महाभारत -१७| मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी, दिवाळी संग्रह | महेंद्रनाथ प्रभु.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाभारत -१७ |
महाभारत - १७
यशोदा तिला आतल्या घेऊन जाते. तर खरोखरच कान्हा
इथं सुध्दा लोणी खात असतो. मालती ने जसे त्याला पाहिले मात्र तिचा तर स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसेना , असं कसं बरं होऊ शकतं ? नाही म्हणजे मी ह्याला तर माझ्या घरी बांधून इथं आली होते. परंतु हा तर माझ्या ही अगोदर इथं येऊन पोहोचला. पण कसा ?" तेव्हा श्रीकृष्ण हसून म्हणाला ," मामी s s "
" तू परत मला मामी म्हणालास ? मी तुझी काकी आहे."
" असे कधी सांगितले तू मला ?"
" अरे यशोदा ! तुझा कान्हा मोठा जादूगार आहे,क्षणात इथं
तर क्षणात तिथं. मला तर काहीच कळेनासे झालंय." असे म्हणून ती आपल्या घरी जायला निघाली. आणि घरी जाऊन पाहते तर तिथंही रस्सीचे बांधलेला. ते पाहून तर तिची मतीच कुंठित झाली. आणि चक्कर येऊन जमिनीवर कोसळली.
यशोदा जात्यावर दळण दळीत असता तेथे श्रीकृष्ण आला नि आपल्या आई ला म्हणाला ," आई,मला लोणी दे ना !" त्यावर यशोदा उत्तरली ," तुला लोणी अजिबात मिळणार नाही." त्यावर श्रीकृष्ण उद्गारला ," नाही. मला लोणी पाहिजेच आहे." यशोदा म्हणाली ," तू मालती च्या चोरी करून लोणी खाल्लेस ना ? त्यामुळे तुला लोणी मिळणार नाही."
" दिलं नाहीस तर मी मटकी फोडेन."
" जा फोड."
" बघ हां फोडेन मी !"
" मग फोड ना, वाट कुणाची पाहतोयेस ?" तिला वाटलं
की हा मुद्दाम बोलतोय मटकी काही फोडणार नाही. म्हणून
ती सहजच म्हणाली ," फोड म्हणून." एकदा परवानगी मिळाल्यानंतर काय त्याने तिथली एक काठी उचलली नि
सरळ शिंख्यावर लटकत आलेल्या मटकी वर मारली. मटके
फुटले नि त्यातील सर्व लोणी जमिनीवर सांडले. यशोदेला त्याचा भयंकर राग आला. तिने एक रस्सी घेतली नि एका उखळीला बांधून टाकले. आणि आपल्या घर कामाला निघून
थोड्या वेळ श्रीकृष्ण तसाच उखळी वर बसून राहिला. तेवढ्यात त्याची नजर त्या दोन झाडावर पडली. दरवाजात
दोन मोठी झाडे उभी होती. तो उखळी वरून खाली उतरला
नि ती लाकडी उखळ ओढत -ओढत त्या दोन झाडा जवळ
गेला नि त्या दोघांच्या मधून अश्या प्रकारे गेला की ती उखळी
त्या दोघांच्या मध्ये अडकली. त्यानंतर त्याने जोर लावून ती
दोन्ही झाले मुळातून उफाळून काढली. तसे त्या झाडाच्या
मधून दोन दिव्य पुरुष बाहेर पडले. नि त्या दोघांनी श्रीकृष्णाला हात जोडले. तसे श्रीकृष्णा ने त्याना आपले वास्तविक रूप दाखविले. तेव्हा त्यातील एकजण बोलला,
ये प्रभू कृपा निदान आपल्याला आमचा कोटी कोटी प्रणाम !
त्यानंतर स्वतःची ओळख सांगत तो म्हणाला ," आम्ही दोघे
देवांचा कोषाध्यक्ष कुबेराचे पुत्र नंद कुबेर नि मानिरात्म ! आम्ही दोघे एके दिवशी मंदाकिनी सरोवरात स्वर्गातील अप्सरा सोबत जलक्रीडा करत होतो. त्याच वेळी तेथे नारदमुनी नर नारायण कडे जाण्यासाठी आलेले असतात.
नारद मुनींना पाहताच अप्सरा लज्जेचे आपले वस्त्र अंगावर
चढवितात. परंतु आम्ही दोघे वस्त्र हीन राहून मोठ्या ने हसत
असतो. नारदमुनी ना भयंकर राग आला नि त्यांनी आम्हाला
शाप दिला. तुम्ही दोघे कुबेराची मुलं असूनही तुम्हां लोकांना लज्जा नाही. या क्षणापासून तुम्हां दोघांना वृक्ष योनी प्राप्त होईल आणि तुम्ही दोघे मृत्यू लोकांत वृक्षाच्या रुपात वास्तव्य कराल. आणि उन्ह पावसाचा आणि वाऱ्याचा आपल्या उघड्या शरीरावर मार खात - खात जीवन जगाल . जेव्हा द्वापर युगात भगवंत श्रीकृष्णाचा अवतार होईल. त्यावेळी त्यांच्या हातून तुम्हा दोघांचा उद्धार होईल. इतकी वर्धे तुमची वाट पाहिल्यानंतर आज तुमच्या हातून आम्हां दोघांचा उद्धार झाला. तेव्हा श्रीकृष्णा ने त्याना आपले वास्तविक रूप दाखवून दर्शन दिले. तसे ते स्वर्गलोकी निघाले. श्रीकृष्णा ने पुन्हा आपले बालरूप धारण केले.
श्रीकृष्ण आपल्या सवंगड्या सोबत विटीदांडू खेळत असतो. परंतु लगेच बाद होतो. परंतु तो मान्य करत नाही.
तो उद्गारला ," , छे छे,छे ! मी नाही झालो बाद. म्हणून मी पुन्हा खेळणार !" तसा सुदाम बोलला," छे छे छे ! तू बाद झालास ! तुला परत खेळायला नाही मिळणार."
" मी खेळणारच !"
" नाही मिळणार !"
" ठीक आहे, मग कुणीच खेळायचं नाही. खेळ बंद!"
" अरे, असा काय हा ? ह्याच्या वर राज आलं की हा असं
करतो ." सुदाम बोलला.
" त्याचं नेमीचंच आहे रे ते." बलराम बोलला.
" काय दादा तू पण त्याचीच बाजू घेतोहेस."
" मी बाजू नाही घेत कुणीही . पण खरं सांग तू बाद झालास होतास की नाही ?"
" मग ठीक आहे,तुम्हीच खेळा मी चाललो." असे म्हणून
तेथुन निघून गेला. तसे सर्व त्याच्या मागे धावले. एका झाडावर चढून बसतात. थोड्या वेळाने सुदामा म्हणाला ," काना फार भूक लागली आहे, काहीतरी खायचा बंदोबस्त कर." तसा श्रीकृष्ण उद्गारला ," चला. लोणी चोरून खाऊ."
असे म्हणून तो जाऊ लागला तसे त्याच्या मागे त्याचे सारे
सवंगडी निघाले. ते सर्वजण मातीच्या घरी आले. तेव्हा सुदामा म्हणाला ," इथं नको. मागच्या वेळी पकडलो
गेलो होतो. " तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला ," पकडलो होतो
पण सुटलो देखील ना ? काकी माझी तक्रार घेऊन माझ्या
आई गेली होती. परंतु माझ्या आई ने तिचे काहीच ऐकून
घेतले नाही, म्हणून काकी आता माझी तक्रार करायला माझ्या घरी जाणार नाही."
" मग ठीक आहे."
" मागील दरवाजाने आंत शिरतात. लोणीची घागर
खाली काढून सर्वजण मस्त त्यावर ताव मारत असतात. नि
मालती उंबरठ्यावर बसून त्या सगळ्यांची मजा पाहत असते.
तेवढ्यात तेथे यशोदा येते. मालतीला दरवाजात बसलेली
पाहून तिने विचारले की, तू इथं का बसली आहेस ?"
" तू आंत मध्ये जाऊन तर बघ काय चाललंय ते."
यशोदा आंत जाऊन पाहते तर खरंच श्रीकृष्ण आपल्या
सवंगड्या सोबत लोणी खात असतो. आपल्या आईला पाहून
तो जरा वरमतो. पण आता काय करणार चोरी पकडली गेली
होती. यशोदा त्याला पकडून आपल्या घरी घेऊन येते नि
एका अंधार असलेल्या खोलीत बंद करून दरवाजाला कडी
लावून घेते . तेव्हा श्रीकृष्ण आपल्या आई ला विनवीत म्हणाला ," आई, मला फार भीती वाटते या काळोखा ची ! मला तू इथं बांधून ठेवू नकोस."
" ह्या खोलीतच काळोखात रहा तू , हीच तुला आता शिक्षा !"
" आई ,मला इथं नको बंद करून ठेवूस ? मला काळोखाची लय भीती वाटते." परंतु यशोदा त्याचं काहीही न ऐकता त्याला त्या काळोख असलेल्या खोलीत बंद करून ठेवते नि काठी शोधू लागते. तसा कान्हा तिला विचारतो की तुला काठी कशाला पाहिजे ?"
" तुला मारायला.'
" आई , काठीने नको मारुस ना गं !'
" का नको मारू ?"
" फार दुखतं ना गं अंग ?"
" दुखलं ? मारायच्या अगोदरच दुखलं तुझं अंग."
" हां फार दुखतं !"
" मग खोड्या कशाला करतोस ?"
" खोड्या मी कुठं करतो ,तेच करतात."
" तेच कोण ?"
" माझे मित्र सारे !"
" तुझे मित्र सर्व खोड्या करतात काय ? आणि तू काय करतोस ?"
" मी ...मी काय करणार ....फक्त त्याना मदत करतो."
" अरे लबाडा तू फक्त मदत करतोस काय ?" असे म्हणून मुद्दामच जवळच पडलेली ती काठी उचलून आणते.
तेवढ्यातच तेथून एक साप सळसळत गेला. तसा श्रीकृष्ण साप ,साप म्हणून ओरडला. तशी ती घाबरून मागे हटली. नि विचारले ," कुठं आहे साप ?" श्रीकृष्ण उद्गारला ," तो काय दरवाजाच्या बाहेर गेला." म्हणून यशोदा दरवाजा खोलून बाहेर पाहते तर खरोखरच बाहेर दरवाजात फना काढून साप उभा असतो. सापाला पाहून यशोदा घाबरते.पण तरी देखील तो साप आपल्या कान्हा जवळ येऊ नये म्हणून सापाला दूर पिटाळून लावण्याचा प्रयत्न करत असते. परंतु श्रीकृष्ण मनातल्या हसत असतो. फक्त आईच्या समजुती साठी तो त्या सापाला उद्देशून बोलला ," नाग देवता तू इथून जा बरं , माझी आई फार घाबरली आहे, तिला अजून घाबरू नकोस. वाटल्यास माझी आई तुला दूध देईल हां त्या झाडापाशी ठेवील हां वाटगं ! हो ना आई ठेवशील ना तू ?" तशी यशोदा ने आपली होकारार्थी मान डोलावली. तसा साप चुपचाप तेथून निघून गेला. तशी यशोदा श्रीकृष्णाला घट्ट मिठी मारत म्हणाली,
" मला माफ कर बाळा, मी फार वाईट आहे,तुला इथं काळोखातल्या खोलीत बंद करून जात होती."
" नाही आई, तू फार चांगली आहेस. मीच फार तुला त्रास
देतो, हो ना ?" तशी यशोदा स्मित हास्य करत म्हणाली ," तुझं
त्रास देणं पण मला आवडतं. माझं गुणी बाळ ते. " असे म्हणून ती त्याच्या मुखाचा गोड गोड पापा घेते."
धनवा नावाचा मुरली विक्रेता नदी किनारे बसून मुरली
वाजवत होता. त्याच वेळी मुरलीचा सुमधुर आवाज ऐकून
तेथे श्रीकृष्ण आला नि त्याच्या बाजूला बसून मुरलीतून निघणारे मधुर स्वर ऐकण्यात मग्न झाला. मुरली वाजवून
होताच धनवा आपले डोळे उघडले तर त्याने आपल्या समोर
श्रीकृष्णाला पाहिले तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारले," तू
कधीपासून बसलाहेस इथं ?"
" बराच वेळ झाला."
" तुला आवडते का मुरली ?"
" फार.मला येईल का आवाजाला ?"
" का नाही येणार ? अवश्य येईल."
" जरा इकडे मी वाजवून पाहतो, मला येते की नाही ती ?"
असे म्हणून त्याच्या हातून मुरली घेतली सुध्दा ! " तेव्हा धनवा बोलला ," ही मोठी आहे, तुला मी छोटी देतो." असे म्हणून त्याच्या हातून ती मुरली घेतली नि दुसरी छोटी मुरली
काढून दिली. श्रीकृष्णाने ती ओठांना लावून फुक मारली परंतु
त्यातून काही सूर निघत नव्हते. म्हणून श्रीकृष्ण उद्गारला," ही तर वाजतच नाही." तेव्हा धनवा उद्गारला ," ही अशी वाजत नाही."
" मग कशी वाजते ?"
" त्यासाठी अभ्यास करावा लागतो."
" अभ्यास !"
" हां अभ्यास ! कितीही कला त्याचा अभ्यास केल्या शिवाय येत नाही."
" कसा करायचा असतो अभ्यास ?"
" प्रथम मुरली ला प्रणाम करून सरस्वती मातेला वंदन
करायचं असतं आणि तिला विनंती करायची की सरस्वती
माते माझ्या गाण्यात सूर भरून दे. असे म्हणून अगोदर
सा रे ग म प ध नि सा ! हे स्वर शिकायचे असतात. त्याने
सांगितल्या प्रमाणे श्रीकृष्णाने सरस्वती मातेला वंदन केले.
ए सरस्वती माते माझ्या गाण्यात स्वर उमटू दे." असे म्हणताच
सरस्वती माता उद्गारली ," जशी आपली आज्ञा प्रभू ! "
आणि श्रीकृष्णाने ओठावर मुरली ठेवली मात्र त्या मुरली
मधुर असे सूर उमटू लागले की, ते पाहून धनवा एकदम
आश्चर्यकारक नजरेने पाहू लागला. कारण असा स्वर त्याने
पहिल्यांदाच ऐकला होता. झाडावरचे पक्षी सुध्दा त्या आवाजाच्या दिशेने येऊ लागले. ते पाहून त्या धनवा ने श्रीकृष्णाला साष्टांग दंडवत घातला. तेवढ्यात तेथे नंदराय
आले नि धनवा ला विचारू लागले की ,ए धनवा हे तू काय
करत आहेस ?" तेव्हा धनवा म्हणाला ," मी आपल्या पुत्राला
साष्टांग दंडवत घालत आहे."
" का बरं ?"
" आपला पुत्र कुणी सामान्य बालक नाहीये. हा दिव्य बालक आहे, अर्थात मला तर वाटतं की हा कुणी गंधर्व आहे,
काहीतरी विशेष कार्य करण्याची हा आपल्या गोकुळात आला आहे."
" असं काय केलं त्यानं ?"
" हा मुरलीतून असे स्वर काढतो की असं वाटतं माता सरस्वती स्वतः हे सूर काढत आहे."
" अगदी बरोबर माताच हे सूर काढत होती." श्रीकृष्ण बोलला. तेव्हा नंदराय ने विचारले ," कुठून शिकलास हे ?"
" हे स्वर मी काढले बाबा. स्वतः सरस्वती माते नेच काढले. मी फक्त सरस्वती मातेला विनंती केली बस्स !"
" बरं बरं ! चल आता आपण घरी जाऊ !" दोघेही
घरी जातात. आणि ही गोष्ट नंदराय जेव्हा यशोदा ला सांगतात ,तेंव्हा यशोदा उद्गारली ," आपल्याला हा गंधर्व वाटतोय ,मला तर चोर वाटतोय. तो पण नुस्ता चोर नाही.
महाचोर !" असे म्हणून श्रीकृष्णा कडे पाहत बोलली ," बरोबर बोलते ना मी ? "
" आई, मी चोरी नाही केली."
" तू आज कलावतीच्या घरी चोरी केली की नाही.?"
" हां , पण ती खोटे बोलून तुझ्या कडून दोन कटोरे
लोणी घेऊन गेली होती म्हणून आम्ही तिच्या घरी चोरी केली.
हिशोब बरोबर केला ना ?" त्यावर नंदराय हसू लागले.
एके दिवशी श्रीकृष्णाचे सारे सवंगडी त्याच्या येण्याची
वाट पाहत असतात. परंतु तो येतच नाही. तेव्हा एकजण
म्हणाला ," सुदामा , तू फार चिडवितोस त्याला. "
" फक्त मीच नाही. आपण सर्व चिडवितो त्याला."
" हो पण तू सर्वात जास्त चिडवितोस त्याला."
" खरं सांगायचं तर त्याला चिडविल्याशिवाय मला मजा
येत नाही."
" म्हणे मजा येत नाही. आता तो रुसून बसला. येणारच
नाही."
" कसा येणार नाही ते मीच बघतो." असे बोलून सुदामा
श्रीकृष्ण ज्या झाडावर रुसून बसला होता तेथे गेला नि त्याची
विनवणी करत बोलला ," काना तुझी सर्वजण वाट पाहताहेत
चल ना खेळायला."
" मला नाही खेळायचं तुझ्या बरोबर."
" मी हरलो.तू जिंकलास ! आता तरी चल."
" मला नाही यायचं म्हटलं ना मी !"
" आता राग सोड ना काना , आणि बोलवताहेत तर जा ना ! " बलराम म्हणाला. तसा श्रीकृष्ण त्याच्या बरोबर जायला तयार झाला. खेळ सुरू झाला.खेळामध्ये दोघांची
पुन्हा बाचाबाची झाली तसा सुदाम चिडून बोलला ," जा मला
खेळायचंच नाही तुझ्या बरोबर. " असे म्हणून रुसून तेथून
निघून गेला.तसे बाकीचे ही सर्वजण त्याच्या मागोमाग गेले.
एके दिवशी नंद गावच्या चावडी वर बसले होते. तेवढ्यात
एक गावकरी पळतच तेथे आला नि बोलला," अहो, नंदराय नदीवर बघा चला, दोन गाई ,नदीचे पाणी पिऊन मरून पडल्या आहेत." त्यावर दुसरा एकजण उद्गारला ," असं जर होतं राहिलं तर आपल्याला हे नंदगाव ही सोडावा लागेल जसे आपण गोकुळ सोडले."
" जोपर्यंत ह्या नदी मध्ये कालियानागचे वास्तव्य आहे,
तोपर्यंत हे असेच होत राहणार. त्याचे ते विषारी पाणी पिऊन
सर्व प्राणी मरायला लागले आहेत." तेव्हा श्रीकृष्ण तेथेच उभा असतो. त्याने त्या लोकांचे संभाषण ऐकले होते. त्याने
काहीतरी बेत केला नि आपल्या सवंगड्या सोबत यमुनेच्या
तीरावरच खेळ सुरू केला. खेळता खेळता चेंडून त्याने यमुना
नदीत फेकून दिला. तसा सुदामा बोलला ," माझा चेंडू तू फेकला आहेस, अर्थात तूच तो आणून दे." त्यावर एकजण
बोलला ," अरे सुदामा, चेंडू नदीत पडलाय.तो कसा आणणार ?" त्यावर सुदामा उद्गारला ," ते मला माहित नाही.
चेंडू काना नेच फेकलाय तर तो काना नेच आणून द्यायचा."
तसा श्रीकृष्ण उद्गारला ," ठीक आहे, मीच आणून देतो तुझा
चेंडू !" असे म्हणून श्रीकृष्ण यमुनेच्या तीराकडे घावत सुटला.
तसे इतर सवंगडी सुदामा ला म्हणू लागले की, अरे,सुदामा,
त्या नदीचे पाणी विषारी आहे, कान्हाला त्या नदीत जायला
देऊ नकोस." असे म्हणून सगळेजण ओरडू लागले. कान्हा जाऊ नकोस. पण श्रीकृष्ण थांबला नाही. तो यमुना तीरावर
उभ्या असलेल्या झाडावर चढला नि सरळ स्वतःला त्या पाण्यात झोकून दिले. तसे सारे सवंगडी सुदामा वर रागावले.
आता सुदामाला पण श्रीकृष्णाची चिंता वाटू लागली होती.
म्हणून तो ही खबर देण्यासाठी नंदराय च्या घरच्या दिशेने
पळत सुटला. नंदराय च्या घरी पोहोचताच तो उद्गारला," कान्हाच्या आई, कानाने यमुना नदीत उडी मारली." हे ऐकताच
सर्वजण नदीच्या दिशेने पळत सुटले.
श्रीकृष्ण नदीच्या अगदी तळाशी गेला. पाहतो तर काय
कालिया नाग मस्तपैकी झोपला आहे, श्रीकृष्णाने अनेक प्रकारे त्याला उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो काही
उठेना , शेवटी त्याच्या शेपटीवर जोराने पहार केला. तसा तो
जागा नि रागाने फुस्कार सोडून आपले विष ओकू लागला. परंतु त्याचा विषाचा श्रीकृष्णा वर काहीच परिणाम झालेला
दिसून येत नव्हता. ते पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले. परंतु तो शरण येत नव्हता. श्रीकृष्णाच्या लाथांचा मार खाऊन -
खाऊन तो अर्धा मेल्या झाला. शेवटी त्याच्या दोन्ही पत्नी
श्रीकृष्णा समोर हात जोडून उभ्या राहात उद्गारल्या ," क्षमा
करा भगवंत. आमच्या पती कडून फार मोठी चूक झाली
त्यांनी आपल्याला ओळखले नाही." तेव्हा कालिया नाग
हात जोडून बोलला ," क्षमा करा भगवंत क्षमा करा !"
" तू या क्षणा पासून आपल्या परिवारासह हे जल सोडून
दूर कुठंतरी निघून जा."
" जशी आपली आज्ञा भगवंत !" त्यानंतर श्रीकृष्ण त्याच्या फण्यावर उभा राहून नाचू लागला नि मुरली वाजू
लागला. मुरलीचे स्वर ऐकून नंद गाव वाशी आनंदाने डोलू
लागले. रक्ताने लाल झालेले पाणी पाहून यशोदा बेशुद्ध झाली होती. ती आता मुरली चे मधूर सूर ऐकून हळूहळू शुध्दीवर येऊ लागली होती. आणि थोड्याच वेळात श्रीकृष्ण
कालिया नाग साहित तीरावर आला. आणि तांडव नृत्य करू
लागला. सारे नंदवाशी मंत्रमुग्ध होऊन आनंदाने डोलू लागले.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा