महाभारत -१८ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी, दिवाळी संग्रह | महेंद्रनाथ प्रभु.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाभारत -१८ |
१८
श्रीकृष्ण उद्गारला ," भरपूर दिवस झाले या धर्तीवर
येऊन परंतु राधा आपल्याला फार विसरूनच गेली. मुरली
वाजवून तिला जरा आठवण करून द्यावी. " असे म्हणून
मुरली वाजवायला सुरुवात केली.
राधाची आई , राधाचे केस विंचरत होती. एवढ्या त
श्रीकृष्णाच्या मुरलीचा सुमधुर आवाज तिच्या कानी पडला.
तशी ती आवाजाच्या दिशेने ती चालू लागली. तसे तिच्या आई ने तिला पकडत म्हटलं ," अगं राधा थांब. कुठं निघालीस ?"
" कुठं म्हणजे ? तो काय मला बोलवतोय ?'
" कोण बोलवतोय तुला ?"
" मुरली वाला तुला कशाला बोलविल ?"
" तो काय मुरली वाजवून मला बोलवतोय."
" अगं कुणी कुणी गुराखी असेल, मुरली वाजवून आपल्या गाईना बोलवीत आहे.'
" नाही गं आई ,तो मलाच बोलवतोय."
" कशावरून सांगतेस ?"
" तो काय राधा राधा अशी धून मुरलीच्या आवाजा ने काढतोय." अशी बोलून ती जाऊ लागते. तशी तिची आई
तिला घट्ट पकडत बोलली ," अगं वेडी का खुळी तू ? असं
कुणी पण बोलविलं म्हणून जायचं असतं का ? ओळख ना पाळक ? उगाच जायचं कुठंही !"
" अगं आई, आमची फार जुनी ओळख आहे, फक्त याच
जन्माची नाही तर अनेक जन्माची ओळख आहे आमची !"
" अशी काय वेड्यावाणी बोलतेस तू आज !"
" अगं त्या मुरलीधर मनोहरनेच मला वेड लाविले."
असे म्हणून ती त्या आवाजा च्या दिशेने चालू लागते तोच मुरलीचा आवाज बंद होतो.
यशोदा आणि नंदराय एकमेकांशी कोणत्या तरी विषयावर
बोलत असतात. तेवढ्यात त्यांच्या च गावचा एक माणूस त्याना येऊन सांगतो की बरसाने गावचा विश्वभान आपल्याला भेटायला आलाय आणि त्याच्या सोबत पंचायत
चे लोक सुध्दा आहे." तेव्हा नंदराय उत्तरले ," बरं बरं सन्मान
पूर्वक घेऊन ये त्याना. " निरोप देणारा जसा निघून जातो तशी
यशोदा नंदराय ला विचारले ," पंचायतची माणसं कशासाठी
येताहेत आपल्याकडे ?" नंदराय उत्तरला ," अंग मागच्या वर्षी
नाही का आपण त्यांच्या गावांवर आक्रमण केलं होतं आणि
भांग पण प्यालो होतो आम्ही ! आता होळी आली आहे ना,
या वर्षी त्यांच्या गावाची आहे पाळी आमच्या गावांवर आक्रमण करण्याची ! अर्थात त्याच्या बंदोबस्त करण्यासाठी
आले असतील ते . त्या सर्वांसाठी ताक आणि लोणीची व्यवस्था कर." असे म्हणताच यशोदा उठून आंत गेली.
तेवढ्यात विश्वभान आणि त्यांच्या सोबत पंचायत चे लोक
सुध्दा होते. नंदराय ने त्या सर्वांचे आदरपूर्वक स्वागत करून
सर्वांना बसून घेण्याची विनंती केली. सर्वजण बसून घेतात.
तेवढ्यात यशोदा सर्वांसाठी ताक आणि लोणी घेऊन येते.
तेव्हा विश्वभान खुश होत बोलला ," वहिनी याची काय आवश्यकता होती ?" त्यावर यशोदा हसून म्हणाली,
" आवश्यकता कशी नाही, एवढ्या दुरून आलेत तुम्ही !
चालून - चालून थकला असाल. थोडेसे ताक प्यालेत तर बरं
वाटेल." असे म्हणत असतानाच तिची नजर राधा वर पडली
तशी ती खुश होत बोलली ," राधा बेटी पण आली आहे सोबत." तेव्हा विश्वभान उद्गारले ," हां इकडे येण्याचा हट्ट करून बसली. म्हणून तिला सोबत घेऊन आलो."
" चांगले केलेत तिला आलेत ते. परंतु मोठ्या माणसाच्या
मध्ये छोट्यांचे काय काम ? म्हणून राधा बेटी आंत चल."
" यशोदा, तिला श्रीकृष्णा कडे घेऊन जा नि श्रीकृष्णाला सांग की तिची आपल्या मित्रांशी ओळख करून द्यायला." नंदराय उद्गारले. यशोदा उद्गारली ," चल राधा कान्हा आंत
बसला आहे. " असे म्हणून यशोदा तिचा हात पकडते नि
तिला श्रीकृष्णा जवळ घेऊन जाते. काना ही बघ विश्वभान की मुलगी ! हीला आपले गोकुळ पहायचे आहे."
" चल राधा !"
" अरे रे थांब. लगेच कुठं घेऊन चललास ? ती बरसाने
गावावरून आली आहे, तिला तहान लागली असेल. तिला
अगोदर थोडे दूध आणून दे. ते तिला पिऊ दे. मग तिला फिरायला घेऊन जा." असे म्हणून यशोदा आंत निघून गेली.
राधा नि श्रीकृष्ण फक्त एकमेकांकडे पाहत राहतात. मुखाने
बोलत काहीच नाहीत. जणू भरपुर दिवसांनी एकमेकांना
भेटल्याबद्दल मंत्रमुग्ध होऊन पाहत आहेत. तेवढ्यात यशोदा
दूध घेऊन आली नि राधाला पाजिले. दूध पिल्यानंतर श्रीकृष्ण राधाला घेऊन यमुना काठावर घेऊन जातो. आणि तिला नदी विषयी सांगताना म्हणाला ," राधा ही बघ यमुना नदी ! आमच्या गावातून वाहते." तशी राधा उत्तरली ," ही नदी आमच्या गावातून ही वाहते." आणि लगेच दोघेही तरुण रूप धारण करतात.
" राधा अजून आपल्या भेटीची वेळ आलेली नव्हती. मग
इतक्यात कशी आलीस तू ?"
" आपण त्या दिवशी मुरली वाजवून मला आठवण करून दिलीत म्हणून मी बाबांच्या मनात एक नवीन संकल्प टाकून इथंवर यायला लावले. कारण मला आपला विरह सहन होत नव्हता."
" पुढं ही आपल्याला खूप विरह सहन करायचा आहे."
" ठाऊक आहे ते मला. सुदाम्याने आपल्याला दिलेला
शाप पूर्ण करायला लागणारच ना ?"
" हो भक्तांच्या इच्छा पूर्ण करणं हेच आपले परम कर्तव्य ! ते बघ नारदमुनी आपल्या बाल रूपाचे दर्शन घेण्यासाठी इकडे येत आहेत. आपल्याला बालरुप धारण
करायला हवे." असे म्हणता क्षणीच दोघेही पुन्हा बाल अवस्थेत आलेत. तेवढ्यात तेथे नारदमुनी प्रगट झाले नि
उद्गारले ," मी आपल्या दोघांच्या दर्शनासाठी एकटाच अभिलाशी नसून , इंद्र,किन्नर, गंधर्व , तसेच देवांचे देव महादेव
ब्रम्हांजी सुध्दा आपल्या दर्शनाचे अभिलाशी आहेत." तेव्हा
श्रीकृष्ण उद्गारले ," ही तर त्यांची महानता आहे की ते एका
सेवकाला एवढं महत्व देत आहेत." तेव्हा नारदमुनी उद्गारले,
" हे तर आपल्याला च माहीत की कोण सेवक आणि कोण मालक ? आपली लीला आपल्यालाच ठाऊक.!"
त्यावर फक्त त्या दोघांनी स्मित हास्य केले.
एक फळवाली वृध्द स्त्री आपल्या फळांची टोपली
डोक्यावर घेऊन सारा गाव भटकली. पण कुणीच तिच्या कडून फळे विकत घेतली नाहीत. फिरून फिरून मात्र
बिच्चारीचे पाय दुखायला लागले. शेवटी कंटाळून एका
ठिकाणी आपली टोपली खाली उतरून बसली नि पर
पाहून ईश्वर ला सभोंदून बोलली ," ए प्रभू ! आज तुझ्या मनात मला उपाशीच ठेवायचा विचार आहे की काय ? हरकत नाही. जशी तुझी इच्छा !" इतक्यात तेथे श्रीकृष्ण आला नि तिला म्हणाली ," फळ वाली मला फळे देशील का ?"
" हां देईन ना, पण त्याचे मोल द्यावे लागेल."
" मोल म्हणजे ?"
" तुला मोल माहीत नाही ?"
" नाही."
" फार भोळा आहेस तू बाळ ! मोल म्हणजे धन."
" आणि धन म्हणजे ?"
" आता कसं समजावू रे तुला ! फारच भोळा दिसतोयेस तू .असे म्हणून त्याचा मनमोहक चेहऱ्याकडे पाहत ती म्हणाली ," जेव्हा आपण एखादी वस्तू कुणाकडून घेतो तेव्हा
त्याबदल्यात त्याला काहीतरी द्यायचं असतं त्याला मोल म्हणतात."
" परंतु माझी आई, आणि गावातील गवळणी मला लोणी
खायला देतात त्या कधीच माझ्या कडून मोल घेत नाहीत. मी
फक्त त्यांना आई म्हणतो. आणि त्या मला आपल्या मांडीवर
बसवितात आणि माझा मुका घेतात. फळ वाली मी जर तुझ्या मांडीवर बसून तुला आई म्हटलं तर तू मला ही फळे देशील का ?" त्याच्या त्या गोड वाणी ने ती वृध्द स्त्री एकदम
भारावून गेली. तिच्या एकदा मनात आलं की या मनमोहक
बालकाला आपल्या मांडीवर घ्यावे. परंतु तिला लगेच जाणवले की आपण चांडाळ जातीचे आहोत. अर्थात त्याच्या
पासून दूर राहणेच योग्य असा विचार करून ती म्हणाली," मी
तुला सर्व फळे देते पण तू मला आई म्हणू नकोस."
" का बरं आई म्हणू नको ? तुला आई बोललेले आवडत
नाही का ?"
" तसं नाही रे,बाळा मी चांडाळ जातीची आहे, आणि तू
उच्छ जाती मधला आहेस रे ! ,तुला कुणी माझ्या मांडीवर बसलेले पाहिले तर फार मुसीबत होईल रे बाळा!"
" मला उच्छ नीच काही कळत नाही. असे म्हणून पट्कन
तिच्या मांडीवर बसला. त्या म्हातारीने अगदी प्रमाणे त्याला
कुरवाळले. नि म्हणाली ," मी आज धन्य झाली. मला सर्वकाही मिळाले. तुला मी सर्व फळे देऊन टाकते. कारण मला सर्वांत मोठे मोल मिळाले. असे म्हणून तिने एका कपड्यात एक एक फळ काढून ठेवू लागली. तसा श्रीकृष्ण
बोलला ," मी तुला धन पण आणून देतो." असे म्हणून तो
घरात गेला नि एका भांड्यात धान्य ठेवले होते त्यातून ओंजळीत धान्य घेतले निघाला. परंतु धान्य ओंजळीतून पडत पडत शेवटी चार-पाचच दाणे हातात राहिले ते तिच्या
टोपलीत टाकले. त्यावर ती वृध्द स्त्री खुश होऊन म्हणाली,
आज भरपूर मोल मिळाले. त्यावर श्रीकृष्ण म्हणाला ," मी
भरपूर आणले होते हातातून परंतु ओंजळीतून पडत पडत
आले नि इतकेच शिल्लक राहिलेत." त्यावर ती वृद्ध स्त्री म्हणाली," माझ्यासाठी खूप झाले एवढे !" असे म्हणून ते दाणे
एका फाटक्या कपड्यात गुंडाळून घेतले. नि टोपली डोक्यावर घेतली नि आज भरपूर मोल मिळाले असे सारखं एकच पालुपद म्हणत आपल्या घरी पोहोचली. डोक्यावरील टोपली खाली उतरून ठेवली नि सहजच कपड्यात गुंडाळलेले दाणे ती पाहू लागली तर काय चमत्कार पाच
दाण्यांच्या ऐवजी मोती,हिरे, माणके झाले होते त्या दाण्याचे.
म्हातारी एकदम खुश होऊन तिने देवाचे आभार मानले.
साऱ्या गवळणी एकत्र जमून श्रीकृष्णाची वाट पाहत असतात.पण श्रीकृष्ण येतच नाही. तेव्हा एक गवळण तक्रारी
स्वरात बोलली ," तो आता नाही येणार."
" का बरं ?"
" ह्या कलावती ने त्याची यशोदाताई कडे तक्रार केली
होती."
" खूप मारलं असेल यशोदाताई ने."
" पण मी म्हणते तक्रार करायची कशाला त्याची ! तो नाही आला तरी आपल्याला पण चैन पडत नाही."
" युद्ध आणि प्रेम या मध्ये सर्वकाही क्षम्य असतं. म्हणून
मी खात्रीपूर्वक सांगते की तो येणार."
" आणि मी म्हणते तो नाही येणार ."
" आणि आला तर !"
" मग ठीक आहे,पाहू कुणाचे खरे होते ते."
" त्यापेक्षा आपण भांडण मिटवून टाकू ना !"
" भांडण तर मिटवायचंच आहे परंतु शरणांगती पत्करून
नाही."
" मग कसं ?"
" तडजोडीची भाषा प्रथम त्याने केली पाहिजे."
" तो का करेल बरं ?"
" जसा आपल्याला त्याचा नटखटपणा आवडतो तशा त्याला पण तर आपल्या घागरी फोडण्यात मौज वाटते."
" हे बाकी खरं !"
" म्हणूनच मी काय म्हणते तो येणारच !"
मनसुख गुपचुप त्या गवळणी च्या वार्तालाप ऐकत होता.
महत्वाचे सर्व बोलणं ऐकल्यावर तो तेथून खसकला. आणि
इकडे येऊन सर्व वृतांत श्रीकृष्णाला ऐकविला. त्यावर श्रीकृष्ण
उद्गारला ," याचा अर्थ त्या स्वतः तडजोड करण्यासाठी पुढाकार घेणार नाहीत. मग आपण तरी का घ्यायचा पुढाकार ?"
" पण मी काय म्हणतो की असं केलं तर आपल्याला पण तर लोणी खायला मिळणार नाही. म्हणून तडजोड आपण
करू या कारण भरपूर दिवस झाले लोणी खाऊन."
" तुम्ही लोक एक गोष्ट का विसरता आहात ? त्यांनी असं
कुठं वचन दिलंय आपल्याला की त्या पुन्हा आपल्या कागाळी आई जवळ करणार नाहीत म्हणून."
" हां असं तर त्यांनी वचन नाही दिलं." मनसुख उद्गारला.
" मला एक चांगला उपाय सुचला बघा."
" कोणता ?"
" आता अधिक मास सुरू आहे, या मासात गवळणी व्रत
करतात.वनात जाऊन देवीची पूजा करतात.आणि वनातल्या
पिंपळाच्या खाली नदीत स्नान करतात. तिथं आपण जाऊ आणि मी सांगतो तेवढं फक्त करा त्या आपोआपच शरणांगती पत्करतील."
दुसऱ्या दिवशी गवळणी त्या नदीवर येतात नि आपली
वस्त्रे सोडून त्या जळात उतरतात. तेव्हा श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी तेथे येतात. नि किनाऱ्यावर सोडून ठेवलेली
त्यांची वस्त्रे पळवतात. श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडावर चढून
बसतो. आणि त्या गवळणी ची सारी वस्त्रे वरती आपल्याकडे
घेऊन ठेवतो नि बासरी वाजवायला सुरुवात करतो. बासरीचे
स्वर ऐकून त्या एकमेकांना सांगू लागल्या की, पाहिलंत मी
म्हटलं होतं ना , की तो जरूर येईल." त्यावर दुसरी गवळण
उद्गारली ," पण तो आहे कोठे ?"
" लपून बसला असेल इथंच कुठंतरी ! चला. आपण बाहेर जाऊन त्याला शोधू या." असे म्हणून काठावर पाहिले
असता त्यांची वस्त्रे तेथून गायब असल्याचे जाणवले. तश्या
त्या उद्गारल्या ," परंतु आपली वस्त्रे कुठं आहेत ? आता आपण पाण्याच्या बाहेर कश्या जाणार !"
त्या इकडे तिकडे पाहू लागतात. पण कुठंच दिसत नाही. तेवढ्यात एकीची नजर त्याच्या चरणावर पडते. तशी ती उद्गारली ," अरे तो बघा. त्याचे चरण दिसताहेत झाडावर." सर्वजणी झाडावर पाहू लागतात. तशी त्यातील एकजण बोलली," कान्हा आम्ही तुला पाहिलं.आता लपण्याचा
प्रयत्न करू नकोस." तसा श्रीकृष्ण आपल्या हातात असलेली झाडाची फांदी फेकून देतो." तेव्हा त्यातील एकजण उद्गारली ," कान्हा तू इथं काय करतोयेस ?"
" मी मुरली वाजवतोय. पण तुम्ही इथं काय करता ?"
" आम्ही स्नान करतोय."
" चांगली गोष्ट आहे. करा."
" पण आता आम्ही बाहेर येऊ इच्छितोय."
" मग या बाहेर."
" पण कशी बाहेर येणार ?"
" जश्या आंत गेलात."
" आमची वस्त्रे नाहीत."
" म्हणजे वस्त्रहीन होऊन स्नान करताय."
" हां !"
" छि छि छि ! वस्त्रहीन होऊन स्नान केल्याने नदीतील
देवीचा अनादर होतो."
" चुकलं आमचं. परंतु आमची वस्त्रे कुणीतरी घेऊन
गेलाय जरा बघ ना कोण घेऊन गेलंय ते."
" मी का जाऊ ? मला तर मुरली वाजवायला फार
आनंद होतोय."
" जरा आमची मदत कर ना ?"
" तुम्ही स्वतः जाऊन घ्या ना !"
" परंतु आम्ही या अवस्थे मध्ये पाण्याच्या बाहेर कश्या
येणार ?"
" जश्या आंत गेल्या होत्या."
" तेव्हा इथं कुणीच नव्हतं."
" का खोटे बोलतेस ?"
" आम्ही खरं तेच सागतोय इथं कुणी नव्हतं ?"
" कुणी नाही कसं ? देव होता ना ?"
" देव...?"
" हां देव सर्वत्र असतो ना मग देवा समोर वस्त्रहीन व्हायला लाज नाही वाटली का ?"
" चुकलं आमचं पुन्हा अशी चूक नाही होणार."
" चांगली गोष्ट आहे,तुमची वस्त्रे शोधून आणून देतो.परंतु
माझी एक अट आहे."
" अट ?"
" हां अट !" इतक्यात एकिचे त्या कपड्यावर लक्ष पडते.
तशी उद्गारली ," आपली वस्त्रे त्याच्या जवळच आहेत. याचा
अर्थ तूच आमची वस्त्रे चोरलीस.बेशर्म ! निर्लज्ज ! "
" मी चोरली नाहीत. तुमची वस्त्रे जमिनीवर पडलेली होती
ती कुणीतरी चोरून नेली असती म्हणून मी ती उचलून वर
ठेवली. आता तुम्हाला ती तेव्हाच मिळतील ज्यावेळी तुम्ही
माझी अट मान्य कराल."
" आम्हाला तुझी कोणतीच अट मान्य नाही. अगोदर तर
लोणी चोरत होता. आता तर वस्त्रे ही चोरू लागला. बऱ्या
बोलाणं आमची वस्त्रे दे आम्हाला नाहीतर आम्ही यशोदाताई जवळ तुझी तक्रार करू नि खूप पिटाई करायला लावू !"
" अरे,मनसुख तू तर म्हणत होतास की ह्या आपल्याशी
तडजोड करू इच्छित आहेत. परंतु ह्या तर...?
तश्या सर्वांनी झाडाच्या फांद्या टाकून दिल्या. त्या सर्वांना तेथे
उपस्थित पाहून त्या गवळणी उद्गारल्या ," अरे बाप रे ! म्हणजे सगळेच आहेत तर इथं." एकजण बोलली.
" साऱ्या गाववाल्या जवळ तुमची तक्रार करून तुम्हां लोकांची चांगलीच पिटाई करायला लावीन मी !" कलावती
उद्गारली.
" खरं तर आम्ही इथं तुमच्या बरोबर तडजोड करायला आलो होतो ; परंतु असं वाटतं की हे भांडण असेच चालू राहील. काही हरकत नाही. कृष्णा खाली ये तू ह्याना करू देत गाववाल्या जवळ आमच्या तक्रारी आपण ह्यांची ही वस्त्रे ह्यांच्या नवऱ्याना दाखवू त्याना सुध्दा माहीत पडू दे की त्यांच्या बायका कश्या वस्त्रहीन होऊन रानावनात कश्या फिरतात ती." श्रीकृष्ण झाडावरून खाली उतरला नि आपल्या सवंगड्या सोबत जाऊ लागला. तेव्हा त्यातील एकजण उद्गारली ," अरे बापरे ! हे तर खरोखरच जाऊ लागले."
" ह्याचा परिणाम फार भयंकर होईल." दुसरी बोलली.
" अरे,मनसुख ह्या तर आपल्याला घाबरवत आहेत."
" परिणाम ह्यांच्या साठी भयंकर होईल. चल तू !" असे
म्हणून सर्वजण तेथून जाऊ लागतात.तशी कलावती गयावया
करत बोलली ," कान्हा असं जाऊ नकोस. गावात आमची फार बदनामी होईल."
" मग तडजोड करायला तयार आहेत का ?" श्रीकृष्णा ने
त्याना विचारले.
" हो आम्ही तडजोड करायला तयार आहोत."
" मग आमच्या काही अटी आहेत त्या मान्य कराव्या
लागतील."
" हो चालेल."
" पहिली अट, पुन्हा कधी तुम्ही यशोदा आई जवळ आमची तक्रार करणार नाही."
" ठीक आहे ,नाही करणार."
" दुसरी अट आम्हाला रोज लोणी आणि ताक प्यायला
आणून देणार !"
" मान्य आहे."
" तिसरी अट पुन्हा कधी वस्त्रहीन होऊन नदीत स्नान
करणार नाही."
" ही पण अट मान्य आहे."
" चौथी अट आमच्या सेनापतीची हात जोडून माफी
मागा." हात जोडून माफी मागतात.तसा मनसुख पुढे बोलला, " आता कान धरून पाच वेळा उठा बस काढा."
तश्या त्या कान धरून उठा बस काढतात.तसा श्रीकृष्ण
बोलला ," वस्त्रे देऊन टाका. आणि कुणीही मागे न पाहता इथून निघा." तसे सर्व वस्त्र तेथे ठेवून ते सर्वजण आपले डोळे झाकून घेतात नि तेथून निघून जातात. त्यातील एकजण
बोलली ," एकाच डावात हरवले त्याने आपल्याला !"
" मला तर त्याच्या कडून हरणे पण आवडते."
" त्याचे मित्र आहेत ना, ते फार वात्रट आहेत. ते त्याला
काही ना काही शिकवत असतात."
" जर तू त्याला आपला पुत्र समजतेस तर त्याच्या मित्रांना सुध्दा त्याच रुपात पहा ना !"
" अगदी बरोबर !"
श्रीकृष्णा चे सवंगडी त्याची स्तुती करतात.
" वा सेनापती ! काय एकदम झक्कास योजना बनविली. एका डावतच त्यांच्यावर आपण मात केली."
" त्याना ह्याने नाही तर त्यांच्या प्रेमाने ठरविले."
" मनसुख प्रेम युद्ध हे असेच असते. जो हरतो तोच शेवटी हरूनही जिंकतो." श्रीकृष्ण उद्गारला.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा