महाभारत -३० | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी, दिवाळी संग्रह | महेंद्रनाथ प्रभु.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाभारत -३० |
महाभारत ३०
आचार्य द्रोणाचार्य हस्तिनापूर च्या साऱ्या राज कुमारांना
शत्रविद्या शिकवत होते. त्याच वेळी झाडाच्या आड उभा राहून एक युवक ते ऐकत असे नि मग बाजूलाच एक झोपडी
जवळ जाऊन त्याचा सराव करत असे. आणि तेथेच झाडाखाली द्रोणाचार्यांची त्याने प्रतिमा तयार केली होती.
त्या युवकाने आणि त्या प्रतिमेला साक्षी मानून
तो शिकण्याचा प्रयत्न करत असे. गुरू द्रोणाचार्य आज
भीम आणि दुर्योधन या दोघांना गदा युध्द कसे खेळायचे
ते सांगत होते नि त्याचे नियमही सांगत होते .ते म्हणाले ,
" गदा युध्दामध्ये कमरेच्या खाली वार करणे वर्ज आहे ,जर असे कोणी तसे केले तर तो त्याच्या गुरूचा अपमान आहे,असे म्हणून भीम आणि दुर्योधन या दोघांच्या हातात एक एक गदा दिली नि सराव करायला सांगितला. परंतु हे दोघे सराव पण असे करायचे की ते जणू युद्ध करत आहेत की काय ? असे वाटायचे ? तेव्हा युधिष्ठिर गुरू द्रोणाचार्यांना म्हणाला की, माझा हा धाकटा भाऊ प्रिय दुर्योधन गदा युध्दात प्रवीण होईल ना गुरुदेव ?त्यावर आचार्य द्रोणाचार्य म्हणाले की, अवश्य होईल. परंतु तू आपल्या अनुज विषयी बोललास नाही काही !" त्यावर युधिष्ठिर उद्गारला ," प्रिय भीम बद्दल मला काही बोलायची गरजच नाही. कारण मला कल्पना आहे की तो गदा युद्धात नक्की सर्वश्रेष्ठ ठरणार."
एका झाडावर गोल रिंगण काढून त्यावर बरोबर मध्य बिंदूवरच बाण मारत होता तो युवक. तेवढ्यात तेथे कुत्रा आला नि भुंकू लागला. तेव्हा तो युवक कुत्रास म्हणाला ,
" चूप , हस्तिनापूरच्या कुत्रा ! " परंतु तो कुत्रा अधिकच भुंकू लागला. ते पाहून एकलव्य म्हणाला ," तू असा गप्प बसणार नाहीस. " असे म्हणून त्याने एका पाठोपाठ काही बाण त्याच्या तोंडात मारून त्याचे तोंडच बंद केले. परंतु आश्चर्य असे की त्याला यत्किंचितही जखम न करता अचूक बाण मारले होते. कुत्रा पळतच आचार्य द्रोणाचार्य जेथे हस्तिनापूर च्या राजकुमारांना प्रशिक्षण देत होते तेथे गेला. त्याची ती अवस्था पाहून सर्वजण त्या कुत्राच्या मागोमाग निघाले. तो कुत्रा बरोबर जेथे तो युवक सराव करत होता तेथे तो घेऊन गेला. एकाग्रतेने बाण मारत असलेल्या त्या युवका कडे पाहून ते कुतूहलाने त्याला विचारले ," धनुर्धर आपला परिचय दे पाहू !" तेव्हा तो युवक बोलला की, यादव कुमार
एकलव्याचा सादर प्रणाम स्वीकार करा गुरुदेव !"
तेव्हा अर्जुन ने विचारले की तू गुरुदेवांचा शिष्य कसा असू
शकतोस.?" परंतु अर्जुन ने विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर न देता तो पुढे म्हणाला ," गुरू बंधूंना पण सादर प्रणाम !" तेव्हा आचार्य द्रोण उद्गारले ,' तू अर्जुन च्या प्रश्नाचे उत्तर अद्याप दिलं नाहीस आणि मी तुला कधी विद्या शिकविली नाही.मग
तू माझ्या शिष्य कसा काय ? " एकलव्य उद्गारला , " आपण अवश्य मला शिकविले नाही, परम पुज्ज गुरुदेव ! परंतु ही विद्या मी आपल्या कडूनच शिकलोय."
" जर मी तुला विद्या शिकविलीच नाही तर मी तुझा गुरू
कसा काय झालो ? आणि ही विद्या शिकलास तरी कसा ?"
" तर मग आपण स्वतः माझ्या गुरुकुलात येऊन पहा !"
तसे सर्वजण त्याच्या मागोमाग निघाले. सर्वजण एका
झाडापाशी आले जिथे स्वतः एकलव्या ने आचार्य द्रोणाचार्यांची प्रतिमा तयार केली होती. तो म्हणाला , " मी आपल्या प्रतिमेलाच आपला गुरू मानुन धनुर्धर विद्या शिकलो आहे. आपण जेव्हा ह्या राजकुमारांना गुरुकुलात
विद्या शिकवीत असता तेव्हा मी झाडाच्या आड लपून ऐकत
असे आणि नंतर त्याचा प्रयत्न करत असे."
" आता आपला पूर्ण परिचय दे बरं !"
" आज्ञा गुतुदेव ! " असे म्हणून तो पुढे म्हणाला ," मी
यादवराज हिरण्यधनूचा पुत्र आहे, माझे वडील मगध नरेश
जरासंध के सेनानायक आहेत."
" माझा मित्र बनण्यास तयार आहेस का ?" दुर्योधन ने विचारले.
" जर हस्तिनापूर आणि मगध यांच्या मध्ये मित्रता असेल
तर अवश्य मी मित्र बनू शकतो."
" तू तर फार मोठा तेजस्वी धनुर्धर आहेस एकलव्य !" आचार्य द्रोणाचार्य उद्गारले.
" ही आपल्या कृपा प्रसादाचा चमत्कार आहे गुरुदेव !
आणि ही प्रतिमा त्याची साक्षी आहे."
" परंतु विद्या शिकण्यासाठी गुरुच्या परवानगीची जरूरी
असते. तू घेतलीस का परवांनगी ?
" मी आपल्या प्रतिमेची परवांनगी घेतली होती गुरुदेव !"
" तर मग गुरू दक्षिणा नाही देणार का ?"
" अवश्य देईन. फक्त आज्ञा करा गुरूदेव !"
" मला गुरुदक्षिणा म्हणून तुझ्या उजव्या हाताचा अंगुठा पाहिजे ."
" जो आज्ञा गुरुदेव ! " असे म्हणून त्याने आपल्या हाताचा
अंगुठा कापून दिला. आणि त्यांचे चरणस्पर्श केले. आचार्य
द्रोणाचार्यांनी त्याला आशीर्वाद दिला.
राधेय
आचार्य द्रोणाचार्यांनी मला विद्या शिकविण्यास नकार
दिल्याने मी तेथून निघालो. नंतर मी माझ्या बाबांना विचारले
की , गुरू द्रोणाचार्यांच्या बरोबरीचा किंवा त्यांच्यापेक्षा ही श्रेष्ठ दुसरा कुणी गुरुवर्य आहे का ?" तेव्हा मला बाबा म्हणाले ,
" भगवान परशुराम ! व्यतिरिक्त दुसरा कुणी नाही. परंतु
भगवान परशुराम ब्राम्हणा व्यतिरिक्त अन्य कुणालाही अस्त्रविद्या शिकवीत नाहीत. असे बाबा मला म्हणाले.. मी
त्याक्षणीच निश्चय केला की भगवान परशुराम यांनाच आपला
गुरू करायचा परंतु त्यासाठी आपल्याला थोडे खोटे बोलावे
लागेल. हरकत नाही. आपला उद्देश तर चांगला आहे ना ?
मी ब्राम्हण आहे म्हणून खोटेच सांगितले. अर्थात भगवान परशुराम यांनी माझी लीनता पाहून आपला शिष्य करण्यास
तयार झाले. आणि त्याला विद्या द्यायला सुरुवात केली.
अर्जुन प्रमाणे मी सुध्दा प्रत्येक परीक्षेत उत्तीर्ण होत गेलो.
तो एका पाठोपाठ एक बाण सोडतो ते भगवान परशुराम कुतूहलाने पाहत असतात. शेवटी ते माझ्या जवळ येऊन मला म्हणाले ," आता थोडा विश्राम कर वत्स ! " तसा मी उद्गारलो ," जशी आपली आज्ञा गुरुदेव ! "असे म्हणून मी त्याना वंदन केले. तेव्हा त्यांनी मला " श्रेष्ठ धनुर्धर भव ! "
असा आशिर्वाद दिला. त्यानंतर मला आपल्या सोबत यायला
सांगितले तसा त्यांच्या मागोमाग मी आलो. ते आपल्या स्नानावर बसले .तसे मी त्यांच्या पाया जवळ खाली बसलो. तर मला म्हणाले ," बाणा मध्ये धनुर्धरचे प्राण असतात कर्ण ! अर्थात धनुर्धरचे पाहिले कर्तव्य आहे की त्याने आपल्या बाणांचा उपयोग अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांच्या हितासाठी कदापि करू नये. कारण तसे केल्याने त्याच्या गुरूचा अपमान तर होतोच ! शिवाय त्याच्या त्या धनुर्धर विद्याचा ही तो अपमान आहे. मग ती विद्या त्याच्या कडून अशी गायब होईल की त्याच्या कडे ती कधी नव्हतीच ! गंगापुत्र भीष्म नंतर आजपर्यंत गुरुकुला मध्ये तुझ्या सारखा कुणी शिष्य आलाच नाही. परंतु तू सांगितलेल्या नियमाचा भंग केलास तर गुरुदक्षिणा मध्ये तुला शिकविलेली सारी विद्या त्या वेळी वापस घेईन ज्या वेळी तुला त्याची जास्त गरज असेल. म्हणून तू इथून जेव्हा जाशील तेव्हा मला गुरुदक्षिणा न देताच जा." मला तर प्रश्न पडला की मी तर खोटे बोलून गुरुदेव कडून धनुर्धर विद्या प्राप्त केली आहे, जर गुरुदेव ना हे समजलं तर काय होईल ? ते तर मला सरळ शापच देतील. म्हणून माझ्या कडून कोणतीही चूक घडणार याची मी जास्त काळजी घेऊ लागलो होतो. तर दुसरीकडे-
द्रोणाचार्य आपल्या पुत्रांस म्हणाले की, तू नेहमी वाद
का घालतोयेस माझ्याशी ?" त्यावर अश्वत्थामा म्हणाला," मी आपला पुत्र असूनही आपला स्नेह अर्जुनाला का मिळतो, मला याबद्दल काही सांगाल का ?" त्यावर आचार्य द्रोण
म्हणाले ," तुला माझा पुत्र विधात्याने बनविले. परंतु तू माझा
शिष्य स्वतःहून झालास. आणि हे गुरुकुल आहे, माझ्या घराचे अंगण नाहीये. अंगणात तुझ्या पेक्षा दुसऱ्या कुणाचाही
अधिकार नाहीये. परंतु गुरुकुलात अधिकार त्यालाच मिळेल
जो सर्वात चांगला शिष्य असेल. अर्जुन तर तो नर आहे की
ज्याच्यामुळे मला नारायण चे दर्शन होणार आहेत."
" परीक्षा घेतल्याशिवाय गुरू ने हे कसे सिध्द केलं की अर्जुनही सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे ?"
" हूं ss ठीक आहे,तुझ्या समाधानासाठी परीक्षा घेतो.
चल ये माझ्या सोबत." असे म्हणून ते एका उंच झाडा जवळ आले. त्यांनी झाडावर झुडुपा मध्ये एक यंत्र पक्षी ठेवला नि
सर्वाना तेथे बोलविले. सर्वात पहिल्यांदा युधिष्ठिर ला आचार्य
द्रोणाचार्य म्हणाले ," युधिष्ठिर ह्या वृक्षावर एक यंत्र पक्षी
लपवून ठेवला आहे, तो तुमचा लक्ष आहे, तेव्हा आता तू हा धनुष्य बाण उचल नि त्यावर नेम धर पाहू ! " युधिष्ठिर ने धनुष्यबाण उचलला नि नेम धरला. तसे द्रोणाचार्य उद्गारले ," आता मला सांग ,काय दिसते तुला? त्यावर युधिष्ठिर उत्तरला,
"आकाश, पृथ्वी !"
" नाही. तू हो बाजुला." त्यानंतर दुर्योधन ला बोलविले नि
त्याला सुध्दा तेच करायला सांगितले. नि शेवटी त्यांनी त्याला ही तेच विचारले की ,काय दिसते तुला ? " दुर्योधन उद्गारला ," ह्या वृक्षावर एक पक्षी लपविलेला आहे. गुरुदेव ! "
" नेम धर." थोड्या वेळानंतर विचारले ," आता काय दिसते
तुला ?" दुर्योधन उद्गारला," पानाच्या आड लपलेला पक्षी
गुरुदेव ! बाण सोडू का ?" द्रोणाचार्य म्हणाले ," नाही." त्यानंतर अश्वत्थामा ला ही तेच करायला सांगितले नि ठरल्या
प्रमाणे त्याला देखील तेच विचारले ," की तुला काय दिसते."
अश्वत्थामा उद्गारला ," आपले चरण ,वृक्ष आणि वृक्षाच्या पानाच्या आड लपलेला पक्षी !" शेवटी अर्जुनाला बोलविले
नि त्याला सुद्धा तेच सांगितले जे इतरांना सांगितले होते.
आणि शेवटी त्याला सुद्धा तोच प्रश्न केला की तुला काय
दिसते. ? " तेव्हा अर्जुन उद्गारला ," मला फक्त त्या पक्षाचा एक डोळा दिसत आहे." त्यावर द्रोणाचार्य खुश होऊन म्हणाले ,
" ठीक आहे." असे म्हणून ते किंचित थांबले. उसासा सोडत ते पुढे म्हणाले ," धनुर्धर ला आपल्या लक्ष च्या व्यतिरिक्त दुसरं काहीही दिसले नाही पाहिजे. " तेव्हा
अश्वत्थामा पुढे येत म्हणाला ," आपला हा शिष्य आपल्या कडे क्षमा मागत आहे, गुरुदेव !" तेव्हा द्रोणाचार्य उद्गारले ,
" तू माझा जीवन प्रकाश आहेस, परंतु ईर्ष्या करणे चांगली गोष्ट नाहीये. कारण ईर्ष्या केल्याने मनुष्याच्या गुणांना वाळवी लागते . तू द्रोणाचार्याचा उत्तराधिकारी आहेस ; परंतु द्रोणाचार्यांचा श्रेष्ठ धनुर्धर शिष्य हा कुंती पुत्र अर्जुनच आहे."
सांदपनि ऋषी गुरुमातेच्या इच्छेनुसार बलराम आणि कृष्ण त्या दोघांना विद्या शिकविण्याचा बहाणा करून त्याना
थांबविले होते ; परंतु नंतर त्यांनाच ते चूकीचे वाटू लागले.
म्हणून मग त्यांनी निर्णय घेतला की आता काही झाले तरी
ह्या दोघांना इथे अडकवून ठेवायचे नाही. आणि म्हणूनच की
काय कृष्णाला बोलवून आणायला सांगितले.
" आपण बोलविलेत मला गुरुदेव !" बलराम ने विचारले.
" हां ! कृष्णाला बोलवून आण. "
" जशी आज्ञा गुरुदेव ! " बलराम गेला नि कृष्णाला
बोलवून आणले. तेव्हा सांदपनि ऋषी उद्गारले ," मी तुम्हां
दोघांना गुरुमातेच्या इच्छेनुसार विद्या शिकविण्याचा बहाणा करून आतापर्यंत थांबहून ठेवले होते ; परंतु असे करणे एक गुरूला हे शोभून दिसत नाहीये. म्हणून तुम्ही दोन्ही बंधूनी गुरुमातेला भेटल्याशिवाय सूर्योदय होण्यापूर्वी इथून निघून जायाचे आहे."
" जशी आपली आज्ञा गुरुदेव ! परंतु गुरुमाता भोजनासाठी आमची वाट पाहत असेल. मथुरा जाण्या अगोदर मी तिकडे जाऊन येतो. " त्यावर नाईलाजाने सांदपनि
ऋषी उद्गारले ," तुला जिथं जायचं असेल तेथे जा."
" गुरुदक्षिणा दिल्याशिवाय मी इथून कसा बरं जाऊ शकतो."
" माझ्या बरोबर ही लीला करतोस लीलाधर कृष्ण ?"
" परंतु लीला मध्ये सुध्दा कर्तव्य पालन तर करावेच
लागते ना गुरुदेव ! गुरुदक्षिणा दिल्याशिवाय शिष्याचा त्या
विध्देवर अधिकारच नसतो. मग काय आपली इच्छा आहे की
मी गुरुदक्षिणा दिल्याशिवाय निघून जाऊ ?"
" गुरुदक्षिणा काय द्यायची ती मी तुझ्यावर सोडतो. तुला
जे काय द्यायचे ते दे, मी ते आनंदाने स्वीकारीन."
" मी तर गुरुमातेची इच्छा पूर्ण करू इच्छितोय."
" इच्छा तर माझी सुध्दा तीच आहे , परंतु गुरूला आपला स्वार्थ पाहण्याचा काहीही अधिकार नाहीये."
" परंतु शिष्याला तर आपला स्वार्थ पाहण्याचा अधिकार
आहे ना गुरुदेव. गुरुमाते ने मला जे प्रेम दिलं ते फक्त एक
माताच देऊ शकते. ती सुध्दा फक्त आपल्या मुलांसाठीच असते. तिने दिलेल्या प्रेमाला सोडून मी जाऊ शकत नाही."
" परंतु तू त्याला शोधणार कुठं ? खूप दिवस झालेत त्या
गोष्टीला. तुम्ही दोघेही निघून गेल्यावर ती हळूहळू विसरेल
तुम्हां दोघांना. " सांदपनि उद्गारले.
" मी त्याला शोधायला अवश्य जाईन. " श्रीकृष्ण उद्गारला.
" परंतु तू त्याला शोधणार कुठे आणि कसे ?"
" शोधायला तर तेथेच जावे लागेल ,जेथून तो हरवला आहे." एवढं बोलून श्रीकृष्ण गुरुमाते जवळ गेला नि म्हणाला, " गुरुमाते आज भोजन नाही करविणार का आम्हाला ?" तशी गुरुमाता उद्गारली ," मी तुला नाही जाऊ देणार !"
" गुरुमाता मी आपल्या स्नेहाचा ऋणी आहे, मी ते ऋण
फेडल्या शिवाय इथून जाऊ शकत नाही."
" अरे, तुला जायला कोण सांगतोय ? तू आल्यामुळे मी
मी माझ्या पुत्राला सुध्दा विसरून गेले. त्याच्यासाठी रडताना तू मला कधी पाहिलेस का ? मी देवकी अथवा यशोदा बरोबर
स्वतःची तुलना नाही करत आहे वत्स !"
" परंतु आईचे ऋण फेडले तर जाऊ शकते."
" अरे, आईला होणारा त्रास स्वतः नारायण पण समजू
शकणार नाही. कारण तो परमपिता आहे, परममाता तर
नाहीये ना ?"
" माते !"
" कोणत्याही गुरुमातेला हे शोभत नाही. आता त्यांची
जाण्याची वेळ झाली आहे, वसुदेव कृष्ण मथुरा जाणार आहे,
तेव्हा ते जे काय देतील ते प्रसाद समजून त्याचा स्वीकार कर."
" हां हां जाऊ दे त्याना ,मी थोडीच रोखणार आहे त्याना.
परंतु त्याला जर वाटत असेल की मी हसत हसत त्याला जायला सांगू तर त्याची ती चुकीची समजूत आहे."
तेवढ्यात बलराम उद्गारला , " आता तर जायची वेळ झाली गुरुमाता म्हणून आजच्या दिवशी तरी मला आपल्या
हाताने भरव ना माते. खरं सांगतो माते माझे पोट तर नंद गावात ही भरले नाही आणि मथुरा मध्येही भरले आणि इथं सुध्दा नाही. मोठा भाऊ बनून आल्याचा मला आता पश्चाताप होऊ लागलाय.." त्यावर कृष्ण हसून म्हणाला ," दाऊ तू माझा मोठा भाऊ बनून ये किंवा छोटा पण पश्चाताप तर तुझ्याच वाट्याला येणार." श्रीकृष्ण उद्गारला.
" जेष्ठ पुत्र होण्याचा अधिकार पहिल्या पुत्राला मिळायला
पाहिजे ना गुरुमाता !" बलराम बोलला
" आईचा स्नेह सर्व मुलांवर सारखाच असतो वत्स ! "
सांदपनि ऋषी उद्गारले.
" आता चल माते आम्हाला भोजन करू दे, फार भूक
लागली आहे, आणि त्यानंतर आपल्या पुत्राला पण तर
आणायला जायचंय , म्हणून आज तू अगोदर मला भरवशील
आणि माझं जाणे तर फारच जरुरी आहे."
" ते का दाऊ ? "
" भोजन पचविण्यासाठी ! " ते दोघेही तेथून निघून जातात. आणि थोड्या वेळाने गुरुमातेच्या मुलासहित परत
येतात, तेव्हा गुरुमाता उद्गारली ," माहीत नाही पुत्र मिळाल्याचा जास्त आनंद आहे की वसुदेव आता आपल्याला
सोडून जाणार त्याचे दुःख अधिक आहे."
" मी आपल्याला सोडून कुठं जात आहे ?"
" ह्याचा सर्वांत मोठा नि पहिला गुण हाच आहे की हा कुणाला भेटत नाही. आणि ज्याला कुणाला भेटला त्याला
हा सोडत नाही." असे म्हणून गुरुमातेला प्रणाम केला. तशी
गुरुमाता उद्गारली ," आयुष्यमान भव ! " त्यानंतर सांदपनि ऋषीना प्रणाम करतात. तेव्हा तेही आशिर्वाद देतात. तेव्हा
बलराम कडे एक गाठोडं असते. ते सांदपनि ऋषींच्या कडे देऊ लागतो तेव्हा ते विचारतात की ते काय आहे ?"
बलराम बोलला ," ते आम्हाला सुध्दा माहीत नाही."
सांदपनि ऋषींच्या पुत्राने त्याना प्रणाम केले. त्यांनी
आयुष्यमान चा आशीर्वाद दिला. त्यानंतर श्रीकृष्ण उद्गारला ,
" हे आपल्या पुत्रा सोबत आपल्यासाठी आणले आहे, आपण त्याचा स्वीकार करावा. " गाठोडे सोडून पाहतात तर त्यात एक शंक असतो. तो हातात घेऊन सांदपनि ऋषी उद्गारले ," हा पंचजन्य शंक आहे."
" तो आपल्यासाठी आहे."
" नाही. हा शंक तुझ्या जवळच राहिल. कारण तो तुझीच
वाट पाहत होता. ह्याला फुंकून जुन्या युगाची समाप्ती नि
येणाऱ्या युगाची घोषणा कर कृष्ण !"
" जशी आपली आज्ञा गुरुदेव !" असे म्हणून श्रीकृष्णा ने
आपल्या ओठांवर ठेवून जोराने फुंकला. त्याचा आवाज सर्वत्र
धुमधूमला.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा