणून सैनिकांना त्यांच्या हातातील
बेड्या काढण्याचा आदेश देतो. तेव्हा सैनिक पुढे होऊन
महाराज उग्रसेंन च्या हातातील बेड्या काढतात. तेव्हा श्रीकृष्ण उद्गारला ," महाराज आता आपण स्वतंत्र आहात."
      तेव्हा उग्रसेन उद्गारले ,"  मला महाराज म्हणू नकोस. मी
आता  राजा नाही. माझ्या मुलानेच माझ्या डोक्यावरील राजमुकुट उतरविला होता. परंतु कंसचा वध जर तू केलास आहेस तर ह्या राजमुकुट वर आता  तुझा अधिकार आहे."
      " नाही महाराज मी फक्त माझ्या जन्मभूमीची सेवा केली
आहे, आणि माझा मुकुट तर हा मयूर पंख आहे, तो राजमुकुट आपल्याच डोक्यावर शोभून दिसेल. शिवाय माझं
इथले कार्य संपले आहे."
     " नाही. वत्स एक क्षत्रिय दाना मध्ये मिळालेले राज्य सुध्दा
स्वीकारू शकत नाही. ते जरी तू दिले असतेस  तरीही ! जर तू हा राजमुकुट आपल्या डोक्यात घालू उच्छित नसशील तर तुझ्या वडिलांनी तो घालायला पाहिजे."
     " त्यांच्या इच्छेनुसारच मी प्रथम आपल्या हातातील
बेड्या काढायला आलोय." तेव्हा महाराज उग्रसेन अक्रूर ला उद्देशून उद्गारले की तुम्ही लोक ह्याला  सांगत का नाहीयेत.  की मी निर्बल ,अशक्त राजा मथुरेची रक्षा नाही करू शकत." तेव्हा अक्रूर उद्गारले की,ज्याने अत्याचारी कंस पासून आमची मुक्तता केली आहे , त्याची प्रत्येक इच्छा आमच्यासाठी आदेश आहे महाराज." तेव्हा महाराज उग्रसेंन म्हणाले ," मला देवकी आणि वसुदेव जवळ घेऊन चला." तसे सगळेजण देवकी ,वसुदेव कैद असतात तेथे येतात. तेव्हा उग्रसेंन देवकी
नि वसुदेव याना उद्देशून म्हणाले ," आता तुम्हीच आपल्या कानाला समजावा की, जे राज्य मी हरलोय ते राज जिंकल्या
शिवाय कसे काय स्वीकारू शकतो." तेव्हा श्रीकृष्ण उद्गारला,
    " महाराज ,आपल्याला असं वाटत नाही का की माझ्या
आई -वडिलांच्या हातातले बेड्या काढले जाऊ नये. कारण
आपल्या आदेशा शिवाय तर हे कदापि शक्य नाहीये."
   तेव्हा देवकी आपल्या वडिलांना म्हणाली ," महाराज  माझ्या हातातले बेड्या काढायला लवकर सांगा. कारण
मी अजून माझ्या कानाला नीट पाहिले देखील नाही."
    जेव्हा उग्रसेंन महाराज चा अगदीच नाईलाज होतो. तेव्हा
ते म्हणाले ," ठीक आहे, तुम्हां सर्व लोकांची जर हीच इच्छा आहे तर मी स्वतःच तुमच्या हातातले बेड्या काढतो." असे म्हणून त्यांनी त्या दोघांच्या हातातले बेड्या काढून टाकले.
हातातले बेड्या काढताच देवकी कानाला मिठी मारते नि
त्याच्यावर चुंबनांचा वर्षाव करते. तेव्हा उग्रसेंन महाराज बोलले ," बोला देवकी पुत्र श्रीकृष्ण की जय ! तसे सर्व मथुरा
वाशी देवकी पुत्र श्रीकृष्ण की जय बोलू लागले.

     त्यानंतर राजदरबार भरविला गेला नि महाराज उग्रसेंन च्या डोक्यावर राजमुकुट ठेवण्यात आला. मथुरा नरेश महाराज उग्रसेंन ची जय असे श्रीकृष्ण बोलला.

क्रमशः
 

टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..